Kala Black Snake books and stories free download online pdf in Marathi

काल ब्लॅक सर्पट

खूप दिवसांनी आज मी सूर्यास्ताला सामोरी जातोय. नकळत समुद्र किनाऱ्यावरून जाताना आज तो क्षण, ती आठवण परत डोळ्या समोरून गेली. कोणी विचार केला होता त्या मावळत्या सूर्याच्या किरणामधून हळूच एक झलक माझ्या समोर येईल आणि माझ्या आठवणीत कायम राहील.
मी ' अकिरा हिवतारि ' जपानमधल्या टॉप 1 कंपनी चा मालक. खूप कमी वयात मी ही कंपनी 15 व्या स्थानापासून पहिल्या क्रमांक वर अनलीये. माझ्यापासून तसे तर सगळे लांब राहतात, त्यांना माझ्या फटकळ किंवा म्हणायला हरकत नाही माझ्या उधट उत्तरा मुळे त्याच्या अभिमानाला ठेच पोहोचते. पण मालकाशी कोण तोंड लावणार ना, म्हणून माझ्या आजूबाजूला सगळे तोंडावर गोड आणि मागून चुगल्या करणारे लोक भरलेत. ज्याच्याकडे पाहून आगदी किळस येते. पण ही गोष्ट माझ्या साठी नवीन नाही, तर लहानापासून अशे लोक माझ्या आसपास होते.
तस तर मी जपान च्या राज शाही घरण्यातून येतो. त्यामुळे लहान पणापासून दुसऱ्या मुलापेक्षा वेगळ्या वातावरणात जगलो. तसा तर मी राज्याच्या म्हणजेच माझ्या बापाच्या उपपत्नीचा मुलगा. तेव्हा राज्याच्या खूप पत्नी असणं म्हणजे साधारण गोष्ट होती. पण मी एक मेव मुलगा असल्यामुळे माझ्या आई ला माझ्या राज्याच्या प्रमुख पत्नी समान मान होता.
वडिलांना त्याच्या शानो शोकत पासून वेळ नव्हता आणि आईला तिच्या सवतीचा काटा कसा काढायचा या विचारापासून फुरसत नव्हती. मी माझ्या 8 वर्षा नंतर च आयुष्य हॉस्टेल मध्येच काढला. आई वडिलांना फक्त एक ओपीचारिक्ता म्हणून भेटत होतो. बरं झालं माझ्या कडे काही गुण होते नाही तर माझी हालत दारावरच्या कुत्र्यापेक्षा वाईट राहिले असते कारण, राजशही घराण्याला उगाच सिंहाचा कुटुंब बोलत नाही.
"जिथे प्रत्येकाला त्याच्या शमतेवर पराखतात. कमजोर असला तर त्याची स्वतःची आई सुधा त्या पिल्लाचा जीव घेताना एक क्षण सुधा विचार करत नाही, जिथे जर तुम्ही स्वतःची रक्षा करू शकत नाही तर तुम्ही दुसऱ्या क्षणी सगळ्याच्या नजरेत खाली पडतात, जिथे तुमच्या इच्छा ची कोणाला कदर नसते."
ज्या वेळेस माझ्या काकांनी मला हे सागितलं होता तेव्हा मी लहान होतो. पण त्याच्या शब्दांच्या बोलण्यात किती वेदना लपल्या होत्या ते मला आता कळतंय. कारण नंतर त्यांना मारणारा हा त्याचा स्वतःचा भाऊ म्हणजेच माझ्या बाप होता. त्या दिवसापासून जगण्याच्या या शर्यतीत मी स्वतः ला इतका झोकून घेतला की, जगणं काय असत हे विसरलो. स्वतः ला इतकं मजबूत केलं की कोणाला मारायची वेळ जरी आली तरी माझे हात कापणार नव्हते. स्वतः ला राक्षसा पेक्षा बतर बनवून घेतला होता कारण,
" हार म्हणजे मौत" हे वाक्य माझ्या मनात माझ्या आईने सतत कोरून ठेवला होता. तिला मी राक्षस बनान मजूर होता पण रजशही शर्यतीत 2 नंबर वर राहणं सुधा मंजूर नव्हता.
पण ही माझ्या तर खोट्या आयुष्याची ओळख खरं आयुष्यात माझं नाव होतं
' काल '
कुंग फु एक्सपर्ट ' अकिरा'. ज्या जगात कोणी पण मला हिवातरी आडणावाने नाही तर ' काल अकिरा ' नावाने ओळखतात.
कूंग फू माझ्या आयुष्यातली एक मेव गोष्ट जी मी कोणाच्या पण दबावामुळे नाही. तर स्वताच्या शांती साठी शिकत होतो. ही आवड माझ्या काकांनी मला लावली होती त्याच्या सोबत लहानपणापासून मी कुंग फू शिकायला गुरुकुलमध्ये जात होतो. पण ज्या वेळेस काकाला मेलेल्या अवस्थेत समोर पाहिलं तेव्हा पासून कुग फू शिकताना एक राग माझ्या डोक्यात राहायचा. कोणावर ? का? कशासाठी? त्याचे उतारा मी पण शोधत होतो. पण एक मेव जरीया होता कूंग फू माझ्या कडे ज्याच्या मुळे काकाला मी माझ्या जवळ समजत होतो. आणि त्याच्या मुळेच मला त्या स्पर्धेत जायचा योग आला.
1 वर्ष चालणारा माझ्या आयुष्याचा तो काळ माझं आयुष्य इतकं बदलून टाकेल असा वाटलं नव्हतं. योगायोगाने ती संधी माझ्या कडे आलती की आणल्या गेली होती मला माहित नाही. पण आयुष्यावर होणाऱ्या त्या एक वर्षाचा परिणाम मलाच नाही तर त्या अस्तित्वात असलेल्या देवालाही माहीत होतं की नाही माहीत नाही. जगाला परत नव्यानी पाहायला शिकवला मला त्या वेळेने.
आणि ती वेळ सुरू झाली त्या सूर्यास्तापासून.
जिथे मला ती पहिल्यांदा भेटली.

इतर रसदार पर्याय