Savadh ..ek gupther - 3 books and stories free download online pdf in Marathi

सावध ...एक गुप्तहेर - 3 ( अंतिम भाग )






शेवटी अश्विन पंचमी चा दिवस उजाडला...आणि कोल्हापूर शहर रोषणाई ने गजबजून गेले .. सर्वत्र आनंद पसरला होता..अनेक ठिकाना हुन भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापूर मध्ये जमले होते..थोड्या वेळात च पंत प्रधानांचे आगमन होणार होते...त्या साठी पोलिस फोर्स ही सज्ज झाली होती..त्यांच्या सुरक्षितेचे कडक बंदोबस्त करण्यात आले होते...सावध व त्याचे साथीदार कडक पहारा देऊन होते.. गोकुळ दासा न सोबत असणारा वसंत पुजारी आज थोडा वेगळा वाटत होता..त्याच्या वर सावध ला संशय आला होता..काही तरी कारण सांगून. पुजाऱ्यान करवी त्याने वसंत ला मंदिराच्या मागील गाभाऱ्यात पाठवले होते..तिथे सावध च्या साथी दारानी त्याला ताब्यात घेतले...कसून चौकशी केल्या नंतर समजले की अल दीन मंदिराच्या परिसरात च आहे एव्हाना तो मंदिरात च आहे ...वसंत पुजारी हा खरा वसंत पुजारी नसून वसंत चा मास्क धारण करून येणारा आतक वादी गीरोह चा एक साथीदार होता.वसंत ला त्यांनी त्याच्या च घरी डांबून ठेवले होते.. वसंत ला लेफ्ट हँडेड होता त्याला कोणताच काम राईट हंन्ड नी करता येत नव्हते हे सावध ला माहित होते त्यामुळे नकली वसंत वर त्याला संशय आला होता.

मंदिरातील प्रत्येक व्यक्ती कडे आता सावध व त्याचे साथीदार संशयित नजरेने पाहू लागले .. पणं त्यांना काहीच समजत नव्हते..गोकुळ दास पुजारी थोड्या वेळा साठी मंदिरातून गायब झाले होते ..त्यात आज सिंधू ही मंदिरात आली नव्हती .. फुल्याने जेव्हा गोकुळ दासाना विचारल तेव्हा त्यांनी काही तरी खोटं कारण सांगून फुल्या ला घरी जाण्या पासून रोखल ... फुल्यां आज गोकुळ दासान सोबतच होता..थोड्या वेळात च पंत प्रधान व त्यांच्या पत्नी चे आगमन झाले..मंदिरात जल्लोष सुरू झाला होता..महालक्ष्मी ची आरती सुरु होती नीलमंनी व शालिनी कामत पूजा करण्यात व्यस्त होते त्यांचे अंग रक्षक बाहेर उभे राहून पहारा देण्याचे काम करत होते..

गोकुळ दास पुजारी आपले काम आपल्या सहकार्या न वर सोपवून तिथून निसटत होते तेव्हा सावध ने खूप शिताफीने त्यांना पकडले .. निरज व गिरीश त्यांना मंदिरा जवळ असणाऱ्या त्याच्या तह खाण्यात घेऊन गेले ...सावध ने तिथे येऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी खूप मुश्कीलीने त्यांना माहिती दिली कारण त्यांची मुलगी सिंधू त्यांची पत्नी व त्यांचे दोन भाऊ यांना त्यांच्याच घरात आतंकवाद्यांनी कैदेत ठेवले होते.पूर्ण कोल्हापूर जिल्हा बेचिराख होऊ नये या साठी त्यांनी आपले कुटुंब पणाला लावले होते.. अल दीन त्यांच्या च घरी थांबला होता..पणं त्याने आपला चेहरा लपवून ठेवल्या मुळे पुजारी त्याला पाहू शकले नव्हते.रात्रीच बॉम्ब प्लांट करण्याचें काम पूर्ण झाले होते..पणं तो कुठे प्लांट केला होता याची माहिती नव्हती.

नीलमनि पंत प्रधानान सोबत आलेल्या एका अंग रक्षका वर सावध ला संशय आला होता.....फुल्या ने देवीच्या आरतीचे ताट सर्व अंग रक्षकान समोर धरले तेव्हा त्यांना थोडा जोराचा ठसका लागला व त्यांनी पटकन आपले हात आरती वरून फिरून त्याला तिथून पाठवून दिले...गर्दीचा फायदा घेऊन रमाकांत ने त्या अंग रक्षकाचे तोंड दाबून त्याला तिथून मंदिरा पाठीमागून बाहेर घेऊन आला ..तळ घरात त्याला डांबून ठेवण्यात आले...अनेक प्रकारे त्याला टॉर्चर करून त्याच्या कडून माहिती मिळाव्यात आली.. मंदिराच्या मागच्या बाजूला खड्डा काढून त्यात बॉम्ब एका पेटीत बंदिस्त करून पुरला होता..पणं ती पेटी सापडली तरी ती उघडणे शक्य नव्हते .. कारण त्या साठी एक कोड नंबर टाकावा लागणार होता..आणि तो नंबर कोल्हापूर जील्ह्याशी निगडित आहे ..इतकी महत्त्वाची माहिती ..सर्वांच्या हाती लागली होती.

तो अंग रक्षक अल दीन चा खास माणूस होता...त्यामुळे थोड्या प्रमाणात त्याला माहिती होती..थोड्या च वेळात अल दीन चे सर्व साथीदार तिथून पळ काढणार होते एक तासाचा टायमर लावण्यात आला होता..कारण धमाका मोठा होणार असल्या मुळे कोल्हापूर पासून अल दीन व त्याचे साथीदार बाहेर पडल्या नंतर बॉम्ब स्पोट होणे गरजेचे होते. अल दीन भिकाऱ्या च्या वेषात मंदिरा च्या परिसरात वावरत होता..सावध ला त्याचा सुगावा लागला तसा त्याने त्याचा पिच्छा सुरू केला.. दोघांन मध्ये बरीच झटापट झाली ..सावध ने चार जोर दार ठोसे अल दीन ला लगावले तसें त्याच्या ओठांच्या कोपर्या तून रक्ताची धार लागली सावध त्याला पकडणार तेवढ्यात अल दीन च्या साथीदाराने सावध वर गोळी झाडली सावध ने स्वतः चा बचाव करत त्यांचा नेम चुकवला व आपल्या कंबरेत खोचलेली मक्खन काढून त्याच्यावर नेम धरून गोळी झाडली .. अल दीन चा साथी दार जागीच ठार झाला..पणं तेवढ्या वेळात अल दीन तिथून पसार झाला होता पणं पुढून येणाऱ्या गिरीश ने त्याला पकडलं परंतु गिरीश चा डाव त्याच्या वरच उलटा झाला .. अल दीन ने त्यालाच पकडुन त्याच्या कनपटीवर बंदूक रोखली व सावध ला गण खाली फेकण्यास सांगितले..सावध ने गण खाली रोखत थोडीशी तिरपी केली व गिरीश ला थोड नजरेनेच खुणवून साईड ला सरकन्यास सांगितलं आणि गण खाली ठेवता ठेवता ..तिरप्या साईड कडून ट्रिगर दाबला तशी बुलेट अल दीन च्या बरकडित घुसली व तो कळवळत खाली कोसळला..सावध ने जवळ जाऊन अजून दोन बुलेट त्याच्या छातीत रिकाम्या केल्या .

सावध व गिरीश पुन्हा मंदिराच्या बॅक साईड ला आले ..रमाकांत व निरज सोबत अजून चार जणांना पाठवून त्यांनी गोकुळ दास पुजारी च्या घरात असणाऱ्या इतर आतंकवादी ना ताब्यात घेतले व गोकुळ दासंच्या कुटुंबा चा बचाव केला.गिरीश सावध ला अल दीन ला कशाला मारल म्हणून ओरडत होता..त्याच्या शिवाय तो कोड कोणाला च माहित नव्हता..पणं तो जिवंत असता तरी त्याने कोड सांगितला नसता हे गिरीश व सावध दोघांना ही माहित होत.त्यामुळे त्यांनी आपल सर्व लक्ष बॉम्ब शोधण्यात लावले..मंदिराच्या बॅक साईड ला सर्व तपासून झाले पणं बॉम्ब कुठेच सापडेना त्यांच्या मदतीला बॉम्ब डिफ्युज करणारे तीन एक्स्पर्ट ही आले होते.रागात सावध ने आपला पाय जोरात जमिनी वर आपटला आणि त्या सर्शी त्याच्या पाया खालची फ रशी थोडी शी हलली ..गिरीश व सावध ने पटकन तिथे उकरून पाहिलं तर त्यांना तिथे पेटी सापडली ... पेटी कोल्हापूर बाहेर घेऊन जाणे आता शक्य नव्हते त्यामुळे काही ही करून कोड नंबर वरून पेटी ओपन करून बॉम्ब डिफ्यूज करने गरजेचे होते .

सावध च्या माहिती नुसार कोड हा कोल्हापूर जिल्हा शी निगडित होता..आणि तो सहा अंकी होता..त्याने प्रथम k हे अक्षर सहा वेळा टाकून पाहिलं पण तो चुकीचा दाखवत होता.खूप विचार करून सावध ने सहा अंक टाकले आणि त्या सरशी ती पेटी ओपन झाली सर्वांना खूप आश्चर्य वाटले ..त्या पेटी चा कोड हा कोल्हापूर जिल्ह्याचा पिन कोड नंबर..४१६००१ होता.बॉम्ब एक्स्पर्ट प्रीतम ने पटकन बॉम्ब डिफ्युज केला व गिरीश व सावध ने मोठ्याने जल्लोष केला.त्याचं मिशन महालक्ष्मी यशस्वी झालं होत .कोणाला काहीच माहीत न पडता त्यांनी आपलं काम फत्ते केलं होत ..हा या सर्वात गोकुळ दास ची फॅमिली व वसंत ओढले गेले होते परंतु ते सुख रूप होते.
दुसऱ्या दिवशी गिरीश ,रमाकांत ,नीरज व सावध ने विश्रांती घेऊन दोन दिवस कोल्हापूर जिल्हा फिरण्याचे ठरवले .सावध मूळचा कोल्हापूर चा असल्यामुळे त्याने तिघांना ही त्याची फेवरेट राजा भाऊ ची मिसळ चारण्या साठी खाऊ गल्लीत नेले ..तांबडा पांढरा रस्याचा स्वाद चखावला..रंकाळा तलाव ,शालिनी पॅलेस ,दख्खन चा जोतिबा अशी आस पास ची सारी ठिकाणे त्यांनी पाहून घेतली .
कोल्हापूर सोडण्या आधी सावध पुजारी ना भेटण्या साठी त्यांच्या घरी गेला ..त्यांचे आभार मानून तो परत फिरत होता तेव्हा त्याला सिंधू भेटली ...सिंधू तर त्याच्या कडे पाहून फ्लॅट च झाली होती..एक टक ती त्याच्या कडे पाहत होती..तेव्हा हळूच सावध तिच्या जवळ जाऊन बोलला ...माझा तर एक डोळा गेला होता..तरी मी तुला पाहत होतो..तेव्हा बोलली स की देवीची सेवा कर पुण्य लागेल ...आता तुला दोन्ही डोळे असून इतकं काय घुरून पाहतेस मला ? त्यांच्या बोलण्याने सिंधू ने खाली मान घातली.सावध तिथून निघून गेला पणं नंतर सिंधू च्या लक्षात आल की फुल्या च सावध होता..तिने कपाळावर एक हात मारून घेतला ..सावध गेला त्या दिशेने तिने पहिले तेव्हा त्याने जाता जाता तिच्या कडे पाहून एक रहस्य मयी स्माईल केलं.


समाप्त





इतर रसदार पर्याय