दीपरामायण Ramkumar Mane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

दीपरामायण

आज 10/01/2023 ऑफिसमध्ये कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं त्याला कारण पण तसंच होतं. दीपीका … काल तुझ्याशी बोलल्यानंतर छान वाटलं पण  'वेड‘ पिक्चर बघितल्यानंतर मी तुला सांगितलं की त्या पूर्ण पिक्चर मध्ये मी तुलाच मेहसुस करत होतो, जिथे प्रेम शब्द येतो तिथे    

दीपीका असणारच अशी माझी आता भावना झाली आहे. पण तुझा अभिप्राय विचारला तर तू म्हणालीस की मला तसं काही वाटलं नाही, मी पिक्चर बघताना आपल्या दोघांना कुठेच रिलेट करत नव्हते. मग मी विचार करू लागलो की चार दिवसापूर्वी हिनेच मला येऊन सांगितलं होतं की मी 'वेड' पिक्चर बघितला आहे तुम्ही पण बघा..! खूप छान आहे. तिने सांगितल्यामुळे मी तो पिक्चर बघताना आम्हा दोघांना त्यातील पात्रांशी रिलेट करत होतो कारण त्यातले बरेचसे प्रसंग हे आमच्या मैत्रीमध्ये घडून गेले होते त्यामुळे मी हा पिक्चर बघताना जास्त सिरीयस होतो. मग परत माझे विचारांचे चक्र चालू झाले...की या घडीला मीच फक्त तिच्याशी जास्त अटॅच आहे का..! पण तिला तेवढी अटॅचमेंट राहिली नाही का...! यात प्रेम म्हटलं तर परत गैरसमज होतात कारण या सुंदर प्रेमाला रोडरोमिओ प्रेमींनी बिभ्सस रूप दिले आहे. त्यामुळे आपण एखाद्यावर प्रेम आहे म्हणायचे धाडस पण करत नाही कारण या रोडरोमीयोंचे चाळे माणसाच्या नजरेसमोर येतात. त्यामुळे खरे प्रेम असून सुद्धा माणूस ते मान्य करत नाही आणि तसेच तु करत असावीस असे मला वाटले. तुझ्या भाषेत याला मैत्री म्हणता येईल कारण बहुधा आपण दोघं एकाच पानावर आहोत पण त्याला मी प्रेम म्हणतो आणि तु मैत्री म्हणतेस. मैत्री आणि प्रेमात थोडा तरी फरक असतो तो मला आजपर्यंतच्या आमच्या सहवासात जाणवला आहे आणि माझ्या या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी फ्लॅशबॅक मध्ये जावे लागेल.

थोडं सुरुवातीपासून घेऊयात...आपल्या या मैत्रीवर लिहिलंच गेलं पाहिजे नाहीतर या मैत्रीवर खूप अन्याय केल्यासारखं होईल असं मला वाटत होतं आणि याच उत्कट भावनेने मी आज लिहायला घेतलंच...मनातलं सगळं आज कागदावर रेखाटल्याशिवाय काम होणारच नव्हतं. तेव्हा सगळं काम सोडून दिलं आणि माझ्या मनातील जमतील तेवढ्या भावना कागदावर उतरायला सुरुवात केली. काही लेख लिहायचा तर त्याला शीर्षक आवश्यक...पण आज शीर्षक शोधण्यासाठी क्षणाचाही वेळ लागला नाही, विचार करेपर्यंत हे शीर्षक मी लिहलं पण होतं...एवढं समर्पक सुचलं की दुसर शीर्षक द्यावे असा विचार सुद्धा मनात आला नाही. दीपिका आणि राम (रामानु) यांच्या मैत्रीचा हा प्रवास आहे. रामायणात प्रभु रामाने सितामाईना जिंकले होते म्हणून ‘रामायण’. पण इथे दीपिका ने रामाला जिंकले म्हणून हे "दीपरामायण" आणि ‘हो’ यात आम्हालापण रामायणासारखा बराच वनवास घडला,बऱ्याच गोष्टी आम्हाला सोडाव्या लागल्या पण तरीही आमची मैत्री टिकुन राहिली. जसा वाक्यप्रचार आहे तस आमच्या मैत्रीत बरंच "रामायण" घडल, तो संदर्भ देऊन हे शीर्षक मी ठेवले आहे यावरून आम्हा दोघांच्या मधली अटॅचमेंट लक्षात येईल.

ठिक आहे… आता हे "दीपरामायण" लिहायला सुरुवात करतो.

पूर्वी मी 'एक मैत्रिण असावी'  या विषयावर लेख लिहिला होता, पण तो मैत्री संपुष्टात आल्यानंतर दोन वर्षांनी लिहिला गेला...जसं बैल गेल्यावर झोपा केल्यासारख झालं. तोपर्यंत लेखात तेवढा रस राहिला नव्हता...म्हणजे असं झालं की माणूस गेल्यानंतर त्याचा पुतळा बांधायचा आणि उदो उदो करायचा. त्यामुळे मी ठरवलं की आमची छान मैत्री आहे ना... मग आत्ताच काहीतरी याच्यावर लिहिले पाहिजे आणि खरचं लिहिण्यासारखं आहे. तस पाहीले तर आमच्यात मैत्री व्हावी असं काहीच नव्हतं. दोन विजातीय ध्रुव यांच्यात मैत्री घडली…’हो’ घडलीचं म्हणावे लागेल किंबहुना स्वामींनी घडवली असेल असा मला वाटतं कारण आमची मैत्री होण्यात माझ्या मोबाईल वरील स्वामींचा फोटो एक दुवा ठरला होता. तसे तिच्यात आणि माझ्यात तीस वर्षाचे अंतर...माझ्या मुलीपेक्षा चार वर्षांनी लहानच ती...पण तिचा समजूतदारपणा हा एखाद्या 30 /40 वर्षाच्या स्त्रीला लाजवेल असा...सुंदर मोकळ मन, कायम हसतमुख पण काही भावनिक उथल पुथल झाली की रडू पण लगेच ...मी दिसायला देखणा, रुबाबदार...तशी ती जेमतेमच,सडपातळ अंकगाठी, मध्यम उंची, उजळ चेहरा, पाणीदार डोळे 👁 पण फारच बोलके.. ओठांपेक्षा तेच जास्त बोलायचे आणि त्यात भर म्हणजे उजवी भुवई उडवत बोलण्याची तिची अदा...माशाल्ला..! खालच्या ओठांवरचा छान तिळ म्हणजे Beautyspot..तिच्या ओठांचं सौंदर्य अजुनच वाढवतो, बोलताना पहिलं लक्ष त्या Beautyspot वरच जाते. इस पर एक शेर अर्ज करत हुं, 

"एक काले तील का पेहरा जरुरी है तेरे लबोंके आसपास...

डर है कही तेरी मुस्कुराहट को कोई नजर ना लग जाए..!" 

तिचा बोलताना कोल्हापुरी भाषेचा साज व माधुर्य, रोखठोक बोलणे आणि ‘हो’ महत्त्वाचे म्हणजे कर्रली हेअर...माझ्या मैत्रिणी या कुरळ्या केसांच्या का असतात हे काही मला समजत नाही कारण या कर्रली हेअरवाल्या मुली म्हणजे अधिक भावनिक गुंता...जसा केसांचा तसा भावनांचा...

