Arranged marriage - 2 books and stories free download online pdf in Marathi

Arranged marriage - 2

Continue...



दुसर्या दिवशी सकाळी हिमानी ला जाग येते तर सकाळचे सात वाजून गेलेले असतात. तिने बेड वर बघीतले तर तिथे कोणी नव्हतं. मग ती समजून गेली की कृतार्थ रोजच्याप्रमाणे आजही लवकर गेले असतील. हिमानी आळस देऊन उठते, तर तिला तिच्या बॉडी मध्ये हल्किशी कळ जाणवते.

" आई गं...😵😵 किती जोरात पडले मी रात्री.😣😣 तेव्हा नाही जाणवलं पण आता तर माझी कंबर भारी दुखायला लागली आहे. हे ना सगळं कृतार्थ मुळे झालं आहे.😠😠 असा राग येतोय ना मला त्यांचा, असं वाटतंय ना की त्यांना टेरेस वरुन खाली फेकून देऊ ... पण काय करु एवढ्या लवकर मला विधवा नाही व्हायचं आहे.😒"
हिमानी तिची कंबर हाताने चोळत , कृतार्थ ला आठवुन रागात बोलत होती.

" पण काय करु?? रात्री ते जेव्हा बोलले ना pay me with your body तेव्हाच त्यांच्या सनकन कानाखाली वाजवायची इच्छा झाली होती माझी, पण मी आई बाबांसाठी ( सासू सासरे) शांत बसले.
सध्या ते कंपनी जॉईन करण्यासाठी मानले आहेत हेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. आता हीच गुड न्यूज जाऊन मी आई बाबांना सांगते. हे ऐकून त्यांना खूप छान वाटेल.😀😀 "
असं म्हणत हिमानी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाते.



थोड्याच वेळात हिमानी फ्रेश होऊन बाहेर येते आणि किचन मध्ये जाते.

तिथे गेल्यावर पाहते तर कृतार्थ चे आई वडील अगोदरच तिथे dinning table वर बसलेले असतात. त्यांच्या चेहर्यावर आनंदाचे भाव असतात.


हिमानी त्यांच्याजवळ जाते तशी कृतार्थ ची आई लगेच हिमानी ला त्यांच्या मिठित घेते. हिमानी ला कळतच नसते काय झालं आहे.


" मला माहित होतं तू नक्की कृतार्थ ला आपली कंपनी जॉईन करण्यासाठी मनवशील. ", कृतार्थ ची आई हिमानी च्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतात. 😊😊

" तुम्हाला कोणी सांगितले हे??🤔🤔 ", हिमानी न समजून विचारते कारण तिने स्वत:हून त्यांना अजुन सांगितलेले नसते.

" सकाळी लवकर कृतार्थ आला होता आमच्या रुम मध्ये", असं सांगून कृतार्थ ची आई सकाळी काय झालं ते तिला सांगायला लागतात.

FLASHBACK

सकाळी कृतार्थ बाहेर जाण्यापूर्वी त्यांच्या आईवडिलांच्या रुम कडे जातो. तो दार वाजवण्यापूर्वी बराच विचार करतो.

शेवटी ठरवून तो दारावर थाप मारणार की त्या अगोदरच कृतार्थ ची आई दरवाजा उघडते.

त्याला खूप आश्चर्य वाटते पण त्याला लगेच आठवते की लहानपणी पण जेव्हा कधी तो त्याच्या आई बाबांच्या रुम समोर यायचा तेव्हा दार नॉक करण्या अगोदरच त्याची आई दरवाजा उघडायची.
तेव्हा तो त्याच्या आई ला प्रश्न करायचा की तिला कसं समजायचे की तो आला आहे??

मग त्याची आई हसुन एवढंच उत्तर द्यायची की "मी तुझी आई आहे".

आज पण त्याच्या आई ला जाणवलं होतं की तो आला आहे. जूने दिवस आठवुन त्याला भरुन आले होते पण त्याने तसं दाखवले नाही. तो समोर बघतो तर त्याची आई त्याला प्रेमाने मनभरुन बघत होती. तिचे डोळे किंचित ओलसर झाले होते.

" मी कंपनी जॉईन करायला तयार आहे, पण मी कंपनी माझ्या पध्दतीने handle करेन. मला कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. मी आज पासूनच कंपनी जॉईन करणार आहे तर Mr. परांजपे ( कृतार्थ चे बाबा ) ला सांगा की त्यांना आज पासून कंपनी मध्ये यायची गरज नाही. आणि अजुन एक गोष्ट मी हिमानी ला घेऊन माझ्या private बंगलो वर उद्या संध्याकाळी शिफ्ट होणार आहे", कृतार्थ त्यांच्या कडे दुर्लक्ष करत दुसरीकडे मान वळवून त्यांना सांगतो.


" हो हो.. चालेल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तू आणि हिमानी तुझ्या प्राइवेट बंगलो वर राहाल तर तुम्हा दोघांना पण एकमेकांना वेळ देता येईल.😊", त्या कृतार्थ कडे बघत प्रेमाने म्हणाल्या.


तोही शांतपणे फक्त होकारात मान हालवून तेथून निघून जातो.


FLASHBACK END

हे सांगताना कृतार्थ च्या आई च्या डोळ्यांत आज कृतार्थ स्वत: हून त्यांच्याशी बोलला याचा आनंद दिसत होता.

" thank you बाळा.. ", कृतार्थ चे बाबा तिच्या जवळ येऊन तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणतात. 😊😊

" अहो बाबा तुम्ही thank you नका ना म्हणू.. मी काय परकी आहे का तुम्हाला आता?? आपण आता family आहोत. " ती त्या दोघांना छान गोड स्माइल देत म्हणते.😊😊

कृतार्थ चे आई वडील तिच्या कडे समाधानाने बघतात.

" गेल्या काही वर्षात तो एक शब्द ही बोलला नाही.सुजाता आणि यश पेक्षा तर कृतार्थ च जास्त मस्तिखोर होता. पण आता बराच शांत झाला आहे", कृतार्थ चे बाबा हताश पणे बोलुन गेले.

कृतार्थ च्या आई च्या चेहर्यावर ही नाराजी पसरली होती. हिमानीला त्या दोघांना असं मुलाच्या विरहात दुःखी बघून तिला वाईट वाटते.

ती त्या दोघांना dining table च्या चेयर वर बसवते.

" आई , बाबा... तुम्ही काळजी करू नका... लवकरच कृतार्थ तुम्हा दोघांना जवळ करतील. किती दिवस ते अजुन तुमच्याशी नाराज राहतील ?? त्यांना ही तर त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा त्रास होत असेल. शेवटी मुलगा आहे आईवडीलांना दुःखात बघून तेही दुःखी असतीलच. लवकरच सगळं काही ठिक होईल फक्त तुम्ही धीर ठेवा, आणि माझ्यावर विश्वास", ती त्यांना धीर देत बोलते.


ते दोघंही तिच्या बोलण्यावर विश्वास दाखवून होकरात मान हलवतात. आज त्यांना हिमानी ला बघून एक नवीन उमेद दिसली होती.

कृतार्थ च्या आईने कृतार्थ च्या बाबांना सर्व सांगितले होते की, त्यांनी हिमानी ला सर्व सांगितले आहे की कृतार्थ त्या दोघांशी का बोलत नाही.
यावर त्यांनी ही काही आक्षेप घेतला नाही.

" चला आता आपण नाश्ता करून घेऊ. तुम्ही कधी पासून माझी वाट बघत असाल ना?? मी आज जरा लेटच उठली.", हिमानी embarrassed होऊन मान खाली घालून बोलते.

ते दोघेही तिला असं बघून गालात हसतात.

" बाळा.. या घरात तुला आम्ही तुला फक्त सुन म्हणून नाही आणलं... आम्ही तुला मनापासून मुलगी मानतो. तू आम्हाला सुजाता सारखीच आहेस. म्हणून असं embarrassed वगैरे होण्याची गरज नाही. तुला जसं हवं तसं तू वावरू शकतेस". त्या हसत तिला म्हणतात.😊😊

" अगदी बरोबर ", कृतार्थ चे बाबा पण दुजोरा देत म्हणतात.

तशी हिमानी पण त्यांना स्माइल देते.

" तुम्ही बसा मी breakfast serve करते", असं म्हणून हिमानी किचन च्या दिशेने जाते.


थोड्या वेळातच एक maid आणि हिमानी ट्रे मध्ये नाश्ता घेऊन येतात.

सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण घरात असलेल्या maid करायच्या फक्त संध्याकाळी जेवणासाठी घरातील सर्व असायचे कृतार्थ सोडून म्हणून रात्रीचं जेवण हिमानी आणि कृतार्थ ची आई मिळून बनवायच्या.

ते तिघेही नाश्ता करायला घेतात.
सुजाता आणि यश चे कॉलेज सकाळी असल्या कारणाने ते लवकर जायचे.

कृतार्थ च्या बाबांची तब्येत ठिक नसल्याने ब्रेकफास्ट झाल्यावर हिमानी लगेच त्यांना आराम करायला लावते आणि त्यांच्या family doctor ला कॉल करुन बोलावते.

लवकरच डॉक्टर येतात. ते बाबांना चेक करुन काही मैडिसिन देतात.हिमानी कृतार्थ च्या आई चे पण चेकप करण्यासाठी सांगते. ते त्यांना पण काही calcium च्या गोळ्या देतात.कृतार्थ च्या बाबांना आराम करण्याचा सल्ला देऊन रुम च्या बाहेर जातात.

" आई तुम्ही बाबांसोबत थांबा मी जरा डॉक्टरांसोबत बोलून येते" हिमानी दरवाज्याकडे जात म्हणते.

त्या पण तिला ओके बोलुन सहमती दर्शवतात.

हिमानी पटकन रूमच्या बाहेर डॉक्टर जवळ येते.

" डॉक्टर... काही काळजीचं कारण नाही आहे ना??", हिमानी काळजीने विचारते.

" तसं काळजीचं कारण तर नाही आहे पण.. टेंशन मुळे पुढे काहीही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. त्यांना सध्या मोकळ्या वातावरणाची गरज आहे. त्यांना कोणत्याही गोष्टीचं टेंशन येऊ देऊ नका. बस बाकी सगळं ठिक आहे" डॉक्टर तिला उपदेश करत म्हणाले.

तिनेही हुंकार भरला.तिला काळजी वाटली होती. ती thank you बोलून जात असते की परत डॉक्टर त्यांना बोलतात.

"तुम्ही कॉल करण्याअगोदर कृतार्थ साहेबांचा मला कॉल येऊन गेला होता त्यांनी तुम्हाला सांगितले नाही का?? म्हणजे मी Mr. परांजपे च्या treatment साठी येणार आहे ते त्यांनी तुम्हाला सांगितल नाही का?? ", त्यांनी न समजून विचारलं.

कृतार्थ च नाव ऐकून तिला जरा आश्चर्य वाटले.

" कृतार्थ नी तुम्हाला कॉल केला होता?? ", तिने त्यांना प्रतिप्रश्न केला.

" हो आज सकाळीच त्यांनी मला कॉल केला होता. Infact त्यांनी मला ऑर्डर दिली होती Mr.and Mrs. परांजपे यांची दर महिन्याला मैडिकल चेकप करण्यासाठी. पण मी मागिल 2 महिने कामानिमित्त बाहेर गेलो होतो म्हणून आलो नव्हतो. त्यांच्या ऑर्डर वरुनच मी monthly check up साठी आलो आहे" , ते पण बोलुन गेले.

तेव्हा हिमानी ला पूर्ण कळते. कृतार्थ न बोलूनही त्यांच्या आई बाबांची किती काळजी करतात हे ऐकून तिला कृतार्थ बद्दल आदर निर्माण होतो.

" कृतार्थ नी मला सांगितलं होतं पण मीच विसरले होते, म्हणून तुम्हाला मी परत कॉल केला होता." हिमानी थाप मारून गोष्ट बदलते.

" ओह अच्छा.. ओके मी निघतो काळजी घ्या", म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात.

" आई बाबांची किती काळजी आहे यांना तरी पण रागावून बसले आहेत. यांचा फुगा तर लवकरच फोडला पाहिजे. किती दिवस असे वागणार आहेत आईवडीलांशी?", हिमानी नाक मुरडत कृतार्थ ला आठवुन म्हणते.

हिमानी परत कृतार्थ च्या आईवडीलांना बघून त्यांना गोळ्या देऊन घराच्या मागे असलेल्या swimming pool मध्ये पाय बुडवून बसली होती.

" मला सांगितलं पण नाही त्यांनी की ते मला त्यांच्या सोबत त्यांच्या प्राइवेट बंगलो वर घेऊन जाणार आहेत. जर आईनी सांगितलं नसतं तर मला तर डायरेक्ट उद्याच माहिती पडले असते जेव्हा ते मला इथुन घेऊन गेले असते" हिमानी तोंड फुगवून तक्रारी च्या सुरात बोलते.😕😕

" पण मला नाही जायचं आहे त्यांच्या सोबत... ते पण एकटीच. इथे तर सर्व जण आहेत. आई बाबा, सुजाता, यश. तिकडे मला किती कंटाळा येईल" ती बोर होतं म्हणाली. 😣😣

ती थोड्या वेळ तिथेच शांत होउन बसली होती.


**************************************

ईकडे कृतार्थ सकाळीच आधी त्याच्या स्वत:च्या कंपनी " sunshine " मध्ये जाऊन नंतर त्याच्या वडीलांच्या कंपनी मध्ये गेला होता.

तो ऑफिस मध्ये गेल्यापासून त्या कंपनीच्या जुन्या नवीन सर्व files त्याने चाळल्या होत्या. त्याला प्रत्येक file मध्ये गडबड वाटत होती.

त्याच्या वडीलांचा PA तिथेच होता. त्याच्या चेहर्यावर तर कृतार्थ ला file चाळताना बघून 12वाजले होते. तो तर सारखा त्याचा घामाने थिजलेला चेहरा रुमालाने पुसत होता.

त्याची ही अवस्था कृतार्थ च्या नजरेतून सुटली नव्हती.

" याने काहीतरी घोळ केलेला दिसतोय", कृतार्थ त्याच्या वडिलांच्या PA कडे तिरकस नजर टाकुन स्वत:शीच म्हणाला.

" PA तुम्ही या कंपनी ला खूप वर्षापासून तुमचे hardwork देऊन कंपनी ला या जागेवर आणून ठेवले आहे यासाठी तुम्हाला काहीतरी reward तर द्यायलाच पाहिजे हो की नाही", कृतार्थ तिरकस हसत म्हणाला.


कृतार्थ ला असं हसताना पाहून त्या PA ला अजुनच भिती वाटली. 😰तो आवंढा गिळत कृतार्थ ला विचारतो काय reward सर.

" तुम्हाला मी काही दिवस holidays देतो. जो पर्यंत मी तुम्हाला बोलवत नाही तो पर्यंत तुम्हाला ऑफिस ला यायची गरज नाही. समजलं??", कृतार्थ त्याच्यावर नजर रोखत म्हणतो.

PA अगोदरच घाबरलेला असतो म्हणून मग तोही हो म्हणतो.

" तुम्ही येऊ शकता", कृतार्थ त्याला दरवाज्याकडे इशारा करत म्हणतो. तसा PA पण लगेच निघून जातो.


तो गेल्यावर कृतार्थ रोहनला ( कृतार्थ चा PA.. जो sunshine कंपनी मध्ये कृतार्थ सोबत काम करतो) कॉल करतो.

तो दुसर्या रिंग मध्ये लगेच कॉल recieve करतो.

" येस सर ", रोहन फोन उचलताच बोलतो.

" रोहन तुझ्यासाठी काम आहे. तुला Mr. परांजपे च्या PA वर लक्ष ठेवायचे आहे. तो कुठं जातो, कोणाला भेटतो. सगळं काही" , कृतार्थ त्याला ऑर्डर देत बोलतो.

" ओके सर" , बोलुन रोहन पण त्याला response देतो.

" हम्म.. आणि अजुन एक.. mr. परांजपे च्या कंपनी साठी एखाद्या विश्वासू व्यक्ती ला PA म्हणून select कर आणि त्यांच्या कंपनी मध्ये पाठवून दे. मी इकडेच आहे.", कृतार्थ म्हणाला.

" उद्या सकाळी PA तिथे हजर असेल सर", रोहन विश्वासाने म्हणाला.

" गुड... बाय", कृतार्थ एवढं बोलून फोन ठेवून देतो.

तो दिवसभर कामात व्यस्त असतो.

************************************

कृतार्थ ला रोज रात्री घरी यायला वेळ होतो म्हणून सगळे जेवण करून त्यांच्या रुम मध्ये जाऊन झोपतात.

हिमानी मात्र त्याची वाट बघत बसली होती.

10 वाजून गेले तरी तो अजुन आला नव्हता.


***********************************


सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून वाईट गोष्टींना प्राधान्य देत नाही.

Comment करुन नक्की सांगा आज चा भाग कसा वाटला. 😊❤


इतर रसदार पर्याय