फिर मोहोब्बत करने चला है तू तुषार विष्णू खांबल द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फिर मोहोब्बत करने चला है तू

फिर मोहोब्बत करने चला है तू
शब्दांकन : तुषार खांबल

दोन वर्ष...... तब्बल दोन वर्षानंतर आज परीचा मेसेज आला होता..... "मला कॉल करशील का???"

त्याच्या जीवाची घालमेल सुरु झाली..... काय काम असेल???? अचानक माझी आठवण कशी आली??? पुन्हा काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना???? अश्या अनेक विचारांनी त्याच्या डोक्यात गर्दी करायला सुरुवात केली.... हो-ना हो-ना करता करता त्याने तिला कॉल केला....

हॅलो.... कसा आहेस

मी मस्त.... तू बोल

मी पण मजेत...... अरे माझा मोबाईल खराब झाला होता.... रिपेअर केला तर सर्व नंबर उडाले.... तुझा नंबर हवा होता म्हणून मेसेज केला......

अच्छा(तिच्या मनात आजही आपल्याबद्दल आपुलकी आहे हे ऐकून त्याला भरून आलं आणि तो बोलता बोलता सहज भूतकाळात हरवून गेला)

२०१० साली तो मुंबईहून विरारला राहायला आला होता….. मुंबईमधील सांस्कृतिक कामाची ओढ त्याला इथे स्वस्थ बसू देत नव्हती….. पारंपरिक सणांमधील त्याचा सहभाग त्याला लवकरात लवकर तिकडे सर्वपरिचित करीत होता.... त्याचं तिथे असणं परीच्या नजरेतून देखील सुटलं नव्हतं.... सतत ती खिडकीत राहून त्याला न्ह्याहाळतं असायची.... अशातच तीन वर्षे कशी निघून गेली काही कळलेच नाही.... एक दिवस परीच्या फेसबुकवर त्याची फ्रेंडरिक्वेस्ट आली..... तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता..... क्षणाचा देखील विलंब न करता तिने ती स्वीकार केली.... आणि सुरु झाली एक प्रेमकहाणी.....

दिवस रात्र रोज चॅटिंग सुरु झाले.... तो कामावर जायला निघाला की हि खिडकीवर यायची.... कामावरून परत येताना पुन्हा त्याला पाहत राहायची.... हळूहळू दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली..... दोघांचा आनंद गगनात मावत नव्हता..... एकमेकांसोबतच्या सुखी संसाराची स्वप्ने दोघांनी रंगवायला एव्हाना सुरुवात केली होती..... अचानक एक दिवस त्याने तिला फिरायला जाण्याबद्दल विचारले.... त्याच्या भेटीबद्दच्या ओढीने तिने देखील लगेच होकार दिला.... आणि उद्याचा पहिल्या भेटीची स्वप्ने रंगवत दोघे झोपी गेले.....

दुसरा दिवस उजाडला..... सर्वांच्या नजरा चुकवत ती निघाली..... तो स्टेशनवर तिची वाट पाहतच होता.... त्याने कुठे उतरायचे हे तिला आधीच सांगून ठेवले होते..... दोघे वेगवेगळ्या डब्यात चढले..... ठरलेल्या स्टेशनवर दोघे पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलं होते...... त्याचं सोबत असणं हे तिला स्वर्गसुख प्राप्त करून देत होत.... चालताना होणार हाताचा हळुवार स्पर्श हृदयातील धडधड वाढवत होता.... मन आनंदाच्या हिंदोळयावर झुलत होत..... मरीन ड्राईव्ह, सी-फेस, हँगिंग गार्डन अश्या अनेक ठिकाणी फिरत त्यांनी संपूर्ण दिवस आनंदात घालवला.... आणि असे अनेक प्रेमळ दिवस घालवण्याची वचनें देखील दिली....

