ती Hiramani Kirloskar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती

वेळ सकाळी सहा-साडे सहाची असेल. केदार अजूनही साखर झोपेतच होता...मोबाईलची रिंग वाजत होती...सकाळी कोण झोपेच खोबर करतय म्हणत त्याने फोन उचलून कट केला... पुन्हा दोन मिनिटांनी मोबाईलची रिंग वाजयला लागली. तसा वैतागत त्याने फोन उचलला...डोळे चोळत स्क्रिन बघितली तर unknown नंबर होता...झोपेतच तो "हॅलो..." बोला समोरुन एका मुलीचा आवाज आला..." हॅलो...केदार बोलतोस ना?" "हा" " हॅलो मी वैभवी बोलतेय. मी मुंबईला आलीय दादर स्टेशनला आहे." तिच्या आवाजात त्याला भीती जाणवत होती "आणि मला इथल काही समजत नाही. तूला वेळ असेल तर प्लीज स्टेशनला येशील का?" खूप वर्षांनंतर त्याने हे नाव ऐकल होत. नाव ऐकताच अंगावरची चादर बाजुला करत तो बेडवर बसला. तिच्या बोलण्याचा नेमका अर्थ त्याला लागत नव्हता. " मी दादरला राहत नाही आणि मला यायला निदान 1 तास जाईल. पण एक मिनिट...तू इथे काय करतेस येवढ्या सकाळी?" त्याला मध्येच थांबवत ती म्हणाली" ऐक तू आल्यावर तुला सगळं सांगते...प्लिज तु ये मी वाट बघतेय" " हे बघ मला नाही यायला जम... " तो पुढे बोलतच होता की फोन कट झाला.

रागात त्याने फोन बेडवर आपटला. तसे तिचे कोणी नातेवाईक ही मुंबईत नाहीत. मित्र असतील की नाही माहित नाही. ही करतेय काय इथे? हिला नंबर कुठे मिळाला माझा? उठल्या उठल्या त्याची चिडचिड होत होती.
त्याने घाई गडबडीत तयारी केली आणि स्टेशनवर आला घड्याळात येव्हाना 7:30 झाले होते.
ट्रेन मध्ये रोजचीच गर्दी होती... दरवाज्यावर नेहमी सारखी उभं राहायला जागा होती..."वैभवी"......त्याच्या मनात या नावा बद्दल आकर्षणा पेक्षा कुतुहल जास्त होत. आयुष्यात दोघांचा...फोनवरचा हा पहिला संवाद असेल.

काँलेजला काही अशा मुली असतात की त्यांच्या नावचा उल्लेख प्रत्येक मुलाच्या तोंडी असतो. त्यातली वैभवी होती. अशा मुलींच वागण, बोलण, चालण त्यांचे मित्र -मैत्रिणी यांचा एक वेगळाच थाट असतो. स्वतःच्या सौंदर्याचा नको तेवढा गर्व करणाऱ्या. अखडू. काही मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या.
केदार मात्र या चौकटीत कधी बसला नाही... अशा मुलीनं पासुन तो थोडा दुरच रहायचा... काँलेज मध्ये असून क्लास मध्ये कधीच नसणाऱ्या काँलेज मान्य बाद मुलांच्या वर्गवारीतला (category) केदार. काँलेजचा कट्टा, गण्याची टपरी आणि क्रिकेटच मैदान याशिवाय काँलेज मध्ये वेगळ काही नसत अस तत्त्वज्ञान बाळगणारा. थोड्याशा रागीट स्वभावामुळे त्याचे मित्र ही तसे कमीच होते. त्यामुळे अशा मुलींच्या जवळपास ही तो नसायचा. त्यांच्याशी मैत्री करन ही तर दुरचीच गोष्ट त्याच्यासाठी. मित्रांच्या टोळक्यात तिच खूप वेळा नाव त्याने ऐकलेल. रोज बस स्टँडवर येता-जाता दिसायची. येवढीच काय ती दोघांची ओळख.