मला वाटते हा भावनिक गुंता सोडवण्यासाठी देव त्यांना माझ्याकडे पाठवत असेल आणि बहुदा मी त्यासाठी समर्थ आहे असा देवाचा समाज असेल. पहिली मैत्रीण तो गुतां मोकळाच ठेवायची पण ही दुसरी त्यावर हेअर क्लिप आणि हेअर बॅंड बांधुन तो सावरुन तरी घ्यायची...तरी असो, पण कर्रली केस ही एक माझी आवडच आहे आणि बहुदा हे देवाला माहीत असावे. मी माझ्या आत्ताच्या मैत्रीणीबद्दल बोलतोय...मला लाल रंग आवडतो म्हणून बरेच वेळा ती केसांवर लाल हेअर बँड आणि लाल क्लिप लावायची आणि त्यावर पर्वणी म्हणजे कधी कधी छान लाल लिपस्टिक पण असायची म्हणजे...सोने पे सुहागाच...तिचे हे रुपडे माझ्या मनात नेहमीच घर करायचं, माझ्या आवडीची ती नेहमीच काळजी घ्यायची आणि मला आवडेल असं वागायचा प्रयत्न करत असे, यात तिची तारांबळ होत असे पण ती करायचीच ...Great...याबद्दल तिचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. म्हणून मी म्हणतो हे मैत्रीच्या पलीकडचं आमचं नातं असावं पण ते आम्हाला उमगत नव्हतं. मी कंपनीत उच्चपदस्थ आणि ती आता नुकतीच ट्रेनी म्हणून जॉईन झालेली, मी संसारी माणूस दोन मुलांचा बाप...वय वर्ष 50 (लोकांचे दृष्टीने म्हातारा), ती नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली तरुणी, मी एक रिलॅक्स लाइफ जगणारा माणूस,ती नवीन नवीन आव्हाने पेलण्यासाठी आतुर असलेली, माझ्या गाठी अनुभवांची शिदोरी,ती अनुभवाने तोकडी... आमच्यात कुठेच तुलना नव्हती...यात मी मोठा किंवा ती लहान हा संदर्भ नाही पण एवढा फरक असून सुद्धा आमच्यात मैत्री झाली याचं कारण की आमची मनं जुळली होती. यात कोणाचाच स्वार्थ नव्हता त्यामुळे या बाह्य गोष्टींमधला फरक आम्हाला कधी जाणवलाच नाही कारण मनाला वय नसतं. त्याची wavelength जिथे मॅच होईल तिथे जुळुन जातात, त्यात पुरुष- स्त्री,म्हातारा -तरुण, गरीब- श्रीमंत हा फरक कधीच राहत नाही आणि मनाशी मनातले तार जोडायला डोळे हे फार मोठे माध्यम आहे. बरेच वेळा आम्ही डोळ्यातूनच बोलायचो, जे कधीच खोटं बोलत नाहीत. मी जरी आसमां असलो तरी ती जमीन होती आणि जी आसमां पाहण्यासाठी आवश्यक होती. आमच्यातली ही दरी खूप मोठी होती तरी जसे आसमां व जमीन क्षितिजावर एकत्र भेटतात तसे आम्ही मनाच्या क्षितिजावर एकत्र होतो, यात फिजिकल असं काहीच नव्हतं. या आभासी भेटण्यात खूप आनंद होता जो शब्दात वर्णन करता येणार नाही तो आमचा आम्हीच अनुभव करायचो. 

गेले एक दीड महिन्यापासून दोघांच्या मनामध्ये खूप घालमेल वा बेचैनी चालु होती आणि ती मला कागदावर उतरवण्याशिवाय पर्याय नव्हता....नाहीतर माझ्या मनाची घालमेल थांबली नसती कारण आम्ही कमीच भेटत असू आणि भेटल्यावर बोलताना थोड्याच गोष्टी व्हायच्या...बऱ्याच गोष्टी वेळेअभावी किंवा विषय बदलल्यामुळे किंवा मनात काही अढी ठेवून राहून जायच्या, मग या राहिलेल्या खुप गोष्टी साठत जायच्या आणि अधून मधून त्याचा विस्फोट व्हायचा...त्याचा मला आणि तिला दोघांनाही त्रास व्हायचा. आज शेवटी मनाचा हीय्या करून या लेखाला मुर्त स्वरूप देण्यास सुरुवात केली. यात तिच्याबद्दलच्या जे लिहीत आहे हा माझा अभिप्राय आहे, हा तिच्याशी तंतोतंत जुळतच असेल असं नाही, काही चुकीचे किंवा अतिशयोक्तीने लिहिलं गेलं तर त्याबद्दल क्षमस्व...! आता यापुढील थोड लिखाण मी प्रत्यक्ष तिला उद्देशून लिहीत आहे, तिला माझे विचारने आहे. 

