Hangover - 2 books and stories free download online pdf in Marathi

हँग ओव्हर - (भाग 2)

मोहित ने मैथिली ला तिच्या घरा पर्यंत सोडले . मीतू वेळेवर औषध घे आणि काळजी घे . ओके मि उदया भेटतो.
हा,बाय मोहित . आणि ती फ्रेश व्हायला निघुन गेली. आज ती खुप खुश होती मोहित आज अचानक आला काय आणि हे अस घडले पन छान वाटत होते तिला. तिला लागले होते पन त्याचा त्रास मोहितलाच जास्त होत होता हे त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होते. रात्री पुन्हा मोहित ने कॉल केला तिची चौकशी केली मग ती शांत झोपी गेली. सकाळी नेहमी प्रमाणे मीतू उठली आता दोन दिवस तिने रजा घेतली होती . थोड्या वेळात तिच्या कड़े कामाला येणाऱ्या मावशी आल्या.काय ओ ताई काय झाल हे काय लागल ? अहो मावशी काही नाही थोड़ काल गावात दंगा झाला ना तिथे लागले मला काही काळजी करण्या सारख नाही. बर ताई काय जादा काम असल तरी बी सांगा मला नाहीतर मी सांचा ला पन येऊ काय तेवढच गरम गरम खायला करून देइन. नको ओ मावशी मी ठीक आहे. तुम्ही त्रास नका करून घेवू. बर मी लगोलग न्याहरी करते बसा तुम्ही. म्हणत मावशी कामाला लागल्या. दाराची बेल वाजली तिला वाटलेच मोहित असणार तिने दार उघडले मोहितच होता, गुड़ मॉर्निंग जान हॉउ यू फील नॉउ ? मी छान आहे. फीलिंग बेटर ये ना आत मोहित .तिने मावशींना आवाज दिला 1ग्लास पानी आना मावशी. मोहित आज पहिल्यांदा तिच्या घरी आला. मीतू एका 1 बीएचके फ्लैट मध्ये रेंट ने रहात होती. तिचे आई बाबा आणि छोटा भाऊ पुण्यालाच होते. मोहित ने तिच्या साठी एक येल्लो रोझेस चा बुके आणला होता. हे तुझ्यासाठी मीतू . ओह्ह थैंक्स मोहित.तुला अजुन ही लक्षात आहे की मला येल्लो रोझ आवडतात ते. हो मी काहीच विसरलो नाही ग जान अजुन एक सरप्राइज पन आहे तो म्हणाला. दे ना मग लवकर मोहित. तितक्यात मावशी आल्या. ती म्हणाली मावशी हे मोहित देशमुख माझे मित्र आहेत . यांनीच काल मला दवाखान्यात नेले. मावशी नी मोहित ला नमस्कार केला. काय घेणार तुम्ही चहा की कॉफी मावशी ने विचारले. नाहीतर जेवूनच जावा की. नको नको आता फक्त कॉफ़ी आना जेवायला नन्तर येईन मोहित म्हणाला. बर म्हणून मावशी किचन मध्ये गेल्या. मोहित दे ना काय आणले आहेस तू . अरे दम घे जरा लहान आहेस का मोहित मुद्दाम तिला चिडवू लागला. पन माझ्या साठी आणलेस ना मग. देतो थांब म्हणत मोहित ने शर्टच्या खिशा तुन एक कैडबरी डेयरी मिल्क काढली. मोहित सो स्वीट ऑफ यू मीतू हसत म्हणाली. त्याला माहित होते कैडबरी हा मीतू चा वीक पॉइंट! त्याने हातात धरली होती कैडबरी. दे ना मोहित आता . देइन पण याच्या बदलयात मला काय देणार स्विटु? असे रे काय मोहित सांग काय पाहिजे तुला? तसा मोहित ने आपल्या ओठा वर बोट ठेवले म्हणाला,हे पाहिजे मला. तशी मीतू लाजली आणि नजर खाली घातली. अरे वा पत्रकार मैडम तुम्हाला लाजता पण येत तो म्हणाला. मोहित काय रे जा नको देवू मला कैडबरी. मैडम आम्ही कोल्हापुरकर आहोत शब्दाला जागनारे तुमच्यासाठी आहे ना हे चॉकलेट मग ते तुमचेच समजले का? हो का दे मग म्हणत तिने त्याच्या हातातून चॉकलेट घेतले. तो तिचा हात धरनार इतक्यात मावशी आल्या. दोघांनी कॉफी घेतली . मीतू म्हणाली मोहित ये ना तुला फ्लैट दाखवते . ओके म्हणत मोहित उठला .हॉल ला लागून गैलरी होती आणि बाजूला बेडरूम होती. मीतू म्हणाली कसे आहे घर ? छान आहे म्हणत मोहित ने मीतू चा हात पकडला म्हणाला मग मीतू डार्लिंग मी चॉकलेट दिले ना आता माझे चॉकलेट दे.