सावध ...एक गुप्तहेर - 2 vidya,s world द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सावध ...एक गुप्तहेर - 2

सावध ने कोल्हापुरात आल्या आल्या आपले काम सुरू केले होते ..झंझर मधील एका आतकंवादी जक्रिब याला सावध ने पकडलं होत..त्याला जक्रीब कडून थोड्या फार प्रमाणात माहिती मिळाली होती..परंतु..जक्रिब काही त्या गिरो ह .. चा मोहरक्या नव्हता..तो तर फक्त एक प्या द..होता..जक्रीब कडून मिळालेल्या माहिती नुसार धमाका इतका मोठा होणार होता की त्यामुळे मंदिराच्या परिसरातील तीन किलोमीटर अंतरा पर्यंत सर्व बेचिराख होणार होत..त्या साठी एक विशिष्ट प्रकारचा बॉम्ब तयार करण्यात आला होता.खूप मोठी जैविक हानी होणार होती. महाराष्ट्रा ला जोरदार तडाखा बसणार होता की त्यामुळे पूर्ण देश शोक सागरात बुडून जाणार होता..पणं हे सर्व थांबवण्यासाठी सरकार चे अथक प्रयत्न सुरू होते.मंदिर पासून ते चार किलोमीटर च्या आस पास च्या परिसरात जागोजागी मायक्रो कॅमेरे लावण्यात आले होते ..तळघरात डोळ्यात तेल घालून पाच एक्स्पर्ट लोक कॅमेरे व्दारा दिसणाऱ्या आजू बाजूच्या परिसरात होणाऱ्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण करत होते.

गोकुळदास पुजारी हे मंदिराचे प्रमुख पुजारी होते ..त्याच्या मदतीला इतर ही पुजारी होते .. फुल्या हा गोकुळ दासांचा हरकाम्या होता ..ते जे काम सांगतील तो पटकन करत असे..फुल्यांच्या एका डोळ्यात मोतीबिदू झाल्या मुळे एक डोळा काम देत नसे.त्यामुळेच त्याचं नाव फूल्या पडलं होत. फुल्याला पाठीवर कुबड आल असल्या मुळे तो थोडंसं वाकून चालत असे..नेहमी भगवा ढगाळ शर्ट..आणि तसचं धोतर हा त्याचा पोशाख.. गोकुळ दासंची मुलगी सिंधू.. काळे भोर डोळे.. कंबरे पर्यंत रुळणारे केस..गोरी पान अशी सिंधू..फुल्याला सिंधू फार आवडायची ..तो तिला नेहमी बोलायचा सिंधू तू खूप सुंदर दिसतेस...सिंधू ला त्याचा खूप राग येत असे..ती त्याला चिडून बोलत असे.. फुल्या आधीच एक डोळा गेलाय दुसऱ्या डोळ्याने मला पाहून तो आणि कशाला घालवतो? त्यापेक्षा देवीची सेवा कर..काही पुण्य मिळालं तर मिळालं तुला ..तिच्या बोलण्यावर फुल्यां फक्त हसत असे.

आय बी चे एजन्ट गिरीश ,रमाकांत व नीरज वेग वेगळे वेष घेऊन मंदिराच्या परिसरात च वावरत होते.गिरीश मंदिरातच असणाऱ्या एका दुकानात लेडीज ज्वेलरी विकण्याचे काम करत होता.रमाकांत मंदिरा पासून थोड्या दूर .. लागलेल्या स्टॉल वर बसून पेढे विकण्याचे काम करत होता व नीरज बस स्टँड वर फेरीवाल्यांचे काम करत होता..या सर्वात सावध कुठे आहे हे कोणाला माहीत नव्हते..त्याचा वेष तर या तिघा ना ही माहित नव्हता.तिघांच्या कानात असणाऱ्या छोट्या ब्लू टूथ द्वारे तिघांना सावध कडून सूचना मिळत होत्या.

अश्विन पंचमी अवघी चार दिवसां वर येऊन पोहचली होती.परंतु अजून ही सावध च्या हातामध्ये झंझर च्या योजने बद्दल काहीच जास्त माहिती मिळाली नव्हती.सावध आपल्या खोलीतील तेह खाण्यात बसून मंदिरातील लाईव्ह फुटेज मॉनिटर वर पाहत होता..त्याने तिथून च गिरीश ला त्याच्या बाजूच्या दुकानातील माणसावर नजर ठेवण्यास सांगितली..संध्या काळ झाली तस्स तो माणूस तिथून निसटून चालला होता ..की गिरीश ने आपल्या इतर साथी दाराना सांगून त्याचा पाठलाग केला पणं तो त्यांच्या हातातून निसटला तो माणूस पुढे जाऊन सावध ला धडकला सावध ने गण च्या बॅक साईड ने त्याला एक जोरदार ठोका दिला त्या बरोबर तो जागीच बेशुध्द झाला.सावध त्याला आपल्या कॉमन आड्यावर घेऊन गेला..रात्री गिरीश ,निरज व रमाकांत तिघे ही तिथे आले त्यांना वाटलं होत तो माणूस त्यांच्या हातून निसटला पणं त्याला तिथे पाहून त्यांना ही थोड आश्चर्य वाटलं थोड्या वेळात सावध ही तिथे आला ..तो माणूस शुद्धी वर आला तस्स गिरीश ने त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली पणं तरी ही तो काहीच माहिती सांगत नव्हता..शेवटी सावध ने स्वतः जवळच पेन त्याची नस पकडुन त्यात जोरात घुसावल तस्स तो कळवळला ..सावध च्या दोन चार झापडीत च तो पोपटा सारखं घडा घडा बोलू लागला.त्याच्या कडून एक महत्त्वाची माहिती हाती लागली की सय्यद चा राईट ह्यांड म्हणून ओळखला जाणारा अल् दीन...पंचीमच्या उस्त्वाच्या एक दिवस आधी कोल्हापुरात येणार आहे..आणि तोच हा बॉम्ब प्लांट करणार आहे..पणं तो कसा दिसतो याची माहिती कोणा कडेच नव्हती एव्हाना त्याच्या साथीदारांना ही त्या बद्दल माहिती नव्हती...झंझर आतंकवादी गीरोह ला जितके कमजोर समजले गेले होते ..तशी ती बिलकुल नव्हती ..त्यांनी तर आपल्या साथी दाराना सुद्धा त्यांच्या प्लॅन बद्दल माहिती दिली नव्हती .

गिरीश ने सावध ला विचारल की त्याला त्या माणसाचा संशय कसा आला तेव्हा सावध ने त्याला सांगितलं की तो ज्याप्रमाणे वस्तू विकत होता ..तसे कोल्हापूर चे विक्रेते अजिबातच नाही..एखादी वस्तू ग्राहकाने आपल्या सोयीनुसार किंमत करून मागितली आणि कोल्हापूर कर इतक्या सहज ती वस्तू त्यांना देतील अस आज पर्यंत कधीच झालं नव्हत.. जो पर्यंत किमतीत घासाघासी करणार नाही तो पर्यंत ते शांत बसणारे नव्हते.

क्रमश: