न्याय - The Punishment Of Death Anmol Yadav द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

न्याय - The Punishment Of Death

दोन शब्द......

मी कोणी साहित्यिक नाही,लेखक नाही,संपादक नाही मी आहे तो तुमच्या सारखा एक सामान्य वाचक... लहानपणा पासूनच वाचनाची आवड होती.रहस्य,थरारक,साहसी गोष्टींच मला प्रचंड वेड.शेरलॉक होम्स मी लहानपणीच वाचून काढले होते. ही वाचनाची आवड लेखनात कधी बदली गेली हेच कळाल नाही.मी छोटे मोठे लेख लिहू लागलो.पण काल्पनिक कथा म्हणा किंवा लेख म्हणा मला कधी जमेलच नाही.मी तसा प्रयत्न सुद्धा केला नव्हता. पण खूप दिवसांनी मनात ठरवून मी माझी पहिली वहिली कथा लिहली आहे.सुजाण वाचक वर्ग माझ्या पहिल्या कथेला प्रतिसाद देतील अशी आशा आहे.
सध्या भारतात गंभीर आणि तितकीच नाजूक बाब म्हणजे स्त्रियांवरील वाढते अत्याचार.हल्ली हे प्रमाण वाढतच चाललं आहे.अश्या केसेस मध्ये आरोपींना कडक शिक्षा होणं ही काळाची गरज बनली आहे. "न्याय-The punishment Of Death" ही माझी कथा सुद्धा ह्याच विषयावर प्रकाश पाडणार आहे.न्याय व्यवस्था शक्तिशाली असेल तर ती का नाही अत्याचार करणाऱ्या आरोपींना मृत्युदंड देत.?अत्याचार करणाऱ्याना कडक शासन होण्यासाठी कडक कायदे केले पाहिजेत हेच ह्याच कथेतून मला सुचवायचं आहे.
माझ्या पहिल्या कथेला वाचक वर्ग काही चूक झाली असेल तर समजू घेतील अशी आशा आहे.

******************************************
सूचना-
या कथेतील सर्व मजकुराचे आणि आशयाचे कॉपीराईट स्वाधीन आहेत.त्यातील कशाचीही छायांकित प्रत काढणे,त्याचे पुनमुद्रनण करणे किंवा अन्य कोणत्याही माध्यमात रूपांतर करणे हा कॉपीराईट कायद्याचा भंग ठरेल.तसे केल्यास कायदेशीर मार्गाने कारवाईस सामोरे जावे लागेल.ह्याची नोंद घ्यावी.
*******************************************

"न्याय-The Punishment Of Death."

अनमोलरत्न.

*******************************************

वेळ रात्री दोनची...ठिकाण मुंबई... मुंबई सारख्या शहराच्या धावपळीच्या जगण्यातून सर्व निद्रा देवीच्या स्वाधीन झाले होते.पण तरीही मुंबई हे कधी न झोपणार शहर त्यामुळे रात्री सुद्धा काही प्रमाणात तुरळक वर्दळ होतीच...अंधाराने आपली चादर संपूर्ण शहरावर टाकली असली तरी अत्याधुनिक दिव्यांनी मात्र शहर उजळून निघालं होत...जणू ते अंधाराच साम्राज्य नष्ट करू पाहत होते..पण अंधारही जणू त्यांना हरवु पाहत होता..रस्त्यावरच्या दिव्यांनी अंधाराच साम्राज्य कमी केलं असल तरी मुंबई सारख्या शहराच्या गल्ली-बोळात अंधाराच साम्राज्य अजूनही अबाधित होत...काळाकुट्ट अंधार कोणाला तारक ठरतो तर कोणाला मारक. उदाहरण घ्या जे व्यवसाय दिवसाचे चालत नाहीत ते व्यवसाय रात्रीच्या अंधारात जोमाने चालतात.प्रेमी युगली व्यक्तींना सुद्धा एकांतात घालवायला अंधारच तारतो. म्हणून दिवसा पेक्षा रात्रीचेच समुद्रकिनारे जास्त गजबजले नसतात का?असो आजच्या रात्रीचा अंधार सुद्धा समान वाटणी करणार होता एकाला तारक तर एकाला मारक ठरणार होता....!! अंधाराच्या साम्राज्याचा फायदा घेऊन एक ब्लॅक कोट घातलेली व्यक्ती झप-झप पावले टाकून चालत होती..तिने घातलेल्या बुटांमुळे अंधारातली शांतता चिरत जात होती..आणि त्याच व्यक्तीच्या पुढे एक अजून व्यक्ती सुद्धा झप-झप पावले टाकून मागे वळून बघत चालत होती...जणू तिला त्या व्यक्तीपासून लवकरात लवकर लांब जायचे होते.पण मागून चालत येणारी व्यक्ती त्या पेक्षा सरस वाटत होती.अचानक त्या पुढे पळणाऱ्या व्यक्तीने मागे वळुन बघितलं तर ती पाठलाग करणारी व्यक्ती जणू अंधाराने गिळून टाकली.त्याने मागे वळून एक-दोन वेळा इकडे-तिकडे बघितलं पण जणू ती व्यक्ती वाऱ्या सारखी गायब झाली होती. मनातून जणू तो खुश झाला होता आणि ती व्यक्ती गायब झाल्याचा फायदा घेऊन परत तो मागे वळून निघालाच होता तोच समोर ती व्यक्ती उभी. जणू त्याला धक्काच बसला आणि तो मागे जाऊन अडखळत पडला.त्या व्यक्तीने तोंडवर घातलेला कोट बाजूला केला आणि एक रहस्यमयी हास्य चेहऱ्यावर आणून त्याच्या भीतीमध्ये आणखी भर घातली...खाली पडलेल्या व्यक्तीला जणू कापरच भरलं तो अडखळत बोलू लागला त...तू...तू.. हे कसं शक्य आहे.भु..भु..भूत....नाही असं कसं होऊ शकत..आणि तो ओरडणार तितक्यातच त्या व्यक्तीने कोटमधलं कसलं तरी द्रव्य भरलेलं इंजेक्शन त्या माणसाच्या गळ्यात मारलं. आणि ती व्यक्ती जाग्यावरच तडफडू लागली..जणू मृत्यू देवतेने त्याला शेवटच ओरडण्यासाठी देखील संधी दिली नाही.जाग्यावरच तो गतप्राण झाला..आणि अंधारच्या काळोखी साम्राज्याचा फायदा घेत ती व्यक्ती सुद्धा अंधारात गुडूप झाली...आजचा अंधार जणू तारक आणि मारक ठरला होता....*******************************************"अरे निशांत उठतोयस की नाहीस.आज तुला कामावर जायचं नाही आहे का?" असा त्याच्या पत्नीचा गोड आवाज निशांत च्या कानावर पडला.तरी म्हणाव तस निशांत साहेब अजून उठले नव्हेतच.त्याच वेळेला निशांत चा फोन वाजला पण निशांत अजून झोपेत असल्याने त्याच्या पत्नी ने म्हणजेच निशा ने फोन उचला.फोन वर कदम हवालदार होते."हॅलो गुड मॉर्निंग सर" कदम बोलत असतानाच निशा ने त्यांच वाक्य तोडत त्यांना अडवलं,"थांबा दोन मिनिट तुमचे साहेब अजून झोपले आहेत उठवते मी त्यांना" अस बोलून निशा ने निशांत ला हलवून जाग केलं आणि बाजूला बसून मोबाईल त्याच्या कानाला लावला आणि सांगितलं हवालदार कदम ह्याचा फोन आहे.निशांत तसाच झोपुन कॉल वर बोलू लागला,"गुड मॉर्निंग बोला कदम काय लोचा झाला सकाळ सकाळ "निशांत."गुड मॉर्निंग सर जय हिंद.विलेपार्ले ला एका वस्तीच्या कडेला एक डेड बॉडी सापडली आहे.असा आताच एक कॉल आला होता" काय!निशांत डोळे चोळत उठून बसू लागला.बाजूला निशा त्यांचं बोलणं ऐकत होतीच. "ठीक आहे कदम तुम्ही जीप घेऊन निघा मी अर्ध्या तासात पोहचतो तो पर्यंत बॉडी ला कोणाला हात लावू देऊ नका.आपल्या सर्व टीम ला ताबडतोब बोलावून घ्या.फॉरेन्सिक टीमला सुद्धा तात्काळ रिपोर्ट करा.आणि मला पत्ता व्हाट्सअप करा.मी येतोच."निशांत "ठीक आहे सर जय हिंद"कदम.कॉल कट होताच निशांत ने मोबाईल बाजूला ठेवला.आणि बाजूला बसलेल्या निशा ला अचानक जवळ ओढल्यामुळे निशा दचकली."अरे काय करतोयस केस आली आहे ना जा आवर वेळ होतोय"निशा "हे बर आहे हा तुझं रात्रीच जाग ठेवायचं मला आणि सकाळी लवकर उठवायच"डोळे मिचकवत निशांत म्हणाला. तस निशा त्याला मारू लागली."आता आवरतोयस की" डोळे मोठे करून निशा म्हणाली."हो हो आवरतो राणीसरकार उगाच आपण राग घालू नका नाही तर मला एकाच वेळी दोन केस वर काम करावं लागेल." हसत निशांत म्हणाला.निशा त्याला बेड वरची उशी मारायला लागली तसा तो बाथरूम मध्ये पळाला.निशा ही नाष्टा आणायला किचन मध्ये निघून गेली. निशांत सरपोतदार. एक कर्तव्य निष्ठ PSI.आपल्या कर्तव्यावर ठाम राहणारा, जटिल गुन्ह्यांची उकल करणारा,गुन्हेगारीला आळा घालणारा थोडक्यात दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी होता.अनेक सामाजिक संस्थाना तो सढळहस्ते मदत करे,अनेक अनाथ मुलांच पालकत्व त्याने स्वीकारलं होत.त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील उचला होता.. कमी वेळेतच त्याने आपली कर्तव्यनिष्ठा दाखवून दिली होती..गुन्हेगारी क्षेत्रातही त्याच्या नावाचा एक दबदबा निर्माण झाला होता.अनेक भाई-गुंड त्याला घाबरून राहत.असा हा कर्तबगार पोलीस ऑफिसर निशांत सरपोतदार.त्याची पत्नी निशा सरपोतदार. एक उत्तम आर्टिस्ट होती. ती घरात बसून कंटाळा येऊ नये आणि आवडही जपावी म्हणून घरातच लहान मुलांचे चित्रकलेचे क्लास घेत असे.दोघांचही घरच्यांच्या संमतीने लव्ह मॅरेज लग्न झालं होतं त्यामुळे त्यांच्यातलं प्रेम लग्ना नंतरही अतुट होत..दोघेही समाधानात होते..निशांत नुकताच फ्रेश होऊन वर्दी चढवून रूम मधून खाली आला.वर्दी मध्ये त्याचा रुबाब उठून दिसत होता.खरच त्याच वर्दी मध्ये व्यक्तिमत्त्व उठून दिसत होत.तो खाली आला आणि किचन मध्ये नाष्टा तयार करत असलेल्या निशा ला मागून त्याने मिठी मारली."प्लिझ आता आग्रह करू नकोस मी बाहेर जाऊन फ्री झालो की खातो.तू नाष्टा करुन घे" निशांत "अरे पण थोडा नाष्टा करून जा उपाशी पोटी नको जाऊस ना"निशा. "प्लिझ ना राणी साहेब आम्ही आता जर वेळेत गेलो नाही ना तर तिकडे काही आणखी गडबड झाली तर आणखी कठीण होऊन बसेल. सो पिल्झ जातो रात्री एकत्र जेवू प्रॉमिस"निशांत."ठीक आहे सावकाश जा आणि लवकरच ये वाट बघतेय मी."निशा.हो ग लवकरच येतो अस बोलून तो तिला परत मिठी मारून कपाळावर किस्स करून केस च्या ठिकाणी त्याच्या रॉयल एनफील्ड बुलेट ने जायला निघाला.....*******************************************ठिकाण-:विलेपार्ले.झोपडपट्टी निशांत जेव्हा कदमांनी व्हाट्सअप केलेल्या क्राईम स्पॉट जवळ पोहचला तेव्हा एका ठिकाणी जमलेली गर्दी पाहूनच क्राईम स्पॉट हाच असेल हे कळायला त्याला वेळ नाही लागला.जणू एखादा फुकट शो बघायला मिळेल अस समजून लोकांनी क्राईम स्पॉट जवळ गर्दी करून ठेवली होती.पत्रकार सुध्दा जीव ताणून आपल्या चॅनेल चा टीआरपी वाढवण्यासाठी झालेल्या मर्डर चा रिपोर्टिंग करत होते...निशांत क्राईम स्पॉट जवळ जाण्यास निघाला कदमांनी लांबूनच निशांत ला बघितलं तस लगबगीने ते निशांत जवळ आले आणि एक कडक सल्युट मारला "जय हिंद सर"कदम."जय हिंद कदम"निशांत."कदम ह्या पत्रकारांना इथे कोणी बोलावलं?"निशांत. "सर ज्याचा खून झालाय तो सुद्धा एक पत्रकार आहे म्हणून ह्यांना सांगावं लागलं नाही त्यांना जणू गरमच विषय भेटला आहे"कदम."काय!पत्रकार आहे?बर बर चला बघून घेऊ"निशांत.निशांत क्राईम स्पॉट जवळ पोहचतो.गुलाबी रंगाचा फुल शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेला इसम जणू त्याने मरण्यापूर्वी काही तरी भयंकर पाहिलं असावं अश्या अवस्थेत पालथा पडलेला दिसला.त्याच्या बाजूला त्याची बॅग पडलेली आढळली. "सर ही बॉडी"कदम."कदम इथे एक रक्ताचा थेंब दिसत नाही आहे आणि तुम्ही खून हा अनुमान काढून पण मोकळे झालात"निशांत."सॉरी सर पण मला कॉल आला तेव्हा कॉल केलेल्या व्यक्तीने असच सांगितलं"कदम."ठीक आहे कदम आपण सध्या तरी संशयास्पद मृत्यू म्हणून ह्या केस कडे बघू.तुम्हाला ज्याने कॉल केला तो इथे आहे का?"निशांत."हो आहे सर मी बोलवतो"कदम."ठीक आहे कदम तुम्ही त्याला बोलवा आणि गावडे आणि रहाटे ना त्याची बॅग तपासून काय भेटत का ते बघायला सांगा." निशांत.येस सर म्हणून कदम त्या माणसाला बोलवायला गेले.थोड्याच वेळात माणूस निशांत समोर हजर झाला.साधारण 35-40 वर्षाचा असेल.काळाकुट्ट आणि सडपातळ बांध्याचा.बिहारी वाटत होता.थोडासा घाबरलेला."नाव काय रे तुझं?"निशांत."रामू नाम है मेरा सरजी"तो व्यक्ती."तुला मराठी येत नाही का?आणि पूर्ण नाव सांग हे काय रामू वैगरे.राहतोस कुठे?"निशांत. "येते थोडी फार मराठी हमको.मेरा नाव रामलाल है, हम इधरही रहेता है,त्या बाजूच्या झोपडी मै."रामू."ठीक आहे ही तुला बॉडी कधी दिसली?"निशांत."साब मै सुबह इधर से मेरे वडापाव के स्टॉल मै जाता हु सुबह सुबह.आज भी मै जा रहा तो ये साब मुझे इधर दिखे पहिले मुझे तो लगा ये बेवडा होगा पर उनके कपडोंसे वो शरीफ दिख रहे थे,इसलिये मैने उनके पास जाकर उनको आवाज दि पर भी वो हिले नहीं इसलिये मुझें शक आया तो मैने दूर से ही उनकी नाक के पास सांसे देख ली तो वो भी बंद थि इसलिये मैने तुरंत पोलीस को फोन किया.और बता दिया.मुझे पोलीस साब ने इधर ही रुकने के लिए कहा,इसलिये मै आज दुकान भी खोल नहीं पाया. माँ कसम साब मै सच बता राहा हु,अब तो मुझे जाने दो.मेरा सुबह का धंदा तो चला गया हात से अब तो जाने तो.माँ कसम मै सच बता रहा हुं साब" रामुने एका दमात कळवळून सांगितलं.निशांतला ही त्याच्या बोलण्यावरून तो खोटं बोलत आहे असं वाटलं नाही म्हणून निशांत म्हणाला,"ठीक आहे अब तूम जा सकते हो.आणि हे ठेव तुला पाचशे रुपये. तुझा धंदा बुडाला म्हणून. रामू हात जोडत म्हणाला,"ये क्या साब आप हमको शर्मा रहे हो पैसो के लिये मै थोडी रुका यहा,ये तो मेरा फर्ज था." निशांत रामुला अडवत म्हणाला, "रेहने दे रखं तेरे पास पर हमने फिरसे तुम्हे पोलीस स्टेशन बुलाया तो तुम्हे आना पडेगा समझे.अब तुम जा सकते हो." "जी साब मेरा नंबर उन (कदम कडे बोट दाखवून) साब के पास है आप हमको जरूरत पडी तो कभी भी बुलाये हम आता है."रामू. ठीक है अब तुम निकलो"निशांत.रामू गेला तसा निशांत डेड बॉडी जवळ आला आला.फॉरेन्सिक वाले त्यांचं काम करण्यात मग्न होते,फोटोग्राफर सुध्दा वेगवेगळ्या अँगलने फोटो काढत होते.गावडे आणि रहाटे बॅग मध्ये काही भेटत आहे का हे शोधत होते.निशांत ते गुडघ्यावर बसून डेड बॉडीची हाताची नस घेतली. आणि थोडावेळ अंदाज घेऊन ठेवून दिली आणि उठून उभा राहिला."कदम"निशांत ने कदम हवालदाराना हाक मारली."येस सर"कदम."त्या गावडे आणि रहाटे ना काही सापडलं का?"निशांत. तितक्यात मागून रहाटे आले."हो सर ह्याच ओळखपत्र, पॅनकार्ड आणि घराची चावी भेटली बाकी जास्त काही नाही भेटलं"रहाटे."आणा बघू ओळखपत्र"निशांत. निशांत ने ओळखपत्र हातात घेतल.नाव-सुजित सुर्यकुमार वाघमारे.वय 22. संध्यादीप प्रेस सब एडिटर.पत्ता-विलेपार्ले रुद्र हाऊसिंग सोसायटी रुम नंबर 12.निशांत ने इतकं वाचून ओळखपत्र रहाटेंकडे दिल."रहाटे काही रोख रक्कम आहे का बॅग मध्ये?निशांत."हो सर एटीएम कार्ड आणि काही कॅश सुद्धा आहे."गावडे."अच्छा म्हणजे हा घातपात पैशासाठी नक्कीच नाही झाला अस अनुमान काढायला हरकत नाही.गावडे आणि रहाटे तुम्ही दोघांनी सुद्धा डेड बॉडी पोस्टमार्टमला पाठवा.कदम तुम्ही फॉरेन्सिक टीम ला संध्याकाळी पर्यंत रिपोर्ट तयार करायला सांगा.आणि ह्याच्या घरच्यांशी संपर्क करून तात्काळ त्यांना बोलावून घ्या.आणि ह्याच्या ऑफिस मध्ये सुद्धा जाऊन सर्वांची कसून चौकशी करा. दोन लेडी कॉन्स्टेबल सुद्धा सोबत न्या.त्याच कोणत्या मुलीसोबत अफेअर किंवा कोणासोबत भांडण होत का ह्याची सुद्धा कसून चौकशी करा.एकही पुरावा मागे सोडू नका.माझ्या अंदाजे रात्री एक ते तीन च्या दरम्यान ह्याला इंजेक्शन देवून मारलं आहे."निशांत. गावडे,रहाटे आणि कदम एकमेकांच्या तोंडाकडे आवसून बघतच राहिले."अरे अरे इतकं काही हायपर होऊ नका.त्याच्या गळ्या जवळ एकदम बारीक सर्कल दिसतोय आणि आणि त्याच शरीर सुद्धा थंड पडायला आलं आहे म्हणून अनुमान काढलं फॉरेन्सिक आणि पोस्टमार्टम रिपोर्ट आला की कळेलच तोपर्यंत तुम्ही तुमच्या कामाला लागा.माझी आता कमिशनर सोबत मीटिंग आहे कोणत्या तरी पक्षाचा मेळावा आहे त्याच्या नियोजनाची जबाबदारी सुद्धा आपल्यावरच आहे.चार पाच पर्यन्त मी पोलीस स्टेशन ला येतो."निशांत. रहाटे, गावडे आणि कदम एकसाथ सल्युट मारुन "येस सर".*************************************************ठिकाण-: कमिशनर ऑफिस मुंबई. "आय अॅम कमिंग सर ?"निशांत. "येस येस कमिंग निशांत" कमिशनर. निशांत दरवाजा उघडून आत जातो आणि एक कडक सल्युट मारुन उभा राहतो."जय हिंद सर"निशांत."जय हिंद निशांत ये बस"कमिशनर. थँक्स सर बोलून निशांत बसतो. "मला आताच कंट्रोल रूम कडून कळाल आहे तुझ्या कडे एक संशयास्पद मृत्यू ची केस आली आहे तरी सुद्धा मला तुझ्यावर आणखी एक जबाबदारी सोपवावी लागत आहे.आता त्याची थोडक्यात कल्पना तुला असेलच"कमिशनर "येस सर"निशांत "परवा खासदार श्रीनिवास देशमुख ह्यांची प्रचार सभा आहे.सभेला अनेक मान्यवर येणार आहेत,त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुला नियोजन करावं लागेल. आणि योग्य ती खबरदारी घेऊन सभा सुरळीत पार पाडावी लागेल..तू तयार आहेस ना?"कमिशनर. "येस सर.पण मला ठराविक पोलिसांची तुकडी उपलब्ध करून द्या म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नियोजन आखता येईल."निशांत "येस त्याची काळजी नको ते मी तुला आज संध्याकाळी च कळवतो..आता तू जाऊ शकतोस."कमिशनर "येस सर जय हिंद" निशांत पुन्हा एकदा सल्युट मारून तिथून बाहेर येतो...बाहेर आल्यावर घड्याळामध्ये बघतो तर दुपारचे 3 वाजून गेलेले असतात. तो लगेच निशा ला कॉल करतो. "हॅलो निशा" निशांत "बोला सकाळी नाष्टा केलाच नशील ना??" निशा थोडं चिडतच विचारते." "अग माझ्या आई वेळच नाही भेटला ग आता जेवून घेतो नक्की"निशांत "मला माहिती आहे तू ते पण जेवणार नाहीस ठेव कॉल रात्री घरी पण नको येऊस तिकडेच राहा" निशा खूप चिडलेली होती. "ये रागुबाई उगाच रागावू नकोस मी आता जातोय हॉटेल मध्ये विडीओ कॉल करतो बस तुला"निशांत "ठीक आहे फक्त 15 मिनिट नाही केलास तर आज तू बाहेर झोपायचं."निशा "हो ग माझ्या माते" निशांत. कॉल ठेवून निशांत लगेच हॉटेल मध्ये जातो आणि जेवणाची ऑर्डर देऊन निशा ला व्हिडिओ कॉल करतो विडिओ कॉल वर मॅडम नाक फुगवून बसलेल्या असतात.आणि निशांत तिला मस्का लावत असतो.10 मिनिटांत ऑर्डर येते. मग निशांत ला जेवनताना बघून निशा लवकर ये रात्री अस बोलून कॉल कट करते.. निशांत ही पटकन जेऊन पोलिस स्टेशन ला निघून येतो.*******************************************ठिकाण-: पोलीस चौकी. निशांत पोलीस चौकीत पोहचतो. गावडे,रहाटे,कदम अजून आलेले नसतात."जोशी मॅडम कदम रहाटे गावडे आले की तिघांना ही लगेच आत पाठवा आणि एक मस्त चहा पाठवून द्या"निशांत "येस सर पाठवते"जोशी मॅडम.निशांत आत जातो आणि टेबलावरच्या फाईल बघत असतो.जोशी मॅडम चहा देऊन जातात तितक्यात कदम रहाटे गावडे हजर होतात."जोशी मॅडम ह्यांना पण चहा पाठवून द्या"निशांत "ठीक आहे सर"जोशी मॅडम "या बसा काही खबर"निशांत "येस सर मी त्याच्या घरी गेलो होतो पण अस कळाल की तो तिथे एकटाच राहत होता.बाकीची फॅमिली पुण्याला राहते अस मला त्याच्या शेजाऱ्यांकडून कळाल.तसा तो दिवस भर बाहेर असल्या मुळे शेजाऱ्यांशी सुद्धा जास्त संपर्क नव्हता त्याचा त्यामुळे जास्त कळू शकल नाही आम्ही आधार कार्ड द्वारे घरच्यांशी संपर्क करून कळवलं आहे ते उद्या येणार आहेत"कदम. ''ठीक आहे कदम. रहाटे गावडे पोस्टमार्टम रिपोर्ट कधी पर्यंत येईल.?आणि त्याच्या ऑफिस मध्ये जाऊन चौकशी केली का?" निशांत "येस सर पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्ट रात्री आठ पर्यंत मिळून जाईल."रहाटे "आणि आम्ही ऑफिस मध्ये सुद्धा जाऊन चौकशी केली पण हवी तशी माहिती मिळाली नाही.तो दोन वर्षांपूर्वी च कामाला लागला होता.तशी त्याची वागणूक चांगली होती त्यामुळे ऑफिस मध्ये कोणाशी त्याच वैर वैगरे नव्हतं हा पण ऑफिस मधल्या एका मुली सोबत तो रिलेशनशिप मध्ये होता.पण आज ती मुलगी काही बोलायच्या परिस्थिती मध्ये नव्हती म्हणून आम्ही तिला उद्या पोलिस स्टेशन ला बोलावलं आहे."गावडे "व्हेरी गुड ठीक आहे.पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आला की पाठवून द्या.आणि उद्या दुपारी परवाच्या प्रचार सभेच्या सुरक्षा नियोजनाची मीटिंग आहे ह्याची सूचना आपल्या डिपार्टमेंट ला देऊन ठेवा."निशांत "येस सर जय हिंद" तिघे ही एकदम सल्यूट मारून निघून जातात.थोड्यावेळाने कमिशनरचा कॉल येतो. "निशांत तू बोललास म्हणून अजून ठराविक तुकडी उपलब्ध करून देत आहे आता बाकीची जबाबदारी तुझी.ऑल दि बेस्ट."कमिशनर "येस सर थँक यु सो मच" निशांत.निशांत कॉल ठेवतो आणि कामात गढून जातो. आठ च्या सुमारास कदम आत येतात. "आय अॅम कमिंग सर"कदम "येस कदम कमिंग"निशांत "सर हे रिपोर्ट"कदम "ठीक आहे कदम आणा बघू इकडे आणि एक मस्त पैकी चहा घेऊन या सर्वां साठी रहाटे गावडे ना सुद्धा बोलावून घ्या."निशांत "येस सर"कदम. कदम जातात तस निशांत रिपोर्ट वाचायला लागतो.मृत्यूची वेळ साधारण रात्री 2 ते 3 दरम्यान,मृत्यू चे कारण हार्ट अटॅक. मृत्यू आधी काही तरी धक्का बसवा किंवा भीतीदायक पाहिलं असावं.कारण मृत्यू आधी हार्ट बिट्स मोठ्या प्रमाणात वाढलेली होती.गळ्या जवळ इंजेक्शन दिल्या सारखी खूण मात्र ती खूण नक्की इंजेक्शन चीच आहे का हे स्पष्ट झालं नाही. निष्कर्ष-भीतीदायक दृष्य पहिल्या मुळे हार्ट अटॅक येऊन मृत्यू.निशांत ने दोन्हीही रिपोर्ट वाचून टेबलावर ठेवले.तो पर्यंत गावडे रहाटे कदम केबिन मध्ये आले."सर चहा"कदम "या बस तुम्ही पण" निशांत. तिघेही निशांत पुढे बसतात. "सर काय म्हणतोय रिपोर्ट"रहाटे."रिपोर्ट तर खूप काही म्हणतोय रहाटे पण आपल्याला वर वरच बघून चालणार नाही रिपोर्ट च्या खोलात जावं लागेल.कारण दिसत तस नक्कीच नसत.एक काम करा उद्या त्या सुजित वाघमारे ची फॅमिली आली की त्यांच्या कडे डेड बॉडी सोपवण्या आधी त्यांना पोलीस स्टेशन ला घेऊन या.आणि त्याला हार्ट अटॅक किंवा अजून कोणता आजार होता का ह्याची चौकशी करा. पोस्टमार्टम रिपोर्ट म्हणतोय की त्याचा मृत्यू हार्ट अटॅक ने झाला आहे."निशांत. गावडे रहाटे कदम एकमेकांच्या तोंडाकडे आवसून बघतात. "पण मग सर त्याच्या गळ्याजवळ जो सर्कल दिसला तो कोणता होता?"गावडे "तेच तर गावडे रिपोर्ट मध्ये सुद्धा ते स्पष्ट झालं नाही आहे.आणि ते स्पष्ट होत नाही तो पर्यंत बॉडी त्यांच्या फॅमिली कडे सोपवून चालणार नाही.मी आताच प्रसिध्द डॉ.दिक्षितांसोबत बोलून घेतो आणि त्यांना पोस्टमार्टम करण्याचा आग्रह करतो.आय होप नक्कीच काही तरी भेटेल."निशांत "सर तुमचा अंदाज काय म्हणतोय खून की नैसर्गिक मृत्यू?" रहाटे "रहाटे ह्याला सध्या आपण संशयास्पद मृत्यू च म्हणू कारण रात्री दोन वाजता हा तिथे झोपडपट्टीच्या एरियात काय करत होता?त्याचा फ्लॅट तर तिथून अंदाजे 20 मिनिट च्या अंतरावर असेल मग हा रात्री 2 वाजता तिथे का गेला?कोणाला भेटायला गेला की कोणी भेटायला बोलावलं? हे शोधून काढावं लागेल.एक काम करा गावडे आणि रहाटे उद्या परत त्याच्या ऑफिस मध्ये जा आणि त्याच कोणासोबत भांडण वादविवाद होते का? काल तो ऑफिस ला आला होता का घरी कितीला गेला ह्याची सर्व चौकशी करा आणि महत्वाचं त्या झोपडपट्टीच्या एरियात राहणारा ऑफिस मध्ये कोण कामाला आहे का ह्याची पण चौकशी करा" निशांत. "येस सर" गावडे आणि रहाटे एकसाथ बोलतात. "आणि कदम तुम्ही आजच सायबर क्राईम कडून ह्याची कॉल हिस्ट्री आणि लोकेशन हिस्ट्री काढून घ्या आणि उद्या मला संध्याकाळी रिपोर्ट करा."निशांत "येस सर"कदम "आणि उद्या दुपार नंतर पोलीस हेडक्वार्टर ला मीटिंग साठी उपस्थित राहा आता जाऊ शकता तुम्हि.मी सुद्धा आता थोड्या वेळात निघेन.उद्या संध्याकाळ पर्यन्त सर्व रिपोर्ट तयार ठेवा"निशांत "येस सर" तिघेही एकसाथ सल्युट मारतात.तिघे गेल्यावर निशांत राहिलेल्या फाईल पूर्ण करतो.थोड्या वेळाने काम आवरत तस घड्याळात बघतो तर 9:30 होऊन गेलेले असतात. चला म्हणजे घरी गेल्यावर आज बोनस लेक्चर ऐकावं लागणार आहे.निशांत मनातल्या मनातच म्हणत पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो आणि बाईक ला स्टार्ट करून घरी यायला निघतो.निशांत बाईक पार्क करतो आणि घरात येतो.दरवाज्या मध्येच निशा मॅडम कंबरेवर हात ठेवून उभ्या असतात."वाजले किती??" निशा "10 ला पाच मिनिटे आहेत का?"निशांत काही केलंच नाही असा आव आणत बोलतो. "तेच फक्त 5 मिनिट वेळ झाला असता तर तुझं अंथरूण बाहेर ठेवून झोपणार होते मी सकाळी प्रॉमिस केलं होतस ना?" निशा जरा चिडतच बोलते." सॉरी ना वेळ कसा जातो तेच कळत नाही काम करताना" निशांत "हो ना म्हणून बायकोला सुद्धा विसरतोस"निशा "अस नाही ग ते सोड जेवलीस का तू?आणि आत मध्ये येऊ की बाहेरच राहू??" निशांत. निशा काही न बोलता आत जाते आणि जेवायला वाढायला लागते. तोपर्यंत निशांत फ्रेश होऊन खाली येतो."निशा मी विचारल तुला जेवलीस का?" निशांत "नाही नकोय मला" निशा "अच्छा म्हणजे माझ्या बायकोला आज माझ्या हातुन जेवायचा मूड झालाय वाटत" निशांत "तू जा रे बाबा बोलू नकोस" निशा गालातल्या गालात हसत बोलते.निशांत ही तिला जबरदस्ती भरवतो.आणि दोघेही दिवस भराचा थकवा विसरुन एकमेकांच्या मिठीत निद्रा देवीच्या स्वाधीन झाले..************************************************रात्री 12:30 च्या सुमारास वरळी सी लिंक वरून वाऱ्याला चिरत एक कार भर वेगाने पळत होती.जणू ती वाऱ्याशी स्पर्धा करत होती.रात्री ची वेळ असली तरी वरळी सी लिंक वर गाड्यांची लगबग होतीच.पिवळ्या धमक लाईट ने फुलून गेलेला वरळी सी लिंक, खाली असलेला अवाढव्य अरबी समुद्र आणि समुद्राच्या वाऱ्यामुळे झालेलं थंडगार वातावरण.अशा वातावरणात चालेली ती रोल्स रॉयल्स कार सुसाट वेगाने जात होती.सी लिंकला संपूर्ण अत्याधुनिक प्रकाशाच्या साधनाने अंधाराला गायब करण्याचा प्रयत्न झाला असला तरी काही ठिकाणी तुरळक अंधार होताच. आणि हाच अंधार त्या रोल्स रॉयल्स मधल्या व्यक्तीला तारक ठरणार होता. वाऱ्याला चिरत जाणारी ती कार अचानक एका ठिकाणी थांबली.. जणू धो-धो कोसळणारा पाऊस अचानक गायब होतो.तो का थांबला,कधी थांबला ह्याचा पत्ता आपल्याला लागत नाही तसच.त्या व्यक्तीने गाडी थांबवून फक्त इंडिकेटर चालू केले.बाकी हालचाल स्तब्ध. ती गाडीतली व्यक्ती कोणाची तरी वाट बघत होती?मोबाईल वर बोलत होती?की अजून काही करत होती हे त्या गाडी मधल्या व्यक्तीलाच ठाऊक.15-20मिनिट झाली असतील.जस जशी सी लिंक वरील वाहनांची रहदारी कमी झाली तशी गाडी मध्ये हालचाल झालेली दिसून आली.आजूबाजूचा कानोसा घेत त्या गाडी मधली व्यक्ती हळूच खाली उतरली.डोळ्यावर गॉगल, अंगात मोठा कोट,पायात घुडघ्या पर्यन्त मोठे बूट असा त्या व्यक्तीचा रुबाबी पेहराव होता. आजूबाजूला लक्ष देत त्या व्यक्तीने हळूच गाडीची डिक्की उघडली.पुन्हा एकदा चहू बाजूनी लक्ष देत त्या डिक्की मध्ये असलेली मोठी ट्रॅव्हल बॅग बाहेर काढली.आणि आजूबाजूला लक्ष देत ती बॅग सी लिंक च्या कट्यावर घेऊन गेली. ट्रॅव्हल बॅग असल्याने बॅगेला चाक होतीच म्हणून म्हणा किंवा त्या व्यक्तीची ताकद म्हणा पण ती व्यक्ती सहजपणे ती बॅग घेऊन कट्टयावर पोहचली.पुन्हा एकदा चौफेर नजर फिरवत आणि क्षणाचा ही विलंब न करता, जणू डोळ्याची पापणी ला लवायला सुद्धा न देता त्या व्यक्तीने ती बॅग समुद्रात ढकलून दिली.ज्या अर्थी त्या व्यक्तीने ती बॅग समुद्रात भिरकावून न देता ढकली त्या अर्थी नक्कीच त्या बॅग मध्ये काही तरी होत.पण काय होत हे त्या व्यक्तीलाच आणि येणाऱ्या काळालाच ठाऊक. बॅग समुद्रात ढकल्यावर ती व्यक्ती कोट च्या खिश्या मध्ये हात टाकून झप झप पावले टाकत गाडीच्या दिशेने निघाली.आणि जराही मागे वळून न बघता गाडीत बसली.आणि पुन्हा युटर्न मारून सुसाट वेगाने माघारी निघाली.कोण होती ती गाडीतली व्यक्ती? काय होत त्या बॅग मध्ये? कोणती निर्जीव वस्तू की भूतकाळ सजीव असलेली पण वर्तमानात निर्जीव झालेली वस्तू? ह्या सर्व प्रश्नची उत्तर येणारा काळच देणार होता.....*******************************************निशांत आज जरा लवकरच पोलीस स्टेशनला हजर झाला होता. कदम गावडे आणि रहाटे सुद्धा हजर झाले होते."आय अॅम कमिंग सर" कदम . "येस कदम कमिंग इन"निशांत. कदम सल्युट मारून निशांत समोर उभे राहतात."जय हिंद सर"कदम "जय हिंद कदम बोला सायबर क्राईम शी बोलणं झालं का?" निशांत. "हो सर संध्याकाळ पर्यंत आपल्याला रिपोर्ट भेटून जाईल.पण तुम्हाला भेटायला त्या सुजित वाघमारे ची प्रियसी आली आहे आणि तिच्या सोबत तिची आई सुद्धा आली आहे."कदम "ठीक आहे कदम त्यांना आत बोलवा आणि तुम्ही सुद्धा त्यांचा जबाब नोंदवायला थांबा." निशांत. "येस सर"कदम पुन्हा एकदा सल्युट मारून बाहेर जातात.थोड्याच वेळात सुजित वाघमारेची प्रियसी आणि तिची आई आत येते.मागून कदम सुद्धा येतात."या बसा" निशांत त्यांना बसण्याची सूचना देतो.साधारण २१-२२ वर्षाची ती तरुणी असेल.बहुतेक आपल्या प्रियकराच्या मृत्यू चा तिने जबरदस्त धक्का घेतला हे डोळ्याखाली आलेल्या काळ्या वर्तुळामुळे सहज जाणवत होतं."आपलं नाव?" निशांत त्या तरुणीला विचारतो "माझं नाव स्नेहा पाटील आणि ही माझी आई भाग्यश्री पाटील" ती तरुणी. "अच्छा ठीक आहे आणि वडील?" निशांत "ते बाहेरगावी असतात"स्नेहा "ओके ठीक आहे.मला जाणीव आहे तुला तुझ्या जवळच्या व्यक्तीच्या अकाली जाण्याने तीव्र दुःख झालेलं असेल पण माझे सुद्धा हात कर्तव्याने बांधलेलं आहेत आणि लवकरात लवकर तुझ्या प्रियकराच्या मृत्यू च कारण शोधणं सुद्धा गरजेचं आहे.त्यामुळे तू आम्हाला सहकार्य करशील ही अपेक्षा." निशांत "हो सर" स्नेहा मुसमुसत बोलते. "ठीक आहे.मला आधी सांग तुमचं किती वर्षा पासून होत?तुझ्या घरी त्याबद्दल कल्पना होती का? तुमच्यात काही वादविवाद किंवा घरच्यांचा विरोध होता का?" निशांत " दोन वर्षां पासून आमच रिलेशनशिप होत.घरी सुद्धा माहिती होत.आणि त्यांची सुद्धा परवानगी होती.त्यानेच मला त्याच्या प्रेस मध्ये जॉब लाऊन दिला होता.आणि वादविवाद म्हणाल तर छोटे मोठे वादविवाद होतात तसे आमचे पण होत होते पण आम्ही परत एकत्र येत होतो टोकाचे वाद आमच्यात झालेच नव्हते."स्नेहा व्हेरी गुड आता सांग त्याच्या मित्रांसोबत त्याचे कधी वाद झाले होते का त्या बद्दल तुला तो काही बोलला होता का? किंवा तुझा कोणावर संशय आहे का??"निशांत "नाही सर तो मित्रांसोबत सुद्धा मिळून मिसळून असे. सो मित्रांसोबत वाद असतील अस वाटत नाही.आणि आमच्या प्रेस मध्ये सुद्धा तो मिळून मिसळून राहत होता." स्नेहा "ठीक आहे त्याच्या काही जवळच्या मित्रांची नाव माहिती आहेत का आणि संपर्क क्रमांक" निशांत "हा सर आमच्या ऑफिस मधला निनाद म्हणून आहे त्या सोबत सुजित जास्त असायचा त्याच्या कडून तुम्हाला त्याच्या मित्रांची माहिती मिळू शकते." स्नेहा आत्मविश्वासाने म्हणाली. " ठीक आहे तुझ्या कडे नंबर असेल ना त्याचा?" निशांत " नाही सर मी सहसा ऑफिस मधल्या मुलांच्या संपर्कात नाही आहे. कारण मला जॉइण्ड होऊन फक्त सहा महिने झाले आहेत" स्नेहा "ठीक आहे.तुझं सुजित शी शेवटचं बोलणं कधी झाल होत?" निशांत. "काल रात्री 10 वाजता बोलणं झालं होत आमचं त्याला ऑफिसमध्ये काम असल्या मुळे तो 10:00 वाजे पर्यत होता.तस तो मला बोललाही होता की आता आवरून मी 10:30 च्या लोकलने रूम वर जाईन तू झोपून घे अस"स्नेहा."ठीक आहे थँक्स स्नेहा. अजून काही मदत लागली तर तुला पून्हा बोलावू. आता तू जाऊ शकतेस.आणि केस क्लोज होत नाही तोपर्यंत तुला आमची परवानगी घेतल्या शिवाय मुंबई बाहेर जाता येणार नाही.आता तुम्ही जाऊ शकता." निशांत. "ठीक आहे सर चालेल" अस बोलून स्नेहा आणि तिची आई निघून जातात. "कदम काय म्हणतंय तुमचं मन" निशांत "मला तर ही मुलगी स्पष्ट खर बोलत होती असच वाटलं सर." कदम. "मलाही..असो कदम तुम्ही रहाटे आणि गावडे ना बोलावून घ्या." निशांत. "ओके सर" कदम गावडे आणि रहाटे ना बोलावून घेतात. "या रहाटे आणि गावडे तुम्ही आता लगेच तो सुजित वाघमारे कामाला होता त्या प्रेस मध्ये जाऊन चौकशी करा.खास करून निनाद म्हणून कोण तरी आहे त्याची. सरळ बोलला नाही तर चौकीत घेऊन या." निशांत. "येस सर" रहाटे आणि गावडे. "ठीक आहे या आता तुम्ही" निशांत. रहाटे गावडे कदम बाहेर निघून जातात.निशांत उद्याच्या प्रचार सभेच्या सुरक्षा व्यवस्थेच नियोजन करण्यात गुंतून जातो. अर्ध्या तासाने कदम आत येतात. "सर सुजित वाघमारे चे आईवडील आले आहेत आत पाठवू का त्यांना?" कदम "येस कदम पाठवा त्यांना आणि तुम्ही सुद्धा या" निशांत "ठीक आहे सर" कदम. कदम बाहेर जातात. आणि थोड्या वेळात सुजित वाघमारे चे आई वडील आणि मागून कदम आत येतात."या बसा" निशांत त्यांना आदरपूर्वक बसायला सांगतो.आणि पाण्याचा ग्लास पुढे करतो.थोडा वेळ असाच शांतते जातो आणि निशांत बोलायला सुरुवात करतो. "हे बघा आई-बाबा तुमच्यावर काय परिस्थिती आली आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे.तुम्हाला ह्यातून सावरायला वेळ लागेल.पण मी पडलो कायद्याचा रक्षक माझे हात कायद्याने बांधलेले आहेत.तुमच्या मुलाच्या मृत्यू चा तपास करण महत्वाच आहे.सो मला तुम्हाला ह्या वेळी त्रास द्यावा लागतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो." निशांत. "अहो राहू दे हो साहेब आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू.पण हात जोडतो माझ्या मुलाच्या मृत्यू च खरं कारण शोधा" सुजित चे वडील रडत हात जोडत म्हणाले.त्यांची बायको ही तोंडाला पदर लावून रडत असते."अहो हे काय करताय आई- बाबा शांत व्हा आपण नक्कीच खर कारण शोधू तुम्ही शांत व्हा आधी." निशांत टेबलावरुन उठून त्यांना धीर देत खांद्यांवर हात ठेवतो आणि पाणी देतो.आणि ते शांत होई पर्यत वेळ जाऊ देतो. थोड्यावेळाने निशांत पुन्हा बोलायला सुरुवात करतो. "हे बघा बाबा मला तुम्हाला जास्त त्रास द्यायचा नाही आहे पण तुम्ही मला थोडी तरी मदत केली तरी मला त्या दृष्टीने तपास करता येईल.विचारू का तुम्हाला उत्तर द्यायला जमणार असेल तर" निशांत.निशांत च्या आपुलकीने त्या दोघांना ही धीर येतो. "विचारा साहेब" सुजित चे वडील. "ठीक आहे तर मला आधी सांगा सुजित ला कधी हार्ट अटॅक आला होता का? किंवा त्याला हृदय या संबंधी कोणता आजार होता का? किंवा त्याच कोणासोबत वैर वैगरे?" निशांत. "नाही हो साहेब एकदम धडधाकट होता सुजितला असा कोणताच आजार नव्हता त्याला. आणि वैर म्हणावं तर तो सर्वांसोबत मिळूनमिसळून राहायचा त्यामुळे त्याच कोणासोबत वैर असेल असं वाटत नाही हो." सुजितच्या वडिलांना पुन्हा एकदा हुंदका आला."ठीक आहे धन्यवाद.तुमच्या कडे संध्याकाळ पर्यंत डेड बॉडी सर्पुद करु. तो पर्यंत तुमच्या राहण्याची व्यवस्था नसेल तर करू का?" निशांत "नको साहेब इथे माझी बहीण आहे तिच्या कडेच आहोत आम्ही राहायला. तुम्ही फक्त माझ्या मुलाच्या मृत्यु च कारण शोधा साहेब. लग्न सुद्धा ठरलं होतं हो साहेब पण ह्या काळाने हिरावून घेतल सुख."निशांत चे बाबा गहिऱ्या आवाजात म्हणाले. "हो नक्कीच शोधू. हे माझं कार्ड तुम्हाला कधी काही आठवलं तर लगेच मला कॉल करून सांगू शकता."निशांत टेबलावरच कार्ड देत म्हणाला. " ठीक आहे साहेब येतो आम्ही" सुजित चे वडील. "हा.कदम ह्यांना बाहेर पर्यंत सोडून या"निशांत . "येस सर" कदम. कदम सुजित च्या आई वडिलांना घेऊन बाहेर जातात.आणि थोड्या वेळाने परत येतात." काय कदम काय वाटत तुम्हाला? निशांत "सर एक मात्र कळाल ती मुलगी स्नेहा पाटील खर बोलत होती त्यांचं लग्न ठरलं होतं हे.आणि एक मला तर ह्याच कोणासोबत वैर असेल असं वाटत नाही सर सगळेच त्याच कौतुक करत आहेत".कदम. "कदम काही वेळा वरून दिसत तस आतून नसत..बहुतेक ही केस आपल्याला जड जाणार आहे.आणि पत्रकार तर उरावरच बसून आहेत म्हणून लवकरात लवकर या केस चा निकाल लावून टाकला पाहिजे.आता एक काम करा गावडे आणि रहाटे आले की आत पाठवा. आणि तुम्ही सुद्धा या." निशांत "येस सर"कदम. कदम निघून जातात तसा निशांत डॉ. दिक्षितांना कॉल करतो. "हॅलो डॉ दिक्षित" निशांत. "बर झालं निशांत अगदी योग्य वेळी तू कॉल केलास नाही तर मी करणारच होतो."डॉ.दीक्षित "का डॉ काही विशेष" निशांत. " विशेष नाही पण जरा गंभीर आहे.तुझ्या आग्रहा खातर मी पुन्हा सुजित वाघमारे च पोस्टमार्टम केलं.पण मला काही तरी धक्कादायक आढळून आलं आहे. अजून मी त्याची खात्री करणार आहे.तुला रात्री वेळ असला तर लॅब ला ये सांगतो सविस्तर."डॉ.दिक्षित. ठीक आहे डॉ .पण अंतविधी साठी डेड बॉडी त्याच्या फॅमिली कडे आज देता येऊ शकते ना " निशांत " हो हरकत नाही देऊ संध्याकाळी." डॉ.दिक्षीत. "ओके ठीक आहे भेटू संध्याकाळी" निशांत बोलून कॉल ठेवतो.थोड्या वेळात कदम गावडे रहाटे एकसाथ केबिन मध्ये हजर होतात. "या बसा." निशांत. "सर आम्ही ऑफिस मध्ये चौकशी केली.पण हवी तशी माहिती मिळाली नाही सर्वांच्याच नजरेत तो मिळून मिसळून राहणारा होता.त्यामुळे कोणाला त्याचे वादविवाद असतील असे वाटत नाही" रहाटे. "खास करून त्याचा मित्र निनाद मुंडे ची सुद्धा चौकशी केली पण हवी तशी माहिती नाही मिळाली.निनाद आणि सुजित कॉलेज पासूनचे मित्र होते.पण तरीही सुजित चे वादविवाद होते अस तो काही बोलला नाही"गावडे "ठीक आहे अजून काही माहिती मिळते का बघा मला आताच डॉ.दीक्षितांचा कॉल आला होता.त्यांना काही तरी गंभीर अस कारण त्यांना गवसलं आहे.संध्याकाळी कळेलच. चला आता मी मीटिंग साठी निघतोय तुम्ही सुद्धा हजर रहा.आणि कदम तुम्ही संध्याकाळी पर्यंत कॉल डिटेल्स तयार ठेवा.आता या तुम्ही."निशांत. "येस सर." तिघेही निघून जातात. निशांत ही मीटिंग साठी निघून जातो.************************************************* निशांत मीटिंग आवरून नुकताच पोलीस स्टेशन ला आलेला असतो.आणि केबीन मध्ये बसून सकाळ पासून केलेल्या तपासणी चा आढावा घेत असतो.तेवढ्यात कदम येतात. "या कदम मिळाले का डिटेल्स?" निशांत "येस सर तेच द्यायला आलोय"कदम "आणा बघू काही विशेष आहे का त्यात?" निशांत "हो सर एका अनोळखी नंबर वरून त्याला रात्री ११ आणि १ च्या च्या सुमारास कॉल आला आहे.पण तो नंबर सध्या ट्रेस होत नाही आहे शेवटचा कॉल त्याच नंबर वरून आला आहे." कदम निशांत डिटेल्स बघायला लागतो.10 वाजता त्याला स्नेहा पाटील चा कॉल आलेला असतो.म्हणजे स्नेहा पाटील खरच बोलत होती ही सिद्ध होत होत. "कदम ह्याला 10 ला स्नेहा पाटील म्हणजे त्याच्या प्रियसी चा कॉल आला होता.आणि तिने सांगितल्या प्रमाणे हा लगेच घरी जाणार होता. मग हा 2 वाजेपर्यंत रात्री बाहेर काय करत होता?" निशांत. "असही असू शकत सर तो हॉटेल मध्ये गेला असेल कारण तसही तो बियर च सेवन करायचा अशी माहिती त्याच्या ऑफिस मधल्या माणसानं कडून कळाली आहे"कदम "अस पण असू शकेल कदम एक काम करा. शहरातल्या सर्व हॉटेल मध्ये चौकशी करा सुजित वाघमारे हॉटेल मध्ये आला होता का?तो कोणासोबत आला होता कीती वाजेपर्यंत होता त्याने drink केली का हे सर्व विचारा.माझ्या मते त्याने ड्रिंक केली नसेल कारण पोस्टमार्टम मध्ये सुद्धा तस काही नाही आहे.तुम्ही सर्व हॉटेल मध्ये फोटो फिरवा त्याचा मी आता डॉ.दीक्षिताना भेटून घरी निघतोय.आणि त्या वाघमारे च्या घरच्याना डेड बॉडी घेण्यासाठी बोलावा." निशांत. "येस सर" बोलून कदम निघून जातात.निशांत ही डॉ.दीक्षितांच्या लॅब ला जायला निघतो.*************************************************ठिकाण-: डॉ.दीक्षितांची लॅब."ये निशांत" अगदी वेळेत आलास बघ"डॉ.दीक्षित. डॉक्टर दीक्षित साधारण 50-55 वयाच्या उंबरठ्यावर असलेले हुशार आणि कर्तबगार डॉक्टर होते.डोक्यावरचे केस पिकलेले, मध्यम बांध्याचे, गोऱ्या वर्णाचे,कठोर अभ्यास पूर्ण मेहनतीमुळे लागलेला भिंगाचा चष्मा लावून ते फाईल वाचण्यात मग्न होते."काय करणार सर आम्हाला वेळेचं बंधन पाळवच लागत. बोला काय म्हणतोय रिपोर्ट." निशांत आत येत म्हणाला.. "ये बस.रिपोर्ट मध्ये खूप काही गंभीर बाबी आढळल्या आहेत.आणि पण महत्वाची बाब ही आहे की त्याला जो अटॅक आलाय तो नैसर्गिक नाही" डॉ.दिक्षित. "काय! नैसर्गिक नाही म्हणजे नक्की काय म्हणायच आहे तुम्हाला" निशांत "अरे हो ऐकून घे.त्याला आलेला ह्रदय विकाराचा झटका नैसर्गिक नाही आहे ह्याची मी खात्री देऊ शकतो.अत्यंत घातक अस पॉयझन देऊन हा ह्र्दयविकाराचा झटका त्याला येईल आणि तो जागीच प्राण सोडेल इतक्या जास्त प्रमाणात पॉयझन दिल गेलं आहे.आता कोणतं पॉयझन ह्याचा मी खुलासा करू शकत नाही.अजून मला काही चाचण्या करायच्या आहेत.त्यासाठी मी 2 दिवसात पुण्याला जाऊन टेस्ट करणार आहे."डॉ.दिक्षित. "म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे डॉक्टर,हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात आहे असं?" निशांत "येस माझी तर पूर्ण खात्री झालीय तू हा रिपोर्ट वाचून ठरवू शकतोस.त्याला आधी असा त्रास नव्हता. हे काही चाचण्यांनी सिद्ध केलंय.महत्वाचं रिपोर्ट मध्ये डेड बॉडी चे फोटो आहेत त्यातला सर्कल नीट निरखून बघ.जो कोणी ह्या मागे असेल तो खरंच हुशार आणि डोकेबाज आहे."डॉ. दिक्षित. "ठीक आहे डॉ.थँक्स.आता मला त्या दृष्टिने तपास करता येईल." निशांत "राइट माय बॉय. मी पुण्यावरुन वरून आल्यावर तुला पॉयझन बद्दल माहिती देतोच.तो पर्यन्त तू काही हाती लागत का ते बघ."डॉ.दीक्षित. "हो ठीक आहे डॉ येतो मी." निशांत डॉ दीक्षितांचा निरोप घेऊन घरी जायला निघतो. घरी पोहचे पर्यंत त्याला रात्रीचे 9:30 होतात पण आज वेळेत घरी आल्यामुळे घरातल्या आयपीएस मॅडम शांत असतात.दोघेही हसत गप्पा मारत जेवण वैगरे करतात आणि झोपी जातात.*************************************************निशांत नेहमी प्रमाणे लवकरच पोलीस स्टेशन ला हजर झाला.आजचा दिवस त्याचा धावपळीतच जाणार होता.केबिन मध्ये बसून तो आजच्या दिवसाच्या नियोजनाचा विचार करत बसला होता. "आय अॅम कमिंग सर?" कदम. येस कदम या." निशांत "जय हिंद सर" कदम त्यांच्या खास शैलीत कडक सल्युट मारून बोलतात. "जय हिंद कदम,बोला काय म्हणताय" निशांत . "सर काल रात्री पासूनच सर्व हॉटेल मॅनेजर ना कॉल लावून काही ठिकाणी प्रत्यक्षात भेटून आम्ही चौकशी केली.त्या पैकी हॉटेल रॉयल्स मध्ये तो रात्री १ वाजेपर्यंत होता अशी तिथल्या वेटर ने माहिती दिली आणि तो हॉटेल मध्ये एकटाच आला होता पण १५-२० मिनिट ने त्याला भेटायला एक मुलगा आला होता.त्याच्याच वयाचा होता. त्या मुलाने पार्सल जेवणासाठी ऑर्डर दिली होती ती घेऊन तो 10 मिनिटात निघून गेला.आणि ह्या सुजित ने फक्त बियर ऑर्डर केली होती पण त्याने ती न घेताच फक्त सिगारेट पीत होता. अशी माहिती सुद्धा तिथल्या वेटर ने दिली आहे.अंदाजे १ च्या सुमारास तो हॉटेल मधून बाहेर पडला. असावा असा अंदाज आहे." कदम. " गुड वर्क कदम.आता तर खात्रीच झाली आहे की हा एक परफेक्ट प्लॅनिंग मर्डर आहे.सायबर क्राईम ला पुन्हा रिपोर्ट करा आणि त्या शेवटचा कॉल आला होता त्या नंबरच लाईव्ह लोकेशन भेटलं नाही तरी लास्ट लोकेशन नक्कीच भेटेल ते शोधून काढायला सांगा..लवकरात लवकर." निशांत "येस सर." कदम. "ठीक आहे चला आता मी खासदार निवास ला जातोय.खासदार श्रीनिवास देशमुख आता काही थोड्या वेळातच पोहचणार आहेत.काही कळालच तर लगेच कॉल करा"निशांत. "येस सर" कदम सल्यूट मारून निघून जातात. निशांतही खासदार निवासाकडे जायला निघतो.*********"हॅलो,यार लोचा झालाय." एक व्यक्ती घाबरत घाबरत बोलत असते."हा माहिती आहे मला पण तू काही ओकला नाहीस ना पोलिसांसमोर?" फोन पलीकडील व्यक्ती " नाही" "ठीक आहे काहीच बोलू नकोस आणि आपली ओळखही सध्या गुप्त ठेव.जमेल तेवढ नॉर्मल रहा." फोनपलीकडील व्यक्ती. "ठीक आहे पण "ती" गायब आहे त्याच काय तिचा सुद्धा पुन्हा लागत नाही आहे. काय करायचं मला तर काही कळत नाही आहे" फोनवरील व्यक्ती."ते बघू.कामाला लावली आहेत माणस तू नको काळजी करुस ठेव फोन आणि आता कामाशिवाय काही दिवस कॉल करू नकोस" फोनपलीकडील व्यक्ती "हा ठीक आहे चल बाय" .**********निशांत चा आज पूर्ण दिवस धावपळीत गेला होता.दुपारी 3 वाजेपर्यंत तो प्रचार सभेच्या सुरक्षेत गुंतला होता.अजूनही प्रचार सभा आटपायला काही कालावधी होता. तितक्यात निशांत चा फोन वाजतो."हॅलो गावडे बोला" निशांत "सर.वरळी सी लिंक पासून काही अंतरावर कोळीना मासेमारी करताना एक सुटकेस आढळून आली आहे.त्यानी उघडून बघितलं तर त्यात एका २३-२४ वर्षाच्या मुलीची डेड बॉडी आहे सर.कदम रहाटे आणि मी आता तिकडेच निघतोय." गावडे. "काय!! ठीक आहे निघा तुम्ही मी सुद्धा 15-20 मिनिटामध्ये पोहचतो. फॉरेन्सिक टीम ला रिपोर्ट करा.आणि पब्लिक ला लांबच ठेवा." निशांत. "येस सर" गावडे कॉल ठेवून देतात.निशांत ला तातडीने जाण्याची गरज असते. पण त्याला अस अचानक सभा सोडून सुद्धा जात येत नसत.तो लगेच कमिशनर ला कॉल करून संभाव्य परिस्थिती ची कल्पना देतो.कमिशनरही समजून घेतात आणि त्याला सभा सोडून जाण्याची परवानगी देतात आणि निशांत च्या जागी एका इन्स्पेक्टर ला तातडीने पाठवतात.निशांत लगेच बुलेट स्टार्ट करून क्राईम स्पॉट कडे जायला निघतो.*******ठिकाण- कोळीवाडा निशांत तातडीने क्राईम स्पॉट वर पोहचतो.जमलेली गर्दी बघून आणि जीव ओतून रिपोर्टिंग करणारे पत्रकार बघून क्राईम स्पॉट ओळखायला त्याला वेळ लागला नाही.तो तिथे पोहचतो तसे त्याला पत्रकार घेरतात. एक पत्रकार "सर शहरात लागोपाठ दोन खून होत आहेत.आपलं पोलीस डिपार्टमेंट ह्या मागच्या आरोपींना अटक कधी करणार?की अजून खून सत्र बघावं लागणार? इतक्यात तिथे गावडे रहाटे येतात आणि पत्रकाराना बाजूला करतात.निशांत डेड बॉडी जवळ पोहचतो.आणि लगेच रुमाल तोंडाला लावतो बहुतेक त्या डेड बॉडी मधून दुर्गंधी पसरायला सुरुवात झालेली असते.निशांत डेड बॉडी च निरीक्षण करतो.त्याला हवी ती खूण त्या डेड बॉडी वर दिसत नाही. "कदम काही आयडेंटि प्रूफ भेटला का डेड बॉडी जवळ? निशांत "नाही सर काहीच नाही आहे" कदम "ठीक आहे कदम एक काम करा डेड बॉडी लगेच डॉ.दीक्षितांकडे पोस्टमार्टमसाठी पाठवा. बहुतेक हीचा मृत्यू होऊन 24 तासा पेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे.आणि फॉरेन्सिक टीम ला बॅग ची नीट तपासणी करायला सांगा.बोटाचे ठसे भेटतायत का बघा" निशांत "येस सर"कदम "गावडे डेड बॉडी कोणाला भेटली त्यांना बोलवा इकडे." निशांत गावडे तिथे उभे असलेल्या मच्छीमार लोकांना घेऊन येतात. "सर हे बघा ह्यांनीच केला होता कॉल" गावडे "हे बघा तुम्ही घाबरू नका फक्त मी विचारेंन ते नीट सांगा.तुम्हाला बॅग कशी भेटली? बॅग भेटली तेव्हा तूम्हाला वास आला असेल ना? निशांत "हो साहेब आम्ही दुपरच्याला जेवून पुन्हा दर्या कडे मासेमारी साठी निघालो तेव्हा सूर्य माध्यावर होता तेव्हाच ही बॅग आम्हाला दिसली.म्हणून आम्ही ती वर ओढून घेतली बोटी मध्ये.आणि आम्हाला वास आला म्हणून उघडून बघितलं तर हे अस दिसलं मग लगेच कॉल केला बस इतकच माहिती आहे आम्हाला वाटल्यास ह्यातल्या कोणाला ही विचारा हे सर्व सोबत होते माझ्या"त्या बोटीचा मालक "ठीक आहे तुमचे हाताचे ठसे देऊन जाऊ शकता तुम्ही, गावडे ह्यांच्या हाताचे ठसे घ्या आणि सोडा ह्यांना" निशांत "येस सर"गावडे "रहाटे फॉरेन्सिक ला लवकरात लवकर रिपोर्ट तयार करायला सांगा आणि ह्या बोटी वरच्या लोकांचे ठसे घेतले आहेत ते सुद्धा फॉरेन्सिक ला द्या आणि बॅग वर ह्या ठस्यां व्यक्तीरिक्त अजून कोणाचे ठसे सापडतात का बघा.आणि कदम ह्या मुलीचा फोटो सर्व पोलीस स्टेशनला पाठवा.हीची ओळ्ख पटवण आधी महत्त्वाच आहे" निशांत. "चालेल सर"कदम. डेड बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली जाते आणि निशांत ही पोलीस स्टेशनला निघून येतो.पोलीस स्टेशनला आल्यावर निशांत केबिन मध्ये कामात गुंतून जातो.साधारण दोन तासाने गावडे आत येतात."या गावडे" निशांत "सर फॉरेन्सिक चा रिपोर्ट आणला आहे.पण रिपोर्ट मध्ये बोटीवरच्या लोकांचे ठसे घेतले त्या पैकी फक्त दोघांचेच आहेत बाकी कोणाचे नाही आहेत." गावडे. "ठीक आहे मला वाटलं होतच. असो पोस्टमार्टम रिपोर्ट आला की तातडीने कळवा.आणि त्या मुलीचा फोटो पाठवला का सगळी कडे?" निशांत." हो सर लवकरच कळेल अशी आशा आहे" गावडे "गावडे एक काम करा त्या पेक्षा फिंगरप्रिंट एक्सपर्ट ला बोलावून तिच्या हाताचे ठसे घ्या तिची आधार व्दारे लगेच माहिती भेटून जाईल." निशांत "खरंच सर लगेचच मी फिंगरप्रिंट एक्सपर्ट ला दीक्षितांच्या हॉस्पिटलमध्ये नेतो." गावडे "ठीक आहे गावडे या आता" निशांत. गावडे निघून जातात.थोड्या वेळाने डॉ.दिक्षितांचा कॉल येतो. "बोला डॉ.काही विशेष"निशांत. "विशेष अस काही नाही कोणी तरी मागून जोरात डोक्यावर प्रहार केल्या मुळे मृत्यू झाला आहे.मरणा पूर्वी थोडी फार झटपट सुद्धा झाली आहे.काही ठिकाणी नखांचे ओरबाडे आढळे आहेत.पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही."बाकी तुला रिपोर्ट पाठवला आहे त्यातून कळेलच. डॉ.दीक्षित. "ठीक आहे डॉ.आमच्या डिपार्टमेंट मधले गावडे फिंगर प्रिंट एक्सपर्ट ना घेऊन येणार आहेत तेवढं आपण त्यांना सहकार्य करा म्हणजे डेड बॉडी ची ओळख पटवायला बर पडेल.आणि मागच्या डेड बॉडी मध्ये पॉयझन आढळल.त्या बद्दल काही कळाल का?" निशांत. "नाही.पण लवकरच कळेल." डॉ.दीक्षित. "चालेल ठेवतो." निशांत. निशांत कॉल ठेवतो. आणि कदम आत येतात. "बोला कदम बहुतेक तुमच्या रिटायरमेंट आधी ह्या केस घाम काढणार आहेत आपला"निशांत. "हो तसच वाटत आहे.हा पोस्टमार्टम रिपोर्ट" कदम फाईल टेबलावर ठेवत बोलतात.निशांत फाईल हातात घेऊन वाचायला लागतो. डॉ.दीक्षितांनी सांगितल्या प्रमाणे डोक्यावर गंभीर घाव पडून रक्तस्त्राव होऊन मृत्यू.शरीरावर काही ठिकाणी नखांचे ओरबडे आढळले..मृत्यू होऊन अंदाजे 48 तास उलटून गेले होते.मृत्यूची वेळ रात्री 10 वाजता.मृत्यू झालेल्या तरुणीचे वय 23-24 च्या आसपास. असा थोडक्यात तपशीलावर आधारित रिपोर्ट वाचून निशांत फाईल बंद करतो."काय म्हणता कदम काय वाटत तुम्हाला." निशांत. "सर ज्या अर्थी डोक्याला मार लागून मृत्यू झाला आहे त्या अर्थी आपण ह्याला खून नक्कीच म्हणू शकतो. पण माझ्या मनात सर एक शंका आली आहे ह्या खुनाचा आणि 2 दिवसांपूर्वी पत्रकाराच्या मृत्युचा काही संबंध असेल का?" कदम. " एकदम माझ्या मनातल बोललात बघा कदम.कारण दोघांच्या मृत्यूची कारण वेगळी असली तरी दोघांची वयोमान थोडीफार समान आहेत.आता हिची ओळख पटल्यावरच आपण पुढचा तपास करू." निशांत. "येस सर."कदम.पर्यन्त आधार चा रिपोर्ट भेटेल अस गावडे बोलले आहेत." कदम. "गुड आता मी निघतो तसही 10 वाजून गेले आहेत लवकर नाही गेलो तर घरातलं प्रकरण तापेल." निशांत हसत बोलतो.कदम ही हसून प्रतिसाद देतात.कदम बाहेर निघून जातात आणि निशांत ही घरी जायला निघतो.*******निशांत आज घरी आला तेव्हा निशा जेऊन बेड वर पुस्तक वाचत असते.ते कितीही हट्ट करत असली तरी कामाच्या वेळी निशांत ला समजून घेत असे.निशांत घरी आल्यावर निशा पुस्तक बंद करून निशांत साठी जेवण गरम करायला जाते.आणि निशांत ही फ्रेश होण्यासाठी निघून जातो.निशांत फ्रेश होऊन खाली येतो."जेवलीस" निशांत. "हम्म" निशा. "आता काय झालं आपलं मॅडम तुला माहिती असेलच दोन दोन खून झाले आहेत आणि त्याचा तपास माझ्या कडेच आहे.म्हणून लेट झाला" निशांत. "माहिती आहे रे मी काही बोलले का?" निशा. "मग शांत का?" निशांत. "माझं ऐक ऐकशील.का?" निशा लाडात येत हसत बोलते." ओहह अस आहे तर आज चक्क मस्का लावत आहे कोण तरी"निशांत निशा ला चिडवत बोलतो. "जा बाबा तुला काही सांगणारच नाही मी" निशा नाक फुगवून उठून जायला निघते. "सॉरी ना बस" निशांत हात धरून तिला बसवतो. "सॉरी माझ्या आई बोल आता" निशांत. "बर ऐक,उद्या स्वयंम भवन मध्ये आर्ट फेस्टिव्हल आहे त्यात बाहेरून सुद्धा खूप प्रसिद्ध आर्टीस्ट सहभागी होणार आहेत मला ते बघायला जायचं आहे प्लीज मला माहिती आहे तुला वेळ नाही आहे.पण निदान मला सोडायला आणि आणायला तरी येशील का प्लीज ना" निशा. "निशा मला खरं वेळ नाही आहे राणी पण भेटला तर नक्की येईन नाही तर तू बस किंवा रिक्षा ने जा ना" निशांत. "मला माहिती होतच.बघते मी माझं" निशा रागात उठून जायला निघते. "ऐ माझ्या माते येतो मी सोडायला आणि आणायला वेळ काय आहे?" निशांत. दुपारी 3 पासून चालू होईल मला चार ला सोड आणि सहा ला न्यायला ये."निशा. "चालेल ठीक आहे." निशांत. "नक्की ना" निशा भुवई उंच करत बोलते. "हो ग बाई.आता झोपायला जायचं की आताच तयारी करू उद्या सोडायची.?" निशांत टॉवेल ला हात पुसत बोलतो. " काही गरज नाही आहे तू जा बेडरूमध्ये येते मी हे आवरून." निशा त्याच्या दंडावर मारून हसत बोलते आणि किचन मध्ये आवरायला निघून जाते.निशांत ही झोपायला निघून जातो.******************************************* निशांत आज निशाला आर्ट फेस्टिव्हल ला नेणार असतो त्यामुळे जरा लवकरच पोलिस स्टेशनवर निघून जातो. "जय हिंद सर." गावडे केबिन मध्ये येत सल्यूट मारत बोलतात. "जय हिंद गावडे.बोला." निशांत. "सर त्या मुलीची आधार कार्ड द्वारे ओळख पटवण्यात यश आलं आहे.तीच नाव शर्मिला रावराणे असून परेल मधल्या एक हाऊसिंग सोसायटी मध्ये राहते.अशी माहिती भेटली आहे." गावडे. "गुड वर्क गावडे.आतच निघू या तिकडे चौकशी साठी. कदम,रहाटे आणि जोशी मॅडम ना सुद्धा घ्या सोबत." निशांत. "येस सर" गावडे निघून जातात. थोड्या वेळाने निशांत आणि त्याची टीम परेल मधल्या एक हाऊसिंग सोसायटी जवळ पोहचते.पोलिसांची गाडी बघून तिथला वॉचमॅन लगेच गेट उघडतो.निशांत गाडीतून खाली उतरतो. "नाव काय तुझं" निशांत वॉचमॅन ला विचारतो. "रमेश नाव आहे माझं." वॉचमॅन बोलतो. "बर रमेश मला थोडी महिती हवी आहे. इथे ह्या सोसायटी मध्ये शर्मिला रावराणे कोणत्या ब्लॉक मध्ये राहते हे माहिती असेलच ना तुला" निशांत. " हो साहेब त्या मॅडम ना कस विसरणार?" वॉचमॅन बोलत असताना निशांत मध्येच अडवून बोलतो. "एक मिनिट विसरणार कस अस का?" "साहेब त्या मॅडम इथे एकट्याच राहतात.त्यांचे मित्र सोडून कधी कोण येत नाही.आणि त्या मॅडम सुद्धा दिवसभर बाहेर असतात आणि रात्री सुद्धा एक दोन वाजता घरी येतात. एकदा तर त्या तीन ला आल्या होत्या आणि मी झोपेत होतो.म्हणून त्यांनी मला खूप काही बोलल्या होत्या." वॉचमॅन. "आणि म्हणूनच तू त्यांचा खून केलास हो ना? निशांत डायरेक्ट बोलतो. "काय खून?नाही साहेब हे काय मला माहिती नाही हो त्या मॅडम सुद्धा तीन दिवस झाले आल्या नाही आहेत. त्यांची गाडी पण इथेच उभी आहे."वॉचमॅन पार्किंग मध्ये असलेल्या गाडी कडे बोट दाखवून बोलतो. "ठीक आहे तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवतो.पण तुला जे आहे ते सर्व खर सांगावं लागेल." निशांत. "हो साहेब सर्व खरं सांगतो पण मला ह्यात अडकवू नका." वॉचमॅन हात जोडत म्हणतो. "ठीक आहे. आधी सोसायटी च्या सेक्रेटरी ला आणि नाईट ड्युटी च्या वॉचमॅन ला बोलावून घे लगेच." निशांत. "चालेल साहेब कॉल करतो नाईट ड्युटी ला राकेश असतो त्याला आणि सेक्रेटरी साहेब तर इथेच पहिल्या मजल्यावर रहातात.त्यांना बोलावून आणतो." वॉचमॅन. "ठीक आहे." निशांत. वॉचमॅन निघून जातो. "कदम गावडे रहाटे आणि जोशी मॅडम तुम्ही शेजारी चौकशी करा तिच्या कडे कोण यायचं,तिच्या घरच्यांबद्दल,मित्रांबद्दल ,वागणुकी बद्दल आणि खास करून दोन-तीन दिवसापूर्वी तिला कोणासोबत जाताना बघितल होत का? हे सर्व विचारा.काहींना काही माहिती भेटेलच." निशांत. "येस सर" सर्व चौकशी करायला निघून जातात.थोड्या वेळात वॉचमॅन सेक्रेटरी ला घेऊन येतो. "साहेब हे आमचे सेक्रेटरी साहेब. साहेब तुमचं नाव सांगा साहेबाना ह्या " वॉचमॅन सेक्रेटरी ला सांगतो. "नमस्कार इन्स्पेक्टर मी संदेश कुमार. इथल्या सोसायटी चा सेक्रेटरी आहे.आपली काय मदत करू शकतो." सेक्रेटरी हस्तांदोलन करत बोलतो. "नमस्कार.तुमच्या सोसायटी मध्ये राहणाऱ्या शर्मिला रावराणे ह्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे त्याचीच चौकशी करायला आलो आहोत.तुमच्या कडे रूमच्या डबल चाव्या असतील ना? तर त्या द्या". "बापरे वाईट झाल खूप. या तुम्हाला मी रूम उघडून देतो."सेक्रेटरी. "ठीक आहे चला.आणि रमेश तू दुसरा तो राकेश की कोण आला की त्याला सुद्धा वरती घेऊन ये.निशांत. "चालेल साहेब" वॉचमॅन. निशांत आणि सेक्रेटरी रुम मध्ये जायला निघतात. आणि निशांत ची टीम सुद्धा चौकशी करून रुम वर येते. "संदेशराव शर्मिलाची वागणूक कशी होती तीच सोसायटी मध्ये कोणासोबत भांडण वैगरे.? निशांत रुमचा दरवाजा उघडत असणाऱ्या सेक्रेटरी ला विचारतो. "नाही साहेब ती तर दिवसभर बाहेर असायची. रात्री अपरात्री घरी यायची. त्यामुळे इथे कोणाशी तिचा जास्त संपर्क नव्हता त्यामुळे भांडण वादविवाद चा प्रश्न नाही.हा पण एकदा रात्री 3 वाजता तीच आता खाली होता त्या वॉचमॅन रमेश सोबत भांडण झाल होत.ती एके रात्री तीन वाजता आली आणि हा झोपला होता म्हणून.शेवटी मलाच कॉल केला वॉचमॅन ने मग मी जाऊन मिटवल.बाकी काही वादविवाद नाही." सेक्रेटरी दरवाजा उघडत सांगतो. "ठीक आहे.तुम्ही इथे थांबा. आम्ही तपासणी करतो." निशांत. "चालेल सर" सेक्रेटरी. "सर्वानी काही भेटत का बघा छोटासा पुरावा सुद्धा महत्वाचा आहे.आणि कदम ती बघा त्या भिंतीवर गाडीची चावी आहे. गाडीत काय भेटत ते बघून या." निशांत. " येस सर." सर्व कामाला लागतात. साधारण अर्धा तास तपासणी चालू असते. तो पर्यंत दुसरा वॉचमॅन सुद्धा येऊन बाहेर उभा असतो. "सर जॉब आयडेन्टि कार्ड भेटलं आहे" गावडे निशांत च्या हातात आयडेन्टि कार्ड देऊन अजून काही पुरावा मिळतो का बघायला जातात.निशांत आयडेन्टि कार्ड हातात घेऊन वाचतो. स्टायलिश ग्राफिक डीझाईन स्टुडिओ.तितक्यात गाडीची तपासणी करायला गेलेले कदम आत मध्ये येतात."सर काही मिळालं नाही गाडीत पण हॉटेल च बिल सापडलं हे बघा."कदम. "ठीक आहे कदम द्या ते इकडे आणि मोबाईल भेटतो का बघा तिचा शक्यता कमी आहे तरी प्रयत्न करा." निशांत. "येस सर" कदम निघून जातात."तुम्ही इकडे या." निशांत एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या सेक्रेटरी आणि त्या दोन वॉचमॅन ना बोलावतो."राकेश नाव ना तुझं?" निशांत त्या वॉचमॅन ला विचारतो."हो साहेब" राकेश वॉचमॅन. "बर मला सांग तीन दिवसांपूर्वी तुझी नाईट ड्युटी होती. तेव्हा तू ह्या मॅडम ना रात्रीच बाहेर जाताना बघितलस का?"निशांत. हो साहेब 7 वाजता त्या मॅडमना न्यायला गाडी आली होती त्यात बसून त्या गेल्या.पण रात्र उलटून गेली तरी त्या परत काही आल्या नाहीत." वॉचमॅन. "गाडीचा नंबर लिहून घेतलास का? किंवा लक्षात आहे का?" निशांत. "नाही साहेब गाडी सोसायटी च्या आत मध्ये आली तरचं नंबर लिहून घेतो आम्ही.आणि त्या मॅडम चे मित्र मैत्रिणी अस अधून मधून येत असतात म्हणून मी पण लक्ष नाही दिल.हा पण साहेब गेट वर सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्यात तुम्हाला नंबर भेटू शकेल."वॉचमॅन. "व्हेरी गुड.रहाटे एक मिनिट इकडे या"निशांत रहाटे ना बोलावतो. "एक काम करा ह्याच्या सोबत जाऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि ह्याच्या सांगण्याप्रमाणे एक गाडी आली होती त्याचा नंबर नोट्स करून घ्या.काही संशय आला तर पूर्ण फुटेज घ्या." निशांत. "येस सर."बोलून वॉचमॅन आणि रहाटे निघून जातात. निशांतही रुमच निरीक्षण करायला लागतो.१बीचके चा फ्लॅट असतो.मधोमध सोफा त्यासमोर फ्लॉवर पॉट त्या मध्ये कुजून गेलेली फुल, त्या समोर एलईडी टीव्ही बाजूला फोटो फ्रेम,हॉल मधूनच दिसेल अस किचन आणि किचन च्या डाव्या बाजूला बेडरूम बाथरूम. असा छोटासा पण अलिशान इंटेरिअर केलेला फ्लॅट तिच्या आर्थिक बाजू भक्कम असण्याची साक्ष देत होता.जवळ 1-2 तास तपासणी केल्यावर निशांत सर्वांना बाहेर निघण्यास दर्शवतो."सेक्रेटरी आम्ही आल्याशिवाय कोणाला हा रुम उघडून द्यायचा नाही वाटल्यास आधी आम्हाला कॉल करा मग आम्ही बघू.काही गरज वाटली तर आम्ही परत येऊच." निशांत. "ठीक आहे सर" सेक्रेटरी. तितक्यात रहाटे येतात. "सर नंबर भेटला आहे.पण संशयास्पद अस काही आढळल नाही.गाडीतली व्यक्ती सुद्धा बाहेर उतरली नाही.पण गाडीचा नंबर मात्र स्पष्ट दिसला आहे."रहाटे. "गुड." निशांत. "चला आपण निघू या. सेक्रेटरी आणि वॉचमॅन तुम्हाला काही संशयास्पद आढळल इथे तर लगेच आम्हाला कळवा.येतो आम्ही." निशांत. निशांत आणि त्याची टीम पोलीस स्टेशनला पोहचते. "जोशी मॅडम सर्वांना चहा मागवा आणि केबिन मध्ये बोलावून घ्या सर्वांना." निशांत. " येस सर.आलेच मी" जोशी मॅडम. निघून जातात.तितक्यात निशांत ला डॉ.दीक्षितांचा कॉल येतो. "बोला डॉक्टर" निशांत. "निशांत पत्रकार सुजित वाघमारे चा अटॅक येऊन मृत्यू झाला नसून त्याला अत्यंत विषारी पॉयझन दिल आहे.पण ते अस मी जाहीर करू शकत नाही.ते पॉयझन अत्यंत घातक असत आणि सामान्य माणसाला भेटत नाही.हे पॉयझन प्राण्यांच्या उपचारासाठी वापरतात.त्याचा जास्त वापर केल्यास हृदय क्षणात बंद पडत.जो कोणी आहे तो नक्कीच मास्टर माइंड आहे."डॉ.दीक्षित. "एक मिनिट डॉ. मग हे आधीच पोस्टमार्टममध्ये का नाही कळाल?"निशांत. "निशांत हे पॉयझन साध्या रक्ततपासणी द्वारे कळून येत नाही.त्यामुळेच पोस्टमार्टन अहवाल मध्ये अटॅक ने मृत्यू अशी नोंद झाली.आता बघ मी माझं काम केलं आहे.हा एक नियोजन पूर्ण खून आहे ह्यावर ठाम आहे.आता गुन्हेगाराचा शोध तुला घ्यावा लागेल." डॉ.दीक्षित. " ठीक आहे डॉ.आभारी आहे.थँक्स" निशांत कॉल ठेवतो.थोड्या वेळात निशांत ची टीम केबिन मध्ये येते. " या बसा" निशांत. सर्व निशांत पुढे असलेल्या खुर्चीवर बसतात. "बोला जोशी मॅडम शेजाऱ्यांकडुन काही कळाल का?"निशांत. "सर ती सहसा जास्त कोणाच्या आल्यात गेल्यात नव्हती. ती सकाळी लवकर बाहेर पडायची आणि रात्री घरी यायची त्यामुळे तिच्याशी जास्त कोण बोलायच नाही"जोशी मॅडम. "आणि सर तिच्या कडे नातेवाईकांच येणं जाण नव्हतंच फक्त मित्र-मैत्रिणी यायचे अस सुद्धा शेजारी बोलले."रहाटे. "ठीक आहे.कदम तुम्हाला गाडी मध्ये विशेष हॉटेल च बिल सोडून काही विषेश नाही सापडलं का?" निशांत. "नाही सर.पूर्ण गाडी मध्ये एक साधी पिशवी नव्हती." कदम. "कदम ते बिल कुठे आहे द्या बघू."निशांत. कदम निशांत ला बिल देतात.निशांत त्याच निरीक्षण करत असतो.आणि अचानक आठवल्या सारख बोलतो. अरे कदम त्या सुजित वाघमारे च्या केस वेळी तुम्ही चौकशी केलात ते रेस्टॉरंट कोणत?रॉयल्स बरोबर.?" निशांत. "हो सर" कदम. "अरे मग हे सुद्धा त्याच हॉटेल च बिल आहे आणि तारीख सुद्धा त्याच दिवशी ची आहे.इतक दुर्लक्ष कस झालं आपलं.एक काम करा कदम गावडे तुम्ही सुजित वाघमारे चा फोटो घेऊन पून्हा तिच्या सोसायटी मध्ये जावा.आणि हा मुलगा इथे येत होता का ह्याबद्दल चौकशी करा.रहाटे तुम्ही पुन्हा हॉटेल रॉयल्स मध्ये जा आणि तिथले सीसीटीव्ही फुटेज मागून घ्या.जोशी मॅडम.तुम्ही तिच्या आधारकार्ड द्वारे तिच्या नातेवाईकांबद्दल माहिती काढा.लक्षात ठेवा एक सुद्धा पुरावा मागे राहिला नाही पाहिजे." निशांत. "येस सर.सर्व बोलून आपल्याला कामाला जायला निघून जातात.तितक्यात निशांत चा कॉल वाजतो." आज सुद्धा नेहमी सारख करणार आहेस का?" निशा हॅलो न बोलता जरा चिडतच बोलते. निशांत घड्याळात बघतो. ४:३० वाजून गेलेले असतात. "अग सॉरी खूप काम आहेत तरी मी येतोय तयारी करून राहा.लगेच सोडून निघायच आहे मला तुला." निशांत. "हा ठीक आहे ये.लवकर आहे मी तयार." निशा. "येस मॅम असा आलो लगेच." निशांत हसत कॉल ठेवतो.आणि पोलिस स्टेशन मधुन बाहेर पडतो.10 मिनिटात निशांत घरी पोहचतो.निशा बाहेरच उभी असते.लाल रंगाच्या साडीत ती खूपच सुंदर दिसत असते.निशांत तिच्या कडे बघतच राहतो.निशा कधी गाडी जवळ येते त्याच त्यालाच कळत नाही. "तुझं बघून झालं असेल तर निघायचं का आता आपण" निशा गालातल्या गालात हसत बोलते. "बघायचं तर अजून आहे पण काय करणार वेळ नाही आहे ना उरलेलं रात्री बघेन." निशांत निशा ला डोळा मारत बोलतो."हट"निशा निशांत ला मारत मागे बसते.निशांत ही बाईक स्टार्ट करतो आणि निघतो. निशा ला आर्ट फेस्टिव्हल ला सोडतो. "मॅडम तुमचं झालं की कॉल करा.मला वेळ नसला तर रिक्षा ने जा प्लीज." निशांत. "ठीक आहे "निशा नाक मुरडत बोलते. "प्लीज ना"निशांत बारीक तोंड करून विनवणीच्या सुरात बोलतो. "हा रे बाबा जा आता" निशा ही निशांत ला आश्वस्त करत बोलते. निशांत ही निशा ला बाय करून पोलीस स्टेशन ला निघतो.*******************************************"आता का कॉल केला आहेस तुला सांगितलं ना थोडे दिवस कॉल करू नकोस अस.कळत नाही का तुला?"फोनपली कडील व्यक्ती जरा चिडतच बोलते. "इथे काय चालू आहे ह्याच भान आहे का तुला आपले दोन पार्टनर कमी झाले आहेत ह्याच भान आहे ना तुला की आपला नंबर लागायची वाट बघतोय? फोनवरील व्यक्ती. "हा मग आता काय करायचं त्या साल्याना अक्कल नव्हती म्हणून मेले ते तू घाबरू नकोस.आणि पोलीसांना जाऊन काही बोललास ना तर साल्या मीच तुला वरती पोहचवेन." फोनपली कडील व्यक्ती जरा गुर्मीतच बोलते. "हम्म" फोनवरील व्यक्ती. "ठीक आहे ठेव आणि लक्षात ठेव पोलिसांना काही सांगू नकोस नाही तर गाठ माझ्याशी आहे.अणि कामाशिवाय कॉल करू नकोस चल ठेव कॉल." फोनपली कडील व्यक्ती. कॉल कट होतो.आणि पसरते भयाण शांतता,वादळापूर्वीची...! !*******************************************निशांत निशाला आर्ट फेस्टिव्हलला सोडून पोलिस स्टेशनला जायला निघतो. वाटेत असताना त्याला कदम यांचा कॉल येतो. निशांत गाडी रस्त्याच्या एका बाजूला घेऊन कॉल उचलतो. "बोला कदम" निशांत. "जय हिंद सर. वाहतूक नियंत्रण शाखेतून आताच कॉल आला होता.ती गाडी त्या मुलीच्या नावावर नसून खासदार श्रीनिवास देशमुख यांचा एकुलता एक मुलगा "मनोज देशमुख" च्या नावावर आहे."कदम. "व्हॉट?कदम हे खात्रीशीर सांगत आहात तुम्ही? "निशांत. "हो सर मला सुद्धा आधी लगेच पटल नाही म्हणून पुन्हा खात्री करायला सांगितली. पण त्याच्याच नावावर आहे हयावर वाहतुक नियंत्रण शाखा ठाम आहे.तसा त्यांनी रीपोर्ट सुद्धा मेल केला आहे." कदम. "ठीक आहे कदम.बहुतेक ही प्रकरण जड जाणार आहे.तुम्ही आहात कुठे?"निशांत. "मी गावडे सोबत हॉटेल रॉयल्सला आलोय."कदम. "ठीक आहे. काम झाल की पोलिस स्टेशनला या." निशांत. "ओके सर " कदम कॉल ठेवतात. निशांत लगेच कमिशनर ऑफिस ला कॉल करतो."जय हिंद सर" निशांत." जय हिंद निशांत. बोल." कमिशनर. "सर एका मुलीच्या मर्डर केस मध्ये खासदार श्रीनिवास देशमुखांचा मुलगा मनोज देशमुख याची चौकशी करायची आहे." निशांत कमिशनरला परिस्थितीची थोडक्यात कल्पना देतो. "ठीक आहे निशांत पण मीडिया पासून जमेल तितक लांब ठेव जो पर्यन्त खरा आरोपी भेटत नाही तो पर्यंत." कमिशनर . "येस सर" निशांत कॉल ठेवतो आणि पोलिस स्टेशनला जायला निघतो.पोलिस स्टेशन .. निशांत पोलिस स्टेशनला पोहचतो. "आय अॅम कमिंग सर?" जोशी मॅडम केबिन मध्ये येत विचारतात. "येस कमिंग"निशांत. "सर आधार कार्ड द्वारे त्या मुलीची ओळख पटवण्यात यश आल. पण; त्या मुलीचे आई वडील हयात नाही आहेत.पण तिची एक बहीण आहे.तीच लग्न झाल असुन सध्या ती गुजरात ला राहते .तिला संपर्क करून कल्पना दिली आहे.ती आजच निघाणर आहे उद्या संध्याकाळ पर्यन्त पोहचेल इकडे." जोशी मॅडम. "गुड वर्क मॅडम. ठीक आहे. गावडे रहाटे आले की बोलवा त्यांना." निशांत. "चालेल सर". जोशी मॅडम निघून जातात.तितक्यात कदम आणि रहाटे आत मध्ये येतात. "या बसा" निशांत त्या दोघांना बसण्याची खूण करतो. "सर आम्ही हॉटेल मध्ये पुन्हा चौकशी केली,पण; हवी तशी माहिती नाही मिळाली. त्या रात्री सुजीत वाघमारेला भेटायला आलेली व्यक्ति एक मुलगा होता पण त्याने तोंड झाकलेल असल्यामुळे त्याचा चेहरा दिसला नाही अस तिथले वेटर सांगतात." रहाटे. "आम्ही शर्मिला रावराणे हीचा फोटो सुद्धा दाखवला पण तिथे ती आली नव्हती अस तिथले वेटर सांगतात. सिसिटीव्ही फुटेज मधून सुद्धा काही निष्पन्न झाल नाही." कदम. "ठीक आहे हॉटेल बाहेरच्या सिसिटीव्ही फुटेज चेक केले का?' निशांत. हो सर हॉटेल बाहेर एकच सिसिटीव्ही आहे त्याचे फुटेज सुद्धा चेक केले पण तो आलेला माणूस हॉटेल पासून लांब चालत जाऊन एक रिक्षा मध्ये बसून गेलेला दिसतोय आम्ही सिसिटीव्ही फुटेज सोबत आणले आहेत तुम्ही चेक करू शकता."राहाटे निशांत ला पेनड्राईव्ह देतात.निशांत पेनड्राईव्ह लॅपटॉपला जॉइंण्ड करून सिसिटीव्ही चेक करतो. हॉटेल मधून बाहेर पडलेली ती व्यक्ति सरळ चालत जाऊन पुढे एका रिक्षा ला हात दाखवून निघून गेलेली दिसते. पण कॅमेरा मध्ये रिक्षाचा नंबर स्पष्ट दिसत नसतो.निशांत पुन्हा झूम करून चेक करतो. आणि त्याला हव असत ते दिसत. एक रहस्यमयी हास्य निशांत च्या चेहऱ्यावर येत.रहाटे आणि कदम दोघानाही त्याच्या हास्या मागचा अर्थ कळतो. "काही मिळाल का सर?. कदम आपली शंका बोलून दाखवतात. निशांत तेच रहस्यमयी हास्य चेहऱ्यावर ठेवून बोलतो."कदम ह्या केस मध्ये आपली कसोटी आहे. मला आता जास्त काही भेटल नाही आहे. पण गुंता झालेल्या दोऱ्याच एक टोक जरी हातात आल तरी दोऱ्याचा गुंता सोडवण सोप जात. आणि तेच टोक आपल्याला गवसल आहे. हे बघा. निशांत लॅपटॉप ची स्क्रीन कदम आणि रहाटे कडे करतो. "बघा त्या रिक्षाचा नंबर दिसत नसला तरी त्या रिक्षा च्या मागे नाव आहे ते स्पष्ट दिसत आहे."निशांत. "पप्पु ?" कदम ऊचारतात. "येस कदम पप्पू.ह्याला शोधण अवघड असल तरी कठीण नाही. एक काम करा आपल्या खबरीना कामाला लावून त्या रॉयल्स हॉटेल च्या एरियात रिक्षा स्टॉप असतील तिथे अशी रिक्षा भेटते का बघायला सांगा . खास करून रात्रीच्या वेळी तो रिक्षावाला भेटेल अशी आशा आहे." निशांत. "चालेल सर" कदम. तितक्यात आत मध्ये गावडे येतात. "या गावडे बसा." निशांत. "सर आम्ही पुन्हा चौकशी केली.तिथल्या सोसायटी मधल्या खूप जणानि सुजीत वाघमारे ला शर्मिला रावराणेच्या रूम वर आलेल बघितल आहे." गावडे. " म्हणजे माझ्या संशय खरा होता. पत्रकार सुजीत वाघमारे आणि शर्मिला रावराणे ह्या दोघांच्या खुनाची लिंक एकेमेकांसोबत मिळती जुळती आहे." निशांत. "सर खासदार श्रीनिवास देशमुख यांच्या मुलाच काय ?" कदम. "कदम तो तर महत्वाचा धागा आहे पण त्याच्या कडे वळण्या आधी आपण पुन्हा सुजीत वाघमारे च्या प्रियसीची चौकशी करायला हवी त्यासाठी आपण आताच निघूया." निशांत. "येस सर" कदम. निशांत आणि त्याची टीम सुजीत वाघमारेच्या प्रेयसीच्या घरी जायला निघते . एका हाऊसिंग सोसायटी मध्ये तिची रूम असते. गावडे दरवाजाची बेल वाजवतात.दरवाजा उघडतो.दरवाजा उघडणारी व्यक्ति पोलिस बघून चकित होते.आणि दरवाजा उघडणारी व्यक्ति दुसरी तिसरी कोण नसून सुजीत वाघमारे ची प्रियसी स्नेहा पाटील असते. "तुम्ही??" स्नेहा आश्चर्य चकित होते. "का आम्ही येण तुझ्या साठी अनेपक्षित होत का? निशांत लगेच स्नेहा च्या डोळ्यात बघत बोलतो. न.. नाही.. नाही या ना आत." स्नेहा अडखळत बोलते."नको राहू दे आम्ही फक्त चौकशी करायला आलो होतो. मला सांग ह्या मुलीला तू ओळखतेस का?" निशांत शर्मिला रावरणेचा फोटो दाखवत विचारतो. स्नेहा तो फोटो निरखून बघते."नाही सर ह्या मुलीला तर मी पहिल्यांदा बघत आहे. कोण ही?" स्नेहा. "तू खर ओळखत नाहीस?बघ लपवून ठेवू नकोस जे असेल ते खर सांग." निशांत. "सर मी खरच सांगतेय मी नाही ओळखत ह्या मुलीला मी पहिल्यांदाच बघत आहे ह्या मुलीला." स्नेहा जराही न घाबरत बोलते. "ठीक आहे.तर ऐक ह्या मुलीचा सुद्धा खून झालाय आणि सुजीत ह्या मुलीच्या घरी येवून जाऊन असायच्या अशी माहीती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे सुजीत आणि या मुलीच्या खुनाचा संबंध मिळता जुळता आहे. म्हणूनच आम्ही तुझ्याकडे चौकशी साठी आलो होतो. जे असेल ते खर सांग. त्यामुळे आम्हाला सुद्धा तुझ्या प्रियकरच्या मृत्यू चा तपास लावण सोप जाईल ."निशांत. "सर तुम्ही खात्रीशिर सांगत आहात?" स्नेहा. 'मग तुला काय आम्ही खोट बोलायला आलो आहोत अस म्हणायच आहे का? गावडे जरा चिडतच बोलतात."सॉरी सर पण सुजीत माझ्या पासून काही लपवून ठेवत नव्हता. त्यात अस एका मुलीच्या घरी वारंवार जाण हे खरच माझ्यासाठी अनेपक्षित आहे मला हयातून सावरायला काही वेळ हवा आहे.आणि खरच मी त्या मुलीला ओळखत नाही."स्नेहा रडकुंडीला येते. निशांतही तिच्याकडून आता काही माहिती भेटेल ही अपेक्षा सोडतो."ठीक आहे पण तुला काही आठवल तर ताबडतोब आम्हाला संपर्क कर."निशांत. "हा सर" स्नेहा मुसमुसत बोलते. निशांत आणि त्याची टीम स्नेहा च्या घरून निघते."गावडे त्या सुजीत वाघमारे चा मित्र निनाद मुंडेला बोलावून घ्या पोलिस स्टेशनला." निशांत जीप मध्ये बसताना गावडेना सांगतो. ठीक आहे सर" गावडे.निशांत पोलिस स्टेशनला पोहचतो. जीपमधुन उतरताना निशांतला कॉल येतो. "हॅलो" निशांत. "वाजले किती" फोनपलिकडील व्यक्ती. "अहहो सॉरी निशा सहा कधी वाजून गेले कळलच नाही ग खूप कामात होतो.मी आता लगेच निघतोय.कुठे आहेस तू?? plz रागावू नकोस ना." निशांत. "अरे हो हो ऐकून तरी घे. मी घरी नाही गेली आहे. मला माहिती होत आमच्या इन्स्पेक्टर साहेबाना वेळ होणार ते म्हणून मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आलीय आर्ट फेस्टिव्हल मध्ये भेटलो आम्ही तू तुझ काम आवरून ये आरामात पण रात्री बाहेर डिनर फिक्स हा"निशा. "हो नक्की राणीसाहेब नक्की आणि थॅंक्स समजून घेतल्या बद्दल." निशांत लाडात येत बोलतो. " हो का बस झाल उगाच मस्का मारू नकोस." निशा हसत बोलते. "चल थोड काम आवरून मी येतो न्यायला तुला.मला अॅड्रेस व्हॉटसअप् कर."निशांत. "हो करते." निशा. निशांत कॉल कट करतो आणि केबिन मध्ये येतो.तितक्यात गावडे आत मध्ये येतात. 'जय हिंद सर. निनाद मुंडे आला आहे." गावडे. "त्याला कस्टडीत घ्या आलोच मी.'निशांत. गावडे निघून जातात. निशांत ही कस्टडीत जातो.आणि गेल्या गेल्या निनाद च्या एक एक सणसणीत कानाखाली मारतो. "तुम्ही हे कायकरताय." निनाद घाबरत बोलतो. "हे तर मी तुला विचारायला हव तू आमच्यापासून काय लपवतोयस?" निशांत. "क.. क.. काय लपवल सर?"निनाद चेहऱ्यावरील घाम पुसत बोलतो. निशांत परत निनाद जवळ जातो पण न मारता त्याची कॉलर पकडत बोलतो हेच की "शर्मिला रावराणे आणि तुझा मित्र सुजीत वाघमारे एकमेकांना ओळखत होते ही?" निशांत जरा रागातच बोलतो."सॉरी सर पण सुजीत त्या मुलीला ओळखतो हे मला सुध्दा माहिती नव्हत. सुजीत मला तस काही बोलला नव्हता."निनाद इतक बोलतो तोच पुन्हा एकदा कानाखाली बसलेल्याचा आवाज कस्टडीत घुमला."हे बघ तू जेवढ आमच्या पासून लपवशील तेवढ तू अडकत जाशील. आम्ही शर्मिला रावराणेच्या सोसायटी मध्ये चौकशी केली आहे. तू आणि सुजीत तिच्या रूम वर येऊन जाऊन होतात अस आम्हाला कळाल आहे म्हणून बऱ्या बोलाने सांग नाही तर आता तुला आमची खाकी दाखवावी लागेल. निशांत निनाद ची कॉलर पकडत बोलतो."सर सांगतो पण plz मला हयात अडकवू नका. माझ करियर खराब होईल सर." निनाद हात जोडत रडत बोलतो."ठीक आहे बोल. हा पण सर्व खर सांगायच हे लक्षात ठेव.कळाल." निशांत. " हो सांगतो सर. मी शर्मिला रावराणेला सुजीत मूळे ओळखतो.त्या दोघांच अफेअर होत. पण दोन वर्षापूर्वी त्याचा ब्रेकअप झाला होता अस मला स्वत:हून सुजीत ने सांगितल होत.आणि एका महिन्यातच स्नेहा पाटील सोबत रिलेशन शिप मध्ये आला.आणि तीन महिन्यापूर्वी मी त्याला एकदा शॉपिंग मॉल मध्ये पुन्हा शर्मिला रावराणे सोबत बघितल होत. त्या बद्दल नंतर त्याला विचारल सुद्धा,तर तो म्हणाला होता की,आम्ही आता फक्त मित्र म्हणून राहणार आहोत पण तू ह्याबद्दल स्नेहाला काही बोलू नकोस. तिला हे आवडणार नाही. मी सुद्धा दुर्लक्ष केल आणि सोडून दिल. मग अधून मधुन आमची पार्टी असली की आम्ही तिच्या रूम वर जायचो. बस इतकच माहिती आहे सर मला.बाकी काहीच महिती नाही. "निनाद श्वास घेत बोलतो. "ठीक आहे मला सांग शेवटच तू तिच्या घरी केव्हा गेला होतास आणि तेव्हा काही वादविवाद झाले होते का?" निशांत. "नाही सर" निनाद. "बर. शेवटचा प्रश्न खासदार श्रीनिवास देशमुख यांचा मुलगा मनोज देशमुख ह्याला तू ओळखतोस का?"निशांत. "नाही सर पण शर्मिला आणि तो मित्र आहेत अस मला सुजीत कडून कळाल होत.तिला गाडी सुद्धा त्यानेच घेऊन दिली आहे अस सुद्धा मला सुजीत बोलला होता." निनाद आता बऱ्यापैकी सावरला होता. "ठीक आहे गावडे ह्याच स्टेटमेंट लिहून सोडा ह्याला आणि तू लक्षात ठेव काही लपवण्याचा पर्यन्त केलास तर गाठ वर्दीशी आहे. आणि ही केस सॉल्व झाल्याशिवाय तू आमच्या परवानगी शिवाय शहर सोडून जाऊ शकत नाहीस. आणि तसा प्रयत्न सुद्धा करू नकोस." निशांत निनादला धमकी वजा इशारा देतो. आणि कस्टडीतून बाहेर पडतो. मागून रहाटे सुद्धा येतात. "सर आपण तर सोसायटी मध्ये निनाद विषयी चौकशी केली नव्हती मग तुम्हाला कस कळाल." रहाटे निशांतला विचारतात. "राहटे मी फक्त अंदाज लावला होता बस तो खरा ठरला." निशांत रहस्यमयी हास्य आणून बोलतो. रहाटे सुद्धा निशांत ला हसून प्रतिसाद देतात. तितक्यात निशांतला कॉल येतो. "जय हिंद सर. हो हो ओके चालेल सर. मी पूर्ण दक्षता घेईन." निशांत मोजक कॉल वर बोलून कॉल ठेवतो. "काय झाल सर."राहटे. "उद्या सकाळी देशमुखांच्या मुलाची चौकशी करायला जायच आहे कमिशनरनि तशी देशमुखना कल्पना दिली आहे फक्त मीडियाला लांब ठेवायची ऑर्डर आहे."निशांत. "सर बहुतेक हे प्रकरण आपल्याला जड जाणार आहे" राहटे. "नक्कीच. तसच काहीस वाटत.चला आणि एक काम करा खबरीना कमाला लावा आणि काही माहिती मिळते का बघा. खास करून शर्मिला रावराणे जिथे काम करायची तिथून माहिती काढा. " निशांत. 'येस सर"राहटे. निशांत पोलिस स्टेशन बाहेर येतो आणि बाईक वर बसण्या आधी निशा ने व्हॉटसउप केलेला पत्ता बघतो. आणि बाईक स्टार्ट करून निशाला पिकअप करायला निघतो.निशांत थोड्याच वेळात निशा ने अॅड्रेस पाठवलेल्या पत्त्यावर पोहचतो. आणि निशा ला कॉल करतो. "हॅलो मॅडम आम्ही आपण सांगितलेल्या ठिकाणी आम्ही हजर झालो आहोत आपण कुठे आहात." निशांत लाडात येत बोलतो. "हो का लवकर आलात हा आपण दहा वाजून गेले आहेत.तरी राहू दे वरती रूम नंबर 4 मध्ये ये माझ्या शॉपिंग च्या बॅग आहेत त्या उचलायला" निशा हसत बोलते."आप धन्य हो माते." निशांत केविलवाण्या सूरात बोलतो. आणि कॉल कट करून रूम नंबर 4 कडे जायला निघतो. निशांत रूमच्या जवळ पोहचतो तेव्हाच निशा आणि तिची मैत्रीण दरवाज्यात उभ्या असतात. निशा आणि तिच्या मैत्रिणीच्या हातातल्या बॅग्स बघून निशांत मनातल्या मनात बोलतो,"बहुतेक क्रेडिट कार्ड खाली केल आहे मॅडम नि" हे बघ आज न्यायला आला हे माझ नशीब नाही तर आज तुझ्याकडेच झोपव लागल असत."निशा निशांत कडे न बघता बोलते. "उरलेल घरी गेलो की ऐकतो मॅडम आता निघायच का आपण? निशांत निशाला बोलतो आणि तिच्या हातातल्या बॅग्स घेऊन जायला निघतो.निशा ही तिच्या मैत्रिणीला बाय करून निशांत च्या मागून निघते.निशांत बाईक स्टार्ट करतो. निशा मागे बसते. "बोल कुठे जायच ?" निशांत. "घरी"निशा रागवून बोलते. "हो का म्हणजे मी उपाशी झोपू का? निशांत हसत बोलतो.आणि गाडी स्टार्ट करून निघतो.निशा चा मूड बदलण्यासाथी निशांत बोलतो "काय ग कोण ही नवीन मैत्रीण" निशांत. "माझ्या कॉलेज मध्ये होती मला सुद्धा नीट आठवत नाही पण ती मला ओळखते. यामिनी डिसूझा. सुप्रसिद्ध आर्टिस्ट आहे ती." निशा. "बर बर बस झाले गोडवे हॉटेल आल आता उतरा" निशांत.दोघेही एका हॉटेल मध्ये डिनर करतात.निशाचा राग घालवण्यासाठी निशांत तिला बीच वर घेऊन जातो. दोघेही काही वेळ घालवतात आणि थोड्या वेळात घरी जायला निघतात.******************************************************************************"काय तू सुजीत मला ओळखायचा हे तू पोलिसाना सांगितलस?"फोनपलिकडील व्यक्ति. "हो मला पर्याय नव्हता. पण अजून मी आपली ओळख सांगितली नाही आहे."फोनवरील व्यक्ति अर्थात निनाद. "ठीक आहे बर झाल आत एक काम कर हा नंबर बंद कर आणि मुंबई सोडून जा कुठे पण जा पण जा." फोनपलिकडील व्यक्ति अर्थात मनोज श्रीनिवास देशमुख. "पैसे?" निनाद. "मला माहिती होत तू पैसे मागणारच. माझ्या एक पंटर तुला करेल पैसे ट्रान्सफर आणि एक मिनिट तू "त्या" घटनेबद्दल काही बोलला नाहीस ना?'' मनोज. "नाही" निनाद. ठीक आहे तू उद्याच मुंबई सोडून जा आणि सावध रहा नाही तर तिसरा नंबर तुझा लागेल.'' मनोज असूरी हास्य करत म्हणाला. 'आणि तुझा चौथा का?" निनाद सुद्धा खुन्नसी स्वरात म्हणाला. मनोज ने एक शिवी देऊन कॉल कट केला.******************************************* त्याच रात्री मुंबई पासून दूर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या एक बंगल्यावर काळ येऊन टेपला होता. काळ्या कुट्ट अंधारात तो बंगला भयाण भासत होता. जणू कोणत्या तरी भीषण घटनेची तो साक्ष देत होता.पण कोणत्या हे कळालाच माहीत."धड.. धड.." शांततेला चिरत एक मोठा आवाज झाला. कोणीतरी बंगल्याच्या दारावर जोरजोराने हात मारत होत. "कोण आहे रे ह्या रातच्याला मारायला आल आहे उद्या या." बंगल्याचा राखणदार असलेला 28-30 वर्षाचा वसिम दारू ढोसत होता. तो बसल्या जागूनच ओरडत म्हणाला. तेवढ्यात परत मगाच सारखा आवाज पण कदाचित त्या पेक्षा जास्त मोठा आवाज झाला. वसिम जरा चीड चीड करत तोल सावरत उठला आणि त्याने दारवजा उघडला. पण दरवाज्या बाहेर काळ्या कुट्ट अंधाराशिवाय काहीच त्याला दिसले नाही. काही दिसाव इतक्या शूध्दित तो नव्हता. "कोण मरतंय रे" वसिम पुन्हा एकदा चिडत म्हणाला पण त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो घरात जायला वळला आणि तोच त्याच्या मागून कोणी तरी अचानक पणे येऊन त्याच्या मानेवर अलगद पणे हात फिरवला आणि त्या व्यक्तीने क्षणात वसीमला सोडून दिल. आणि वसिम गळा चिरलेल्या कोंबडी प्रमाणे जमनीवर तडफडू लागला.शेवटचे डोळे मिटण्या आधी वसिम ने त्या व्यक्तीला बघण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि त्या व्यक्तीचा अर्ध्या प्रकाशात चेहरा बघून "त. त.. त.. तू.. तू" करतच वसिम ने प्राण सोडला भीती मुळे तो डोळे सुद्धा बंद करू शकला नाही. आणि अंधारातून आलेली ती गूढ व्यक्ति अंधारातच गुडुप झाली.कोण होती ती व्यक्ति? का करत होती ती आस हे येणारा काळच सांगणार होता.******************************************* निशांत आणि त्याची टीम सकाळीच खासदार श्रीनिवास यांच्या बंगल्यावर पोहचली होती. बंगल्याचा थाट देशमुखांची श्रीमंती दाखवत होता.खासदार साहेब दौऱ्यावर असल्यामुळे ते घरात नव्हते. त्यामुळे निशांतलाहवी तशी चौकशी करता येणार होती. "या बसा मी छोट्या साहेबाना बोलावून आणतो." तिथला एक नोकर म्हणाला. थोड्याच वेळात २५-२६ वयाचा तरुण खाली आल तोच होता 'मनोज श्रीनिवास देशमुख.' एक स्मित करत त्यांने निशांत सोबत हस्तांदोलन केल. "काय कस काय येण केलत साहेब.'' मनोज स्मित करत बोलतो. "आम्ही का आलो आहोत ह्याची कल्पना तुला तुझ्या वडीलानी दिलीच असेल. तरी जास्त वेळ घेणार नाही. तुझा शर्मिला रावराणे सोबत संबंध काय हे जाणून घ्यायच आहे." निशांत मनोजच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. पण मनोज सुद्धा बहुतेक तयारिच करून आलेला असतो. "हे बघा ती फक्त माझी एक चांगली मैत्रीण होती या बाकी काही संबंध नाही." मनोज न घाबरत निशांतच्या डोळ्यात डोळे घालत बोलला. "मग स्वत:च्या मैत्रिणीचा खून झाला तरी तू काही चौकशी का नाही केलीस.जेव्हा खून झाला तेव्हा कुठे होतास?" निशांत. "मी खासदार साहेबांसोबत एका दौऱ्यावर गेलो होतो. वाटल्यास तुम्ही विचारू शकता.त्यातून फ्री झालो की तुम्हाला भेटायला येणारच होतो कारण ति वापरत असलेली गाडी मीच तिला दिली होती आणि त्यावरून तुम्ही संशय घेण साहजिक आहे." मनोज न घाबरता बोलला. "ठीक आहे तिचा तुझ्याशी किंवा अजून कोणशी वादविवाद."निशांत. " नाही पण दुसऱ्या कोणाशी असेल तर ते मला माहिती नाही.' मनोज. "तु निनाद मुंडेला ओळखतोस का?"निशांत. "नाही" मनोज. "ठीक आहे. काही गरज लागली तर पुन्हा भेटुच. येतो आम्ही." निशांत. "हो चालेल." मनोज स्मित करत म्हणाला. निशांत आणि त्याची टीम बंगल्यातून बाहेर पडली. "सर" रहाटे. "बोला" निशांत. "सर सुजीतला भेटायला जी व्यक्ति आली होती.आणि रिक्षातून बसून गेली तो रिक्षा वाला आपल्या खबरींना भेटला आहे. त्याला पोलिस स्टेशनला घेऊन आले आहेत.'' रहाटे. ''गुड आणि ती शर्मिला रावराणे काम करायची त्या स्टुडिओ च काय?'' निशांत. "तिथे सुद्धा खबरी लावले आहेत सर. बहुतेक तिथून ड्रग्स विकले जातात अशी माहिती मिळाली आहे फक्त पुष्टी करण्यासाठी पुन्हा एकदा माहिती मिळवायला सांगितली आहे." रहाटे. "भारीच रहाटे.माहिती मिळाली की लगेच अॅक्शन घेऊ बहुतेक ह्या केसेस च टोक खूप खोलवर रुतलेल आहे." निशांत. निशांत आणि त्याची टीम पोलिस स्टेशनला पोहचली.निशांत आल्या आल्या कस्टडीत निघून आला. त्याच्या मागून गावडे ,कदम आणि रहाटे सुद्धा आले."नाव काय तुझ?" निशांत ने कस्टडीत खुर्चीवर बसलेल्या एक २७-२८ वर्षाच्या तरुणाला विचारल. "राहुल नाव आहे माझ साहेब" तो तरुण खुर्चीतून उठत म्हणला. निशांत ने परत त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला खुर्चीत बसवल आणि स्वत; समोरच्या टेबलवर बसला. "हे बघ राहुल आम्ही तुला इथे गुन्हेगार म्हणून घेऊन आलो नाही आहोत.त्यामुळे आम्हाला तू जे माहिती असेल ते सांगून टाक काहीच लपवून ठेवू नकोस." निशांत. "हो साहेब.त्या रात्री मला ते मास्क लावलेले साहेब भेटले त्यांना मी जवळच रोड वर सोडल. बहुतेक त्यांची गाडी खराब झाली होती." राहुल न घाबरता म्हणाला. "गाडीचा नंबर बघितला होतास का तू? किंवा त्या व्यक्तीचा चेहरा?'' निशांत ही काही भेटेल ह्या आशेने विचारतो. "नाही साहेब आधीच वेळ झाला होता घरी जायला म्हणून लक्ष नाही दिल इतक." राहुल जरा घाबरत म्हणाला. "ठीक आहे अजून काही आठवल तर आम्हाला सांग. आता जाऊ शकतोस तू. कदम ह्याच नाव नंबर घेऊन ठेवा."निशांत"येस सर" कदम. निशांत कस्टडीतून बाहेर येतो. तितक्यात त्याला कमिशनर चा कॉल येतो. "जय हिंद सर'' निशांत. " निशांत पत्रकार सुजीत आणि त्या एक मुलीच्या खुनाच्या केस च काय झाल.?" कमिशनर. 'सर तपास चालू आहे आम्ही लवकरच खऱ्या गुन्हेगारपर्यंत पोहचू." निशांत."निशांत अशी उत्तर न्यूज रीपोर्टना दे. मला वरती उत्तर द्याव लागत.एका पत्रकराची हत्या झालीय त्यामुळे न्यूजवाले सुद्धा पोलिस डीपार्टमेंट वर प्रश्न चिन्ह निर्माण करत आहेत" कमिशनर नाराजिच्या सूरात म्हणाले. "येस सर मी लवकरात लवकर केस सोडवण्याचा प्रयत्न करतो." निशांत. "ठीक आहे." कमिशनर कॉल कट करतात.तेवढ्यात मागून राहटे येतात. "सर न्यूज बघितली का?" रहाटे निशांत ला हातात मोबाईल देत बोलतात. "नाही का काय झाल?" निशांत मोबाइल हातात घेत बोलतो. "खासदार श्रीनिवास देशमुख ह्याच्या अलिबाग येथील फार्म हाऊसच्या केयरटेकर ची गळा चिरून हत्या. हत्येच कारण अद्याप ही अस्पष्ट. व्हॉट??? रहाटे मग आपल्याला मनोज देशमुख बोलला का नाही.? एक काम करा रहाटे.त्या मनोज ला कॉल करा." निशांत. "येस सर." रहाटे कॉल लावतात. "सर कॉल लागत नाही आहे." राहटे निशांत ला सांगतात. "निशांत लगेच खासदार श्रीनिवास देशमुखांच्या पीएला कॉल लावतो. "हॅलो मी पोलिस सब इन्स्पेक्टर निशांत सरपोतदार बोलतोय. खासदार श्रीनिवास देशमुख ह्यांच्या मुलाचा नंबर लागत नाही आहे आम्हाला एका केस संदर्भात त्यांची चौकशी करायची आहे." निशांत."बहुतेक तुम्हाला कळालच असेल खासदार साहेबांच्या अलिबाग मधल्या फार्म हाऊस च्या केयर टेकरची हत्या झाली आहे हे छोटे साहेब सुद्धा तिकडेच निघाले आहेत."पीए जरा गुरमितच बोलला. "ओके थॅंक्स." निशांत ने कॉल कट केला. "रहाटे ताबडतोब अलिबाग पोलिस स्टेशनला रीपोर्ट करा.आपण आल्याशिवाय कोणाला आत सोडू नका अशी सक्त ताकीद द्या." "येस सर." रहाटे. "कदम जीप काढा आपण आताच अलिबाग ला निघतोय." निशांत. "येस सर."कदम. थोड्याच वेळात निशांत आणि त्याची टीम अलिबाग कडे रवाना होते.दोन तासांच्या प्रवास नंतर निशांत आणि त्याची टीम अलिबाग मधील खासदार श्रीनिवासांच्या फ्राम हाऊस वर पोहचली.अलिबाग मध्ये एका बीच लगतच ते फार्महाऊस होत.निशांत जीप मधून खाली उतरला बहुतेक पोलिसानी डेड बॉडी पोस्टमार्टम साठी पाठवली होती. पोलिसांचा कडेकोट पहारा त्या फार्महाऊस ला होता. निशांत ला बघताच तिथले दोन हवालदार लगबगीने पुढे आले. "जय हिंद सर'' ते दोन हवालदार कडक सलयूट मारत म्हणाले. "जय हिंद. क्राईम स्पॉट कुठे आहे?आणि तुमचे इन्स्पेक्टर साहेब कुठे आहेत." निशांत. "सर ते आत आहेत आणि बहुतेक खून होऊन जास्त कालावधी झाला होता म्हणून डेड बॉडी पोस्टमार्टन साठी पाठवून दिली आहे. या तुम्हाला स्पॉट दाखवतो.इन्स्पेक्टर सुद्धा तिथेच आहेत." मानकर हवालदार. "ठीक आहे चला" निशांत आणि त्याची टीम त्या दोन हवालदारांच्या मागून निघते. निशांत चालता चालता फार्म हाऊस च निरीक्षण करत असतो. एकदम शांत ठिकाणी निसर्गरम्य परिसरात ते फार्म हाऊस असत. आजूबाजूलाही फक्त समुद्र जवळपास एखाद घर सुद्धा दिसत नसत. एकदम निर्जन स्थळी ते ठिकाण असत."सर हे इन्स्पेक्टर देशपांडे साहेब हेच तपास करत आहेत" मानकर हवालदार निशांत ची इन्स्पेक्टर देशपांडे सोबत ओळख करून देतात. "जय हिंद सर'' देशपांडे सलूटमारत बोलतात. "जय हिंद देशपांडे. मी सब इन्स्पेक्टर निशांत सरपोतदार." निशांत स्वत:ची आणि त्याच्या टीम ची ओळख करून देतो. "देशपांडे खून अंदाजे कितीला झालाय ? " निशांत. "अंदाजे बारा ते दोन च्या दरम्यान" देशपांडे. "तुम्हाला खबर कोणी दिली?"निशांत. "इथे सकाळी माळी कामाला येतो त्याने" देशपांडे. "आहे की सोडलात त्याला?" निशांत. "नाही थांबवल आहे त्याला.मानकर जा त्या माळीला घेऊन या"देशपांडे. मानकर हवालदार त्या माळीला घेऊन येतात. "काय रे नाव तुझ?" निशांत त्या माळीला विचारतो."माझ नाव किसन आहे साहेब." एक पस्तीस चाळीस वर्षाचा किसन बोलतो. "किती वर्षापासून आहेस इथे कामाला?" निशांत. "पाच वर्षापासून." किसन. "ठीक आहे तू बॉडी बघितल्यावर कशाला हात वैगरे लावला नाहीस ना?" निशांत. "नाही साहेब मी घरात जायला दरवाजा वाजवायला गेलो तेव्हा दरवाजा आधी पासूनच उघडा होता आणि उघडला तेव्हा हे साहेब मला अश्या अवस्थेत दिसले मग मी लगेच पोलिसाना कळवल."किसन. "ह्याचे कोणसोबत वाद वैगरे होते का?" निशांत."माहिती नाही साहेब माझ काम फक्त बगीच्या पुरत ह्याची भांडण वैगरे असतील तर मला माहिती नाही." किसन. "ठीक आहे आता जा तू. काही आठवल तर कळव आम्हाला." निशांत. "हो साहेब"किसन निघून जातो. "देशपांडे देशमुखांचे चिरंजीव आले होते ना ते कुठे आहेत?"निशांत. "हो सर ते डेड बॉडी सोबत हॉस्पिटला गेले आहेत." देशपांडे."ठीक आहे त्यांना पोलिस चौकी ला बोलावून घ्या."निशांत. "येस सर"देशपांडे. निशांत आणि त्याची टीम पुरावा भेटेल ह्या दृष्टीने तपास करते पण इथे सुद्धा त्यांच्या हाती निराशाच येत. थोड्या वेळाने निशांत आणि त्याची टीम अलिबाग पोलिस स्टेशनला पोहचते. मनोज देशमुखला सुद्धा चौकशी साठी आणण्यात येत. "वाटलं नव्हत एका दिवसात इतक्या लगेच आपली परत भेट होईल अस."निशांत. "म्हणजे तुम्हाला म्हणायच काय आहे. हे बघा तुम्ही येवून गेल्यावर मला ह्या घटने बद्दल कळाल.म्हणून मी इकडे तातडीने निघून आलो." मनोज. "रीलॅक्स मिस्टर मनोज देशमुख. मला इतकच सांगा तुम्ही आमच्या पासून काय लपवत आहात. आधी तुमच्या एका मित्राचा आणि मैत्रिणीचा खून आता तुमच्या फार्महाउस च्या केयर टेकरचा खून ह्याचा अर्थ काय लावायचा आम्ही." निशांत जरा मोठ्या आवाजात विचारतो."हे बघा मला ह्या बदल काही माहिती नाही त्यांचे बाहेर वाद असतील तर मला त्या बदल काही कल्पना नाही तुम्ही मला विनाकारण हयात अडकवू नका." मनोज. निशांत काही बोलणार तितक्यात निशांत चा फोन वाजतो. "हॅलो निशांत ताबडतोब काही एक कारण न सांगता मनोज देशमुखला सोडून दे नाही तर मला नाईलाजाने तुझी ट्रान्सफर करावी लागेल."कमिशनर. "पण सर.."निशांत. "इट्स माय ऑर्डर निशांत."कमिशनर. "येस सर" निशांत रागात कॉल कट करतो. "तू जाऊ शकतोस" निशांत मनोज ला बोलतो."ठीक आहे इन्स्पेक्टर"मनोज खुन्नसी हास्य करत बोलतो.मनोज निघुन जातो. "देशपांडे फॉरेन्सिक आणि पोस्टमार्टम रीपोर्ट हातात येतातच मला रीपोर्ट करा. आणि काही माहिती मिळाली तरी सुद्धा कळवा आता आम्ही निघतो. "येस सर" देशपांडे सल्युट मारत बोलतात. निशांत आणि त्याची टीम मुंबई कडे रवाना होते."सर एक ताजी खबर हाती लागली आहे." कदम केबिन मध्ये येत घाई घाईने बोलतात."कसली कदम"? "सर मनोज देशमुख आणि त्याच्या मित्रांवर म्हणजेच सुजीत वाघमारे,निनाद मुंडे आणि मनोज देशमुख ह्यांवर एका मुलीवर बलात्कार केल्याच्या केस दाखल झाल्या होत्या.पण कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केल."कदम. "व्हॉट शिट. इतक आपण विसरलो कस. ताबडतोब त्या केस ची फाइल मागवून घ्या आणि महत्वाच निनाद शी संपर्क करा."निशांत. "येस सर" कदम. कदम बाहेर निघून जातात. तितक्यात निशांत चा कॉल वाजतो. "हॅलो सर मी म.. मी निनाद ती परत आलीय सर आता मला सुद्धा सोडणार नाही. वाचवा सर.." निनाद. "हॅलो निनाद हॅलो" शीट यार कॉल सुद्धा कट झाला. निशांत लगेच केबिन मधून बाहेर येतो. गावडे ह्या नंबर च लास्ट लोकेशन काय आहे चेक कर फास्ट." निशांत. "सर,मुंबई गुजरात एक्सप्रेस वे दाखवत आहे." गावडे. "हा म्हणजे आपल्याला फसवून पळत होता. गावडे टीम ला रीपोर्ट करा आता आपण ताबडतोब निघतोय. वाहतूक पोलिसाना सुद्धा रीपोर्ट करा." निशांत. "येस सर"गावडे. निशांत वेळ बघतो तर रात्रीचे १० वाजले असतात तो निशाला आज घरी येणार नसल्याचा मेसेज करतो. आणि तो आणि त्याची टीम गुजरात एक्सप्रेस वे वर रवाना होते. गाडीत असतानाच गावडेचा कॉल वाजतो. "ओके ठीक आहे आम्ही आल्याशिवाय काहीं अॅक्शन घेऊ नका" गावडे. "सर गुजरात एक्सप्रेस वर एका चालत्या गाडीने पेट घेतला आहे. आणि रोडच्या साइड पट्टीवर जाऊन गाडी आदळी आहे. बहुतेक ती निनाद मुंडेचीच असावी." गावडे. "मला वाटल होतच असच काही तरी घडणार.अजून किती वेळ आहे रहाटे लोकेशनला पोहचायला?" "अर्धा तास" रहाटे. अर्ध्या तासात निशांत आणि त्याची टीम लोकेशनला पोहचते. वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त असतात. अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा घटनास्थळी दाखल असतात. अॅम्ब्युलेन्सच्या सायर्सन मुळे वातावरण गंभीर वाटत होत. निशांत जीप मधून उतरला.तितक्यात वाहतूक पोलिस निशांत जवळ आले. "जय हिंद सर"सोनी. "जय हिंद.अपघात कितीच्या सुमारास घडला.?आत मध्ये किती व्यक्ति होत्या त्यांची ओळख पटली का?" निशांत. "नऊ पंधरा ते साडेनऊ च्या सुमारास अपघात घडला आहे. आत मध्ये एकच व्यक्ति होती तिला खूप प्रयत्न करून आम्ही बाहेर काढल आहे बट ही इज नो मोअर.तुम्ही रीपोर्ट केल्या प्रमाणे सदर व्यक्ति तीच असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ९९ टक्के शरीर भाजल्या मुळे ओळख स्पष्टपणे पटू शकली नाही. तुम्ही डेड बॉडी बघून घेऊ शकता." सोनी. "डेड बॉडी पोस्टमार्टम साठी पाठवली का?निशांत. "नाही. आता पाठवणार होतोच. अॅम्ब्युलेन्स मध्येच आहे चला मी दाखवतो तुम्हाला."सोनी. "ठीक आहे चला. गावडे आणि रहाटे तुम्ही गाडीची तपासणी करा आलोच मी'' निशांत. "येस सर'' गावडे आणि रहाटे. निशांत डेड बॉडी बघायला जातो.डेड बॉडी पूर्ण भाजून गेलेली असते पण निशांत बॉडी च्या ऊंची आणि आकारावरुन सहज अंदाज लावतो. "काय वाटत सर हा तोच असेल का?" सोनी आपली शंका व्यक्त करतात."हो हा तोच आहे.बॉडी पोस्टमार्टम ला पाठवून द्या." निशांत. "येस सर" सोनी. निशांत डेड बॉडी बघून कार जवळ येतो. गाडी जळाली असली तरी गाडीचा नंबर थोडा दिसत असतो. "सोनी गाडीचा नंबर नियंत्रण शाखेला रीपोर्ट करून गाडी कोणाच्या नावावर आहे ते बघायला सांगा" निशांत. "येस सर" सोनी. निशांत गाडीला चहूबाजूने बघतो. शेवटी तो आत मध्ये जाऊन ब्रेक चेक करतो आणि सो अंदाज लावायचा तो लावतो. "गावडे रहाटे काही भेटल का?" निशांत. "नाही सर पण हा नक्कीच आपल्याला गुंगारा देवून पळून जात होता.कार मध्ये बॅगच हॅंडल उरल आहे." गावडे. "ते तर कळालच.बघा अजून काही भेटत का मी कमिशनर शी बोलून घेतो. "निशांत. "येस सर". निशांत बाजूला येतो आणि कमिशनरना कॉल करतो. "हॅलो सर सॉरी इतक्या रात्री कॉल केला म्हणून" निशांत. "अरे हो असू दे दुपारी जरा वारिष्ठांकडून प्रेशर आल होत म्हणून" कमिशनर. "इट्स ओके सर"निशांत. "बोल काही प्रॉब्लेम झालाय" कमिशनर. "निशांत थोडक्यात कल्पना देतो आणि मनोज देशमुख च्या सुरक्षेत वाढ करायची सूचना देतो. "ठीक आहे निशांत तुझ्या म्हण्या प्रमाणे जर खरच मनोज देशमुख च्या जीवाला धोका असेल तर आपल्याला जड जाईल. सो लवकरात लवकर आरोपी शोध. त्यासाठी काहीही कर ऑर्डर ची वाट बघू नकोस.'' कमिशनर. "येस सर"निशांत कॉल ठेवतो. तोपर्यंत गाडीची तपासणी करून गावडे आणि रहाटे आणि सोनी येतात. "सोनी फक्कड चहाची व्यवस्था करा जरा." निशांत. "हो सर सांगतो" सोनी. "सर आताच अलिबाग वरुन देशपांडेचा कॉल आला होता. पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक रीपोर्ट आले आहेत पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही.रक्तस्त्रावा मुळे मृत्यू असा अहवाल आहे आणि शरीरावर कोणतेही ठसे आढळून आले नाहीत." गावडे. "खूनी परफेक्ट प्लॅनिंग करून मर्डर करत आहे. आणि आता त्याची शेवटचा शिकार असेल मनोज देशमुख. पण आपण ही होऊ द्यायची नाही आहे. रहाटे कदमना कॉल लावून द्या."निशांत. रहाटे कदमना कॉल लावतात. "हॅलो कदम काय झाल फाईल भेटली का? आणि तिच्या कुटूबा विषयी माहिती?" निशांत. "हो सर आताच फाइल हातात भेटली आहे मी निघालो आहे पोलिस स्टेशनला. आणि तिच्या कुटूबाविषयी म्हणाल तर तिचे आई वडील हयात नाही आहेत पण तिचा भाव आहे. आपल्या खबरीना पत्ता काढायला लावला आहे भेटला की लगेच उचतो त्याला." कदम. "गुड कदम. आम्ही येत आहोतच पोलिस स्टेशनला. आणि अजून एक काम करा.अजून आपले काही खबरी मनोज देशमुख च्या घराबाहेर ठेवा.'' निशांत. "येस सर." कदम. कदम कॉल कट करतात. "सोनी आम्ही आता निघतो.पोस्टमार्टन आणि महत्वाच गाडीचा फॉरेन्सिक रीपोर्ट आला की लगेच कळवा आणि शक्य तितक्या लवकर." निशांत. "येस सर" सोनी. निशांत आणि त्याची टीम पुन्हा मुंबई कडे रवाना होते. मुंबईला पोहचे पर्यन्त सकाळचे ४ होतात. निशांत केबिन मध्ये जातो तो पर्यन्त कदम फाईल घेऊन येतात. "या कदम बसा." निशांत. "सर ही फाईल" कदम निशांत लया फाईल देत बोलतात. "आणि तिच्या भावाच काय झाल?"निशांत. "तो दादर मध्ये एक केमिस्टच्या दुकानात कामाला आहे.आपल्या खबरीना त्याला उचलायला सांगितल आहे." कदम. "गुड. कदम एक चहा पाठवून द्या तो पर्यन्त मी फाईल वाचतो तो पर्यन्त कोणाला आत पाठवू नका." निशांत. "येस सर" कदम निघून जातात. निशांत फाईल हातात घेतो. "रागिणी गडकरी अत्याचार आणि हत्याकांड सन २०१७" निशांत फाईल चे शीर्षक वाचतो आणि फाईल ओपन करतो. "लग्नाचे आमिष दाखवून रागिणी गडकरी या तरुणीवर अमानुष अत्याचार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सुजीत वाघमारे,निनाद मुंडे आणि मनोज देशमुख तसेच पीडितेची मैत्रीण शर्मिला रावराणे यांच्यावर संशयीत आरोपी म्हणून खटला दाखल. पुराव्या अभावी संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता." "पोस्टमार्टम रीपोर्ट- पीडितेवर सलग दोन दिवस सामूहिक क्रूर अत्याचार झाला. ठीक ठिकाणी अत्याचाराच्या खुणा.शेवटी श्वास गुदमारल्या मुळे पीडितेचा मृत्यू.पुराव्या अभावी फाईल बंद करण्यात आली." निशांत थोडक्यात वाचून फाईल बंद करतो. आणि खुर्चीत मागे टेकून विचार करायला लागतो.कोण असेल ह्या खून सत्रानचा खरा गुन्हेगार?गडकरी हत्याकांड आणि ह्या घडत असलेल्या घटनेचा एकमेकांशी संबंध असेल का? अस जोरात विचार चक्र चालू असत. तितक्यात आत मध्ये कदम येतात. "या कदम तुम्ही चहा ठेवून कधी गेलात ते कळाल सुद्धा नाही बघा." निशांत. "राहू दे सर मी पुन्हा मागावतो.पण सर रागिणी गडकरीच्या भावाला आणल आहे.'' कदम. "ठीक आहे कस्टडीतच दोन चहा पाठवून द्या बघूया पाहुणे काय बोलत आहेत." निशांत. "येस सर."कदम निघून जातात. निशांतही कस्टडीत येतो. रागिणी गडकरीच्या भावाला आधीच कस्टडीत आणलेल असत.साधारण ३५-४० च्या आसपासचा असतो."काय कस वाटल आमच पोलिस स्टेशन गडकरी साहेब आपली ओळख?"निशांत. "आदित्य गडकरी" तो चेहऱ्यावरची किंचितही रेष न हलवता बोलतो. "ठीक आहे तर ऐका आदित्य गडकरी तुम्हाला इथे का आणल आहे त्याची तुम्हाला कल्पना असेलच."निशांत" "मला अजिबात कल्पना नाही उलट आपली लोक माझ्या इच्छे विरुद्ध मला इथे घेऊन आले आहेत." आदित्य निशांत च्या डोळ्यात डोळे घालून बघत बोलतो. "ठीक आहे तर मी तुम्हाला सांगतोच. तुमच्या बहिणीसोबत घडल ते खूपच वाईट आणि संतापजनक होत हयात शंका नाही पण तुम्ही बदला म्हणून एका पाठोपाठ एक खून करणार असाल तर ते कायद्यात बसत नाही. त्यामुळे बऱ्या बोलाने गुन्हा कबूल करा नाही तर आम्हाला आमची खाकी तुम्हाला दाखवावी लागेल."निशांत. "कसले खून कसला बदला बोलत आहात तुम्ही ?मला काहीच काळात नाही आहे." आदित्य. निशांत जाग्यावरून उठत आदित्याची कॉलर धरत त्याला उभ करतो."हेच की तुझ्या बहिणीच्या केस मध्ये आरोपी असलेली सुजीत वाघमारे,निनाद मुंडे आणि शर्मिला रावराणे ह्यांचे खून तू केलेस ना? खर सांग." निशांत रागात बोलतो. "काय ह्यांचे खून झाले. वा मस्तच झाल." आदित्य जोरात मोठ्याने हसतो. त्याच हास्य कस्टडीत गंभीर वातावरण निर्माण करत.निशांत त्याला सोडून देतो आणि आदित्य खुर्चीत बसतो. "खरच मस्त झाल साहेब माझ्या सोन्यासारख्या बहिणीच्या आयुष्याची माती केली त्या नराधमानी. जो कोण हे करत असेल तो खरच देवदूत आहे. त्याच्यावरचा गुन्हा कबूल करायला सुद्धा मी तयार आहे." आदित्य खिन्न चेहऱ्याने बोलतो. निशांत त्याला थोडा वेळ देऊन बाहेर येतो. सकाळचे ९ वाजून गेलेले असतात. निशांत ला कमिशनर चा कॉल येतो. "जय हिंद सर"निशांत. "जय हिंद निशांत. काय कुठे पर्यन्त आला आहे तपास?" कमिशनर. "संशयित आरोपी म्हणून एकाला ताब्यात घेतल आहे पण पुराव्या अभावी काही करता येत नाही आहे तरी आमचा प्रयत्न चालू आहे" निशांत. "लवकरात लवकर आरोपी हजर नाही झाला तर केस सीबीआय कडे जाईल आणि त्यानंतर संभाव्य परिस्थितीची तुला कल्पना असलेच.आणि महत्वाच आज खासदार देशमुखांच्या घरी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याची पार्टी आहे सो पोलिस बंदोबस्त असेलच तरी सुद्धा तुम्ही अलर्ट रहा. आणि जो संशयित आरोपी आहे त्याला दिवसभर कस्टडीत ठेवण पुराव्या अभावी शक्य होणार नाही म्हणून दोन कॉन्स्टेबल त्याच्या मागावर लावा."कमिशनर. "येस सर"निशांत. निशांत कॉल कट करतो आणि पुन्हा कस्टडीत जातो. "हे बघ तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून आम्ही तुला सोडून देता आहोत पण जोपर्यंत खरा सूत्रधार भेटत नाही तोपर्यंत तू हे शहर सोडून जाऊ शकत नाहिस. आणि तसा प्रयत्न जारी केल्यास तरी तुला महागात पडेल. कदम ह्याची माहिती लिहून घ्या.आणि सोडा ह्याला. " निशांत. निशांत कस्टडीतून बाहेर पडतो. रहाटे आणि गावडे सुद्धा मागून येतात. "गावडे आपले दोन कॉंस्टेबल ह्या आदित्य गडकरीच्या मागे लावून ठेवा अगदी दिवसरात्र आणि मनोज देशमुख आणि आदित्य गडकरीचा नंबर सायबर क्राइम कडे द्या. कोणत्याही धोका असेल तर लगेच कळवा आणि रहाटे आपण आज संध्याकाळी स्वत: मनोज देशमुख च्या घरा बाहेर पहारा देणार आहोत साध्या युनिफॉर्म मध्ये या. बाकीच्याना सुद्धा रीपोर्ट करा"निशांत. "येस सर" निशांत घरी फ्रेश व्हायला निघणार असतो तो तोच जोशी मॅडम कुरियर घेऊन येतात. "सर हे तुमच्या नावाने आल आहे" जोशी मॅडम. "माझ्या नावाने?द्या ठीक आहे.बघतो मी" निशांत. जोशी मॅडम निघून जातात.निशांत कुरियर ओपन करतो ते एक लेटर असत. "आज तिचा शेवटचा न्याय-The punishment of death." हे एक वाक्य लिहलेल ते एक पानी पत्र असत.टायपिंग लेटर असल्यामुळे निशांत ही काही करू शकत नसतो. तो लेटर दुमडून खिशात ठेवतो. आणि तितक्यात त्याला वाहतूक पोलिस सोनी यांचा कॉल येतो. "बोला सोनी" निशांत. "सर गाडीचा फॉरेन्सिक रीपोर्ट आला आहे. गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि इंजिन मध्ये अचानक बिघाड झाल्याने गाडीने लगेच पेट घेतला. आणि गाडीचे दरवाजे सुद्धा आतून लॉक झाले होते." सोनी. "आणि पोस्टमार्टम रीपोर्ट?" निशांत. "९९.९९% टक्के भाजल्यामुळे मृत्यू असा अहवाल आहे." सोनी. "ठीक आहे सहकार्या बद्दल धन्यवाद"निशांत. " माझ कर्तव्य आहे सर" सोनी कॉल कट करतात. निशांत घरी जाण्याचा बेत रद्द करतो आणि बाजारातून नवीन साधा एक ड्रेस विकत घेतो आणि एका हॉटेल मध्येच नाष्टा करून आणि कपडे बदलून पोलिस स्टेशनला येतो. निशांत पोलिस स्टेशनला आल्या आल्या गावडे रहाटे आणि कदमना बोलावून घेतो. "आज आपली काल सारखी नाइट आहे अस समजा पण आजची रात्र आपल्याला डोळ्यात तेल घालून जागायची आहे.आपण सर्व आताच थोड्या वेळातच मनोज देशमुख च्या घरी निघणार आहोत साध्या युनिफॉर्म मध्ये,सर्वानी तयार रहा आदित्य गडकरीच्या मागे लावलेल्या कॉन्स्टेबलना सुद्धा सूचना द्या. मनोज आणि आदित्य ह्या दोघांचे नंबर सुद्धा ट्रेस करून ठेवा. तुम्हाला सर्वाना अर्धा तास देतो तुम्ही फ्रेश होऊन या तो पर्यन्त." निशांत. "येस सर" सर्व निघून जातात.निशांत निशाला कॉल करून उद्या पर्यन्त तरी घरी येणार नसल्याची कल्पना देतो. आणि कमिशनरना सुद्धा कल्पना देतो. थोड्याच निशांत ची टीम पोलिस स्टेशनला हजर होते. आणि निशांत आणि त्याची टीम खासदार श्रीनिवास देशमुखांच्या बंगल्याकडे रवाना होते. निशांत मनोज देशमुखला संभाव्य परिस्थितीची कल्पना देण्यासाठी एकटाच श्रीनिवास यांच्या बंगल्या मध्ये प्रवेश करतो. एकुलत्या एक मुलीचा साखरपुडा असल्या मुळे खासदार साहेब घरीच असतात. निशांतला बघून ते म्हणतात "या इंस्पेक्टर साहेब इकडे कस येण केल?" खासदार श्रीनिवास. "महत्वाच बोलायच होत तुमच्याशी आणि तुमच्या चिरंजीवांसोबत" निशांत. "हो या ना. या चला आपण त्याच्या रूम मध्येच बसून बोलू या. रामु चहा पाठवून दे छोटे साहेबांच्या रूम मध्ये" खासदार श्रीनिवास. निशांत आणि खासदार श्रीनिवास मनोज च्या रूम मध्ये जातात. निशांत त्यांना संभाव्य परिस्थितीची थोडक्यात कल्पना देतो. काही झाल तरी बाहेर पडू नकोस अशी सक्त ताकीद निशांत मनोजला देतो. "इंस्पेक्टर तुम्ही म्हणत असाल त्या गडकरी प्रकरणाचा धोका असेल तर वाटेल ते करा आरोपीला पकडत न बसता सरळ गोळ्या घाला बाकीच मी बघतो. तुम्ही काळजी करू नका पण हे प्रकरण परत बाहेर आल तर माझी खासदारकी धोक्यात येईल. आधीच आमच्या चिरंजीवानी कमी पराक्रम केले नाही आहेत?" देशमुख. "ते तर येणारा काळच ठरवेल येतो मी तुम्ही दक्षता घ्या." इतक बोलून निशांत निघतो.**********************************************************************************एका काळोख्या रूम मध्ये लाल बल्ब चालू होता. त्याखाली एक २२-२४ वर्षीय तरुणीचा फोटो होता. त्या समोर एक २५-२६ वर्षाची व्यक्ति मांडीवर बसून हात जोडून होती."आज तुझ्या आत्म्याला खरी शांती लाभेल ही माझी फक्त आशाच नाही तर माझ्या विश्वास आहे.तुझ्या निष्पाप देहाची ज्यानी अब्रू लुटली ते सर्व आज यमसदनी जातील. आणि हीच माझी तुला श्रद्धांजलि असेल.इथली न्याय व्यवस्था पैश्याने विकली जाते पण मी.. मी.. न्याय मिळवूनच देईन. तू सहन केलेल्या प्रत्येक त्रासाला आणि तू सहन केलेल्या वेदनेला.. तुझ्या निष्पाप आत्म्याला!!"अचानक त्या व्यक्तीचा आवाज येण बंद होत आणि रूम मधला लाल बल्ब सुद्धा बंद चालू व्हायला लागतो.कोण असेल ती व्यक्ति?करेल का ती न्याय????ठरेल का मनोज देशमुख तिची शेवटची शिकार????**********************************************************************************संध्याकाळी सात पासूनच देशमुखांच्या बंगल्यावर लगबग चालू होते. कडक पहारा देशमुख बंगल्या बाहेर तसेच आत मध्ये असतो.सीसीटीव्हि ने सुद्धा कडक लक्ष ठेवल जाणार असत.निशांत आणि त्याची टीम आजूबाजूला लक्ष ठेवून असते. पण म्हणावी तशी हालचाल होत नाही. सगळ सुरळीत चालू असत. मनोज देशमुख वर सुद्धा निशांतचे सहकारी पाळत ठेवून असतात.नऊ-साडे नऊ च्या सुमारास मनोज देशमुख वर लक्ष ठेवून असणारे कॉंस्टेबल निशांत ला घाईने रीपोर्ट करतात. "सर मनोज देशमुख रूम मध्ये गेला आहे अर्धा तास झाला तरी अजून बाहेर नाही आला आहे." पोलिस कॉंस्टेबल. "व्हॉट???मी येतोय तुम्ही दरवाजा तोडायला सुरुवात करा अजिबात वेळ लावू नका." निशांत जवळ जवळ धावतच सुटतो. त्याच्या मागून त्याची टीम सुद्धा धावते.सर्व मनोज देशमुख च्या रूम बाहेर उभ राहून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी एकदाच दरवाजा तुटतो. निशांत आत मध्ये लगेच घुसतो. आणि मनोज देशमुख ला शोधायचा प्रयत्न करतो पण उघडी खिडकी आणि त्यातून बाहेर पडणारी रस्सी ह्यावरून निशांत जो अंदाज लावायचा आहे असतो तो लावतो. "रहाटे मनोज चा नंबर ट्रेस करा फास्ट.." निशांत सुद्धा कॉल लावून बघतो. पण मोबाईल बंद आहे अस दाखवत असत. "सर लास्ट लोकेशन इथलच आहे." रहाटे. "रहाटे पोलिस डिपार्टमेंटला रीपोर्ट करा सगळी कडे नाका बंदी करा. काही करून मनोज त्या व्यक्तीला भेटला नाही पाहिजे.आदित्य गडकरी कुठे आहे लगेच चौकशी करा."निशांत. "सर तो त्याच्या घरीच आहे आपले कॉंस्टेबल त्याच्यावर पाळत ठेवूनच आहेत." गावडे. "ठिक आहे" निशांत.निशांत आणि त्याची टीम लगेच कामाला लागते. निशांत ही पुढची अॅक्शन घेण्यासाठी बाहेर पडणार तोच खासदार देशमुख निशांतला अडवतात. "इतका कडक बंदोबस्त असताना आमचे चिरंजीव गायब होतात म्हणजे काय? हे बघा त्याना काय झाल तर तुमची वर्दी गेली म्हणून समजा" देशमुख भडकत बोलतात. "खासदार साहेब तुमच्या वयाचा मन ठेवून गप्प बसलोय याचा अर्थ असा नाही तुम्ही वर्दी वर याल. आणि तुमचे चिरंजीव गायब नाही तर स्वत: फरार झाले आहेत. आणि कळेलच माझी वर्दी जाते की तुमची खुर्ची." निशांत देशमुखाना त्याच्या शैलीत उत्तर देतो आणि बंगल्या बाहेर पडतो.*******************************************आजच्या रात्रीचा काळोख न्याय करणार होता. त्यामुळे तो आज जरा जास्तच गडद झाला होता. मनोज देशमुख ह्या सारख्या नराधमाला तो गिळंकृत करणार होता.मनोज ला कार्यक्रम चालू असताना एका लहान मुलाने सेलफोन आणून दिलेला असतो. तो सेलफोन घेऊन मनोज आपल्या रूम मध्ये जातो."हॅलो कोण आहे का लागला आहेस मागे?"मनोज त्या सेलफोन वरुन जरा रागातच बोलतो. "सगळ्या प्रश्नाची उत्तर तुला थोड्याच वेळात भेटतील. तुझ्याकडे वेळ कमी आहे. मी सांगितलेल्या पत्त्यावर कोणालाही न कळता ये नाही तर "रागिणी गडकरी" च्या जागी तुझी बहीण असेल" फोनवरील व्यक्ति. "******** कोण आहेस तू काय करणार आहेस तू आता येतो सांग कुठे येऊ पण खबरदार बहीणीवर आलास तर." मनोज. "वा मग जिच्या आयुष्याची तू वाट लावलीस ती सुद्धा कोणाची तरी बहीण होती." फोनवरील व्यक्ति. "ऐ चल फालतू बक बक बंद कर लवकर बोल कुठे येवू तुला सुद्धा त्या रागिणी गडकरी कडे पाठवतो" मनोज दात ओठ खात बोलतो."