विषय तसा गहनच आहे "मैत्रीतलं प्रेम"...अगदी लहानपणापासून समाजाने आपल्या मनावर प्रेम या शब्दाचे किंवा या विषयाची एवढी भीती घातली आहे की प्रेम म्हटलं की माणूस दचकतोच. मैत्री पर्यंत ठीक आहे पण प्रेम म्हटलं की सगळी समीकरणाचं बदलतात, शक्यतो त्याकडे चुकीच्या दृष्टीनेच बघितलं जाते. प्रेम म्हणजे पाप असाच बहुसंख्या लोकांचा समज आहे आणि एक मित्र आणि मैत्रिणीतले मैत्रीतलं प्रेम म्हणजे तर अजूनच मोठा गुन्हा ठरतो. आता आपल्या दोघांविषयीच बोलूयात...आपली साधारण एक वर्षाच्या आतलीच ओळख आहे. आमच्या डिपार्टमेंटला तु आली तेव्हा माझं तुझ्याकडे विशेष लक्ष नसायचं पण हळूहळू बोलण्यात आणि मुख्य म्हणजे स्वामींमुळे आपली ओळख वाढत गेली त्यातूनच तुझी माझ्याबद्दलची ओढ विशेष वाढली. तू माझ्याबरोबर एवढी कम्फर्टेबल होतीस की एकदा वर माझ्याबरोबर माझ्या ऑफिसमध्ये बसली असतानाचा तुझ्यावर अडचणीचा प्रसंग गुजरला, जो मुली पुरुषाशी शेअर करत नाहीत पण तू मोकळ्या मनाने मला सांगितलंस आणि माझ्याकडून मदत मागितली, यावरूनच कळत की तू माझ्याबरोबर किती Easy होतीस. तु माझ्या दिसण्या-वागण्या-बोलण्यावर इंम्प्रेस होत गेलीस, तुला माझी 'भारी क्रेझ' होती हे तु मला पाठवलेल्या मेसेज मध्ये बरेच वेळा लिहले होतेस व तुला तुझ्या आईची छबी माझ्यात दिसायची. तसेच मग माझ्या बोलण्यात मला एका मैत्रिणीची कमी जाणवते हे मी बोलून दाखवलं...असेच पुढे पुढे मी " मैत्रीण" यावर लिहिलेला पूर्ण लेख तुझ्याशी शेअर केला आणि यातूनच मला वाटते की आपली मैत्री फुलत गेली. मग आपण व्हाट्सअपच्या द्वारे संपर्कात येऊ लागलो प्रत्यक्ष भेटण्यासाठी तुझी तळमळ चालू असायची कारण मी डिपार्टमेंटला सकाळी भेटून गेलो की ४ वाजताच परत खाली यायचो, कित्येक वेळा तु मला मेसेज करून बोलावुन घ्यायचीस. तुला माझ्याशिवाय करमायचंच नाही, मला भेटण्यासाठी वेगवेगळी कारण शोधायचीस. मला ही तुझी ओढ जाणवायला लागली होती, यातच 'आपने हमारी बराबरी रब से करावायी थी' आणि सर्वात कळस झाला जेव्हा "तुझमे रब दिखता है" हे गाणं तु मला पाठवलंस आणि मी तुझा झालो तो कायमचाच आणि त्यानंतर तू पाठवलेल्या प्रत्येक युनिक गाण्या गणिक माझे तुझ्याशी असलेले बंधन घट्ट होत गेले. मग आपण दोघे एकमेकांशी बऱ्याच काय..सर्वच गोष्टी शेअर करायला लागलो. तुला शायरी येत नव्हती पण समजायची आणि युनिक शायरी शोधुन मला पाठवायचीस, त्यातली एक अप्रतिम शायरी येथे पेश करतो... 

"आज रब से मुलाकात हुई है,

थोड़ी सी आपके बारे में बात हुई है,

मैंने पूछा क्या दोस्त दिया है,क्या किस्मत मैंने पाई है,

रब ने कहा संभाल कर रखना,मेरी ही परछाई है |"

किती अप्रतिम आहे, माझी योग्यता तु किती वरच्या पदाला नेऊन ठेवलीस हे वर्णन करायला माझ्याकडे अल्फाज नाहीत. तू मला पाठवलेल्या एका मोठ्या मेसेज मध्ये तु मला 💎 हिरा  म्हणालीस "माझ्याकडे दुसरा हिरा नाही"..! आता तुच सांग,माझं प्रेम का नाही जडणार तुझ्यावर..! यात दोष काय माझा. मी 💎हिरा आहे हे मी जाणतो पण ज्या उत्कटतेने तु ते लिहिलसं असं कोणीच मला आजपर्यंत नावाजलं नव्हतं, ह्या एका शब्दाने तु मला जिंकलस, माझे सर्व पैलु तू या एका उपमे मध्ये परफेक्ट बसवले होतेस....खरच तुम्हारा जवाब नही, इसीलिए तो तुम लाजवाब हो आणि तु माझ्या ह्रदयात घर केलस ते कायमचे. दोन दिवसापूर्वीच वेड पिक्चर मधला हा डायलॉग तुला पाठवला होता "तुझं माझ्यावर प्रेम होतं..माझं प्रेम होत गेलं.." याला तू काहीच रिप्लाय केला नाहीस मला वाटलं माझंच काहीतरी चुकतंय..देवाने स्त्री ही प्रेम करण्यासाठीच बनवली आहे, ती मैत्रीत नाही सामावली जातं...मैत्रीची पुढची पायरी म्हणजे प्रेम...मैत्री एक तळं असेल तर प्रेम हा सागर आहे आणि तु सागरा सारखी अथांग आणि Deep आहेस. तुझा Insta caption "I'm so deep even the ocean gets jealous" मध्ये सुद्धा तु हेच indicate करतेस. I get in love at your Abyssal & Deepness. तू मैत्रीचं तळं नाहीस तर प्रेमाचा सागर आहेस. तर मग तुच सांग की माझं तुझ्यावर प्रेम जड़ल यात माझं काय चुकलं..! तुझ्या या सागराच्या तळाशी मी कित्येक वेळा जाण्याचा प्रयत्न केला आहे, पूर्ण तळ अजून मी गाठु शकलो नाही तरी पण माझे प्रयत्न चालूच आहेत. वेळोवेळी तुझ्या भावनांच्या लाटा, भावनिक वादळ या तळाशी जाऊन मी शमवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून हा सागर शांत राहील. तुझ्या मनाची खोली या सागरा सारखीच आहे, वर जरी शांत दिसत असलीस तरी आत मध्ये भावनांचा कल्लोळ चालू असतो आणि तो मला समजत असतो, पण तू सांगत नाहीस म्हणून मी तुला जास्त विचारत नाही. अगदीच गरज पडली तर तू मला सांगशील असं मला वाटत, ठीक आहे थोड पुढे जाऊयात, तू पाठवलेल्या वरील शायरीवर माझा रिप्लाय...!

