Gunjan - 1 books and stories free download online pdf in Marathi

गुंजन - भाग १


गुंजन....भाग १

ही कथा आहे एका अश्या मुलीची जिने बरीच स्वप्न पाहिली होती आपल्या वयात,पण काही कारणाने तिची स्वप्न अपूर्ण राहतात.काय आहे तिचं स्वप्न?करेल का ती ते पूर्ण ते या कथेत पाहायला मिळेल.

---------------

"मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती वेद जाधव यांचे अचानक लग्न सांगलीचे आमदार भूषण विखे-पाटील यांची एकुलती एक कन्या गुंजन विखे-पाटील सोबत झाले आहे. या लग्नाचे नक्की कारण काय आहे?हे जाणून घ्यायची सगळयांना उत्सुकता लागली आहे.पण जाधव परिवार मीडियाला उत्तर द्यायला टाळत आहेत"एक रिपोर्टर हातात आपला माईक पकडून मोठ्याने ओरडतच टीव्हीवर बोलत असतो.ती न्युज पाहून तिचे डोळे भरतात.



एका मोठ्या अश्या मॉर्डन बेडरूममध्ये ती लाल घागरा चुनरी घालून बसली होती.कितीतरी महागडे असे दागिने तिच्या गळ्यात होते.डोक्यावर सिंदूर आणि हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र होते.जे पाहून पुन्हा पुन्हा तिचे डोळे भरत होते.कारण हे सगळं होईल याची तिला कल्पना देखील नव्हती. मोठ्या परिवारातून ती देखील होती.त्यामुळे तिला आसपास असलेल्या श्रीमंत वस्तूंचे काही नवल वाटत नव्हते.


"नाही मला हे लग्न मान्य नाही.माझी स्वप्न अशीच मी संपवणार नाही!!हा, पण माझ्या बापासारखाच असेल.ही पुरुष जातच मला आवडत नाही.मी याला आपलं मानणार नाही"ती ओरडूनच बोलते.


"हेय ओरडू नको, तू!!किती मोठ्याने ओरडत आहेस?या घरात हळू आवाजात बोलायचं.इथं मोठा आवाज चालत नाही"एक माणूस तिच्या समोर उभा राहून रागातच बोलतो.त्याच बोलणं ऐकून ती शांत होते आणि रडू लागते.


"तुम्ही वाईट आहात!!"ती रडतच बोलते.


"आणखीन काही?एक तर तुझ्या बापाने अडकवल त्याला जाऊन बोल काय ते?अस काय केलंस की ज्यामुळे तुझं लग्न माझ्यासोबत लावलं?"तो शांत होऊन तिच्या बाजूला बसत बोलतो.त्याच्या अश्या कृतीने ती थोडीशी बाजूला सरकते आणि गप्प राहते.


"मी गुंजन...."ती थोडीशी घाबरत बोलते.


"ओह, गुंजन. नाईस नेम. मी वेद."तो गालात हसून म्हणाला.


"जास्त हसू नका.मला माहित आहे तुम्ही पण आता तेच करणार जे इतर जण करतात. त्यासाठी, माझ्यासोबत गोड बोलत आहात. मला माहित आहे हे सगळं"गुंजन रडतच बडबडते.तिचं ते बोलणं ऐकून तो विचारात पडतो.मग जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो आपल्या रूमकडे पाहतो.


"हेय, असले काही विचार माझ्या मनात नाही आहे.सो रिलॅक्स!! आपण ओळख करूया का? मिन्स मी अस कोणत्याही मुलीसोबत बोललो नाही,त्यामुळे थोडस एक्सप्रियन्स कमी आहे माझ्याकडे"वेद फ्री ली होऊन बोलतो.कारण गुंजनच्या डोक्यात कोणते विचार चालू होते?हे त्याला बरोबर कळलं होतं.


"मला डान्सर बनायचं होत.माझं स्वप्न होत ते.मी परवाच्या दिवशी पुण्यात गेली होती.मोठी स्पर्धा होती तिथे, पण तिथे बाबा कुठून आले काय माहिती त्यांनी मला डान्स करताना पाहिलं आणि त्यांना राग आला. खूप मारलं मला.कारण आमच्या घरात डान्स कोणाला आवडत नाही"गुंजन रडतच बोलते. तिचं बोलणं ऐकून तो शांत होतो. कारण आमदार होते तिचे बाबा. बाहेर जगाला ज्ञान देत असले तरीही घरात मात्र ते तसे नव्हते.


"तुझ्या पायाला काय झालं आहे हे?लागलं कस बघू?"वेद तिचा पाय पाहून म्हणाला.कारण तिच्या पायाला थोडासा काळा निळा झाला होता.त्याच बोलणं ऐकून ती स्वतःच्या पायाला पाहते आणि पटकन त्यावर घागरा ओढते.


"मला झोप येत आहे"गुंजन काहीतरी बोलायचं म्हणून बोलते आणि तशीच बेडवर पडत असते की,तेवढ्यात तो तिचा हात पकडतो.


"आधी कपडे बदल आणि ते दागिने काढ!!त्यानंतर झोपून जा.डोन्ट वरी मी काही तुला सोडणार वगैरे नाही आहे. त्यामुळे नवरा बायको सारख राहायला सुरुवात केली तरीही चालेल.फक्त एक काम कर माझ्यासाठी!!"वेद तिचा हात धरून बोलतो.


"कोणतं काम?"ती.


"जशी तू त्या घरात राहत होतीस ना?तशी न राहता थोडीशी फ्री ली वाग!! मान्य आहे, त्या घरात घाबरून राहत होती, पण हे घर तुझं आहे अस समजून सगळ्यांसोबत चांगलं रहा!! बघ तुझे विचार बदलतील लवकरच आमच्या बद्दलचे.हो, तुझं स्वप्न पण पूर्ण होईल कदाचित"वेद काहीसा विचार करत बोलतो.त्याच अस बोलणं ऐकून ती विचारात पडते.आजच सकाळी तर लग्न झालं होतं त्यांचं तरीही वेद तिच्यासोबत एखाद्या मित्राप्रमाणे वागत होता. तो खरंच चांगला होता का की, दबावामुळे असा वागत होता.याचा विचार तिच्या मनात येऊन जातो.वेद भानावर येऊन तिचा हात सोडतो, तशी ती भानावर येते.



"वॉशरूम कुठे आहे?"गुंजन बेडवरून उठत बोलते.



"राईट साईड" वेद आपला कोर्ट काढत म्हणाला. त्याच ऐकून गुंजन वॉशरूमला जाते.



वेद मात्र गालात हसतो आणि आपला मोबाईल काढून त्याच लॉक काढून मोबाईलमधील फोटो गॅलरी ओपन करतो. त्यात एका सुंदर मुलीचा फोटो असतो. ती अशी मस्त पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घालून चेहऱ्यावर नटखट एक्सप्रेशन ठेवून हसत असते.तो फोटो पाहून नकळत त्याचे ओठ रुंदवतात.



"गुंजन, मला अजूनही विश्वास बसत नाही. ज्या मुलीवर मी पाहून प्रेम केलं. आज तिचं मुलगी माझी बायको आहे!! माझं नशीब एवढं चांगलं आहे हे आजच कळलं. पण तुला कधी कळेल माझ्याबद्दल?"तो मनातच फोटोकडे पाहत बोलतो. तेवढ्यात वॉशरूमच्या दरवाजा उघडण्याचा आवाज होतो, तसा तो मोबाईल बंद करून त्या दिशेला पाहतो.ती मस्त आता थोडी फ़्रेश वाटत होती त्याला आधीपेक्षा.कारण आंघोळ करून ती फ्रेश होऊन नाईट ड्रेस घालून आली होती.


"मी झोपते"गुंजन बेडजवळ येत बोलते.


"ओके, तू इथे झोप. मी या कडेला झोपेन. बायको आहेस ना माझी त्यामुळे इथंच झोपेन. डोन्ट वरी मला माझ्या मनावर आवर घालता येतो. तू बघ तुझं"तो एवढंच हसून बोलतो आणि तसाच वॉशरूमला निघून जातो. ती त्याच बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करते. कारण इंटरेस्ट नव्हता तिला त्याच्यात. तिला तर येऊन जाऊन आपलं आयुष्य खराब झालं आहे लग्नामुळे असच वाटत होतं. राजकिय कारणामुळे तिचं लग्न झालं आणि तिच्या बाबाने तिच आयुष्य खराब केलं होतं. पण वेदच बोलणं आठवून ती आता तिच्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला लागते. ती तशीच बेडवरून उठते आणि आपली बॅग काढते. त्यात एक छोटासा फोटो अलबम असतो, तो ती उघडते आणि त्यातील एक एक फोटो पाहायला लागते. ते फोटो पाहून नकळतपणे तिचे डोळे भरत असतात.



"लहानपणापासून नृत्य करायची आवड होती मला. किती छान छान अवॉर्ड मिळाले मला ना!! हा अवॉर्ड मला फर्स्ट टाईम मी जेव्हा शास्त्रीय नृत्य केलं होतं तेव्हा मिळाला होता. घरात कोणाला माहीत नव्हतं मी नृत्य करायचे ते. पण जेव्हा कळलं तेव्हा त्या लोकांनी माझ्यासोबत अस केलं. माझ्या मैत्रिणी मी श्रीमंत घरात जन्माला आली हे जाणून मला लकी म्हणत असायच्या. पण मी म्हणेल माझ्यापेक्षा अनलकी कोणीच नाही आहे.कारण मी श्रीमंत होते ते फक्त पैश्याने, प्रेम, माणस याने तर मी श्रीमंत नाहीच आहे. कारण त्या घरात फक्त एक नावापुरती त्यांची मुलगी होते आणि जगाला दाखवण्यासाठी. बाकी आजवर कधी माझ्या फॅमिलीने साधं मला जवळ देखील घेतले नाही. मी मुलगी आहे ना म्हणून!!आज त्या जागी मुलगा असता तर? खुश असते सगळे. त्याला हवं तसं वागू दिलं असत. पण मला मात्र सूट दिली नाही. हे लग्नात देखील, मला पाहायला मिळालं नाही. सरळ उचल आणि लग्नात बसवलं. असच असत का मुलीचे आयुष्य?तिला स्वप्न पाहण्याचा ,ती स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार नसतो का?"गुंजन फोटोकडे पाहत बोलत असते.


"कोण बोललं मुलींना स्वप्न पाहण्याचा आणि पूर्ण करण्याचा अधिकार नसतो ते?"वेद बाहेर येत टॉवेलने स्वतःचे केस पुसत बोलतो.त्याच बोलणं ऐकून ती शांत होते.



"लग्न झालं आहे माझं. माझं आयुष्य माझी स्वप्न आता पूर्ण होणार नाही"ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.




"विश्वास ठेवून बघ माझ्यावर एकदा!! लग्न झालं म्हणजे सगळं संपलं नाही. ही तर सुरुवात आहे सगळ्याची. प्रत्येक नवीन गोष्टीला थोडासा वेळ लागतो. तुला डान्सर बनायचं आहे ना? मग आपण अस करू की तुला सगळ्या नृत्य साईडच्या स्पर्धेत भाग घेता येईल आणि तू फेमस होशील अस काहीतरी करू" वेद काहीसा विचार करत म्हणाला. तो आपला मोबाईल काढतो आणि त्यावर सर्च करतो. तेव्हा त्याला काहीतरी नेटवर मिळत तसा तो खुश होतो.गुंजन मात्र त्याच्याकडे फक्त पाहत असते. कारण तो काय बोलतो? हेच तिला कळत नव्हतं.




क्रमशः
-------------------


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED