नकळत सारे घडले (भाग २) प्रियंका कुलकर्णी द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नकळत सारे घडले (भाग २)





अजयचे आई-बाबा घरी येतात ,अजयला हाताला लागलेलं बघून सीमाताई काळजीत पडतात," अजय अरे काय झालं तुला,काय लागलंय हे "सीमाताई विचारतात. " आई घाबरू इतकं काही लागलं नाही आहे मला"अजय घडलेला प्रसंग तो आईला सांगतो ,तेव्हा कुठे आई शांत होते. अश्विनी ही तिच्या घरी अजयच्या अकॅसिडेंट बद्दल सांगते,तिचे आईवडील ही लगेच अजयला भेटून येतात,थकल्या मुळे रात्री लवकर सगळे झोपी जातात
अजयला मात्र झोप येत नसते, तो अश्विनी ला मॅसेज करतो,


अजय:-hi ,झोपलीस का.

अश्विनी: हॅलो ,नाही झोपले,तुझाच विचार करत होते, कसं वाटतंय तुला ,आणि अजून जागा का आहेस ,तुला तर आरामा ची गरज आहे..

अजय: हो ग,पण सारखी तुझी आठवण येत आहे,हॉस्पिटल मधला प्रसंग सारखा डोळ्यासमोर येतो आहे, अस वाटतंय की हे स्वप्न तर नाही न.. खरंच थँक्स ,माझ्या सारख्या मुलावर तू प्रेम करते,मी कुठे अन तू कुठे ,खरंतर तुझ्या समोर मी काहीच नाही ग.

आश्विनी: अजय तू असं का बोलतोस रे,प्रेम हे काय जात धर्म, श्रीमंत गरीब पाहून नसतं होत ,ते ठरवून तर कधी होतच नाही,बस अचानक होऊन जातं , आणि जातीने तर तू उच्च आहेस माझ्यापेक्षा तरी तुला ही प्रेम झालंच न,अजय माझं नितांत प्रेम आहे तुझ्यावर, फक्त तुझ्या दिसण्यावर नाही तर तुझ्या खरेपणावर ,तुझ्या निर्मळ स्वभावावर माझं प्रेम आहे.. आणि आता पुन्हा असं स्वतःला कमी लेखलस तर बघ कायमचा अबोला धरेल मी.

अजय: अग ऐ, असं काही करू नकोस ,अबोला वगैरे नको धरू,सॉरी या नंतर नाही बोलणार अस ,मग त झालं ..

अश्विनी: आता कसा आलास लाइन वर, चल झोप आता ,खूप उशीर झाला आहे , आराम कर आणि काळजी घे ,मी येईल उद्या तुला भेटायला..

अजय:हो हो झोपतो ,चल good night ,लव्ह यु सो मच, आणि तू आधी मला लव्ह यू म्हण मगच झोप ,नाहीतर बघ मी कॉल करेल आताच
.
अश्विनी: बरं बाबा म्हणते हो, लव्ह यु टू अजय बस्स खुश न आता,चल झोप आता..

अजय:हो खूप खूप खुश.. झोपतो हो आता.. उद्या भेटू..

सकाळ होते.अजयच्या मित्रांना अकॅसिडेंट बद्दल माहिती होते तसेच ते त्याच्या घरी येतात.
संतोष: अज्या लेका तुझा अकॅसिडेंट झाला अन तू आम्हाला साधं कळवलं पण नाही,आता काकू भेटल्या ड्युटी वर जातांना तर त्यांनी सांगितलं..

अजय: अरे ,खूप नाही लागलं बस थोडं हाताला खरचटलं आहे..
अजय हॉस्पिटलमध्ये जे घडलं ते सगळं सांगतो,अश्विनीने कशी प्रेमाची कबुली दिली वगैरे.. हे ऐकून त्याचे मित्र खूप आनंदी होतात.
अश्विनी ला ही ते चांगलं ओळखत असतात..

