Eka Zadachi Gochi - 2 books and stories free download online pdf in Marathi

एका झाडाची गोची - भाग २


मकाजी, मकाजीची आई, त्याची पत्नी झाडामुळे पार मेटाकुटीला आले होते.पण त्यांचा काहीच इलाज चालत नव्हता. झाडा पुढे त्यांनी अगदी त्यांचे हात टेकले होते.आठ दिवसांपूर्वीच मकाजीची मुलगी झाडाच्या खोडाला अडकून पडली होती.तिला इजा झाली नव्हती.पण थोडेफार खरचटले होते. तिला मुका मार लागला होता. त्यामुळे त्याची मुलगी नार्गी
मधून मधून वेदनेने कळवळत होती. नार्गीला मकाजीच्या बायकोने डॉक्टर कडे नेऊन आणले होते तरीपण तिला बरे वाटत नव्हते असे त्याची बायको त्याला म्हणत होती. मकाजी ची आई मकाजीची वर जोराने ओरडली, म्हणाली.... हा कोपऱ्यात पडलेला कोयता घे आणि जा बाहेर...ते झाड अगदी मुळापासून पासून तोडून काढ. आताच्या आत्ताच.
मकाजिला सुद्धा तसेच वाटत होते. परंतु मुन्शीपार्टी वाले, पोलीस आणि वन खात्याच्या भीतीमुळे तो तसे करायला धजावला नाही. नाहीतर ते झाड त्याने कधीच तोडले असते.

काही न बोलता तो तिथून बाहेर आला. डोळे वटारून झाडाकडे बघू लागला. मात्र झाड त्याच्याकडेच टक लावून पहाते की काय असे त्याला वाटू लागले. त्याने झाडावरून नजर हटवली आणि पलीकडे च्या कॉलनीमध्ये इमारतीवर नजर टाकली. पलीकडच्या कॉलनी आणि त्याच्या घराच्या मध्ये कॉलनीची भिंत होती. ज्याला आपण कंपाउंड वॉल म्हणतो ना तशी...
मकाजीच्या मनात आले ही जर कंपाउंड वॉल थोडी आत मध्ये घेतली असती ना सोसायटी वाल्यांनी त रस्ता झाला असता .परंतु सोसायटी वाले पण आडमुठे आहेत .ते काय आपल्यासाठी काही करणार नाहीत. हे त्याला चांगलेच माहीत होते आणि मकाजी काय मोठा व्हीआयपी नव्हता. त्यामुळे असं करणं कोणी शक्यच नव्हतं. झाडाप्रमाणे एक प्रकारे मकाजीची सुद्धा गोची झाली होती. हतबल होऊन तो घरात शिरला आणि टीव्ही लावून पाहू लागला. जेवण झाल्यावर सगळे झोपी गेले. मकाजी सुद्धा झोपला होता.

