भाग १०.
गुंजन दिल्लीला निघून गेली होती. पण इकडे वेदला मात्र घरी आल्यावर घर अस शांत वाटत होते. कारण गुंजन नव्हती त्या घरात. आता तर त्याला तिची एवढी सवय झाली होती की, घरात उगाच तिचे असल्यासारखे भास होत होते. तो मनाला समजावत हॉल मधील सोफ्यावर शांत पणे मागे डोकं टेकवून डोळे बंद करून बसतो. पण तेवढ्यात त्याला काहीतरी आठवत तस तो झटकन डोळे उघडतो.
"ओ, गॉड . गुंजन कडे माझा फोन नंबरच नाही आहे आणि तिचा देखील माझ्याकडे नाही आहे. आता कसा कॉन्टॅक्ट करू मी तिच्यासोबत? दिल्लीतील हॉटेलचा नंबर असेलच ना? त्यावर कॉल करून पाहतो मी" वेद अस स्वतःशीच बोलून कॉल लावण्यासाठी म्हणून स्वतःचा मोबाईल हातात घेतो आणि नंतर कसला तरी विचार करून तो मोबाईल बाजूला ठेवतो.
"नाही वेद. तिला पण माझी आठवण आली पाहिजे. माझ्याकडे जसा तिचा नंबर नाही. तसाच तिच्याकडे देखील नाही. बघू गुंजन आता काय करते ते? थोडीशी बुद्धी तिने पण वापरली पाहिजे!!"वेद स्वतःशीच बोलतो आणि तसाच फ्रेश व्हायला निघून जातो.
स्थळ:- दिल्ली
गुंजन दिल्लीत थोडीशी घाबरतच फ्लाईट मधून उतरते. मनात कितीतरी विचार येत होते तिच्या. पण सध्या स्वतःला धीट बनवण्याचा वेडा प्रयत्न करतच ती एअरपोर्टच्या बाहेर इकडे तिकडे पाहत पडते. एक मोठी बॅग तिच्या हातात होती. ती तिला झेपत नव्हती. तरीही कशीबशी घेऊन चालत होती.
"त्यांना कळवायला हवं. मी पोहचली ते."गुंजन अस म्हणून एअरपोर्टच्या बाहेर एका जागी थांबते आणि आपला मोबाईल काढून वेदला कॉल लावायला जात असते की, तिला आठवत त्याचा नंबरच तिच्याकडे नाही. तशी ती हतबल होते. जवळपास दीड दोन महिने सोबत ते होते, पण अजूनपर्यंत मोबाईल वरून कधी त्यांचा संवाद झाला नसल्याने दोघांकडे नंबर आले नाही. आता मात्र, गुंजनला स्वतःच्या मूर्खपणा बद्दल राग येतो आणि काही वेळातच तिचे डोळे भरायला लागतात. कारण दिल्लीत पोहचायचे कस ते वेदने सांगितले होते. पण त्यानंतरच तिला काहीच कळत नव्हतं.
"फेसबुक, पर सब कुछ मिलता हैं। मराठी बिझनेसमन वेद के फॉलोअर्स जादा हैं ना ?" एक मुलगी हिंदीतून मोबाईल मध्ये पाहत म्हणाली. गुंजनच लक्ष नकळतपणे तिच्या बोलण्याकडे जात. तस ती त्या दिशेला पाहते.
"हा , ये इतना हँडसम और कमाल का हैं ना? इसलीए इतने जा़दा फॉलोअर्स हैं उसके। लेकिन, मॅसेज को कभी भि रिप्लाय नहीं करता ये"दुसरी मुलगी थोडीशी नाराज होत म्हणाली. त्यांचं ऐकून गुंजन स्वतःचे उलट्या हाताने डोळे पुसते आणि मोबाईल हातात घेऊन त्यावर फेसबुक इन्स्टॉल करते. इन्स्टॉल करून स्वतःची प्रोफाइल बनवते. पण स्वतःचा फोटो बिलकुल टाकत नाही. फक्त एक राधा कृष्णचा डीपी ती आपल्या प्रोफाइलला लावते आणि 'गुंजन जाधव' अस नाव टाकून वेदची प्रोफाइल ओपन करून त्याला "हाय" असा मॅसेज करते. तशीच मॅसेज सीन होण्याची ती वाट पाहत असते. खूप वेळ झाला तरीही तिचा मॅसेज सीन होत नाही म्हणून तिला रडायला येत पण तेवढ्यात तिच्या मॅसेजच्या खाली पलीकडून मॅसेज पडतो.
"रडू नको, मला तुझा नंबर टाक" पलिकडून मॅसेज येतो. तो मॅसेज पाहून ती शॉक होते आणि आसपास पाहते.
"मी आसपास नाही आहे. आता बरेच प्रश्न पडले असतील ना तुला?"ती मोबाईल वायब्रेट झालेला पाहून मॅसेज वाचते. हा मॅसेज वाचून ती फक्त प्रश्न चिन्ह टाकते.
"तुझ्या प्रोफाइलला जो राधाकृष्णचा डीपी आहे. तो तुझ्या माहेरच्या तुझ्या रुममधील फ्रेमचा काढलेला आहे. गुंजन जाधव अस नाव टाकलं होतं. त्यामुळे मला वाटलं तूच असशील. पण तुझ्या फोटो मुळे मी तुला ओळखलं. आता नंबर टाक . मग मी तुला कॉल करतो" वेद असा मॅसेज टाकून गालात हसतो. त्याचा हा मॅसेज गुंजन रीड करते तेव्हा तिला या संबंधी काय बोलावे? ते कळत नाही. कारण वेदच एवढं बारीक लक्ष होते तिच्या घरात. हे, तिला आजच कळलं. तशी ती गप्प राहून गालात हसते आणि आपला नंबर वेदला सेंड करते. सेंड करताच क्षणी तिला अनोळखी नंबरवरून कॉल येतो. तशी गुंजन तो कॉल उचलते.
"पोहचली तू?"वेदचा आवाज तिच्या कानावर पडतो. तो आवाज ऐकून तिच्या मनातील सर्व विचार थांबतात. कारण याच आवाजासाठी तिचं मन अस्वस्थ होत होत. नकळतपणे डोळ्यांतून तिच्या पाणी येत.
"अहो, तुम्ही नंबर पण नाही दिला मला....मला भीती वाटत होती.."ती मुसमुसत म्हणाली.
"शु$$$ ,रिलॅक्स गुंजन. एवढं काही नाही झालं. असं छोट्या छोट्या गोष्टीवरून रडत नाही बसायचं. मी कॉल केला आहे कॅबला. ती येईल तुला न्यायला" वेद अगदी शांतपणे तिला म्हणाला.
"मला भीती वाटतं आहे इथं. मी पुन्हा येऊ का?"गुंजन थोडीशी कचरत विचारते.
"अजिबात यायचं नाही. तुझं स्वप्न आहे ते आणि आतापासून या जगातील प्रत्येक गोष्टीसोबत तुला मॅच करावे लागले. त्यांचं राहणीमान, वगैरे सगळं काही तुला शिकावे लागेल गुंजन. इथं तू सिम्पल, भोळी राहिली तर कोणीही तुला फसवू शकत. प्रत्येकवेळी मी असेल अस नाही ना?त्यामुळे प्लीज, माझ्यासाठी एकदा हा अनुभव घेऊन बघ. तुला नक्की आवडेल. हॉटेलवर काही मिळालं नाही तर मी तुझ्या बॅग मध्ये हेल्दी फूड ठेवलं आहे. ते खाऊन घे. मला कॉल कर पोहचल्यावर" वेद अस म्हणून कॉल ठेवत असतो की, तेवढ्यात तिचा आवाज येतो.
"अहो$$$$, तुम्ही हॉटेल पर्यंत बोलू नाही का शकत माझ्यासोबत? मला भीती वाटते अस एकटीने जायला. तुमच्यासोबत बोलत राहिली की मन शांत राहिल ना" गुंजन काहीशी हळू आवाजात म्हणाली. तिचं म्हणणे ऐकून तो गालात हसतो.
"ओके, बाबा. मी काम करता करता बोलतो. मग तर खुश ना?"वेद कानाला मोबाईल लावून लॅपटॉप वर काम करत म्हणाला.
"हो, हो खुश आहे मी" गुंजन आनंदी होऊन म्हणाली. वेद तिच्या मोबाईलला ट्रॅक करून तिचं लोकेशन ड्रायव्हरला टाकून तिथं बोलावून घेतो. काही वेळात ड्रायव्हर येतो आणि तो गुंजनच सामान गाडीत टाकून तिला आतमध्ये बसवून तिथून घेऊन जातो. वेद पूर्ण रस्त्याभर काम करत करत तिच्यासोबत बोलत असतो. थोडस तिला फ्री करत होता बोलायला तो. काम तर बरंच होत त्याला. पण त्याने गुंजनला तस न सांगता, आपलं काम करत बोलत राहतो. त्याच्याशिवाय तिला कोणाचा आधार नव्हता त्यामुळे तोच प्रत्येकवेळी तिच्या सोबत खंबीरपणे उभा राहत होता.
गुंजन वेद सोबत बोलतच हॉटेलवर पोहचते आणि तिथं येऊन कीज घेते. तशीच हसून ती रूम पाहून त्या दिशेला जायला लागते. स्वतःच्या रुमजवळ आल्यावर ती हातातील रूमच्या किज पाहते आणि विचारात पडते.
"अहो, या हॉटेल वाल्या लोकांनी मला फसवलं. मी कशी आत जाऊ?"गुंजन निरागसपणे हातातील कीज कडे पाहून म्हणाली. तिचं म्हणे, त्याला कळत नाही.
"काय झालं गुंजन?"तो थोडस लॅपटॉपवर काम करायचं थांबवतो आणि काळजीने विचारतो.
"अहो, यांनी चावी नाही दिली मला. एक कार्ड दिलं चावी म्हणून" गुंजन बोलते. पण तिचं बोलणं ऐकून वेदच्या चेहऱ्यावर हसू उमटते.
"गुंजन, चावी तिचं आहे रूमची. रुमला बघ छोटसं कार्ड स्वाईप करण्यासाठी असेल ना तिथं ते कार्ड व्यवस्थित घाल!! मग आपोआप दरवाजा उघडेल"वेद हसून म्हणाला. कारण गुंजन अगदी निरागस त्याला वाटत असायची. बाहेरच्या जगाशी कधी संबंध न आल्याने थोडीशी घाबरून जगत असायची. जास्त टेक्नॉलॉजी बद्दल तिला काही माहीत नसायचे, पण वेद मात्र तिला सांभाळून घेत होता. वेळोवेळी तो तिला मदत करत असायचा. आता, ती वेदने सांगितल्याप्रमाणे कार्ड घालते. तसा तो दरवाजा ओपन होतो. तशी ती खुश होऊन आतमध्ये जाते. आतमध्ये जाताच तो दरवाजा आपोआप बंद होतो. तशी ती घाबरते आणि तो दरवाजा खोलण्याचा प्रयत्न हाताने करते. कारण कार्ड तर बाहेर राहील होत यामुळे ती घाबरून जाते.
"अहो$$...कार्ड बाहेर राहील...मी लॉक झाली आहे....तुम्ही या ना मदतीला...भीती वाटते मला..."ती पॅनिक होत रडतच बोलते.
"आता काहीवेळापूर्वी सांगितले ना रडू नको?तरीही रडते. हे बघ शांत हो बघू आधी" तो तिला शांत करण्यासाठी प्रेमाने म्हणाला. पण उपयोग काहीच होत नव्हता. तिला तर रडूच येत होतं. कारण आता मनात खूप जास्त प्रमाणात भीती निर्माण होत होती तिच्या.
"गुंजन, शांत हो. रूममध्ये इमर्जन्सी बटन असत बघ. दरवाजाच्या मागे असेल, कदाचित! ते दाब. आपोआप दरवाजा ओपन होईल"वेद तिला रडताना पाहून म्हणाला. त्याच ऐकून ती मुसमुसतच ते बटन शोधते आणि दाबते. तसा दरवाजा ओपन होतो. ते पाहून ती रडता रडता खुश होते आणि पटकन दरवाजाच कार्ड काढून घेते.
"अहो, उघडलं. तुम्ही ग्रेट आहात!!" गुंजन डोळे पुसत म्हणाली. आता तिचा आवाज व्यवस्थित ऐकून तो सुटकेचा श्वास घेतो. कारण तिचा तो आवाज ऐकून त्याला देखील भीती वाटत होती. मनाला खूप आवर घालत होता तो. त्याला तिच्यापर्यंत जाण सहज शक्य होत. पण तिला जग कस आहे? का राहतात लोक? हे समजायला हवं आणि शिकून तिने घ्यायला हवे. यासाठीच त्याने तिला एकटीला पाठवले होते. पण आता पहिल्याच दिवशी अस काही केल्याने आता थोडफार टेन्शन त्याला देखील येत होतं तिचं.
वेद काहीवेळ तिच्यासोबत बोलतो आणि घड्याळात वेळ पाहुन फोन ठेवून देतो. कारण बरीच रात्र झाली होती.गुंजन ही मग बॅगेत वेदने ठेवलेलं फूड काढून खाते आणि बेडवर स्वतःला झोकून झोपण्याचा प्रयत्न करते. पण झोप काही लवकर तिला लागत नव्हती. कारण वेदची सवय झाली होती तिला त्यामुळे. मध्यरात्री कधीतरी ती त्याचा विचार करून झोपून जाते.
क्रमशः
-------------------
कधी कधी अस असत..लोक भरपूर शिकलेले असतात..पण थोडेसे घाबरून राहतात.. मग अशी गुंजन सारख काही झालं की त्यांचं डोकं चालत नाही.. कारण मनात भीती असते..नको ते विचार चालू असतात.. जर तुम्ही चांगला विचार ठेवला तर चांगलं नक्कीच होईल..घाबरून गेलात की काहीच होणार नाही..असच काहीसं उदाहरण म्हणजे गुंजन आहे..गुंजन शिकली भरपूर पण व्यवहार ज्ञान माहीत नसल्याने अशी राहते..तुम्हाला काय वाटत जुळवून घेईल का ती दिल्लीतील वातावरणासोबत? की सगळं सोडून वेदकडे येईल?