इच्छा Akshata alias shubhadaTirodkar द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इच्छा

आदित्य देवधर एक व्यवसायिक त्याच्या नव्या ऑफिसाचे आज उद्घाटन होते देवधर कुटुंबीय सगेसोयरे मित्रमंडळी आणि कर्मचारी उपस्थित होते देवधर दाम्पत्यानं एकुलती एक कन्या होती इच्छा असे तिचे नाव आज ती पाच वर्षाची झाली ह्या कारणाने आजचा शुभमूहुर्त ठरला होता तिच्या हातानेच शुभ कार्याला ला सुरवात करणार होते. इच्छाने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता आपल्या इवल्याश्या हाताने तिने फीत कापली आणि सगळ्यानी आत प्रवेश केला

तेव्हड्यात आदित्य याचे व्यसकर काका म्हणाले "अरे आदित्य पूजा करणार ना तू मग सोवळं परिधान करून ये भटजी पोहोचतील आता"

"नाही काका मी नाही करणार पूजा इच्छा करणार आहे "

काका आश्यर्य चकित होऊन म्हणाले "काय एव्हडी लहान मुलगी आणि ती सुद्धा मुलगी करणार अरे तू असताना"

"त्यात काय आहे काका आज तिचा वाढदिवस पण आहे आणि आम्ही दोघेहि असणार ना तिच्याबरोबर पण पूजा मात्र तीच करणार "

काका चिडून म्हणाले "अरे वेड्या मुली कधी पूजा करतात का ?"

"का नाही काका "

"अरे पण तू भटजींना सांगितलं ना "

"हो आणि त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे"

"अरे आपल्याकडे मुली पूजा वैगेरे करत नाही ना आपल्या घराण्यात कोणी केलं "

आदित्य ला काका असेच काहीतरी म्हणतील याची पूर्व कल्पना होती त्यामुळे तो उत्तर देण्यास तयार होता "ही पूजा इच्छाच करणार ती माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि तिच्या जन्मानंतरच मी एवढा यशस्वी झालो आहे माझ्यासाठी ती लकी आहे"

आपले काही नाही चालणार हे पाहून काकांनी आदित्य पुढे नमते घेत म्हणाले "बघ बाबा आम्ही मोठी माणस म्हूणन सांगतो "

"काका माझी इच्छा माझ्यासाठी सर्व आहे त्यामुळे सॉरी "

काका चा निराशलेला चेहेरा पाहून काका ना समजावत म्हणाला "काका मुलींना मुलापेक्षा कमी समजणं मला जमत नाही पुढे हा बिजीनेस ती सांभाळनार ना आम्ही देवी ना पुजतो मग मुलींना का नाही ज्या देवी साठी नवरात्र जागवली जाते ह्याच लहान बालिकेचे पूजन केले जाते आणि तिच्याच मुलीवर अत्याचार होतो तेव्हा आपण फक्त गप्प बसतो काय ना काका मी असं नाही म्हणत कि पूर्ण स्वतत्र द्या संस्कार आणि शिस्त हि तेव्हडीच असली पाहिजे आणि तुम्ही म्हणता ना इच्छा लहान आहे पूजा करण्यासाठी तुम्हाला माहित आहे का आमची इच्छा गायत्री मंत्र पूर्ण म्हणते "

तेव्हड्यात आदित्य ची नजर बाहेर गेली भटजी आपली पिशवी सांभाळात येताना त्याना दिसले "ते बघा भटजी आले बाळा इच्छा ये लवकर"

इच्छा पळत पळत आली आणि भटजी च्या पाया पडत म्हणाली " नमस्कार भटजी काका "

"आयुष्मान भव "

इच्छा चा एवढ्या लहान वयात स्वभाव आणि संस्कार पाहून भटजी सुखावले ते सगळयांना पाहत म्हणाले 'वाह काय गुणी मुलगी आहे नाही तर कोण पाय वैगेरे पडत "

आपल्या मुलीचे झालेले कौतुक पाहून आदित्य खुश झाला त्याने काका कडे एक नजर फिरवत म्हटले "आहेच माझी मुलगी हुशारआणि संस्कारी पण

भटजी ने प्रेमाने इच्छा कडे पहिले व म्हटले "ये बाळ बस पाटावर "

इच्छा मध्ये पाटावर बसली होती बाजूला देवधर दाम्पत्य बसले आदित्य ने परत एकदा काका कडे नजर फिरवली तर ते त्याच रागात होते काकांना मुलीने पूजा करणे हे कारणच पटत नव्हते पण आदित्य काही ऐकायला तयार नव्हता त्यामुळे नाईलाजाने ते पूजेत सहभागी होते पण राग- मात्र स्पाष्ट चेहऱ्यावर दिसत होता पण आदित्यने त्याच्याकडे लक्ष न देता भटजींना पूजा सुरु करण्यास सांगितले

आणि भटजींनी गणरायाचे नाव घेत पूजेला सुरवात केली...