APHARN books and stories free download online pdf in Marathi

अ प ह र ण

लेखकाची ओळख :

सुरेन्द्र पुरुषोत्तम पाथरकर,

निवृत अधीक्षक, सेंट्रल वेरहाउसिंग कार्पोरेशन,

सध्या :लेखक, एलआयसी,स्टार मेडीक्लेम Advisor,

वडील: कै.पुरुषोत्तम पाथरकर,

प्राथमीक शिक्षक, सरस्वती विदद्यालय,नासिक॰

पत्ता :

“ आशीर्वाद “ बंगला नो:03, कोणार्क नगर नो:02,

आडगाव शिवार, पंचवटी ,नाशिक-४२२००३

संपर्क: मोबाइल : ८५५४८३६९८९

Email ID: patharkar.sp@gmail.com
मनोगत:

लहानपणापासून लिहिण्याची आवड.सन 1975 ते 1980 च्या दरम्यान नासिकच्या गावकरी मराठी दैनिकात काही सामाजिक विषयावर लेख लिहिले होते. सेंट्रल वेरहाउसिंग कार्पोरेशन मध्ये 39 वर्ष सेवा झाली. तेव्हा हेड ऑफिस दिल्ली वरुन हिन्दी मधे त्रिमासिक प्रसिद्ध होत असे. त्यात माझ्या हिन्दी भाषेत कथा शृंखला 1 ते 7 प्रसिद्ध झाल्या आहेत. नंतर कामाच्या व्यापा मुळे निवृत्तीपर्यंत लिखणला वेळ देता आला नाही. 28 फेब्रुवारी 2015 ला रिटायर झाल्यावर मात्र ठरवून आणी वाचकांच्या प्रेमाखातर लिखाण सुरू आहे. ई- साहित्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष माननीय श्री.सुनील सामंत साहेब यांना मी मनापासून धन्यवाद देतो कारण ई- साहित्य प्रतिष्ठान तर्फे माझ्या लोकप्रिय कथा (1) अंतिम लढत (2) प्रारब्ध ( तीन कथांचा संग्रह) ऑडिओ सह ई- प्रकाशित झाले. वाचकांच्या प्रेमळ आग्रहामुळे यापुढेही अजून वाचनीय कथा लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.

लेखक: सुरेन्द्र पाथरकर

+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@+@

{[ अपहरण ]}

लेखक:सुरेन्द्र पाथरकर:

मोबाइल: 8554836989 Email:patharkar.sp@gmail.com

( कथा पूर्ण काल्पनिक असून स्थळ, काळ,व्यक्ति, यात काही साधर्म्य आढ़ळल्यास तो केवळ योगायोग समजावा :१८०८२०२१ )

प्रभाकर शेजवळ, असिस्टंट कमिशनर, (कस्टम्स), आपल्या केबिनमधे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालीत होते. निवृत्तीला फक्त १८ महिने बाकी असताना पुण्याहून नागपूर येथे कमिशनर ( कस्टम्स ) या पदावर प्रमोशनवर बदलीची ऑर्डर आली होती. आत्ता पर्यंत जवाहरलाल नेहरु पोर्ट, नवी मुंबई, नाशिक नंतर आता पुने कस्टम येथे अतिशय उत्तम प्रकारे काम केल्यामुळे प्रमोशन झाले होते, परंतु नागपूरला बदली झाल्यामुळे सर्व कुटुंब नाराज झाले होते, प्रभाकर शेजवळ मुळचे पुण्याचे स्थाइक कुटुंब. प्रभाकर चवथ्या पिढीतिल कुटुंब प्रमुख. शनिवार वाड्यापासून १५ मिनिटं पूर्वेकडे चालत गेले की प्रभाकर यांचा २५०० चौरस फुटाचा ०३ BHKचा स्वतंत्र बंगला. कंपाउंडमधे डावीकडे कार पार्किंग शेड. शेडमधे आता सिल्वर कलरची आल्टो कार व् एक एक्टिवा ती पण सिल्वर कलरची उभी होती. प्रमोशन व बदलीची बातमी घरी कधीच समजली होती. मोबाइलच्या जमान्यात बातम्या पसरायला काही सेकंद पुरेसे असतात. प्रभाकरची पत्नी कमल व मुलगा अमेय हॉलमधे गंभीर चेहरा करून बसले होते. टेबला वरील पेंडिंग फाइल्स बाजूला ठेउन प्रभाकर साहेब आपल्या सफेद कलरच्या इन्नोव्हा कारमधे बसून घरी निघाले.

प्रभाकर रोजच्या पेक्षा आज लौकर घरी आल्याने कमल मॅडम व अमेय यांना चिंता वाटू लागली, त्याचे कारण नागपुरला बदली हे तर होतेच, पण जास्त चिंता प्रभाकरच्या शुगर लेव्हलची होती. गेल्या १० वर्षा पासून त्यांना मधुमेह होताच पण मागच्या पाच वर्षापासून इन्सुलिनवर डिपेंड होते. दुपारी जेवणाआधी २० यूनिट व् रात्रि जेवणाआधी २० यूनिट इन्सुलिन इंजेक्शन घेत होते. अमेयने लगेच उठून पेनड्राइववर पप्पांच्या आवडते शास्त्रीय संगीत लावले व कमल मॅडम साहेबानसाठी ब्लैक लेमनटी बनवायला किचनमधे निघून गेल्या. प्रभाकर फ्रेश होउन आल्यावर, हॉल मधील डाइनिंग टेबला सभोवती बसून सर्वांनी निवांत पणे चहाचा आस्वाद घेण्यास सुरवात केली.

सायंकाळची वेळ, सुमधुर संगीत, देवाजवळ लावलेल्या सुगन्धित अगरबत्तीचा सुगंध हॉलमधे दरवळत होता. प्रभाकरने आराम खुर्चीत पाठीमागे रेलून रीलॅक्स मूडमधे डोळे बंद करून घेतले होते. कमल विचारांच्या तंद्रीत चहाचे घोट घेत होती. अमेय मोबाइल मधील गेममधे व्यस्त होता. इतक्यात डोअर बेल वाजली कमलने दरवाजा उघडला तर बाहेर प्रभाकरचा कार ड्राईवर मधु घरी जाण्यासाठी परवानगी मागायला आला होता. कमलने त्याला जाण्यास सांगितले व दरवाजा लाउन घेतला. परत येउन सोफ्यावर बसणार इतक्यात परत डोअरबेल वाजली. आता कोण आले असेल बर असे पुटपुटत कमलने पुन्हा दरवाजा उघडला, पहाते तर बाहेर, प्रल्हाद भाऊजी नेहमीच्या आनंदी चेहर्‍याने उभे होते. ये बाबा प्रल्हाद बस प्रभाकरने प्रसन्नतेने स्वागत केले. तू जेव्हा जेव्हा येतोस तेव्हा तेव्हा आमचे घर आनंदाने भरून जाते. हो आता ओळख करून देतो प्रल्हाद हा नुसताच लहानपणापासुनचा मित्र नव्हे तर कस्टम ऑफिसमधे अत्यंत कडक शिस्तीचा असिस्टंट कमिशनर म्हणून पूर्ण रेंजमधे प्रसिद्ध अधिकारी आहे. आमच्या घरचाच एक सदस्यच आहे.

अरेबाबा आता कौतुक पुरे, तू प्रकृतीची काळजी घे बाबा. प्रमोशनवर नागपुरला बदलीची न्यूज़ मला मिळाली आणि मी लगेच तुज्याकड़े धाव घेतली. मला माहिती होते प्रमोशनने तू जितका खुश असशील त्या पेक्षा जास्त दुःखी तू नागपुरला बदलीमुळे असशील. जास्त काळजी तर कमल वहिनी व अमेयला वाटत असणार तुझ्या प्रकृतिमुळे. आता मी आलो आहे. सर्व अडचणीवर चर्चा करून मार्ग काढू, का्य अमेयबेटा बरोबर आहे ना? मीही तेच म्हणतो आहे आई पप्पाना. आता काळजी सोडा, मी आता मोठा झालो आहे, केमिकल इंजीनियरिंगची पदवी पण मिळाली आहे, करियर नक्की आहे. लौकरच जॉबसाठी प्रयत्न सुरु करणार आहे. चर्चा सुरु असतांनाच कमल वहिनी सगळ्यासाठी गरम गरम कांदेभजी प्लेटमधे घेउन आल्या. उत्साहाने सगळ्यानी भजी संपविली. अमेय अजून भजी आणण्यासाठी किचनमधे गेला. ही वेळ साधून कमल वहिनीनी लगेच अमेयच्या लग्नाचा विषय काढला. प्रभाकरने पण पाठिंबा दिला. प्रल्हाद विचार करून म्हणाला अरे काही काळजी करू नकोस आजकाल ८० टक्के लग्न रजिस्टर्ड वधु/वर विवाह संस्थेच्या माध्यमातूनच जमतात. पूर्वी लग्न जूळविणारे मध्यस्थी असत आता ती प्रथा जवळजवळ बंद पडली आहे. तेव्हा आता काळजी करणे सोडा. पुढील महीन्याच्या पहिल्या आठवड्यातील कुठल्याही तारखेचे नागपूरचे रिजर्वेशन करून घे. या महिनाअखेरीस रिलिव्ह होउन जा म्हणजे प्रवासाची तयारी करण्यास वेळ मिळेल. कमल वहिनी याला आता जास्त विचार करू देऊ नका. निवृतिला फक्त १८ महिनेच राहिले आहेत, काही जास्त नाहीत पटकन निघून जातील. याच्या नंतर दोन वर्षाने मी पण निवृत्त होणार आहेच. अमेय आत येता येता म्हणाला, काका आता जाऊ नका, जेवणच करून जा, मी छान सस्पेन्स मुव्ही लावतो. पप्पान्ना खुप आवडते, रोज रात्री जेवतांना आम्ही एक मुव्ही नक्कीच बघतो. नकोरे बाबा तुम्ही मजा करा. ओके मी निघतो, शुभ रात्री, परत भेटू.

