जानू न बोलताच निघून गेली.. पहिले दोन दिवस तर आपण अभय सोबत जे वागलो ते चुकीचं आहे अस तिला वाटलच नाही..पणं नंतर मात्र ना राहून अभय ची सारखी आठवण येऊ लागली.. अभय कडून मात्र एक ही मॅसेज अथवा फोन तिला आला नव्हता..त्याचे स्टेटस ही दिसत नव्हते आता..आपण अभय ला काय काय बोललो त्या दिवशी असा विचार करत बसली असताना तिला पुन्हा सर्व आठवल....आणि जस आठवल त स..तिला घाम फुटू लागला .. अंग कापू लागलं...आयुष्याचा समीर होवू नये म्हणून आपण स्वतः ला जपत राहिलो पणं आपण स्वतः समीर होऊन बसलो ..हे कसं कळलं नाही आपल्याला याचं विचारांनी तिचं डोकं सुन्न होवू लागलं...जे समीर आपल्याला बोलला तेच तर आपण अभय ला बोललो..सारखं प्रेम प्रेम काय करतोस ? प्रेमा शिवाय काही नाही का तुझ्या लाईफ मध्ये? मी नाही भेटले म्हणून लाईफ संपली का ? आणि बिचारा अभय? तो तर नेहमी आपल सर्व ऐकत च गेला कधी आपल्याला दुखावलं नाही..कधी त्रास दिला नाही..जीवापाड प्रेम च तर केलं होत आपल्यावर अभय नी मग आपण का त्याच्या प्रेमाला समजून घेतलं नाही ? का आपण अभय सोबत अस वागलो याचा पाशताप जानू ला होवू लागला...दिवसा गानिक जानू ला अभय जास्तच आठवू लागला..त्याचं तिची काळजी करणं..सारखं जानू ..जानू करणं..आता तर फोन ची रिंग ही वाजली तरी जानू अभय चा फोन असेल म्हणून तळमळ करू लागली पण अभय चा फोन येतच नव्हता...ना त्याचे मॅसेज येत होते..जानू स्वतः त्याला मॅसेज करू लागली पणं तिचे मॅसेज अभय ला जातच नव्हते म्हणजे त्याच्या अकाऊं ट ला मॅसेज सेंड होत नव्हते..समीर सारखं अभय ही आपल्याला सोडून गेला की काय या भीती ने जानू च्या मनाचा थरकाप उडाला...आपण अभय वर प्रेम करू लागलो ..हे मात्र आता तिला पटलं होत.. खरंच एखाद जवळच माणूस जेव्हा दुरावत तेव्हाच तर त्या माणसाची किंमत आपल्याला कळते... अभय ची आठवण आली त्याचं वेड पणं आठवल ..मला तूच हवी आहेस...मला लग्न करायचं आहे तुझ्या सोबत ..हे शब्द आठवले की जानू एकटीच गर्दीत हि हसू लागली होती ..तिचं हरवलेलं हसन पुन्हा तिला भेटलं होत...जानू पुन्हा पहिल्या सारखी प्रेम वेडी झाली.होती ..पणं या प्रेम वेडी चा वेडा कुठे हरवला होता..जानू रोज अभय चा फोन येईल मॅसेज येईल या आशेवर होती..आणि जेव्हा आपण त्याला सांगू की आपल ही प्रेम आहे त्याच्या वर तेव्हा किती खुश होईल तो याचा च विचार ती दिवस रात्र करत होती.
एक दिवस अचानक जानू चा फोन वाजला ..अनोळखी नंबर पाहून ती इतकी खुश झाली होती..तिला वाटलं अभय चा च असेल तो फोन खूप आतुरतेने तिने फोन उचलला..
जानू : हॅलो..
स्नेहा: हॅलो ..जानू ..स्नेहा दीदी बोलतेय..
अभय चा नसला तरी दीदी चा फोन आहे हे पाहून ही जानू खुश झाली..
जानू : दीदी..आज आठवण आली का तुला ? गेली स तेव्हा पासून तर कधीच आठवण नाही काढलीस तू..विसरलीस का तुझ्या जानू ला?
स्नेहा दीदी: नाही ग जानू तुला कस विसरू ..पणं बाबा चा राग पाहून नाही वाटल बोलावं कोणा सोबत आणि त्यात नवीन संसार उभा करायचा नादात सर्वच मागे राहील ग.. तू रागावली आहेस का माझ्यावर ?
जानू : नाही ग दीदी..मी का रागवेन? बाबा जात पात मनात असले तरी मी नाही मानत..आणि तुझं आयुष्य होत..तुला तुझ्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार होता.. पणं तू बाबा ना सांगायला हवं होत.
स्नेहा दीदी:तुला वाटत बाबा तयार झाले असते ?
जानू: हो ते ही खरंच आहे अगदी आपण २१ व्यां शतकात जरी वावरत असलो तरी जाती पातीच भेदभाव अजून हि लोकं जपत च आहेत ..बाबा न सारखे किती तरी लोकांचे विचार अ जून तसेच आहेत..कधी माणसं फक्त माणुसकी हा एकच धर्म मानतील काय माहित... बर कशी आहेस ? आणि जिजू बद्दल तर सांग काही तरी..ते कसे आहेत ?
स्नेहा दीदी: मी ठीक आहे आणि सुखात आहे ..तुझे जीजू ही मस्त आहेत .माझी खूप काळजी घेतात.
जानू : कसे भेटलात ? ते ही तर सांग .
स्नेहा दीदी: तुझे जीजु आणि मी एकाच कॉलेज मध्ये शिकत होतो..आधी मैत्री झाली नंतर मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं कळलच नाही..जेव्हा कळाल तेव्हा बाबा विरोधात न जायचं मी ही ठरवल होत..पणं तुझे जिजु अनाथ आहेत ..ना त्यांना आई आहे ना त्याची फॅमिली आहे ..आणि त्याच माझ्यावर खूप प्रेम होत अशात मी ही त्याची साथ सोडली असती तर खूपच दुखी झाले असते ते ..म्हणून मग केलं आम्ही लग्न ..बाबा ना तर दुसऱ्या जातीचा मुलगा ही चालला नसता मग सुधीर एक अनाथ आहे ..त्यांच्या जाती पातीचा च काय फॅमिली चा ही पत्ता नाही हे पाहून तर बाबा नी कधीच कबुल केलं नसत.
जानू : दीदी तू खरच ग्रेट आहेस..आणि एक ना एक दिवस बाबा ही समजून घेतील ..तू नको काळजी करुस.
स्नेहा दीदी: बर एक गूड न्यूज देण्या साठी फोन केला होता तुला.
जानू : गूड न्यूज ?
स्नेहा दीदी: हो ..तू मावशी होणार आहेस.
जानू : वावं दीदी ..मस्तच.. खरंच समोर असतीस तर मिठी मारली असती तुला.
स्नेहा दीदी: आज आई ची खूप आठवण येत आहे ग .
जानू : तू काळजी करू नकोस ..बाबा नसले घरात की मी आई ला बोलायला लावेन तुझ्या सोबत ..आणि लवकर सर्व ठीक होईल ..तू काळजी घे स्वतः ची.
स्नेहा दीदी: हो हो आजी बाई..मोठी मी की तू ग ?
जानू: मीच मोठी आहे आता तू ऐक माझं .
स्नेहा दीदी: बर ठीक आहे ..तू ही सर्वांची काळजी घे..आणि एकदा भेटायला ये जानू खूप पहावसं वाटत आहे तुला.
जानू : हो दीदी नक्की येईन ..ठीक आहे .
जानू आज खूप खुश होती .. अभय असता तर आपण आपली खुशी त्याच्या सोबत शेयर केली असती अस तिला खूप वाटलं...पणं खरंच आता अभय शिवाय नाही राहवत..मलाच शोधायला हवं कुठे आहे तो आणि त्याला सॉरी ही बोलायला हवं.
जानू पुन्हा अभय चा नंबर डायल करते पणं फोन लागतच नाही काय करावं तुला कळत नाही..हा..एकदा अभय नी आकाश चा फोन नंबर सेंड केला होता हे तिला आठवत ..तो नंबर ती शोधून काढते व अभय चा फोन तर लागत नाही आकाश ला च विचारू तो कुठे आहे अस ठरून ती आकाश ला फोन लावते .