तेवढ्यात दादर स्टेशन आल...सकाळच्या गर्दीत कुठे शोधायच हिला?... त्याने फोन काढला आणि त्याच नंबरवर काँल केला पण फोन कट झाला... पुन्हा केला पुन्हा कट झाला...वेडी आहे का ही? तो वैतागला... आधी स्वतःच फोन करुन बोलवायच वर फोन केला तर कट करतेय... सकाळी कोणत ओझ डोक्यावर येऊन पडलय... त्याची चिडचिड होत होती... थोडी गर्दी कमी झाली तसा तो प्लाटफोर्मवर शोधायला लागला... गर्दीतून वाट काढत तो मेन ब्रिजवर आला... ब्रिजवर त्याने दोन फेर्‍या मारल्या ती कुठेच दिसत नव्हती. त्याला tension यायला लागल. तेवढ्यात त्याला आठवल्या सारख झाल तसाच तो रत्नागिरीवरुन आलेल्या ट्रेनच्या प्लाटफोर्मवर नजर फिरवत धावत सुटला... धावता-धावता मागून हाक आली " केदार"
तो तसाच पाठमोरा थांबला... धावल्यामुळे त्याला दम लागला होता. शर्ट घामाने भिजल होत. श्वास वरखाली होत होता. एका हाताने चेहेऱ्यावरचा घाम बाजुला करत तो मागे वळला.
समोर ती उभी होती. गडद निळा पंजाबी ड्रेस हातात एक पर्स आणि बाजुच्या बेंचवर तिची बॅग होती...
माहित नाही पण काही तरी सापडल्याचा भाव तिच्या चेहर्‍यावर तिच्या हसण्यातून दिसत होता. तो तसाच बेंचवर येवुन बसला. धावल्यामुळे दम लागला होता...लगेच त्याच्या मनात चमकून गेल सिगरेटची लक्षण आहेत. कुणीच काही बोलल नाही. तिने हातातली पाण्याची बॉटल त्याच्या समोर केली. आणि थँक्स म्हणाली. पाणी पिऊन त्याने रुमालाने घाम पुसला. दोघ एकामेका जवळ बघुन काँलेज नंतर किती बदल झालाय दोघात आठवत होते. केदार मात्र आतून चिडलेलाच होता. ती ही बेंचवर आता थोडी दूर सावरून बसली. राग आवरत थोडासा चिडून केदार म्हणाला फोन कट का करत होतीस? शोधायच कुठे? त्याचा राग समजत होता तिला. त्याला थांबवत ति म्हणाली. मी माझ्या फोनवरुन तुला काँल नाही केला. माझ्या मोबाईलची बॅटरी संपली. सकाळी उतरले तेव्हा लक्षात आल. स्टेशनवर दोन मुली भेटल्या त्यांच्या फोनवर काँलस् केलेत...तु कदाचित निट बघितल नाहीस. 5 मिस काँल आहेत दोन नंबर वरुन" त्याने फोन चेक केला 5 मिसकाँल होते. तरी ही त्याला तिच इथे येण समजल नव्हत. थोड सावरून बसत त्याने विचारल तूला नंबर कुठून भेटला माझा आणि तू एकटी काय करतेस इथे?"
"तुझा नंबर फेसबुकवरून भेटला "इकडे तिकडे बघत ती म्हणाली" सांगते तुला सगळ पण आदी मला फ्रेश व्हायच आहे..." आपण इथून निघुया का?" "अग पण" त्याला बोलु न देता तिने बॅग उचलली "चालता चालता बोलु आपण" तस मग तो ही उठला. गर्दिची सवय नसल्याने तिला बॅग घेऊन चालता ना मेहनत करावी लागतेय बघुन त्यान बॅग हातात घेतली आणि तो चालायला लागला. गर्दित वाट काढत ती त्याच्या मागे चालत होती. मध्येच मागेवळुन केदार म्हणाला" कुणी नातेवाईक आहेत का इथे?" खर तर त्याला विचारायच होत तू घरातून पळून तर आली नाहीस ना? ती नाही म्हणाली,संशयाने बघत तो म्हणाला " कोणी मित्र वैगेरे?" " नाही, परवा लग्न आहे मैत्रिणीच पुण्याला. तर सगळ्या मैत्रिणी इथेच भेटुन सोबत जाणार आहोत. त्या उशीरा येतील. मीच जरा लवकर पोचले." बोलता बोलता दोघे ही स्टेशनच्या बाहेर आले. सगळ नंतर सांगते मला फ्रेश व्हायच प्लीज." हाताने दाखवत तो म्हणाला स्टेशनला लेडीज तिथे..." जाऊन आले पण ते थोड..." तिला काय बोलायच त्याला समजल. पण आता हिच करायच काय हेच त्याला समजत नव्हत. एक तर ही उगाच गळ्यात पडलीय च्याआयला या फेसबुकच्या...मैत्रिणीच लग्न यांच्या ताप माझ्या डोक्याला... घरी घेऊन गेलो तर सतराशे साठ प्रश्न... जाण्या येण्यातच वेळ जाईल. त्याला तसा विचार करत उभा बघुन ती म्हणाली " मला थोडी खरेदी करायची आहे त्यानंतर मी संध्याकाळी मैत्रिणी सोबत निघेन. तिच्या बोलण्याने याचा पारा वाढत चालला होता. तरी स्वतःला आवरल.
तो काही बोलला नाही तसे दोघे ही ऐकामेकासाठी अनोळखीच होते. त्याने बॅग तिच्या जवळ दिली आणि तो म्हणाला," आलो लगेच थांब इथेच" म्हणून निघाला. ५ मिनिटांनी तो टॅक्सी घेऊन वापस आला. बॅग उचलून मागच्या सीटवर ठेवली आणि तो पुढे ड्रायव्हरच्या बाजुला बसला. ती ही आत येऊन बसली. कुठे जायचय हे विचारायच धाडस तिला होत नव्हत. तो ओळखीचा असला तरी अनोळखी होता. तिच्या चेहर्‍यावर आता आश्चर्य आणि भीती दिसत होती. केदार ही तसाच डोक्यावर हात फिरवत कुठे फसलोय मी म्हणत रस्तयावरच्या बाजूने जाणाऱ्या गाड्यांनजवळ बघत विचार करत होता. १० मिनिटांनी टॅक्सी एका गेट मधून आत शिरली एका बिल्डिंग समोर थांबली. केदार उतरला तिच्या हातातली बॅग घेतली मग ती ही उतरली. ड्रायव्हरला पैसे देऊन तो बॅग उचलून आत जात होता. ती तिथेच थांबली बघुन तो मागे येत म्हणाला," दुसरा पर्याय नव्हता घरी घेऊन गेलो असतो पण येण्या जाण्यातच वेळ जाईल आणि घरी सतराशे-साठ प्रश्न विचारत राहतील. फक्त फ्रेश हो मग आपण निघू."
तिला ते पटल असाव. मानेने होकार देत ती त्यासोबत काऊन्टरवर आली. एक रुम बुक केली आणि तो पैसे देण्यासाठी पाकीट काढत होता त्याला थांबवत ती म्हणाली मी देते पैसे." तो नको म्हणत होता तरी तिने पैसे दिली. काऊन्टरवरचा मुलगा तिच्याकडे बघुन मिश्किलपणे हसला. चावी घेऊन दोघे रुम जवळ निघाले. केदार चिडून म्हणाला "तुला पैसे द्यायची काय गरज होती." "का काय झाल? मी दिले तर?" दरवाजा खोलत तो म्हणाला" कस समजावू तुला" दरवाजा उघडला दोन पावल आत जाऊन तसा तो तिथेच थांबला. मागून ती आत आली. दोघांनाही आता समजून चुकल चुकीच्या हाँटेल मध्ये आलोय. बेडची चादर विस्कळीत झाली होती. उशा खाली पडल्या होत्या. ते बघून घसा साप करत तो म्हणाला," तु फ्रेश होतेस ना" ती ही थोडी गोंधळली होती. मानेने होकार देत तिने बँग बाजुच्या टेबलावर ठेवली. आतुन टाँवेल आणि कपडे काढले आणि ती आत बाथरूम मध्ये गेली. ती गेली तस स्वतःवरच चिडत त्याने चादर उशा सरळ केल्या. बॅग बेडवर ठेवली.

१५-२० मिनिटांनी ती बाथरुम मधुन बाहेर आली. केदार तिथे नव्हता. टाँवेल बेडवर फेकत तिने हाक दिली केदार... तो नव्हताच तिथे... दरवाजा उघडायला गेली तर दरवाजा बाहेरुन बंद होता...ती खिडकी जवळ आली बाहेर बघितल तर तिथुन काही दिसत नव्हता तो. पुन्हा तिने दरवाजा वाजवला पण कोणी उघडत नव्हत. आता ती घाबरली... लगेच बॅग उघडुन तिने पर्स चेक केली पैसे चेक केले. मोबाईलची बॅटरी चार्ज करायला चार्जर बॅगेत शोधताना तिने सगळे कपडे बाहेर काढले. भीतीने तिचे हात थरथरत होते डोळ्यात आता पाणी येत होत कसा बसा चार्जर बोर्डला लावला आणि फोन चालु करायला लागली. तेवढ्यात बाहेरुन कडी खोलायचा आवाज आला तशी ती सावध झाली. भिंतीला ठेकुन उभी राहत ती दरवाज्याजवळ बघत होती. दरवाजा उघडुन केदार आत आला. दरवाजा लावत तो समोर बघतच राहिला भिंतीला टेकुन ती रडत होती. काही समजायच्या आत ती समोर येऊन त्याच्या गालावर तिचा हात चाप करुन बसला. कुठे गेला होतस येवढा वेळ? तो काही बोलला नाही. हातातल्या नाश्ताच्या पिशव्या त्याने तिच्या समोर केल्या आणि आता दोघांना ही हसू आवरत नव्हत.
टेबलावर दोन्ही पिशव्या ठेवून त्याने बेडवरच टाँवेल उचलून तिच्या जवळ केल. शांतपणे ते हातात घेऊन तिने चेहेरा पुसला...दोघांच्याही चेहर्‍यावर आता एक वेगळच हसु होत... " मी फ्रेश होतो म्हणत तो मग बाथरूम कडे वळला. ५ मिनिटानी तो बाहेर आला तोपर्यंत तिने दोघांसाठी नाश्ता पेपर डिश मध्ये तयार ठेवला होता... रुमालाने चेहेरा पुसत तो समोरच्या खुर्चीत येउन बसला... दोघांनाही अवघडल्यासारख झाल होत... जास्त वेळ शांत राहण दोघांनाही जमत नव्हत. बोलायला सुरुवात कुठुन करावी दोघांनाही प्रश्न पडलेला... न राहून त्यानेच मग बोलायला सुरुवात केली " तु मैत्रिंणीना काँल केलास का? नाही म्हणजे हवा तर माझा फोन घे. " विचार किती वेळ लागेल यायला. अचानक त्याच बोलण चालू झाल तसा हिचा गोंधळ उडला हे तिच्या चेहर्‍यावर दिसत होत. दोन सेकंद वेळ घेत ती म्हणाली, " हा बरी आठवण करुन दिलीस नाश्ता झाला की करेन काँल" त्या दुपार पर्यंत पोचतील बहुतेक म्हणत ती उठली आणि मोबाईल चालू केला... पुन्हा शांतता झाली... काही बोलायच म्हणून ती म्हणाली... पाण्याची बाँटल आणलीस का? त्याने लगेच पाण्याच्या दोन बाँटल तिच्या समोर केल्या... एक बाँटल घेऊन तिने बाजुला ठेवली. दोघांनाही समजत होत की बोलण्याचे आणि वागण्याचे प्रयत्न तसे मूर्खपणा सारखेच चालू आहेत. या गोंधळात स्वतःला सावरत त्याने पुन्हा बोलण चालू केल," मग घरी सगळे कसे आहेत?" अशा साध्या प्रश्नांनी बोलण सोप करायचा त्याचा प्रयत्न होता... "सगळे ठिक आहेत" उत्तरा सोबत तिचे प्रश्न चालु झाले..." तु बोल कस चालू आहे तुझ... कुठे जाँब करतोस?.... दोघातला संवाद आता सरळ साधा होत होता... बोलण्यात आलेल दडपण थोड हलक होत जात होत... बघत त्याने तिला विचारल" तू एकटीच आलीस कोणी मैत्रिण नाही सोबत काँलेजची..." पाणी पित ती म्हणाली नाही काँलेजच्या मैत्रिण नाहीत बरोबर...जिच लग्न आहे ती माझ्यासोबत नर्सिंगला होती रत्नागिरीत. ती पुण्याला राहते त्यामुळे तिच लग्न पुण्याला आहे...आणि सोबत येणार आहेत बाकीच्या मैत्रिणी..." पुढे काही फारस बोलण झाल नाही त्यांच्यात. नाश्ता करुन झाला. तोपर्यंत चार्जिंग झाली होती. तशी ती मोबाईल घेऊन बाहेर आली... दोन मिनिटांनी आत येऊन म्हणाली अजून २-३ तास लागतील त्यांना यायला. केदार पेपर डिश डसबिन मध्ये टाकत म्हणाला," बर " तेवढ्यात त्याचा फोन वाजला... डोक्याला हात लावत त्याने फोन उचला हँलो बोलत तो रुमच्या बाहेर आला... थोड्यावेळाने आत आला. ती पेपर हातात घेऊन बेडवर बसली होती... काही बोलायच म्हणून तो म्हणाला, " प्रवासात थकली अशील तर आराम कर तु?" " का पुन्हा न सांगता बाहेर जायच का तुला?" गालातल्या गालत हसत तिने चिमटा काढला. मानेने नकार देत हसत म्हणाला नाही आहे इथेच रुमच्या बाहेर... " त्यापेक्षा इथेच बस तू प्लीज" पुढे काही न बोलता मघाशी तिचा गालावर बसलेला हात आठवला असेल त्याला तो जाउन खुर्चीवर येवून पेपर वाचत बसला.
ऐव्हाना घडाळ्यात साडे अकरा वाजले होते. पेपर वाचून बोर झाल्याने त्याने मोबाईल मध्ये गेम चालू केला... सहज त्याची नजर तिच्यावर गेली... ती शांत आणि बिनधास्त झोपलेली बघुन त्याला आश्चर्य वाटल. हि तिच मुलगी आहे का? जी घाबरुन रडत होती. त्याला तिचा रडका चेहरा आणि मघाचा प्रसंग आठवला आणि स्वतःशीच हसा़यला लागला.

हिच्या बोलण्यातून हि तेवढी हि अखडु नसेल कदाचित... काँलेजला असताना कधी बोलण झाल नाही पण आज भेटण होतय याच त्याला आश्चर्य वाटत होत... आणि थोडा राग ही येत होता... लग्नाला जातेय तर सोबत प्रवास कुणी मैत्रीण आणायला काय होत हिला... जरी चेहऱ्याने ओळखायचा असलो तरी अनोळखी आहे पण हि अशी झोपलीय की हिला काळजीच नाही कशाची... वर नखरे काही औरच दिसतात हिचे... येवढ जरी त्याच्या मनात चालु होत तरी त्यात काळजी दिसत होती...स्वभावच रागीट असल्याने काळजी पेक्षा रागावताना त्याचा फक्त राग दिसायचा. किशातुन सिगरेटच पाकिट काढल. सिगरेट पेटवणारच होता की पुन्हा एकदा ती खरच झोपली आहे की जागती झोप आहे हे बघून घेतल. आणि सिगरेट पेटवून तो खिडकीजवळ उभा राहिला.

दोन तासात त्याच्या ४ सिगरेट ओढुन झाल्या होत्या... मागुन अचानक तिचा आवाज आला " किती सिगरेट ओढतोस रे?.... सिगरेटच्या वासाने रुम भरली होती. " जरा कमी कर ती सकाळी काळीजवर यायच बाकी होत" तिच बोलण तोफेच्या गोळ्यासारख त्याच्या कानावर आदळत होत... तशीच उठुन ती बाथरुम जवळ वळली तस त्याने खिडकी उघडुन पंखा फास्ट केला... ती बाहेर आली तशी त्याच्या हातात सिगारेट बघुन तीच रोखान बघन त्याला समजून आल. हातातली सिगरेट खिडकीतून बाहेर टाकत तो पुन्हा खुर्चीवर येवून बसला...
पुन्हा मोबाईल घेऊन ती रुमच्या बाहेर आली. सकाळ पासून ते आतापर्यंत तिच्या वागण्या बोलण्यातला फरक त्याला जाणवत होता... दोनदा ती बोली पण काही तरी खटकतय अस राहुन राहुन त्याला वाटत होत... त्याने घड्याळात बघितल तीन वाजत आले होते... ती आत आली आणि म्हणाली "निघुया आपण" मला थोडी खरेदी करायची आहे एक तासात मैत्रिणी येतील मग आम्ही बस ने पुण्याला निघु सोबत." दिवसभरतल पहिल वाक्य त्याला आतून शांत करुन गेल. ती तयारी करतेय म्हणून तो रुमच्या बाहेरच सिगरेट पित थांबला... काहि वेळाने ती बँग घेऊन बाहेर आली... दरवाजा लाँक करताना त्याच्या तोंडातली सिगरेट ओढुन घेत ती थोडी रागातच म्हणाली सोड ती आता...आणि जिन्याच्या पायर्‍या उतरत खाली निघाली... मागून हा तिची बॅग संभाळत रागात म्हणाला" नोकर समजली का ही मला" कसले नखरे यार हिचे...

आता टॅक्सी दादर मार्केटला थांबली...तशी खरेदी जास्त नव्हती. खरेदी झाली तशी ती म्हणाली बाजुलाच पुण्याला जायला ट्रॅव्हल असतील... पुन्हा त्याने टॅक्सी तिकडे फिरवली... यात वेळात दोघात तस बोलण झालच नाही... पण हिला कसली तरी घाई नक्कीच होती... म्हणून त्याने विचारल," आल्या वाटत मैत्रिणी तुझ्या?" त्याच्या जवळ न बघता ती म्हणाली नाही त्या निघाल्या पुढे थोडी चुकामुक झाली... हे बोलता तिच्या आवाज गोंधळलेले नव्हता पण काही तरी होत जे त्याला समजत नव्हत... ट्रॅव्हल जवळ उतरुन त्याने टिकीट काढल आणि तो प्रवासात पाणी लागेल म्हणून पाण्याची बॉटल आणायला गेला... ट्रॅव्हल सुटायला तसा अजून वेळ होता...
ट्रॅव्हल पासुन थोडी दुर बसयला जागा होती...तो तिथे आला आणि त्याने तिच्या हातात बाँटल दिली...तिला अस एकट बसलेल बघुन तो म्हणाला," आत निघेल थोड्यावेळाने पोचशील वेळेवर नको जास्त विचार करु." काहीच न बोलता त्याच्या जवळ बघत ती फक्त हसली.... " एक विचारु" तो म्हणाला मानेने नकार देत ती दुर कुठे तरी बघत होती... न राहून त्याने शेवटी विचारल, काय चाललंय तुझ?... सकाळी तू वेगळी होतीस आणि आता वेगळी दिसतेस... " तू खोट बोलतेस का माझ्यासोबत?...
दोन मिनिट शांत राहून ती म्हणाली," मी जे बोलेन ते तुला कदाचित आवडणार नाही आणि ते बोलून काही अर्थ ही नाही... पण तरी ही मला ऐकायच आहे. तो बोलताना शब्दांवर जोर देत बोलत होता. "ठिक आहे" बोलत तिने दिर्घ श्वास घेतला. तो ही आता तिच्या बाजुला बसला...

हा मी खोट बोलले... तो काही बोलणार होता पण तिने थांबवल... आधी ऐकून घे आणि मग ठरव मी का केल अस... पुन्हा एक दिर्घ श्वास घेत ती म्हणाली... पुण्याला कुणा मैत्रिणीच लग्न नाहीय... नाही कोणी मैत्रिणी मला इथे भेटायला येणार आहेत...मी पुण्याला जातेय हे खर आहे... समजत नाही कुठुन सुरुवात करु... बोलता बोलता शब्दांना जोडायचा ती प्रयत्न करत होती... मी इथे आलीय तुला भेटायला...तुला हे समणार नाही आणि मला ते समजून सांगता येणार नाही... वेडेपणा बोल हव तर माझा पण मी ज्याच्यासाठी आले ते जस हव होत तेवढ नाही पण थोडस त्यातून घेऊन जातेय मी. त्याला तिच्या बोलण्याचा अर्थच लागत नव्हता.. पुढे ती बोलत राहिली... काँलेजला असताना माहीत नाही तू कधी notice केलस का? पण तुझ्या मागे मुलींमध्ये खुप चर्चा रंगायच्या... तुझ्या मित्राची बहिण माझ्या वर्गातच होती. त्यामुळे त्याने सांगितलेले तुमचे किस्से अधुन मधुन कानावर येत असायचे. तुमच्या बद्दल काही मुली वाईट बोलायच्या तर काही तुमचे वेडेचाळे ऐकवायच्या... तुम्हाला क्लासरुम तरी माहीत होता का रे? ती स्वतःशीच हसायला लागली... कट्टयावरच तुमच बसन. रोजच काही तरी तिथुन नवीन ऐकु यायच... त्यात तुझ्या बद्दल जास्त बोलण होत होत. म्हणून की काय मी तुझ्या विषयी जास्त विचार करायला लागले. हे सगळं मी करत नव्हते ते होत होत... तसा तू कुणा मुली सोबत कधी फिरताना बोलताना दिसला नाहीस...म्हणजे हे हे ऐवढच कारण नाही जे तु मला आवडायला लागलास... आता ती आठवतय तस भराभर बोलत होती आणि तो तिच्या आठवणीनां स्वतःशी जोडुन घ्याचा प्रयत्न करत होता... तुझा तो फ्रेन्डशीप डे ला झालेला गोंधळ... पैजे खातर तू सगळ्यासमोर त्या जुनियर मुलीला बांधलेला बॅन्ड... त्यानंतर माझ्या मैत्रिणी आठवडाभर त्याच चर्चा करत होत्या... खर सांगु काहीना तू जास्तच over वाटायचास... पण या सगळ्यात मला मात्र तू इतर बोलतात तसा कधी वाटलाच नाहीस... माहित नाही का? पण एक वेगळेपणा वाटायचा... कदाचित तुझ्याबद्दल जास्त ऐकुन किंवा विचार करुन मला तस वाटत असेल...

एक दिवस अचानक तू दुपारी माझ्या बस मध्ये दिसलास... मला काही समजतच नव्हत हा इथे काय करतोय...मग समजल की आमच्या इथे क्रिकेट च्या मॅच साठी सगळे जात होता...आता त्याच मला हसू येतय. मी तुझ्या आधी बस मधून उतरुन घरी जाऊन काही न खाता तुझी मॅच बघायला आले आणि मग जाताना मला तुझ्या वागण्याचा आणि मित्रांचा राग आला... बिअर पिऊन कसे खेळता रे तुम्ही.?.. तुमच्या बॅगा बिअर साठीच होत्या असच वाटायच मला. त्यानंतर तुझ्या पासून दुर राहिलेलच बर अस ठरवल... शक्य तो प्रयत्न केला तरी ही तु समोर यायचास...येवढच काय तर जाण्या येण्याचा टाईम ही बदलला मी. आणि त्यात student meeting मध्ये तुम्ही केलेला राडा समोर आला....तुमचा मुद्दा चुकीचा नव्हता पण विरोध करायची पध्दत चुकीची होती... यात तुमच्या मित्रांवर बाकी मुलींकडून तोंडसुख घेण चालुच होत. मग अशात मीच माझ्या मनात कदाचित तुला रंगवत गेले... खर तर तो बावळटपणा होता माझा पण ते होत... " आणि ती थांबली.

तो खुप वेळ शांत होता," आता त्याचा रागाचा पारा वाढला होता... तुला हेच सांगायच होत म्हणून आलीस का इथे? एकटी? जरा तरी अक्कल आहे का? घरी कुणाला माहित तरी आहे का तु आहेस कुठे? जरी मी चेहेऱ्याने ओळखीचा असलो तरी अनोळखी होतो... आज तुझ्या सोबत काही बर वाईट झाल असत तर कोणाला समजणार होत? हेच बोलण तुझ फोनवर फेसबुकवर होऊ शकल असत ना? कुठे आहेस कुणाला माहित नाही कुणासोबत आहेस माहित नाही? तुला जरा ही भीती नाही वाटली? कसला मुर्खपणा आहे हा?
त्याचा राग तिला समजत होता. पण कदाचित ती आपल बोलण त्यांच्या पर्यंत पोहचहू शकली नाही... त्याच्या रागामुळे तिचे डोळे पाणावले बघुन आपण जास्तच बोललो अस त्याला वाटायला लागल...पुढे तो काहीच बोलला नाही...
ती म्हणाली हा आधी मला ही वाटलेला हा मूर्खपणा.... आणि डोळ्यांच्या पापण्या पुसत हसत म्हणाली, मला माहित होत की तुला हि हा वेडेपणा वाटणार... दोन सेकंद स्वतःच्या भावनांना काबु करत ती बोलू लागली....काँलेज संपल्यानंतर तू पुन्हा कधी दिसला नाहीस... कदाचित माझा तसा समज झालेला... माझच मला सुचत समजत नव्हतं.... मी प्रयत्न केला कि चुकुन ही तुझा विषय मनात आणायचा नाही. पण मेंदू आणि मनात रोजचीच भांडण चालू होती... ते आकर्षण होत की ते प्रेम तेव्हा कळतच नव्हत... मला सतत वाटायच की तुला समजून घ्याव... लोक म्हणतात तसा तू आहेस की मी जस तुझ चित्र रंगवत होते तसा तू आहेस.... प्रेमाच हे अस असत जितका वेळ ते बंद करुन ठेवतो तेवढच ते मनाचे दरवाजे जोरजोरात ठोकत.... मला तुझा एक दिवस हवा होता तुझ्या आयुष्यातला...

तु म्हणालास भीती नाही वाटली एकटी यायला? खर सांगू सोप्प नव्हत रे माझ्यासाठी येवढ करन.... गावातून कधी कुणाच्या सोबती शिवाय बाहेर पडायची हिम्मतच नाही झाली कधी.... पण यावेळी मनाने काही वेगळच ठरवल होत... मला तुझ माझ्यावर प्रेम आहे का? हे विचारायच नव्हतच कधी.... नाही ते आता शक्य आहे. मला ही माहित होत की तुझ ही आयुष्य वेगळ आहे... तुझ्याही आयुष्यात कुणी दुसर असेल... पण जेवढा विचार करायची तेवढा गुंता वाढायचा.... काँलेजला कधी तुझ्यासमोर उभ राहयची हिम्मत झाली नाही कारण तुझ्या रागीटपणाचे किस्से ऐकुन होती... कदाचित स्वतःला नकार भेटेल हि भीती ही होती कुठे तरी... तुझा नंबर खर तर तुझ्या मित्रा कडुनच घेतला होता मी.... खुप दिवस मोबाईल समोर ठेवून काँल करु कि नको यातच अडकली होती... जरा ही हिम्मत झाली नाही.... येवढ्या वर्षानंतर काय बोलणार होते मी...

