आधार रोशनी द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आधार

लग्नाची घाई चाललि होती सगळे गडबडीत होते
नवरदेव मंडपात आला होता आणी आता नवरी च्या येण्याकढे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते
तेवढ्यात नवरी आली सुरेक सुंदर नाजूकशी
अगदी कोवळी 18 वर्ष्याची लक्ष्मी नवरीच्या वेश्यात अगदी साक्ष्यात लक्ष्मी दिसत होती

वेंकटेश नावाच्या व्यक्तीसोबत आज ती साताजन्मासाठी बांधली जानार होती
हळू हळू विधी होत गेले आणी शेवटी पाठवणी ची वेल झाली

पाठवणी च्या वेळेस सगळे भाऊक झाले होते
आपले साधे भोले आईवडील आणी दोन धाकटे भाऊ
हे जे आजपर्यंतच तिच जग होत ते ती सोडून जात होती
तिच्या लहान भावांचा ती आधार होती
जानु काही त्यांना एक छोटी आई लाभली असावी

पाया पडते वेळेस आजीने मिठीमरून माझी पोर आता परक्यांची झाली असे उदगारले
आजीच्या बोलण्यात प्रेम माया आनि दुख स्पस्ट जाणवत होते
हळू हळू सगळ्यांचा निरोप घेऊन लक्ष्मी आणी वेंकटेश ची गाडी आता रस्त्याला लागली होती
पूर्ण प्रवासात लक्ष्मी तिच्या घरच्यांनाच विचार करत होती
तिची शिकायची इच्छा होती पण लग्नामुळे हे तिच स्वप्न आता स्वप्नच उरलं होत
वेंकटेश : ओह मॅडम आता जरा चेहरा हसका ठेवा झाल आपण पोहचणार आहोत
लक्ष्मी ने तसे स्वतःला सावरले
पण तिला तिच्या नवऱ्यच्या बोलण्यात परके पणा आणी उर्मठपना जाणवत होता
घराणे संबंधामुळे तिच लग्न झाल होत
या आधी तीने वेंकतेश पाहिल देखील नव्हतं
नाही त्याच्याबदल तिला ज्यास्त माहिती होती


गृहप्रवेश झाला आणी तिच्या आयुष्याची गाडी आता सुरु झाली
पारतिने माहेरी गेल्यास तीने तिच्या आईला घट्ट मिठी मारली
सारिका : लक्ष्मी कस वाटल ग सासर सगळे माणस कशी आहेत आणी वेंकटेश कसे आहेत
लक्ष्मी ने आपल्याभावना आईपासून लपवल्या

लक्ष्मी : छान आहे घर मोठ आहे
आणखी बरीच पाहुणे मंडळी आहेत
त्यामुळे घर भरून वाटू लागल

सारिका ला आपल्या लेकीच्या बोलण्यातली उदासता लपली नव्हती
वेंकटेश चे नाव काढून सुद्धा ती खुललि नव्हती यातच तिच्या आईला सगळे समजले
की सासर आपल्या मुलीला तेवढे आवडले
नाही आणी तीला तिथे एकटे पडण्याची भीती वाटत होती

वेंकटेश ची नोकरी मोठ्या शेहरात होती त्यामुळे तो आठवड्यातून दोन दिवस यायचा
माणूस म्हणून तो एक खूप चांगला वक्ती होता
त्याला गरिबीची जान होती
आणी त्याच्या वडिलांचा तिरप्या स्वभाव थोडा त्याच्यात उतरला होता
लक्ष्मी ने त्या घराला आपलं मानलं होत
ती त्या घरची धाकटी सुन होती
सगळे अगदी हक्काने तिला काम सांगायची
तीही मनापासून सगळ्यांच करत होती
ती आगळ्यांचा आधार बनली होती ती नसेल तर कोणाचं काम पूर्ण होन मुश्किल
तिला माहेरी सुद्धा दोन दिवसाच्या आत येन भाग होत
तिच्या नवऱ्याला या सगळ्यांचं कौतुक होत
पण तो न कधी स्तुती करत ना कधी तिला याची जाणीव करून देई

तीने स्वतःला रामवून घेतलं
होत ना कोनति अपेक्षा होती ना कसली तक्रार
पण कधीतरी तिच्या मनाच्या कोपऱ्यात तिलाही वाटायचं की तिच्यासाठी कोणता आधार का नाही ती ज्याला आपलं मन मोकळ करून बोलू शकेल
ज्याच्याशी बोलताना वागताना तिच्या मनात भीती नसेल
तिचा नवरा कितीही चांगला असला तरी त्याने तिला कधीही आधार नव्हता दिला
उलट त्याने तिच्यावर फक्त नवऱ्याचा हक्क गाजावला होता
त्याने तिच्यावर हाताही उगरला होता पण ती बिचारी राग मानुन करेल तरी काय
शेवटी कधीतरी तो आप ला आधार होईल अशी अश्या तिच्या मनात कधी कधी डोकवायची

आज लक्ष्मीला कळले की तिला दिवस गेलेत
या बातमीमुळे सगळे सगळे आनंदी झाले
माहेरि सुद्धा सारिका आईला खूप आनंद झाला त्यांना वाटले की आता माझी लेक सुखी होईल ती पूर्ण होईल

सारिका माहेरी जरा लवकरच आली होती कारण डॉक्टर ने तिला आराम सांगला होता आणी
तो तिच्या सासरी भेटन मुश्किल होता
वंकटेश चा तिला माहेरी पाठवण्यात हात होता
पण तो एकदाही तिला भेटायला सासरी नाही आला

होणाऱ्या लेकराच्या निमित्ताने
तरी माझा विचार केला यातच लक्षमीने समाधान मानले होते
लक्ष्मीला एक कन्या रत्न झाले
सगळे खूप आनंदी झाले
मोट्या जाऊबाईंना तीन पोरच होती
म्हणून मुलगी झाल्याचा सगळ्यांना आनंद होता

मुलीचे नाव सगळ्यांनी आनंदी ठेवले
कारन तीच्या येण्याने सगेलच खुश होते
वेंकटेश च्या मित्राला त्याच दिवशी मुलगा झाला होता
तो मित्र वेंकटेश च्या मुलीला पाहायला आला
बोलता बोलता
वेंकटेश : तुला तर मुलगा झाला बाबा तु मुलाचा बाप आहेस आता म्हणून एवढा मिरवतो आहेस

त्याचे हे बोल लक्ष्मीच्या कानावर पडले तेव्हा तीने आनंदी कढे पाहिले आनंदी अगदी शांत पणे लक्ष्मीच्या खुशीत झोपली होती तीने आनंदी ला जवळ घेतलं
आणी आनंदी जागी झाली
झोप मोडल्यामुले ती रडायला लागली
वेंकटेश : काय केल तु ति झोपलि होती ना तिला रडवून तु कामापासून हात बाजूला करतेस हे दिसत माला

तुझ्या फायद्यासाठी माझा लेकीचा वापर नको करुस

त्याचे असे बोलणे नवीन नव्हते पण त्याचा आरोप तिला टोचून गेला

लक्ष्मी जवळ नसली की आनंदी कावरी बावरी होत असे
आनंदीला आपल्या जवळ सुरक्षित वाटते आणी तिच्यासाठी तरी आपल्याहून माज्याहून जास्त जवळची व्यक्ती कोण्ही नाही असा विचार करत करत लक्ष्मी झोपी गेली
दोन्ही कुटुंब एका देवस्थानाला निघालं होत
त्याच निमितने लक्ष्मी आणी आनंदी याची भेट होईल म्हणून सारिका खुश होती
लक्ष्मी सुद्धा खुश होति करान सारिका शिवाय कोण्ही काही क्षणभर पण तिला आधाराख वाटलं नव्हतं

दर्शन झाल्यावर वेंकटेश गरम आहे हे लक्ष्मीला जाणवत होत पन नेमक काय झालाय हे तिला कळलं नव्हतं
गाड्या एका ठिकाणी थांबल्या
लक्ष्मी आणी आंनदी तिच्या महेरि जाऊन येतिल असे ठरले होते म्हणून आता त्या दुसऱ्या गाडीत बसणार होत्या

वेंकटेश तडक तिच्याजवळ आला त्याने काही न जुमनता लक्ष्मीच्या कानाखालि वाजवली
नेमके काय घडले आणी का हे कोणाला समजत नव्हते
वेंकटेश चा भाऊ परिस्तिथी सांभाळतो

तर लक्ष्मीला त्यांचा गाडीचा ड्राइवर बोलला याचा त्याला खुप राग आला होता
पण त्यात लक्ष्मीची काहीच चुक नव्हती
लक्ष्मीला भर गाडीतून उडी माराव अस वाटत होत पण ती शांत बसली होती

लक्ष्मी चे आईवडीला सुद्धा खूप दुखावले गेले होते
आईने थोडा फार आधार देऊन
पुरुष असेच असतात तुझे बाबा चांगले आहेत पण सगले तसे नसतात असा समाज लक्ष्मीला दिला

तिच्या वडिलांना मात्र हे अजिबात आवडले नव्हते
सारिकाने सुद्धा त्यांच्याजवळ नाराजगी व्यक्त केली करान हे स्थल सारिकाने नलारले होते
पण ती शेवटी हरली होती

लक्ष्मीच्या सासरवरून तिला पाठवून द्या असा निरोप आला
यावर तिच्या वडिलाने नाही पाठवणार असे सांगले
लक्ष्मीला या गोष्टी मुळे आधार वाटला

पण तीने या गोष्टीला मनावर घेऊ नये असे तिचा लहान भाऊ सुद्धा तिला समजावत होता

ती ज्यांना त्यांच्या आज पर्यंत आधार देत आली
आपल्या लहान भावना तीने आपल्या मायेचा आधार दिला होता
आज ती भाऊ सुद्धा तिचा आधार बनत नव्हती

शेवटी ती परत सासरी गेली
पण हा प्रसाग पुन्हा आला

चारित्रावर आरोप घेणे हे लक्ष्मीला सहन होत नव्हते
आता ती वेंकटेश सोबत शहरात राहायला आली होती
आता तर तिला खूपच एकटे पणा वाटे त्यावर वेंकटेश चे वागणे
एकदिवशी तर ती सगळे कंटाललि आणी आपला कोण्ही साथ नाही देउ शकत म्हणून शेवटी तीने मरणाचा विचार डोक्यात आणला
ती आता पूर्ण खचली होती
तीला तिच्या माहेरचे पण आता पारके वाटत होत
आपला आधार अस तिच स्वतःच काहीच नव्हतं
तिचा निर्धार पक्का होता आता तिला कोणाचा आधार नको होता आता तीने मन कठोर बनवलं होत

याआधीही असा विचार आला असता ती तिच्या आईवडिलांचा भावाचा विचार करी पण आता तीही तिला पारकी वाटायची
तिला आनंदी वर सुद्धा हक्क गाज्ऊ शकत नव्हती
कारन् ती या घरात जन्मली आहे आणी तिच या घराशी नात लक्ष्मीला आनंदी पासून दूर करी

आनंदीचा निश्चय झाला होता आता ती परत माघार घेणार नव्हती
तिला वेंकटेश ने मारले होते पण तिला या जखमांनी त्रास होत नव्हता
तर आपली बाजू समजून आपल अस कोण्ही नाही याचा तिला त्रास होत होता

ती उठली आणी आता आता बस म्हणून निघणार च तेवढ्यात आनंदी ने ममा असा उदगार काढला
अगदी जाणू ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती

तिचे ते निरागस उदगार ऐकून आनंदी खाली बसलि आणी तीने आनंदीला आपल्या उराशी घट्ट पकडले

आनंदीला कवटालून् ती खूप रडली
जाणू तिला आनंदीने तिला आधार दिलता

तिच्या दोन अक्षरांनी लक्ष्मीला बांधून ठेवलं
यापुढे जेव्हाही तिला काहीही वाटे ती आनंदी शी बोलायची
तिला जवळ घ्याय ची

पुढे लक्ष्मीला मुलगाही झाला
तिची माया तिच जग ही ती दोन लेकरे बनली
पण कमी वयात गरोदर पणा आणी सतत चा तान या मुळे ती बरीच आजारी असायची
काही ऑपरेशनस् मुळे तिचे खूप हाल झाले होते

आनंदी मोठी होत होती
लक्ष्मीला तीने त्या दिवसापासून खूप आधार दिला होता
आनंदि खूप समजदार होती
तिच्या मनात तिच्या वाडीला बदल द्वेष नव्हता

आंनदीने तिच्या वडिलांना समजून घेतले होते
तीने समजले होते की त्यांना एक कुटुंब अस लहानपनि भोगता अल नाही आणी त्यांनी जे पाहिलं त्यातून ते तसे बनत गेले

पण आनंदीला तिची आई खूप प्रिय होती
तीने लहानपणीच आईचा आधार बनून तिचा जीव वाचवला नव्हता तर ती मोठेपणी सुद्धा लक्ष्मीचा आधार होती
घरी भांडण वगरे झाल की ती आई जवळ बसून राहायची
आपल्या हाताने ती आईला भरवायची

लक्ष्मी आपल्यासाठी जगली ही जान आनंदीला होती तिच्या पद्धतीने ती लक्ष्मीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करी

आनंदीने डॉक्टर हो बर तु अस सहज लक्ष्मी बोलली होती पण आनंदीने जिद्दिने हे मिळवलं
तिचा नंबर मेडिकल कॉलेज मध्ये लागला

वेंकटेश ला सुद्धा गर्व होता
तिला सोडायला गेल्यावर पहिल्यांदाच वेंकटेश रडला होता

पण त्यानंतर आनंदी ने आपले मोन सोडले तीने जमेल तास वेंकटेश ला त्याचा चुकीचजी जाणीव करून द्यायची
तीने स्वतःला आधी सिद्ध केल होत नंतर ती लक्ष्मी पुढे एका मजबूत आधारस्थंभ बनून लढायची

लक्ष्मीच्या आजपनात अगदी लहान लेकरा ला आई जपते तसे आनंदी तिच्या लक्ष्मी ची काळजी घ्याची

पुढे गावी चालत असलेल्या किटकिरीमुळे आणी आजपरेत् सहन केलेलं सगळे मिळून
लक्ष्मी ची मानसिक अवस्था बिघडलि होती


वेंकटेश लक्ष्मीची खिली उडवे पण आजपर्यंत स्वतःहुन् त्याने तिला दवाखान्यात सोबत नेले नव्हते
तो पैसा पुढे टाकायचा आणी हात काढून घ्यायचा

पण आनंदी ही तिच्या आईला साथ द्यायला धावायची
आपला अभ्यास सांभाळत ती लक्ष्मीला पण साथ धायची
तीने आपणहून लक्ष्मीला माणसरोग आणी काउंसेलिंग ला घेऊन गेली


लक्ष्मी जे प्रेम आणी असुरक्षुता आजपर्यंत भेटली होती
ती या अवस्थेत भीतीत असायची की तिला कोणी मारुन् टाकेल
ती फक्त आंनदी च ऐकायची आणी आंनदीसोबत च तील सुरक्षित वाटे
आनंदी खुप खंबिर होती
आपल्या लहान भावलहि आनंदी खुप आधार देत होती

हळू हळू लक्ष्मी बरी झाली

आणी पुन्हा सगळं सुरळीत झाल

आनंदीने ठरवले होते की
ती पुढे निराधार बायकानसाठी आधार बनेल


लक्ष्मीला जे काही दुख आणी युनिवा जीवनात भेटल्या होत्या त्या सगळ्या आंनदीने भरून काढल्या होत्या

जीवनात कोणत्याहि रूपात एक आधार असल्यास माणूस समाधानि आणी संतूष्ट जीवन जागु शकतो

तर तुमच्या जीवनात असा आधार कोण आहे ?