वारी...अशीही Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वारी...अशीही

वारी …अशीही


अंथरुणावर पडल्या पडल्या रखमा स्वतःशीच बोलत होती…


"विठ्ठला अरे तुझ्या वारीला यायचं होतं रे ! पण कसे येणार? आज पर्यंत एकही वारी मी चुकवली नाही.अरे तुला भेटण्याची ओढ इतकी असते की ती ओढ एक ताकद बनून पाठीशी उभी राह्याची. कुठल्याही संकटाला पळवून लावायची.


विठुराया तुझी तुळशी माळ तर मला फारच आवडते. ती गळ्यात घातली की मनाला अत्यंत समाधान मिळतं. तुझ्याशी सरळ सरळ संवाद साधण्याच समाधान मिळतं. विठ्ठला आता मी कशी येणार रे तुला भेटायला? माझा जो सहचरी होता त्याला तू कायम वारीसाठी घेऊन गेलास आता मी एकटी पडले त्यात भर म्हणून माझं पाय मोडला. आता कशी येणार मी? "


एवढं बोलून रखमा बाईंच्या डोळ्यातून घळघळ पाणी येऊ लागलं.


घरात काम करणाऱ्या सुनेला विणाला त्यांचं स्व: शीच केलेली बडबड ऐकू येत होती. मनातून तिला वाईट वाटलं. तीही स्व:शीच

पण विठ्ठलाला उद्देशून बोलली…


"पांडुरंगा माझ्या सासूचा जीव तुझ्या दर्शनात अडकला आहे. तुझ्या वारीसाठी चालण्याची एवढी ताकद त्यांच्या पायात नाही. तूच काहीतरी कर."


भाजी चिरता चिरता वीणाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तिला तिच्या सासूची विठ्ठलावरची भक्ती माहिती होती.


रखमा आपल्या पायावरून हात फिरवत बोलत राहील्या….


"तुझी वारी या वर्षी अशी सूनी जाईल बहुदा. वारीमध्ये सामील व्हायला माझी मुलं आता मला पाठवत नाही रे…! माझी वयोगाठ आता हळूहळू नाजूक झालीय पण माझी मानसिक शक्ती नाही हा नाजूक झाली. ती तशीच कणखर आहे पण मी तुला कशी भेटायला येऊ? मी चालू कशी?


मी जर आज पर्यंत खूप मनापासून तुझी भक्ती केली असेल तर विठ्ठला तूच मार्ग काढ रे बाबा. तुझ्या वारीला येण्याची माझी इच्छा तशीच राहिलं आणि मला पैल तिराहून बोलावणं आलं तर जवाच लागेल ना!


मला आता एकटीला कुठेही पाठवणार नाही. मग शेवटी माझ्या जवळ हाच एक उपाय उरेल. घरी बसून डोळे मिटायचे डोळ्यासमोर तुझं रूप आणायचं आणि


'पांडुरंग पांडुरंग' म्हणायचं.


मी दुसरी कोणतीही वारी कशी करू शकेन रे ?मला दुसरी वारी नाहीच करायची. मला माझ्या पंढरपूरची वारी हवी आहे. असं का नाही करत तू मला सरळ तुझ्याजवळच का नाही रे घेऊन जात? काय ठेवलंय आता इथे? मला मोह नाही कशाचा… भौतिक जगामध्ये माझं काहीही उरलं नाहीये. शेवटचा धागा होता माझा जीवन साथी त्यालाही तू किती सहजपणे आपल्या जवळ बोलावून घेतल. मला का ठेवलं इथे?


आपलं आयुष्च म्हणजे एक वारीचं असते हे मला कळतं रे… पण या वारीत खूप मोहाचे पदर आहेत. आता त्याचं आकर्षण नाही राहील. मला दूरचे दिवे दिसू लागलेत. तिथे तुझं वास आहे एकतर त्या किनारी घेऊन जा किंवा तुझ्या पंढरपूरला घेऊन जा. पण आता इथे नको. सदा सर्वदा तूच माझ्या चित्ती असतो. तुझ्या भक्तीच नाद माझ्या शरीराच्या कणाकणात घुमतोय.


पंढरपूरला यायचं म्हणून माझा जीव उतावीळ झालं आहे.


पांडुरंग….पांडुरंग…"



कितीतरी वेळ रखमा विठ्ठलाची आळवणी करत होती. रखमाच्या सुनेचे विणाचे डोळे घरातील काम करताना सतत वहात होते. कालपासून रखामाचा सातत्याने हा घोष चालू होता. उद्या आषाढी …. रखमाच सगळं चित्त पंढरपूर आणि वारी याकडेच लागलं होतं.


" आई तुम्ही पोहे नाही खाल्ले?" वीणा


"नको वाटतंय. फक्त विठ्ठलाची पावलं बघवीशी वाटतात आहे." रखमा उदास पणे म्हणाली.


"आई तुम्हाला पायासाठी गोळ्या चालू आहेत त्यासाठी खायला हवं. खाल्लं नाहीतर तुम्ही गोळ्या कशा घ्याल?"


"वीणा माझ्या गोळ्या आहे हा विठ्ठल, त्याची वारी. इथे बसून मला वारीतील विठ्ठलाचा जयघोष ऐकू येतो आहे. टाळ, चिपळ्या किती मधुर आवाजात विठ्ठलाला आळवत आहे." अचानक रखमा आपल्या घोग ऱ्या आवाजात म्हणायला लागली.


' टाळ बोले चीपळीला नाच माझ्या संग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग.


दरबारी आले रंक आणि राव

सारे एकरूप नाही भेदभाव


नाचू गाऊ सारे होऊनी नि: संग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग.


रखमा अभंग म्हणत असतानाच वीणा हळूच खोलीबाहेर गेली. वीणाने रमेशला म्हणजे तिच्या नाव ऱ्याला फोन लावला.


"हॅलो…काय ग आत्ता का फोन केलास?" रमेश


" घरी येता का?" वीणा


" का ग काय झालं?" रमेश


" आज आईंच मला खर वाटत नाही." वीणा


" म्हणजे काय झालं?" रमेश


वीणाने रमेशला सकाळपासून जे जे झालं ते सांगितलं. रमेशला ही रखमा च वरीवरच प्रेम माहित होतं.तोही लगेच घरी यायला निघाला.

………..


रमेश घरी आला. त्याने बघीतल. रखमा उशीच्या आधारे भिंतीला टेकून बसली होती. तिच्या समोरच्या भिंतीवर सावळ्या विठ्ठलाचा मोठ्ठं फोटो टांगलेला होता. ती एकटक विठ्ठलाच्या फोटोकडे बघत होती.तोंडाने भजन म्हणत होती.


रमेशने रखामाला हाक मारली…


" आई.. ए आई…"


रखमाबाई ना रमेशकडे बघीतल ना त्याला काही उत्तर दिलं. ती तिच्या उन्मादी अवस्थेत पोचली होती तिथे तिला फक्त विठ्ठल दिसत होता.


रमेश आणि वीणा गंभीर चेहे-याने रखामाच्या पलांगा शेजरी बसले.


रखमाचा डोळ्यातून सतत अश्रुधारा बरसत होत्या.चेहे-यावर अलौकिक आनंद विलसत होता. रखामाची नजर एकही सेकंद विठ्ठलवरुन ढळत नव्हती.


राखामाचा श्वास आता हळु हळू चालत होत. रमेशला काय वाटलं कुणास ठाउक त्याने त्याच्या डॉक्टरला घरी बोलावलं.


डॉक्टर घरी आले त्यांनी रखमाला तपासल


" रमेश काकूंची तब्येत एकदम ठणठणीत आहे."


" मग ती मी हाक मारली की माझ्याकडे बघत नाही किंवा बोलत नाही."


" त्या विठ्ठभक्ती त रमल्या आहेत. त्या वारकरी आहेत पण या वर्षी वारीला त्यांना जाता येत नाही. यातून त्या या उंनमनी अवस्थेत पोचल्या आहेत असं मला वाटतंय."


आता तिघेही रखमकडे बघत होते.भजन म्हणताना तिचा अवघा देह आनंद सगरात डुंबत होता. रखमा भजन म्हणत असली तरी हळु हळू तिचा आवाज कमी होत गेला. तिचं श्वास आधीपेक्षाही संथ झाला.


एकक्षणी डॉक्टर तटस्थ झाले आणि दुस-या क्षणी त्यांनी रखमाची नाडी बघीतली आणि नकारार्थी मन हलवली.


रमेश आणि वीणा जागच्या जागी कोलमडले.


"डॉक्टर आईची विठ्ठलावर इतकी गाढ भक्ती होती की ती सतत म्हणायची वारीला येऊ देत नाही तर तू तुझ्या जवळ मला बोलावं. तुझ्या जवळ आले की जन्म मरणाच्या फे-यातून सुटेन. आज तिला विठ्ठलाने खरंच आपल्या जवळ बोलावून घेतलं."


एवढं बोलून रमेशला रडू आवरलं नाही.


डॉक्टरांनी रमेशच्या पाठीवर थोपटले.


सावळ्या विठ्ठलाच रूप आपल्या डोळ्यात साठवून रखमा वारीसाठी निघून गेली.


अशीही वारी…मनाला हळव करणारी.

__________________________

लेखिका… मीनाक्षी वैद्य