!. . . . . . .अपत्यकामेष्ठी . . . . . .
. . . . .खरंतर तिच्या मनाविरुद्धच गोष्ट घडली दोघांच्या वयात १२ वर्षाचा फरक.नाय व्हय म्हणंत बापान हिरीत ढकलावी तशीच यदु गायके नावाच्या इसमासोबत सगुणाच लग्न लावुन दिलं.तिच एेकनार कोण सातवीतनं आठवीत जायचं म्हणुन खुश होती.त्यातच लग्नाचा घाट घातला.
सासरकडच्यांनी तिला सांभाळुन घ्यायच म्हणत म्हणत नवर्यासकट सवती ठेवली. कारण लग्नाला २ सालं झाली पण कुस उजवणां म्हणुन त्या नवतरुणीला नकळत टोमने मिळु लागले. कोणत्याही शुभ कामात तिला टाळु लागले.
नवर्याचं मात्र एक ना दोन त्याला काही सांगावे तर तोही 'असुदे बघुया 'म्हणुन वेळ मारुन नेऊ लागला.
दवाखाना करावा अशी दोघांची मानसिकता नव्हती.
मात्र गंडे दोरे तांत्रिक बाबा असला एकही प्रकार सगुणाने सोडला नाही.सगळं करुन पाहिलं.त्यातच धाकल्या जावेची मंदाची दोनदा सपुत्रिक कुस उजवली.यदुला समाधान वाटले.बारक्याच्या पोरांनाच जीव लावु म्हणुन निश्चींत झाला.सगुणाही त्यांच हागणंमुतनं काढु लागली.मंदाच हलकं होऊ लागलं.
एका शुभ कार्यक्रमात अनास्था ओढवली लहान लेकराची मुंज काढायची होती मंदाने सगुणाकडुन पोराला घेऊन भटजींच्या पुढ्यात आणुन बसवले.फक्त पोराच्या आईबापालाच तिथं थांबण्यास सांगितले.बिचारी सगुणा झाल्याप्रकाराबद्दल कमालीची निराश झाली.पण बोलणार कुणाला गपगुमान सहन करुन बसली.
शिमग्याच्या घाटावर कपडे धुवायली गेली असता.
तिथंसुद्धा त्या बायका कुजबुज करत तिच्या तिथं येण्याविषयी बोलत होत्या.
वांझोटी बाई अशा ठिकाणी येणं गैर आहे वगैरे वगैरे .
सगुणाला त्या पाण्यात जीव द्यावा वाटला.कपडे कशीबशी पिळुन ती भरल्या डोळ्याने देवाच्या कळसाकडे पाहत घराकडे निघाली.घरात पोहचताच "थोरली आई खायला दे" असं मंदाचा मोठा मुलगा म्हणाला.सगुणा क्षणभर मघाचचा प्रसंग विसरली.त्याला खायला देऊन कपडे सुकवण्यास गेली. रात्री तिने स्फुंदत यदुनाथला प्रसंग सांगितला. आपण फक्त नवराबायको आहोत आईबाप कधी होणार.तो नेहमीची समजुत घालु लागला पण तिने काहीच ऐकलं नाही.तिची आई सांगायची हामदाबादला यावर अौषधोपचार होतो तिकडं जायचंच असं ठणकावुन ती झोपण्याचा यत्न करु लागली.
यदुला भिती पडली आता ही काही ऐकनार नाही काहीतरी कराव लागणारच .दुसर्यादिवशी उठुन यदु रानाकडं गेला.शेतात शेजारच्याचा बाळु मुकादम व त्याचा हद्दीवरुन वाद सुरु होता.
पण कुणिच माग सरकत नव्हतं . दोघांची हमरीतुमरी झाली .बाळु मुकादम खोचक बोलला"यद्या कुणासाठी भांडतुयास प्वार ना बाळ पोटाला अन उड्या मारतुया."
कधी न भडकनारा यदु कुदळ घेऊन बाळुच्या अंगावर धावुन गेला.पण आजुबाजुच्या लोकांनी त्याला धरुन ठेवला.यदु आज यरवाळीच घरी पोचला.नेहमी सारखाच पण त्याच्या मनात वादळ सुरु होते.एका टोमण्याने आपली ही अवस्था तर मग बिचारी सगुणा तिची काय हालत करत असतील हे लोक व बायका.
काही नाही काहीपण करुन आता अपत्यप्राप्ती साठी
अौषधोपचार करायचाच गेली दहा वर्षं वांझ म्हणुन जगणार्या सगुणासाठी.
झोपताना सगुणाला सांगितलंच उद्या तु म्हणत्यास त्याे अौषधोपचार करु पण घरात कुणाला याची कुणकण नको म्हणुन "मुंबईकडच्या नसलेल्या मित्राच्या वास्तुशांती ला जातोय दोघही" म्हणुन निघाले.तसही कुणाला संशय आला नाहीच.
सगुणाने आधीच पत्ता व इतर माहिती घेतली असल्याने हामदाबाद ला जाणे अवघड गेले नाही . मनासारखा अौषधोपचार करुन व पुढील पथ्यपाणी कसे घ्यायचं याची माहिती घेऊन दोघेजण. वास्तुशांतीत मिळालेली म्हणुन साडी चोळी व टावेल टोपी खरेदी करुन गावाकडे आले.मंदाच्या मुलांना मिठाई खरेदी केली.
अन नेहमीचा दिनक्रम सुरु झाला. सगुणा मंदाच्या पोरांत जीव रमवु लागली.स्वतंत्र राहत असल्याकारणानं पथ्यपाणी याची कुणाला कुणकुण लागलीच नाही.
कधी नव्हे तो यदुनाथ सगुणाची काळजी घेऊ लागला होता.खरंतर त्याला आता त्याची घाई झाली होती पण अजुन तशी चिन्ह दिसत नव्हती.
साधारण तिन महिण्यांनी निसर्ग बदलला अन् सगुणाच्या लक्षात येताच तिने यदुनाथला सांगितले.तो मनोमन देवाचे आभार मानु लागला.अगदी त्याची आई सगुनाची सासुसुध्दा तिच्या कडे येऊन कमीजास्त पाहु लागली.जबाबदारी वाढली होती.याची जाणीव होतीच.
उशिराचे बाळंतपण म्हणुन काळजी होती.सगुणाला त्याची कल्पना होती.आजुबाजुच्या बाया तिला भेटायला येऊ लागल्या.ज्यांनी टोमने मारले त्याही आल्या.सगुणाला या मानवी स्वभावाचे आश्चर्य वाटले अन् समाधानही.
होता होता दिवस भरले .तिने माहेरला जायचा प्रश्नच नव्हता.कधी नव्हे ते सासरचे लोकांनी हवं नको विचारलं . बाळंतपणासाठी तालुका आरोग्य केंद्रात चार दिवस आधी दाखल केले.तिथे इनमिन तिन खाटा .पण त्यांनी दाखल करुन घेतले.सगुणा अवघडली होती पण तेथील सम परिस्थितींत असणार्या बायंकांकडे पाहुन धीर यायचा.अशातच तनुजा नामक महिला जिचा नात्यातच निकाह झाला होता.तीच जास्त चिंताक्रांत होती. कारण तिची चौथी खेप होती.पूर्वीच्या तिन्ही बाळंतपणात बालके म्रृत्यूच्या खाईत सापडली होती यावेळेस सासरकडच्या लोकांनी "बच्चा जियेगा तो ससुराल नहीं तो वहींसे मायके चली जाना.
सोबत तिची बूढी अम्मा होती.सगुणासोबत यदुनाथ होता मात्र रात्र झाली की तो उद्या लवकर येतो म्हणुन निघुन गेला.तालुक्याच ठिकाण असलं तरी सुविधा यथातथाच होत्या त्याची अवस्था म्हणजे "असुन शिमगा नसुन खोळंबा"दुर्गम भागात आरोग्य सेविका टिकायच्या नाहीत.एकच आरोग्य सेविका पेशंट अवघडली असेल तरच मुक्काम करायची नाहीतर आत शहरात जाऊन राहायची.
एकीला दोघी म्हणुन सगुना अन् तनुजा वेळ काढत होत्या.
तनुजाला भिती वाटत होती ससुराल या मायका?आणि सगुणाला पडली होती पहिलटकरणीची धास्ती.!
उत्तर रात्रीच्या सुमारास दोघींना प्रसववेदना पाठोपाठच सुरु झाल्या पेंगुळलेल्या आरोग्यसेविकेने झोपेतच दोघींनापण प्रसवखोलीत दाखल केले अंधुकशा प्रकाशात त्या जीवाच्या आकांताने अोरडत होत्या. आरोग्यसेविका शांत करत होती.दोघींच्याही जवळचं कुणी नव्हतं .
पहाटेचं दोन जीवांनी जन्म घेतला. आरोग्यसेविका तद्वत दुसरीकडे गुंतली.तनुजा अजुन शुध्दीवर नव्हती.सगुणाच्या कुशीत बाळ रडत होतं.तिच्या आनंदाला पारावार नव्हता.पण उजव्या बाजुला तनुजाच बाळं रडत नव्हतं तिच्या मनात कालवाकालव झाली . सगुणाच्या बाळाच्या आवाजानं तनुजा जागी झाली अन कुशीतल्या बाळाकडे बघुन सावध झाली . तिने त्याला घेतले पण. . . . . . . हाय रे दैवा. . . . . !
तिने टाहो फोडला ..नेहमीचा वेदनांचा आवाज म्हणुन लक्ष द्यायला कुणी नव्हतंच . . आणि ती मुर्छित झाली. . . . सगुणाला समजेनासं झालं.. . . तिनं मोठ्या प्रयत्नाने लगबगीने तिच्या बाळाला स्वत:कडे घेतले व आपला काळजाचा तुकडा तिच्या बाजुला झोपवला . त्याच्या आवाजाने तनुजा पुन्हा सावध झाली.रडत्या बाळास पाहुन
तिच्या डोळयांतून आनंदाश्रू निघाले.
सगुणा निपचित पडलेल्या बाळाला बिलगुन गच्च डोळे मिटुन आक्रंदु लागली.तनुजाला समजण्यास वेळ लागला नाही.तिने त्याही स्थितीत सगुणाच्या पुढ्यात हात पसरले.
सगुणाने डोळयांतून गप्प राहायचा इशारा केला.
सकाळी सकाळी स्टँड वरुन पळत येणाऱ्या यदुला पाहताच आरोग्यसेविकेने सांगितलंच बाळ दगावलंय पण आई सुखरुप आहे. हे ऐकताच यदुनाथ पायरीवरंच डोक धरुन बसला.
बाजुलाच तनुजाचा शौहर मुलगी झाली म्हणुन मिठाई वाटत
फिरत होता. तनुजा सगुणाच्या रुपात अल्लाच भेटल्याच मानत होती.
अ
पत्यकामेष्ठी सगुणाला तिच्या दुखा:ची चिंता नव्हती, तनुजाचा संसार मार्गी लागल्याच तिला समाधान होतं. . . .. . .ते मात्र वांझ नव्हतं . . . .!!
सु.वि.कोळेकर
मु.पो.मारुल हवेली
ता.पाटण जि.सातारा
भ्र.८६००७७१०१०