त्याने तिला आपल्या जवळ ओढ़ले आणि अलगद तिच्या ओठा वर आपले ओठ टेकवले आणि प्रदीर्घ चुम्बन घेतले. खुप दिवसानी त्यांनी एकमेकांचा स्पर्श अनुभवला. मीतू ने त्याला घट्ट मीठी मारली म्हणाली,मोहित तू फक्त माझाच आहेस ना ? त्याने तिला अजुन घट्ट आपल्या मिठित घेत म्हणाला,हो ग जान मी फक्त आणि फक्त तुझाच आहे कायम. तुला कधी ही अंतर देनार नाही मी. मीतू त्याच्या मिठितुन बाजूला होत म्हणाली,आय लव यू मोहित आय लव यू टु मीतू आणि पुन्हा एकदा तिला किस केले. हे बघ मि निघतो आता तु औषध वेळेवर घे आणि आराम कर मी कॉल करतो मोहित म्हणाला. ओके बाय मोहित. आणि तो तिथुन निघाला. मावशी काम आवरुन निघुन गेल्या. मीतू बेड वर पडून मोहित चा विचार करत होती सकाळ चा त्याचा सहवास आठवून ती पुन्हा पुन्हा एकटीच हसत होती. खूप छान वाटत होते तिला. इतक्यात तिचा फोन वाजला तिने पाहिले विक्रांत होता हॅलो विक काय म्हणतोस अरे मित्या कशी आहेस तू आता जस्ट न्युज पहिली मी तुला जास्त लागले तर नाही ना? नाही रे थोडं डोक्याला आणि हाताला लागले आहे बट डोन्ट वरी काल मोहित माझ्या पाठोपाठ होता म्हणून मला वेळेवर त्याने हॉस्पिटल ला नेले. ओहह दयाटस ग्रेट. पण तू बरी आहेस ना. हो एम फाईन. बर काळजी घे मी करेन कॉल पुन्हा बाय . बाय विक म्हणत तिने कॉल कट केला. विक्रांत तिचा कॉलेज फ्रेन्ड ग्रॅज्युएशन होई पर्यंत ते एकत्र होते अगदी बेस्ट फ्रेंड ती त्याला विक म्हणायची आणि तो कायम मित्या च म्हणायचा तिला.नंतर त्याने लाँ केले आणि अँडव्होकेट झाला आता तो पुण्यात सायबर सेल मध्ये होता. आणि मैथिलीने पत्रकारिता केली पन त्यांची मैत्री कायम होती विक्रांत ला मोहित बद्दल सगळ माहित होत. रात्री पुन्हा मोहित ने तिला कॉल केला बराच वेळ दोघ बोलत होते. मग ते झोपी गेले. दोन दिवसांनी मैथिली ला ड्रेसिंग ला बोलवले होते म्हणून मोहित आज येणार होता तिला हॉस्पिटल ला न्यायला . मीतू छान तयार झाली स्काय ब्लू कुर्ता आणि व्हाइट जीन्स तिने घातली होती सूंदर दिसत होती. मोहित आला तिला पाहुन म्हणाला,काय मीतू कोणाला बेहोश करायचा विचार आहे काय दिसतेस तू एकदम नाद खुळा !!😊😊काय रे मोहित नाद खुळा काय. हा मग आमच्या कोल्हापुरात असच बोलतात. हम्म्म्म चला राजे निघूया का आता. चल म्हणत त्याने तिच्या गाला वर किस केला. दोघ हॉस्पिटल ला आले ड्रेसिंग करून निघाले तिला डॉकटरानी ऑफिस जॉइन करायला परवानगी दिली.मोहित म्हणाला मीतू चल आपण बाहेरच जेवन करू . हु चालेल ती म्हणाली. ते हॉटेल ओपल ला आले मोहित म्हणाला,मीतू आता मी आमदार की साठी फॉर्म भरणार आहे तीन महिन्यानी इलेकशन आहे सो आता माझी थोड़ी धावपळ वाढनार त्यातून ही मी तुला वेळ द्यायचा प्रयत्न करेन तु ही मला समजून घे ओके. हा मोहित नक्कीच आय एम विथ यू ऑलवेज. तू टेंशन घेऊ नकोस. नक्की ना नाहीतर मागच्या वेळी रूसली तशी रुसुन बसशील . मोहित नाही रुसनार आय प्रॉमिस. बघ हा जान म्हणत त्याने तिचे नाक ओढ़ले. ती हसली फक्त. गप्पा मारत त्यांनी जेवन केले.मोहित ला एक कॉल आला लैंड लाईन नम्बर होता त्याने घेतला कॉल हैलो कोण बोलतय. समोरून आवाज आला मि कोण कुठला हे जाणून घ्यायची तुला गरज नाही. मी काय सांगतो ऐक तू आमदार च्या पदा साठी फॉर्म भरणार नाहीस नाहीतर गांठ माझ्याशी आहे समजल तसा मोहित चिडला म्हणाला,अरे तू कोन आहेस ते सांग आधी आणि मी इलेक्शन ला उभा राहीन किवा नाही तुला काय करायचे आणि हे बघ मी कोणाच्या बापाला भीत नाही असल्या धमक्या मला देवू नकोस असे बोलून त्याने कॉल कट केला. मीतू ला काळजी वाटू लागली ती म्हणाली,मोहित कोनाचा होता फोन आणि काय म्हणत होता तो? मीतू तू नको टेंशन घेवू अग राजकरण म्हंटल की असे असतेच पन मी खंबीर आहे यू डोन्ट वरी असे म्हणत त्याने तिच्या हाताला थोपटले. मोहित तू काळजी घे मला भीति वाटते रे तुला काही झाले तर मी काय करू आय वान्ट यू . अरे जान अस भिवून कसे चालेल हा तू पुण्याची भित्रीभागुबाई म्हणत तो तिला चिडवू लागला. मोहित काय पन तुला मसकरी सुचते कधिपन . अग नको इतका विचार करू आय विल टेक केयर ऑफ मि ओके. चल आता काय गाल फुगवून बसली स्माईल प्लीज. मीतू त्याच्या कड़े पाहत हसली. त्याने तिला घरी सोडले तो ही त्याच्या घरी आला.

क्रमश..कसा वाटला हा भाग नक्की सांगा. पुढे काय होईल मोहित ला धमकी चा कॉल कोणी केला..पाहूया पुढील भागात. All rights rests with the author. Dont copy any part of story...


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED