Janu - 45 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 45

जानू ने आकाश ला फोन लावला ..दोन चार रिंग नंतर आकाश नी फोन उचलला..

जानू: हॅलो..आकाश

आकाश: हॅलो.

जानू: मी जान्हवी प्रधान बोलतेय..

आकाश: व्हॉट अ सरप्राइज..बोल ना ..

जानू: अभय कुठे आहे ? त्याचा फोन लागत नाही..म्हणून तुला लावला मला त्याच्या सोबत बोलायचं आहे.

आकाश: जान्हवी रागावू नकोस पण मला तुझा खूप राग आला आहे.. अग अभय किती प्रेम करत होता तुझ्या वर ..तू नव्हतीस तरी तो फक्त तुझ्या आठवणीत जगत होता..मला माहित आहे तुझ्या साठी त्याने काय काय केलं..तुझ्या पप्पा चा नंबर घेऊन तुझ्या सोबत बोलण्याचा प्रयत्न केला..त्यांच्या शिव्या खाल्ल्या...कुठे कुठे शोधल तुला..आपूर्वाच्या लग्नाला ही तू येणार आहे कळल्यावर तो आला होता.. तू भेटलीस तेव्हा पासून किती खुश होता तो ..त्याची एकच इच्छा होती ..तुझ्या सोबत लग्न करायची..नेहमी म्हणायचा एक ना एक दिवस जानू नक्की भेटेल मला..पणं तू भेटलीस ही पणं का अशी वागली? तो तुला भेटायला आला होता नाशिक ला त्या नंतर दुसऱ्या दिवशी मला भेटला होता सर्व सांगितलं होतं त्याने मला खूप दुखी होता तो..मुलगा असून ही रडला होता ग तो...का नाही समजून घेतलीस त्याला ? काय चुकी होती त्याची ? तुझ्या वर प्रेम केलं होत इतकीच ना ? कशाला त्याचं मन तोडल स?

जानू ला ऐकुन खूप वाईट वाटत..

जानू : हो माहित आहे रे मी खूप चुकीचं वागले ..नाही समजून घेतलं मी त्याला..त्याची माफी मागायची आहे मला..माझं ही प्रेम आहे त्याच्या वर मला सांगायचं आहे त्याला ही पणं ..उशीर केला मी .

आकाश: उशीर नाही खूप उशीर ..

जानू : हो..पणं आता नाही करणार..

आकाश : उशीर झाला ग..तुला भेटला त्याच्या दुसऱ्या दिवशी च रात्री त्याच्या बाबा ना heart attack आला .. आणि त्यातच ते गेले ..त्याची आई ही खूप आजारी आहे ..म्हणून च तो लग्न करतोय त्याच्या आई च्या इच्छे साठी..त्याचा फोन धावपळीत पडून फुटला आहे ..त्याने अजून नवीन घेतला नाही..खूप अबोल झाला आहे तो ..खूप मोठा धक्का बसला आहे त्याला..

जानू : लग्न ?

आकाश: हो ..लग्न आहे त्याच..आणि मला वाटत तू आता लांबच राहा त्याच्या पासून ..नको येऊस पुन्हा त्याच्या लाईफ मध्ये.

जानू आकाश च बोलणं ऐकून काहीच न बोलता फोन ठेवते..शब्दच नसतात तिच्या कडे तर ती काय बोलणार ? डोळ्यातून अश्रू ओघळ त होते..सर्व संपलं असच वाटत होत तिला..डोकं गर गर फिरत होत..आपण काय ऐकलं याच तिला भान च नव्हत..किती तरी प्रश्न मनात थैमान घालत होते.
का? का ? माझ्याच सोबत अस होत ? काय पाप केलंय मी ? आधी समीर न ठोकरल..जीवापाड प्रेम करून सुद्धा.. एक heartless मुलगी बनवून सोडलं.. अभय ने ही आपल्या वर जीवापाड प्रेम केलं पणं आपण तर समीर समीर च करत त्याला समजून घेतलं नाही..आता अभय ही आपल्या आयुष्यातून दूर निघून गेला... अभय च प्रेम समजून घेतलं नाही ..आपली चूक झाली या वेळी पणं त्याची इतकी मोठी शिक्षा? खूप रडत होती जानू..आणि तिचा आतला आवाज ही आज तिला ओरडत होता..आणि ती फक्त ऐकत होती.

आवाज : रडा मॅडम रडा..असच होयला हवं.. जेव्हा मी सांगत होतो ..समीर नको..तेव्हा त्याच्या मागे वाहत गेलात आणि आता. ..जेव्हा सांगितलं होत की अभय चांगला आहे ..त्याचं प्रेम आहे ..तेव्हा फक्त मित्र आहे मित्र आहे म्हणून मलाच गप्प केलं..त्याला समजून ही घेतलं नाही..स्वतः पेक्षा ही तुझी जास्त काळजी करणाऱ्या त्या अभय ला जेव्हा आधाराची गरज होती तेव्हा मात्र तुम्ही नव्हता सोबत त्याच्या.. खरंच तुला अभय च प्रेम मिळावं इतकं तुझं स्थान मोठ नाही..तुझ्या साठी तर समीर सारखेच ठीक आहेत..

जानू आपल्या आतल्या आवाजच बोलणं ऐकून तर जास्तच दुखी होत होती..पूर्ण रात्र ती रडत होती ..खूप आप राधी वाटत होत तिला...जीव नकोसा झाला होता...आपल्यालाच काही तरी झालं असत तर बर झालं असतं असं तिला राहून राहून वाटत होत..

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED