आज पहाट जरा मस्तच भासत होती, त्यालाही जराशी धुंदी चढली होती, बाहेर पाउस रिमझिम पडत होता, वाराही कुंद जाहला होता...... ❤
तो आज खूप खुश होता, अगदी मनातून भारला होता.... ❤ कारणही तसच होतं, आज तिच्या अन त्याच्या लग्नाला एक वर्ष झालं होत... ❤ ती तर त्याहुनही खुश होती, अगदी मनाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होती, लग्नाला एक वर्ष तर झालंच होत, पणती त्याला आज "गुड न्यूज" देणार होती..... ❤
सकाळी नाश्ता चालला होता,तिने आज,मोगरा माळला होता आणि सुवासमंद दरवळत होता..... ❤तिने आज त्याचे आवडते बटाटेपोहेकेले होते,तोही प्रत्येक घासाबरोबरतिला डोळे मिटकावून दाद देत होता..... ❤त्याच्या आईलाही हे कळत होत,ती पण मुद्दाममधेच खाकरून त्यांचा नजरभंगकरत होती..... ❤
आणि तो अगदीच प्रेमाने तिच्या हातावर मधेचएखादी थाप मारत होता... ❤
संध्याकाळी आईकडून त्याने खास "परमिशन" घेतली होती,आई नेही अगदी हसून ती दिली होती.... ❤ "इविनिंग शो" ची दोन तिकिटे काढली होती, मग घरी तिघांचा डिनर असा मस्तबेत ठरला होता, दोघे भलतेच खुश होते, आई देखील त्यात सामीलझाली होती.... ❤दृष्ट लागू नये असा त्यांचा संसार होता, पणसंसाराच कायत्याला कधी कधी प्रेमाचीचदृष्ट लागते..... ❤
त्याने पैसे वाचवून हफ्त्याने तिच्यासाठी स्कुटी बुक केली होती, तिला ऑफिसला जायला गर्दीत त्रास होतो ना..... ❤तीही काही कमी नव्हती पाच महिने पैसे वाचवून एक हिऱ्याची अंगठी घेतली होती, जणू संध्याकाळी ती घेऊनएका हिरयावर दुसर्या हिरयाचा कळस चढवणार होती..... ❤ऑफिस मधून संध्याकाळी एकमेकांना फोन केले,तिनेत्याला त्यांच्या सोनाराच्या दुकानासमोरभेटायला बोलावले.... ❤
त्याला कळून चुकलं होतं काहीतरी महागडी भेटवस्तूमिळणार, तो हि नवीन कोरी करकरीतस्कुटी घेऊनतिला भेटायला निघाला होता.... ❤तो तिथे पोचला त्याने स्कुटी लपवून पार्ककेली, म्हटलं "सरप्राईज" देईन,,ती त्याच्या आधीच तिथे पोचली होती,आणि हिऱ्याची सुरेख अंगठी आपल्याच मुठीतलपवली होती..... ❤
तो क्षण आला दोघांची नजरानजर झाली, त्यानेतिला दुरूनच हात केला,,तिनेही त्याला हात हलवून प्रतिसाद दिला, दोघे एक-एक पाऊल पुढे सरकू लागले.... ❤ती तर दोन-दोन पावले उडी मारून चालत होती,तो आपल्या नेहमीच्या हास्यात तिच्यावरची नजर ढळू देत नव्हता.... ❤दोघांच्याही मनात एक पूर्णवर्ष तरळत होतं,आयुष्य भराची साथ हेच फक्त दिसत होतं..... ❤ती पुढे आली दोघांमध्ये फक्त वीस-एक पावलेच राहिली, ती वीस पावले पण आज कोसभर वाटत होती.
पण अचानक तो मटकन खाली बसला, काय होतंय हेच त्याला कळत नव्हतं... ❤ त्याचा कानाचे पडदे फाटले होते... नाही नाही धरणी कंपच झाला होता, कि आभाळ फाटलं वीज पडली त्याला काही काही उमजत नव्हतं, नाही नाही हा तर बॉम्ब-स्फोट होता..... ❤
क्षणभरात तो भानावर आला, सगळी कडे फक्त धूर कल्लोळ आगीचे लोटआणि अस्ताव्यस्त भंग झालेली माणसे, त्याला त्याची "ती" कुठेच दिसत नव्हती, त्याची भिरभिरलेली नजर फक्त तिलाच शोधत होती... आणि त्याला ती दिसली ती तीच होती का..? साडी फाटलेली, अंग रक्ताने माखलेलं,तिचं पूर्ण सौंदर्य रक्ताने लपलेलं होतं, अंग-अंग छिन्न-विच्छिन्न झालं होतं..... ❤
तो धावला जीवाच्या आकांताने धावला, त्याने तिचं डोकं मांडीवर घेतलं,,तिला जोरजोरात हाक मारली, अजून थोडी आशा दिसत होती तिने डोळे उघडले..... ❤त्याचे अश्रू तिच्या गालावर पडत होते, तेच अश्रू तिचा अबोल चेहरा दाखवत रक्त दूर सारत होते... ❤तो काही बोलणार इतक्यात तिने मुठ उघडली,आणि ती हिऱ्याची अंगठी जणूकाही खुलून हसली... ❤
तिने मुठ उघडली, त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं, तिच्या मुठीत ती चमकदारbअंगठी लकाकत होती, जणू घे मला बाहुपाशात खुणावत होती..... ❤ तो रडत होता थांब थांब म्हणत होता, पण तिच्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते... ❤
तिच्या चेहऱ्यावर होतं ते फक्त हलकसं स्मित हास्य, कदाचित मरणापर्यंत साथका हीच..? तिने ती अंगठी हळूच त्याच्या हातावर ठेवली,त्याने तीचा हात घट्ट धरला होता, हळूच तिची मुठ बंद झाली फक्त "टेककेअर" म्हणून तिचे नाजूक ओठ बंद झाले,पण तिच्या चेहऱ्यावरच ते जीवघेण "स्माईल" आजही तसच होतं,, तसच होतं......?
हि कथा लिहताना अक्षरशः माझ्या डोळयातून पाणी येत होते...😢😢😢