“ प्रभाकर शेजवळ “ कमिशनर (कस्टम्स), दरवाज्या बाहेर बोर्ड चमकत होता, नागपूरची कस्टम डिपार्टमेंटची सुरेख इमारत, तिसर्‍या मजल्यावरील आपल्या केबिनमधे प्रभाकर कामात मग्न होता. नागपुरला येउन आता तिन महीने पूर्ण झाले होते. प्रभाकरच्या मनात आता कधी एकदाचे १५ महीने लौकर संपतात व आपण निवृत्त होउन पुण्यास परत जातो असे झाले होते. आजच आठ दिवसांची रजा मंजूरीची आर्डर प्रिंसिपल कमिशनर, कस्टम, मुंबई यांचे कडून मेल नी मिळाली होती, तसे लगेच कमल ला फोन करून सांगितले होते की या दिवाळीला मी पुण्यास येत आहे. एखादा छानसा स्पॉट निवडून आपण आउटिंगचा प्रोग्राम ठरवू तसे अमेयला मी सविस्तर सांगीनच. ला नागपुर खुप आवडले. इथली माणसे फार प्रेमळ लगेच आपलेसे करून टाकतात.

प्रभाकरची दिवाळी खुपच आनंदात गेली. प्रभाकर, कमल व अमित माथेरानला चार दिवसांसाठी होटल एडवांस बुक करून रहायला गेले. वर्षातुन एकदा तरी कुटुंबासहित काही दिवस आउटिंगला जाण्याचा अलिखित नियमच प्रभाकरने केला होता. वर्षभरातील रोजच्या कामाच्या रुटीन मधून थोडासा निवांतपणा मिळण आवशक असते, असा त्याचा ठाम विश्वास होता. फॅमिली मधील सर्वच सदस्य वर्षभर आपापल्या कामात व्यस्त असतात. सहवासाचा आनंदाचा अभाव जाणवतो कारण एकाच घरात राहूनसुद्धा सर्व मेम्बर इतके व्यस्त असतात की वेळेअभावी फक्त औपचारिक बोलणेच होऊ शकतात. म्हणून प्रभाकर वर्षातून एकदा आउटिंगला जाण्याच्या प्रोग्रामला एक आनंदी फॅमिली असण्याचे ट्रेड सीक्रेट मानत होता.

पुण्याला पिकनिक हुन परत आल्यावर मात्र प्रभाकरला तातडीने नागपुरला जावे लागले कारण तसा ड्यूटी जॉइन करण्यासाठी प्रिंसिपल कमिशनर कस्टम्स, मुंबई यांचा ई-मेल आला होता. जॉइन केल्यावर लगेच प्रभाकरला मुंबई ला एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ऑफिसमधे डेपुट केले गेले. हे केंद्र सरकारचे डिपार्टमेंट असून, गुप्त स्वरूपाच्या ऑफिसियल धाडी टाकुन, आर्थिक गुन्हे करणार्‍यांना पकडतात व पुरावे तपासून गुन्हे दाखल करतात. ई.डी. ला अतिरिक्त मदत म्हणून महाराष्ट्रातुन प्रभाकर सारखे अजून तीन कस्टम कमिशनर याच कामासाठी डेपुट केले होते. कामाचे टाइमिंग पक्के नव्हते. जेवणाच्या वेळा नियमित नव्हत्या. रोज खुप धावपळ करावी लागायची. पण प्रभकरने कशाची पर्वा केली नाही. पूर्ण सर्विसमधे प्रामाणिक ड्यूटी ला पहिले प्राधान्य दिले होते. स्वत:हाच्या, फॅमिलीच्या काही अडचणी असल्यास त्या नंतर एटेंड करावयाच्या आधी ऑफिसच्या कामाला प्राधान्य . वीस दिवसानंतर प्रभाकरची या कामातून सुटका झाली. प्रभाकरला थकवा जाणवत होता. नागपुरला जॉइन व्हायच्या आधी आठ दिवसांची रजा घेउन विश्रांतिसाठी पुण्यास आला.

प्रभाकर पुण्याला आल्यामुळे, कमल व अमेयला आनंद झालाच पण प्रल्हादला पण खुप आनंद झाला. प्रल्हादची ऑफिसमधे जबाबदारी वाढली होती तरीपण रोज संध्याकाळी गप्पांची मैफिल जमवायची पक्के ठरले. रोज सायंकाळी गप्पांची मैफिल जमण्याचा आजचा तीसरा दिवस होता. रोज संध्याकाळी ६.३० वाजता बैठक जमत होती व ८.३० पर्यंत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालायची व त्यात जमलेले सगळे हिरीरीने भाग घेत. परिणामस्वरूप बाजुच्या बंगल्यात राहणारे निवृत्त तहसीलदार नाना व प्रभाकरच्या कोलनीत राहणारे माजी नगरसेवक व सध्या राजकारणातुन निवृत्त झालेले आप्पा, रोज नियमित पणे गप्पांची मैफिलमधे उपस्थित राहू लागले.

एका संध्याकाळी सर्व जण प्लेट मधील चिवडाचा आस्वाद घेत होते व बरोबरच गरम गरम चहाचा घोट पण घेत होते. “का्य अमेय आजकाल काय चालू आहे?” प्रल्हाद काकाने आज अमेय ची विकेट घ्यायची ठरवलेले दिसत होते. “काही खास नाही काका आजच तीन कंपनीमधे नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज पाठवला आहे. तिन्ही कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत. कारण मी केमिकल इंजिनियर असून या डिग्रीला स्कोप नक्कीच आहे पण या विषयातील कॅन्डीडेट साठी रिक्त जागा कमी प्रमाणात निर्माण होतात. बघू लक कसे आहे ते पण असणे महत्वाचे आहे ”“पण अमेय मला सांग नोकरीचे नंतर बघू आधी लग्न कधी करतोस ते सांग. आता आई/पप्पा थकले आहेत. थोडेच दिवसात पप्पा निवृत होणार आहेत. तुमची आर्थिक स्थिति लगेच तुला नोकरी लागावी अशीही नाही. लग्नानंतर सावकाश जॉब मिळाला तरी चालतो.”

“तुम्हाला का्य वाटते नाना?”“यावर अमेयला आपल मत मांडाव असे वाटते.”अमेंय सावरून बसला. त्याला अंदाज आला की सगळी मेजोरिटी त्याच्या विरोधातच जाणार.“प्रल्हाद काका मी नक्की मत मांडतो, पण काका माफ़ करा, लहान तोंडी मोठा घास घेत आहे, तुम्ही पप्पाचे लहानपणीचे मित्र. तुमचे वय अंदाजे पन्नास समजू, तरी तुम्ही अजून लग्न केलेले नाही, अजून ब्रम्हचारी आहात. माफ़ करा तुम्ही मला वडिलांच्या समान आहात, फक्त उत्सुकतावश विचारत आहे.”“अमेय अरे गाढवा,” एकाच वेळी प्रभाकर व कमल मोठ्याने ओरडले, “मुर्ख आहेस का? आपल्या पेक्षा मोठ्या लोकांशी नेहमी आदराने बोलावे.” “अरे प्र्भ्या मी का ब्रम्हचारी आहे हे अजून बऱ्याच जणांना माहित नाही, फक्त तुला व कमल वहिनीना माहीत असावे. असो.”

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सगळी मण्डळी जमली. आज प्रल्हादने सुरवात केली.“कालचा अमेयचा प्रश्न एकदम बरोबर होता. मी आजपर्यंत ब्रम्हचारी असल्याचे अनेकांना माहित नाही. लोकांनी काही दिवस प्रश्न विचारले नंतर तेही विचारणे सोडले, मी पण स्वत:हुन कोणाला स्पष्टीकरण देत बसलो नाही. आज मी ठरवले आहे मनमोकळे पणाने इथे जमलेल्या सर्वांना मी जिवनातील सत्य सांगणार असून त्यामुळे माझ्या मनावरचे ओजे कमी होईल असे नक्की वाटते. मी इतके वय वाढे पर्यंत का ब्रम्हचारी राहिलो याला अनेक कारण आहेत.”

“एक मिनिट, चहाचे कप तयार आहेत, आधी गरम गरम चहा घ्या, कोणाला पाणी पाहिजे असल्यास सांगा.” अमेयने विनंती केली. पाच मिनिटांच्या ब्रेक नंतर प्रल्हादने पुन्हा बोलण्यास सुरवात केली. “असे म्हणतात की “लग्न एक असा लाडू असतो जे खात नाहीत ते तर पस्तावतात पण जे खातात तेही पस्तावतात” सॉरी, वाक्य मनावर घेऊ नका, हे एक जनरल मजेशीर स्टेटमेंट आहे. मी आई वडिलांचा पहिलाच मुलगा असल्याने लाडाचा होतो. वडिल एका खाजगी कंपनीत वर्कर होते. घरची परिस्थिति सामान्यच होती. मला लहान चार बहिणी. त्यावेळी फॅमिली प्लानिंगचा आजच्या एवढा प्रसार झाला नव्हता. अपत्य असणे ही देवाची कृपाच समजली जायची. असो. मी एस.एस.सी. पर्यंत चांगल्या मार्काने पास होत होतो. चार बहिणी घरात आईला मदत करीत. घरातील आर्थिक नाजुक परिस्थिति लपून राहिली नव्हती. पुढील कॉलेजच्या शिक्षणासाठी वडिलां कड़े पैसे मागण्यांची हिम्मत नव्हती. मार्ग सापडला. मला कॉलेजने आर्थिक दुर्बळ घटकातील विद्यार्थी म्हणून फी माफ केली. तरी घरी आर्थिक मदत व्हावी म्हणून मी एका टाइपिंग इंस्टिट्यूटमधे इंस्ट्रक्टर म्हणून नोकरी स्वीकारली. सकाळी कॉलेज, दुपारी नोकरी व रात्री अभ्यास करायचो. कॉलेजचे शेवटच वर्ष. जिवनातील महत्वाच्या अनेक उलटसुलट घटना त्या एकाच वर्षात घडल्या व आश्चर्यकारकपणे जीवनाला अचानक वेगळेच वळण लागले. कंपनीत काम करीत असतांना एक दिवस वडिलांच्या डोक्यावर लोखंडी शिडी पडली व जागीच त्यांचा मृत्यु झाला. मी डिग्री परीक्षा पास झालो पण हा आनंद काही दिवसच टिकला कारण एकदिवस गैस सिलेंडर स्फोट होउन आई व लहान दोन बहिणी ८० टक्के भाजल्या. गैस सिलेंडर लिक होते पण लक्षात न आल्याने अनवधानाने लहान बहिणने चहा करायचा म्हणून शेगडी सुरु करायला गेली. अचानक आग पसरली. आई व अजून एका बहिण जवळ असून सुद्धा काहीही मदत करता आली नाही कारण तोपर्यंत त्यांना सुद्धा आगीच्या ज्वालानी वेढून टाकले होते. कॉलोनीतील सर्व लोक जमले होते. सगळेच धावपळ करीत होते. मी दोन दिवस दवाखान्यात बेशुद्ध होतो. सगळे संपले होते. मित्रांनी मात्र खुप सहकार्य केले होते ” “काका थोड़े पाणी प्या.” अजय म्हणाला. “मी सगळ्यासाठी गरम गरम चहा आणतो. सगळे खुपच अकल्पित होत. सगळ्याची उत्सुकता खुप वाढली आहे. पण आज विश्रांति घेउन उद्या सायंकाळी परत सगळी मंडळी जमू.”

मधले दोन दिवस बैठक नाही जमली. त्यात आता खुश खबर म्हणजे अमेयला भोपाळच्या कंपनीचा इंजिनियर पदासाठी मुलाखतीसाठी कॉल आला होता. पुढच्या आठवड्यात जायचे होते.सगळी मंडळी जमल्यावर अजयने ही बातमी सगळ्याना सांगितली. आता जास्त काही सांगण्या सारखे राहिले नाही प्रल्हादने शांतपणे बोलण्यास सुरवात केली. “उमा माझी लहान बहिण व मी दोघेच उरलो होतो. बहिणीच्या शिक्षणाची, लग्नाची जबाबदारी मी पार पाडली. तिने पीएचडी पूर्ण केली व एक बैंक अधिकारी नवरा मिळवला. एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये त्यांना आहेत. दिवस, वर्ष सरत गेले. लग्नाचे वय कधी उलटून गेले समजले सुद्धा नाही. आता गरज पण वाटत नाही कारण मी आता सद्गुरु साधनेत स्वत:ला वाहून घेतले असून आजन्म ब्रम्हचारी राहण्याचे ठरवले आहे. असो.”सर्व मंडळी सुन्न झाली होती. नाना व आप्पा जोडीने आज कांदे भजी खाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी दोन्ही काकू व आई किचनमधे गेल्या. सर्वच रिलैक्स बसले होते. सगळ्यांचे लक्ष वेधत नाना बोलण्यास उभे राहिले. क्षमा करा गरम गरम कांदा भजी तयार होई पर्यंत मी एक कविता सांगणार आहे. कवि कोण माहित नाही, पण प्रत्येकाला जीवनात एका जोड़ीदारची गरज कशी आवश्यक असते हे सुन्दर पणे व्यक्त केले आहे. आता कविता सांगतो:

एक राधा हवीच ना.....?

एकांतात बोलायला...

हातात हात धरायला...

काळजात सामावून...

काळजी करायला...

एक राधा हवीच ना.....?

जग हसत जेव्हा जेव्हा,

तेव्हा समजूत काढायला...

भूक नसतांनाही आग्रह करून,

हक्काने जेवण वाढायला...

एक राधा हवीच ना.....?

कुणीच नसते आपल अस ...

एकाकीपण भरायला...

नकळत ओघळनारे दोन अश्रु...

तळहातावर धरायला...

एक राधा हवीच ना.....?

श्वास होतात मंद मंद,

धडधड नुसती ऐकायला...

शांत निवांत शेवटाला,

सुरेल भैरवी गायला...

एक राधा हवीच ना.....?

आसमंत रिता होतांना...

आभाळ भरून आणायला...

“होय” मी फ़क्त तुजीच आहे,

कानांमधे म्हणायला...

एक राधा हवीच ना.....?

एक राधा हवीच ना.....?

कमल गरम गरम भजीच्या प्लेट्स टेबलावर ठेउन कविता ऐकत उभी होती. कविता संपताच सगलेच उभे राहिले कडकडून टाळया वाजतच होत्या. प्रभाकर म्हणाला या अर्थपूर्ण, सुंदर कविता ज्या अनामिक कवीला सुचली असेल त्याला आपल्या सर्व उपस्थित मित्र मण्डळी तर्फे कोटि कोटि प्रणाम. भज्यांचा आस्वाद घेत आजची बैठक संपल्याचे प्रभाकरने जाहिर केले.

रजा संपल्याने प्रभाकरने नागपुरला ड्यूटी जॉइन केली होती. अमेय मुलाखतीसाठी भोपाळला जाऊन आला. एकच जागा भरायची होती. फ़क्त चारच मुले मुलाखतीसाठी आली होती कारण केमिकल इंजीनियरिंग हा विषय डिग्रीला फारच कमी मुले निवडतात. भोपाळ हुन यायला आता अमेयला १६ दिवस होउन गेले होते. अमेय दुपारी लैपटॉपवर एक गेम खेळत होता स्क्रीनवर मेल आल्याचा मेसेज दिसत होता. त्याने गेम पोज़ केला व जीमेल ओपन करून बघितले तर त्याचे इंजिनियर पोस्टसाठी सिलेक्शन झाल्याचे भोपाळच्या कंपनीने कळवले होते. आठ दिवसात ड्यूटी जॉइन करावयाची होती. अमेयला खुप आनंद झाला. त्याने लगेच ही बातमी आईला सांगितली व पप्पांना, नागपुरला फोन करून पण सांगितली. अभिनंदन बेटा प्रभाकरने सांगितले, आपण दोघे पुण्याला असू तेव्हा आपण मित्र मण्डळीना एक मोठी पार्टी देऊ आणि तू, कमल व मी केरळला ट्रीपला जाऊ. तिथले निसर्ग सोन्दर्य खुपच विलोभनीय आहे. मजा करू का्य? आता लौकर ड्यूटी जॉइन कर. हार्ड वर्क कर. बेस्ट ऑफ़ लक.

ठरल्याप्रमाणे अमेयने भोपाळला कंपनी जॉइन केली. एक छोटीसी सेल्फ कंटेन रूम भाड्याने घेतली. कंपनीचे भोपाळला हेड ऑफिस होते. भारतात सर्व मेट्रो सिटीत कंपनीच्या शाखा होत्या. अमीतला एक स्वतंत्र केबिन देण्यात आली होती. अमेयला कम्पनी, त्याला अलौट केलेले काम, व भोपाळ सिटी पण आवडली होती तसे त्याने आपल्या मित्रांना व घरी आई-पप्पाना पण कळवले. बोलता बोलता एक वर्ष पूर्ण झाले. प्रोबेशन पीरियड संपल्याने अमेयला पहिले इन्क्रीमेंट पण मिळाले.

इकडे प्रभाकर दोन महिन्या पूर्वी नागपुर ऑफिस मधून निवृत्त होउन पुण्याला आला होता. प्रत्येक रविवारी प्रभाकर व कमल जेवणाचा डबा बरोबर घेउन पुण्याच्या जवळपास कारने आउटिंगला जात होते. अमेय चार दिवसांची रजा काढून पुण्याला आला होता. सगळ्यांना खुप बरे वाटले. मित्रांनी व कॉलोनीतील सगळ्यानी येउन अमेयचे अभिनंदन केले केले, व लौकरच आता लग्नाचे लाडू कधी देणार अशी प्रेमाने विचारणा पण केली.

चार दिवसांनी अमेय भोपाळला परत गेला. प्रल्हाद व प्रभाकर रोज सायंकाळी भेटत होते. कमल आंघोळ, देवपूजा आटोपून किचनमधे ब्रेकफास्ट बनवायला गेली. जातांना प्रभाकरला उपमा, की पोहे बनऊ विचारांयला बेडरूममधे गेली, तर प्रभाकर डोळे बंद करून बेडवर पडला होता. कमलंने विचारल्यावर खुणेने काहीही कर असे सांगितले. सकाळचे साडे आठ वाजले होते. कमल किचनमधे आली व पोहे बनऊन प्लेट घेउन हॉलमधे आली व टीव्हीवर मराठी लाईव्ह बातम्या लावल्या. प्रहकार पण बेडरूम मधून हॉलमधे आला. बातम्या ऐकता ऐकता दोघे गरम गरम पोह्याचा आस्वाद घेऊ लागली. TV वर भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी दिसत होते. आवाज लहान असल्याने काही समजत नव्हते, म्हणून प्रभाकरने उठून टी.व्ही.चा आवाज मोठा केला. सर्व भारतीय नागरिकांना मोदीजी आवाहन करत होते की कोरोना नावाच्या संसर्गजन्य रोगाचा प्रसार भारतात वेगाने होत असून लोकांनी घराच्या बाहेर पडू नये. सर्व दुकाने, बाजारपेठा अत्यावशक सेवा सोडून बंद राहणार असून लोकांनी काही नियम पाळने जरुरी आहेत असे सांगितले. जसे दोन्ही हात साबणाने वारंवार स्वच्छ धुणे, घराबाहेर जातांना मास्क वापरणे, कुठेही गर्दी न करता दोन माणसांमध्ये कमीतकमी दोन गज (अंदाजे चार हात) अंतर ठेवणे अनिवार्य केले गेले. संपूर्ण भारतात कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून कडक नियम लागु केले गेले होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी लौकर उठून प्रभाकरने टी.व्ही. वरील बातम्या लावल्या. जगभरात सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडवला होता. ही करोनाची पहिली लाट असल्याचे सांगितले जात होते. चीन देशापासुंन या संसर्गजन्य कोरोना महामारीचा उगम असल्याचे समजले. इटली, जापान, इंग्लंड, अमेरिका अशाप्रकारे अनेक देशांमधे कोरोनाचा उत्पात वाढला होता. सर्दी, ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी लक्षण सुरवातीच्या काळात दिसून येत होते. बऱ्याच दिवसांनी प्रल्हाद अचानक प्रभाकरला भेटायला आला. तिन महीने उलटले तरी सरकारने कोरोनाने एडमिट असलेल्या रुग्ण संख्या, बरे होउन घरी गेलेल्या रुग्ण संख्या, आणी मृत् रुग्ण संख्या विचारत घेउन कर्फु अजून १५ दिवस वाढवला होता. प्रल्हादने हातात ग्लोज घातले होते. तोंडावर मास्क होता. आत आल्या बरोबर प्रभाकरने प्रल्हादच्या पूर्ण अंगावर सैनीट्याट्यझरचा स्प्रे केला. लाकडी खुर्ची दरवाज्या जवळ ओढून घेउन त्यावर प्रल्हाद बसला व बोलायला सुरवात केली. प्र्भ्या मी आलो आहे तो तुम्ही दोघांनी प्रकृतीची काळजी काटेकोरपणे घ्यावी हे सांगण्यासाठी. अमेय भोपाळला, इथे तुम्ही दोघे एकटेच. तु इन्सुलिन डिपेंडेंट, थोडासा हट्टी पण आहेस. मला तुमची दोघांची काळजी वाटते. कोरोनावर अजून औषध तर नाहीच पण भारतातील साइंटिस्ट यांना यावर लस शोधण्यात यश मिळाले आहे. तरी पण लसिचे निर्धारित डोस घेतले म्हणजे आता कोरोना होणार नाही, कुठलेही बंधने पाळण्याची गरज नाही, म्हणजे मास्क वापरणे, नियमित साबणाने हात धुणे, चार हात अंतर ठेवणे, हा भ्रम असून सर्व बंधने लसी नंतरही नियमित पुढे पण कठोरपणे पाळणे अत्यावशक आहे. ६० प्लस वय, त्यात मधुमेह, हाई बीपी, सारखे क्रोनिक आजारपण असल्यास कोरोनाचा प्रादुरभाव त्वरित होऊ शकतो. तुम्हाला काहीही कधीही गरज वाटल्यास मला ताबडतोब फोन करा. ही सुचना वजा हुकुम अमेयने तुम्हाला दोघांना देण्यास मला सांगितले आहे असे सांगुन प्रल्हादने निरोप घेतला.

सरकारच्या कडक नियमानुसार सर्व व्यवहार बंद होते, सर्व सरकारी ऑफिस, खाजगी कारखाने, सर्व धार्मिक स्थळ, मुलांचे कॉलेज, स्कूल बंद होते. मुंबईत लोकल, बस, टैक्सी, प्रवास बंद होता. आता कोरोना महामारी सुरु होउन साधारण १० महिन्याच्या वर कालावधी होउन गेला होता. परराज्यातून आलेले काम करून पोट भरणारे अनेक कुशल, अकुशल कामगार आपापल्या राज्यात परत निघून गेले होते. प्रभाकऱला अस्वस्थ वाटत होते. वरीलप्रमाणे असंख्य विचारांनी डोक्यात गर्दी केली होती. अमितची काळजी वाटत होती कारण तो एकटाच भोपाळला राहत होता. मध्यप्रदेशमधे पण कोरोनाचा संसर्ग वाढला होता. अमितला पुण्याच्या जवळपास नोकरी शोधुन भोपाळहुन परत बोलावण्याचा विचार अजितच्या मनात घोळत होता. तसे त्याने मनातले विचार कमलला बोलून पण दाखवले होते. पण भविषात काय लिहिले आहे हे याची नुसती कल्पना पण माणूस करू शकत नाही, एक प्रकारे हे चांगलेच आहे, कारण भविषातिल दु:खांची नुसती चाहुल लागली तरी माणसाचा जगण्यातील रस/आनंद लोप पावेल.

भोपाळला अमित अगदी आनंदात होता. बॉस त्याच्या कामावर खुश होता. ऑफिस मधील सहकारी स्टाफ कोओपेरटीव होता. अमित केमिकल इंजीनियर होता आणि त्याची कंपनी औषधांची निर्मिती करणारी भारतातील नामवंत कम्पनी होती. कंपनीचे बॉस श्री. रतन शहा यांनी अमितला तातडीने केबिनमधे बोलवल होत. अमित टेबलावरील सर काम निपटून लगेच शहा साहेबांच्या केबिनमधे गेला. शहा साहेब अमितची वाटच पहात होते. त्यांनी केन्द्रीय आरोग्य मंत्रालयचा आलेला मेल त्याच्या समोर ठेवला. भारतात सर्व औषध निर्मिती करणार्‍या कंपन्यांच्या प्रतिनिधींची एक सिक्रेट कोंफिरन्स तातडीने दिल्लीला बोलावली होती. कंपनीने अमितची ही कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी निवड केली होती. कॉन्फरन्स तिन दिवसांनी दिल्लीला होती. वेळ कमी होता. नाही म्हणून चालणार नव्हते. अमितने पी.ए. ला तिन दिवसानंतरचे प्लेनचे बुकिंग करण्यास सांगितले. रूमवर आल्यावर त्याने तातडीने प्रभाकरला मोबाईलवर रिंग दिली पण रेंज नव्हती. रात्री १०.३० वाजता प्रभाकरचा फोन अमितला आला. प्रल्हादला थोड़े अस्वस्थ वाटत असल्याने प्रभाकर त्याला घेउन दवाखान्यात गेला होता. अमितचा मिस कॉल बघून प्रभाकरने आता फोन केला होता. अमितने आई, बाबांच्या प्रकृतीची चौकशी केली. नंतर अमितने सांगितले की सध्या सगळीकडेच कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने मी वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन निवडून पुण्याला येणार होतो व घरुनच ऑफिसचे काम करणार होतो. ऑफिसने परवानगी पण दिली होती. पण अचानक ऑफिसने त्याची दिल्लीला कॉन्फरन्सला जाण्यासाठी निवड केल्यामुळे दिल्लीहून आल्यानंतर पुण्याला येणार असल्याचे त्याने प्रभाकरला सांगितले. तसेच आई/बाबांना कोरोना बाबतचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यास सांगितले. आवश्यक कारणा शिवाय घराबाहेर न पडण्याचे बजाऊन सांगितले.

राजा भोज एअरपोर्ट, गांधीनगर भोपाळ येथून इंदिरा गाँधी इंटरनेशनल एअरपोर्ट न्यू-दिल्लीला जाण्यासाठी अमितचा प्लेनमधे बसला. फ़क्त सिलेक्टेड निमंत्रितानसाठी या प्लेनची अरेंजमेंट मंत्रालयाने केली होती. सामान्य नागरिकांना एका स्टेट मधून दुसर्‍या स्टेटमधे प्रवेश करण्यास बंदी होती. इंदिरा गाँधी इंटरनेशनल एअरपोर्ट न्यू-दिल्लीला पोचल्यावर अमितने लगेज मधून सूटकेस कलेक्ट केली.टॅक्सीस्टँडच्या दिशेने तो निघाला. कोरोनाच्या कडक निरबंधामुळे एअरपोर्टवर फारच कमी गर्दी होती. दोन कमांडो अमितच्या नावाचा बोर्ड घेउन एक्जिट गेट उभे होते. अमित जवळ आल्या बरोबर त्यानी त्याचे आय कार्ड चेक केले व त्याची सूटकेस उचलून त्यांच्या बरोबर येण्यास सांगितले. मंत्रालयातील VIP गेस्टहाउसमधे त्याची राहण्याची सोय करण्यात आली होती. गेस्टहाउसमधे अनेक सेल्फ कंटेन रूम्स होत्या. देशभरातुन कॉन्फरन्ससाठी आलेल्या सर्व प्रतिनिधीनची राहण्याची सोय इथे केलेली दिसत होती. कोणीही एकमेकानां ओळख़त नव्हते.

सकाळी शार्प ११ वाजता कॉन्फरन्स एड्रेस करण्यासाठी माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री, केंद्रीय गृहराज्य मंत्री यांनी हॉलमधे प्रवेश केला. दुपारी १.३० वाजता लंचची व्यवस्था होती, ४ वाजता चहा/कॉफ़ी व बिस्किट्सची अरेंजमेंट होती. ६ वाजता कॉन्फरन्स संपली. थोडक्यात पंतप्रधानच्या आदेशनुसार कोरोना महामारीच्या संधर्भात ही कॉन्फरन्स औषधि निर्माण करणार्‍या सरकारी/निम् -सरकारी/खाजगी मैनेजमेंटचे प्रतिनिधि आणी अत्यन्त आनुभवि साइंटिस्ट यांना निमंत्रित केले होते. यात पिपीई किटचे, हैण्ड सानिटाययझरचे, मास्क्स आणी रेस्पिरेटर्स, ओक्सिजन, बेड इत्यादीच्या चे उत्पादन व निर्मिती व योग्य डिस्ट्रीब्यूशनच्या जबाबदारीची जाणीव सर्वांना करून दिली गेली. खास करून कोविड-१९ हा जागतिक स्तरावरील संसर्गजन्य रोग आहे, सगळ्यानाच नवीन. याच्या लस निर्मितीत काही भारतीय साइंटिस्ट आधीपासून काम करीत आहेत. या सर्व परिस्थितिसाठी इंटरनेशनल कॉम्पिटिशन आहे. खास करून चीन देशाकडून हे सर्व प्रयत्न अयशस्वी होण्यासाठी सिक्रेट एजेंट्स जगभर एक्टिव्हेट होत असल्याचे एनआयए / रॉ चे गुप्त संकेत आहेत. या पार्षभूमीवर सर्वांनी कशी सावधगिरी बाळगावी यावर सुचना देण्यात आल्या.

या आधी पण अमित कंपनीच्या कामासाठी दिल्लीला अनेक वेळा आला होता. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून दिल्ली सरकारने पब्लिकवर कडक बंधने टाकले होते. बिनाकामाचे घराबाहेर पडल्यावर बंदी होती. रात्री डिनर नंतर अमितला खुप कंटाळ आल्यामुळे थोड़े फिरून यावे/ शतपावली घालावी या उद्देशाने तो गेस्टहाउसच्या एक्जिट गेटवर आला. त्याच्या अगोदर दोन अजून अपरिचित व्यक्ति गेटवर गार्डला बाहेर जाण्यासाठी चौकशी करत होत्या. त्यांना पान खाण्याची तलफ आली होती, विकत घेण्यासाठी जवळच्या स्टॉलवर जायचे होते. अमित गेटवर पोचल्यावर गार्डने जास्त लांब न जाण्याच्या अटीवर जाऊ दिले. चालत चालत जातांना ओळख जाली. त्यापैकी एक श्री. आर.के.स्वामी होते ते पुण्याच्या एका नावाजलेल्या कोरोना लस निर्मिती कंपनीचे मैनेजिंग डायरेक्टर होते. दुसरे श्री. परांजपे पण बंगलोरच्या एका PPE किट बनवण्यार्‍या कंपनीचे ओनर होते. १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या स्टॉलवरून वरून मसाला पान घेउन तिघे पण परत फिरले. या दरम्यान तिघांच्या ओळखी होउन विजिटिंग कार्ड एक्सचेंज केले गेले.

तेव्हड्यात एक मोटरसायकल आडवी आल्याने तिघांना थांबावे लागले. अन काय होत आहे हे समजायच्या आधीच मागुन एक क्रीम कलरची इनोवा कार आली, मागचे दोन्ही दरवाजे उघडले गेले तोंड मफलरने बांधलेले चार गुंड गाडीतून उतरले आणी या तिघांच्या मुसक्या बांधून कारमधे कोंबण्यात आले. गूंगीचे औषध टाकलेल्या रुमालाने तोंडे बांधली गेली. डोळ्यांवर पट्टी बांधली गेली, अन कार सुसाट वेगाने निघाली. साधारण तिन तासाच्या प्रवासानंतर एका सुनसान जागेवर असलेल्या बंगल्याच्या आवारात कार थांबली. तिघांना उचलून बंगल्यातील हॉलमधे फेकले गेले. किती तरी वेळ निघून गेला होता. परांजपे यांनी डोळे किलकिले करून मनगटावरील घड्याळ बघितले, हॉलमधे अंधार होता पण घड्याळत रेडियम असल्याने त्याना पहाटेचे ३ वाजल्याचे समजले. स्वामी व अमेय अजून शुद्धीवर आले नव्हते. दोन्ही हात व पाय बांधल्यामुळे हालचाल करता येत नव्हती.

सकाळचे आठ वाजले होते. तिघांना आता जाग आली होती. खुप प्रयत्न करून सुद्धा हालचाल करता येत नव्हती. इतक्यात हॉलचा दरवाजा उघडला गेला, प्रकाश हॉलमधे पसरला. मफलरने तोंड बांधलेले चार कमांडो आत आले, त्यांनी बरोबर चहा, व ब्रेकफास्ट तिघांसाठी आणला होता. लगेचच त्यांच्या मागे पूर्ण पांढरे कपड़े घातलेले व तोंड पांढर्‍या रुमालाने बांधलेले दोन व्यक्ति आत आले. त्यानी दिलेल्या आर्डर प्रमाने तिघांचे हात, पाय, तोंड मोकळे करण्यात आले. कमांडोज त्यांना बॉस म्हणून संभोधत होते. ते दोघे इंग्लिश व मोडक्या तोडक्या हिंदीमधे बोलत होते. सुटका होताच तिघांनी एकमेकाना इशाराकरत हातात दिलेल्या चहा/ब्रेकफास्टच्या प्लेट्स आलेल्या कमांडोजच्या दिशेने भिरकावून दिल्या आणी बेसावध असलेल्या कमांडोजवर हल्ला चढवला. पण कोणत्याही उद्भवणार्‍या प्रसंगासाठी तरबेज असलेल्या कमांडोजवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट या प्रकाराने भडकून आलेल्या त्या दोन बॉसने कमांडोज ला आर्डर दिली की त्या तिघांना जोपर्यंत त्यांची मस्ती जीरत नाही तोपर्यंत बेसमेंटमधे नेउन कपड़े काढून तिथे असलेल्या बर्फाच्या लादीवर बांधून ठेवा. पुढचे २४ तास त्यांचे खुप हाल करण्यात आले. परांजपे व अमित यांच्या खिच्यात सापडलेल्या कागदपत्र वरून मिळालेल्या माहितीचा त्या दोन बॉस ला आवशक माहिती मिळाली नसल्याचे जाणवत होते.

इकडे गवर्नमेंट गेस्ट हाउसमधे स्वामी, परांजपे व अमित यांचे अपहरणची बातमी वार्‍यासारखी पसरली होती. पीएमओ ऑफिसमधे सीबीआय, एनआयए व रॉ या गुप्त संघटनांची अर्जेंट मीटिंग बोलावली होती. भारताचे संरक्षण मंत्री स्वतः हजर होते. पंतप्रधान प्रदेशात होते, तरी त्यांना दिल्लीत घडणार्‍या घटनांची माहिती प्रत्येक तासाला अवगत करण्यात येत होती. भारताच्या दृष्टीने अत्यंत कोन्फिडेंटियाल असलेल्या या मीटिंगला बोलवलेल्या निमंत्रितामधून तिघांचे अपहरण केले गेले होते. यात इंटरनेशनल दहशतवाद्यांचे भारताच्या शत्रुंकडून वापर करण्यात आल्याचा एनआयए ने निष्कर्ष काढला होता. विशेष म्हणजे सीबीआय, एनआयए व रॉ या तिन्ही भारतीय गुप्तहेर संघटनांची एकाच केसमधे एकत्र काम करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. गवर्नमेंट गेस्ट हाउस मधील गेट इंचार्ज रामसिंगने साधारण एक तास तिघांची परत येण्याची वाट बघितली होती. त्यानंतर त्याने वरील अधिकार्यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. तातडीने वरून चक्र फिरली. दहाव्या मिनिटात कारचा ताफाच गेस्टहाउस सभोवती जमा होता. गेट इंचार्ज कडून अधिकार्यांनी बाहेर गेलेल्या तिन्ही निमंत्रितांची माहिती कलेक्ट केली. गेस्टहाउसच्या गेटपासुन स्टाल पर्यन्त जिथे जिथे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्यांचे २४ तासाचे रेकॉर्डेड फुटेज काढून तपासणीसाठी सीबीआय ऑफिसला तातडीने पाठवण्यात आले. तिघांपैकी श्री. स्वामी सरकारच्या आरोग्य विभागाच्या सिक्रेट मिशनचे इंचार्ज होते. अमित शेजवळ, व परांजपे यांना मिस-आयडेनटिटी म्हणजे ओळख चुकल्याने अपहरण करण्यात आले असल्याचे रॉ ने निष्कर्ष काडून पंतप्रधान कार्यालयाला पाठवला होता. तिघांची शोधून सुटका करण्याचे सर्व प्रयत्न युद्धपातळीवर तातडीचे सुरु केले होते. एका रोडच्या टर्निंगवर असलेल्या बंगल्यावरील सीसीटीव्ही च्या फुटेजमधे एका क्रीम कलरच्या इन्नोवा कारमधे काही लोकांना काही गुंड कारमधे जबरदस्तीने कोम्बित असल्याचा सिन कैद झाला होता. कार स्पीडने टर्न करून जातांना नंबर प्लेट शेवटचे दोन आकडे xxxxxx79 येवढेच स्पस्ट दिसत होते. या माहितीच्या आधारे पुढील तपास वेगाने पण गुप्तपणे चालू होता.

तिघांच्याही खिशातिल सर्व वस्तु काडून घेतल्या होत्या. त्यात मोबाइल, आय.कार्ड, व्हिजिटिंग कार्डस, हात रुमाल, पैसे समाविष्ट होते. कोणाशी संपर्क करण्यास ते असमर्थ होते. तिघांमधे अमित तरुण होता. अनुभव कमी असला तरी बुद्धीने शार्प होता. ती रात्र कशीबशी अस्वव्स्थपणे जागुन काढावी लागली. पहाटे पाचच्या सुमारास साधारणपणे ८ ते १० लोक त्यांना कोंडून ठेवले होते त्या बंगल्यात आले. तिघांनाही वेगवेगळ्या रूममधे ठेवण्यात आले, प्रचंड मारहाण करण्यास सुरवात केली. अमितला काही बोलायच्या आधीच लाथ्याबुक्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली गेली. अमितने खाली फरशीवर पाळथे पडून दोन्ही हात डोक्याच्या मागे घेतले, त्या भयानक मारहाण पासून चेहरा सुरक्षित ठेवण्यात त्याला थोड़े यश मिळाले. कमर व पाठीवर लाठ्या बुक्यांचा पाउस पडत होता. ते बिचारे बॉसची आर्डर फॉलो करत होते, कारण त्यांनापण आपण यांना का मारतो आहे हे माहित नव्हते. थोड्याच वेळात अमित बेशुद्ध होउन निपचित पडला होता. रात्रि कधीतरी अमितला जाग आली, अंग खुप ठनकत होत, , सुजव्या डोळ्याला सूज आली होती , चक्कर येत होती कारण पोटात काही अन्न पण नव्हते, तेव्हड्यात काहीतरी खुडबुड आवाज यायला लागला होता. अत्यंत वेदना सहन करीत अमित बंद दरवाज्या जवळ सरपटत पोहचला. बाहेरून कोणीतरी दरवाज्याच्या खालच्या फटीतुन एक मोठा स्क्रूड्रायवर आत ढकलण्याचा प्रयत्न करीत होते. अमितने सर्व उरलीसुरली शक्ति पणाला लाऊन स्क्रूड्रायवर आत ओढून घेण्यात यश मिळवले. बाहेर असलेल्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे अमितने दरवाज्याला आतून असलेल्या तिन्ही बिज्यागिरिंचे स्क्रू काढायला सुरवात केली. बाहेरच्या व्यक्तीने जोर जोरात लाथा मारून दरवाज्याची एक फळी तोडली. अमितच्या तोंडावर हात ठेउन न बोलण्याचा इशारा केला. बाहेरच्या हॉलमधे चारही गुंड दारूच्या नशेत अस्ताव्यस्त पडले होते. आलेल्या अपरिचित माणसाने सांगितले की तो रॉ चा एजेंट असून सकाळी त्यांना चहा व ब्रेकफास्ट घेउन आला होता. तुम्ही तिघे गवर्नमेंट गेस्टहाउस मधून बाहेर पडल्या पासून तुमच्या मागावर मी होतो. तेव्हापासून प्रत्येक मिनिटांचे रिपोर्टिंग होम मिनिस्टर ओफिसला देत आहे.

बाहेरच्या हॉलमधे पडलेले गुंड यूनिफार्ममधे होते. अमितने त्या अनोळखी मदत करणार्‍या व्यक्तिस त्याचे नाव विचारले. पण आश्चर्य म्हणजे त्याने सांगितले की आम्हाला नाव नसते. आम्हाला कोड नंबर वरून ओळखले जाते. वरून आलेली आर्डर फॉलो करणे व प्रत्येक मिनिटांचे रिपोर्टिंग करणे हे महत्वाचे काम. हॉल मधील दोन गुंडाना ओढून आतल्या खोलीत आणले गेले. त्यांचे यूनिफार्म काढून अमित व त्या अनोळखी व्यक्तीने घातले, थोडे घट्ट होत होते पण ईलाज नव्हता व त्यांच्या हातातील एके47 रायफली पण हस्तगत केल्या. हॉल मधील एका गुन्ड़ाने अचानक येउन अमितच्या उजव्या खांद्यावर लोखंडी सळीने जोरदार प्रहार केला. सावध होउन अमितने खांद्यावरच्या जखमें कड़े दुर्लक्ष करून त्याच्यावर अंन्दाधुंद फायरिंग करून त्याला ख़तम केले. तोपर्यंत अनोळखी व्यक्तिने अजून एका बाथरूममधे लपलेल्या गुंडाला शूट केले होते. सगळीकडे शांतता पसरली होती. आता त्यांनी स्वामी व परांजपे यांचा बेसमेंट मधील आतल्या रूम्समधे शोध घेण्यास सुरवात केली. एका रूममधे परांजपे खुर्चीला बांधलेल्या अवस्थेत दिसले. ते बेशुद्ध होते. उरलेल्या सर्व रूम्स शोधून सुद्धा स्वामी कुठेच सापडले नाहीत. अमितला स्वामींची चिंता वाटायला लागली. अनोळखी व्यक्ती थोड़े लांब जाऊन मोबाइलवरून बोलायला लागली. आर्धा तास बोलणे चालू होते. अमितच्या जवळ येउन त्या व्यक्तीने सांगितले की आता घाबरन्याची काहीच गरज नाही. या बंगल्याला लश्करी जवानांनी चारी बाजूने घेरलेले आहे. श्री,स्वामी, यांची डेड बॉडी पुणे एअरपोर्टच्या टॉयलेटमधे सीबीआय अधिकारी श्री.गायकवाड याना सापडली आहे, तेव्हा ते पुणे येथून दिल्लीला कॉन्फरंस अटेंड करायला निघाले होते. एका दहशतवादी संघटनेने त्यांच्या अपहरणाची खुनाची जबाबदारी चेतली असून, दिल्लीला कॉन्फरंसला जाण्या आधी स्वामी कडून कोरोना लस शोधकार्य विषयी गुप्त माहिती दहशतवादी संघटनेला पाहिजे होती. पण श्री, स्वामी यांनी काहीही गुप्त माहिती त्यांना दिली नाही म्हणून त्यांना शूट केले गेले. तुमच्या बरोबर असलेला इसम हा ओरिजिनल स्वामी नव्हता. त्याचे खरे नाव अब्द्दुल होते. तुम्हाला व परांजपे यांना चुकीची ओळखीमुळे उचलण्यात आले होते. म्हणून त्यांचे दोन बॉस व अब्बुल दिल्लीच्या बाहेर जात असतांना कार सह लोकल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इकडे पुण्याला प्रभाकर व कमल फारच काळजित होते. दिल्लीला कॉन्फरंसला निघण्या आधी अमितशी जेव्हडे बोलणे झाले होते तेव्ह्डेच त्यानंतर काहीही संपर्क होऊ शकला नव्हता. दोघांनी अमितच्या मोबाइलवर अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा संपर्क झाला नव्हता. अखेर प्रभाकर पुण्याच्या पोलिस कमीशनर श्री. श्रीकांत खानविलकर यांना प्रत्यक्ष भेटण्यास गेले होते. त्यांनी प्रभाकरला अमित भोपालहुन अब्स्कोंडिंग असल्याचे रीतसर एफआयआर दाखल करायला लावला होता. नंतर त्यांनी भोपालच्या अमित काम करीत असलेल्या कंपनीत एम.डी ला फोन करून दिल्लीच्या कॉन्फरन्सची पूर्ण माहिती घेतली होती. अजितने दिल्लीला प्रत्यक्ष जाऊन अमितचा शोध करण्याची परवानगी देण्यासाठी पोलिस कमीशनर श्री.खानविलकर साहेबांना विनंती केली. अशी परवानगी सहसा कोणालाच मिळत नसते. पण अजित स्वतः कस्टम कमिशनर होते, शिवाय एन्फोर्समेंट डायरेक्टर या केन्द्रीय खात्यात अनेक वेळा डेपुटेशनवर काम केले होते. त्यामुळे त्यांच्या केन्द्रीय गृहखात्यात उच्च पातळीवर ओळखी होत्या. याची जाणीव श्री. खानविलकर साहेबांना होती. तरीपण कोरोना चे सर्व नियम पाळण्याअटीवर प्रभाकरला पत्नी बरोबर पोलिस संरक्षणात दिल्लीला जाण्याची परवानगी दिली. तशी लेखी आर्डर त्यांना देऊन त्याची कॉपी सीबीआय ऑफिस दिल्लीला फोनवर बोलण्याचा रेफेरेंस देऊन मेलने पाठउन दिली होती.

परांजपे यांना दिल्लीतील कस्तूरबा होस्पिटल मधील आयसीयू मधे पोलिस संरक्षणात एडमिट केले होते. डोक्याला मार लागल्याने अजूनही ते बेशुद्ध होते. स्पेशल वार्डमधे अमित एडमिट होता. अमित तरुण असल्याने उजव्या हातचे फ्रैक्चर सोडून बाकी मुका मार वगैरेतुन लौकर रिकव्हर होत होता. केन्द्रीय संरक्षण मंत्री मोठ्या ताफ्या सहित परांजपे व अमितला प्रत्यक्ष भेटण्यास व त्यांचे कौतुक करण्यास येउन गेले. परांजपे व अमित दोघांच्या फॅमिलीला दिल्लीला येण्यासाठी मंत्रालयातुन मेसेज पाठवले गेले. अमितला त्याने ज्या धाडसाने या अपहरण प्रकरणात दहशतवादी गुंडाना तोंड देत त्यांच्यावर मात केली होती ते कंसीडर करून, केन्द्रीय गृहमंत्रालया कडून त्याला सीबीआईमधे अधिकारी म्हणून प्रोबेशन वर नेमणुकची आर्डर निघाली होती.

सकाळचे सात वाजले होते. इंजेक्शन देण्यासाठी नर्सने अमितला उठवले. अमित फ्रेश होउन बेडवर बसला होता, इतक्यात समोरून आई पप्पांना येत असलेले बघून आश्चर्य वाटले व खुप आनंदित झाला. अमित व्हिआयपी पेशंट असल्याने नर्सने लगेच दोन खुर्च्या आणून दिल्या. अजित कमल बरोबर इथपर्यंत कसा पोहचला हे सविस्तर समजल्यावर अमितचा ऊर भरून आला. आपल्या काळजी पोटी आई पप्पांना किती त्रास सहन केला होता. दिल्लीत पोचल्यावर त्यांची रहायची उत्तम व्यवस्था सरकार तर्फे करण्यात आली होती. प्रभाकर व कमलला एक आठवडा दिल्लीत रहावे लागले. अमितची प्रकृति सुधारली होती. दोन दिवसात डिस्चार्ज मिळणार होता. सरकारकडून तिघांचे प्लेनचे पुण्याला जाण्यासाठी अडवांस टिकिट काढून देण्यात आली होती. परांजपे यांना डिस्चार्ज मिळणार नव्हता, पण त्यांची प्रकृति सुधारत होती. त्यांची मुलगी व जावई सतत त्यांच्या जवळ बसून त्यांची सेवा करीत होते. अमितची हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ, नर्सेस, वार्ड बॉय, डॉक्टर्स यांनी मनापासून सेवा केली होती. दिल्लीहुन निघण्याआधी अमितने प्रत्येकाला भेटून वैयक्तिक आभार मानले होते. पुण्याच्या एअरपोर्टवर प्लेन लैंडिंग होताच लगेज कलेक्ट करून प्रभाकर , कमल,व अमित लगबगीने एक्सिस्टच्या दिशेने निघाले. बघतात तर का्य समोर प्रल्हाद, निवृत्त तहसीलदार नाना, माजी नगरसेवक व सध्या राजकारणातुन निवृत्त झालेले आप्पा, आणी अमितच्या सहा मित्रांचा ग्रुप हातात सुन्दर फुलांचे बुके घेउन तिघांचे स्वागत करायला हजर होते. सगळे आनंदात होते.

आता एक महिना होउन गेला होता तरी, अपहरचा कटु अनुभवाची आठवण आली तरी अमितच्या अंगावर काटे उभे रहायचे. कोरोनाचे पेशेंट व डेथ रेट कमी होत असले तरी तिसर्‍या लाटेची शक्यता जास्त होती, ज्यात लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता होती. लॉकडाउनमुळे कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होतांना दिसत असला तरी दुकान, सरकारी, खाजगी, ऑफिस, बस, लोकल, टैक्सी,रिक्षा प्रवास, स्कूल, कॉलेज, परीक्षा, बंद असल्याचा कालावधिमधे निरंतर वाढ होत असल्याने सगळे अर्थचक्र थांबले होते. ते पूर्ववत करावे अशी, सरकारची, समाजाची गरज होती. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून परत एकदा पुर्विसारखी गप्पांची मैफिल प्रभाकरने सर्वांच्या सहमतीने गुरवारी संध्याकाळी सहा वाजता बोलावली.

प्रल्हादने प्रभाकरशी बोलून कम्युनिटी हॉल निवडला, कारण अमितचे सीबीआईमधे नेमणूक झाल्या बद्दल त्याच्या मित्रांनी त्याचे अभिनंदन करायचे ठरवले होते. अमितचे मित्र गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजल्या पासून हॉलवर हजर होते. सगल्यांनी तोंडावर मास्क लावला होता. मास्क शिवाय प्रवेश नाही असे स्टीकर चिटकवले गेले. पाच फुटाचे अंतर ठेउन खुर्चा ठेवण्यात आल्या. दरवाज्या जवळ एक टेबल ठेउन तिथे हैण्ड सेनीटायजर स्प्रे ठेवला होता. जवळच्या वाशबेसिन जवळ डेटोल हैण्डवाश स्प्रे ठेवला होता. प्रभाकर आणी प्रल्हाद बरोबरच आले. अमितच्या मित्रांनी केलेली जय्यत तयारी व उत्साह कौतुकास्पद होता. साधारण ६.३० वाजेपर्यंत बहुतेक निमंत्रित जमले होते.

प्रभाकरने बोलायला सुरवात केली. “ जमलेल्या सर्वांचे आभार मानणे अगत्याचे आहे. आज आपण बर्‍याच कालावधी नंतर जमत आहोत. कुठल्याही फ़ोर्मुलिटीज नाहीत. ज्याला बोलावस वाटेल त्याने मास्क काढून खुर्चीवर बसूनच बोलावे, उभे राहून बोलायची गरज नाही. सुरवात आपण आपल्या कालोनीतिल कोरोनामुळे निघन पावलेल्या व्यक्तिना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली देऊ. स्थानापन्न होउन आप्पानी बोलण्यास सुरवात केली. अमितचे सीबीआईमधे नेमणूकी बद्दल अभिनंदन. त्याच्या मित्रांनी आणलेली भेट वस्तु त्याला देण्यात यावी. टाळ्याच्या कडकडात एक बंद पाकिट अमितला देण्यात आले. अमितने पाकिट घेउन हात जोडून सर्वांचे आभार मानले. अमित म्हणाला सर्व मित्रांचे मनापासून आभार. मला मित्रांनी विचारले होते की कुठली वस्तु तुला भेट म्हणून पाहिजे सांग, कारण सीबीआईमधे सर्व्हिस करून तू एकप्रकारे देशसेवाच करणार आहेस, हे अनेक तरुणांसाठी उत्तम उदाहरण असेल , आणी हेच आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यावर त्यांचा मान ठेउन मी एक सल्ला दिला जो सर्वांनी मजूर केला. तो म्हणजे सर्व मित्रांनी ५०,००० रूपये मला देण्यासाठी जमवले होते त्यात मी १०,००० रुपये टाकले आणी पप्पा आणी प्रल्हाद काका यांनी मिळून १०,००० रुपये टाकले टोटल ७०,००० जमले या अमाउंटचा आम्ही डिमांड ड्राफ्ट काढून जे बालकांचे आई वडिल दोघेही कोरोना मुळे मृत्यु होउन अनाथ झाले असतील त्यांच्या मदतीसाठी देत आहोत. या निर्णयाचे सर्वांनी उभे राहून टाळयाच्या कड़कडात स्वागत केले.

प्रल्हाद काकाने बोलावयास सुरवात केली. या कोरोना महामारीच्या काळात लोकांना खुप वाईट अनुभव पण आले. वैद्यकीय क्षेत्रातील लोक समाजासाठी वरदानच असतात. अनेक लोकांना मृत्यु पासून वाचवतात. पण सर्वच असे नसतात हे या काळात समाजाच्या लक्षात आले. काही घटना सांगतो. बेड उपलब्ध असून नाही सांगणे, एमआरआय सारख्या टेस्टची गरज नसतांना करायला सांगणे, लाखोंची बिल क्लेम करणे, नकली इंजेक्शन विकणे इंजेक्शनची व लसिची काळबाजारी करणे. मृताच्या टालूवरील लोणी खाणारे लोक समाजाने बघून मान खाली घातली. अनेकांना मृत देह ताब्यात मिळाले नाही, अनेकांनी मृत देह देत असून ताब्यात घेतले नाहीत. अनेकांचे मृत देह उत्तरप्रदेशात नदीत वाहताना सापडले. असो.

प्रभाकरने बोलण्यास सुरवात केली,” आपल्या आजच्या विषयाच्या ओघात काही जरुरी माहिती आजच्या तरुणासाठी मार्गदर्शन म्हणून सांगणार आहे. कृपया लक्ष दया. सरकारला लोक कल्याणकारी राज्य चालवतांना अनेक प्रकारचे गुन्हेगारी करणारे, दहशतवादी संघटनांना, यांना तोंड द्यावे लागते. त्या त्या खात्याचे संक्षिप्त नाव आपल्याला माहित असते पण अश्या खात्यात जॉब मिळणयासाठी आजचे तरुण माहिती अभावी कमी प्रयत्न करतांना दिसतात. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून माहिती सांगत आहे. यात दोन प्रकार असतात राज्य पातळीवरील, व केन्द्रीय पातळीवरील गुप्त गुन्हे शोधक खाती.

केन्द्रीय पातळीवर : (१ ) एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, केंद्र सरकारचे डिपार्टमेंट असून, गुप्त स्वरूपाच्या माहिती वरून ऑफिसियल धाडी टाकुन, आर्थिक गुन्हे करणार्यांना पकडतात व पुरावे तपासून गुन्हे दाखल करतात. (2) सेंट्रल ब्यूरो ऑफ़ इन्वेस्टीगेशन गुन्ह्याचा गुप्तपणे तपास करून गुन्हे दाखल करणारी एजेंसी. (३) नेशनल इन्वेस्टीगेशन एजेंसी. ही केन्द्रीय काउंटर टेररिज्म, अंतराष्ट्रीय दहशदवाद, कायदाची आंबलबजावणी करणारी एजेंसी आहे. (४) रिसर्च एंड एनालिसिस विंग ही एजेंसी शत्रूवर गुप्तपणे लक्ष ठेउन त्याची माहिती सरकारला देत असते आणी पुरावे मिळताच गुन्हे दाखल करते ( ५ ) सेंट्रल इकोनॉमिक इंटेलिजेंस ब्यूरो. ही एजेंसी आर्थिक गुन्हेगारांच्या मागावर असते. पुरावे मिळताच गुन्हे दाखल करते.

राज्य पातळीवर (१) क्रिमिनल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट. ही एजेंसी संशयास्पद मृत्यु, दरोडे, जातीय दंगे, आर्थिक व सर्व प्रकारची फसवणूक याचा शोध घेउन गुन्हे दाखल करते. (२) एंटी टेररिज्म स्क्वाड. एक प्रकारची विशेष पोलिस दल एजेंसी आहे. गुप्तपणे आतंकवादी हमले, त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेउन त्यांना तोंड देण्याच्या योजना बनवते.व पुरावे मिळताच गुन्हे दाखल करते. (३) नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो प्रत्येक राज्यात शाखा असून केंद्र सरकारचा एडमिनिस्ट्रेटिव कंट्रोल असतो. आरोग्य आणी कुटुंबकल्याण मंत्रालय इतर संबधित विभाग, संस्था, यांनी अमली पदार्थाच्या गैरवापराशी केलेल्या कृतीचे समन्वय करुन पुरावे मिळऊन गुन्हे दाखल करते. केंद्र व राज्य सरकार मध्ये अजून बरेच डिपार्टमेंट असून त्याची माहिती इथे सविस्तर सांगणे शक्य नाही. लाखो रुपयांचे डोनेशन भरून डॉक्टर, इंजिनियर होउन पैसे कमवण्या पेक्षा आता सांगितलेल्या डिपार्टमेंटमधे जॉब केल्यास देशसेवा करण्याची संघी मिळेल.” प्रल्हादकाकाने प्रभाकरला इशारा करून थांबवले व पुढे बोलण्यास सुरवात केली.

“ मित्रांनो आजचा आपला कार्यक्रम इथेच थांबवावा लागत आहे याबद्दल क्षमस्व. या कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी दिली होती याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला याबद्दल क्षमा मागतो. तसेच आपण सर्व आपला मौल्यवान वेळ देऊन आलात त्याबद्दल माझ्या तर्फे व शेजवळ परिवारा तर्फे मनापासून आभार व नेहमीप्रमाणे करोनाचे निर्बंध असल्याने चहाकॉफ़ी किंवा कांदाभजी देऊ न शकल्या बद्दल क्षमस्व.”

इतर रसदार पर्याय