Kulaswamini books and stories free download online pdf in Marathi

कुलस्वामिनी

माहुरची रेणुकामाता ,कोल्हापुरची महालक्ष्मी माता,तुळजापूच तुळजाभवानी माता,व वणीची
सप्तशृंगी माता ही महाराष्ट्रातील
प्रमुख देवीची पीठे आहेत.या पैकी प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत आहे,त्यालाच आपण
कुलस्वामिनी म्हणतो किंवा कुलदेवता म्हणतो कारण ती आपल्या कुलाचे अथवा घराण्याचे रक्षण करणारी,काळजी घेणारी आहे.
म्हणून कुलदेवतेची सेवा महत्वाची आहे.सर्व साधारणपणे,प्रत्येकाचे घरी देवीचे नवरात्र असते,नऊ दिवस
अखंड नंदादीप असतो.प्रत्येकाची पद्धत वेगळी
असते.कोणी घटस्थापनेच्या दिवशी गहू पेरतात.अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी होम,हवं
करण्याची पद्धत आहे.
नऊ दिवस सप्तशती या ग्रंथाचे पाठ करावेत.किंवा मराठी देवी महात्म्य या मराठी
ग्रंथाचे पाठ करावेत.
ज्या ठिकाणी आपले
कुलदैवत त्या ठिकाणी निदान
वर्षातुन आगर दोन वर्षांतुन एकदा तरी जाऊन,कुलस्वामीनीचा सत्कार
करावा.म्हणजे साडी,खण व
नैवेद्य अर्पण करावा.
नित्य नेमाने देवीचे कवच,अर्गला व किलक वाचावे
कुलदेवतेला अभिषेक श्री सुक्त
किंवा देवी अथर्वशिर्शाने करावा.देवीचे नुसते नित्य स्मरण जरी केले तरी ती आपले रक्षण करते.
"यैस्तु भक्त्या स्मृता नूनं तेषां वृद्धिः प्रजायते । ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तान्न संशयः"
देवी जगदंबेची नऊ रूपे आहेत.
."प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी । तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ॥

पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च । सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

संसारात अनेक समस्या अडचणी असतात.नोकरी,विवाह,किंवा आर्थिक पैसे मिळतात पण शिल्लक

राहत नाहीत ,सुख शांती

लाभत नाही याचं कारण

आपल्या घरात कुलाचार

होत नाहीत,कुलदेवतेची सेवा होत नाही.निदान सप्तशती संस्कृत किंवा मराठी देवी महात्म्य नित्य वाचावे.संस्कृत सप्तशतीचे पाठ करण्या करता संथा घ्यावी लागते.संस्कृत सप्तशती न जमल्यास मराठी देवी महात्म्य सोळा अध्याय असलेले वाचावे.शक्यतो सुरुवात करतांना अष्टामी,नवमी,किंवा चतुर्दशी असावी.वाचण्या पूर्वी संकल्प करावा.संकल्प म्हणजे आपल्या मनातील इच्छा जगन्मातेस बोलून दाखवाई.सप्तशती अथवा देवी महात्म्य याचे पाठ करतांना पाठ करण्याची जागा एक असावी.समई लावलेली असावी.मन शांत ठेवावे

माहिती साठी काही स्लोक.

नमामि त्वाम् महादेवीं महाभयविनाशिनीम् ।

महादुर्गप्रशमनीं महाकारुण्यरूपिणीम् ॥ २२ ॥
महाभयाचा नाश करणारी, महासंकटांचे निवारण करणारी, करुणेची साक्षात मूर्ति असलेल्या अशा देवीला माझा नमस्कार असो.
सप्तस्लोकी
ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा । बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ॥१॥
दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि ।
दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्र चित्ता ॥२॥
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥३॥
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे । सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥४॥
सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते । भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तु ते ॥५॥
रोगानशेषानपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान् । त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति ॥६॥
सर्वाबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि । एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरि विनाशनम् ॥७॥
पुष्कळ लोकांना त्यांचो कुलदेवता कोणती आहे हे माहीत नसते.अशावेळी प्रश्ननिर्माण होतो.प्रथम आपल्या नात्यातली जुनी व्यक्ती
शोधावी व त्यांना विचारावे किंवा जे आपले मूळ गाव आहे
त्या ठिकाणी जाऊन महिती
करून घ्यावी.
देवी पाठ केल्याने म्हणजे कर्म,भक्ती व ज्ञान याचे द्योतक
आहे.हा ग्रंथ म्हणजे आपली
इच्छा पूर्ण करणारा आहे.सकाम भक्ती करणाऱ्याला
मनोवान्छित फल प्राप्त होते.निष्काम भक्ताला दुर्लभ
असा मोक्ष प्राप्त होतो.महर्षी मेधा यांनी राजा सुरथ यांना सांगितले की'तामुपैहि महाराज शरणं परमेश्वरीम । आराधिता
सैव नृणां भोगस्वर्गापवर्गदा ।।
ज्या भगवतीची भक्ती केल्यानंतर मनुष्यास प्रसन्न होऊन भोग, स्वर्ग, ऐश्वर्य,मोक्ष
प्रदान करते.जगन्माता भागवती ही कृपाळू आहे.
जगन्माता देवीचे ध्यान
खङ्गं चक्रगदेषुचापपरिघाञ्छूलं
भुशूण्डीं :
शङ्खं संदधतीं करैत्रिनयननां सर्वाङ्गभूषावृताम ।
निलाष्मद्युतिमास्यपाददशकाम
सेवे महाकालीकां ।
यामस्तौत्स्वपिते हरौ कमलजो
हन्तुं मधुं कैटभम्।।
ऊँअक्षस्रकपरशुं गदेषूकुलिशं पद्मं.धनुष्कुण्डिकां

दण्ढं शक्तिमसिं च चर्म जलजम
घंटा सुराभाजनमल ।
शूलम पाषसुदर्शने च दधतीम
हस्तै प्रसन्नाननां ।
सेवे सैरिभमर्दिनीमिह महालक्ष्मी
सरोजस्थिताम ।।


या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥॥
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
कुलधर्म व,कुलस्वामिनीची नित्य सेवा केल्याने,सुख,समृद्धी,
ऐश्वर्य प्राप्त होते.
सुधाकर काटेकर
9653210353









इतर रसदार पर्याय