अवी:अज्या ,जे झालं त्याचा आनंद च आहे,पण तिचे बाबा कसे आहे माहिती आहे न तुला,तापट तर आहेच पण श्रीमंतीचा किती गर्व आहे, ते तुमच नातं स्वीकारतील का? आणि तुझ्या घरी चालेल का अश्विनी सून म्हणून जातीचा प्रश्न येईलच न मध्ये ...

अजय: तिचे बाबा दिसायला च तापट आहे,पण स्वभावाने प्रेमळ आहे आणि अश्विनी त्यांची लाडकी मुलगी आहे तीच म्हणणं तर ते ऐकतील च न ,माझ्याशी ही छान पटत त्यांचं खूप कौतुक करतात ते माझं,आणि राहिला प्रश्न माझ्या घरी तर मला माहित आहे मला कधी कोणत्याही गोष्टीला नाही म्हणार नाही, आईबाबांचा विश्वास आहे माझ्यावर,आणि अश्विनी आवडते आईला ती तिला खूप आनंदाने स्वीकारेल.

राजू:- असं असेल तर आनंदच आहे, अश्विनी सारखी चांगली मुलगी जोडीदार म्हणून लाभण ही खरंच भाग्याची गोष्ट आहे..

इकडे अश्विनी लवकर उठून पटापट आवरून अजयला भेटायला म्हणून निघतेच की आई हाक मारते ,"आशु,एक काम कर माझं, गोडाचा शिरा बनवला आहे तेवढा अजय ला नेऊन दे बरं, त्याला आवडतो म्हणून केलाय"..
अश्विनी काय खुशच आता आईनेच जा म्हंटल्यावर दुधात साखर." हो आई जाते".अश्विनी.. अजयची आई ड्युटी वर गेली असते तर बहिणी कॉलेजमध्ये गेल्या असतात,आता घरी फक्त अजय,त्याचे बाबा आणि मित्र असतात...अश्विनी येते ती आत येताच ,

अवी: या वहिनीसाहेब, स्वागत आहे तुमचं.
सगळे खो खो हसतात,अश्विनी ला लक्षात येते की अजयने यांना सगळं सांगितले आहे म्हणून हे असे चिडवत आहे,ती लाजते ,"तुम्ही मला वहिनी का म्हणत आहात" अश्विनी...

"तू आता उगाच बनू नकोस, आम्हाला अज्या नि सांगितलं आहे बरं का सगळं" संतोष...

"अरे थोडं हळू बोला बाबा आहेत आत मध्ये ऐकू जाईल त्यांना" अजय...

"गप रे तू, अब प्यार किया तो डरना क्या" राजू

"बरं आशु तू लक्ष नको देऊस यांच्या बोलण्याकडे ,तूझ्या हातात काय आहे"अजय..

"बघ विसरले च,आईने तुझ्यासाठी शिरा पाठवला आहे,तुला आवडतो ना म्हणून " अश्विनी...

"खरंच, आईने पाठवला आहे की तू बनवला आहेस" अवी

"आईनेच केला आहे मला नेऊन दे म्हणाली"अश्विनी..

" बस करा रे तुम्ही उगाच नका त्रास देऊ तिला, आशु आण तो शिरा इकडे" अजय..

"चल अज्या निघतो आम्ही, उगाच कबाब मैं ह्दडी कशाला" संतोष...

"हो चला निघा बरं तुम्ही"अजय

"काय स्वार्थी मित्र आहेस तू लेका,लडकी आई तो दोस्तो को जानेे की लिये बोल रहा है,ठिक आहे बघून घेऊ तुला" राजू...

"चला येतो हा वहिनी साहेब ओळख असू द्या" अवी ..सगळे हसतात.

आणि ते तिघे निघुन जातात.. आता अश्विनी आणी अजय दोघच हॉल मध्ये असतात,काय बोलावं दोघानाही सुचत नाही.. अश्विनी अजय जवळ येऊन बसते,अजय तिचा हात हातात घेतो ..

'बोल न ,काही अशी गप्प का आहेस" अजय

"काय बोलू काही सुचत नाही आहे,एरव्ही किती बोलतो आपण पण आज खूप धडधडतय"...अश्विनी

" बरं माझ्याकडे बघ तर , कळलंच नाही ग मी कधी तुझ्या प्रेमात पडलो ते,आशु तू दिसायला तर सुंदर च आहेस पण त्याहून अधिक मनाने तू सुंदर आहेस,हसरी,निर्मळ,इतरांचा विचार करणारी, शांत नदी सारखी म्हणून च तू मला आवडतेस"अजय..

"खरंय आहे तुझं मला ही नाही कळलं की मी तुझ्यात कधी गुंतत गेले,खर त तुला सांगावस वाटत होतं पण भीती होती तुला जर मान्य नसेल तर आपली मैत्री ही तुटेल,म्हणून गप्प होते,पण काल तुझा अकॅसिडेंट झाल्याचे ऐकून मग मी स्वतःवर ताबा नाही ठेवू शकले आणि तुला मनातलं सगळं सांगून टाकले,अजय माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर" अश्विनी..

"माझंही खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर" अजय..

"पण भीती वाटते रे मला,आपल्या घरी मान्य नाही झालं तर" अश्विनी...

" नको ,काळजी करू ,करतील मान्य सगळे,आपण त्यांना मान्य करायला भाग पाडु, पण पळून वगैरे नाही जायचं आपण ,जे होईल त्याला समोर जायचं"अजय

" हो ,खर बोललास तू,कुठल्याही परिस्थितीत पळून वगैरे जायचं नाही ,तू योग्य तेच करशील मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर" अश्विनी...

अश्याप्रकारे अजय आणि अश्विनी च्या नात्याला सुरुवात होते, 2 दिवसात अजय बरा होतो आणि आपल्या कामावर पुन्हा जॉईन होतो.अश्विनी च ही कॉलेज ,अभ्यास असतो . कधी कधी बाहेर लपून भेटणं ,गिफ्ट ,ग्रिटींग देणे असं सुरू होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असतात.पण घरच्यांसमोर पूर्वी सारखेच वागत असतात त्यामुळे घरी कोणालाही कानोकान खबर नसते...3-4 महिने असेच भर्रकन निघून जातात. आणि तो दिवस येतो जिथून अजय अश्विनी च्या नात्याला नजर लागते. त्यादिवशी अजय घाईघाईने कामाला निघून जातो ,सीमाताई आणि मुली त्या दिवशी घराची साफसफाई काढतात..अजयचे कपाट आवरायचं म्हणून आई कपाट उघडते,आणि एक एक करून सामान काढते,त्यात त्यांना एक बॉक्स दिसतो त्यात अश्विनीने दिलेले ग्रीटिंग, पत्र आणि गिफ्ट असतात..सीमाताई ते एक करून पाहतात तसा तसा त्याना एक एक धक्का त्यांना बसतो ,आपल्या नजरे आड अजय चे असले प्रकार सुरू आहे,किती विश्वासघात केला ह्याने असे किती तरी विचार मनात येतात त्यांच्या,सीमाताई डोक्यावर हात देऊन खालीच बसतात,स्वाती, नीता त्यापण सगळं पाहतात त्यांना पण त्यांच्या दादाच्या वागण्याचं नवल वाटतं ...

"अजयने काय केलं हे ,इतक्या दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि आपल्या ला कळू पण दिले नाही,छोट्या त छोटी गोष्ट सांगणारा अजयने इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवली,विश्वास तोडला आहे त्यांने माझा,घरी येऊ दे जाब विचारते त्याला" सीमाताई.. संध्याकाळ कधी होते अन अजय घरी कधी येतो याची त्या वाट बघत बसतात....मनात मात्र येणाऱ्या संकटाच्या चाहुली च वादळ उठलेल असते..

क्रमशः ..