आणि मी नायिका बनले... Akshara Mhatre द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आणि मी नायिका बनले...


थोड गोष्टीबद्दल...
नायिकेचे खडतर आयुष्य त्यात भर घालायला खलनायक आणि या जाचातून वाचवायला आलेला नायक.मग खलनायक आणि नायक मध्ये युद्ध आणि नयिका व नायक यांचा सुखी संसार....... किती तरी गोष्टी याच कथानकावर आधारित असतात ना......यावर च आधारित गोष्ट श्री.रॉय यांनी लिहली होती.ज्यात एक श्रीमंत उद्योगपती असतो.त्याला दोन मुली असतात.पहिली इव्हा आणि दुसरी इलॉन्वी. इव्हा अगदी सालस व भोळी त्यामुळे सर्वांच्या लाडकीची तर इलॉन्वी उदोगपतीची अनैतिक संबंधातून जन्माला आलेली जी अतिशय रागीट,इव्हा ची ईर्ष्या करणारी आणि अतिशय वाया गेलेली.थोडक्यात गोष्टीची खलनायिका आणि ती ज्याच्यावर प्रेम करायचा तो आर्विन राज्याच्या उच्च आधिकाऱ्याचा मुलगा.पण त्याला काय रागीट इलॉन्वी पसंद पडली नाही त्याला आवडली ती तिची बहीण इव्हा.मग काय झाले इलॉन्वी चे त्यांना वेगळे करायचे प्रयत्न पण ते दोघं एवढे एकमेकांत गुंतले होते की
इलॉन्वी ला इव्हा ची हत्या करायचा मार्ग उरतो.ती इव्हा ला मारणार तोच आर्विन इलॉन्वी ला रंगे हाथ पकडतो.त्यानंतर तिला कारावास होतो पण एक अज्ञात येऊन तिला मारण्याचा प्रयत्न करतो.ती तिथून पळते पण तो अज्ञात तिचा पाठलाग करतो.ती तिथेच एका ठिकाणी लपून राहते.तो अज्ञात त्याच्या साथीदारांसोबत चर्चा करत असतो. लपलेल्याया इलॉन्वी ला समजते की तो अज्ञात दुसरा तिसरा कोणी नसून राज्याचा राजकुमार असतो. राजकुमारा बद्दल समाजात खूप गैरसमज असतात.....पण खर सांगावं तर तो दोषींप्रती खूप क्रूर असतो.इलॉन्वी हे जाणून होती तिला माहित होत की राजकुमार आरोपीची कातडी सोलतो ज्याने त्याला आनंद मिळतो..आज न उद्या राजकुमार आपल्याला शोधेल आणि असच मारेल या विचारानेच ती घाबरून जाते.शेवटी ती ठरवते..अस झुरत मारण्यापेक्षा एकदाच मेलेल बर ती बाजूला तुटून पडलेली काच उचलते व हाताची नस कापते आणि तिचा मृत्यू होती.
समाप्त
श्री.रॉय त्यांची ही कथा पूर्ण करून त्यांच्या नातनिला ऐकवतात पण तिला ही काय फार आवडत नाही म्हणून ती आजोबांकडून त्यांची गोष्ट लिहायची डायरी घेते आणि ' समाप्त ' शब्द खोडून पुढे गोष्ट लिहायला सुरू करते.


आता ती पुढे काय लीहते त्या खलनायिकेच काय होते ते पुढच्या भागात बघुया.
पुढच्या भागापासून मी नाही तर माझे पात्र बोलतील .......हा आता गरज लागली तर माझी लुडबुड असेलच मधे मधे....
गोष्ट १८००शतकाच्या सुरवातीच्या ब्रिटन मधली असेल......तिथल्या उच्च वर्णीय लोकांचे काही नियम व रीती यांचा समावेश असेल पण अधिक तरी गोष्टी माझ्या कल्पनेच्या असतील.
* पात्रांची नावे
इलॉन्वी
इव्हा
आर्विन
राजकुमार
विरोनिका
अजून बरेच पात्र आहेत.....पुढे कळेलच.
काही पात्रांची मते ज्याने तुम्हाला गोष्टी बद्दल व त्यांच्या व्यक्तिमत्त्व बद्दल अंदाज येईल....
इलॉन्वी:- मी अजून अशी नाही राहू शकत.....मला नाही मरायच...मला जगायचंय...मग भलेही मला त्यासाठी खलनायक बनाव लागल तरी चालेल.
इव्हा:- शांत जगा व शांतीने जगू द्या.....मन साफ असेल तर जग साथ देत.
आर्विन:- मी तिला माझ्या पासून दूर होऊ देणार नाही....मी तिला मिळवणारच भलेही काहीही होऊदे.
राजकुमार(राजकुमाराला नाव आहे हा.....कळेल लवकरच.):- मला तिला छुप्या शत्रू पासून वाचवायचय.....तिने कायम माझ्या बाजूने राहावे एवढंच हवंय मला.
आता यात कोण नायक कोण नायिका आणि कोण खलनायक हे कथेत कळेलच
कथा,पत्रे व वर्णन केलेली जागा हे सर्व माझ्या कल्पनेतले आहेत.
काही जणांना अजूनही कथा कश्याबद्दल आहे ते कळलं नसेल तर पुढच्या भागात नक्की कळेल.....फक्त एकच विनंती ही गोष्ट वाचताना लॉजिकल, प्रॅक्टिकल विश्र्वातून जरा रजा घेऊन कल्पनेच्या जगात हजर रहा. कारण स्वतः enstine म्हणतात
"Logic will get you from A to B. Imagination will take you everywhere"
आणि माझा कथा लिहण्याचा पहिला प्रयत्न आहे तरी काही चुकल्यास माफी असावी.
∆∆∆∆∆∆∆∆∆{•••}∆∆∆∆∆∆∆∆∆

वाचल्याबद्दल धन्यवाद.......पुढच्या भागात भेटू.