कथा लहरी गाढवाच्या Narayan Mahale द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कथा लहरी गाढवाच्या

1 सेमिनार

एकदा एका गाढवाला एका विद्वान कोल्याचा सेमिनार attain करण्याची लहर आली. सेमिनार हा वाघाच्या चोरून एका गुप्त जागी ठेवण्यात आला. सेमिनार चा विषय होता "वाघापासून वाचण्याच्या नवनवीन triks" सेमिनार ला वेगवेगळे प्राणी जमले. हत्तीपासू ते मुंगीपर्यंत सर्व हजर होते.
गाढव लहरी होते. गाढवाला कोल्ह्याचे भाषण रटाळवाने वाटले. तो बोअर झाला. मग गाढवाने डोके लढवून कोल्ह्याच्या आवाजाची मध्येच स्तुती करने सुरू केले.
कोल्हा आपली स्तुती बघून खुश झाला व वेगवेगळ्या चालीवर गाणे म्हणू लागला. गाढव इथेच थांबला नाही. त्याने कोल्ह्याच्या स्वरात स्वर मिसळवणाऱ्या बकरीची पण स्तुती केली. मग बकरी स्टेजवर जाऊन गाऊ लागली. गाढवाने हरणाची पण प्रशंसा केली. मग हरीण पण स्टेजवर गेले. आपला मूळ विषय सोडून सेमिनार भलतीकडेच भरकटत गेला.
मग गाढवाने त्याचं सर्व डोकं पणाला लावून सामूहिक गायनाचा कार्यक्रम ठेवला. सर्व प्राण्यांचा आवाज जंगलात गुंजू लागला. हा आवाज ऐकून वाघांचा झुंड तेथे आला. सर्व प्राणी घाबरले व सैरावैरा पळू लागले. वाघाने काही प्राण्यांची शिकार केली व सेमिनार पळून गेला.

*** *** ***


2 प्रेयसी आणि गाढव

एकदा लहरी गाढवाच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. प्रत्येकाला प्रेयसी आहे आणि आपल्याला नाही याचे त्याला खूप दुःख वाटत होते. ते हताश होऊन जंगलात दूर जाऊन बसले. समोरच्या झाडावर दोन पक्षी एकमेकांचे चुंबन घेत असल्याचे त्याला दिसले. मग तर तो आणखीच निराश झाला.
एक सूंदर गाढविण समोरून जात असल्याचे त्याने पाहिले. तिला बघून तो ताडकन उभा राहिला. तिला इंप्रेस करण्यासाठी त्याने गाणे म्हटले. पण त्या सुंदर गाढविण ने मात्र त्याला भाव दिला नाही. मग गाढवाने एक युक्ती केली. गाढव कोणाचीही खोटी प्रशंसा करण्यात माहीर होते. तो त्या सुंदर गाढविण च्या मागे चालु लागला. व तिची प्रशंसा करू लागला. आपली स्तुती ऐकून गाढविण आनंदाने फुलून गेली. ती गाढवाच्या प्रेमात पडली. गाढवही तिच्या प्रेमात पडले.
मग एक दिवस लहरी गाढवाची प्रेयसी रुसली. "सर्वजण शॉपिंग करतात, तुम्ही मला एकदाही शॉपिंग ला नेले नाही." मग गाढवाने आपल्या मालकाजवळून उचल म्हणून मजुरीचे आगाऊ पैसे घेतले व तो तिच्यासोबत मॉल मध्ये शॉपिंगला गेला. एकाच नारळात दोन पुंगळ्या टाकून दोघानेही नारळपाणी पिले. ते आकाशपाळण्यात बसले, समुद्रकाठी बीचवर फिरायला गेले.
मग गाढवाला बीचवर तिच्यापेक्षाही खूप सुंदर सुंदर गाढविनी दिसू लागल्या. त्या सर्वांचे नायनसुख घेत गाढव आपल्या प्रेयसीला तिच्या घरी सोडून आपल्या घरी परत आला. दुसऱ्या दिवशी मालकाने गाढवावर जास्तच ओझे लादले.ऍडव्हान्स पैसे घेतले त्यामुळे त्याला ओव्हरटाइम काम करावे लागले.
आता गाढविण रोजच रुसायला लागली. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे म्हणून गाढविण लाडात यायची. गाढव दुसऱ्या गाढविणशी बोलले तरीही ती रुसायची. रस्त्याने चालताना दुसरीकडे बघणेही त्याला कठीण वाटू लागले. तो स्वतंत्र्यातून हळूहळू पारतंत्र्यात गेला. बिचारा गाढव तिचे हट्ट पुरवू पुरवू कर्जबाजारी झाला. ओझे वाहू वाहू त्याची प्रकृती खालावली. तो काळवंडला,हडकुळा झाला. मालकाने त्याला कामावरून काढून टाकले. त्याची प्रेयसीही त्याला सोडून गेली. आता गाढव एकटाच जंगलातून संथपणे चालत होता. चालायलाही त्याच्या अंगात बळ उरले नव्हते. काहीही करून त्याला समोरच्या तलावावर पाणी प्यायचे होते. अंगात बळ नसल्यामुळे तो इंटरव्हल घेत घेत तलावाचा रस्ता पादाक्रांत करू पाहत होता. त्याला दूरवर एक सुंदर गाढविण रडताना दिसली. हळूहळू तिच्याजवळ जाऊन तिला रडण्याचे कारण विचारले. त्यावर गाढविण म्हणाली, " सर्वांना प्रियकर आहेत. फक्त मलाच एकही प्रियकर/बॉयफ्रेंड नाही." हे ऐकून गाढवाच्या अंगात अचानक कसलेतरी बळ संचारले. व गाढव विद्युत वेगाने तेथून पळून गेला.

तात्पर्य : .....

*** ***