Hangover - 5 books and stories free download online pdf in Marathi

हँग ओव्हर - (भाग 5)

मोहित चा बंगला पाहूनच आई बाबा आनंदी झाले. मोहित दरवाज्या पाशी आला आई बाबा या बसा म्हणाला. मितुला पाहुन तर तो वेडाच झाला. पुन्हा पुन्हा त्याची नजर तिच्या कड़े जात होती. आणि मीतू ब्लश करत होती☺️☺️. आई साहेब म्हणालया मीतू किती गोड दिसतेस आज. थैंक्यू आई ती म्हणाली. मोहितने सगळ्यांनाची ओळख करून दिली. मोहित म्हणाला सध्या माझी खुप धावपळ सुरू आहे 3 महिन्यावर इलेकशन आले आहेत . तुम्ही सर्वानी ठरवा कसे करायचे. सगळ्यांनी विचारांती असे ठरवले की 15 दिवसांनी साखरपुडा करू आणि निवडणुका झाल्यानंतर लग्नाची तारीख फिक्स करू. मग एकत्र जेवन झाले. मोहित म्हणाला,साखरपुडयाची सगळी खरेदी पुण्यात करू. चालेल सर्वजन म्हणाले . मोठी लोक साखरपुडयाची तयारी कशी करायची याचे प्लैनिंग करत बसले. सौरभ अजिंक्य सोबत होता. मोहित त्याच्या रूम मध्ये गेला आणि मितुला मेसेज केला रूम मध्ये ये . तसे ही तिला त्याला भेटायचे होतेच . आई मि येते असे म्हणत मीतू तिथुन उठली आणि मोहित कडे आली. काय बोल मोहित. त्याने तिला आपल्या जवळ ओढत दुसऱ्या हाताने दार लावले. अरे काय करतोस कोणी येईल ना मोहित? येवू दे आता लग्न ठरले आपले आणि आज काय रापचिक दिसतेस तू यार.. काय दिसते रापचिक? अग ही आमची कोल्हापुरी भाषा आहे आता तू पन कोल्हापूर ची होणार . काही ही काय मोहित? बर ते सोड एक कीस्सी तो आज बनती ही हैं जान. नाही हा कोणी तरी येईल मी जाते. तसे मोहितने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिचे प्रदीर्घ चुंबन घेतले. मितु जान तुला मिठीतून दुर करावेसेच वाटत नाही इतकी हॉट दिसतेस. हो का राजे चला आता खाली नाहीतर आपले आई बाबा आपल्याला शोधत इकडे येतील. हम्म चला राणी सरकार. दोघ खाली येतात. तसे अजिंक्य म्हणतो आई मी बोललो ना दोघ एकत्र येतील म्हणून. तसे सगळे हासू लागतात. मैथिली लाजून खाली पाहत राहते. संध्याकाळचा चहा घेऊन मितु आणि आई बाबा निघतात तिथुन. जाता जाता मोहित मितुला बाय म्हणत कोणाचे लक्ष नाही असे पहात तिला फ्लाईंग किस देतो.सगळे खुप खुश असतात.मैथिली चे आई बाबा अजुन 2 दिवस तिच्या सोबत राहतात. एक दिवस मोहित ला घेवून महालक्ष्मीला जावून येतात. मीतू मोहितचे लग्न निर्विघ्न पणे पार पडू दे अशी आई अंबाबाई च्या चरणी प्रार्थना करतात. स्वयंपाकाला येणाऱ्या मावशीना पन मीतू च्या लग्ना बद्दल सांगतात मावशी ना सुद्धा आनंद होतो कारण त्या मोहित ला ओळखत असतात. तो कसा आहे हे त्यांना ही माहित असते. दोन दिवसांनी आई बाबा सौरभ पुण्याला जातात. त्या नंतर आठ दिवसांनी मोहित अजिंक्य आई बाबा मैथिली ला घेवून पुण्याला येतात साखरपुडयाची खरेदी करायला . सर्वजन दोघांना अंगठी घ्यायला जातात. मीतू आणि मोहित आपल्या पसंतीने अंगठी घेतात.मोहितच्या आई मीतु साठी एक छान सा सोन्याचा हार आणि चांदीचे पैंजन घेतात.मोहित दागिन्याचे बिल द्यायला जातो . तसे मीतूचे बाबा पण रिंग चे बिल द्यायला जातात . बाबा राहु दे मी देतो बिल मोहित म्हणतो. नाही जावईबापू तुमच्या अंगठी चे पैसे मीच देणार. म्हणजे बाबा अजून तुम्ही मला परकाच मानता . नाही नाही मोहितराव तशी रितच आहे. मी मानत नाही काही. पण हे बरे नाही दिसणार. मला तुम्ही तुमचा मुलगा समजता की नाही. हो मानतो . मग झाल तर हे सगळ बिल मी देणार. अरे काय बोलता इतक म्हणत मोहितचे बाबा तिथे आले. तेव्हा मोहितने त्यांचे बोलने बाबांना सांगितले. तसे दिनकरराव हसत म्हणाले,तुमचा जावई हट्टी आहे फार ऐकनार नाही करू दे त्याला करायचे ते. आता यावर मि काय बोलनार ? मीतु चे बाबा म्हणाले.यानंतर ते मीतु ची साडी घ्यायला आले. खुप अनेक प्रकारच्या साडया पाहिल्या पण कधी मोहितला नाही आवडलया तर कधी बाकीच्यांना. मग मोहितच म्हणाला,आई साडी काही खास वाटत नाही आपण मितुला लहेंगा घेवू. तुला जे आवडेल ते घे आई बोलली. मग दोघांच्या पसंतीने पिंक आणि गोल्डन असा छान लेहँगा घेतला. मोहितला मरून कलरचा कुर्ता घेतला आणि अजिंक्य ने सूचवले दादया तू या कुर्तासोबत धोती ट्राय कर मस्त दिसेल. मोहित ने ते ट्राय केले एकदम परफेक्ट आणि रुबाबदार दिसत होता. मोहितने डोळ्यानी ेेइशारा करून मितुला विचारले . तिने ही मस्त असा इशारा केला. 👌👌. सगळी खरेदी करून बाहेरच जेवन करुन घरी आले .मोहित आणि त्याची फ़ैमिली हॉटेल वर राहिले होते. एक दिवस खरेदीत गेला आणि दूसरा दिवस मीतु च्या घरी सर्वाना जेवन असा बेत होता. त्याच दिवशी मोहित कोल्हापुरला निघाला. मीतु अजुन 2 दिवस पुण्यात थांबुन साखरपुडया च्या कार्यक्रमासाठी हॉल ची अँरेन्जमेंट करनार होती. विक्रांत होता पुण्यात तिच्या मदतीला. एक छोटा पन छान ए सी हॉल त्यांनी बुक केला. मीतू ने विक्रांत ला मिहित ला येणाऱ्या धमक्यानच्या कॉल सबंधी सांगितले. विक्रांत म्हणाला,डोन्ट वरी जास्तच काही अड़चन आली तर मी येइन मदतीला. ओके मीतु म्हणाली. बाय दे वे मीतु तू आता इथेच थांबनार एंगेजमेंट होई पर्यंत का जाणार आहेस कोल्हापुर ला. नाही रे खुप सुट्टी झाली कामावर आता कोल्हापुर ला जाणार आणि परत येइन एक दिवस आधी. हा काम का तो सिर्फ बहाना है मैडम,अब किसी के बिना रहा नही जाता होगा...विक्रांत तिला चिडवू लागला. वीक तसे काही नाही हा म्हणत मीतु लाजत होती. सी हॉउ आर यू ब्लशिंग मैडम ..मित्या चक्क लाजतेस तू यार..गप बस ना आता मार खाशील वीक मीतु खोट खोट रागवून म्हणाली.. बर,चला आता मला काम आहे . उदया कॉल कर निघताना विक्रांत बोलला. दोघांनी निरोप घेतला. मीतु कोल्हापुर ला आली . कामावर येणे गरजेचे होते. पुढे एंगेजमेंट ला सुट्टी हवी म्हणून आता मीतु जास्तीचे काम पन पूर्ण करून ठेवत होती. मोहित आणि ती फार कमी भेटत होते. पन दोघ खुश होते. नेक्स्ट वीक मध्ये एंगेजमेंट होती . सगळी तयारी झाली होती. मीतु मोहितला भेटून पुण्याला निघाली. आदलया दिवशी पार्लर वगैरे तिने आवरुन घेतले. मितुचा चेहरा छान ग्लो करत होता. तिला आणि मोहित ला अजिबात करमत नव्हते सारखा फोन सुरु असायचा. आज एंगेजमेंट होती मीतु छान नटली होती. सगळेजन आवरुन हॉल वर आले. थोड्या वेळात मोहित ही आला. मुहूर्ता वर सखरपुडयाचे विधी झाले आता रिंग घालायाचा कार्यक्रम होता. दोघे ही कपड़े चेंज करून आले. मीतु खुप सुंदर दिसत होती. मोहित धोती कुर्ता मध्ये खानदानी दिसत होता . खूपच लाज़वाब. दोघांना नजर लागेल असा जोड़ा दिसत होता. दोघांनी एकमेकांना एंगेजमेंट रिंग घातल्या. तसे सर्वानी टाळया वाजवल्या . एकमेकांना पेढा भरवला. वेट वेट वन मोअर थिंग म्हणत विक्रांत केक घेऊन आला. मीतु ने मोहित ला विक्रांत बद्दल सांगितले होते पन त्यांची भेट झाली नव्हती. विक्रांत स्टेज वर आला तसे मीतु ने मोहितशी त्याची ओळख करुन दिली . दोघांनी शेकहैण्ड केले. विक्रांत म्हणाला अभिनंदन आणि त्याने मोहित ची गळा भेट घेतली. मोहित मीतु ने केक कापला. मग जेवन झाले छान मजेत हा कार्यक्रम झाला. आता मोहित खुप बिझी राहु लागला निवडणूक जस जसे जवळ येऊ लागले तसे त्याचे काम मीटिंग् कार्यक्रम यात ही वाढ झाली . त्यातून ही जमेल तसे मीतु ला वेळ देत होता. त्याला येणारे फोन कॉल चालूच होते दर वेळी धमकी दिली जायची . डीएसपी अजय चा तपास सुरु होता पन अजुन काही हाती लागत नव्हते. मोहित ऐका मीटिंग साठी गेला होता . संध्याकाळी मीटिंग होती मिटिंग सुरु होऊन थोड़ा वेळ झाला होता. रात्र होत आली होती अचानक काहीतरी तोड़फोड़ झाल्याचा आवाज ऐकू आला. तसे मीटिंग मधले सर्वजन बाहेर आले पाहता तर काय कोणी तरी मोहितच्या कार ची तोड़फोड़ केली होती. मागची पुढची काच फोड़ली होती .तिथे पार्किंग ला कोणी वॉचमन नव्हता म्हणून हे करायचे धाडस त्या लोकांनी केले होते. सगळे जन चर्चा करू लागले की हे कोनाचे काम असेल ? मोहित म्हणाला,मला पन माहित नाही मी पोलीस चौकिला कळवतो. मोहितने अजय ला कॉल करून झाला प्रकार सांगितला. अजय म्हणाला कोणी ही कार ला हात लावू नका.आम्ही येतो. थोड्या वेळात अजय दोन पोलिसांना घेवून आला कार चा पंचनामा करने गरजेचे होते काही पुरावे मिळतात का पाहने गरजेचे होते. मोहित म्हणाला,अजय जो मला कॉल करतो ना त्याचेच हे काम असावे शंभर टक्के. हो मला ही तसाच डाउट आहे अजय म्हणाला.ही बातमी मितुला तिच्या ऑफिस मधून समजली पत्रकाराना ही खबर देणारे ख़बरी असतातच . मीतु ने लगेच मोहित ला कॉल लावला,मोहित तू कुठे आहेस आणि कसा आहेस? मि ठीक आहे डोन्ट वरि जान. मोहित तू कार मध्ये नव्हतास ना? नाही माझी मिटिंग सुरु होती तेव्हा तोड़फोड़ चा आवाज झाला म्हणून आम्ही बाहेर आलो तर माझी कार फोड़ली होती. मोहित पन आज तू नव्हता कार मध्ये पण तुजया मागे ते लोक नसतील कशा वरुन ? ते तुला माघार घे म्हणून धमकी देतात ना उदया तुला काही केले तर.? मोहित आय एम सो मच वरीड अबाउट यू. असे म्हणत मीतु फोन वरच रडू लागली.अरे मीतु रडू नको यार मला काही होत नाही. अजय आला आहे इथे प्लीज तू रडू नको. मोहित तू कुठे आहेस मी येते तिथे मला भेटायचे तुला . मी ठीक आहे मला काही झालेले नाही. ओके तू नको मी लगेच येतो तुझ्या कड़े . हा म्हणत तिने फोन ठेवला.

क्रमश ..All rights rests with the author. Copying any part of the story will lead to legal consequences.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED