Janu - 29 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 29

अभय ला जयपूर ला येऊन दीड वर्ष होऊन गेल होत..अधून मधून तो आपल्या घरी जावून येत असे..ऑफिस मध्ये अभय आता सर्वांचाच बेस्ट फ्रेन्ड झालेला..फक्त मुलं च नाही तर ..मुली सुद्धा त्याच्या मैत्रिणी होत्या..त्याच्या ऑफिस मध्ये त्याच्या सोबत काम करणारी सानिका..सानिका दिसायला ही छान होती.. अभय ची चांगली मैत्रीण होती पणं ..सानिका ला मात्र अभय आवड त होता..हे अभय चा मित्र प्रीतम जाणून होता.. सानिका त्याची ही मैत्रीण होती..आणि सनिकानेच प्रीतम ला अभय आवडत असल्याचं सांगितलं ही होत..प्रीतम नी ठरवलं होतं अभय आणि सानिका ला मिळवायचं.
आज अभय च्या ऑफिस मध्ये कार्यक्रम होता..आज आपण सानिका बद्दल अभय च्या मनात काय आहे हे विचारू अस प्रीतम ने ठरवल होत..सर्व जण एकत्र जमले होते ..music system वर गाणी सुरू होती..सर्व जण एंजॉय करत होते .. अभय आपल्या मित्रां न सोबत गप्पात रंगला होता..सानिका ही आज छान तयार होऊन आली होती..प्रीतम ने अभय ला इतर मित्रान पासून थोड लांब नेल..तो अभय सोबत बोलणारच होता ..की तो पर्यंत ..एक गाणं सुरू झालं आणि अभय नी त्याला थांब नंतर बोल म्हणून सांगितलं..

मैं इश्क उसका वो आशिकी है मेरी
वो लडकि नहि जिंदगी हैं मेरी..

उसके ही दिलं मे अब तो रेहना हैं हर दम
उस दिलरुबा से केहना हैं हर गम...

मैं इश्क उसका वो आशिकी है मेरी
वो लडकि नहि जिंदगी हैं मेरी..

खुशबू जैसी आये जाये .. कितना दिलं को वो तडपाये
मेरी सासे ,मेरी धडक न , वो है मेरा दिवणापन
बेताबी यो मे है वो राहत का मौसम ..
उसके लिये ही मेरी चाहत का मौसम..
मैं होश उसका वो बेखुदी हैं मेरी..
वो लडकी नाही जिंदगी हैं मेरी..

अभय तर गाणं ऐकून केव्हाच जानू च्या विचारात दंग होऊन गेला होता..आणि प्रतिम त्याला हलवून हलवून जागं करून थकला होता..प्रीतम ला तर अभय ची हालत पाहून हसू आवरेना झालं होत..हा या गाण्यात इतका काय बेधुंद झाला आहे ?
शेवटी एकदाचं गाणं संपलं..प्रीतम नी अभय ला भाना वर आणल..

प्रीतम : अरे ..इतकं काय त्या गाण्यात होत रे ? जे जागे पणीच स्वप्नात हरुवून गेला होतास ?
अभय त्याचं बोलणं ऐकून हसतो आणि लाजतो ही..

अभय: अरे काही नाही..असच आवडत मला ते गाणं..

प्रीतम: गाणं आवडत की ...दुसरच कोणी?

अभय हसतो आणि आपल्या सुंदर केसान वरून हलकासा हात फिरवतो..

प्रीतम : बर ..तुला सानिका कशी वाटते ?

अभय : छान आहे ..का रे ?

प्रीतम : आहे ना छान ? अरे वा मग जमल तर..

अभय: काय जमलं?

प्रीतम: अभय सानिका लाईक्स यू..आणि तुला ही ती आवडते तर जमलच ना ?

अभय: एक मिनिट ..प्रीतम तू उगाच गैरसमज नको करून घेऊ..सानिका छान आहे पणं फक्त मैत्रीण म्हणून ..माझ्या मनात तिच्या विषयी दुसरं काही नाही.. इन फॅक्ट तिच्याच काय दुसऱ्या कोणत्याच मुली विषयी प्यार वाली भावना नाही..जानू सोडली तर माझ्या आयुष्यात दुसरं कोणत्याच मुलीला स्थान नाही..

प्रीतम : ही जानू कोण ?

अभय मग त्याला जानू विषयी सर्व सांगतो...प्रीतम ऐकुन थोडा विचार करून बोलतो.

प्रीतम : अभय तू ग्रेट आहेस यार पणं जस तू सांगितलं तास तर जानू चा काहीच पत्ता नाही..आणि .. समज ती कधी भेटलीच नाही तर ?

अभय: ये गप रे प्रीतम काही पणं नको बोलू..जानू मला नक्की भेटेल.. माझा विश्वास आहे.

प्रीतम : समजा भेटली तरी जर तिच्या आयुष्यात दुसरं कोणी असेल तर ? सोड ना जानू चा विषय .. यार सानिका चांगली आहे ..ती आहे तर तिचा विचार कर..विसरून जा जानू ला..

अभय: प्रीतम ..मी म्हटलं नाही..की सानिका चांगली नाही ..चांगलीच आहे ती..आणि एकदा बोललास ..पुन्हा बोलू नकोस ..जानू ला विसर म्हणून ..ती माझं सर्वस्व आहे..
अभय आज पहिल्यांदा प्रीतम वर रागावला होता..तो तिथून निघून गेला.रूम वर आल्या वर प्रीतम चे शब्द त्याच्या डोक्यात फिरत होते..मनाला खूप यातना होत होत्या.. खरंच जर जानू दुसऱ्या कोणाची झाली असेल तर ? या नुसता विचाराने त्याचं डोकं सुन्न झालं होत...तितक्यात त्याचा फोन वाजला आकाश चा फोन होता तो..

आकाश: हाय अभ्या..कसा आहे स ?

अभय: मी ठीक आहे रे..तू कसा आहेस ?

आकाश : मी एकदम मस्त..पणं काय झालं रे तुझा आवाज खूप वेगळा येत आहे.

अभय: काही नाही रे थोडा मूड खराब आहे..

आकाश : तुझा मूड कसा का असेना पण मी सांगितलेली न्यूज ऐकुन तू नाचायला लगशिल..

अभय: अस काय ? तुला लॉटरी लागली काय ?पणं त्याने मी का नाचेन ? तूच नाच.

आकाश : अरे ती अपूर्वा आहे ना..

अभय: कोण ती ..सुनील ची बहीण ?

आकाश : अरे हो तिचं..तिचं लग्न ठरलं आहे ..

अभय : चांगलं आहे पणं यात माझं काय ?

आकाश : अरे तू ऐकुन घेतोस का ? की मी ठेऊ फोन ?

अभय: बर बोल..

आकश: ह ..मग त्या अपूर्वाच लग्न ठरलं आहे .. तर ..लग्नाला जानू येणार आहे..

अभय तर जानू च नाव ऐकुन च वेडा होतो..
अभय : काय काय ..? परत सांग ? कोण येणार आहे ?

आकाश: अरे जानू येणार आहे..जान्हवी प्रधान..

अभय: ये तू खर सांगत आहेस ना ? उगाच चे श्टा नको करू माझी..

आकाश : अरे ती अपूर्वा भेटली होती..ती च बोलली जानू येणार आहे ..

अभय : कधी आहे लग्न ..?

आकाश: चार दिवसांनी..

अभय: अरे मी उद्याच निघतो..थँक्यु आकाश यार तू इतकी भारी न्यूज दिली आहेस ना ..वाटत तुला च उचलून घेऊन नाचावं..

आकाश: म्हटलं होत ना..तू नाचायला लगाशिल..

अभय : होय रे खरंच नाचू वाटत आहे मला..

आकाश: बर चल भेटू आलास की .

अभय: हो हो..bye

अभय तर आनंदात वेडा होता..जानू येणार ? बापरे..ओळखेल ना ती मला ? नाही का ओळखणार ? कशी दिसत असेल ती आता ? किती वर्षांनी आपण तिला पाहणार.. यार कधी संपणार हे चार दिवस कधी एकदा मी जानू ला पाहणार ? एक ना हजार विचार .. अभय ला तर या सर्व विचारांनी झोप येत च नव्हती..

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED