समुद्र आणि हवा यांच्यातील संवादाची ही कथा आहे.
एके दिवशी समुद्रकिनारी एक मूल खूप जोरात रडत होतं. आणि म्हणत होता की हा समुद्र चोर आहे! त्याने माझी चप्पल चोरली! माझी चप्पल समुद्राने घेतली!
थोडं जवळच एक म्हातारी बाई रडत रडत होती. आणि म्हणत होते की या समुद्राने माझ्या मुला ला गिळून टाकलं आहे! या मारेकऱ्याने माझी आधाराची काठी पाण्यात नेली! इथे एका मच्छिमाराने गळा काढला आणि म्हणाला हा समुद्र किती क्रूर आहे, माझ्याकडे एकच जहाज आहे! तोही त्याच्या वेगवान पाण्याच्या लाटांनी वाहून गेला.आता माझ्या आयुष्यात मी पुढे माझा प्रपंच कसा चालवू.
हे सर्व कहाणी ऐकून हवेला ही खूप वाईट वाटले आणि पाण्याला सांगितले तू किती क्रूर आहेस, या गरीब लोकांवर इतका अन्याय का करतोस! वाऱ्याचा आवाज ऐकून सागर म्हणाला, तू उद्या माझ्याकडे ये, मी असा करतो का की नाही हे शोधायला.
दुसर्या दिवशी समुद्रकिनारी एक मूल जोरात नाचत होते आणि म्हणत होते, मम्मी, हे बघ, आज मला समुद्राने एक बॉल दिला आहे. कचऱ्यातून मुलाला एखादा बॉल मिळाला असावा आणि तो वारंवार समुद्राकडे जाऊन त्याला थँकयू बोलत होता. धन्यवाद देत होता.
काही अंतरावर एक मच्छीमार हात जोडून गुडघ्यावर बसून समुद्राला म्हणत होता, अरे सागरा, आज तू माझ्यावर एवढी मोठी दया दाखवलीस, तू मला इतके मासे दिलेस, माझे आणि माझ्या कुटुंबाचे सर्व जीवन आता सुरळीत सुरू होईल. यशस्वी होईल! पुन्हा पुन्हा धन्यवाद!
हे पाहून वाऱ्याला काही समजत नाही, शेवटी या समुद्राला काय म्हणावे, चांगले की वाईट! त्यात सागर हसत म्हणाला की, माझे काम रोज किनाऱ्यावर येणे आणि परत जाणे.मला त्यांच्या अनुभवातून काहीतरी सांगणे हे त्यांचे काम आहे. त्यांचे म्हणणे ऐकून मी माझे काम सोडू शकत नाही ना ? कालच्या मुलाचे की आजच्या मुलाचे कोणाचे ऐकावे?
तुझं मन हा तुझा आरसा आहेस आणि मनाला आरशात पाहत रहा , ज्यांचा मन खराब आहे त्यांनी स्वतः ची काळजी करावी. कदाचित कोणी तुम्हाला टोमणे मारेल, कोणीतरी तुम्हाला तुमच्या भूतकाळाची आठवण करून देईल, कोणीतरी तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करेल, कोणीतरी तुम्हाला समस्या सांगेल! बरेच लोक तुमची हेटाळणी करतील! तसेच इतरांमुळे असंख्य लोकांनी आपली स्वप्ने मारली आहेत.
या जगात जो तो आपापला प्रपंच करीत असतो. तरी काही माणस दुसऱ्याच्या आयुष्यात लुडबुड करीत असतात.माणस हा सरडा कसा रंग बदलतो तशी माणस पण आपापली रंग कायम बदलत असतात! जर तुम्ही यशस्वी झालात तर लोक म्हणतील की आम्हाला आधीच माहित होते की तू नक्कीच यशस्वी होणार! बाळाचे पाय फक्त पाळण्यात दिसतात!
तुम्ही अयशस्वी झालात तर लोक म्हणतील आम्हाला माहीत होते! तू त्याच्या आयुष्यात काहीही करू शकणार नाही! तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुमच्या क्षमतेवर, तुमच्या आयुष्यावर, तुमच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे केले तर!
तोच माणूस या जगात काहीतरी मोठे पाहतो, जो निराश होतो,तरीही आशा सोडत नाही आणि आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करू लागतो.
झाडाला कितीही पाणी दिले तरी त्याला वेळेवरच फळ येते, त्याचप्रमाणे प्रत्येक कर्माचे फळ ठराविक वेळेनंतरच मिळते.
जर तुम्ही अपेक्षांना धरून असाल तर उत्साही राहा... कारण जेव्हा अपयश शिखरावर असते तेव्हा यश अगदी जवळ असते.
मित्रांनो, जेव्हाही तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल तेव्हा तुमच्या आयुष्यासमोर नक्कीच काही प्रश्न उभे राहील!
या कथेतून शिका, जे तुमच्या क्षमतेवर सवाल उठवतात. तो त्यांचा अनुभव दाखवतो! असा त्यांचा अनुभव असू शकेल. तुम्हाला काही फरक पडणार नाही! तुम्हाला दोन कान दिले आहेत. एक चांगला घेण्यासाठी कायम सताड उघडा ठेवा आणि दुसऱ्या कानाने जे तुम्हाला प्रेरणा देत नाहीत ,तुम्हाला मानसिक रित्या दुर्बल करीत आहेत अश्यांचे शब्द दुसऱ्या कानाने बाहेर टाकत रहा.
तुम्ही तुमचे बेस्ट देत रहा ,प्रयत्न करीत रहा आणि एक ना एक दिवस यश नक्की मिळेल.
समाप्त
अर्चना डुबल