दिवस उलटत होते, प्रेमाला बहर चढत होता...... एव्हाना आजूबाजूला त्यांच्या प्रेमाची कुणकुण लागली होती..... सर्व काही सुरळीत सुरु होते..... लग्नाची बोलणी करायची ठरवली..... त्यांच्या मित्रांनी तिच्या भावाला लग्नाबद्दल विचारले तर त्याने टुकार करणे देऊन त्यांच्या लग्नास नकार दिला...... तिने तिच्या वडिलांशी बोलायचे ठरविले.... मे महिन्यात त्यांचा साठावा वाढदिवस येणार होता.... तेव्हा ती त्यांच्याशी लग्नाविषयी बोलणार होती.....

अवघे २-३ बाकी असताना अचानक तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी कानावर आली.... ती पूर्णपणे कोलमडून गेली..... हक्काचा आधार गमावल्याने तिला काही सुचत नव्हतं..... काय करावं कोणाशी बोलावं.... सर्व काही कळण्यापलीकडे होते.... आपल्याला कोणी वाली उरला नाही याची तिला खंत वाटत होती.... आणि अगदी तसेच झाले......

वडिलांच्या निधनानंतर तिच्या भावाची आणि वाहिनीची वागणूक बदलू लागली.... ते दोघे तिला नजरेसमोर बघून घेत नसत..... तिने पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला.... परंतु तिच्या वडिलांची शिकवण तिला तसे करू देत नव्हती..... शेवटी तिच्या मनाविरुद्ध तिचे लग्न लावून देण्यात आले..... आणि तिच्या प्रेमाचा गळा आवळण्यात आला....

त्याचीही परिस्थिती काही चांगली नव्हती.... तिचे लग्न झाल्यानंतर त्यानेदेखील लग्न केले.... परंतु त्याचा संसार काही जास्तकाळ टिकला नाही.... आपापसातील गैरसमजामुळे त्याच्या पत्नीने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि एक दिवस ती घर सोडून निघून गेली....

इकडे परी तिच्यावर झालेल्या अन्यायामुळे ती काहीशी कोमेजून गेली होती.... रोज हसत-खेळत असणारी परी आता काहीशी अबोल राहू लागली..... नवऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा केली..... पण ती देखील फोल ठरली.... या आयुष्यात आपण एकटेच कमनशिबी आहोत असे तिला वाटू लागले.... परंतु आपल्या नशिबाचे भोग म्हणून तिने आलेल्या परिस्थितीला सामोरे जायचे ठरविले.... काही काळानंतर देवाने तिला एक गोंडस पुत्राची आई होण्याचं भाग्य दिले.... आता त्याला पाहून ती जगत होती.... पण जोडीदाराच्या प्रेमाची अजूनही तिला आस होती.....

वर्षे सरत होती.... एकत्र कुटुंबात असून देखील प्रेमाच्या शोधात ती एकटी पडली होती.... हसऱ्या चेहऱ्याची परी आतून तुटत होती.... मनोरंजनाचे एकमेव साधन असलेला तिचा फोन अचानक खराब झाला आणि पुन्हा काही दिवस उदासीनतेत गेले.... फोन पुन्हा आल्यावर सर्व मित्र मंडळींचे नंबर जमा करण्यात ती लागली होती.... अश्यातच तिला फेसबुकवर त्याच नाव दिसलं.... आणि मन पुन्हा प्रेमाची वाट शोधू लागलं.....

इकडे तिच्या सोबत बोलताना तो देखील भावुक झाला होता.... कोरड्या पडलेल्या त्याच्या हृदयात पुन्हा प्रेमाचे झरे वाहू लागले होते..... आणि कुठेतरी शांत आवाजात गाणे ऐकू येत होते

जब जब तेरे पास मैं आया, इक सुकून मिला
जिसे मैं था भूलता आया वो वजूद मिला
जब आए मौसम ग़म के तुझे याद किया
हो जब सहमे तन्हांपन से तुझे याद किया

हम्म दिल संभल जा ज़रा
फिर मोहब्बत करने चला है तू
दिल यहीं रुक जा ज़रा
फिर मोहब्बत करने चला है तू