आधी घरातून बाहेर तरी पड भित्रा " फोन वरील व्यक्ति हसत बोलते. त्यामुळे मनोज आणखीनच रागाला येतो. रागातच एक शिवी देत तो कॉल कट करतो. आणि बाहेर कस पडायच ह्याचा विचार करायला लागतो. शेवटी कपडे बदलून रूमच्या खिडकीतून तो रस्सी टाकून पळायच ठरवतो. त्याप्रमणे तशी तो अंमलबजावणी करतो. मनोजचा रूम बंगल्याच्या मागील बाजूस असल्या मुळे त्याला खाली उतरताना कोण बघत नाही. तो मागच्या गेट वर सेक्युरिटी नाही आहेत हे बघून बंगल्यातून पलायन करण्यास यशस्वी होतो. बंगल्यातून बाहेर पडताच त्याला सेलफोन वर एसएमएस येतो. तो पत्ता बघतो आणि रागात रिक्षाच्या शोधत निघतो. सुदैवाने त्याला एक रिक्षा भेटते. आणि तो पत्ता दिलेल्या अॅड्रेस वर निघतो.थोड्याच वेळात रिक्षा मनोजने सांगितलेल्या अॅड्रेस वर पोहचते. मनोज रिक्षातून खाली उतरतो आणि समोर बघतो तर महानगर पालिकेच्या पाण्याच्या टाकीचा उंच टॉवर असतो. रात्रीच्या काळोखात तो भयाण दिसत असतो."सहाब क्या आप पानी की जांच करेन ईतने रात को जा रहे हो?" तो रिक्षा वाला हसत म्हणतो. मनोज त्याला एक शिवी घालतो. रिक्षा वाला गप आपले पैसे घेऊन निघून जातो. मनोज त्या पाण्याच्या टाकीच्या भल्या मोठ्या टॉवर कडे दात खात बघतो आणि झप झप पावले तो टॉवर कडे जायला निघतो. वरती चढे पर्यन्त गळणाऱ्या पाण्याने मनोज पूर्ण भिजून जातो. शेवटी तो धापा टाकत एकदाचा वरती येतो. चौहू बाजूकडे तो चौफेर नजर फिरवतो. पण आजूबाजूला मट्ट काळोख असतो. पण त्या काळोख्यात टॉवरच्या कट्ट्यावर एक काळा कोट घातलेली व्यक्ति उभी असते. अंधारात ती जणू मृत्यू देवताच दिसत असते. "ये कोण आहेस तू काय हवय तुला बोल ना *****" मनोज रागात एक शिवी देतो. "मला ओळखल नाहीस?" समोरील व्यक्ति गंभीर हास्य करत बोलते. तिच्या हास्यामुळे वातावरण गंभीर होत. क्षणात ती व्यक्ति गरकर्न मान मागे फिरवते. "रागिणी तू.." मनोज भीतीने ओरडतोच. तीन वर्षापूर्वी त्यांनी जि अवस्था केली असते त्याच अवतारात रागिणी त्याच्या समोर उभी असते. मनोज लटपटू लागतो. "का घाबरलास मला बघून????"रागिणी गंभीर हास्य करत बोलते. "का तेव्हा तर माझ्या देहाची ही अवस्था करताना तुला मज्जा येत होती आणि आज घाबरतोस??"रागिणी तेच गंभीर हास्य करत बोलते. "क.. काय हवय तुला."मनोज चाचरत बोलतो. "न्याय हवाय मला आणि त्यासाठी तुला मराव लागेल." रागिणी गंभीर स्वरात बोलते."हे बघू मी माझी चूक कबूल करतो मी केला तुझ्यावर अत्याचार मीच आहे तुझा खूनी" मनोज भीतीच्या भरात सर्व घटना क्रम सांगून टाकतो. "आता तरी मारू नकोस मला"मनोज हात जोडत बोलतो. आणि रागिणी चा लक्ष नाही आहे हे बघून तो तिच्या अंगावर धावून येतो पण ती सावध असते. "तुझ्यासारख्या गिधाडाला माफी नाही तर मृत्यू हाच अंतिम पर्याय." रागिणी रागात बोलते तीच ते गंभीर रूप बघून मनोज ची बोंबडी वळते. "तो बघ तुझा काळ जवळ आलाय तुला न्यायला" गंभीर स्वरात रागिणी बोलते आणि हातातल लाईटर पापणी न लवताच क्षणात मनोज च्या अंगावर भिरकावून देते. मनोज आगीने भाजून ओरडू लागतो. मनोजचा जळता देह बघून रागिणी क्रूर हसते.आणि क्षणात मनोज च्या जळत्या देहावर लाथ मारते. मनोज चा जळता देह टॉवर वरुन एखाद्या आगीच्या गोळ्यासारखा खाली कोसळतो.आणि टॉवर वरुन रागिणी मनोज च्या कोसळणाऱ्या देहाकडे बघत हसत राहते..**********************************************************************************ब्रेकिंग न्यूज."रागिणी गडकरी हत्याकांडातील ५ आरोपींच्या हत्येच गूढ उकल.मनोज देशमुखच्या हत्ये आधी गुन्हा कबूल केलेली चित्रफित आमच्या सूत्राच्या हाती लागली आहे.जनते मधून आरोपींची हत्या करणाऱ्याच समर्थन केल जात आहे. खासदार श्रीनिवास देशमुखाना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला."निशांत टीव्ही बंद करतो. आणि शांत बेड वर झोपून राहतो. दोन दिवसा पासून कामाच प्रेशर असल्यामुळे त्यात मनोज देशमुखला सुद्धा वाचवता न आल्यामुळे त्याला मानसिक तणाव आलेला असतो.तसच आता केस सुद्धा सीबीआय कडे सोपवलेली असते पण पुराव्या अभावी ती सुद्धा लवकरच बंद होणार असते.निशांत शांत पणे बेड वर पडून विचार करत असतो. तितक्यात निशा आत येते. निशांत च्या डोक्यावरून हात फिरवत बोलते."आता कस वाटत आहे"निशा. "आहे ठीक" निशांत. 'हम्म घे कॉफी आणली आहे आणि सकाळीच तुझ कुररियर आल आहे ते सुद्धा बघून घे मी जेवणाच बघते." निशा. निशा बाहेर जाते निशांत कॉफी पित आलेल कुरियर ओपन करून बघतो.टायपिंग केलेल ते लेटर असतं.इंस्पेक्टर निशांत सरपोतदार. निशांत लेटर वाचायला सुरुवात करतो.मला माहिती आहे तुझ्या आयुष्यातली पहिलीच केस असेल जी तू हरली अशील पण ही केस तू हरूनही जिंकलास.मी कोण मी अस का केल आणि कस केल ह्याची तुला उत्सुकता असेलच तेच सांगणार आहे. तुला माहिती असेलच मी कश्या प्रकारे पाच नराधमाना यम सदनी धाडल पण का धाडल हे मी तुला सांगते."रागिणी गडकरी ही माझी जिवलग मैत्रीण. आम्ही मैत्रीण कमी आणि बहीण जास्त होतो.अगदी बालवाडी पासून ते बारावी पर्यन्त आम्ही एकाच बॅच वर बसून शिकलो. हसलो,रडलो,भांडलो. पुढे उच्च शिक्षणासाठी मला बाहेर गावी स्थाईक व्हाव लागल पण तरी सुद्धा रागिणी आणि माझी मैत्री अतूट राहिली. असा एक दिवस कधी गेला नाही आम्ही दोघी फोन वर बोललो नसू असा. रागिणी माझ्या एवढीच पण हळवी,नाजुक आणि कोणावरही लगेच विश्वास ठेवणारी म्हणून मला तिची नेहमी काळजी वाटत असे. असच सर्व सुरळीत चालु होत रागिणी कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला होती आणि अश्यातच मला तिने न्यूज दिली की कॉलेज मधल्या तिच्या मैत्रिणीच्या मित्राने तिला प्रपोज केल आहे.रागिणीच्या बोलण्या वरुन मला ती खुश वाटत होती म्हणून मी सुद्धा तिला काही बोलले नाही. तिची मैत्रीण म्हणजे शर्मिला रावराणे आणि मित्र म्हणजे सुजीत वाघमारे. असेच दिवस जात होते. रागिणी मला दरोज रात्री न चुकता कॉल करत होती दिवस भरच्या गप्पा टप्पा होत होत्या. सुजीत सोबत केलेली मज्जा सुद्धा ती माझ्या सोबत शेयर करत होती. एकंदरीत ती सुजीत सोबत खुश आहे अस वाटत होत.रागिणीची शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली होती आज तिचा लास्ट पेपर होता.तिने मला कॉल केला आणि उद्या ती सुजीत आणि शर्मिला सोबत अलिबागला फिरायला जाणार आहेत अस मला सांगितल. मी सुद्धा तिच्या आंनदात विरजण नको म्हणून गप्प बसले पण दक्षता आणि संभाळून राहायला सांगायला मी विसरले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मला तिने निघताना सुद्धा कॉल केला इतकच नव्हे त्या तिघांचा सेल्फी ही दिला. तो दिवस नेहमी प्रमाणे गेला संध्याकाळी मीच स्वत:हून कॉल लावला. पण तिने उचला नाही मला वाटल नवीन ठिकाणी गेली आहे मिळू दे तिला एकांत म्हणून मी सुद्धा लक्ष नाही दिला.आयुष्यात पहिल्यांदा च मला रागिणीने कॉल केला नव्हता त्यामुळे थोड अस्वस्थ वाटल. दुसऱ्या दिवशी सुद्धा मी कॉल करत राहिले पण आता कॉल बंद येत होता. त्यामुळे मी जरा घाबरेलेच लगेच रागिणीच्या घरी कॉल करून चौकशी केली. तर रागिणी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या भावाने दिली. माझ जणू अवासनच गळल. पण कस बस मी स्वत:ला सावरून त्याच रात्री फ्लाइट मध्ये बसून भारतात आले. आणि जेव्हा रागिणीच्या घरी गेले तेव्हा तीच पांढऱ्या कपडत्यात गुंडाळेल शव माझ्या नजरेत पडल. मी जाग्यावरच खाली बसले. तिथल्या एक दोन जणानी मला उठवून बसल पण आता मला स्वत:ला सावरण अवघड होवून बसल होत. मी रागिणीच्या शवाला मिठी मारून मानसोक्त रडून घेतल.त्यावेळी तिथे शर्मिला रावराणे,सुजीत वाघमारे सुद्धा होते पण त्यांना जाब विचारण्या इतपत मी शुद्धित नव्हते.रागिणि वर अत्याचार होऊन हत्या झाली अशी कुजबूज कानावर पडत होती.पण नाही माझ मन तयार नव्हत. निष्पाप रागिणी सोबत अस घडू शकत अस स्वप्नातही मला वाटल नव्हत.रागिणीला अंतिम संस्कारा साठी नेण्यात आल.मी संध्याकाळ पर्यन्त रागिणीच्या घरच्या अंगणात बसून होते.अचानक मला काय झाल ते माहिती नाही मी रागात उठले आणि सरळ पोलिस स्टेशन गाठल. आणि त्या दिवशी रागिणीने मला पाठवलेला सेल्फी मी पोलिसाना दाखवला. त्या आधारे शर्मिला आणि सुजीत ची कसून चौकशी केली गेली पण त्या दोघे रागिणी अर्ध्या वाटेतुन पुन्हा घरी निघाली होती अस ते बोलत होते. पण माझ मन हे मानायला तयार नव्हत मी तशीच घरी निघून आले. ती रात्र माझी रडण्यातच गेली. दुसऱ्या दिवशी मी उठून रागिणिच पोलिसानी दिलेल सामान बघत होते. आणि देवाने कृपा करावी तस मला तिच्या बॅग मध्ये मी तिला एकदा वाढदिवसाला दिलेला रेकॉर्ड पेन सापडला. देवाचा धावा करत होते काही तरी भेटू दे. मी तो लगेच रेकॉर्ड पेन लॅपटॉपला जोडला आणि ऐकू लागले. त्या दिवसभरात झालेला पूर्ण संवाद त्यात रेकॉर्ड झाला होता."झाली का ती बेशुद्ध?" शर्मिला. "हो झाली. बाकीची फलटण कधी येणार आहे?" सुजीत. "येतच असतील.पण काहीही म्हणा हा मासा खूप मेहनतीने जाळ्यात लागला." शर्मिला. "हो ना तुझ्या कृपे मुळे" दोघंही दात खिदळत असत्तात. तितक्यात दुसऱ्या व्यक्तींचे सुद्धा आवाज येतात. "काय रे कुठेय माल" मनोज. "नाही तर काय किती दिवस वाट बघायला लावलीत साल्यानो." निनाद. "जा रे आत आहे उगाच घसा फाडू नकोस. आम्ही सुद्धा आत आहोत दुसऱ्या रूम मध्ये उगाच बोंब मारत बसू नका." सुजीत. थोड्या वेळ अस त्यांच बोलण चालू होत. आणि अचानक "सुजीत मला वाचव रे" अशी आर्त हाक रागिणीची ऐकू आली पुढे रात्र भर त्या नराधमानी तिचे लचके तोडले ह्या सर्व मध्ये फार्महाऊस चा केयर टेकर सुद्धा सहभागी होता. रेकॉर्डर ऐकून माझ डोक सुन्न झाल. दुसऱ्या दिवशी मी वकिलांची मदत घ्यायची ठरवल. आणि मी स्वत:त्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला. पण अगदी निकालाच्या दिवशी इथली न्याय व्यवस्था विकली गेली. माझ्या कडे असलेला एकमेव पुरावा मी केस साठी वकिलाना दिला पण तोच वकील निकालाच्या दिवशी फरार झाला. माझ तर अवासन गळून पडल. न्याय व्यवस्थे वरुन विश्वास उडला. कोर्टाने त्या सर्वाना निर्दोष सोडल. मी खचले आणि एक क्षणही न वाट बघता सरळ बाहेरगावी माझ्या घरी निघून आले.तेव्हाच मी ठरवल होत. रागिणीच्या मृत्यूचा बदला आता घेतला तर मृत्यू नेच घ्यायचा.ह्यावर मी सलग दोन वर्ष काम केल. परफेक्ट मर्डर प्लॅन केला. मी एक आर्टिस्ट आहे त्यामुळे मी राणिणीची ची अवस्था त्या नराधमानी केली होती तस हुबेहूब मास्क तयार केल. त्यांना मारताना मला त्यांची चूक आठवून द्यायची होती. आधी माझ्या समोर होता तो म्हणजे सुजीत वाघमारे.त्याला संपवण माझ्या साठी कठीण नव्हत.मी पूर्ण सेफ केलेल्या नंबर वरुन सुजीतला त्या दिवशी रात्री कॉल केला. रागिणी केस संबंधी माझ्या कडे पुरावे आहेत अशी धमकी दिली. मला जास्त काही नको फक्त ठराविक रक्कम मला आजच भेटून दे अशी त्याला मागणी केली.त्याने ती कबूल केली. रात्री ठरलेल्या ठिकाणी मी त्याला बोलावल आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा दिली. आता तुला वाटेल सुजीतला हॉटेल मध्ये भेटायला आलेली व्यक्ती कोण?तर ती दुसरी कोण नसून निनाद मुंडे होय. मी पैश्याची मागणी केली तेव्हा सुजीत ने मनोज देशमुखला कॉल करून कल्पना दिली. आणि मनोज ने निनाद आणि शर्मिला करवी ती रक्कम सुजीतला पोहच केली.आता तुला वाटेल ती रक्कम सुजीत जवळ का नाही सापडली तर ते सुद्धा सांगते. संशय येऊ नये म्हणून ती रक्कम मी काढून घेतली. पण ती पापी लोकांची रक्कम मी स्वत:न वापरता अनाथ आश्रमात दान केली.मी येतानाच माझ्या व्यवसायाने प्राण्यांचे डॉक्टर असलेल्या माझ्या वडिलांच्या लॅब मधून प्राण्याच एक विशिष्ट पॉयझन आणल होत. त्याच्या वापर करून मी शिकार क्रमांक एक सुजीत वाघमारे ला यमसदनी पाठवल. नंतर क्रमाक होता शर्मिला रावराणेचा तिला सुद्धा मी सहज गाठल.मी अनोळखी नंबर वरुन तिला एका रूम वर ड्रग डील च्या बहाण्याने मी तिला बोलावून घेतल आणि तिथेच तिचा काटा काढला. मी तिला सुद्धा इंजेक्शन देऊन मारणार होते पण तीने केलेल्या प्रतिकारा मुळे ते शक्य झाल नाही. शेवटी फ्लॉवर पॉट डोक्यात मारून तिला मला संपवाव लागल. तिसरा क्रमांक होता निनाद चा पण तुझा संशय वाढला होता आणि त्या वरून तुझ लक्ष उडवण्यासाठी मी वसिम चा खून घडवून आणला कारण तो सुद्धा त्या वाईट कामात सहभागी होता. नंतर मी निनाद कडे वळले. माझ त्याच्या प्रत्येक हालचाली कडे लक्ष होत. तो स्वत:हून माझ्या जाळ्यात आला.मला खात्री होतीक निनाद पोलिसाना गुंगारा देण्याचा प्रयत्न करेल,त्यामुळे मी त्याच्यावर लक्ष ठेवून होते.त्याच्या गाडीचे ब्रेक फेल करून इंजिन मध्ये सुद्धा बिघाड करून आणला. आणि जेव्हा तो सुसाट एक्सप्रेसवे ला लागला तेव्हा च त्याला मी त्याच्या गाडीत असलेल्या सिस्टिमने व्हिडिओ कॉल केला. रागिणी समजून तो घाबरून गेला. मग त्याने तुला कॉल करून सांगितल पण तो पर्यंत त्याच नियंत्रण सुटुन मला हव तेच घडल. जास्त लोड घेवू नकोस मी केलेले सर्व कॉल पूर्ण दक्षता वापरुन केले होते. म्हणूनच तुमच्या सायबर क्राइमला सुद्धा कळाल नाही. आणि शेवटची शिकार तर तुला माहिती आहेच. आता मी त्याला पूर्ण जाळल कस ते सांगते. जेव्हा मनोज रागात पाण्याच्या टॉवर वर येत होता तेव्हा तो पाण्याने न भिजता मी लावलेल्या डीझेल ने तो भिजला. पण त्याला रागाच्या भरात ते कळाल नाही आणि शेवटी मीच त्या नराधमला आग लावली.आता तुला अस वाटेल मी सर्वांवर पॉयझन का नाही वापरल तर त्याच कारण सोप आहे तुझ केस वरच लक्ष भरकटू दे म्हणून. जर मी एकच पद्धत ठेवली असती तर तुझ काम सोप झाल असत आणि मला कमी वेळ मिळाला असता.ज्याना मरायच होत ते मेले. इथल्या न्याय व्यवस्थेने जो न्याय केला नाही तो मी केला. अत्याचार झालेल्या पीडितेच शव साक्षीला असताना,तिच्या घरच्यांचा आक्रोश साक्षीला असताना अजून साक्षीदर लागत असेल थू आहे न्याय व्यवस्थेवर. आता तुझ्या कडून ही केस गेलीच आहे. सीबीआयला सुद्धा काही भेटेल असा पुरावा सोडला नाही आहे मी. लेटर सुद्धा टाइप केलेल आहे सो हा पुरावा होणार नाही ह्याची तुला कल्पना आहेच. मी वापरलेल सर्व कॉल निनावी होते त्यामुळे त्यातून सुद्धा काही भेटणार नाही. मी हे लेटर तुझ्या हातात पडण्या आधीच भारत सोडलेला असेन. आणि तुला माझी चौकशी करायची असेल तरी तुला बाहेरगावी राहण्याऱ्या लोकांच्या चौकशी करण्या बद्दलचे नियम माहिती असतीलच. त्यामुळे निरर्थक तू तुझा वेळ वाया घालवणार नाहीस अशी खात्री आहे. मी केलेल हे कायद्याच्या दृष्टीने चूक असेल पण ते रागिणीला न्याय देण्याच्या दृष्टीने योग्यच होत. जाता जाता तुला माझी ओळख करून देते. "मी तुझ्या बायकोची काही क्षणाची मैत्रिणी यामिनी डिसूझा". धक्का बसला? हो चक्क माझ्या समोर येऊन तू मला ओळखू शकला नाहीस. आणि बर तुझी बायको माझी मैत्रीण वैगरे कोणी नव्हती बर का मीच तशी तिला भुरळ घातली होती की तिला मी तिची मैत्रीण वाटेल. सो चिल्ल.. केस वरुन आता तुला सुट्टी आहेच बायको ला वेळ दे. केस सुटली आहेच तुझ्या नजरेत फक्त मी पुरावा सोडला नाही आहे. आता थांबते."गुन्हेगाराला कडक शिक्षा तुमचे कायदे करतील तेव्हाच लोक कायदे हातात घेण बंद करतील"..
-यामिनी डिसूझा.

निशांत लेटर बंद करतो. आणि शांत डोक ठेवून विचार करतो. यामीनिने जे केल ते योग्यच होत. ही केस मी हरूनही जिंकलो. असा विचार करत निशांत समाधानाने झोपी जातो.