आज स्त्रीला खुप ठिकाणी समाजात मोठा मान आहे. स्त्री वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. पुरुषासोबतच नाही तर पुरुषांच्या ही पुढे आज महिला वर्चस्वाने आहेत. पण संकोच वाटतो... आज स्त्री कितीही पुढे गेली तरी ती घरात त्याच जागेवर आहे. समोर असलेला ग्लास ही आज नवर्याला बायकोच उचलुन देते तेव्हाच तर घरातील इतर माणसांना समाधान मिळतो. आज ही नवरा बायको समान पदावर कार्यरत असले तरी सकाळी लवकर बायकोनेच उठायचं आणि सर्व आवरायचं. नवर्याला मात्र वेळेवर उठवायचं, नाश्ता समोर, रुमाल आणि सॉक्स हातात द्यायचे. त्याला कसलीच कमी पडायला नको. पण तिने सर्व कामं आवरुन तिची वेळ झाली की न खाताच धावत सुटायचं. तिला कितीही प्रश्न पडले तिने कितीही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते प्रश्न न सुटणारे हे भासवुन देणारी ही एक जुनाट विचारांची स्त्रीच असते.
एक आई वयात आलेल्या मुलीला घरातील कामे शिकवायला सुरुवात करते. का ती मुलाला जेवण बनवायला शिकवत नाही??? का ती मुलाला भांडी, कपडे करायला शिकवत नाही??? कोणी थोर विचारवंताने सांगितलं आहे का??? की घरातील सर्व कामे फक्त स्त्रीनेच करायची. एका मुलीला घरातील सर्व कामे शिकवणारी, स्वतः हाताने घ्यायची सवय लावणारी जी आई असते ना.. तीच आई मुलाने काहीच करायचं नाही किंवा सर्व आईकडुन किंवा बहिणीकडुन घ्यायचं शिकवणारी आईच असते. जसं आपण बोलतो स्त्री पुरुष समानता आहेत. पण ते प्रत्यक्षात ते मुलगी आणि मुलगा या भुमिकेत असतात तेव्हाच त्या वाक्याची त्यांना जाणिव व्हायला हवी..
पण एका स्त्रीला जेव्हा या गोष्टींची जाणिव होते तेव्हा दुसर्या स्त्रीने समजुन घ्यायला हवं..आज जर पुरुष घरातील कामे करतो म्हणुन तुम्हीच त्याला बायकोचा वेडा बोलत असाल तर मग तुम्ही स्वतःच स्त्री पुरुष समानता वाक्यात अडथळा आणत आहात.
खरंच संकोच वाटते जगात स्त्री पुरुष समानता असली तरी घराघरांमध्ये, विचारांमध्ये नाही. आता उदाहरणच बघा ना.. रमेश आणि स्वाती दोघे ही कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहेत. दोघांची कामावर जायची आणि यायची वेळ ही सारखीच पण दोघांची कंपनी मात्र वेगळी होती. रमेशला ही कंपनीत दहा वाजता पोहचायचं असायचं आणि स्वातीलाही. पण तरीही रमेश घरातुन नऊला निघायचं म्हणुन आठ किंवा सव्वा आठला ऊठणार, स्वाती मात्र पहाटे पाचला ऊठायची. ऊठल्यानंतर तीने स्वतःचं आवरलं की पहिले किचनमध्ये जाणार सर्वांसाठी एकीकडे भाकरी तर दुसरी भाजी बनवणार. त्यानंतर तीने कीचन आवरायचं, सर्वांना ऊठवायचं त्यांना चहा द्यायचा, रमेशच्या मागे लागुन त्याल ऊठवायचं. रमेश उठायच्या आधी नळाला सात वाजता पाणी येतं मग ते भरुन घ्यायचं, संपुर्ण घर झाडुन साफ करायचं. आणि मग नवर्याला आरामात ऊठवायचं, मग रमेश उठल्यानंतर त्याला अंघोळीसाठी पाणी द्यारचं कपडे द्यायचे त्यानंतर त्याला नाश्ता द्यायचा. त्याचं आवरलं की पटकन् घड्याळाकडे बघत साडे आठ वाजता ती कपडे मशीनला लावणार, ते होईपर्यंत ती संपुर्ण घर पुसुन घेणार. कपडे तो पर्यंत होतातच, ते झाले नाही तरी आई बाबा आणि दिर आणि नंणदेच पण नाश्त्याचं बघायचं. तोच नऊ वाजले की रमेशचा आवाज येणार... स्वाती चल लवकर... ऊशीर होईल, बस जाईल निघून...
हो हो.. येते चला पटकन् कपडे सुकायला टाकते आणि येते. तुम्ही चला पुढे..
हो ये...
स्वाती पाच मिनिटातं कपडे सुकायला घाईत टाकते आणि लगेच त्याच आवतारात बॅग घेऊन धावत सुटते.
काय गं.. स्वाती, काय आवतार आहे तुझा, निदान केसं तरी विंचारायची, तोंड बघ तुझा.. अशी का राहतेस तु???
रमेशला समजावणं कठीण जो उठल्यापासून बघतोय बायको काय करते आणि काही नाही तोच असं बोलतोय त्याला उत्तर तरी स्विती देऊ शकत नव्हती.
खरंच संकोच वाटतो या लोकांच्या विचारांवर ज्या स्त्री मुळे आज तुम्ही आहात, तुमचं कुटुंब आज जिच्यामुळे आहे तिलाच तुम्ही समजु शकत नाही..