पहाटे झोपेत असताना मकाजिला त्याची आई कण्हत असलेली ऐकू आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत मकाजी झोपू लागला. परंतु आईचा कण्हण्याचा आवाज अधिकच येऊ लागल्यामुळे तो अंथरुणातून उठून बसला. आईच्या जवळ जात त्याने तिला विचारले आई तुला काय होत आहे का.
होय रे मक्या होय माझ्या छातीत दुखतंय. त्याची आई वेदनेने म्हणाली.
मग आई आपण आता डॉक्टरकडे जाऊया का...
नको मक्या नाही आता कोणता डॉक्टर उघडा असेल...
आपलं जवळचं हॉस्पिटल असेल उघडे कदाचित मक्या म्हणाला...
नको मला आता काय होत नाही. मी बरी आहे. मकाजीची आई वेदना सहन करीत म्हणाली.
नक्की नाही तुला आता काय होत नाही ना .खात्री करून घेत मकाजी तिला म्हणाला.
होय रे होय मला आता काही होत नाही तू झोप...
आईचे बोलणे ऐकून मकाजी झोपी गेला. सकाळी मकाजीला जाग आली ती म्हणजे एका मोठ्या रडक्या आवाजी गलक्याने..
ताडकन मकाजी जागेवर उठून बसला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. त्याची बायको धाय मोकळून रडत होती.अंथरूणावरून उठून त्याने बाजूला होऊन बायकोला विचारले काय झाले तू अशी
तेव्हा त्याची बायको म्हणाली... अहो आपल्याला सोडून आई देवा घरी गेल्या...
न मकाजीच्या पायाखालची वाळूच सरकली असे त्यवाटले. पहाटे झोपताना त्याला जशी काळजी वाटली होती. तसेच घडले होते. तोही त्याच्या बायकोच्या रडण्यात सामील झाला. त्याची मुलगी नार्गी सुद्धा त्याला बघून रडू लागली . ते ऐकून आजूबाजूची माणसं भराभरा त्यांच्या घरामध्ये आली. आणि त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झाली...
थोड्यावेळाने शेजारीपाजारींनी मकाजीचे घर भरून गेले. भरपूर माणसं त्याच्या घरामध्ये जमली होती. मात्र त्यांच्या बोलण्याचा सूर मकाजिला थोड्यावेळाने लक्षात आला.
वसती मधला एक कार्यकर्ता जवळ येऊन मका जिला म्हणाला मकाजी आता हिरोंना आवर आणि सगळे जे झाड आहे त्या झाडाच्या बद्दल मुळशी पार्टीमध्ये कळव त्याला सांग आमच्या घरी असं घडलेलं आहे तरी त्याबद्दल हे झाड कापणं आवश्यक आहे. तसं झालं नाही तर आमच्या आईचं पुढचं सगळं करणं आम्हाला अवघड होईल..
मुखर्जीने लगेच नगरसेवकाला फोन लावला. नगरसेवकाने मुळशी पार्टी फोन फिरवला आणि लगेच सूत्र हलली. महानगरपालिकेची गाडी वसाहती मध्ये आली आणि त्यातून पाच-सहा माणसे खाली उतरली तुमच्या हातामध्ये झाड तोडण्याची इलेक्ट्रिक करवत आणि इतर साहित्य होते. तिथे आल्या आल्या ती माणसे लगेच कामाला लागली. मका जिच्या घरात रडार चालली होती आणि बाहेर त्या झाडाच्या फांद्यांची कापाकापी चालली होती. हो हो झाड शेती खाली वेगळे होऊन खाली पडत होती. झाडापासून मकाजीच्या घराला आणि त्याच्या बाजूच्या घराला नुकसान होऊ नये यासाठी महानगरपालिकेची लोकं झाड काळजीपूर्वक कापत होते. थोड्याच वेळात ते भले मोठे झाड आणि त्याच्या फांद्या कापून दूरवर नेऊन त्याची विल्हेवाट महानगरपालिकेच्या कसलेल्या झाडे तोडू पथकाने विक्रमी वेळेत लावली सुद्धा होती.... त्या झाडामुळे अडवलेली जागा आता मोकळी झाली होती... आता स्पष्टपणे मकाजीच्या घरामध्ये जायला रस्ता झाला होता...

झाड तोडून झाल्यावर मकाजीला कोणीतरी बाहेर बोलवले. मकाजी बाहेर आला. त्याने झाड तोडलेल्या जागेकडे पाहिले तेव्हा त्याला ती जागा एकदम भकास वाटली. परंतु ते झाड तोडण्यासाठी आपल्या आईला जीव गमावा लागला खूपच वाईट वाटत होते. मकाजीच्या फोटो पाठव मकाची बायको सुद्धा बाहेर आली आणि ती सुद्धा झाड तोडलेल्या जागे कडे
बघू लागली. तेव्हा तिला खरंतर तिच्या भावना आवरता आल्या नाहीत. झाड तोडले म्हणून आनंद व्हावा.अथवा आनंदाने आपण नाचावे असे तीला क्षणभर वाटले. परंतु आपल्या सासूबाईचे असे वाईट झाल्यामुळे तिला तो आनंद तीला दाबून टाकावा लागला.
माणसं मात्र म्हणत होती मकाजीच्या आईला अखेर खाल्ले... मक्का जिला आणि त्याच्या मुलीला नार्गीला सुद्धा
रडावे की हसावे हेच कळत नव्हते...
सोबत जमलेल्या वसाहतीमधील लोकांना सुद्धा
हसावे की रडावे हेच कळत नव्हते. आनंद लपवावा की दुःख दाखवावे याच संभ्रमात अनेक जण पडले होते.
झाड तोडून झाल्यावर मकाजीच्या आईचे अंत्ययात्रा तिथून बाहेर पडली आणि स्मशानाच्या दिशेने निघाली तेव्हा वाटेत पडलेले झाडाचे कलेवर मरून पडले होते. एक विचित्र घटना घडली तसा तो प्रकार वाटत होता. त्याच्यासाठी केला होता अट्टाहास ती घटना अशी घडेल असं कोणालाही वाटलं नाही. मकाजीच्या आईच्या मृत्यू प्रकरणापर्यंत ते झाड जिवंत होतं. आता मात्र ते मरण पावले होते.
झाड पडलेला आनंद कुणालाच दाखवता येत नव्हता. हे मोठे शल्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. झाडाने नुसत्या मकाजीची गोची केली नव्हती .तर पूर्ण वसाहतीचीच गोची केली होत.
हे स्पष्टपणे दिसून येत होतं. मात्र मकाजीच्या आईच्या मृत्यूनंतर झाडाची सुद्धा गोची सुटली होती हेच खरं असं म्हणता येईल. मात्र रस्त्यावर एका बाजूला पडलेल्या झाडाच्या लाकडाच्या ओंडक्यांनी आणि पर्णहीन फांद्यानी रस्त्याचा अर्धा भाग व्यापला होता... झाडाच्या पानांचा गंध आजूबाजूच्या रस्त्यावर आणि वातावरणात पसरला होता. मात्र झाडाच्या त्या अवस्थेकडे कोणी पाहिला तयार नव्हता सगळेच जण मकाजीच्या आईच्या अंत्ययात्रेत सामील झाले होते. झाडाच्या बद्दल कुणाच्याही मनात कणव दिसत नव्हती ंं.
झाडाची विल्हेवाट लावून झाल्यानंतर खूप वेळाने महानगरपालिकेचा एक अधिकारी मकाजीला येऊन भेटला.
तो अधिकारी मकाजिला म्हणाला. खरंतर आताच्या या क्षणी तुम्हाला मी एक गोष्ट विचारणा योग्य नाही तरीपण मी तुम्हाला ती गोष्ट विचारतो चालेल.
कोणती गोष्ट...
मला एक कळत नाही लोकं आपल्या मुलीचं नाव गार्गी ठेवतात. पण तुम्ही तुमच्या मुलीचं नाव नार्गी कसं काय ठेवलं.

खरंतर मकाजी त्या अधिकाराच्या प्रश्नाचे उत्तर देणार नव्हता परंतु त्याला मनातून दाटून आले . तो म्हणाला साहेब कसं आहे.
मी इतकी वर्ष नगरसेवकांना सांगत होतो की हे झाड तोड झाड तोडा. कोणत्या नगरसेवक काही लक्ष दिलं नाही. परंतु कसं का होईना तरी आता ते माझं काम केलेलं आहे.
मकाजी त्याचा इथे काय संबंध मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारलेला आहे तो अधिकारी न समजून म्हणाला.
साहेब मी तुम्हाला तेच समजावतो आहे थोडं ऐका... हे जे नगरसेवक साहेब आहेत ना आम्हाला मदत करणारे त्यांच्या बायकोचं नाव काय आहे तुम्हाला माहित आहे का ंं

होय माहीत आहे. तो अधिकारी ओशाळून म्हणाला. ते नाव जर तुम्हाला चालतं तर माझ्या मुलीचं नाव नारगी आहे हे तुम्हाला कसं खटकतं.

तुम्हाला एक म्हणून सांगतो नारगी हे नाव माझ्या आईने तिचं ठेवलेला आहे त्यामुळे कुणाला आवडत नसेल तरी मी ते नाव आता बदलणार नाही कारण माझ्या आईची पुन्हा म्हणून ते माझ्या मुलीचं नाव आहे..

आपल्या नगरसेवक च्या बायकोच काय नाव तर आहे उपेक्षा...
आणि असं काय पाहिजे होतं अपेक्षा... मग ती चालतो तुम्हाला.

मकाजी त्याच्या आईची खुणा पुसायला तयार नव्हता परंतु झाडाच्या खोडाचाही मागमूस राहणार नाही अशी काळजी घेतली गेली होती याचं त्याला काहीच वाटत नव्हतं.

इतर रसदार पर्याय