हाय!
कसा आहेस? खरं तर माझं दुहेरी मन सांगत होत की मी ह्याबद्दल लिहावं पण नंतर विचार आला की आपल्यात असं काहीच शिल्लक नाही, जे मला गमावण्याची भीती आहे.
कदाचित तुझ्या बदलावांचा माझ्यावर काय परिणाम होईल याची तुला कल्पना नसेल किंवा तुला ते जाणून घ्यायची पुरेशी काळजीही नसेल. असो! तर मग हे वाच? वाच आणि मला कळव किंवा वाचून विसारसुद्धा, तुझी मर्जी.
तुला आठवतं का रे? आपलं शेवटचं बोलणं? मला नाही! एक वेळेस असं असायच की आपलं बोलून झाल्याशिवाय दिवस संपायचाच नाही. आता महिने उलटले आणि मला वाटत नाही की तुझ्या लक्ष्यात तरी असेल मी अस्तित्वात आहे की नाही! मला....मला जाणवत होतं की तुझा हाथ माझ्या हातून निसटत आहे तरी ही मी तुला धरून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो दिवस शेवटी आलाच! मी तुला मुक्त करण्याचा निर्णय घेतला. गेस व्हॉट? मी बरोबर होते! तू माझ्यासाठी होतास कारण मला तू हवा होतास. मला खरच माफ कर जर मी तुला मोकळेपणा दिला नाही तर. पण तू माझ्यासाठी सर्व काही होतास, म्हणून तुझ्या जवळ राहणे माझ्यासाठी चुकीचं होतं का?
आपली शेवटची भेट ही ६ महिन्यांपूर्वी होती. आपण सहवास सोडून हळू हळू फोनवरून बोलायला लागलो. मग कॉल्स बंद होऊन फक्त मेसेजेस ना रिप्लाय द्यायचो, आणि नंतर तर औपचारिकता म्हणून फक्त "कशी आहेस?" हे मेसेजेस. जसे,जसे दिवस सरत होते, मला जाणवू लागलं की मी स्वतःला तुझ्यावर लादत होते, तुझ्याकडून भेटण्याची आणि कॉल्सची मागणी घालत होते! थोड्या दिवसांनी मला आश्चर्याचा धक्काच बसला करण तू कसाबसा माझ्या आयुष्यातून निघून गेला,आणि मी इतका वेळ तुझा पाठलाग करत होते. मला खरच माहीत नव्हत की ती आपली शेवटची भेट असणार. आपण सामोरा- समोर आलो खरं पण तुझ्यामध्ये एका अनोळखी व्यक्तीशी भेट झाली. पूर्णपणे एक नवीन व्यक्ती, ज्याच्या डोळ्यात एक वेगळीच भाषा होती, एक वेगळीच आभा जी मला फार टोचत होती. मी कधीच तुला विचारलं नाही कुठे चुकत आहे आणि नाही तुला सांगायची गरज भासली!
शांतता आपल्यामध्ये इतकी जोरात किंचाळली की शब्दांनी आत राहणे पसंत केले!
जर फक्त! मी तुला भेटले असते, तुझ्यातला खऱ्या माणसाला भेटले असते. तो माणूस जो माझी खूप काळजी घ्यायचा. आजारी असताना जागरण करत असेन तर जबरदस्ती झोपावणारा! जो तासांचा प्रवास करून मला फक्त स्वतःच्या बाहुपाशात घेण्यासाठीचा हट्ट करणारा! ज्याला माझे सगळे आवडी-निवडी माहीत होते. माझे हट्ट पुरवणारा, नेहमी माझ्या स्वप्नांना उभारी देणारा, लोकांसमोर अदबीने सांगणारा हो हितच आहे माझं सुंदर भविष्य आणि आल्हाददायक वर्तमान!!!
खरच तू बदलला नासतास तर? अस म्हणतात की आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीला अजाण होताना पाहणे ही खूप त्रासदायी आणि हृदयाला कोमेजून टाकणारी भावना आहे, आणि मला कळलं......मला माहीत आहे कसं वाटत जेव्हा प्रेमाचे बोल....किरकोळ शब्दात रूपांतर होतात, आणि आपण जेव्हा एखाद्या चांगल्या व्यक्तीशी बदललो गेलो आहोत तेव्हा! खरच मला स्वतःचीच लाज वाटू लागली करण मी माझं स्वाभिमान बाजूला ठेवून सतत तुझ्या अवती-भोवती घुटमळायची. राग आहे, त्रागा आहे, मनात बरीच घालमेल सुरू आहे! ह्या जीवाची फार सवय लागली आहे 'तुझी सवय'! पण मी आता स्वतःच्या अब्रूला ठेच पोचवणार नाही.
पण....पण....मी अजूनही तुझ्यावर तितकच प्रेम करते! माझ्या आयुष्यात तुझी जागा कुणीच घेऊ शकत नाही, कोणीच नाही! तू सुखात आहेस ना? बस मला तेच हवं आहे आणि हो! हे वाचून झाल्यावर मागे वळून बघायचं नाही! तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात कर...
तुझीच,
आकर्षण? की आणखी काही?