वंशाचा दिवा Bharti Shah द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वंशाचा दिवा

"मॅडम हिचा गर्भपात करायचा आहे". एक वयस्क म्हातारी सांगत होती. तिच्या सोबत उंचशी, सावळी पण स्मार्ट मुलगी दुःखी चेहऱ्यांनी उभी होती. नुकतीय ओ. पी.डी .सुरू झाल्याने विशेष गर्दी नव्हती. मी त्या दोघींना बसायला सगीतले. दोघी बसल्या .मुलगी अस्वस्थच वाटत होती. म्हातारी चेह-याने मवाळ होती ,पण तिच्या डोळ्यात निर्धार दिसत होता.
"ह ! आता बोला काय समस्या आहे ? मी प्रश्न केला. " तस काही नाही मॅडम, ही माझी सुन रेवती , नुकतच लग्न झाल आणि ती गरोदर आहे". " "अच्छा म्हणजे तुम्ही नोंदणी करायला आलात होय ?". आजीबाई थोड्या अडखळल्या, बिचकतच बिचकतच म्हणाल्या " मॅडम आम्हाला हे मुल नको आहे, म्हणून हिला घेऊन आलो. "
" नुकतच लग्न झाल आहे ,म्हणजे हे हिच पहिलच अपत्य असणार , नाही मावशी ? "हो पहीलचं आहे ? " थोडस अडखळत आजीबाईंचं उत्तर आल.
"मग कां नको ते मुल तुम्हांला? काही व्यंग असल्याच प्रायव्हेट दवाखान्यात कळल कां ? मी चौकशी केली. दोघीही गप्पच होत्या. मला कळेना काय समस्याआहे. मुलगी सुदृढ दिसत होती. बरेचदा पहिल्या बायकोपासून आधीच मुल असतील तर दुसरी बायका केल्यावरहि मुल नको अशी मानसीकता दिसते. म्हणुन विचारल की " हे तुझं दुसरपणावर लग्न आहे कां?", यावर मुलीनी नुसतीच नकारार्थी मान वळवली. आता मला थोडी शंका आली.प्रश्नाच मुळ जाणणं आवश्यक होत. मी रेवतीला बाहेर बसायला सांगीतल. ती सावकाश उठून बाहेर गेली. मी बाहेर पाहील तिचा नवरा सोबत होता. ती त्याच्याजवळ जाऊन गप्पच उभी राहीली. मी माझा मोर्चा आजीबाईंकडे वळवला.
" आता खर खर काय ते सांगा ? कारण पहिल मुलं कायद्याने पाडता येत नाही. खरोखर काही व्यंग कींवा तसंच काही महत्वाचे कारण असल्याशिवाय. एकदोन क्षण ती शांत बसली. जगू शब्दांची जुळवाजुळव करीत असल्यासारखी, मग हळूच म्हणाली " आता काय सांगाव बाई, माझ्या मुलाच नुकतच लग्न झालं. मुलगी मीच पसंत केली. मुलगी चांगली आहे. कामाधामात, बोलण्यावागण्यात , पण बाई मला अशी शंका आहे की, हे मुल माझ्या मुलाचं नाही. लग्नानंतर ती एकदाही बाहेरची झाली नाही. तसा माझा मुलगा तिला नांदवायला तयार आहे. तुम्ही हा गर्भपात करून दया, दुसऱ्यांदा जे राहील ते आम्ही "ठेवू" . मी शांतपणे आजीबाईची हकीकत ऐकली. तिलाहि सांगीतल्यावर सुटल्यासारख वाटल . "असे म्हणता? पण तुम्ही याबाबत तिच्याशी बोलला कां? तिच काय म्हणणं आहे ? दिवस असतांना तिने तुमच्या मुलाशी लग्न का केल ? तुम्ही म्हणता की ती बोलण्यात, वागण्यात चांगली आहे. जर तिनं जबरदस्ती लग्न केल असत , तर ती रागावलेली, चिडलेली, उदास राहिली असती. तुमच्या मताप्रमाणे ती घरात चांगली वागते ."

"हो "पडेल स्वरात आजीबाई म्हणाल्या .
"असं करा, तुम्ही बाहेर थांबा .मी तुमच्या सुनेशी बोलते ,नंतर तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन या.तो आलाआहे ना सोबत ?
"बर, आला आहे तो बाहेरच थांबला आहे. आजीबाईंनी सुनेला पाठवले . रेवती संथ पावल टाकत आली व माझ्या समोर बसली. मी तिला बघत होते सालस ,शांत मोठे मोठे डोळे, पण उदास चेहरा, साडी व्यवस्थीत स्वच्छ.
"रेवती तु मला आपली मोठी बहीण समज व सर्व खरखर सांग. होईल तेवढी मी तुला मदतच करीन. रेवतीच्या डोळयात पाणी उभ राहील. ती म्हणाली "मला कल्पना नाही. पण सासुबाईंच म्हणण असं आहे की मी या मुलाचा गर्भपात करावा दुसऱ्यांदा पुन्हा गर्भ राहील्यास तो ठेवु. मला त्यांना विचारायची हिंमत झाली नाही. यांना विचारल तर यांनीही कारण सांगीतल नाही, पण म्हणाले की आई म्हणते तसे कर. मग माझा नाईलाज आहे काय कराव काही समजत नाही. पण त्यांच्या मनानी मला वागणं भाग आहे.
बर मला असं सांग की तुझ शिक्षण किती ?" " मॅडम मी बी ए. झाली आहे." रेवती
"रेवती न लपवता मला अस सांग की कॉलेजमध्ये असतांना तुझ कोणावर प्रेम वेगरे होत कां? " " नाही मॅडम अस काहीच नव्हत. माझ लग्नही घरच्यांनी ठरवून केलेल आहे".
तिला माझ्या प्रश्नाचा रोख कळला नाही. मी हळूच विचारल रेवती तुझ्यावर पूर्वी जबरदस्ती वैगरे केली होती कां? "नाही, नाही पण तुम्ही असे का विचारता?" "बर तुझी मासीक पाळी नियमित होते को?" " हो" . रेवती ती थोडी बुचकळली होती. पण हळूहळू तिच्या ध्यानात येत होत.
मी तिला पुन्हा खात्री करुन घेण्याच्या उद्देशाने विचारल , "रेवती अगदी नक्की तुझ कोणावर प्रेम नव्हत, तुझा कोणी गैरफायदा घेतला नाही ना ?". "नाही मैडम' ,तीच्या आवाजात ठामपणा होता. नक्कीच हा गर्भ लग्नानंतर राहीला आहे याची मला खात्री झाली .रेवनीचे डोळे स्वच्छ होते त्यात लपवाछपवी, भीतीचे नामोनिशाण नव्हते.
"रेवती तुझ्या पाळीची तारीख कोणती ? " तिने तारीख सांगितली . "आणि तुझ्या लग्नांची तारीख ? " "मॅडम या वेळी पाळीच्या दिवशीच माझ लग्न होत ".
अस्स ,माझ्या लक्षात तीची समस्या आली. लग्नाच्या वेळी तीची पाळी सुरू होती. त्यानंतर बरोबर प्रजोत्पादन कालावधीतच संबंध आल्याने लगेच तिला दिवस राहीले होते. पण लग्नानंतर ती पाळीला बसली नाही त्यामुळे सासुला शंका येत होती. आता माझं काम होत. मी तिच्या सासुला व नवऱ्याला आत बोलावल. दोघेही आले, माझ्या समोर बसले. आता काय ऐकाव लागणार ? असे शांशक चेहेरे होते. मी त्यांना थोडं रिलॅक्स होऊ दिल व सांगीतल की " असं बघा. प्रत्येक स्त्रीला चार ते पाच दिवस, पाळी जाते. पाळीचे एक ठराविक सायकल असते. कोणाला २८ दिवसांनी नियमीत पाळी होते तर कोणाला 30 दिवसांनी . पाळी झाल्यावर चौदाव्या दिवशी स्त्रीबीज बाहेर येत आणि त्या आठवडयात जर पुरुषाशी संबंध आला तर ते स्त्रीबीज फलीत होऊन दिवस राहातात". त्यांना तसे चार्ट मी दाखविले . "आता, असं बघा की रेवती लग्नाच्या दरम्यान पाळीला बसली होती. त्यामुळे तीला लगेच दिवस राहीले आणि मी खात्री करून घेतली आहे की तिचे कोणाशीही संबंध नव्हते . तेव्हा हा गर्भ तुमच्या मुलाचाच आहे म्हणून तुम्हांला गर्भपात करायची आवश्यकता नाही. तरी तुम्ही आणि तुमचा मुलगा विचार विनीमय करून मला तुमचा निर्णय सांगा. रेवती इथेच बसली आहे". मला खात्री होती की माझं म्हणणं त्यांना पटल आहे. तरी मी त्यांच्या मनाने त्यांना निर्णय घ्यायला लावणार होते कारण यावर त्या अपत्याच आणि रेवतीचही भवितव्य निर्भर होत. जर मानलेच नसते तर मी त्यांना गर्भपाताचे धोके समजावून देणार होते. पण ती वेळ आली नाही आजीबाई हसतच परत आल्या म्हणाल्या "बाई आता राहूच दया" . नंतर तिची प्रसुतीपूर्व नोंदणी केली. त्यानंतर पूर्ण दिवस ती सासुसोबत नियमीत प्रसुतीपूर्व तपासणीसाठी येत होती.
एके दिवशी सकाळीच रेवतीशी सासु मी दवाखान्यात आल्या आल्याच मोठा पेढ्यांचा बॉक्स होऊन आल्या. "बाई मुलगा झाला." त्यांची खुषी ओसंडून वाहात होती.
मॅडम याच श्रेय तुम्हांलाच आहे. आम्ही तर आपल्याच हातीनी आपल्या वंशाला तोडणार होतो". मलाही त्यांच्या आनंदाचा संसर्ग झाला .समाधान वाटल एका निर्दोष स्त्रीचा विस्कळीत होणारा संसार वाचला होता. त्यांच्या संशयावरून त्यांनी गर्भपात करून आज तिचा स्विकार केला असता तरी ,नव्याची नवलाई संपल्यावर आयुष्यभर तीला ,तिचा दोष नसतांनाही टोमणे ऐकावे लागले असते. थोड्याश्या समुपदेशनाने अपत्यासोबतच एक संसार सुखाचा होणार होता.