रात्री ट्रेन मध्ये बसली तेव्हा पासून स्वतःच्या निर्णयावर शंका घेत होते.... रात्रभर झोप लागली नाही... सतत स्वतःला हिम्मत देत होते... रात्र खूप मोठी वाटत होती... तो फोन उचलेल का? उचलला तर तो येईल का? नाहीच आला तर....? प्रश्नांनीं नुसती बैचेन होत होती.... स्टेशनला उतरले आणि ती गर्दी बघुन आता स्वतःच्या पायावर दगड मारुन घेतय असच झाल त्यात मोबाईलची बॅटरी संपली.... एका मुलीचा फोन घेऊन तुला काँल केला पण तू उचलत नव्हतास....जर तू आला नसतास तर मी इथे दिवसभर तुझी वाट बघत राहिली असते वेड्यासारखी आणि स्वतःच्या निर्णयावर स्वःताला दोष देत पुण्याला निघाली असती. पण खर सांगु तू फोन उचलास आणि थोड बर वाटल मला... पण एका अनोळखी मुली साठी तु येशील की नाही माहित नव्हत... पण तु जेव्हा धावत समोरुन जात होतास तेव्हा माझा निर्णय चुकला नव्हता हे मला समजून आल. कुणाला येवढी काळजी असते रे कुणाची... तू यावस अस काही विषेश नव्हत आपल्यात पण तू आलास... एखाद्या अनोळखी माणसासाठी कोणी येवढ नाही करत... आणि तुला तशी गरज ही नव्हती... तरी तु आलास... खर तर तुला बघुन डोळ्यात पाणी येत होत पण तरी तू थोडा रागातच होतास... मला सुचत नव्हत की काय बोलू... पण त्या रागात तुझी काळजी दिसत होती... आता राहिला भरवसा तर भरवसा ठेवण ही कठीण होत... एकाच रुम मध्ये एकटी निवांत कशी झोपू शकत होते मी... मनात खूप शंका होत्या पण रिस्क घेण तेवढच हातात होत माझ्या.... तु बाहेरून कडी लाउन गेलास तेव्हा स्वतःला खूप कोसत होते मी....आतून एकदम कोसळून गेले होते... या एका दिवसात माझ्यासोबत तु काही करु शकला असतास.... पैसे घेऊन पळाला असतास किंवा माझ्यासोबत काही वाईट ही केल असतस आणि कुणाला त्याची खबर ही नव्हती.... पण तुझ्या ते स्वभावतच नव्हत.... मी ज्याच्यावर प्रेम केल तो नेमका कसा आहे बघायला खूप वेळ लागला नाही... तू नव्हताच कधी तसा जसे लोक म्हणायचे... मी बरोबर होते हे तू प्रत्येक वेळी जाणीव करत राहिलास... ज्याच्यावर प्रेम केल त्याच्या सोबत एकाच रुम मध्ये एकाच छताखाली राहता आल... तुला भेटता आल तुझ्याशी बोलता आल याशिवाय दुसर काही नको होत मला. मला तुला सांगायच नव्हत की माझ प्रेम आहे तुझ्यावर नाही मला तुझ उत्तर हवय... आता सगळ्याला उशीर झालाय...

तेवढ्यात ट्ँव्हलस सुरु झाली... प्रत्येकजण आत जात होता.... त्याला अजुन ही स्वतःच्या कानावर विश्वास नव्हता... मला तुझ्यासोबत तुझ्या आयुष्यातला ऐक दिवस मिळाला तु तो दिलास थँक्स माझ्या वेडेपणाला या एका दिवसात तू सांभाळून घेतलस....

हा मी खोट बोलले पुण्याला मैत्रिणीच लग्न आहे... खर तर लग्न माझ आहे... हा माझा वेडेपणा मुर्खपणा समज पण हे खूप महत्त्वाच होत माझ्यासाठी....
तिचे डोळे पाणावले होते की तिला पुढे काही बोलता येत नव्हत...कदाचित तिला डोळ्यातल पाणी त्याला दाखवायच नव्हत ती तशीच मागे फिरली आणि बॅग घेऊन बस मध्ये चढली....बस त्याच्या समोरुन निघुन जात होती आणि तो तिथे एकटाच उभा होता... तिचा चेहरा आठवत.....