Janu - 37 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 37

आज रविवार सुट्टीचा दिवस..दर रविवारी जानू कामात असे व अभय तिच्या सोबत बोलण्याची वाट पाहत असे..या रविवारी मुद्दामच जानू ने सर्व काम लवकर आवरलं.. अभय ने सकाळी गूड मॉर्निंग तेवढ बोलला होता..पणं त्या नंतर काही त्याचा मॅसेज आला नव्हता..जानू ने काम आवरून त्याला रिप्लाय केला..पणं साहेब गायब ..मॅसेज चा रिप्लाय नाही की मॅसेज त्याने पाहिला ही नाही..शेवटी बराच वेळ वाट पाहून जानू दुपारी झोपी गेली ..ऑफिस मुळे दुपारी झोप मिळत न से..आज सुट्टी त्यामुळेच ती झोपली होती..संध्याकाळी उठून थोड काम आवरलं नंतर फोन पाहिलं पणं अभय अजून गायब च ..अरे हा कुठे गेला ? सुट्टी दिवशी हा इतका कसा काय बिझी आहे ? जानू विचार करत होती..तेवढयात अभय नी तिला मॅसेज केला.

अभय: हॅलो..

जानू : अरे वा सुर्य उगवला वाटत..लवकर आठवण आली?

अभय: तुला आठवायला मी विसरतो कुठे तुला ?

जानू : सुट्टी दिवशी ही इतका कसा बिझी असतोस रे तू ? आपल्या देशाचे प्राय मिनिस्टर ही इतके बिझी असत नसतील...आणि तू ? सकाळी गायब ते संध्याकाळी उगवतोस ...PM कुठला..

अभय ला जानू च बोलणं ऐकून हसू येत..

अभय: म्हणजे मी जेव्हा तुझ्या मॅसेज ची वाट पाहत असतो सुट्टी दिवशी तेव्हा तू बिझी असेल ल चालत आणि मी नाही बोललो तर मी PM का?

जानू : म्हणजे तू बदला घेत होतास का ?

अभय: ये काही पणं काय जानू .. तस काही नाही ग..मी कधीच तुझ्या सोबत अस वागू शकत नाही..मी कधी तसा विचार ही केला नाही..

जानू : मग इतका बिझी कसा होतास ?

अभय: त्या शेजारच्या काकू आहेत ना त्या अचानक चक्कर येऊन पडल्या..त्यांची मुलं इथे नाहीत ..कामा साठी बाहेर गावी राहतात..आणि त्या एकट्याच इथे असतात..मग काय करणार..बेशुद्ध झाल्या होत्या त्या..मी उठवून घरात नेल त्यांना..पणं खूपच अशक्त झाल्या होत्या त्या मग जावून डॉक्टर ला घेऊन आलो..त्यांना सलाईन लावल्या..त्यांच्या मुलांना फोन केला..मग ते आले ..मग मी घरी आलो त्यामुळे तुझ्या सोबत बोलता च आ ल नाही.. माझा फोन मी घरीच विसरून गेलो होतो ना त्यामुळे..सॉरी जानू.

जानू ला अभय च खूपच कौतुक वाटत..दुसऱ्यांची ही किती काळजी करतो हा..पणं तसा तो लहानपणा पासूनच असा आहे हे तिला माहीत होत.

जानू : अरे वा म्हणजे समाज सेवा अजून ही सुरू आहे म्हणायची.. बर ठीक आहे.

अभय: ये समाज सेवा वगेरे काही नाही..त्या एकट्या आहेत बिचाऱ्या म्हणून केली मदत..जानू जेवलीस का ?

जानू : हो ..तू ?

अभय: नाही अजून..

जानू : ये तुझं रोज माझ्या जेवणा जवळ काय असत रे ?रोज काय एकच प्रश्न विचारतोस ? जेवलीस ,जेवलीस ?

अभय: काय करणार ..तू जेवल्या शिवाय मला नाही ना जेवायला मिळत ?

जानू : म्हणजे ?

अभय: म्हणजे रोज तू जेवाल्या नंतर च मी जेवतो ..नियमच आहे तो ..तू जेवलीस ही खात्री करून च मग मी जेवतो..

जानू ला त्याचं ऐकूनच विचित्र वाटत..

जानू : हे जरा जास्तच होतंय हा अभय ? अस कुठे असत?

अभय: आता कोणी नसेल करत पणं मी करतो..तुला पटतच नाही माझं काही ही..

जानू : गप तू हे असल काही करत जावू नकोस...आणि ज्या दिवशी मी बोलत नाही तेव्हा कसं जेवतोस मग ?

अभय: त्या दिवशी नाइलाज असतो मग..तू जेवली असशील समजून जेवतो..मग..

जानू : मग रोज तसचं समजत जा आणि जेवत जा ..

अभय: नाही..तुला पटत नाही तर राहू दे..पणं माझा नियम तसाच राहणार..

शेवटी जानू च शांत होते ..मग थोड्या गप्पा मारून अभय जेवण करतो..परत थोडा वेळ बोलून जानू कडून फोटो मागून घेतो..त्याचं ठरलं होत ना रोज फोटो द्यायचे ..जानू नाही होय म्हणता म्हणता एक ग्रुप फोटो पाठवते.. अभय तिला हसून म्हणतो तुझी फलटण नको.. एकटी चा दे..शेवटी पुन्हा वाद करून करून मग तो तिचा अजून एक फोटो मागून घेतो..फोटो पाहत त्यात हरवून झोपी जातो...

जानू सकाळी ऑफिस मध्ये पोहचते..पलीकडच्या डेस्क वरून तिला ओळखीचा आवाज ऐकू येतो..कोणी तरी खूप मोठ्याने हसून बोलत असत..तो आवाज ऐकुन जानू ला तो आवाज खूप ओळखीचा आणि जवळचा वाटू लागतो..नकळत तिची पावले त्या दिशेने वळतात..तिथे एक मुलगा पाठमोरा उभा राहून गप्पात रंगला होता..पाठ मोरा उभा असला तरी जानू त्याला ओळखते..तिचे पाय थरथरू लागतात..दरदरून घाम फुटतो..तोंडातून आवाज येईनासा झाला आहे अस तिला वाटू लागतं..पणं तरी ही तिच्या तोंडून शब्द निघतात..

जानू : स...मी... र... तू..?

तसा तो मुलगा जानू कडे वळतो ..तो समीर च असतो..तो तिच्या कडे पाहून हसतो..

समीर : होय जानू मी ...मी इथे जॉईन झालो आहे..मी पुन्हा आलो आहे जानू तुझ्या कडे..माफ नाही करणार का तू मला ?
अस म्हणून समीर पुन्हा मोठ्याने हसू लागतो..

जानू तर भूत पहिल्या सारखं तिथेच खिळून उभी होती...

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED