Arranged marriage - 1 Saavi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Arranged marriage - 1

संध्याकाळची वेळ होती. हिमानी तिच्या सासूबाई सोबत गार्डन मध्ये बसलेल्या होत्या.
संध्याकाळचे वातावरण खूप आल्हाददायक झाले होते. थंडीचे दिवस होते म्हणून थोडासा गारवा वाढला होता.
सासू आणि सुन त्यांच्या गप्पा गोष्टीत गुंतल्या होत्या. बोलता बोलता अचानक हिमानी च्या सासूबाई शांत झाल्या. त्यांचे डोळे पाणावले होते.

हिमानी तिच्या सासूबाई ला असं बघून अस्वस्थ होते. ती त्यांच्या हातावर हात ठेवून त्यांना काळजीने विचारते.

हिमानी : आई .. काय झालं??? 😟😟

सासूबाई : हिमानी बाळा... आपली कंपनीची अवस्था सध्या ठिक नाही आहे. हे ( हिमानी चे सासरे) पण खूप टेंशन मध्ये आहेत सध्या. कंपनी ला पुर्ववत करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल पण त्यांची ( हिमानी चे सासरे ) तब्येत पण आता ठिक नसते.
आणि कृतार्थ ( हिमानी चा नवरा)तर आम्हाला नजरे समोर ही बघायला तयार नाही.
ना आमचं काही ऐकायला तयार आहे.😢😢

( त्या तिच्या डोळयातील अश्रु आवरण्याचा प्रयत्न करित बोलत असतात)

हिमानी : पण आई असं काय झालंय जे कृतार्थ असे वागत आहेत??? त्यांनी कंपनी joined केली तर चांगली गोष्ट आहे ना... मग ते का नकार देत आहेत??? 😕😕
( तिने न समजून विचारले)

सासूबाई : कृतार्थ गेल्या पाच वर्षापासून असा वागतो आहे. जी चुक आम्ही कधी केलीच नाही त्या गोष्टीची शिक्षा तो आम्हा दोघांना देत तर आहेच पण स्वत:ला ही देत आहे. 😔😔
( त्या नाराज होत म्हणाल्या)

हिमानी : मला समजले नाही आई..😕

सासूबाई : कृतार्थ आमचा मोठा मुलगा. त्याच्या नंतर सुजाता आणि यश हे दोघे जुळे. कृतार्थ लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. तो शाळेत असताना त्याचे जास्त मित्र नव्हते. थोडेच होते पण त्यांना फार जीव लावायचा. त्यातीलच एक त्याचा best friend विराज.
कृतार्थ आणि विराज दोघांनी पण त्यांच graduation सोबतच पुर्ण केले होते. Graduation नंतर पण कृतार्थ ला पुढे शिकण्याची इच्छा होती म्हणून कृतार्थच्या बाबांनी त्याला अमेरिकेला पाठवले पुढच्या शिक्षणासाठी.
घरची परिस्थिती तशी चांगलीच. परांजपे कंपनी कृतार्थ च्या बाबांनी मोठ्या मेहनतीने टॉप वर नेऊन ठेवली होती.
विराज कृतार्थ चा जिवलग मित्र असल्याने त्याचं इथे घरी येणं व्हायचं. आम्ही पण त्याला बराच जीव लावला. साध्या घरातुन होता तो. विराज ला पुढे शिकवण्यासाठी जमत नव्हते म्हणून कृतार्थच्या बाबांनी विराजला विचारले होते की जर त्याला पण पुढे शिकायची इच्छा असेल तर त्याचा शिक्षणाचा पुर्ण खर्च ते करतील.
पण विराज ने त्यावेळेस नकार दिला. त्याला आता नोकरी करायची आहे असं तो म्हणाला होता म्हणून कृतार्थ च्या बाबांनी त्याला आपल्याच कंपनीत नोकरी देण्याचे ठरवले. आम्ही सगळेच खुश होतो. कृतार्थ पण खुश होता. त्याच्यातच तो अमेरिकेसाठी निघून गेला.
विराज ने आपली कंपनी जॉईन केली होती. पुढचे 6 महिने तो खूप चांगल काम करायचा. मुळात तो हुशार होता. पण नंतर नंतर त्याचा बिहेवियर बदलू लागला. त्याने लपुन छपून आपल्या कंपनीचे महत्वाचे प्रोजेक्ट चोरी केले आणि इतर opposit कंपनीला विकले.
तो असं काही करेल कोणालाच वाटलं नव्हतं.
कंपनीतील important projects हा चोरी करुन इतर कंपनीला दुप्पट किंमतीत विकायचा त्या मुळे कंपनी तोट्यात जाऊ लागली. कोणालाच काही कळत नव्हते की कंपनीचे नुकसान का होते आहे. कृतार्थ च्या बाबांनी त्यांच्या माणसांना त्या व्यक्तीला शोधून काढायला लावले जो कंपनीला धोका देत होते.
जेव्हा त्या माणसांनी शोध घेऊन कृतार्थ च्या बाबांना सांगितले की विराज आहे ज्याच्या मुळे कंपनीला नुकसान होत आहे. हे ऐकून तर आम्हा कोणालाच खरं वाटलं नव्हतं पण त्यांनी काही पुरावे दाखवले. त्या माणसांनी विराज ला आपल्या कंपनीच्या compititive company च्या इतर व्यक्तींसोबत बोलताना आणि त्यांना काही file देतानाचे फोटो त्यांनी दाखवले.
कृतार्थ च्या बाबांना तर फारच धक्का बसला होता. तरीही त्यांनी त्याला पुन्हा असं काही करायचं नाही म्हणून warning देऊन सोडले होते. विराज ने पण असं पुन्हा काही करणार नाही म्हणून वचन दिले. मग कृतार्थ च्या बाबांनी त्याला पुन्हा आपल्या कंपनीत नोकरी करायला चांस दिला.
त्याने परत काम करायला घेतलं. पण म्हणतात ना.. मुळ स्वभाव कधीच बदलत नाही. काही वेळाने त्याने परत कंपनीत घोळ घालायला सुरुवात केली.
मग नाईलाजाने कृतार्थ च्या बाबांनी त्याला जेल मध्ये पाठवले. विराज जेल मध्ये आहे हा धक्का त्याच्या आई बाबांना सहन झाला नाही ते हे शहर सोडून त्यांच्या मुलीकडे राहायला गेले कायमचे.
आम्हाला वाटले की काही दिवस जेल मध्ये राहिल तर तेव्हा तरी तो सुधरेल. पण एक दिवस अचानक जेल मधून फोन आला आणि कळाले की विराज ने जेल मध्ये आत्महत्या केली आहे. आम्हाला तेव्हा झटकाच लागला होता. त्याच्या बॉडी ला पोस्टमोटर्म साठी पाठवले गेले.त्या नंतर काही माहित नाही.
त्या घटने नंतर एका आठवड्याने कृतार्थ घरी आला आणि आल्या आल्या त्याने त्याच्या बाबांवर आरोप केला की विराज च्या मृत्यु ला ते जबाबदार आहेत. आम्ही हे ऐकून तर पुरते शॉक झालो होतो.
खूप प्रयत्न केले आम्ही त्याला समजावण्याचा पण तो आमच्याशी एक शब्द ही बोलायला तयार नाही.
तो तेव्हा पासून परत अमेरिकेला गेला तो कधी परत आलाच नाही.
आता 2 वर्षापूर्वी तो परत घरी आला अमेरिकेतून तेही आमच्या साठी नाही तर सुजाता आणि यश साठी.
कृतार्थ ने त्याच्या बाबांशी बोलणे तर सोडले पण त्या दिवसापासून तो माझ्याशी पण बोलला नाही.
विराज एवढा जवळचा होता का ग की तो आमच्याशी असा वागतो. आई च काळिज आहे शेवटी. मुलगा समोर असुन पण खूप अंतर आहे आमच्यात. कृतार्थ चे बाबा पण खूप दुःखी आहेत पण ते कधी बोलून नाही दाखवत.
कृतार्थ ला काही बोलले पण त्याने जर हे घर सोडून जायचा निर्णय घेतला तर?? म्हणून आम्ही त्याला काही बोलत नाही.
पण सध्या कंपनीला त्याची गरज आहे. यश आणि सुजाता दोघेही अजुन शिकत आहेत. म्हणून कृतार्थ चे बाबा अजुनही कंपनी चालवत आहेत. पण त्यांची तब्येत खरंच खूप गरज आहे.

त्या बोलत होत्या पण शेवटी त्यांच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा त्यांच्या गालावरून वाहायला लागलेच.

हिमानी ला त्यांना असं बघून खूप वाईट वाटतं. ती तशीच त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती.

काही वेळाने त्या शांत होत हिमानिशी बोलायला लागतात.

सासूबाई : हिमानी.. बाळा तू एकदा कृतार्थ सोबत बोलुन बघ ना... त्याला तयार कर ना आपली कंपनी जॉईन करायला...🥺🥺🥺

( त्या खूप आशेने बघत होत्या हिमानी कडे )

हिमानी तर गोंधळून जाते.

हिमानी : आई... मी कसे सांगू त्यांना?? 😥😥

सासुबाई : अगं बाळा तू आता बायको आहेस त्याची... प्लिज त्याला तयार कर ना.. नाहीतर कृतार्थ च्या बाबांची वर्षानुवर्षांची मेहनत काहिच महिन्यात धुळीत मिसळेल. 🥺🥺

त्यांना असं बघून हिमानी ला नकार द्यायला जमत नाही म्हणून ती पण होकार देते.


काहिवेळ थांबून दोघीपण घरात जातात आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करतात.

जेवण रेडी झाल्यावर हिमानी, तिचे सासू सासरे आणि सुजाता, यश सोबतच जेवण करतात पण कृतार्थ नसतो.


जेवण झाल्यावर सगळे आपल्या आपल्या रुम मध्ये निघून जातात.

हिमानी पण तिच्या रुम मध्ये असते.
घड्याळात बघते तर रात्रीचे 8:30 वाजलेले असतात. ती स्वत:शीच बोलत असते.

हिमानी : आताशी फक्त 2 महिने झाले आहेत आमच्या लग्नाला पण कृतार्थ यांना एकदा पण नीट बघीतले नाही. एकतर रात्री लेट येतात घरी आणि सकाळी लवकर जातात. 😤😤
बायको चे काही महत्त्वच नाही यांना. आणि हे असं कसं करु शकतात त्यांच्या आई बाबांसोबत. कृतार्थ ने आई बाबांच ( सासू सासरे) काहिच ऐकून घेतले नाही आणि त्यांनाच उलट दोषी ठरवले. त्यांचा आई बाबांबद्दल असलेला गैरसमज दूर करायला लागेल.
आता तर यांना येऊ देच चांगलीच बघते!!!
आमची जास्त भेट पण झाली नव्हती लग्ना अगोदर.... मोजून 2 वेळा भेटले होते पण त्यात ही ते महाशय अगदी शांत. जसं की त्यांच तोंड हे फेविकॉल ने चिपकलेल आहे. 😤😤
आज तर मी त्यांना कंपनी जॉईन करायला भागच पाडणार आहे. एवढे अमेरिकेत शिकुन आले ते काय फक्त मिरवायला??
मी जर एवढी अभ्यासात हशार असती ना तर आतापर्यंत तर अर्ध जग जिंकल असते.... पण काय करु लहानपासूनच माझा आणि अभ्यासाचा छत्तिस चा आकडा आहे.
पल्ले ही नहीं पडता मेरे😤😤

ती बराच वेळ कृतार्थ ची वाट बघत असते... रात्रीचे 10 वाजले होते तरी त्याचा काही पत्ता नसतो.

बिचारी हिमानी सोफ्यावर बसली होती. तिला खूप झोप येत होती तरीही जबरदस्तीने तिने डोळे उघडे ठेवले होते.

दारू प्यायलेल्या बेवडयाला पण एवढी नशा चढत नसेल जेवढी हिमानी ला झोपेची चढली होती.

ती समोर असलेल्या बेड ला बघून बोलते.

हिमानी : माझा बेड... अरे तू तो जान है मेरी... जी तो करता है तेरे गोद में सो जाऊ... लेकीन पहले पतिदेव को तो आने दो...😤😤
10 वाजून गेले पण ह्यांचा पत्ता नाही... मी या वेळेस तर माझ्या स्वप्नात असते...😕
देव न करो पण ह्यांची कोणी बाहेर दुसरी आहे तर नाही ना.. जिला हे माझी लाडकी सवत बनवण्याचा प्लान चालू असेल... तर मग मी काय करेन??🤯🤯🤯 तसेही हे अमेरिकेतून आले आहेत... दुधासारखी पांढरी विदेशी गर्ल भेटली असेल तर??? देवा रे!!!! नको असे दिवस दाखवू रे...🤯🤯

कृतार्थ ची वाट बघता बघता तिने आपल्याच विचारांचे घोडे सैरभैर सोडले होते.
काय करणार बिचारी प्रचंड प्रमाणात झोप जी लागत होती.

एखादी विदेशी मुलगी यांच्या आयुष्यात असेल हा विचार करुन तर तिने पटकन सोफ्यावरुन उडी मारली.

ती तिथेच येरझारया मारत होती. स्वत:च्याच विचारांत गुंतली होती.


हिमानी : आई शप्पथ सांगते.. ह्यांनी जर विदेशी गोरी पटवली असेल ना तर आधी त्या तीला आग लावेन नंतर कृतार्थ ला एखाद्या देशी जादूटोणा बाबा कडे घेऊन जाईन आणि त्यांना सांगेन.... की हे ' बाबा यांना अशी जडीबूटी द्या की जी प्यायल्यावर ह्यांना फक्त माझे वेड लागेल... आयुष्यभर माझ्या शिवाय कोणी दुसरी कोणी दिसलीच नाही पाहिजे...'😤😤

ती विचारात हरवलेली असते जेव्हा... कृतार्थ येतो.
त्यांच्या रुम चा दरवाजा उघडाच होता.
तो बाहेरूनच पाहतो आणि स्वत:शीच बोलतो.



कृतार्थ : हिला काय झालंय आज??? चक्क एवढ्या लेट पर्यंत जागी आहे..?? मी येतो तो पर्यंत तर ती स्व्प्नांनाच्या नगरीत असते.. मग आज काय झालं?? जाऊ दे ना मला काय करायचं आहे... 😑

तो खांदे उडवत आत गेला तरीही तिचं लक्ष नव्हतं... त्याने त्याच्या wardrobe मधून त्याचे कपडे बाहेर काढले आणि बाथरुम मध्ये गेला. दरवाजा च्या आवाज येतो तेव्हा ती भानावर येते.
तो आला हे तिला समजते..

हिमानी : आई शप्पथ!!! हे कधी आले?? जाऊदे आले एकदाचे ... नाही तर मी तर जरा जास्तच विचार करत होती. 😅😅 मला माझ्या नवर्यावर विश्वास ठेवला पाहिजे..

ती परत सोफ्यावर जाऊन बसते.. ती त्याची बाहेर येण्याची वाट बघत असते.


10 मिनिटं झाली तरी तो बाहेर आलेला नसतो.

हिमानी ( मनातच ) : मी मुलगी असुन पण मला फक्त 5 मिनिटे लागतात अंघोळ करायला.. हा म्हणजे कावळा अंघोळ करते तर काय झालं..पण लवकर करते ना ते महत्त्वाचं..😁😁
अजुन कसे नाही आले हे बाहेर.. झोपले तर नाही ना आत मध्ये...🤔🤔 बघते बर..


ती हळूच बाथरूम च्या दरवाज्यापाशी जाते. ती दरवाज्याला कान देऊन काहीतरी ऐकायचं प्रयत्न करते.तेवढ्यात कृतार्थ बाथरूमचा दरवाजा उघडतो तशी ती डायरेक्ट त्याच्या शरीरावर आदळते.


तिचे खंद्यापर्यंत असलेले छोटे केस तिच्या डोळयावर येतात. क्षणभर तर
दोघांनाही समजत नाही. कृतार्थ जरा भानावर येत सावरतो आणि तिला बघतो तर तिचं तोंड अजुनही त्याच्या छातीवर असते.. तो तिलाच बघत असतो पण निर्विकारपणे.

तिला भान येते तसं ती पटकन बाजूला होते.. आणि इकडे तिकडे बघत तिचे छोटे केस नीट करते. नंतर चोर डोळ्याने ती त्याच्या कडे बघते. तो तिलाच बघत असतो. तिला हे समजल्यावर तर तिच्यात धस्स होतं. ती भितीचा आवंढा गिळून स्वत:लाच शिव्या देते..

हिमानी : ( मनातच) हेमू... मूर्ख कशाला वेडयागत करते.. बघितलंस ना.. कसे बघत आहेत😱😱😱


कृतार्थ तिला एक नजर बघून सोफ्यावर जाऊन बसतो.
तो शांतच असतो. तो सोफ्यावर झोपण्याच्या तयारीत असतो.
लग्न झाल्यापासून तो सोफ्यावरच झोपत असतो पण हिमानी ला हे माहित नसतं कारण तो रात्री येण्या अगोदर ही झोपलेली असते आणि तो सकाळी लवकर बाहेर निघून जातो तेव्हाही ती झोपलेली असते.

तो झोपणार तेव्हाच ती त्याला हाक मारते..


हिमानी : कृतार्थ!!! मला बोलायचं आहे...😅😅
( ती awkward smile देत म्हणाली )

कृतार्थ तिला प्रश्नार्थक नजरेने तिला बघतो.

तिच्या चेहर्यावरचे हावभाव तो वाचण्याचा प्रयत्न करित असतो.

थोड्या वेळाने तो तिला बोलण्यासाठी डोळ्यांनीच इशारा करतो.

हिमानी हळूच त्याच्या समोर येऊन उभी राहते.



हिमानी : हे बघा.. मला गोल गोल फिरवून गोष्टी करता येत नाही म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सांगते.. तुम्ही आपली कंपनी जॉईन करा.. जर तुम्ही आपल्याच कंपनीला मदत केली नाही तर आपली कंपनी बंद पडेल आणि आपण सर्व रस्त्यावर येऊ. म्हणून तुम्ही आपली कंपनी जॉईन करुन तिला पूर्वस्थितीवर आणा...
मला माहित आहे तुम्हाला आई बाबांचा राग येतो पण यश आणि सुजाता चा विचार करा एकदा... यश आणि सुजाता ला तुम्ही रस्त्यावर बघू शकता का??

( ती सगळं एका दमात बोलुन देते. तिलापण कळत नाही की ती काय काय बोलली आहे)

कृतार्थ फक्त तिला बघत असतो. चेहर्यावर कोणतेच भाव नसतात.

त्याला बघून तर तिला कळतच नव्हतं की त्याच्या मनात काय चालू आहे.


कृतार्थ : यश आणि सुजाता च काय करायचं हे मला चांगलच माहित आहे. तुला सांगण्याची गरज नाही. आणि राहिला प्रश्न कंपनी जॉईन करण्याचा तर ते तर मी अजिबात करणार नाही. आणि मला कोणी फोर्स करु पण शकत नाही. जर कंपनी bankrupt झालीच तर तु पण तर एका नावाजलेल्या कंपनीच्या मालकाची मुलगी आहेस. तू तर जाशील ना हे घर सोडून तुझ्या माहेरी. मग तुला काय एवढी काळजी आहे?? तुझ्या वर वाईट दिवस नाही येणार आहेत.

तो तिच्यावर नजर रोखत म्हणतो.
तशी हिमानीची सटकते.
ती रागाने कमरेवर दोन्ही हात ठेवून त्याच्या कडे मोठे डोळे करुन म्हणते.

हिमानी : ओह... hello Mr. आता मी तुमची जबाबदारी आहे बायको म्हणून... मग आता तुमच्या सोबतच राहीन ना.... या घरची कंपनी जर bankrupt झाली ना तर तुमच्याच बाजूला मला पण रस्त्यावर बसवा वाटी घेऊन भीक मागण्यासाठी. त्या भिकेतून जेवढे पैसे भेटतील ना.. त्यातून पाव भाजी बनवण्याचा धंदा करावा लागेल. समजलं ना मी काय बोलते आहे???
म्हणून सांगते... तुम्ही आपल्या घरची कंपनी जॉईन करा.. यश, सुजाता आणि माझं future आता फक्त नी फक्त तुमच्या हातात आहे. 😤😤
( तिने मुद्दामहून आई बाबांच नाव घेतले नाही कारण तिला माहित आहे त्याला राग येऊ शकतो )

तो खरंतर तिचे विचार ऐकून त्याला हसायला येतं होत पण तरीही त्याने त्याचा चेहरा निर्विकार ठेवला होता.

ती अजुन ही त्याला तशीच बघत होती.


कृतार्थ सोफ्यावरुन उठतो आणि तिच्या समोर हाताची घडी घालून रुबाबात उभा राहतो.
त्याला असं बघून तर तिची बोबडीच वळते.

कृतार्थ : ठिक आहे... तयार आहे मी कंपनी जॉईन करायला पण त्या बदल्यात तू मला काय देशील??? 😈😈
( तो तिरकस पणे हसत म्हणाला )

त्याची ही अशी स्माइल बघून तर तिला साक्षात तो devil भासला.


हिमानी : तुम्हाला... जे पाहिजे... ते... मी देइन...
बस्स... तुम्ही... कंपनी... जॉईन करा..😰😰😰

( ती शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाली )


तो परत तसाच एकदा हसला...

कृतार्थ : खरंच.. जे मागेण ते देशील...😈😈


हिमानी : 😰😰😰 हो...

( बस्स ... इथेच फसली हिमानी )

कृतार्थ : Then pay me with your body 😈😈😈

( त्याचा aura काही तरी वेगळाच होता)

त्याचे शब्द एकुन तर तिला धडकीच भरली.. ती खूप वेळ विचार करत होती.

हिमानी ( मनातच ) : जर मी यांना नकार दिला तर ते कंपनी जॉईन करणार नाही. आई बाबांना already एवढं टेंशन आहे. बाबांची तब्येत पण बरी नाही आहे... काय करु नाही सांगू शकत नाही मी.. पण होकार द्यायला तर मला जमणार नाही.... हिमानी विचार कर काहीतरी..😥😥

काहीतरी ठरवून ती परत त्याला बोलते..


हिमानी : ते.. ठिक आहे तयार आहे मी... i will pay you with my body.. पण आता नाही तेव्हाच जेव्हा तुम्ही आपल्या कंपनीला Top 3 मध्ये घेऊन याल... बोला मंजूर आहे तुम्हाला???🤧

ती हिंमत करुन बोलते.

तिचे शब्द ऐकून कृतार्थ मनातच हसतो.

कृतार्थ : so indirectly you are challenging me... right???😑😑


हिमानी : yess ofcourse...😥


कृतार्थ : ok.. i like challenges...
Your challenge accepted..😈😈
पण एकदा का मी तू दिलेलं challenge complete केलं तर मग तुला माझ्या पासून कोणीच वाचवू शकणार नाही.😈😈

( तो तिला खुनशी हसत बेड वर जावून झोपतो )

तो बेड वर पडून तिला परत एकदा म्हणतो..

कृतार्थ : आणि हा.. आज पासून तू सोफ्यावर झोपायचं... जर तू बेड वर झोपलिस तर रात्री काय होइल मला माहित नाही... so the last choice is yours...

( ती त्याला पाठमोरी उभी होती तरी त्याच्या आवाजातुन तिला जाणवत होतं की तो विचित्र हसतो आहे )

त्याच्या श्ब्दांनी तिच्या संपुर्ण अंगावर काटा आणला होता.


ती त्याच्या कडे न बघताच कपाटामध्ये ठेवलेले extra blanket आणि cushions घेऊन धावत सोफ्यावर स्वत:ला झोकून देते. ती त्याच्या कडे एकदा पण बघत नाही.

ती स्वत:चा पुर्ण चेहरा blanket ने कवर करुन घेते.

तिची ही अवस्था बघून कृतार्थ मात्र आवाज न करता हसत होता. 😂😂😂

कृतार्थ : वेडी कुठली.😂😂

तो तसाच lights off करुन डीम लाईट चालू ठेवून झोपून जातो.
हिमानी तर लगेच झोपून जाते.

रात्री 3 वाजता कृतार्थ ला काहीतरी पडण्याचा आवाज येतो. तो कसे तरी डोळे उघडून बघतो तर हिमानी सोफ्यावरुन झोपेत खाली पडलेली असते.

तिला पडलेलं पाहून तो उठणारच की त्या अगोदर हिमानी डोक्याला चोळत उठते आणि परत टूणकण सोफ्यावर उडी मारून परत झोपी जाते.
ती लगेच गाढ झोपी जाते.



हे सगळं बघून कृतार्थ ला खूप हसायला येतं.
तो ब्लँकेट ओढून जोर जोरात हसायला लागतो.
😂😂😂😂😂😂😂😂

किती तरी वेळाने तो शांत होतो.

कृतार्थ : किती तरी वर्षातून आज मी असा मोकळेपणाने हसलो आहे ते पण हिमानी मुळे... खरंच वेडी आहे. पाच वर्षापूर्वी जे झालं ते मी अजुनही नाही विसरु शकत. मला पण खूप आठवण येते आई बाबांची पण ते चुकिच वागले विराज सोबत. म्हणून मी नाही म्हणत होतो कंपनी जॉईन करायला.

मला नाही यायचं होतं इकडे परत पण यश आणि सुजाता साठी आलो 2 वर्षापूर्वी. पण मला काय माहित होते की माझे आजी आजोबा मला लग्नासाठी फोर्स करतील. मी माझ्या आई बाबांशी नाही बोलत पण माझे आजी आजोबा जीव लावतात मला मग कसं नाही बोलणार होता मी त्यांना???

त्यांच्यासाठी केलं मी हे लग्न.. ही हिमानी हिला मी दोन वेळा भेटलो होतो ,बोलणं नाही झालं होतं पण ठिक वाटली होती मला.

लग्न झाल्यापासून आज आम्ही असे बोललो असेल. तिने कंपनी जॉईन करायची गोष्ट काढली तेव्हा मला खरतर राग आला होता पण चुकिचा राग तिच्या वर नको म्हणून शांत राहिलो. ओरडून काही फायदा नाही होणार म्हणून मी तिला माझ्या शब्दाने घाबरवायचं ठरवलं आणि मग pay me with your body असं बोललो.
अशा गलिच्छ विचारांचा नाही मी पण तिचा होकार ऐकून मला खरतर आश्चर्य वाटलं.
पण नंतर तिची अट ऐकून उसासा सोडला मी. काम करुन घेण्यासाठी challenge दिलं मला.
मी अमेरिकेत काय फक्त मजा मारत नव्हतो.
तिकडे शिकायला तर गेलो पण त्यासोबतच मी माझी स्वत:ची कंपनी चालू केली होती. पण या बद्दल कोणालाच मी सांगितले नाही.
2 वर्षापुर्वी मी आलो आणि एक ब्रांच मी इथे पण चालू केली.
मी रोज माझ्या ऑफिस लाच जातो "sunshine " नाव आहे माझ्या कंपनीचे. माझ्या वडीलांची कंपनी जरी bankrupt झाली ना तरी पैशांची काही कमी भासणार नाही कोणाला. आई बाबांशी नाराज आहे मी म्हणून काय त्यांना रस्त्यावर सोडेन हे तत्त्वात बसत नाही माझ्या.
माझी sunshine company टॉप 1 वर आहे. आणि ही वेडी मला वडीलांची कंपनी Top 3 मध्ये आणायची गोष्ट करते. आज जे काही मी कमावलं आहे ते स्वत:च्या मेहनतीने केलं आहे. अमेरिका सारख्या देशात शिकलो असलो तरी भारतीय संस्कार विसरलेला नाही आहे मी.
वडीलांची कंपनी मी पुर्ववत करेन नंतर जेव्हा यश त्याचं शिक्षण पूर्ण करेल तेव्हा त्याला ही कंपनी सोपवेन.

आता तिला दिलेलं चैलेंज accept केलं आहे तर पूर्ण तर करावं लागेलच ना. आणि तसंही प्रयत्न केल्या शिवाय हार मानणे हे माझ्या तत्त्वात नाही.

उद्या पासून काम चालू करेन काम परांजपे कंपनी मध्ये.😈



********************

सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे.