One Girl friend is Must books and stories free download online pdf in Marathi

एक मैत्रिण असावीच

*हा लेख माझ्या मैत्रिणीस अर्पण---
या सारख्या विषयावर लिखाणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. कारण मी पुर्वी 'माझा कराड ते चिंचवड सायकल प्रवास-१९८८' आणि 'वासोटा जंगलातील एक रात्र -१९९२' या दोन विषयांवर लिखाणाचा प्रयत्न केलाय पण तो म्हणजे आधी घडलेल्या घटनांचा फक्त लेखणीतला उतारा होता.त्यात मनातील विचारांचा वा भावनांचा कल्लोंळ कुठेच रेखाटला नव्हता.आता तब्बल२८ वर्षांनंतर परत लिखाणाचा प्रयत्न आणि तो पण तसा वयाला न शोभणारा विषय, जरा अवघडचं काम होतं.पण मनात ठरवलं की आत्ता नाही तर परत कधीच नाही आणि केली सुरवात! आमच्या सारख्या कधीतरी लिहण्याचा प्रयन्त करणाऱ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न असतो की सुरवात कुठुन व कशी करावी.पण ठिक आहे जशी तशी सुरवात तर करुयातच. तसा वयाचा आणि माझा ३६ चा आकडा, वयाला न शोभणार वागणे हा जणु काय माझा छंदच. माझ्यादृष्टीने वय म्हणजे फक्त एक नंबर, मी आता ४८व्या वयातसुध्दा विशीतल्या सारखाच वागतो वा स्वतःला विशीतलाच समजतो व सर्व जुने छंद जोपासतो. या वाढत्या वयानुसार मला अतिमॅच्युअर वा सिरीयस कधी होताच आले नाही. मला जीवनात 'सहज' जगायला आवडतं, अगदी 'सहज' शब्दांसारख,ना कुठे काणा, मात्रा,ना वेलांटी,ना कुठे रुकार. जिवनाकडे पाहण्याच्या या सहज दृष्टीकोनामुळे ना चाळींशी जाणवली ना येणाऱ्या पंन्नाशीची चाहुल कधी लागली. मी आपलं असचं सहज जगतोय,अगदी मस्त कलंदर. बरं शीर्षक ठरवताना पण निवड काही होत नव्हती, एक का! एखादी का! एकतरी का! एकच मैत्रिण! पण शेवट हेच फायनल केलं, कारण बाकीचे शब्द खुपचं स्पेसीफिक वाटत होते आणि आता मैत्रिण तर झालीयेच आणि ती पण जरा युनिकच आहे. बरं शीर्षकावरुन वाचणाराच्या मनाची थोडी चलबिचल झालीचं असेल,पुढील एक दोन वर्षात पंन्नाशीला टेकनाऱ्या म्हाताऱ्याला (टेकनाऱ्याच म्हणुया कारण बरेच जण पुढे काठीच टेकायला लागतात) काय हा म्हातारचळ!लोकांच्या दृष्टीने हा म्हातारचळचं आणि हो या कथेच्या नायिकेच्या म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या xx दृष्टीने सुध्धा बरं का!ते पुढे कळेलचं.मी मुद्दामच इथे तिचं नांव नाही लिहीत कारण तिला नाही आवडणार ते अथवा त्यामुळे ती रागवण्याची शक्यता आहे आणि ते मला नकोय.बरं तिने जर परवानगी दिली तर मी आनंदाने लिहीन.तिला आपण नायिकाच म्हणुयात कारण या लिखाणाचे ऊर्जा स्तोत्र तीच आहे,पण तिची इंर्टी उत्तरार्धात आहे. ती एक प्रतिभावंत व अतिशय परखड लिहणारी लेखिका आहे. तिच्या थोड्या बहुत संगतीचा व तिचे लेख वाचून प्रेरित होऊन हा लिहण्याचा प्रयत्न आहे.
पुर्वाध: -
आयुष्यात एका मैत्रिणीची उणिव का जाणवत होती यासाठी माझ्या लहानपणापासुन ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे २०१९ पर्यंत xxया मैत्रिणीशी ओळख होईपर्यंतच्या काळातील माझ्या व्यक्तीमत्वाच्या जडण घडणी बाबत  जाणुन घेणे महत्त्वाचे आहे म्हणून हा सगळा पुढचा  अट्टाहास. आम्ही ८० ते ९० च्या दशकातली मुलं,जन्म ७२चा, कळेपर्यंत ८०साल आणि कॉलेज संपले ९०ला, संपली तरुणपणातील मजा,कारण डिप्लोमा पास झालो की क्यांम्पस इंटरव्हुमध्ये सिलेक्ट होऊन बजाजमध्ये रुजु झालो वयाच्या १९व्या वर्षी.आता थोडंस मागे जाऊयात, घरात आम्ही दोंघ भाऊ, मी लहान, बहीण नाही, आमच्या संपुर्ण माने परिवारात आमच्या त्या पिढीत एक पण मुलगी नाही.आमचे चार काका सगळ्याची मिळून नऊ मुलंच. घरात स्ञी जी काही ती फक्त आई, त्यात वडील कडक शिस्तीचे त्यामुळे इमोशंस/भावना यांच्याशी आमचा दुरापास्त संबध नव्हता. सगळेच एक जात पाषाण हृदयी म्हणतात ना तसे, शाळेत पण तिच अवस्था, मुलांची शाळा वेगळी, ज्या चाळीत रहात होतो तिथे ही मुलींचा दुष्काळ,आम्हाला बहीण नसल्यामुळे आमच्या शेजारांच्या मुलीला आम्ही बहीण मानले होते पण तोही संबध तीन-चार वर्षाचा कारण आम्ही नविन ठिकाणी रहायला गेल्यामुळे भेटणे फक्त राखीपौर्णीमा आणि भाऊबीज एवढेच.आता मला असे वाटते की शक्यतो आमच्या पिढीतचं ऒव्हरऑल मुलीचां दुष्काळच होता. जाऊदे! ते महत्त्वाचं नाही आमचं बालपणं कसं गेलं हे सांगण्यासाठी हा अट्टाहास केलाय. यामुळे मुलींशी कसं बोलावे, कसं वागावे हे कधी कळलंच नाही. साल १९८६/८७ पर्यंत तारुण्यात पाऊल ठेवले होते. आमच्या नविन कॉलनीत पण मुली कमींच व आम्हांला बहीण नसल्यामुळे कोणत्याही मुलीशी ओळख नाही वा कधी बोलणे नाही.कॉलनीत माझा एकच मित्र आहे,राजु! त्याच्या घरासमोर 'लंगोटे' कुटुंब रहात होते आणि त्यांची धाकटी मुलगी 'स्वराली' आमच्याच वयाची, ती मला आवडायची व मला तिच्याशी मैत्री करावीशी वाटत होती. मी तसा प्रयत्न पण चालु केला होता व त्यासाठी तिचीपण अनुकुलता जाणवत होती. त्याकाळात मुलींशी मैत्री जमवणं हे खुप वेळ खाऊ व अवघड कामं होतं. ती आमची गाडी काही पुढे सरकली नाही कारण मी १०वी पास होऊन डिप्लोमाला प्रवेश घेतला! तो कुठे तर कराड पाॅलीटेकनिक कॉलेजला. त्यामुळे पुढे नो कॉन्टक्ट, मी एक दोन महिन्यातुन कधीतरी घरी यायचो आणि ती कुठे शिकायला होती ते नाही कळालं. तो विषय तिथेच संपला. इकडे कॉलेज मध्ये पण मेक्यानिकल ब्रांच निवडलेली, त्याकाळात  मेक्यानिकल साईडला मुली नसल्यातच जमा. बाकी दोन ब्रांच मधे म्हणजे ईलेट्रीकल व सिव्हील मधे सुध्दा एक दोनच मुली होत्या पण त्यांच्याशी आमचा काही संपर्क नसायचा. कुसरोवाडीया कॉलेजचे चांगले मिळालेले अँडमिशन सोडुन मी कराडला गेलो. तसं पाहीलं तर वाडीयाचा हायफाय फ्रिनेस माझ्या पचनी कदाचित कधी पडला नसताचं. पण ते बरेच झाले, नाहीतर माझे कॉलेस पुर्ण नसते झाले. पण कराड कॉलेज जर पाहिलं तर खरचं स्वर्ग होतं आमच्यासाठी. फॉर्म भरायला गेलो त्यावेळेसच मी या कॉलेजच्या प्रेमात पडलो होतो. एकतर सिटीच्या बाहेर निसर्गरम्य ठिकाण, शांतता आजूबाजूला शेती, मोकळा परिसर,मोकळी हवा, काॅलेजचे मोठं मैदान की जिथे नेहमी सी के नायडू इंटर  कॉलेज क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या, तसेच जिमखाना,बास्केट बॉल ग्राउंड, ही तर माझ्यासारखा खेळाडूला पर्वणीच होती. कॉलेज व होस्टेल हे सर्व जुने दगडी बांधकाम त्यामुळे एक वेगळाच फिल़ असायचा आणि कॉलेजच्या मागेच होस्टेल होते म्हणजे रोडवर कॉलेजचे मेनगेट मग कॉलेज आणि एक रस्ता तिथुनच बाजुने मागे होस्टेलकडे जायचा. कॉलेजची कंपाउंड वॉल मेनरोड पासून मागे पुर्ण होस्टेल कव्हर करायची मध्यभागी ग्राउंड नंतर होस्टेल आणि एका बाजूला मुख्याध्यापक आणि प्राध्यापकांच्या कॉटर्स होत्या. होस्टेलचे चार ब्लॉक होते,ए, बी, सी आणि डी हा इंजीनियरिंगसाठी होता. कॉलेजच्या कॅम्पसमध्येच होस्टेल असल्यामुळे एकच मेन गेट होते आणि कधीमधी रात्री १०नंतर ते बंद करायचे. आम्ही तीन वर्षांमध्ये ए आणि सी ब्लाॅकलाच राहिलो. आमच्या कॉलेजची विशेषता म्हणजे इंजिनीअरिंग आणि डिप्लोमा हे एकत्रच होते त्यामुळे क्लासरूम मोठे होते आणि बरेचसे शिक्षक इंजिनीरिंग आणि डिप्लोमासाठी काॅमन होते, त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता खूप चांगली होती. क्लासरुमला दोन दरवाजे होते त्याचा हा फायदा असायचा, न आवडीच्या विषयाची लेक्चर्स बरेच वेळा या मागच्या दरवाज्यातून बाहेर पडून आम्ही बंक करायचो आणि टपरीवर टाईमपास करायचो. खेळावर माझं विशेष प्रेम, त्यातच क्रिकेट हा सगळ्यात आवडीचा खेळ, कॉलेज संपलं किंवा शनिवार-रविवार मैदानावर क्रिकेट खेळणे हा आवडीचा कार्यक्रम होता. होस्टेलच्या रूम पण एवढ्या मोठ्या होत्या की (specifically 'C' block in 2nd year) पावसाळ्यात ग्राउंड ओले असायचे मग आम्ही रूम मध्ये हाफ पिच क्रिकेट खेळायचो. कॉलेजच्या क्रिकेट टीम मध्ये मी उपकप्तान होतो. आम्ही त्यावेळच्या ऊत्कृष्ट अशा कराड सिटी क्रिकेट टीमला सुद्धा हारवलं होतं. त्यानंतर आम्ही कोल्हापूरला आयडीएसच्या (Inter Diploma sports) क्रिकेटच्या मॅचेस पण खेळलो होतो. कॉलेजच्या स्पोर्ट्स मध्ये मी नेहमी चमकायचो,शेवटच्या वर्षी तर मी खेळात दहा ते बारा सर्टीफिकेट मिळवले होते. पण नुसते खेळून जमणार नाही!ज्यासाठी आपण कराडला आलोय त्या शिक्षणात काहीतरी करून दाखवणे ही महत्त्वाचं होतं. त्यामुळे शेवटच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जवळ असलेले सगळे बॅट आणि स्टंप तोडून टाकले आणि अभ्यासाला लागलो. थर्ड इयरचा रिझल्ट आला त्यावेळेस मी डिस्टिंक्शन मध्ये पास झालो होतो आणि पूर्ण कॉलेजमध्ये माझा क्रमांक नववा होता आणि अशा प्रकारे डिप्लोमा विदाऊट  ATKT डिस्टिंक्शन मध्ये पास होण्याचे माझे उद्दिष्ट सफल झाले होतं. मी तीनही वर्षी कॉलेज होस्टेलला होतो, त्यामुळे धमाल असायची. आमचं कॉलेज कराड सिटी पासून बाहेर होते, साधारण ६ किलोमीटर, तसं पाहीले तर कराड मधली सगळीच कॉलेज सिटीच्या बाहेरच 'विद्यानगर' परिसरात आहेत. प्रामुख्याने सिटीबस आणि सायकल हे दोन ट्रांसपोर्टेशनचे माध्यम होते. पण आमचं विशेष प्रेम सायकलवर होतं, सिटी बस रात्री आठ नंतर बंद असायच्या. त्यामुळे रोज क्लासेस आणि जेवणाच्या मेससाठी सायकलवरुन सिटीत जाणे भाग असायचे आणि ते पण दिवसांत दोन वेळेस कारण कॉलेजच्या जवळपास चांगले क्लासेस वा जेवणाच्या मेस नव्हत्या. यामुळे रोज दिवसभरात साधारणपणे २० ते २५ किलोमीटर सायकलिंग व्हायचं. हा सायकलिंगचा फिवर एवढा असायचा की रविवारी सुट्टीच्या दिवशी लगतच्या साखर कारखान्यांना भेट द्यायची, चाफळ राममंदिर,एकदा तर आम्ही सायकलिंग करत कोयना धरण गाठलं जे कराडपासुन ७०किमी आहे आणि याच आत्मविश्वासाने पुढे कराड ते पुणे असा सायकल प्रवास घडला, त्याबद्दल येथे काही लिहित नाही त्याचे लिखाण वेगळे आहे. परत मुळपदावर येऊ,रात्री मेसेचं जेवण झाले की रोज मसाला दूध प्यायला बस स्टैंडवर जाणे,रात्री नऊ ते बारा पिक्चर बघून होस्टेलवर बाराच्या पुढे यायचं,कॉलेजचे मेन गेट बंद असले की गेट वरून उचलुन सायकली आत घेऊन यायचं, होस्टेलचे गेट बंद असले की मागच्या जाळ्यांवर चढुन आम्ही रूम मध्ये जाणे, आमचे हे असले पराक्रम चालु असायचे. त्याला कारण पण तसंच होतं, एकदा उशिरा आल्यानंतर आम्ही सोज्वळपणे होस्टेलच्या गेटने आत गेलो तर वॉचमनने आम्हाला पकडलं, आम्हीपण त्याला नडलोच कारण विचार केला की रात्री कशाला हा काही नाटक करेल, पर हो गया उलटा! त्याने सरळ मुख्याध्यापकांनाच फोन लावला आणि ते महाराजपण हौसेने उठले आणि आम्हाला त्यांच्या कॉटर्सवर बोलवुन घेतलं, खुप खरी खोटी सुनावली आम्हाला पण आम्ही एैकत नव्हतोच, आमची नावं लिहून घेतली आणि सकाळी कॉलेजमध्ये भेटायला सांगितलं पण पुढे काय विषेश झाले नाही. पण आम्ही तेव्हापासून कानाला खडा लावला, रात्री-अपरात्री होस्टेलमध्ये घुसण्याचा मागील जाळी हाच आमचा रस्ता झाला.आठवड्यात हमखास एक ते दोन पिक्चर हे रुटीन असायचे.पिक्चर पहाण्याची पहिल्यापासून आवड त्यामुळे पिक्चर मधले डायलॉग, हिंदी,उर्दू भाषेचे बर्‍यापैकी ज्ञान व शब्दांचा साठा माझ्याजवळ होता. त्या काळातले 'मैने प्यार किया' 'चांदणी' सारखे पिक्चर आम्ही किती वेळा बघितले याची मोजदाद नाही.मग त्याची डायलॉगबाजी रूमवर चालायची, धमाल करायचो.एका रुम मध्ये तिघे मी, रवी आणि सुनिल,आम्ही तिघेही पुण्याचे, त्यामुळे समविचारी, एकदम गट्टी असायची. मला रोज  व्यायामाची व स्वच्छतेची सवय, त्यामुळे रोज रुम झाडणे तसेच संध्याकाळी आमचा एकत्र व्यायाम हा शिरस्ता तीनही वर्ष अबाधीत होता. तसेच मी एक गणपतीचा फोटो लावला होता रुम मध्ये त्याची आम्ही रोज पूजा करायचो. मुलांच्या होस्टेल रुममध्ये सहसा असणारे तसले पोस्टर्स कधीच आमच्या रुममध्ये नव्हते.एकदम प्रसन्न व स्वच्छ वातावरण असायचे रुम मध्ये ,कसल्याही वाईट विचारांना थाराचं नव्हता तिथं. होस्टेल रेक्टर नेहमी आमच्या रुमची स्तुती करायचे. दिवसभर कॉलेज, संध्याकाळी एकत्रच टपरीवर चहा पिण्यास जाणे,खायला काय! कधी आम्लेट ब्रेड, बॉईड् अंडा ब्रेड, कधी क्रिमरोल चहा, त्याकाळात कॉलेज एवढांच वेळ टपरीवर जायचा कारण पण तसचं होतं. समोरच सायंस कॉलेज होते त्यामुळे हिरवळ भरपुर आणि या वाळवंटातल्या इंजीनियरसना तेवढ्याचं म्रुगजळाचा दिलासा. माझ्या दोनही रुम मेटना पण मैत्रिणी नव्हत्या त्यामुळे आमचा मुलींशी काही संबधच कधी आला नाही किंबहुना आम्ही मुलींशी मैत्री करण्याचा तसा प्रयत्न पण कधी केला नाही. मी तसा उंचपुरा, गोरा देखणा, रोज व्यायाम करणारा, माझा स्वभावातला टापटीपपणा आणि पुण्याचे राहणीमान, त्यामुळे माझी पर्सनॅलिटी बाकी सगळ्यांपेक्षा जरा हटकेच होती त्यामुळे मी कॉलेजमधली एक स्मार्ट वा फेमस पर्सनॅलिटी होतो, शिक्षक पण बोलताना म्हणायचे अरे त्या स्मार्टला बोलवा!
आतापर्यंत मित्र आणि काॅलेजबद्दलच सांगुन झाले, मग थोडंस प्रेमाचं 'वन साईड प्रेम' का असेना! त्याबद्दल येथे नमूद करावेसे वाटते, नाहीतर जवानी एैसेही गुजरी! या फिर कॉलेज लाईफ मे 'नो प्यार व्यार'! ( वन साइड लव्ह का असेना) तो कहानी मे मजा़ नही आयेगा, पण हे खरं आहे.तसा मी काही एवढा सोज्व़ळ नव्हतोच आणि का असावा at last boys are boys. कॉलेजचा पहिला दिवस मी पुण्यावरून एसटी ने कराडला पोहचलो आणि सिटी बसने कॉलेजला चाललो होतो. बसमध्ये बर्‍यापैकी गर्दी होती आणि मी स्टॅंडिंग होतो. तेवढ्यात माझी नजर दोन माणसं पुढे उभी असलेल्या पाठमोर्‍या मुलीच्या बॉयकट पेक्षा थोड्या मोठ्या मोकळ्या सोडलेले केसांवर गेली. हे वयच असं असतं की या वयात नजर अशा गोष्टी शोधत असतेच. ती उंचपुरी होती, मध्यम बांधा! साधारण माझ्या एवढीच तिची उंची होती आणि लॉन्ग फ्रॉक घातल्यामुळे ती अजूनच उंच वाटत होती. ती पाठमोरी असल्यामुळे तिचा चेहरा काही मला दिसत नव्हता, पण बसच्या वरच्या दांडीला धरलेला हात तर गोरापान दिसत होता. तिचा चेहरा बघायची मला उत्सुकता लागली होती. बस मधल्या एक दोन धक्क्यांमध्ये चेहऱ्याचं साईडने थोडं दर्शन झालं पण पूर्ण चंद्र नजरेत आला नाही. माझा प्रयत्न चालूच होता पण गर्दीत ते शक्य होत नव्हते.शेवटी देवाने माझे एैकले आणि पुढच्या एका धक्कयात तिने दांडीला धरलेला हात बदलण्यासाठी स्वतःला @120 डिग्री मध्ये वळवलं आणि पूर्ण चंद्रमा नजरेस पडला. व्वा! कलीजा ख़लास झाला! और दिल मे बजी घंटी, टींग टींग! गोरापान थोडासा उभट चेहरा, थोडेसे घारे पण पाणीदार डोळे. एखाद्याला आवडण्यासाठी एवढं सौंदर्य बास होतं. एकदा आमची एकमेकांना डोळ्यात साठवण्या एवढी नजरानजर झालीच आणि पुढच्या स्टॉप वर ती खाली उतरली.तो अध्याय तिथे संपला आणि पुढे कॉलेज रुटीन चालू झाले. पुढे दोन ते तिन आठवड्यानंतर आम्ही तिघे मित्र कराडमधल्या रॉयल  टॉकीजला गोविंदाचा 'हत्या' पिक्चर बघायला गेलो होतो.शो ९-१२ रात्रीचा होता आणि योगायोग म्हणजे मला आवडलेली बसमधली ती मुलगी पण तिच्या काही मैत्रीणींन बरोबर तोच पिक्चर पाहण्यासाठी आली होती. अपनेको और क्या चाहीये था! पिक्चरला गर्दी कमी होती त्यामुळे मी तिला चटकन ओळखले आणि आमची एकदा नजरानजर झाली आणि तिने पण मला शक्यतो ओळखले असावे असा माझा आपला गोड गैरसमज.माझ्या बरोबरच्या मित्रांना बसमधील कहाणी माहीत होतीचं किंबहुना अशा चटकदार गोष्टी अजून तिखट मिठ लावून सांगण्यासाठी मित्र हे मोठे व्यासपीठ असतं.मग त्यांनाही मी त्या मुलीचं दर्शन घडवलं.आमच्या प्रमाणे तिचेपण बाल्कनीचेच तिकीट होते. ती आमच्या तीन ते चार लाईन पुढे बसली होती, माझं पिक्चर मध्ये लक्ष कमीच होतं मधल्या लाइन्स मोकळ्या असल्यामुळे आम्ही थोडा थोडा वेळाने तिच्यावर लाईन माराण्यासाठी एक एक लाईन पुढे सरकलो आणि अगदी तिच्या मागच्या लाईनमध्ये जा़ऊन बसलो. इंटरर्वल मध्ये तिच्या समोरून एक दोन वेळ  जायचा प्रयत्न केला पूर्ण पिक्चर मध्ये तिने सुद्धा एक दोन वेळा मागे बघून प्रतिसाद द्यायचा प्रयत्न केला. पिक्चर सुटला मग आम्ही  तिचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत पोहोचलो. त्या दिवशी ती ज्या स्टॉपवर उतरली होती तिथेच बाजूला रोडवरचं त्यांचा बंगला होता. हे चांगलं झालं, या पिक्चर मुळे मला तिचे घर तरी सापडले. त्या दिवसापासुन आम्ही तिचे नाव 'हत्या' ठेवले. तिचे खरे नाव काय होते हे मला माहीत नव्हतं आणि शेवटपर्यंत मी ते शोधण्याचा प्रयत्नही कधी केला नाही. आता तिचे घर माहीत झाल्यामुळे आणि ते आमच्या क्लासला जाय-येयच्या वाटेवर होतं त्यामुळे तिच्या घरात डोकावणे  हा आमचा रोजचा कार्यक्रम असायचा. तिच्या बंगल्याची कंपाउंड वॉल उंचीला लहान होती त्यामुळे घराचा मेन दरवाजा रस्त्यावरूनच दिसायचा, मी जाता येता एक दोन मिनिटं तिथे थांबुन कानोसा घ्यायचो की दरवाजात ती दिसतेय का!  यापेक्षा जास्त वेळ वाया घालवायला मला आवडायचं नाही कारण मी पहिल्यापासूनच वेळेचे नियोजन करणारा आहे आणि कुठेही फालतु वेळ वाया घालवायला मला नाही जमायचे. शेवट स्वभावचं तो, अजुन पण नाही सुधारला. तिच्यासाठी माझ्याकडे पाच ते दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ नसायचा, पाच मिनिटात दरवाज्यात ती दिसली तर ओके नाहीतर निघालो पुढे. मुली पटवायला वा त्यांच्यामागे फिरायला वेळ द्यावा लागतो आणि त्याचंच वावडं होतं मला! तो स्वभाव असावा लागतो किंवा ते रक्ता़तच असावं लागते. त्या काळात मुलींच्या मागे फिरणे म्हणजे वेळ वाया घालवणे किंवा वाया गेलेला मुलगा अशी अंधश्रद्धा होतीचं. मी खरंच वेळ नाही दिला नाहीतर तिला पटवायला जास्त वेळ लागला नसता,काय कॉन्फिडन्स!आमचे रुटीनच एवढे बीझी असायचे की सकाळी क्लास तो पण कराडसिटीत मग मेस ती पण सिटीतच, क्लास झाला की १० वाजताच दुपारचे जेवण करुन येयचो,मग कॉलेज ५ वाजेपर्यंत, संध्याकाळी व्यायाम व परत सिटीत जेवायला, रात्री अभ्यास चालायचा १०वाजेपर्यंत,दिवस कसा संपायता हे कळायचंच नाही. मधल्या फावल्या वेळेत अगर सुट्टीच्या दिवशी खेळ ठरलेलेच क्रिकेट,हॉलीबॉल.या सर्व शेड्युलमध्ये एखादी मैत्रिणी असावी अथवा मैत्रिणीची  कमतरता कधी भासलीच नाही. या आमच्या लिमिटेड मित्रांच्या रांगड्या मैत्रीतच खुश असायचो असेच दिवस पुढे जात राहिले. तिची आठवण असावी म्हणुन आम्ही  तिच्या बंगल्यावरून येता जाताना मोठ्याने 'हत्या' म्हणून ओरडायचो. पुढील तीन वर्षात तिच्या बंगल्याच्या दारात एक दोन वेळा तिची झलक झाली पण मी या माझ्या प्रेमाला पुढे जास्त काही हवा दिली नाही आणि माझी ही वन साईड लव्ह स्टोरी येथे  समाप्त झाली. बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.एक अध्याय संपला म्हणजे कॉलेज झालं आणि बजाज मध्ये नोकरी चालू झाली. कंपनीत एक वर्षाचे ट्रेनिंग संपल्यावर पर्मनंट झालो आणि आयुष्यातला एक टप्पा पूर्ण केला. पुढे पुण्यात वाडीया काॅलेजला पार्टटाईम बीई ला ऍडमिशन घेतले आणि शिक्षण पुढे चालू ठेवले. इथला एक छोटासा किस्सा माझ्या पर्सनॅलिटी बद्दलचा, पार्टटाईम बीई मध्ये दुसऱ्या वर्षाला श्री.लोहार सर म्हणून प्रोफेसर जॉईन झाले ते पाॅवर इंजिनीयरिंग विषय शिकवत होते. आमच्या पहिल्याच लेक्चरला एवढ्या सगळ्या मुलांच्यात त्यांनी मला बघितलं आणी म्हणाले 'ए स्मार्ट' तु कराडला होतास ना! मी हो म्हटलं! ते म्हटले मी तुला ओळखतो! मी त्याचे धन्यवाद मानले.हे सांगायचे म्हणजे आपली ख्यातीच जबरदस्त होती.ते कराड काॅलेजला इंजिनीयरिंगला शिकवायचे आणि मी डिप्लोमाला होतो, त्यांची माझी तशी विशेष ओळख नव्हती तरी ते मला ओळखत होते, क्या बात है! आताचे रुटिन म्हणजे,पूर्ण दिवस कंपनीत, संध्याकाळी कॉलेज, रोज लोकलने अप- डाऊन, अभ्यास, शनिवार रविवार प्रॅक्टिकल्स त्यामुळे फुल बिझी शेड्युल होते, थोडीसुद्धा उसंत नसायची इतर ऍक्टिव्हिटीसाठी. रवी आणि मी कॉलेज पासून एकत्र, पुन्हा एकाच कंपनीत रुजु झालो आणि ते पण एकाच डिपार्टमेंटमध्ये, शाळेपासुनचा एक मित्र 'गणेश पाटील' तोसुद्धा बजाज मध्ये जॉईन झाला होता त्यामुळे माझ्यामित्रांचे सर्कल कधी वाढलंच नाही. सगळचं कसं लिमीटेड होतं आणि त्यात माझी रास तुळ असल्याने सगळच मोजुन मापुन काम. शाळा आणि कॉलेजमधला मित्रांचा ग्रुप परत पार्टटाईम बीई ला एकत्र आला. पुन्हा धमाल चालूच, राहुल आणि पुणे कॅम्प मधल्या व्हिक्टरी वर पिक्चर बघणे हा आठवड्यातला कार्यक्रम असायचा. त्यामुळे बीई कंम्प्लीट करायला थोडा उशीरच झालाच.शेवट घरच्यांनी वाट बघून चोविसाव्या वर्षी मला लग्नाच्या बेडीत अडकवून टाकल, साल १९९५ एप्रिल महिना अनुजाचे माझ्या आयुष्यात आगमन झाले. त्याआधी मी २२ मुली बघून झाल्या होत्या त्या काही माझ्या पसंतीस उतरल्या नव्हत्या. अनु होती अकलुज -माळीनगर बागायतदाराची कनिष्ठ कन्या पण पुण्यात शिकायला होती,त्यामुळे तीचे एकंदरीत राहाणीमान माझ्या पसंतीस उतरले.आमचा साखरपुडा झाला जून मध्ये आणि लग्न होते नोव्हेंबरमधे,या मधल्या काळात आम्ही अगदी लव मॅरेज कपलसारखी हौस करून घेतली. कधी सिंहगड -खडकवासला, कधी बनेश्वर, कधी ओशो पार्क, चांदणी चौक, युनिव्हर्सिटीतले स्पाॅट, हॉटेलींग, पिक्चर यात चार महिने कधी गेले समजलेच नाही. पुढे लग्न झाले दोन मुलं झाली,पार्टटाईम बीई पण कंप्लिट केली. गेले २३ वर्ष हे रुटिन लाईफ चालू होतं!घर, कंपनी, मुलं, नातेवाईक, वर्षातून दोन वेळा व्हेकेशनवर जाणे. मी आणि अनु तसे एकमेकाला पूरकच आहोत' मेड फॉर इच अदर कपल' आमचा दोघांचा एकमेकांवर अतूट विश्वास कधीही आम्ही एकमेकांवर संशय घेत नाही,काय असेल ते स्पष्ट बोलतो,त्यामुळे आमचं वागण हे पहिल्या पासून खेळीमेळीचं होतं.अनुचा स्वभाव बोलका आणि प्रेमळ असल्यामुळे तिचा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप मोठा होता. माझी पण त्यांच्याशी बर्‍यापैकी ओळख होती.माझी तुळ रास तिच्या अगदी उलट होतं, प्रेम असो वा मैत्री सगळेच मोजून-मापून त्यामुळे मी आपला एकटा जीव सदाशिव! थोडेच मित्र नो मैत्रिणी,बायको हीच मैत्रिण. बरं बायको ही मैत्रिण असते असं सगळे म्हणतात पण मी म्हणेल ती मैत्रिणीची भूमिका रंगवु शकते वा रंगवत असते. मैत्रिण आणि बायको यातला फरक सांगायचा झाला तर बायको म्हणजे लांब पल्ल्याचा पुर्व निश्चित ट्रेनचा प्रवास ! यात तुमचा मार्ग फिक्स आहे त्यात बदल करता येत नाही, मधली स्टेशन्स तसेच अंतिम स्टेशन हेसुद्धा ठरलेलं आहे. प्रवासाचा वेग हासुद्धा पूर्वी निश्चित केलेला आहे,तुमच्या जागा सुध्दा फिक्स आहेत यात तुम्हाला लिमीटेड  मोकळीक आहे. सगळंच पूर्व निश्चित असल्याने बरचंस ग्रांटेड धरलेल आहे  आणि हे थोड्या प्रवासात रुटिन बनुन जाते. दोघांचा नियोजित मार्गाने व नियोजित वेगाने प्रवास चालु असतो. या प्रवासात रुसवे-फुगवे जरी झाले तरी टोकापर्यंत जात नाही कारण गाडीचा लांब पल्ल्याचा प्रवास असल्यामुळे थोडा वेळ गेल्यानंतर विचारांती तडजोड होऊन सुलह होऊन जातो.या उपरांत मैत्रिण म्हणजे थोड्याशा अंतराचा रोज होणारा सिटीबसचा प्रवास, यात बरचंस  flexible असंत,काहीचं  Granted धरता येत नाही किंवा ते नसतंच. ना तुमच्या जागा,ना प्रवासाचा वेग, ना प्रवासात येणारी गर्दी,ना प्रवासाचा मार्ग. यात एक मोकळीक असते ती म्हणजे थोड्या थोड्या वेळात येणारे स्टॉप, यात वाटल्यास कोणीही उतरून जाऊ शकतो, आपली जागा बदलु शकतो अथवा फायनल स्टॉपला गेल्यानंतर दोघंही आपापल्या मार्गी जायला मोकळे. पण परत दुसऱ्या दिवशी प्रवासात एकत्र येणे आणि परत विलग होताना उद्याच्या पुनःभेटीची आस लागणे ही मैत्रिणीच्या मैत्रीची लज्जत आहे.या थोड्याश्या सहयोगाने एक वेगळीच attachment तयार होते. याबद्दल अजुन  एक उपमा देण्यासारखी आहे,एखादं फळ जवळ असणे आणि ते न खाता जवळ बाळगून त्याची खराब न होण्यासाठी काळजी घेणे आणि ते जवळ असल्याचा आनंद म्हणजे मैत्रिण. या उपरांत तेच फळ खाऊन त्याचा मिळणारा आनंद म्हणजे बायको आणि त्या खाल्लेल्या फळाच्या आनंदाच्या आठवणींवर जगतो तो नवरा,ही माझी आपली Hopless फिलोसाॅपी आहे.या उपमा कितपत समर्पक आहेत हे मला ठाऊक नाही पण माझे हे एक जनरल मत आहे. मैत्रिणींच्या मैत्रीत भावना,संस्कार आणि आदर या गोष्टींना खुप महत्त्व असते. ही मैत्री अगदी कापसासारखे मुलायम (soft) असते,मित्रांच्या मैत्रीचा राकटपणा येथे नसतो वा तो उपयोगाचा नसतो. ही फार हळुवार जपावी लागते,जास्त हवा लागली तर ही उडून जाते अथवा जास्त उष्णतेने  जळून जाते.त्यामुळे संवादातला मृदुपणा, खरेपणा, शब्दाचा मोजून-मापून व योग्य वापर,भावनांचा आदर आणि मनाशी सांगड या आचारसंहिता पाळल्यास ही मैत्री म्हणजे सुरक्षित अंतर ठेवत (without accident) केलेला लांब पल्ल्याच्या खुप आनंददायी प्रवास आहे. या आचारसंहिता पाळताना ते बंधन न वाटता एक वेगळ्या प्रकारचा आनंद तुम्हाला मिळत असतो,तो शब्दात सांगता येणे अशक्य आहे.२०१९ पर्यंत बायको हीच आपली मैत्रिण हाच हिशोब चालु होता पण दैवयोग काही वेगळाच होता.वयाच्या पंन्नाशीकडे वाटचाल करत असताना माझ्या आयुष्यात एक मैत्रिणीची एंट्री झाली की जिने माझ्या रुटिन आयुष्याला थोडीतरी कलाटणी देऊन माझ्यातल्या सुप्त गुणांना वाव दिला.

उत्तरार्ध -------
२०१९ जानेवारी महिना, माझ्या xx मैत्रिणीची एंन्ट्री......
आमच्या कॅफेटेरिया मध्ये चहाला तिचं येणं चालू झालं, तसं तिला मी पूर्वी पासुन ओळखत होतो पण बहुधा ती मला ओळखत नसावी, तिचा वेगळा ग्रुप असल्याने कामासंबधी कधी बोलणं व्हायचं नाही. तिच्या ग्रुपमधील तिचे सहकारी आमचेही मित्र होते, त्यामुळे ते दोघे सहकारी आणि  xxही या तिघांनी आमचा कॅफेटेरिया टेबल जॉईन केला. हा आमचा टेबल तसा स्पेशल, आमच्या व्यतिरिक्त येथे कोणीही बसण्याचे धाडस करायचे नाही. कारण आमचा टेस्टिंग ग्रुपचा लौकिकच तसा होता. बाकीचे सगळे आमच्या पासून चार हात लांब असायचे. आम्ही ठरलेले ४-५ जणंच त्या टेबलावर असायचो. xx हीचे आमच्या इकडे येण्याचे कारण म्हणजे त्यांच्या कॅफेटेरियात खूप गर्दी असायची ती टाळण्यासाठी त्यांनी आमच्या ग्रुपचा कॅफेटेरिया जॉईन केला. तिच्या भाषेतच सांगायचे म्हणजे तिने म्हाताऱ्यांचा ग्रुप जॉईन केला कारण तिला बाकीचे मित्र म्हणायचे 'काय त्या म्हाताऱ्यांच्यात चहाला बसतेस'. पण हे कितपत खरे होते ही तिलाच माहीती, या विषयावर तिला आमची खेचायला आवडायचं आणि खिलाडु व्रुतीने आम्हीही तिच्या या आनंदात सहभागी व्हायचो. आमचा साधारण ग्रुप ४० ते ५० वयाचा आणि तिचं वय साधारण ३० च्या दरम्यान असेल. आमच्या या टेबलवर सगळेजण मला अध्यक्ष म्हणायचे कारण बराच वेळ माईक माझ्याकडेच असायचा. विषय कोणताही असो मस्त चर्चा होयच्या त्यात मी माझं मत तर मांडायचोच पण शेवटी उपदेशाचे ढो़स सगळ्यांना पाजणे हा माझा हातखंडा आणि कुणालातरी बकरा करुन त्याची खेचायची हा चहाच्या वेळी टाईमपास असायचा, अर्धा तास नुसता कल्ला असायचा, एकदम मजा येयची. माझ्या मीपणाचा ढोल वाजवण्यावरून पण मी टेबलवर तसा कुप्रसिद्ध होतच. एकंदर रोजच चहाच्या वेळेत एकदातरी माझा ढोल वाजवुन व्हायचाच. ती आमच्या टेबलवर चहाला येण्यामुळे तिच्याशी हळूहळू बोलण्यास सुरवात झाली. एखाद्या गैर मुलीशी रोज रोज बोलण्याचा हा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग होता. पुर्वी कधी अशा खेळीमेळीचा काहीच अनुभव नसल्यामुळे मला सुरुवातीला अवघडल्यासारखे व्हायचं, पण हळूहळू ओळख वाढत गेली आाणि मी तिच्याबरोबर रुळत गेलो. ती बीई झालेली आणि एक कंपनी जंम्प मारुन बजाजला जाॅईन झाली होती.तसेच तिचे काॅलेज,साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मित्र सर्कल पूर्वीपासूनच होते त्यामुळे तिला हे वातावरण काही वेगळ नव्हतं. ती एकदम बिनधास्तपणे आमच्यात वावरायची आमच्या सगळ्या चर्चेमध्ये सामील होऊन स्वतःच मतप्रदर्शन करायची. ( हे माझ्या माहितीच्या आधारे मी लिहीत आहे यात तफावत असू शकते त्याबद्दल क्षमस्व:).आता थोडसं तिच्याबद्दल, नाही...! थोडसं कुठलं बरचं काही, तिची उंची जरी कमी असली तरी तशी ती थोड्याशात मावणारीच नाही.थोडी बुटकी या संज्ञेत ती मोडत होती,मध्यम बांधा, थोडेसे करली (कुरळे) मध्यम लांब केस आणि ते पण तिच्यासारखेच फार वेळ बंधनात रहात नसतं, शक्यतो ते मोकळेच रहाणं पसंत करतं अगदी तिच्या स्वभावासारखेच. तिला आणि तिच्या केसांना कसलंही बंधन आवडायचं नाही, दोघंही मस्त मोकळे वाऱ्यावर स्वार असायचे! आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड द्यायला. ही म्हणजे मराठवाड्याची झाशीची राणीच जशी! हक्कासाठी कुठेही नडायला तयार.
एक फुल भायांचे वूलन जॅकेट ती नेहमी घालायची, वर्षातले 266 कामाच्या दिवसांपैकी २५० दिवस तरी तिच्या अंगावर ते असायचेच, मग ऋतू कुठलाही असो. हे मधले १५/१६  दिवस जॅकेट धुतल्यावर वाळंत नसल्यामुळे मिस होत असावेत! हा आपला माझा कयास! पण तिच्या पेक्षा ते आम्हीच जास्त मिस करायचो. ते जॅाकेट म्हणजे तिचं अगदी पेटंट होतं त्यामुळेच ती कितीही दुरुन पण ओळखु यायची. जॅकेटची पुढची बटनं लावण्याची तसदी ती शक्यतो नाही घ्यायची, पण हे रुपं तिला शोभायचं. स्टाईल अशी की लेडी डाॅनच! एकदम रावडी राठोड. ते जॅाकेट,टोपल्या सारखे मोकळे केस आणि खाली बघून चालायची स्टाईल! हे मागून जर बघितलं तर पावसाळ्यात इरलं घातलेला शेतकरी जसा दिसतो ना अगदी तसंच दिसायचं. चालताना खाली बघुन ती काय शोधायची! खाली मुंडी पाताळ धुंडी! हे काय मला शेवटपर्यंत कळालं नाही किंवा तिने ही सांगितलं नाही. वर्ण गोरा, नाकी डोळा छान,गोलाकार चंद्रासारखा तरतरीत तेजस्वी चेहरा अगदी कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रासारखा! पर इन खुली जुल्फों की वजहसे ये पुरा चांद कभी नजर नही आता था। अगदी कधी तरी केस बांधल्यानंतर इस पुरे चांद के दीदार हो जाते थे। तसे बांधलेले केस पण तिला छान दिसायचे. इस शाय़राना दिल से आपकी तारीफ पेश की है। गुस्ता़खी माफ हो हुजुर! तिच्या डोळ्यात वेगळीच चमक असायची पण तिच्या त्या स्पेशल चष्म्यामुळे आम्हाला ती कमीच दिसायची. स्वाभिमान आणि बाणेदारपणा हा तर तिचा मुळ स्वभावचं, स्वतःवर असलेला कॉन्फिडन्स तिच्या वागण्यात दिसायचा, खुप कष्टातून मिळवलेलं हे यश तिच्या करारीपणात जाणवायचं. ती आमच्या चहाच्या टेबलला जाॅईन झाल्यामुळे आमच्या बोलण्या आणि वागण्याला एक लिमिटेशन आले व पुढे पुढे बोलण्यात, वागण्यात शिस्त आली, पूर्वीचा रांगडेपणा,थिल्लरपणा पाचकंळपणा आम्हाला कमी करावा लागला. पण या बंधनांचा आम्ही पण आनंदाने स्वीकार केला कारण तिच्यामुळे आमच्या टेबलला एक रौनक वा चैतन्य आले होते. या तीन महिन्यात तिच्या संपर्कात आल्यावर असं लक्षात आले, ती एक उच्चप्रतीची खुप संवेदनशील लेखिका आहे,उर्दू हिंदी भाषांवर तिचे चांगले प्रभुत्व आहे, शेरोशायरी मध्ये तिला भरपूर ज्ञान आहे. साहित्याचा दांडगा व्यासंग,तिच्या उंचीपेक्षा तिच्या विचारांची आणि ज्ञानाची उंची खूप मोठी होती. तिचा वयापेक्षा जास्त असलेला समजूतदारपणा माझ्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण करायचा. तिचा मार्दव लाघवी बोलणे आणि रोखठोक स्वभाव मला आवडायचा. मग रोज चहाच्या वेळेस तिला भेटायची ओढ़ लागायची आणि तिच्याशी भेटुन बोलल्यावर मन प्रसन्न व आनंदी व्हायचं. बहुदा तिला पण माझा सरळ व मोकळा स्वभाव आवडला असावा आणि  माझ्यातला निर्मळ माणूस /श्रोता जाणवला असावा.त्यामुळेच मे महिन्यामध्ये सहज बोलता बोलता तिनेच सुरवात केली! ती मला म्हणाली... माझे काही लेख मी तुम्हाला शेअर करते तर मला तुम्ही तुमचा व्हाट्सअप नंबर द्या...ही आमच्या मैत्रीची खरी सुरुवात झाली. मग व्हाट्सअप वर आम्ही चॅटिंग करायला सुरवात केली त्यात एकमेकांचे विचार शेअर करायला लागलो आणि याच विचारांच्या अनुशंगाने पुढे हळूहळू शेरोशायरीला सुरुवात झाली. खरच सांगतो की मी यापूर्वी कधी एकही शेर लिहला नव्हता पण नेहमी हिंदी पिक्चर पहात असल्याने मला शायरीतलं थोडं ज्ञान होतं आणि शायरी समजायची एवढेच. कशातही मागे हटायचे नाही हा स्वभावच त्यामुळे तिने पाठवलेल्या शेरला मी माझ्यापरीने प्रत्युत्तर द्यायला लागलो. शेरोशायरीत ती बाप होती, तिच्याकडे शेरोशायरीचा खुप मोठा खजिना होता आणि तो पण त्या काॅलिटीचा होता 'बहुत ऊंचे अल्फाजो' से भरा हुआ, तिने पाठवलेला पहीला शेर येथे नमुद करावासा वाटतो.20/06/19, 2:28 pm -1. "अजीब रिश्ता है हमारी दरमियान, हमें जवाब ही नही मिलता और तुम सवाल भी भूल जाते हो।" ती स्वतः परिस्थिती अनुरुप  फार पटकन शेर लिहायची आणि पाठवायची. तिची इन्स्टंट रेसिपी शायरी म्हणजे जन्नत मिळाल्याचा आनंद असायचा, त्याची नजा़कतच भारी असायची ' वो तो बस उसके बस की ही बात थी, किसी एैरे गैरे कि ताकत नही थी।' या जन्नतची सफर तिने मला खुप वेळा घडवून आणली होती 'शुक्रिया जनाब'! यातूनच तिची योग्यता काळायची. मला मोबाईलवर  टायपिंगचा एवढा अनुभव नव्हता वा सवय पण नव्हती त्यामुळे मला टायपिंगला जरा वेळ लागायचा त्यावर ती नेहमी मला चिडवायची! किती वेळ लावताय! म्हातारे झालाय तुम्ही! बुझता दिया बहुत फड़कता है। चेष्टेत असे काही कमेंट्स पण ती टाकायची, पण तिच्या मनाचे माधुर्य बघा! थोडवेळात त्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त करायची. खरचं तिच्या स्वभावाच्या पैलुना किती पदर होते ते समजायचे नाही. तिच्या द्रुष्टीने हे खरंच होतं कारण तिच्यात आणि माझ्यात जवळपास १६/१७ वर्षाचे अंतर  होते, ती साधारण ३०/३१ची होती आणि मी ४५+. हे जनरेशन मोबाईल टायपिंगला use through होऊन गेलं  होतं पण मला तेवढी सवय नव्हती वा कधी गरज नाही पडायची आणि त्यात ती पडली हाडाची लेखिका एकदम super fast! मी इथे श्वास घेईपर्यंत तिचा दोन लाइनचा रिप्लाय हजर. ती रोज साधारण ६ ते ८ तास on screen असायची, मला नेहमी म्हणायची! मी खूप वेळ on screen असते याचा त्रास होतो, हे मला कमी करायचं आहे आणि  त्यासाठी ती प्रयत्न पण करत होती पण लिखाण हा तिचा पिंडच होता, तिच्या रक्तांतच होतं त्यामुळे लिहिल्याशिवाय तिला करमायच नाही. ही तिची तारीफ झाली! पर हम भी कोई कच्ची गोलीयां नही खेलें थे। एक दोन आठवड्यात मी पण फास्ट टायपिंग करायला शिकलो. या मैत्रीणीमुळे माझ्यात घडलेली ही पहिली सुधारणा, त्यातून परत लिहिताना माझ्या काही चुका व्हायच्या  'Typo Error' त्यावर पण ती मला नेहमी चिडवायची पण मैत्रिणीच्या नात्याने समजावून सांगायची. मी आपला विक्रमादित्या सारखा माझा हट्ट काही सोडायचो नाही! वेताळाने किती चिडवलं तरी आपलं काम इमानेइतबारे चालू ठेवायचो. ती म्हणजे एव्हरेस्ट शिखर होती आणि मी आपला तिच्यापुढे बापुडा दुर्गाटेकडी एवढी सुद्धा माझी उंची नव्हती. शेरोशायरीच्या या पिचवर ती अगदी कर्टली अंब्रोस सारखी धुंवाधार बॉलिंग करायची आणि मी आपला कडमडत कसा तरी रवी शास्त्री सारखा पिचवर टिकून राहायचा प्रयत्न करायचो, तिचे काही बाॅऊसर तर माझ्या डोक्याच्या खुप वरून जायचे,पण मी पिचवरुन हलायचो नाही. मी सुरुवातीला,आलेल्या शेर मध्ये थोडासा बदल करून उत्तर पाठवायचो पण मग तिने अनुकूलता दाखवली आणि मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि मी  स्वतः शेर लिहायला लागलो, ही सगळी तिचीच कृपा. मी तिला गालिब म्हणायचो आणि मला तिचा शागीर्द बनवण्यासाठी विनंती करायचो.तिच्यापासुन प्रेरणा घेऊन मी लिहलेला पहिला शेर आणि आमचं ते संभाषण येथे नमुद करावेसे वाटते,जे खालीलप्रमाणे!
21/06/19, 6:01 pm - Ramkumar:
१)पा लेने की  बेचैनी और खो देने का डर,
बस  इतना  ही  है ज़िंदगी  का सफर !!
२) मिलावट का दौर है साहिब..."हा" में "हा" मिला दिया करो..."संबंध" लंबे समय तक टिकेंगे...
21/06/19, 6:40 pm - xx ती: क्या यह आपका लिखा हुआ हैं? 😄😄 office politics !!!
21/06/19, 6:56 pm - Ramkumar: आप जैसे गालीब की पनाह ये शागीर्द कुछ सीखनेकी कोशीश कर रहा है| आदाब है जनाब
21/06/19, 6:59 pm - xx ती: लगता हैं हमें ही आपकी शागिर्दी अपनानी होगी! बहुत खूब!👍 21/06/19, 7:00 pm - Ramkumar: हम आपके आभारी है 🙏
22/06/19, 8:31 am - Ramkumar: गालिब के चरणों मे शागीर्द का ये पहला फुलं
22/06/19, 8:31 am - Ramkumar: गालिब तो गलिब है जिसने आसमां छु लिया है| शागीर्द ने भी उनकी पनाह मे दो जहाँ पा ली या है|
मी तिचा खुप आभारी आहे, या अशा बॅटिंगमुळे उस दिन बडे दिलवाले गालिबने हमारी शागीर्दगी मंजुर कर के उनके दिल मे हमे पनाह़ दी। अशाप्रकारे आमची गुरु आणि शिष्याची वाटचाल चालू झाली. ती मला सर म्हणायची पण या शायरीत तिचं माझी सर झाली होती. आमची सकाळी गुड मॉर्निंग पासून ते रात्री गुड नाईट पर्यंत चॅटिंग चालायचं, दिवसभरात  साधारणपणे आम्ही चार ते पाच तास तरी चॅटिंग करायचो, अगदी मनमोकळ्या गप्पा व्हायच्या, पर्सनल विषयावर पण आम्ही बोलायचं किंबहुना पर्सनल विषय शेअर करताना आम्हाला काही वावगं वाटत नव्हतं तेवढी आमची अटॅचमेंट झाली होती. एकमेकानां चिडवणे अथवा टोमणे मारणे हा तर रोजचा उद्योग असायचा अगदी टॉम अँड जेरी सारखं भांडायचो. मी टॉम आणि ती जेरी, ती मला कधी जेरीस आणायची पण मी पण तिला भरपूर त्रास द्यायचो. मग शेवट चिडुन ती तोंडाला कुलूप लावून बसायची, मग थोडावेळ सन्नाटा व्हायचा मग स्वतःहूनच परत मेसेज टाकायची 'इतना सन्नाटा क्यू है भाई' की झालं चालू परत, आम्ही ठरवायचो की आता भांडायचं नाही! शहाण्यासारखं वागायचं! पण पालथ्या घड्यावर पाणी.
या आमच्या fast झालेल्या मैत्री बद्दल तिला मनातला संदेह तिने एका मेसेज मध्ये तिने मला बोलुन पण दाखवला होता. "01/07/19, 10:52 pm - xx ती: एखादी गोष्ट जितक्या वेगाने वर जाते, तितक्याच वेगाने ती खाली येते. नात्याचं ही असंच असतं.मैत्री लोणच्यासारखी  खूप दिवस मुरली की बराच काळ टिकते. याउलट fast friends.जितके पटकन ते attach होतात तितक्याच पटकन,कदाचित जास्त वेगाने detach ही होतात. गोष्टी जितक्या हळुवारपणे घडतात, रंगत वाढवत नेतात. वचावचा खाण्यात आणि प्रत्येक घास चवीने लज्जत घेऊन खाण्यात जो फरक आहे तसंच नात्याचं आहे. सहज सुचलं म्हणून!" मला यात वावगं काहीच वाटत नव्हतं अगर आजपर्यंत माझी मित्राशी अशीच मैत्री व्हायची वा झाली होती. ह्या मैत्रीत मला सगळं नवीन असल्यामुळे काहीच कळत नव्हतं, तिच्या मनात शंका यायचं कारण, बहुदा पूर्वी तीच्याबरोबर तसं काहीतरी घडलं असेल त्यामुळे ती त्या अनुशंगाने म्हणत असावी. पण मी या गोष्टीच खरंच कही सिरिअसली नाही घेतले. माझी आपली स्वछंदपणे मैत्री निभावने चालू होते, येणाऱ्या नजीकच्या भविष्यकाळात या गोष्टी आमच्या मैत्रीत घडणार आहेत अथवा या आम्हाला भोगाव्या लागणार आहेत याची मला तसूभरही कल्पना नव्हती, बरं ते असू द्या पुढे! माझे काही मेसेज तिच्या डोक्यावरून जायचे तसेच चहाच्या टेबलवरचे आमचे काही द्व्यिर्थी संवाद तिला काही कळायचे नाहीत ते फुल बाऊन्सर असायचे तिच्यासाठी! ती खुप बेचैन व्हायची, मग जागेवर जाऊन मला मेसेज टाकून त्याबद्दल चौकशी करायची आणि मी मग तिला सगळ विस्कटून सांगायचो. तशी ती खूप संवेदनशील म्हणजे 'आर्टिकल १५' सारखा पिक्चर बघून घरी आल्यानंतर! आयुष्यमान खुराना जरी तळ्यातुन बाहेर आला असला तरी ही त्या तळ्यातचं डुबक्या मारत बसणार! तो पिक्चर घरी घेऊन येणार ! या पिक्चरचा अभिप्राय तिला विचारला तेव्हा अलंकारिक भाषेत तिचं उत्तर "खूप जड होता"! खरचं हे फक्त तिलाच सुचु शकत बाकी कुणाची पोहोचंच नाही. या पिक्चरवर बराच विचार करणार, मग गेली संध्याकाळ, वाटलं तर त्याच्यावर काही लिखाण करणार! स्वयंपाकाचा बोर्या, नवरा करतोय स्वयंपाक. मी तिला नेहमी म्हणायचो, तुझा नवरा खरंच ग्रेट आहे जो तुझ्यासारख्या एवढ्या संवेदनशील बायकोबरोबर संसार करतो. पण दोघांचं लव मॅरेज असल्यामुळे छान जमायचं आणि दोघेही तसे सोशल एक्टिव्हीटीत असल्यामुळे एकमेकांना पूरक होते. माझ्यामते तिचा नवराच जास्त समजूतदार असणार जो हिला खुप सांभाळून घेत असावा कारण या तीन चार महीन्यात तिच्या स्वभावाचे बरेच पैलु मला बर्‍यापैकी कळायला लागले होते. तिचे विचार आणि मनाची अवस्था तिच्या करली केसाप्रमाणेच बरीच गुंतागुंतीची होती. प्रदेशानुरुप म्हणजे कमी पावसाच्या प्रदेशात (मराठवाडा) रहात असल्याने संवादात थोडासा कोरडेपणा, उष्ण प्रदेश असल्यामुळे डोकं नेहमी गरम आणि स्वभावाचा कल रागीट/ चिडका या संज्ञामध्ये मोडणारा, तिच्या या स्वभावामुळे तिला सगळे घाबरतात असा तिचा गोड गैरसमज होता. मग आम्हीसुद्धा तिला बरं वाटावे म्हणून घाबरायचे ढोंग करायचो. तसेच अतिविचार ही एक वाईट सवय तिला होती, कुठल्याही गोष्टीचा खुप विचार ती करायची, भविष्याची नको तेवढी काळजी,भूतकाळातल्या गोष्टींचा पगडा, हे सगळे एकवटून त्याची वर्तमानाशी सांगड घालण्याचा वायफ़ळ प्रयत्न करायची, सरळ सहज जगणं तिला फार कमी वेळा जमायचं. या अशा स्वभावामुळे वर्तमानकाळाचा आनंद हिरावून बसायची. बराच वेळा तिला मी याबद्दल समजून सांगायचो. लिखाणाची आवड आहे ते ठीक आहे पण जगणातल्या बाकी गोष्टीचा पण आनंद घेणे आवश्यक आहे, त्याबद्दल मी तिला समजुन सांगीतल्यावर तिचं उत्तर -
"04/07/19, 9:43 pm - xx ती: जिना रह जाता है आपका, जब शायरी मे ही दिन निकल जाता है आधा|  इसपर गौर करेंग !"आजुबाजुला घडणाऱ्या खुप छोट्या गोष्टींचा पण तिच्या मनावर लगेच परिणाम व्हायचा आणि तिला डिप्रेशन यायचे, रोजच्या रुटीन लाईफला कधी कधी ती खुप कंटाळायची आणि मला म्हणायची 'आयुष्याच्या तोच तोच पणाचा मला कंटाळा आलाय !' मला तुम्ही कुठेतरी लांब सोडून या! पण ते तेवढ्यापुरतं असायचं. यातून मी बराच वेळा तिला शाब्दिक आधार देऊन बाहेर काढाण्याचा प्रयत्न करायचो.अशा शाब्दिक आधाराने ती त्यातून बाहेर पण यायची आणि मला धन्यवाद देत म्हणायची की' ! तुम्ही नेहमी मला नवी उमेद दाखवता!' कधी कधी या गंभीरतेमधे छानशी मिश्कील किनार पण असायची. चहाच्या टेबलावर गप्पा मारत सगळ्यांच्यात मला म्हणायची 'तुमचं घर म्हणजे महाल आहे असं सांगताना तुम्ही, मग मला दत्तक घ्या की!' काहीही...चेष्टा करायची, या उपरांत जागेवर जाऊन लगेच मला मेसेज करणार 'मी खूप स्वाभिमानी आहे. मी आपले चेष्टेने म्हणत होते. मी काही कुणाकडे दत्तक म्हणून जाणार नाही. जसं काय मी उद्याच तिला दत्तक घ्यायला बसलोय! फार छान किस्से असायचे. ही झाली तिच्या स्वभावाचे एक बाजू,दुसरी बाजू म्हणजे ती खूपच केअरिंग होती,जसा तिच्या स्वभावात चंचलपणा होता तेवढाच समजूतदारपणा पण  होता. आमच्या वयात एवढा फरक असून पण ती माझ्याशी खुप एडजेस् करायची, एका छोट्याशा मदतीचं पण तिला खुप अप्रूप वाटायचं, त्याची एक झलक- प्रसंग काय होता तर, जोरात पाऊस चालु होता, तिच्या डिपार्टमेंटला तिला जायचं होतं आणि आम्ही दोघं एका बाजूला कोपऱ्यात गप्पा मारत उभे होतो. तिच्याकडे छत्री नव्हती, एक मित्र समोरून छत्रीत चालला होता, मी त्याला बोलून हिला छत्री़ दिली आणि तिला जा म्हटलं. मग मी आणि तो मित्र भिजत गेलो. माझ्या या छोट्याशा मदतीचा तिने पाठवलेली शुक्रगुजरी शायरी वाखाणण्यासारखे आहे. "08/07/19, 7:09 pm - xx ती: आज जाना की कितने खुदापरस्त हैं हम छाता लिए चले गए उन्हें भीगता देख ।  08/07/19, 7:54 pm - Ramkumar: ना तक्कलुफ किजीए जनाब वो तो वक्त का तकाजा था छाता था छोटा आपका इसिलाये ऊन्हे भीगते जाना पडा पर दिल है आपका बङा ये तो आपके इस फिकरते लफ्जों से साबित हुआ 🌧☔☔🙏". तिचं शेअरींग सुध्दा तेवढच असायचं, तिचा वाढदिवस झाल्यानंतर अगदी आठवणीने दुसऱ्या दिवशी ती आम्हा सगळ्यांना डब्यामध्ये कट केलेला केक घेऊन आली होती. माझ्या शायरीत सुधारणा व्हावी यासाठी ती मला 'सुखंन' सारखे शायरीचे कार्यक्रम अटेंड करायला सांगायची, त्या कार्यक्रमांचे शेड्युल्ड मला पाठवायची. तसेच 'सहादत हसन मंटो' यांचे लेख वाचायला सांगायची, 'नुसरत फतेह अली खान' यांच्या युट्युब वरील गझलच्या लिंक मला शेअर करायची. अशा एक नाही हजार गोष्टी मला ती सारखी सांगत असायची. मी सर्व ऐकले किंवा वाचले का नाही याबद्दल खातरजमा करून घ्यायची, यावरूनच तिची माझ्याबद्दलची कळकळ जाणवायची. मी स्वतःला खुप नशीबवान समजचो की अशी मैत्रीण मला मिळाली होती. मी पूर्वी फक्त पंकज उदास,जगजितसिंग यांच्या व्यतिरिक्त काही गझल ऐकल्या नव्हत्या पण हीच्यामुळे या अशा उॅंचे अल्फाजोवाल्या गझल ऐकण्याची पात्रता माझ्यात आली होती. खरंच, माझी तशी काही योग्यता नव्हतीच पण या मैत्रिणीमुळे मी अशा योग्यतेच्या जवळपास पोहोचलो होतो. तिची अजुन एक खुबी सांगायचे राहूनच गेले, हे माझ लिखाण म्हणजे वेब सिरीज सारखं झालंय थोडं इकडचं,थोडं तिकडचं कधी मधलं राहिलेलं, पण जाऊ दे! काही राहायला नको, ती छान गायची, तिच्या आवाजाला छान सुर होता, पण आवाज थोडा नाकातुन येयचा,लेडी मुकेश म्हणा हवं तर! तिने नविन "आशिकी" पिक्चरमधील तिच्या आवाजातील तीन-चार गाणी मला पाठवली होती.आता माझ्याकडे त्यातील दोनच शिल्लक आहेत.तिची आठवण झाली की (म्हणजे दिवसातून एकदा तरी,कधीकधी दोन तिन वेळा) अजूनही ती गाणी मी एैकत असतो.'जिने हम भुला ही नही पाये तो उन्हे याद क्या करे'! तिची हीच एक आठवण माझ्याजवळ अजून शाबूत आहे,हे तिने मला दिलेलं फार मोठे गिफ्ट आहे असे मी समजतो.परत रुळावर येऊया,बुधवारचा माझा उपवास असायचा आणि तिने त्या दरम्यानच्या काळात दुपारचे जेवण बंद केल्यामुळे कॅन्टीनला जात नव्हती,मग आम्ही दोघेच कॅफेटेरियात फळे खात बसायचो. पण त्यावेळी सुद्धा आम्हा दोघांना कॅफेटेरियात गप्पा मारत बसलेले बघत कोणी गेलं तर ही मला म्हणायची, "बघा तो कसा आपल्या दोघांना बघत गेला!" शेवट स्त्री सुलभ स्वभावच तो!आमच्या मनात काही नव्हतं पण बघणार्‍याला काय वाटेल? या विचाराने ती बेचैन व्हायची आणि म्हणायची 'लोकांच्या तोंडावर हात ठेवता येत नाही!' ऑफिसमधे बराचसा वेळ आमचा चॅंटिंग मध्ये जायचा.तिला कामाचा ताण असायचा पण त्यातुनही  ती वेळ काढून रिप्लाय देत असायची.मी बाॅस असल्यामुळे बर्‍यापैकी निवांत असायचो आणि त्यामुळे शेरोशायरीला वेळ द्यायचो.या कालावधीत आमची मैत्री सातव्या आस़मान पर थी। आम्हाला एकमेकांशिवाय करमत नसायचं,ती मला म्हणायची पण 'हम आपसे ही इतना क्यू बतियाते है ये हमे भी पता नही है। आणि हे खरंच होतं. आमचे स्वभाव मिळतेजुळते नव्हते तरी पण आमची मनं कधी एवढी जुळली आणि आमच्यात प्रेम कधी निर्माण झाले हे आम्हालाचं कळंल नाही. संपर्काने प्रेम वाढतं तशातला हा काय प्रकार असावा. तिने तिच्या एका लेखात लिहिलं पण होतं की माणूस एकाच वेळी बर्‍याच जणांवर त्या नात्यानुसार प्रेम करत असतो.या प्रेमाच्या व्याख्या आणि नियम वेगवेगळे असतात. तशाच प्रकारे हे आमचं मैत्रीतल प्रेम असावे जे आम्हा दोघांनमधे एकप्रकारची ओढ निर्माण करुन आम्हाला बांधून ठेवत होतं.एक वेळा चहाला जरी नाही भेटलो तरी आम्ही बेचैन व्हायचो. घरी गेलो तरी चॅटिंग बराच वेळ चालु असायचं. पण माझी सवय होती की मी घरी गेल्यानंतर नेट बंद करायचो, मग हिला राग यायचा.मला म्हणायची  'सारखं तुम्ही नेट का बंद करता! कंजूस कुठले'.पण माझा स्वभाव  होता की घरी गेल्यानंतर घरच्यांसाठी वेळ द्यायचा, पण तिला ते पचनी नाही पडायचे, मला या कारणास्तव अगदी छळायची. दर गुरुवारी संध्याकाळी मंदिरात जाणे आणि आल्यानंतर गजानन महाराजांची पोथी वाचन आणि त्यावेळेस नेट बंद ठेवाणे असा माझा पूर्वीपासूनचा नियम आहे. पण त्या गुरुवारी मी मंदिरातून पोहोचेपर्यंत हिचे जेवढे मेसेज आले होते आणि चिडून किती भाव खाता वगैरे असे मेसेज करून मोकळी झाली होती. मी सांगतोय तिला कि मंदिरात गेलो होतो आणि आता पोथी वाचायची तर मला म्हणते ते तुम्ही किती ब्राह्मणाळलेले आहात, हा  एवढा अवघड शब्द पण तिलाच सुचू शकतो. मला म्हणते 'तुम्ही एवढे उंचेपुरे धडधाकट आहात,एक जानव घाला म्हणजे अगदी ब्राह्मण शोभाल'. तुम्ही तर दारू पण पिता मग पोथी वाचन कसं जमतं,असे काही बाळबोध प्रश्न तिला पाडायचे. पण माझे उत्तर असायचे! ज्याठिकाणी जसं तिचं तसं मी वागतो. When in Rome be a Roman. माझे लोकांन सारख काही लपवून नसतं, जे आहे ते खरे आणि समोर, माझे मन स्वच्छ आहे. त्यादिवशी ह्या अर्धा तासात एवढं चॅटिंग झाले की ती शेवट कंटाळून मला म्हणाली 'जा लवकर पोथी वाट बघतीये तुमची, भल्या माणसा देव तुम्हाला सुबुद्धी देवो'.या चॅटिंग मध्ये मला खाली जायला वेळ झाला त्यामुळे सौ.अनुजा ओरडल्या! काय करत होता इतक्या वेळ, मी बापडा आता काय सांगणार !
आता त्या रात्रीचा वादळी प्रसंग सागतो. त्या मध्यरात्री गरम होतय म्हणून एसी लावायला मी उठलो आणि मग खालच्या मजल्यावर सहज चक्कर मारून आलो आणि येऊन बघतोय तर आमच्या सौ.माझा मोबाईल चेक करत आहेत. आज हे आमच्यात प्रथमच घडत होतं,तसा माझा मोबाईल लॉक नसतोच वा आमचे दोघांचेही मोबाईल लॅाक नसतातच आणि असले तरी एकमेकाच्या फिंगर टच ते अनलॉक पण होतात. संध्याकाळी पोथीवाचनासाठी मी खाली यायला लावलेला उशीर याची तिला शंका आल्यामुळे  हे कृत्य केलं असावे असं मला वाटले. तसे आम्ही दोघंही पहिल्यापासूनच काही लपवून ठेवत नसू. पण आता ती संध्याकाळचं पोथी वाचायनाच्या आधीचं आमचं सगळं चॅटींग  वाचत होती आणि वैतागून म्हणाली  'किती वेळ हे चॅटिंग करता! मला नाही हे पटत'.माझा मोबाईलचा वाढलेला वापर एवढ्यात तिच्या लक्षात आला होता.या मैत्रिणीबद्दल मी तिला पूर्वीच सांगितलं होतं, यात काही नवीन अथवा लपवण्यासारखं काहीच नव्हतं. किंबहुना कधीकधी आमच्या दोघांच्या चर्चेत कंपनीचा विषय निघाला तर त्या दिवशी काही विशेष घडलं असेल तर या मैत्रिणीबद्दल पण मी तिला सांगायचो आणि तिलाही ते काय काही वावगं वाटत नव्हतं. तिचं म्हणणं एवढचं होतं की ती तुमची मैत्रीण का असेना पण एवढा वेळ संपर्कात राहणे चांगलं नाही हे वरवरचं होतं पण तिच्या मनात काही वेगळं चाललं आहे याची मला जा़णीव झाली कारण नंतर तिच्या वागणुकीत फरक पडायला लागला होता, माझ्यावर शंका घ्यायची आणि चिडायला पण पण लागली होती.

 ३री घंटा....!
पण हे त्रिवार सत्य आहे, बायकोला स्वतःच्या नवऱ्याची मैत्रीण सहज पचवता येत नाही. तिचे शाळेतले, कॉलेजचे बरेच चांगले मित्र आहेत त्यांच्याबद्दल माझं कधीच ऑब्जेक्शन नसायचं आणि ते सुद्धा माझे चांगले मित्र झाले आहेत. अनुजा सुद्धा त्यांच्याबरोबर किती वेळा हॉटेलींग/ पिकनिकला जायची पण मी त्याबद्दल कधीच आडकाठी घ्यायचो नाही किंवा माझ्या मनात कधी शंकाही यायची नाही.माझा स्वभाव पहिल्यापासून मोकळा आहे,शंका घेणं मला कधी जमलंच नाही, काय असेल ते तोंडावर बोलून मोकळं व्हायचं.पण ठिक आहे शेवटी स्त्रीसुलभ स्वभावच तो! त्याला औषध नसतं.आता इकडे मैत्रिणीच्या स्वभावाची सुद्धा थोडीशी तशीच अवस्था होती. त्यासाठी एक प्रसंग येथे नमूद करावासा वाटतो. तिला क्रिकेटची भारी आवड आहे आणि त्याची इत्थंभूत माहिती सुद्धा तिला असते. मॅच चालू झाली की सारखे मेसेज टाकून स्कोर विचारायची,तिला मॅचवर पैज लावायचे पण किडे असायचे. मला म्हणायची 'लावताय का पैज? इंडीया जिंकणार' आता पैज तर लागली पाहीजे मग मी तिच्या विरुद्ध भाकीत करुन पैज लावायचो. पैज पण कितीची! पन्नास-शंभर रुपयांची! तर मला म्हणायची कंजूस 'किती कमी पैशाची पैज लावतय'. पण ठिक आहे, एकदा ती पैज हरल्यावर त्या वसुली खातिर आम्ही दुपारी गुपचुप जेवायला बाहेर जायचं ठरवलं. हे सगळ्यांच्यात जाहीर करायला तिला नाही आवडायचं, आमच्या दोघांच्या मैत्रीची कुठेही चर्चा होऊ नये याची ती नेहमी काळजी घ्यायची. माझं तसं काही नसायचं,स्वभावच पहिल्यापासून बिंदास्त असल्यामुळे मला त्याबद्दल काही गैर वाटत नव्हतं. पण ती एक संसारी स्त्री असल्यामुळे काळजी घेणे हे सहाजिकच, लोक काय विचार करतील हे आपण सांगू शकत नाही, मग मी पण दक्षता बाळगायचो. आता ही शंभर रुपयांच्या पैजेची  जेवणाची पार्टी तिलाच द्यायची होती. मग पुर्वी ठरल्याप्रमाणे त्या दिवशी (11_07_2019) दुपारी आम्ही कंपनी समोरील ब्रह्मास हॉटेलमध्ये जेवायला गेलो. हे दोन दिवस आधीपण मी ऑर्डर देऊन सगळं बुक करून ठेवलं होतं पण ऐनवेळी हिने पोट दुखतयं असं कारण देऊन तो दिवस टाळला होता कारण काही दुसरंच असावं पण मी नाही तिला विचारले, ठीक आहे म्हणालो आणि त्या दिवसाचा बेत रद्द केला.आता आज हॉटेलमध्ये जेवायला बसल्या बसल्या तिच्या नवऱ्याचा तिला फोन आला, ती जरा टेन्शनमध्येच त्याच्याशी बोलत होती की मी मित्रांबरोबर बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आले आहे. त्यांच संभाषण झाल्यानंतर मला ती म्हणते की 'आता व्हाट्सअप पण सेफ राहिलेला नाही आपलं चॅटिंगपण दुसऱ्याला वाचुता येऊ शकते असे ट्राॅकींग app आहेत'. तिच्या या बोलण्या मागचा उद्देश माझ्या काही लक्षात आला नाही. का! ती कंपनीच्या बाहेर पडल्या पडल्या ती  ट्रॅक झाल्यामुळे  फोन आला होता? असा प्रश्न माझ्या मनात आला, पण मी काही जास्त खोलात गेलो नाही. असं काही असतं याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं आणि I don't care for such things.पण यावरून लक्षात येईल की तिचं सगळं वागणं असं गुढ, तुकड्या-तुकड्यात असायचं, ते असं का! मला नाही कधीच समजलं आणि मी पण तिला कधी त्याबद्दल विचारलं नाही. आमचे दोघांचे स्वभाव या बाबतीत अगदी उलट होते. हे असले प्रश्न मला कधीच पडायचे नाहीत कारण माझा स्वभाव मोकळा असल्यामुळे माझ्या मनात कोणाबद्दल शंका यायची नाही. एखादा व्यक्ती भेटला, बोलला, आवडलं की मी लगेच सरळ विश्वास ठेवून मोकळा. पण हीच तसं नव्हतं, आधी खूप परखणार, सगळी माहिती काढणार आणि हळूहळू विश्वास ठेवणार त्यातसुद्धा बराच वेळा परीक्षा घेणार, तिच्या मनात काय चाललंय याचा कधीही ताकास तूर लागू देणार नाही. तिच्या मनाला किती कप्पे असावेत ते तिलाच माहिती आणि तिच्या बेचैन, अशांत स्थितीचं हेच खरं मुळ होतं. एवढा विरोधाभास असुन पण आम्ही दोघे जवळचे मित्र होतो हे विशेष.पुढे येणाऱ्या सॅड सीनच्या आधी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडलेल्या हा छान प्रसंग तुमच्याशी शेअर करायला मला आवडेल.जून महिन्यातला प्रसंग आहे, जून महिन्यातला हा दिवस मला आणि अनुसाठी स्पेशल आहे. पूर्वी या दिवशी आम्ही साखरपुडा झाल्यानंतर फिरायला सिंहगडावर गेलो होतो. त्या आमच्या भेटीची आठवण म्हणून गेल्या काही वर्षात जमल्यास या दिवशी आम्ही सिंहगडावर जायचा नेम ठेवला होता. मी आज अर्धी सुट्टी काढून घरी गेलो, नंतर मी आणि अनु सिंहगडावरुन फिरून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घरी परत आलो. सिंहगडावर जाणार आहे हे मैत्रिणीला मी आधीच सांगितले होते तसेच गडावरचे काही फोटो पण तेव्हा मी तिला शेअर केले होते. त्या संध्याकाळीच, माझे मोठे बंधू श्यामदादा यांचा लायन्स क्लबचे प्रेसिडेंट झाल्याबद्दल  एका हॉटेलवर सत्कार समारंभ होता. संध्याकाळी सातपर्यंत कार्यक्रम सुरु होणार होता. मी सिंहगडावर असतानाच विचार केला की दादाच्या या यशाला शायरी मध्ये शब्दबद्ध करावे आणि ती शायरी त्या समारंभात पेश करावी. गडावरून परत येत असतानाच मी शब्दांची जुळवाजुळव करत होतो, पाच वाजता घरी पोहोचल्यानंतर एक तासाभरात  एक छान शायरी लिहून तयार केली आणि कार्यक्रमाला आठ वाजता हजर झालो.मी आयोजकांना मला दहा मिनिटे वेळ द्यावा हे आगाऊ सांगून ठेवले होते. अनु व्यतिरिक्त आमच्या घरातील कुणालाही याबाबत काहीच माहीत नव्हतं. मला स्टेजवर पाहुन दादाला धक्का बसला होता, आता हा काय बोलणार आहे! पण मी पुर्ण आत्मविश्वासाने शायरी पेश केली आणि सगळ्यांनी त्याची खूप तारीफ पण केली. लोकांचा अभिप्राय असा होता की, त्यांना वाटलं भाऊ त्याच्या मोठ्या भावाबद्दल एक चार शब्द बोलेल. पण भावाबद्दलची तारीफे शायरी ऐकून सगळे बेहद खूष झाले आणि याचं पूर्ण श्रेय या मैत्रिणीने मला स्फूर्तीने शिकवलेल्या शायरीला जाते, त्याबद्दल मी तीचा खुप आभारी आहे. आज तिच्यामुळे मी स्टेजवर उभा राहून सर्वांपुढे शायरी पेश करू शकलो होतो, स्टेज डेअरिंग आणि आत्मविश्वास तिच्यामुळे माझ्यात आला होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर अनु मला म्हणाली तुमच्या मैत्रिणीला हे कळवा त्याप्रमाणे मी तिला खालील मेसेज पाठवून तिचा शुक्रिया पण अदा केला,अपने शागीर्दकी इस सफलता पर उन्हेभी गर्व महसूस हुआ।
"अपने मशहुरी की बात ना कर अब,
कल तो हम भी मशहुर हो गये,
आपने दिखायी राह पर थोडा तो आगे बढ़ गये
शुर्कीया जनाब! यु ही करम हम पे बनाये रखे
पर छोटीसी ईल्तजा ये है।
बेवजाह अपनापन का फिर ना जिक्र किजीये,
आपकी कुछ अलग जगाह है इस दिलमे,
इसे बस खुदगर्जी का नाम तो न दिजीये,
लोंग होगें कुछ, जो दिखावापन करते होगें,
बस उन लोगों मे हमे तो न तौलियें"
मागील अध्याय पुढे चालू,
स्त्रीसुलभ शंकेखोर स्वभावाला अनुसरून एक दोन प्रसंग अजून  आहेत. मी एक सहा महिन्यापूर्वी आमच्या ऑफिस मधील गौरी, नेहा आणि स्मिता ह्या तीन मुलींना दुपारी जेवायची पार्टी दिली होती. मी माझ्या कारमध्येच त्यांना मॅजेस्टिक हॉटेलमध्ये  घेऊन गेलो होतो. किस्सा असा होता की,आमच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा फीडबॅक द्यायचा होता आणि मुख्यकरुन  लेडीज रायडर्सचा फीडबॅक महत्त्वाचा होता. या तिघीही मी सांगितल्यामुळे राईड करायला तयार झाल्या होत्या. गौरी आणि स्मिता त्यांची शॉर्ट डिस्टन्सची राइड त्या एकट्या करून आल्या होत्या. पण नेहा आणि मी स्वतंत्र स्कूटरवर पुण्यात मोठी राईड करून आलो होतो. राईड झाल्यानंतर पाठक साहेबांनी स्मिताला पिन मारली, या राईडबद्दल पार्टी का नाही घेतली! माने साहेब पार्टी देतात काम झाल्यावर. हे मला कळालं, आता माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न झाला म्हणून मी पार्टी द्यायचं कबूल केलं. पण नेहा राजस्थानमध्ये तिच्या घरी होती, ती परत आल्यानंतर आम्ही पार्टी केली.आता ही पार्टी काही गुपचूप केली नव्हती, हे सगळ्यांना ज्ञात होतं आणि मी आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा सांगितलं होतं. या विषयाला अनुसरून एकदा xxही मला टोमणा मारत म्हणते की 'दुसऱ्यांच्या बायकांना जेवायला घेऊन जायला काय आवडतं पुरुषांना ते मला कळत नाही'.त्यावर माझं उत्तर होतं ' लोक तर लपून लपून घेऊन जातात मी बिंदास्त घेऊन गेलो होतो'. पण  माझा युक्तिवाद असा होता, ती कोणाची का बायको असेना, ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, त्याला त्याचे स्वातंत्र्य आहे आणि तिने कुणाबरोबर जायचं किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे. ती कुणाची बायको असल्याने ऑफिसच्या मित्रांबरोबर कधी जेवायला जाण्यात काही वावगे ठरत नाही. तसेच त्या मर्जीने आल्या होत्या ना तर कुणी त्यांना धरुन नेले होते. दुसरा प्रसंग,चहाच्या टेबलावर विषय झाला तेव्हा  xxहीने सांगितलं की आज गौरीचा वाढदिवस आहे.आमच्या टेस्टिंग मध्ये दोन गौरी नावाच्या मुली आहेत आहेत मी चुकून कोकणातल्या गौरी साळवेला भेटल्यावर  तिला शुभेच्छा दिल्या.आता हे कन्फ्युजन  xxहिला कळाल्यावर मला म्हणते तेवढाच तिचा हात हातात घ्यायचा चान्स घेतला! आता याला काय उत्तर! प्रसंग तिसरा, एक दिवस ऑफिस सुटायच्या वेळेस आमचं चॅटिंग चालू होतं आणि तिला कामामुळे उशीर झाला होता, तर मला म्हणते की 'मला सोडता का घरी! बस चुकलीये माझी'. मी सांगितलं कार नाही आणली आज मी मोटरसायकलवर आलोय. ठीक आहे तो विषय तिथेच संपला, दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मी मुद्दाम चेष्टेने तिला मेसेज केला आज मी कार आणली आहे सोडून का घरी? त्यावर तिचे वाकडे उत्तर 'माने साहेब आर न डी मधल्या सर्व मुलीं घरी गेल्या का ते चेक करुन  मगच घरी जातात वाटतं'. वरील सर्व प्रसंगात xxहि जे काही बोलली ते चेष्टेने होतं का सिरीयसली हे समजत नव्हतं. पण या प्रसंगानंतर आमच्यातलं चॅटिंग थोड कमी होऊ लागल असं माझ्या ध्यानात आले. मी मेसेज केल्यानंतर बराच वेळाने उत्तर यायचे किंवा उत्तर पण यायचे नाही, पण यापुर्वी श्वास घेण्यास पण अवधी नसायचा तेवढ्यात उत्तर हजर असायचे. हा नजरअंदाजपणा एवढ्यातच हो़ऊ लागला होता, मी विचारलं तर ती सांगायची की बाॅस शेजारी बसले होते तस्सम अशी काही कारणं ती सांगायची, पण ते मला काही खरं वाटत नव्हतं. माझं मन मला खात होतं की माझे मुलींच्या बाबतीत काही वाईट दृष्टीकोन आहेत असे तिला वाटून  माझ्याबद्दल हिच्या मनात काही वाईट इमेज तर तयार झाली नाही ना आणि त्यामुळे ती मला टाळत आहे का? ह्या अशा विचारात दोन दिवस गेले. पण हा दुरावा मला काही सहन होत नव्हता. मग एक दिवस मी तिला फोन करून बोलावलं माझ्या आवाजात थोडासा गंभीरपणा तिला जाणवला म्हणुन ती लगेच मला भेटायला आली. तेव्हा मी तिच्याशी स्पष्ट बोललो की माझ्याबद्दल असा काही ग्रह तुझ्या मनात आहे का? मला तसे खूप कमी मित्र आहेत आणि तू तर माझी एकच मैत्रीण आहेस. तुम्हा सर्व मित्र-मैत्रिणींना मला जपून ठेवायचे म्हणून तुझ्याशी मी  स्पष्ट बोलतो आहे. आजपर्यंत मी माझ्या प्रतिमेला प्रकर्षाने फार स्वच्छ,निर्मळ ठेवत आलोय आणि त्याच्यावर कोणी शंका घेतयं आणि ते पण एका स्त्रीने शंका घेणं याचं मला खूप वाईट वाटंल होतं, ते मला सहन होण्यासारखं नव्हतंच आणि हा असा माझा पहिलाच अनुभव होता त्यामुळे मला तिच्याशी काय बोलावे ते सुचत नव्हते. मी माझी प्रतिमा आरशासारखी स्वच्छ ठेवण्याचा आजपर्यंत प्रयत्न करत आलोय म्हणून पहिल्यापासून मी कटाक्षाने मुलींपासून लांब राहायचो की कुठेही गैरसमज व्हायला नको. या अशा घुसमटीत तिच्याशी बोलताना नकळत माझ्या डोळ्यांच्याकडा ओलसर झाल्या होत्या आणि आवाज पण जड झाला होता ते तिला जाणवलं. आमच्या संभाषणा नंतर ती मला समजावून निघून गेली की तसं काही माझ्या मनात नाही. पण खरच तिच्या मनात काय होतं हे तिलाच ठाऊक यानंतर आमच्या मैत्रीत थोडं थोडं अंतर पडत गेले, चॅटींगचा वेळ कमी होत गेला, एक-दोन वेळा किरकोळ कुरबुरी पण झाल्या पण त्यांचा समिट झाला. पण ती पुर्वी म्हटल्याप्रमाणे जी गोष्ट ज्या वेगाने वर जाते त्याच वेगाने ती खाली येते हे संज्ञा खरी होण्याच्या दिशेने आमच्या मैत्रीची वाटचाल चालू झाली होती. १ ऑगस्टला, शुक्रवार संध्याकाळी xxहिने एक स्टेटस ठेवलं होतं, सापांशी रिलेटेड आणि त्याचे विष माणसाच्या वागणुकीशी कसे रिलेट करते असा काही संदर्भ होता. मी ते वाचलं आणि आत्ताच्या घडलेल्या प्रसंगाशी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला, मला याचं वाईट वाटलं की ते स्टेटस आहे पण मला दिसतंय म्हणजे मी हे वाचावे ही तिची इच्छा असावी, नाही तर मला ती हाईड करु शकली असती. आम्ही रात्री एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाऊन आलो, तिथे बीझी असल्याने मोबाईल पाहिलाच नव्हता आणि रात्री आल्यावर मेसेज चेक केले तर xx हिने मला एक अजगर बेडवर असलेला फोटो पाठवला आणि मला म्हणते हे तुम्ही आहात! मी तिला रिप्लाय पण केला तू हे असं काय म्हणते मी असा नाही, त्यावर ती म्हणते नाही तुम्ही असेच आहात. या दोन्ही संदर्भावरून मी काय समजायचं वा तिला माझ्या पर्यंत काय मेसेज पोहोचवायचा हे मला कळत नव्हते. एक मात्र होते की सांप काय किंवा अजगर काय ही उदाहरणं काही चांगली नाहीत आणि ती समोरच्याची काहीतरी वाईट इमेज दर्शवतात. मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं, त्यारात्री झोप पण लागली नाही, विचारांचं नुसतं काहूर माजलं होतं. मी एवढ चांगलं वागून पण माझ्याबद्दल कसं कोण एवढे वाईट विचार करू शकते. मी जो नाहीच तो लोकांना का दिसतो? माझी तुलना कशाची होते तर साप आणि अजगर, ठीक आहे सापाचं स्टेटस होतं तर ज्यांना कुणासाठी होतं त्यांच्या पुरतं ठेवून बाकीच्यांना हाईड केलं असतं तर गैरसमज झाला नसता पण ते तसं नसुन ते माझ्यासाठी पण असावे असं दिसते. दुसरा दिवस २ ऑगस्ट शनिवार होता माझ्या आयुष्यातला काळा दिवसच म्हणता येईल, खुप वाईट दिवस होता तो आणि पुढचा 3 ऑगस्ट रविवार हे दोन दिवस आयुष्यात मी कधीही विसरू शकणार नाही. या दिवशी मी माझ्या आयुष्यातला कोहिनूर गमावला असंच मला वाटतं. सकाळी उठलो पण माझे कशातच लक्ष लागत नव्हतं मैत्रीणीवरचा प्रचंड राग मनात होता. माझ्या इमेजवर  बोट दाखवलेले मला कधीच सहन होत नाही आणि त्या रागातच एक वाईट मेसेज लिहुन ठेवला. सकाळपासून तिचा काही मेसेज आला नाही आणि मी पण तिला कसलाच मेसेज पाठवला नाही. पुर्ण दिवस तसाच बेचैनीत गेला. रात्री साधारण नऊ वाजता तिचा मेसेज आला 'काय लिखाण पूर्ण झालं का?' याचा संदर्भ असा की तिच्या लिखाणापासून स्फूर्ती घेऊन मी एक आठवड्यांपूर्वी मैत्रीवर एक लेख लिहायला घेत आहे असं तिला सांगितलं होते. तिला वाटलं की शनिवार सुट्टी आहे तर मी लेख लिहून पूर्ण केला असेल, या भाबड्या आशेने तिने मला मेसेज टाकला. पण मी दिवसभर डोक्यात राग ठेऊन तिच्या मेसेजचीच वाट बघत होतो आणि तिचा मेसेज आला, बास़! माझा राग क्षणार्धात उफाळून आला आणि मी मागचा पुढचा कसलाही विचार न करता वेड्यासारखा तो मेसेज तिला पाठवला आणि तिला what's app वर block केले ( पण या एका block मुळे मी आयुष्यभरासाठी block होणार आहे आणि भविष्यात Unlock साठी मला हर पल उनके दिल की दहलीज़ पर दस्तक देकर गुजारशोंकी बारीश करनी पडेगी याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती)
"सांपो के और अजगरों के बिलं मे सुबह नही होती.
शायद लोगें के के दिल और आँखे मेंढक की है जो ऊन्हे
दोस्तों मे भे सांप और अजगर नजर आते है. गये दो दिन से हो रही बेइज्जती का शुक्रीया जनाब.हप्तेभरसे हम यही जानना चाहते थे, अच्छा हो गया आपने हमारी औकात तो दिखा दी हमे.दोस्ती जब बोझ बन जाये तो छोडना ही अच्छा"
आणि या आमच्या चांगल्या मैत्रीचा मीच माझ्या रागाने सत्यानाश केला, हा राग माणसाकडून काय करून घेईल याची मला त्यादिवशी अनुभूती आली. पण वेळ निघून गेली होती मी माझ्या हाताने सगळं संपवलं होतं.पुढे माझी अवस्था राग आणि भिक माग अशी होणार आहे याची मला जरासुद्धा कल्पना आली नाही. हा असा मेसेज वाचून तिच्या मनाची काय अवस्था होईल याचा मी जरासुद्धा विचार केला नाही. ती दिवसभर कुठेतरी बिझी असेल, त्यातूनही रात्री वेळ काढून आपल्याला मेसेज करते, विचारते! मी मात्र डोक्यात राग घेऊन तिच्या भावनांच्या पार चिंधड्या केल्या. खरंच आजही तो क्षण आठवला की माझाच मला राग येतो आपण एवढे निर्दयी का वागलो असेन. पण वेळ निघून गेल्यानंतर या विचारांना काहीच अर्थ नव्हता. तो मेसेज वाचून क्षणात तिचा कॉल आला कारण मराठवाड्याची झाशीची राणीचं ती कशी शांत बसेल. मी म्हणजे आम्ही घरातील सर्वजण जेवण करून हॉलमध्ये बसलो होतो, माझा मोबाईल समोर टेबलवरच होता,त्याची रिंग वाजली आणि घरातले सगळे एकदम थक्क होऊन फोनकडे बघत होते कारण मला शक्यतो कुणाचे फोन येत नाहीत आणि रात्री तर नाहीच हे सर्वांना माहीत होते आणि स्क्रीनवर तिचं नाव दिसलं. अनु म्हणाली 'या अशा अवेळी हीचा फोन कसा काय आलाय!' मी सांगितले आमचं दोघांचं भांडण झालं आहे त्यामुळे ती फोन करत आहे पण मला तिच्याशी काही बोलायचे नाही. अनू म्हणाली की फोन घ्या आणि बोला निट तिच्याशी,पण मी रागात असल्याने दोन-तीन वेळा कॉल कट केला आणि निष्ठूरपणे तिचा नंबर ब्लॉक करून टाकला. मला घरामध्ये या गोष्टींवर काहीच बोलायचं नव्हतं. मग तिने पण रिप्लाय मेसेज टाकून मैत्री संपल्याचं जाहीर करून टाकलं. त्या मेसेज मध्ये ती म्हणते की मी थोडीशी  गंमत पण करायची नाही का! तुम्हीच म्हणता की 'हम दिल पर नही लेते है आणि हे काय मग'. ही अशी काही गम्मत असू शकेल असा मी कधी विचारच केला नव्हता किंबहुना माझ्या रागीट स्वभावामुळे माझ्याशी कधीच कुणी गंमत करायचे धाडस करायचे नाही, ना माझे मित्र, माझी मुलं, ना माझी बायको. ही सगळी माझ्या जवळची मंडळी चेष्टा वा गंमत याबाबतीत माझ्यापासून दोन हात लांब असायचे कारण मी पण एका लिमिटपर्यंत लोकांची चेष्टा करायचो पण लिमिट च्या बाहेर केलेली गंमत किंवा चेष्टा मला नाही आवडायची. तिचा हा मेसेज वाचल्यावर माझ्या डोळ्यासमोर वीज चमकल्यासारखी झाली. मी हा का विचार केला नाही! मी त्याला काय एवढे सिरीयसली घेतलं! हे माझं मलाच कळत नव्हतं. पण क्षणात होत्याचं नव्हतं झाले होते आणि आता वेळ निघून गेल्यानंतर विचार करण्याला काहीच अर्थ नव्हता. त्या मेसेज मध्ये ती म्हणते 'मी काही तुमच्यासाठी Special नाही किंवा तुम्ही सुद्धा काही माझ्यासाठी Special नाही'. पण खरं तर आम्ही दोघेही एकमेकासाठी  Special च होतो हे सत्य नाकारता येत नाही. ती तर माझ्यासाठी स्पेशल होती, आहे आणि राहणारच. मी  तोपर्यंत तिच्यासाठी Special होतो. ती रात्र अशीच दुःखात गेली, बाण सुटला होता आणि त्याने तिचे हृदय किती जखमी झाले असेल हा विचार करून डोकं सुन्न झालं होतं. राग एवढा वाईट असतो की जो व्यक्त केल्यानंतर विचार करायची बुद्धी देतो आणि जेव्हा त्याचा अंमल तुमच्यावर असतो त्यावेळेस तो तुमची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट करून टाकतो याची अनुभूती मला त्यादिवशी आली होती. तिसरा रविवार होता 3 ऑगस्ट, सकाळी उठल्यावर समजलं की आज फ्रेंडशिप डे आहे, खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. फ्रेंडशिप डे च्या दिवशीच आपण आपली मैत्री तोडली, तिची माफी मागून तिला मेसेज करावा हा विचार मनात घोळत होता तेवढ्यात अनुने खालून आवाज देऊन सांगितलं आज फ्रेंडशिप डे आहे तिला काही मेसेज टाकू नका आणि प्रकरण वाढवू नका. मी बरं म्हटलं, पण मला चैन पडत नव्हता. मी गाडीच्या कामासाठी एकटाच स्कोडाच्या शोरूमला गेलो होतो तिथे साधारण माझं एक ते दीड तासाचे काम होतं त्यावेळेस मी Sorry म्हणत फ्रेंडशिपचा मेसेज तिला पाठवलाच आणि तिचा नंबर पण unlock  केला. तसा तो एक फ्रेंडशिपचा जनरल मेसेज होता पण या मेसेजमुळे पुढे खूप वादंग होईल याची मला जरासुध्दा कल्पना नव्हती. मी असा कयास केला की हि रागवणार तर आहेच आणि काल राहिलेलं तिचं बोलणं ती आज बोलणारच, आपण एकटेच आहोत तेव्हा तिचा फोन आला तरी तिचा सगळा राग ऐकून घेऊन मग नीट शांतपणे तिला समजावता येईल, या विचाराने मी तो मेसेज पाठवला होता. पण झालं सगळं उलटच, तिचा काही रिप्लाय आला नाही. ती बहुदा बिझी असल्यामुळे तिने तो मेसेज ११am वाजेपर्यंत बघितलाच नव्हता त्यामुळे सगळंच आधांतरी होतं. आता माझी झाली पंचायत,मी आणि अनु अवधूतवाडीला एकत्र निघालो होतो. माझ्या मनात विचार आला, अनुने मेसेज टाकू नका हे सांगितल्यावर सुद्धा मी तिला मेसेज टाकलाय आणि अजून पर्यंत तिने तो मेसेज पाहिला नाही. आता आम्ही दोघे एकत्र असताना मैत्रिणीचा जर फोन आला तर आमच्या दोघांच्या वादाला कारणच, म्हणून मी मोबाईल फ्लाईट मोड मधे टाकला. अवधूतवाडी वरून आम्ही चार वाजता घरी आलो आणि त्यानंतर मी संध्याकाळी पाच वाजता चालायला जातानाच फोन फ्लाईट मोड वरून काढला. तोपर्यंत  xx हीचे बरेच मिस-कॉल झाले होते, मग मी तिला फोन केला म्हणजे स्वतःला शहीद होण्यासाठी तोफेच्या तोंडी दिले. फोन उचलताच तिने जे धडाधड फायरिंग चालू केले की मला काहीच समजत नव्हते, सहाजिकच आहे तिचा तो कालपासूनचा राग अनावर होऊन बाहेर पडत होता. त्यामुळे ती बेलगाम बोलत होती आणि मला एैकण्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता. काही गोष्टींचा तर संदर्भच नव्हता पण सुक्या बरोबर आज ओलं पण जळतं होतं, तसं सगळ्याच गोष्टी निघत होत्या. मी पाठवलेल्या फ्रेंडशिप मेसेजचा तिने काहीतरी वेगळाच अर्थ घेतला होता आणि त्याबद्दल ती मला रागवत होती. मी काय तुमची बायको आहे का! मी तुमच्या मुली एवढी आहे! असं काहीबाही बोलत होती,जे माझ्या समजण्याच्या पलीकडे होते. ती रागात काय बोलत होती हे बहुधा तिला पण समजत नसावे. पण माझ्याकडून एक चूक झाली होती त्यामुळे गुन्हा न केलेले १०० अपराध सुद्धा मला माझ्या पोटात घेणे भाग पडत होते. आम्ही बोलता बोलता तिचा मोबाईल डिस्चार्ज झाला व फोन डिस्कनेक्ट झाला. मी चालुन घरी पोहोचलो पण हिचा परत फोन येण्याची मनात धाकधूकी होतीच. घरी आलो तर वाशिंग मशीनवाला काहीतरी रिपेरिंगसाठी आला होता. मी त्याच्याबरोबर होतो तेव्हा परत तिचा फोन आला. मी तसाच कसातरी घरात drybalcony च्या बाजूला उभा राहून तिच्याशी बोलु लागलो. तिने पुन्हा AK47 load करुन firing चालु केले, मध्येच तो service man माझ्याशी बोलतोय,ती तिकडून बोलतीये मला काहीच कळंत नव्हते,मी आपला दोघांनाही हो म्हणत होतो. नंतर मी पार्किंग मध्ये येऊन तिच्याशी हळू आवाजात बोलू लागलो. घरच्यांशी लपुन फोनवर तिच्याशी बोलणं मला भाग होतं कारण अनुने मला सकाळीच ताकीद दिली होती तरी मी तिला मेसेज टाकला होता, त्यामुळे मला सगळे लपवने भाग होते. हे तिला मी सांगितलं तर ती मला म्हणते की तुम्ही आपल्या मैत्रीबद्दल बायकोला सांगितलं होतं मग आता का लपवत आहात. आज सकाळपासूनचे घडलेले प्रसंग तिला काहीच माहिती नव्हते त्यामुळे तिने मला सरळ खोटारडे ठरवलं होतं आणि जुन्या सर्व गोष्टींवरचा  तिचा विश्वास उडाला होता. पण खरं तर यात काहीच तथ्य नव्हतं आज फक्त सकाळी मी अनुला न सांगता आमची मैत्री टिकावी म्हणून मेसेज टाकला होता हेच फक्त लपवलं होतं. पण आता ते तिला खरे वाटत नव्हते, तशी परिस्थितीच तयार झाली होती आणि आता रागात तिची अवस्था कालच्या माझ्या अवस्थे सारखी झाली होती, ती काहीच ऐकायला तयार नव्हती. मी आज पर्यंत खोटं बोलत आलोय असंच तिला वाटलं आणि ती म्हणत होती तुमच्या बायकोला सांगायला मी नवऱ्याला घेऊन तुमच्या घरी येऊ का! आता याची काय संबंध आहे का! विषय काय चालला होता फ्रेंडशिपचा आणि कुठून कुठे निघाला, वड्याचे तेल वांग्यावर काढतात तसं झालं होतं. पण माझी चूक होती त्यामुळे मी जास्त न बोलता तिच्या हो ला हो करुन सगळ्या (न केलेल्या पण) चुका मान्य करत संभाषण संपवुन टाकले. भांडण्यात एवढा टेरर असणाऱ्या सिंघमचे तिने पार चिंगम करुन टाकले होते. जय हो ...!
त्यादिवशी मी मुग गिळून गप्प बसलो कारण आदल्या दिवशीच्या रागामुळे झालेले माझे नुकसान मला माहित होतं त्यामुळे मला तिला अजून दुखवायचं नव्हते. ती म्हणेल ते खरं म्हणून मी शांत राहिलो त्यादिवशी मी राग जिंकायला शिकलो. अशाप्रकारे त्या फ्रेंडशिपच्या दिवशी संध्याकाळी आमच्या मैत्रीचा ही अस्त झाला. मी विचार करून नुसता सुन्न झालो होतो कशातच लक्ष लागत नव्हतं. त्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये चहाच्या टेबलावर भेटायचो पण बोलणं बंद झाले होते, एखादा शब्द वा क्षण कसा एवढ्या दिवसांच्या जिवलग मैत्रीचा नाश करु शकतो, दर मिनिटा गणिक चॅटींग करणारे आम्ही दुर होऊन एवढा अबोला धरुन बसलो होतो. पलभर मे हमारी दोस्ती मे दरारा पड गई थी। मग मी पण तिची चहाची वेळ चुकवायचो, मी खूप अगतिक झालो होतो. तिचा मनातला माझ्याबद्दल झालेला हा असा गैरसमज कसा काढावा त्याचा मार्ग शोधत होतो. अशा प्रकारच्या गैरसमजामुळे मला तिला तोंड दाखवायची हिंमत होत नव्हती. तिने मला व्हाट्सअप आणि फेसबुकवर आधीच ब्लॉक केले होते त्यामुळे संभाषणाला मेसेज व्यतिरिक्त दुसरा पर्यायच नव्हता.

साधारण एक दोन महिन्यांनी मी तिला हळू हळू माझे चुकले असल्याचे, मला माफ करण्याबद्दलचे मेसेज टाकत राहिलो. पण तिच्या मनातले ते शल्य लगेच निघणे शक्य नव्हते. मी रोज देवाजवळ सुद्धा प्रार्थना करायचो की तिच्या मनातील माझ्याबद्दलची कटुता संपू दे आणि आमची मैत्री पूर्ववत होऊ दे, माझ्या प्रत्येक प्रार्थनेत तिचं नाव असायचं कारण शेवट मला देवाचाच आधार. मला वाटायचे की आज ना उद्या ही राग विसरून मोठ्या मनाने कधीतरी मला पुन्हा मित्र म्हणून स्वीकार करेल, शेवट काळ हेच सगळ्यावर औषध असते. शेवटी तिने आणि देवाने दोघांनीही माझे ऐकले आणि तिला माझ्यावर दया आली. साधारण तीन-चार महिन्यानंतर माझ्या साधारण पन्नास एक मेसेजनंतर तिचा मेसेज आला, मी संध्याकाळी नवनाथांची पोथीचं वाचत होतो आणि तिचा मेसेज आला. ' I am sorry & respect you. I appreciate you & your patience'. मी म्हटलं देवचं पावला की आज,मला खूप आनंद झाला. मग मी तिला तिची नवीन गाडी आली का ? याबद्दल विचारणा केली, त्यावर ती म्हणाली एक-दोन दिवसात फायनल करायचे आहे. मग तिने व्हाट्सअप आणि फेसबुक पण unlock केले तेव्हा मला वाटले आता आमची मैत्री पूर्ववत होईल, पण नियतीच्या मनात तसं काही नव्हतं. दुसऱ्या दिवशी तिचा मला फोन आला की आम्ही म्हणजे ती आणि तिचा नवरा गाडी बुक करायला चालले आहोत (Ford चे नवीन मॉडेल होते freestyle)  तर तुमच्या ओळखीने काही डिस्काऊंट मिळतोय का बघा. मी सगळीकडे चौकशी करून बघितले पण फार उशीर झाला होता. पुणे जिल्ह्यातील डीलरकडे ती फक्त एकच गाडी उपलब्ध होती आणि एकच गाडी असल्यामुळे डिस्काउंट शक्य नव्हता,तीचे हे काम माझ्याकडुन नाही झाले. मग मी व्हाट्सअपला तिला पुर्वीप्रमाणे गुड मॉर्निंगचे मेसेज आणि शायरीचे मेसेज टाकायला सुरुवात केली,तर ती रिप्लाय करते की मला अशा गोष्टींसाठी आता वेळ नाही, मी शायरी सोडली आहे. फेसबुकवर पण तिच्या क्लिपला मी कमेंट्स पाठवल्या तर तिचा रिप्लाय की, प्रत्येक फोटोला कमेंट द्यायची आवश्यकता नाही! हे असं काहीतरी तुम्ही करता म्हणुन मी तुम्हाला ब्लॉक केलं होतं यापुढे कमेंट्स देत जाऊ नका. दिवस कसे बदलतात आणि त्याबरोबर माणुस पण कसा बदलतो हे त्याचेच द्योतक होते. पूर्वी हिच मैत्रीण गुड मॉर्निंच्या मेसेजची वाट बघायची, मेसेज नाही टाकला तर का उशीर झाला आज! असं विचारायची,फेसबुकच्या कमेंटला जी भरभरुन धन्यवाद द्यायची पण आता तिला या सगळ्यासाठी वेळ नाही आणि ते कमेंटस पण नकोसे होतात, यावरून आपण समजून घ्यायचं की तिच्या मनात आपल्याला आता जागा राहीलेली नाही. पण तरीसुध्दा माझं मन हे मानायला तयार नव्हते, जे सत्य आहे हे तिला सांगणं गरजेचंच होतं. माझी चुकीची प्रतिमा मला तिच्या मनातून पुसून टाकायची होती, त्यासाठी मी शक्य तेवढे प्रयत्न करत होतो. व्हाट्सअप वर आमचं काहीच चॅटींग व्हायचं नाही म्हणजे मी मेसेज पाठवायचो पण ती कधीच रिप्लाय करत नव्हती (आज दोन वर्ष होऊन गेली या गोष्टीला पण आज पर्यंत व्हाट्सअवर तिने एकाही मेसेजचा रिप्लाय दिला नाही अथवा मेसेज पण पाठवला नाही) नुसतच सगळं अनलॉक होतं पण ब्लॉक सारखीच परिस्थिती होती. जिनसे बाते ख़त्म नही होती ती, उनसे बातं ही खत्म हो गई है। मग माझ्या मनात विचार आला की तिने मला unlock करायचं कारण हे फक्त त्या दिवसाच्या कामासाठी होतं का? तिचं काम नाही झालं, विषय संपला! असं असावे. पण मी तो negative विचार मनातुन काढून टाकला, तिला जर नसेल वाटत चॅटिंग करायचे तर राहू देत! आपण जबरदस्ती करायची गरज नाही. तिचा ग्रुप मोठा आहे आणि तसे तिला आता माझ्या मैत्रीची आवश्यकता नसावी. पण या आमच्या मैत्रीच्या Breakup ला मीच कारणीभूत होतो, मीच तिचं मन दुखावलं होतं त्यामुळे तिला दोष देण्यात काहीच अर्थ नव्हता. मला फक्त एवढंच वाटत होतं की मी काही खोटं बोललो नव्हतो, माझी ही मलीन प्रतिमा तिच्या मनातून निघावी याचंसाठी माझा प्रयास चालू होता. त्या मेसेज मध्ये मी तिच्यासाठी लिहलेला एक शेर पाठवला होता, ऊर्दू dictionary मधुन ऊॅंचे लफ्ज शोधुन हा शेर मी लिहला होता. मला वाटलं की गालिबसाहब खुश होंगे,
"अब नफरतेगिर्दाब से बंजर हुई है ये जमीं उफ्क तक
शायद है हम आसीम सो आकिबत भुगतेंगें अंन्त तक
गुजारिश है अब जनाब  से,
ए यार अब ना तु यु मिला कर,ना तु यु खिलां कर
बारीशे इश्क बनके इस बंजर जमीं पर ना यु तु गिरा कर
हो न जाये इश्क फिर इस बंजर जमीं को बारीश से
खिल न जाये अब गुलशन फिर से इस बंजर जमीं पर
हम है पशेमान, हम पर तु अब थोडा रहेम कर
ए इश्के बारिश, हम पर थोडा तो रहेम कर"
पण झालं उलटच, तिने Bullshit असा या शेरला रिप्लाय दिला. Bullshit means it is  spontaneous reply without understanding facts. ह्या अशाचप्रकारचे इश्क, प्यार संबंधित शेर पूर्वीसुद्धा आम्ही एकमेकांना पाठवायचो आणि ते सगळं शायरी पुरते मर्यादित होते, हे आम्हा दोघांनाही माहित होतं. मग तिने आज का याचा चुकीचा अर्थ घेऊन bad word वापरुन माझा गोरक्षनाथ करून टाकला?ते काही मला समजल नाही. यापुढे तुम्ही माझ्याकडे बघत जाऊ नका आणि मला परत मेसेज टाकू नका (काहीही हं......ती) असा रिप्लाय देऊन व्हाट्सअप फेसबुक ब्लाॅक करून टाकले. म्हणजे असं झालं की मी बॉलिंग टाकतोय ऑफ साईडला आणि ती खेळतीये लेग साईडला कोणाचाच कोणाला मेळ नाही, फक्त नुसताच गैरसमज. तो फेब्रुवारीचा महिना होता,गजानन महाराजांचा प्रकट दिनाच्या आधीचा दिवस असेल ४ फेब्रुवारी, मी त्या डोकेरेशन मध्येच व्यस्त होतो आणि तिचा हा मेसेज आला,मी पुर्णपणे हँग त्यामुळे मी फक्त ओके असा रिप्लाय देऊन टाकला आणि डोकेरेशनच्या कामाला लागलो. तिच्या या अशा रिप्लायवर बोलण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते, तिचं हे वागणं मला अगदी अनपेक्षित होतं. आम्ही दोघं सेम पेजवर नव्हतोच त्यामुळे चर्चा करण्यात अर्थच नव्हता. अमिताभ बच्चनच्या 'आखरी रास्ता' पिक्चर सारखी अवस्था झाली होती, 6 नंबर मुझे यहासे 6 दिख रहा है लेकिन तुम्हे 9 दिखा रहा है। दोनो अपनी अपनी जगाह सही है। दोघांची पोझिशन विरुद्ध असल्यामुळे 6 नंबर तिला 9 दिसत होता कारण दोघंही आपापल्या जागी बरोबर होते, पण ती जर माझ्या जागी आली असती तर मला काय म्हणायचंय हे तिला कळालं असते,पुन्हा एकदा मी निशब्द झालो. आम्हा दोघांच्या बाबतीत असं का घडतंय याची उकल मला होत नव्हती. माझ्या म्हणण्याचा अगदी विरुद्ध अर्थ ती का घेते, हे मला समजत नव्हतं. मला नेहमी वाटायचं की 'शीशे की तरह साफ हुं, फिर भी न जाने क्यु कुछ दोस्तों के समझ के बाहर हुं।' तिने जरी मला bad word वापरले असले  तरी मला तिचा राग नाही आला कारण मी जे काय म्हणतोय ते तिला समजतचं नव्हते याचं मला वाईट वाटलं. आता मी राग गिळायला शिकलो होतो. आज मै वापिस वही नाराजगी की खाईं मे जा पहूंचा था। फिरसे वही सन्नाटा,वही गलतफ़हमी का कोहराम और वही नजरअंदाजगी का माहौल. माझ्या चारित्र्यावर एवढे शिंतोडे उडवून झाले होते की मी मनातून पूर्ण तुटलो होतो.मग चहाच्या वेळेस ती टेबलवर यायची पण आम्ही एकमेकांना बघायचो सुद्धा नाही. माणूस क्षणात एखाद्या बद्दलचे मत कसे बदलतो,तो थोडंसुद्धा थांबून विचार न करता एखाद्या गोष्टीला त्याच्या समजुतीप्रमाणे अर्थ लावून मोकळा होतो आणि दुसऱ्याला  दोषी ठरवतो. इतके दिवस चांगले वागलेले किंवा चांगल्या गोष्टी त्याच्या लक्षात राहत नाही फक्त एक वाईट गोष्ट तो लक्षात ठेवून बाकी सगळ्या चांगल्या गोष्टींना मातीमोल करून टाकतो. जसे की सफेद कपड्यावर एक बारीक काळा डाग जरी पडला तरी माणसाच्या डोळ्यात तो लगेच खुपते, तो सफेद रंग लक्षात न ठेवता तो काळा डाग लक्षात ठेवतो. हे मानवी मनाचे वैशिष्ट्य आहे की त्याला पॉझिटिव्ह गोष्टींपेक्षा निगेटिव्ह गोष्टीच जास्त लक्षात राहतात आणि एका शुल्लक चुकीमुळे वा गैरसमजुतीमुळे पूर्वीच्या शंभर चांगल्या गोष्टी विसरुन जातात. जैसे कि 'किसी को पाने के लिए अपने सौ खुबियां कम पड़ जाती है। पर खोने के लिये एक गलतफ़हमी ही काफी होती है। त्यानंतर मार्चमध्ये, मी दहा दिवस 'धरमशाला' हिमाचलला ट्रिपला गेलो होतो पण येताना दिल्ली एअरपोर्ट वरून आल्यामुळे मला पंधरा दिवस होम कोरंटाईन व्हावे लागले. मग ते १५ दिवस संपेपर्यंत पूर्ण लॅाकडाऊन लागले त्यामुळे साधारण अडीच ते तीन महिन्याच्या कालावधीत आमचा कसलाय संपर्क आला नाही किंवा आम्ही दोघांनीही तो करायचं प्रयत्न ही केला नाही. मे मध्ये ऑफिस चालू झाले तेव्हा  एवढ्या दिवसानंतर प्रथमच ती मला दिसली पण आता मास्क घातलेला होता तिच्याशी काहीतरी बोलावे असे माझ्या मनात होते पण मी धाडस करू शकलो नाही कारण माझ्यावरचे आरोपचं एवढे भयंकर होते की तिच्याशी बोलणं मला शक्य होत नव्हते. माझ्या पाठीमागून ती निघून गेली आणि त्या परिस्थितीसुद्धा मला एक शेर सुचला. मी आज एवढ्या दिवसानंतर शेर लिहीत होतो, खरतर तीचं माझ्या शायरीचे ऊर्जा स्तोत्र होती, माझी गुरु/ गलिब होती त्यामुळे तर तिच्या नुसत्या एक झलकने सुद्धा मला शेर सुचला. पण मी सगळीकडुनचं ब्लॉक असल्यामुळे तिला तो शेर पाठवणं शक्य झाले नव्हते.
२६/०५/२०२०
आज अरसों बाद गुजरे हो पास से,
जैसे ठंडी एक हवा का झोंका छु जाये रुह से,
हम तो थे बेखबर, पर आप भी बने रहे अंजान से,
पहेले तो (करोना से पहेले) आपके आने की इत्तिला
होती ती हवा मे बिखरी खुशबू से,
पर आज धोका हुआ जनाब, मुंह पर बंधे मास्क से...!
ती या करोनाकाळात व्यवस्थित आहे हे पाहून मला समाधान वाटलं. त्यानंतर एक-दोन वेळाच तेवढ्यापुरतंच आमचं समोरा समोर येणं झालं पण तिच्या डोळ्यातच माझ्याबद्दलचा राग मला कळत होता त्यामुळे मला शर्मींदल्या सारखा व्हायचे. या मधील काळात मी तिला बरेच मेसेज पाठवले पण तिने काहीच रिप्लाय पाठवला नाही. एक-दोन वेळा मी फोन पण केला पण तिने तो कट केला, मला या गोष्टीचा अजिबात राग आला नाही. ती तिच्या ठिकाणी बरोबर असेल असं मी स्वतःला समजवायचो. मला तिला गमवायचे नव्हते म्हणून मी माझा स्वाभिमान/ इगो बाजूला ठेवून माझे प्रयत्न चालूच ठेवले कारण तिची मैत्री ही मला माझ्या ईगोपेक्षा महत्त्वाची वाटत होती. तिला मी कधीच विसरु शकत नव्हतो, तिची आठवण ही येतचं राहिली. मी खूप वेळा तिला विसरायचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही, मी जेव्हा जेव्हा तिला विसरायचा प्रयत्न करायचो तेव्हा तेव्हा तिच्या आठवणी दुप्पट वेगाने मेरे दिल के दरवाजे पर दस्तक दिया करती थी। तो मैने अपने दिल से हार कर उनकी यादों को अपने दिल मे सदा़ के लिये एक मेहफुज़ जगाह दे दी। जिस से मै उनको हर पल याद करता रहुँ।
ती माझ्यावर नाराज होती अथवा माझा तिरस्कार करत होती तरी मला तिचा राग न येता तिच्याबद्दल प्रेमचं वाटायचं कारण माझ्या हृदयावर तिची वा तिच्या व्यक्तीमत्वाची एक मोहोर तयार झाली होती ती मिटने आता कधीच शक्य नव्हते. काळानुरुप त्याच्यावर थोडाफार धूळ बसायची पण तिच्या सुंदर आठवणींची थोडीशी फुंकर घातली की ती मोहर परत ताजीतवानी होऊन स्पष्ट दिसायची. तिने माझ्या हृदयात मैत्रीण नावाचा तिचा एक नवीन कप्पा बनवला होता जो पूर्वी कधी माझ्या हदयात नव्हताच. तिने आहे त्या जागेत सर्वांना बाजूस सारत स्वतःची एक स्वतंत्र जागा बनवली होती आणि ती कायमचीच. आता ऑफिस सुरु होऊन सात-आठ महिने झाले होते कोविड कंडिशनमुळे ऑफिसमध्ये सुद्धा तिची भेटायची शक्यता कमीच होती. फेब्रुवारीत 2020 ला एक दिवस मी धाडस करून तिला फोन केला पण तो तिने कट केला. मी निराशा होऊन परत फोन करायचा प्रयत्न केला नाही आणि पुढे दोन महिन्यात एप्रिल मध्ये तिने राजीनामा दिल्याचे बातमी मला कळाली. मला खूप वाईट वाटतं आता तर तिची भेट दुरापास्तच होणार होती. ती कुठे जाणार होती, काय करणार होती हे मला नाही कळालं, आयुष्यात ती परत भेटेल का नाही याची चुटपुट मला लागून राहिली होती पण मी हतबल होतो. ती माझ्यावर नाराज होती का माझा तिरस्कार करत होती हे मला कळत नव्हतं, नाराजगी ही एखाद्या प्रसंगानुरूप असते ती तेवढ्यापुरतीच असते, थोड्या दिवसानंतर सर्व विसरून संबंध पूर्ववत होऊ शकतात. पण तिरस्कार ही एखाद्या व्यक्तीची मनात तयार झालेली वाईट प्रतिमा असते ती पुसणे सहज शक्य नसते आणि ते पुसणे त्या वाईट ठरवलेल्या व्यक्तीला तर कधीच शक्य नसते कारण त्याने विश्वास गमावलेला असतो. पण ज्या व्यक्तीच्या मनात ती तयार झाली आहे त्या व्यक्तीने ती निट विचार करुन प्रयत्न पुर्वक पुसली तरच ते शक्य होते, नाहीतर आयुष्यभर ती वाईट प्रतिमा मनाच्या कोपऱ्यात तशीच पडून राहते आणि मग कधी त्या व्यक्तीची चुकून जरी आठवण आली तरी त्याची फक्त वाईट प्रतिमाच आठवते कारण त्याची चांगली प्रतिमा कधीच मनातून विसरून गेलेली असते आणि ती व्यक्ती आयुष्यभर त्या एका वाईट गोष्टीचं ओझं मनावर बाळगून राहते. या अशा परिस्थितीमुळे जाताना तिला मी भेटायचा किंवा तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला नाही, मी विचार केला की जाता जाता उगाच तिला अजून दुःख द्यायला नको. ती जरी कंपनी सोडून गेली असली तरी माझ्या मनातल्या तिच्या आठवणी तशाच ताज्या होत्या. मागील दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाल मी आठवून पाहत होतो आमची मैत्री असताना मी या आमच्या मैत्रीवर  एक लेख लिहायला घेतला होता पण ती आमची मैत्री ८६ दिवसातच  तुटल्यानंतर तो लेख अपूर्ण राहिला होता. मी बरेच वेळा तो लिहायचा प्रयत्न केला पण मनाने साथ दिली नाही. मग यावर्षी एक ऑगस्टला मैत्री दिनाच्या दिवशी म्हणजे आमची मैत्री तुटल्यानंतर बरोबर २ वर्षांनी, मी मनाचा हिय्या करून तिला मैत्री दिनाच्या शुभेच्छांचा मेसेज पाठवला. मी लिहिलं 'भले बुरे जे होऊन गेले विसरून जाऊ या वळणावर' तिचा रिप्लाय मेसेज येईल याची मला जरासुद्धा शाश्वती नव्हती पण तिने मोठ्या मनाने जुन्या गोष्टी विसरून मला माफ करून मैत्रीदिनाच्या शुभेच्छा पाठवल्या आणि मला Unlock केलं. मला खूप आनंद झाला तिच्या या दरिया दिलीवर मी एक शेर लिहला.तसे ती तुटीकचं वागत होती, दोन दिवस आधी मी तिला पाठवलेल्या व्हाट्सअप मेसेजला तिने काही उत्तर दिले नव्हते, म्हटलं अजून नाराजगी पूर्ण नाहीशी झालेली दिसत नाही. ती परत ऊगाच  रागवेल म्हणून तो शेर तिला न पाठवता माझ्या स्टेटसवर ठेवला, विचार केला की तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती स्टेटस बघेल.
4/8/2021
इस friendship day पर रुठे हुए दो पुराने अजी़ज दोस्तों की दिलजमाई हुई तो उनके दिलों के जज्बा़त को इस बदलते मौसम ( आषाढ से श्रावण) से जोड़़कर शायरी मे पेश करनेका प्रयास किया है। तो जरा गौर फरमायेंगा जनाब।
!! आज अऱसो बाद, पुरवा सुहानी आयी है।
कोयल की मिठी कुक ने, खामोशी कि निंद जगाई है।
अब जो,खुली है बंद आंखे तो अश्क़ों मे मोतींसी चमक़ आयी है।
भीगे भीगेसे सुस्त मौसम ने मस्ती की करवट़ बदली है।
नाराज़गी की काली घटा़से सुरज की रिह़ाई हुई है।
तो सुरज के किरणों मे खिलती हॅंसी सी रौंनक छाई है।
!!आज पुरवा सुहानी आयी है तो दिल मे फुले नही समायी है।
गम के अंधेरे पर खुशी के उजालेने दस्त़क दी है।
बंजरजमीं पर फिरसे मेहरे-ए-नज़र की बारीश बऱसाई है।
धुॅंधली  हवा मे भीनीं भीनीं सी खुशबू बिख़राई है।
फुलं खिले है गुलशन मे तो खुशी से डाली लहराई है।
देखते ही देखते कोहरे मंजर ने लह़राती अंगडा़ई ली है।
!!आज पुरवा सुहानी आई है जो दिल मे नयी उमंग लाई है।
इस बारी़श से दिलों से नफ़रत की धुल़ साफ़ हुई है।
गलतफ़हमी के पिंजरेसे भरोसें के पंची की बाइ़ज्जत बरी हुई है।
शुक्र है जनाब का, उमरकैद की सजा़ आज माफ हुई है।
टुटी़ हुई दोस्ती की डोर आज फिरसे जुड़ रही़ है।
अरसों से मांगी दुवा आख़िर आज कबुल हुई है।
एक शख्स मे फरीश्तें की आज़माईश हुई है।
!!आज पुरवा सुहानी आयी है यारों की दिलज़माई हुई है।
पण दिवसभरात ते स्टेटस तिने पाहिलेच नव्हते म्हणून मी तिला व्हाट्सअप वर मेसेज पाठवला की स्टेटस बघं पण हा मेसेज तिने बघेपर्यंत २४ तास होऊन गेले होते आणि माझे पूर्वीचे स्टेटस डिलीट झाले होते आणि नंतर मी स्वामींचे ठेवलेले स्टेटस - 'लोकं एकमेकांना खाली खेचतात पण स्वामी भक्तांना  कसे हात देतात' त्याबद्दलच होतं, तिने ते पाहिले आणि परत मला ब्लॉक करून टाकले. मला काही समजले नाही की आता परत मी का ब्लॉक झालो? हा block- unlock सापशिडीचा खेळ आमचा गेले दोन वर्षे चालू आहे. मेसेज पाठवला तर उत्तर नाही, फोन केला तर फोन उचलायचा नाही. मी शब्दांची जेवढी कारीगरी करता येईल तेवढी करून तिला मेसेज पाठवून मनधरणी करायचा प्रयत्न केला पण ते सगळे विफल झाले. तिने मैत्री दिनाला दिलेल्या शुभेच्छा आणि माफी या थोड्याश्या उर्जेवर मी या लेखाचे उर्वरित लिखाण पूर्णत्वास न्यायचा प्रयत्न केला, नाहीतर गेली २ वर्ष हे लिखाण अपूर्णच होते. मी देवाला नेहमी म्हणायचो अगर वापिस मिलवा नही सकते हो हमे तो भुलवा तो दो। पण या दोन्ही गोष्टी मला आणि देवाला काही शक्य झाल्या नाहीत और मै इंतजार करता ही रहा हुँ। एखाद्याने आपल्याला ब्लॉक केल्यानंतरचा मंजर फार वेगळा असतो. तुमचा इंतजार हा कधीच संपतच नाही, तुम्हाला प्रत्येक क्षणी मनात एक आस असते आज तरी  unlock होईल पण दिवस असेच पुढे जात रहातात 'आखिर उम्मिद पर तो दुनिया कायम है।'
ए इंतजार की घडिंया बहुत कठीण होती है। आमच्या दोघांच्यात कम्युनिकेशनसाठी  Text मेसेज हे एकच माध्यम उरलं होतं, त्यामुळे एखाद्या मेसेजची बीप जरी वाजली तरी मनात येयचं की तिचा काही मेसेज आला असेल का! पण ते मृगजळच ठरयचं. ' यु तो उनका जवाब आने की कोई गुंजाईश नाही थी फिर भी बार बार फोन चेक करते राहते है।' मधल्या काळात मी शोधलं की  truecaller वरून सुद्धा मेसेज, chat, अटॅचमेंट पाठवता येतात आणि whatsapp सारखा त्याचा फीडबॅक पण समजतो. मग मी truecaller वरुन chat मेसेज पाठवायला लागलो पण हे थोडे दिवस चालू राहिले आणि त्यावर पण संक्रांत आली, तिने truecaller पण ब्लॉक केले. खरचं एखाद्याला त्रास द्यावा तर असा. पण ठिक आहे 'इन तनहाईयों और इंतजार का कुछ अलग ही खुमार होता है।' हा मौहोल मी गेली दोन वर्ष अनुभवतो आहे, पण विश्वास आहे उशिरा का होईना ' सच की जीत मुमकीन है। पर ये भी सच है 'जिंदगी मे दो पल ही गुजरे है बडे़ कठीण, एक उनके आने से पहले और एक उनके जाने के बाद...!'
तसे पाहिले तर आम्ही दोघेही आपापल्या जीवनात मशगुल आहोत, रोजच्या रुटीन मध्ये बिझी आहोत. कोणाचं कोणावाचून अडत नाही हे जरी खरं असले तरी मी तिला खूप मिस करतोय. आता तिच्या जीवनात माझी काही अहमियत नसेल सुद्धा पण माझ्या जीवनात ती एक milestone or turning point आहे. गेल्या तीन वर्षातला माझ्यातला जो काही positive बदल आहे हा केवळ तिच्यामुळे झालेला आहे. तिने मला तिची गायलेली गाणी पाठवल्यानंतर मी माझ्या आवाजातलं एक गाणं तिला पाठवलं होतं.'आंधी' पिक्चरमधले 'तुम आ गये हो नूर आ गया है नही तो जिंदगी बडी बेवजा जा रही थी।'  
हे गाणं मला माझ्या बायकोने अनुने पंचवीस वर्षांपूर्वी आमच्या लग्नाच्या आधी भेट केलं होतं. ती वेळ खरंच तशी होती आणि त्यासाठी ते समर्पक होतं. कारण बॅचलर लाइफ नंतर संसारिक आयुष्याची सुरुवात करतानाच्या situation ला ते चपख़ल मॅच होत होतं. एकमेकाचे ते भेटणे हे खरंच नुर आल्यासारखं होतं. आता पंचवीस वर्षानंतर एक रुटीन लाइफ चालू असताना,जीवनाची एक ठराविक घडी बसलेली असते, आयुष्याला आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला  Stagnency आलेली असते. या अशा well set life मधे या छान युनिक मैत्रिणीचं भेटणं आणि माझ्यात घडलेले खुप चांगले बदल त्यामुळे मी हे गाणं तिला समर्पित केलं होतं. ते खरंच तिला रास्त होतं कारण गेल्या फक्त २.५ वर्षात माझा राम पासून रामानु पर्यंतचा घडलेला प्रवास याचे पूर्ण श्रेय तिचे आहे.कधी एक साधं वाक्यही लिहु न शकणारा मी आता बऱ्यापैकी शायरी करायला लागलो होतो आणि हा मैत्रिणीसाठीचा एवढा मोठा लेख लिहू शकलो होतो, स्टेजवर जाऊन शायरी पेश करू शकलो होतो, माझ्या भावनांना शब्दांमध्ये कसं उतरवायचं हे मी तिच्याकडून शिकलो, राग गिळायला शिकलो, स्वतःचा अहंकारापेक्षा समोरच्याला महत्त्व द्यायला शिकलो, दुसर्‍याच्या भावना समजायला शिकलो तसेच आपल्यामुळे मन दुखावलेल्या व्यक्तीला अर्जव करून त्याची मनधरणी करायला शिकलो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सॉरी म्हणून माफी मागायला शिकलो. आयुष्यात येणारी एखादी व्यक्ती तुम्हाला काय देऊन जाते आणि तुमच्या व्यक्तिमत्वात किती बदल घडवु शकते हे मी म्हणजे एक मोठे उदाहरण आहे. तुमच्यात असलेल्या छुप्या गुणानां प्रोत्साहन देऊन तुमचे व्यक्तिमत्व घडवू शकतात.
आमचे सगळे रिलेटिव्ह विचारायचे कि राम आता शायरी कसं काय करायला लागला, खरं कारण आम्हा नवरा बायकोनांच माहीत होतं त्यामुळे आम्ही फक्त एकमेकांकडे बघून हसायचो. खरंच तिची मैत्री मला बरचं काही देऊन गेली ते शब्दात मांडण्यासारखे नाहीच. मी कोणी तिच्यासारखा महान लेखक नाही, मनात येणाऱ्या गेल्या २ वर्षातल्या आठवत असलेल्या (वैसे तो सिकंदर कुछ भुलता नही) गोष्टी फक्त जमेल तशा कागदावर उतरवत गेलो. हे कितपत जमलं किंवा नाही याची मला खात्री नाही पण जेवढे जमलं तेवढे मी लिहायचा प्रयत्न करतोय, मनातल्या सर्वच गोष्टी नाही मला लिहता आल्या पण माझ्या भावना थोड्या तरी तिच्यापर्यंत पोहोचवाव्यात यासाठी मी हा लिखानाचा उठाठेव केला आहे. खरं तर हा लेख लिहायला घेतला तेव्हा मी म्हटलं होतं कि माझे पूर्वीची जी दोन छोटी लिखाणं होती ती होऊन गेलेल्या प्रसंगाचं वार्तांकन होतं आणि हा लेख मी चालू घडामोडी वर लिहीत आहे. पण हे  नियतीला मान्य नव्हतं आमची मैत्री असताना मी लिहायला घेतलेला लेख आमची मैत्री तुटून जवळपास दोन वर्ष होऊन गेल्यानंतर मी पूर्ण करत आहे. या लेखाची आनंदी मनाने केलेली सुरुवात शेवट अशी दुःखी, मैत्री तुटलेल्या परिस्थितीत होईल अशी सुताराम शक्यता मनाला कधी वाटली नव्हती. आमची छान मैत्री आणि त्या मैत्रीमुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात झालेले चांगले बदल, तिचे माझ्या आयुष्यातले स्थान हे सांगण्याचा  या लेखाचा खरतर उद्देश होता. पण परिस्थिती एवढी पालटली की त्याचा शेवट असा दुःखद झाला. मागील महिन्यात सहज मी सैफ आणि राणी मुखर्जीचा 'हम तुम' पिक्चर पाहत होतो, तो पहात असताना मी आमच्या मैत्रीला त्याच्याशी कम्पेअर करत होतो आणि त्यातील बरेचसे प्रसंग आमच्या मैत्रीशी साधर्म्य वाटत होते. जसे की पटकन मैत्री होणे, खूप अटॅचमेंट वाढणे मग किरकोळ गैरसमज आणि मैत्रीतली भांडणे, परत सुलह होणे, परत गैरसमजुतीने detachment होणे हा सिलसिला पिक्चर संपेपर्यंत चालू असतो. दोघांचीही मनं एकमेकानां शेवटपर्यंत निट समजत नाहीत अथवा दोघांच्याही काही वेगळ्या अपेक्षा असल्यामुळे गैरसमज निर्माण होऊन दोघेही चांगले असून एकमेकापासून फारकतच राहतात आणि शेवट या त्यांच्या मैत्रीवर सैफ पुस्तक लिहीतो आणि योगायोग बघा! मी सुद्धा तसाच हा लेख लिहिला आहे. आता हा लेख तिने वाचावा, मला समजुन घ्यावे आणि पिक्चरचा शेवट जसा गोड झाला तसा आमच्या तुटलेल्या मैत्रीचा सुलह व्हावा एवढीच माफक अपेक्षा आहे. पण आमच्या मैत्रीचे भवितव्य सर्वस्वी तिच्या हाती आहे. एक मुद्दा इथे नमूद करावासा वाटतो, ती जे म्हणत होते की 'वेगाने वर जाणारी गोष्ट ही तेवढ्याच वेगाने खाली येते' त्यावर माझं म्हणणं असं आहे की वेगाने जाणाऱ्या गोष्टीला विश्वास, निखळ स्वच्छ प्रेम,खरेपणा, आदर, सकारात्मक दृष्टिकोन या प्याराशुटने जर पकडून ठेवलं तर ही वेगाने जाणारी मैत्री निश्चितचपणे अनंत कालापर्यंत आकाशात तरंगत राहू शकते आणि छान मैत्रीचा आनंद आपल्या देऊ शकते. पण आपणच गैरसमज निरर्थक इगो, संशय, शंका, नकारार्थी  दृष्टिकोन अशी अनंत भोके पाडुन मैत्रीच्या प्याराशुटला  दुप्पट वेगाने जमिनीवर आणतो.  तरी असो या मैत्रिणीचे माझ्या ह:दयातले स्थान शेवटपर्यंत असेचं कायम राहणार आहे. माझ्याजवळ शिल्लक असलेले  आमच्या दोघांचे काही चॅटिंग,जे मी माझ्याकडे सेफ स्टोअर केले आहे. तसेच तिने गायलेली दोन गाणी, या तिच्या आठवणी माझ्याजवळ निरंतर राहतील. मधल्या काळात फेसबुक वरून आणि डायरेक्ट माझ्या मोबाईलवर  काही Spy work  झाले त्यातून या काही गोष्टी वाचल्यात तीच आमच्या मैत्रीची शिदोरी माझ्याकडे आहे. बरेच वेळा तिची शायरी वाचुन तिची आठवण अजुन ताजी होत असते. हर पल आप मुझे याद आते हो ये कहनेका बात ही नही, याद उसे किया जाता है जिसे भूल गये हो,आप तो हमारे दिल मे बसे हो इसलिये आप के बिना हमेशा एक खालीपनसा रहता ही है।

मी माझ्या चुकीच्या रागाने या चांगल्या जिवलग अश्या (तीन-चार महिन्यात सुध्दा अशी जिवलग मैत्री होऊ शकते) मैत्रीणीला गमावले ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी हानि आहे, रुठे हुए दोस्त - वो फिर नही आते.  हे लिखाण करत असताना राजेश खन्नाच्या 'आपकी कसम' या पिक्चरमधील गाण्याची आठवण होते.
काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी…
*वो फिर नहीं आते….*
आयुष्यभर अगदी कशीही, कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. आयुष्याचा काहीकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित् संपर्का पलिकडे पोहोचली असतात. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही अबोला न धरणारी, हिच माणसं आता दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवं….. संपर्कात रहायला हवं.
अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना ? तो संवाद अविरत चालू रहायला हवा. कारण तो काळ किंवा ती माणसं ….परत येत नाहीत हो ..* वो फिर नहीं आते…*
गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं कि ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी हि माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायला हवीत.
*फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर*
*पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं*
*वो बहारों के आने से खिलते नहीं*
*कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं*
*वो हजारों के आने से मिलते नहीं*
*उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम*
*वो फिर नहीं आते…*
हि माणसं अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं. मनापासून जपलेल्या मैत्रीला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि....... क्षणात सगळं संपते आणि होत्याचे नव्हते होऊन जाते. डोळ्यांना दिसणाऱ्या, ऐकलेल्या किंवा आपण समजलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.
*आँख धोखा है, क्या भरोसा है*
*दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है*
*अपने दिल में इसे घर बनाने न दो*
*कल तड़पना पड़े याद में जिनकी*
*रोक लो रूठ कर उनको जाने न दो*
*बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम*
*वो फिर नहीं आते…*
आपल्या सगळ्यांचच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय … ठरवलेलं धेय गाठायचंय. आयुष्य खरंच खुप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत ...आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच.
उत्तरार्धात मागे वळून पाहताना ते पुढे येणार्या  प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत  हीच ती  सुंदर माणसं....तुमच्या बरोबर अगदी खंबीर उभी.. सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची.... सच कहा है किसीने...
*...वो फिर नही आते....*
खरंच हे गाणं मी जगलोय वा अजुन ही जगतोय म्हणा.
मी तिला खुप म्हणजे खुप Miss करतोय.
आमची मैत्री असतानाचे दिवस अगदी मंतरलेले होते आणि त्या मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीवर पुढचा जीवन प्रवास चालू आहे.
हा माझा राम पासून रामानू पर्यंतचा प्रवास तिलाच समर्पित आहे. ती बरोबर असताना शायरीची जी शान होती ती औरच होती...ती आता नाही. मी थोडीफार शायरी करत असतो पण त्याला ती नजाकत येत नाही. या सर्व जुन्या आठवणींना उजाळा देताना मराठी गाण्याची एक ओळ आठवते 'आयुष्यात अशी पाखरे येती जी स्मृती मागे ठेवूनी जाती'. खरंच गैरसमज माणसाला कुठल्या पातळीपर्यंत घेऊन जातो  ' गुस्से मे कही एक बात दिल से कही सौ बातों को भुला देती है। 'एकदा का गैरसमजाची धुळ तुमच्या चष्मावर बसली की तुम्हाला त्यानंतर सगळचं अंधुक दिसु लागते. ती धूळ स्वतः साफ केल्याशिवाय दुसऱ्याच्या मनाचा भाव, पारदर्शीपणा निट दिसत नाही. पण ठीक आहे, माझ्या कुवतीनुसार मी हे लिखाण पूर्ण केलं आहे. लिखाणात काही अतिशयोक्ती किंवा अतिरेक झाला असेल तर मी क्षमा मागतो, मनात होतं तसं मी लिहित गेलो तरीही बऱ्याच गोष्टी लिहायच्या राहून गेल्यात. पण गेले जवळपास तीन महिने म्हणजे मैत्रीदिनाला तिचा मेसेज मिळाल्यानंतर मी लिहण्यास परत सुरुवात केली होती. जसा वेळ मिळेल तसे हे लिखाण पूर्ण करायचा प्रयत्न करत आलो जे आज पूर्णत्वास गेले २६/१०/२०२१. गंमत बघा जेवढे दिवस आमची मैत्री होती त्याच्यापेक्षाही जास्त दिवस त्या मैत्रीबद्दल लिहिण्यात गेले यावरून तुम्हाला कळेल की किती खोलवर आमचे मैत्री रुजली होती. हे लिखाण म्हणजे अगदी पाकीजा पिक्चर बनवल्या सारखं झालं आहे. जसा तो पिक्चर बनायला सोळा वर्षे लागली (१९५६ -  १९७२) तसं हे लिखाण करायला मला खुप वेळ लागला (<२ वर्ष) आणि पिक्चर १९७२ साली रिलीज होईपर्यंत बरीच स्थितांतरे होऊन कमाल अमरोही आणि मीनाकुमारी यांच्यात फारकत झाली होती म्हणजे सुरुवात आनंदाने केली होती पण पिक्चर पुर्ण होईपर्यंत त्याची सॅड स्टोरी झाली होती. आमचंही काही वेगळ नाही लिखाणाला आनंदाने सुरवात आणि दुःखद  THE END.
हे लिखाण करत असताना ती सारखी माझ्याबरोबरच असल्याचा नेहमी भास होत असायचा त्यामुळेच हे लिखाण मी पूर्ण करू शकलो, तिच्या आठवणीनां त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
यादों के स्पर्श बडे़ अजीब होते हैं।
कोई भी ना हो पास,फिर भी वो बहुत करीब होते हैं।
इन मीन ४ महीन्याची मैत्री एखाद्याच्या व्यक्तिमत्वात एवढा बदल करू शकते! हीच मैत्री जर जीवनभर राहिली असती तर किती छान झाले असते.पण नशीबापुढे आपण सगळेच हतबल असतो. एखाद्या कडुन आपण काही घेतल तर त्याची परतफेड करायची असते, पण मी तिला काहीचं देऊ शकलो नाही ही खंत कायम माझ्या मनात रहाणार. तिला मी नेहमी म्हणायचो ' गालिबसाहब हम आपको सिर्फ दो बुंदे देकर आपसे सागर पा लेते है।' आणि हे खरचं आहे! तिने मला खूप काही दिले आहे त्याबद्दल मी तिचा आयुष्यभर ऋणी राहणार. उलट माझ्यामुळे तिचं मन दुखावलं गेलं, तिला मनस्ताप झाला. त्याबद्दल मी अनेकदा तिची माफी मागत आलोच आहे आणि तिने पण मला माफ केले आहे. पण ती पुन्हा माझ्याशी मैत्री करण्यास धजावत नाही हे खरं, पर एक दरख्वा़स्त है।
'फिरसे एक बार शिद्दत से आज़मालो हमे,
दावा है, हमारे जैसा दोस्त नही मिलेगा इस जहां मे,
यकीनं मानिये तो जरा,आपका दिल नही दुखायेंगे...!'
'त्रास फक्त प्रेमात होतो असं नाही, एकदा जीवापाड मैत्री करून बघा, मला वाटतं की प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो. मैत्रीची तुलना करायची झाली तर संथ वाहणाऱ्या नदीशी करता येईल,दोन भिन्न किनाऱ्यांना म्हणजे दोन मित्रांना मैत्रीचे निर्मळ पाणी एकत्र जोडून ठेवत असते आणि संथपणे जीवनासारखे पुढे वाहत असते. हे मैत्रीचे निर्मळ पाणी जोपर्यंत आहे पर्यंत दोन्ही किनारे एकमेकाच्या संपर्कात असतात. पण जर कधी एखाद्या किनाऱ्याला गैरसमज/शंका/ चुक यांची खिंडारे पडुन मैत्रीचे पाणी वाहून जाऊ लागले  तर अशावेळी विश्वास/माफी/क्षमा यांच्या लिंपनाने  ही खिंडारे बुजून टाकुन मैत्रीचे पाणी अडवावे व हळुवारपणे सुसंवादाच्या पावसाने मैत्रीची नदी पुन्हा काठोकाठ भरावी. कधी नाराजीच्या दुष्काळात अपुऱ्या संवादरुपी पाऊसाने सुध्दा मैत्रीची नदी आटु लागते अशावेळी गोड आठवणीचां ओलावा जपत विनंत्यांचे पाऊस पाडत मेहरबनीच्या वर्षा त्रुतुची वाट पहावी की जेणेकरून मैत्रीच्या प्रेमाचे निर्मळ पाणी  साठवुन मैत्रीची नदी पुन्हा वाहु लागेल.पण अशी खिंडारे वा दुष्काळ पुन्हा न पडण्याची आणि त्यामुळे मैत्रीची नदी न आटण्याची नीट काळजी घ्यावी.आता आमच्या मैत्रीचा ब्रेक अप होऊन दोन वर्षे होऊन गेली तरी पण आमची परत मैत्री व्हावी आणि तिने मला unlock करावे यासाठी मी अजून पण तिला विनंत्या करतच असतो. मी आजपर्यंत एवढ्या विनंत्या/ मनधरणी  कधीच कुणाची केली नाही, माझ्या बायकोची सुद्धा नाही तर! म्हणून म्हणतो, 'कुछ तो बात है उसमे और उसकी दोस्ती मे, या पिछले जनमं का कुछ रिश्ता होगा हमारा,जो हम उनकी दोस्ती से इतने attach है।
हम दोनो की जिद़ भी कमाल है।
ओ ना तो मानने पर राजी़ और हम उनको मनाने मे।
'इस नादान दिल का हौसला तो देखो, इंतजार उसका है जिसको शायदा अब मेरा ऐहसास तक नही है।'
पण मी मनाला समजवतोय की
'अगर इंन्सान सही है तो इंतजार गलत नही...!'
'रोज़ शिद्दत से आपकी कमी महसुस होती है और फिर रोज़ दिल को मनाने मे बहुत देर लगती है।
आता कालचीच गोष्ट घ्या ना! भारत-पाकिस्तान खुप दिवसानंतर T-20 मॅच, तिच्या बेटिंग लावायच्या सवयची मला आठवण झाली, तशी क्रिकेट मॅच बघताना तिची ही सवय मला आठवतेच, पण काल प्रकर्षाने आठवण झाली. मनात विचार आला होता की तिला मेसेज करावा की बेटिंग लावायची का! परत मनाला आवर घातला.
'अब किसकी थी उस वक्त ख़ता याद नही
किस तरह हमारी यारी हुयी जुदा याद नही !
है याद वो गुफ़्तगूकी तल्ख़ी लेकिन
’आजाद’ वा गुफ़्तगू थी क्या याद नही !! --
" कुछ कहते है दोस्ती प्यार है। कुछ कहते है दोस्ती जिंदगी है। हम कहते है दोस्ती तो दोस्ती है। उस से बढ़कर ना जिंदगी है न प्यार है।"
हे लिखाण कुठे थांबावावे हेचं कळत नाही कारण आमच्यातल्या गोष्टी ह्या न संपणाऱ्या आहेत. पण आता मनाला आवर घालतो आणि थांबतो ...क्यों की!
' सिर्फ मेहसुस किये जाते है, कुछ ऐहसांस....
कभी लिखे नही जाते।'
आता एवढीच आर्जव, मी जे लिहिले आहे ते शांतपणे तिने वाचावे आणि या वाचना नंतर तिला जी योग्य वाटते ती माझी प्रतिमा तिने ठरवावी.
तिने मला इतके वेळा ब्लॉक करून सुद्धा मी परत परत वेड्या सारखा तिला विनंती करतच आहे आणि त्यामुळे कदाचित मी तिच्या नजरेत फिजूल ठरलो असेन. पण माझ्या मनातील सर्व गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते फिजूलपण ही मला मान्य आहे. 🙏
दिल मे एक आस बनी हुई है कि शायद खुदा कहे  उसे,
"जा सिमरन जा करले उससे दोस्ती, जिंदगी मे शायद एैसा दोस्त फिर ना मिले"
" मेरी  दोस्ती का बस़ इतना ही उसुल है।
बस़ आप ही से है मुक्कमल़...!
वरना बाकी तो सब़ फिजुल है...!"
आज भी मेरा एक  Password उनके नाम से जुडा है।
जो दिन मे कई बार युज होता है।
Goodbye, but I can't forget you at all...!
                                                 राम ~~ *** रामानु

इतर रसदार पर्याय