प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५७. Khushi Dhoke..️️️ द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५७.








सत्कार सोहळा पार पाडून सगळे घरी निघून येतात.... जो - तो आपल्याच कामात बिझी होतो..... सुकन्या वर आपल्या रूम मध्ये निघून जाते...... तिला एक वेगळीच अस्वस्थता जाणवते..... ती कधी काउच, कधी बेड तर, कधी गॅलरी मधला झोपाळा असं थोडा - थोडा वेळ सगळीकडे फिरते..... शेवटी जाऊन बेडवर आडवी होते आणि यूट्यूब वर साँग प्ले करते.....


शायद कभी ना कह सकूँ मैं तुमको
कहे बिना समझ लो तुम शायद
शायद मेरे ख्याल में तुम एक दिन
मिलो मुझे कहीं पे गुम शायद
जो तुम ना हो रहेंगे हम नहीं
जो तुम ना हो रहेंगे हम नहीं
ना चाहिए कुछ तुमसे ज्यादा
तुमसे कम नहीं
जो तुम ना हो
तो हम भी हम नहीं
जो तुम ना हो
तो हम भी हम नहीं
ना चाहिए कुछ
तुमसे ज्यादा
तुमसे कम नहीं


ती साँग बदलते....


एहसास की जो ज़ुबान बन गए
एहसास की जो ज़ुबान बन गए
दिल में मेरे मेहमान बन गए
आपकी तारीफ में क्या कहें
आप हमारी जान बन गए
आप हमारी जान बन गए
आप ही रब आप ईमान बन गए
आप हमारी जान बन गए आ..
किस्मत से हमें आप हमदम मिल गए
जैसे की दुआ को अल्फाज़ मिल गए
सोचा जो नहीवो हासिल हो गया
चाहूँ और क्या की खुदा दे अब मुझे
रब से मिला एक अयान बन गए
ख़्वाबों का मेरे मकान बन गए
आपकी तारीफ में क्या कहें
आप हमारी जान बन गए
आप हमारी जान बन गए
आप हमारी जान बन गए
आप ही रब आप ईमान बन गए
आप हमारी जान बन गए


ती पटकन यूट्यूब बंद करते आणि गॅलरी मध्ये जाऊन उभी राहते.....

मनात स्वतःशीच बोलू लागते....

सुकन्या : "मी आणि रोमँटिक साँग्स..... शीट.... कधी पासून ऐकायला लागले..... आजच.... हो आजच ऐकले.... हा पण, ती फिलिंग छान होती..... डोळे बंद करून ऐकलं तर....."

असं म्हणत, ती डोळे बंद करते आणि शांत होते.... थोड्याच वेळात समोर शौर्यचा फेस...... ते बघून ती पटकन डोळे उघडते.... लगेच बाथरुम मध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी घेते..... फ्रेश होऊन बाहेर येते....

सुकन्या : "काय होतंय मला हे..... का त्याचा विचार करतेय इतका मी???"

थोड्या वेळात जयाचा आवाज कानावर पडतो.....

जया : "सुकन्या बाळा बाहेर ये चल.... जेवायला वाढलंय...."

सुकन्या : "हो मम्मा आले....."

ती जेवायला खाली निघून जाते.... जेवताना ती एकही शब्द न बोलताच जेवण करते.... सगळे तिला फोर्स ही करत नाहीत.... कारण, नॉर्मली ती निराश, हताश असली की, कोणीच आधी विचारत नसतो.... तिचा मूड सुधारला की, तिच सगळ्यांना नेमकं काय झालं होतं हे क्लिअर करते....

सगळे जेवणं आटोपून आपापल्या रूममध्ये निघून जातात.... सुकन्या ही तिच्या रूममध्ये निघून येते.....

@सल्लूची रूम.....

ऊर्वी : "सल्लू अरे सुकन्या..... ती आज किती शांत होती ना....."

सल्लू : "मला माहितीये ती का इतकी शांत होती.... ज्या फिलिंग्स तिने आज पर्यंत दाबून ठेवल्या होत्या..... आज त्याच तिला छळत आहेत..... बेटर की, ती हे सर्व लवकर एक्सेप्ट करेल...."

ऊर्वी : "पण, मला तिच्या डोळ्यात शौर्य विषयी चमक दिसली अरे.... मग, ती का मान्य करत नसेल...."

सल्लू : "आपण ना ऊर्वी, खूप क्षणिक विचार करत असतो....."

ऊर्वी : "म्हणजे??"

सल्लू : "बस, सांगतो......"

दोघेही काऊच वर बसतात.....

सल्लू : "नॉर्मली काही मुलींच्या बाबतीत काय घडतं ते सांगतो.... त्यांना पुढचा व्यक्ती सुटेबल वाटतो.... पण, तो आपल्याला आवडतो हे त्याला जाऊन सांगायला.... त्यांच्या इगोला ते वागणं सुटेबल नसतं.... त्यांना सगळ्या फिलिंग्स अनुभवायच्या असतात.... पण, स्वतःचं नाव तिथे कुठेही नको असतं.... मग हळूच त्या ह्या सर्व फिलिंग्स एकट्यात अनुभवतात..... मला वाटतं सुकूचा हाच प्रॉब्लेम असेल.... कदाचित कोणाच्या नजरेत यायचं नसेल आणि म्हणून हे सर्व तिला मान्य करायचं नसेल.... ती चुकीची असं मी म्हणत नाही..... पण, स्वतःला त्रास करून काय अर्थ ना..."

ऊर्वी : "मला एक प्रश्न पडलाय आता..... म्हणजे, तिच्या मनात फिलिंग्स आहेच...... असं आपण कसं म्हणू शकतो?? होऊ शकतं ते थोड्या वेळासाठी असेल जे मी तिच्या डोळ्यात बघितलं...."

सल्लू : "होऊ शकतं ते क्षणिक असेल.... कारण, एखादी गोष्ट आपल्याला थोड्या वेळासाठी खूप आवडून जाते आणि आपल्या डोळ्यांतून समोरचा ते ओळखू शकतो.... आणि मला खूप चांगल्याने माहितीये..... तिला सोशल वर्क करायचं आहे..... आता ऐक, तुला सांगतो.... मोस्टली काय होतं.... आपल्याला आपल्याच आवडी - निवडी जपणारा हवा असतो.... अँड शौर्य परफेक्ट आहे तिच्यासाठी.... पण, हे मान्य करायला तिचं मन तयार नाही.... रादर, तिलाच कोणाला दाखवायचं नसेल....."

ऊर्वी : "अरे पण, कधी पर्यंत असं चालेल ना..... एक ना एक दिवस तर तिला हे मान्य करावंच लागेल ना.... मग तो शौर्य असो वा कोणी??"

सल्लू : "आता हे तर ती ठरवेल..... तिला कधी मान्य करायचं ते.... आपण तर फक्त ती कुठल्या प्रॉब्लेम मध्ये नको फसायला इतकंच बघू शकतो..... राईट...."

ऊर्वी : "बट, तुला एक सांगू का....."

सल्लू : "बोल...."

ऊर्वी : "काहींच्या बाबतीत काय असतं..... त्यांना एखाद्या रिलेशनशिपमध्ये मुद्दाम बांधण्यात येतं आणि नंतर त्यांच्यात प्रेम होतं.... असं जर आपण करून बघितलं?? म्हणजे, शौर्य आणि सुकूचं ऑफिसियली रिलेशन अंनाउन्स केलं त्यांची एंगेंजमेंट करून दिली... मग हळू - हळू होईलच प्रेम...."

सल्लू : "हा निव्वळ मूर्खपणा आहे.... याची काय गॅरंटी की, त्यांच्यात पुढे जाऊन प्रेम होईलच...? आणि एक फॅक्ट सांगतो..... एकदा एक क्रिमिनल किती तरी वर्ष कोठडीत डांबून ठेवण्यात आला होता.... नंतर शिक्षा संपली आणि त्याला जायला सांगण्यात आलं.... तर, तो जातच नव्हता कारण, त्याला त्या कोठडीची सवय झालेली.... तर, काही दिवस सोबत राहून सवय होऊ शकते प्रेम नाही.... ते व्हायचं तर एका क्षणात ही होईल नाही तर कितीही प्रयत्न करून ते होणार नाही..... राहिली गोष्ट सुकन्या अँड शौर्य ची तर, त्यांना एंगेज केलंच म्हणून, ते रिलेशन त्यांना मान्य करावं लागणं हे तर सॅक्रिफाईस झालं ना..... हे बघ प्रेम वगैरे ज्याचा - त्याचा विषय.... आता सुकन्या कधी मान्य करेल.... हे आपण तिच्यावर सोडूया.... पण, जेव्हा कधी तिला जाणीव होईल..... त्यासाठी आपण त्या मनःस्थितीत तयार राहून ते सेलिब्रेट करायचं.... ओके.... चल आता जास्त विचार नको करू..... आराम कर..... मी येतो एक लेक्चर आहे माझं....."

ऊर्वी : "अरे पण सुकन्या?"

सल्लू : "हे बघ ती सध्या गोंधळात आहे.... मी त्यादिवशी तिला समजावलं ना..... तरी आज ती गोंधळात आहेच.... म्हणजे, नक्कीच ती काही तरी विचार करत असेल........ आणि जर आपल्यातलं कोणी तिला जाऊन विचारलं.... तर, ती अजूनच टेन्शन घेईल.... मग प्रत्येकाचं मत वेगळं.... सगळ्यांचं ऐकून ती त्यांच्या नुसार विचार करायला लागेल.... मला हेच नकोय.... कोणाच्याही ओपिनियनचा ऑर डिसिजनचा माझ्या सलमावर इफेक्ट नकोय मला..... जे काही असेल ते तिचं स्वतःचं असावं इतकंच मला वाटतं...."

ऊर्वी : "बरोबर आहे तुझं....."

सल्लू, ऊर्वीच्या कपाळावर ओठ टेकवतो.....

सल्लू : "तू आराम कर..... येतो मी...."

सल्लू निघून हॉल मध्ये येतो......

आजी : "बेटा कुठे निघालास अरे....?"

सल्लू : "एक लेक्चर हैं.... आता हू... शाम तक...."

आजी : "बेटा, सुकन्या अरे....."

तो जाऊन आजिसमोर गुडघ्यावर बसतो आणि तिचे दोन्ही हात स्वतःच्या हातात पकडून तिला समजावत बोलतो.....

सल्लू : "आम्मिजी..... उसे सोचने देते हैं..... अगर हम में से कोई उससे बात करेगा तो वो खुद के हिसाब से नहीं सोच पाएगी.... चल आता हूं....."

आजी : "ठीक हैं.... बेटा आराम से जाना....."

आजी आराम करायला निघून जाते.... सगळे आपापल्या रूममध्ये आराम करत असतात.... मात्र, सुकन्याच्या डोक्यात अजूनही विचारचक्र सुरूच असतं.....

सुकन्या : "काय होतंय मला.... ना धड कुठे मन लागत आहे ना काही..... एक काम करते, कॉलेज पूर्ण होई पर्यंत कसलाच विचार करत नाही..... कॉलेज संपल्यावर, आजोबा ज्या प्रोजेक्ट बद्दल बोलले होते तो जॉईन करते..... शीट, तिथे शौर्य सोबत असेल..... पण, असुदे मग त्याचं काय.... बघून घेईल.... मी माझं फोकस क्लिअर ठेवते... अँड तसं ही मला का इतका विचार करावा लागतोय..... जेव्हा मला कोणाचं प्रेम नकोच आहे.... प्रेम नको आहे असं म्हटलं की, मला असं का होत असेल.... नक्की काय होतंय मला कळतंच नाहीये..... जाऊदे मी आता कॉलेज संपे पर्यंत कोणाशीच भेटणार नाही ना बोलणार कोणाशी.... मग तर कोणी डोक्यात ही येणार नाही ना.... झालं मग....."

इतकं सर्व गोंधळ सुरू असता ती स्वतःच्या मनाची समजूत काढत झोपी जाते.....

असेच दिवसामागून - दिवस जातात..... तिचं ग्रॅज्युएशन ऑलमोस्ट संपत येतं.... आणि एक दिवस प्रोजेक्टच्या फायनल सबमिशन डेट्स अनाऊंस होतात.....

१८ जुलै फायनल सबमिशन... पूर्ण तयारी करून ती कॉलेज साठी रेडी होते..... सर्वांच्या आशीर्वादाने बाहेर पडते..... कॉलेजच्या रस्त्यावरून जाताना तिची स्कूटी स्लिप होते आणि ती जाऊन एका झाडाला आदळते....
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️