"आपने हमारी रब़ से बराबरी करवाई है। 

इसलिये तो ये दोस्ती कि शुरवात हुई है। 

आपकी चाहत है पाकिजा़, तो हमने आपको दिल मे अलग जग़ह दी है। 

आपके सिधे साधे प्यार मे सच्चाई है। 

तभी तो हमने आपको इतनी इज्जत दी है। 

वरना गैरों की इतनी औकात कहां है। 

जिन्होने अब तक हमारी परझाई तक नही छुई है।"

तिला त्रयस्थ ठेऊन पुढील लेख...!  

हे आतापर्यंत आमच्या दोघांच्या व्यक्तिरेखांबद्दलचे विश्लेषण झाले, तसेच मैत्रीची सुरवातीबद्दल मी इथे लिहायचं प्रयत्न केला. आता आपल्या मैत्रीचे विस्तृत विश्लेषण करत आहे, फार बहारदार आहे. लिहितानाच मला एवढ छान वाटतंय, मग आम्हाला अनुभवताना किती मजा आली असेल सांगा... फारच रोमँटिक आहे. आमच्या सुरवातीपासूनच्या भेटी पासुन सुरवात करुयात.

अभिदादाचा सत्संग...ही आमच्या दोघांची पहिली बाहेरची भेट... सत्संग झाल्यानंतर ती प्रथमच माझ्या गाडीत बसली माझ्या आईबरोबर मागच्या सिटवर होती, त्यानंतर आमची ओळख वाढत गेली आणि माझ्या गाडीच्या पुढच्या सीटवर ती कधी आली हे कळालच नाही. त्यानंतर मिलिंद दादा पादुका घेऊन घरी आले होते त्यावेळेस पण ती प्रथम आमच्या घरी आली, अगदी घरच्यासारखी वागली, सौ नी तिला जेवण करुनच पाठवलं, तिला घर दाखवताना आमच्या बेडरूम मधील तो कोलाज फोटो तिला खूप आवडला. त्यानंतर ती बाथरूम बराच वेळ बघत होती. आम्ही टेरेसवर बराच वेळ गप्पा मारत बसलो मग खालून सौ नी आवाज दिला किती वेळ बोलत आहात आणि मग आम्ही खाली आलो व ती निघून गेली, पण सौ च्या मनात आमच्याबद्दल पहिली शंका प्रकट झाली. पुढे आमचं शेअरिंग वाढत गेले,तिला शायरी आवडायची मग मी पुर्वी लिहिलेली शायरी तिला रोज पाठवायला लागतो त्याला आम्ही dose म्हणायचो..ती म्हणायची आजचा dose पाठवा ना..एक किंवा दोन dose गुड नाईटच्या आधी पाठवायचो त्यामुळे आम्हाला शांत झोप लागायची, हे चॅटिंग माझ्या बायकोच्या लक्षात आले आणि एक दिवस तिने माझा मोबाईल बघितला पण आमच्या चॅटिंगमधे वावग असं काहीच नव्हतं, पण माझ्या पूर्वीच्या मैत्रिणीच्या बाबतीत जे घडलं होतं त्याची आठवण देऊन ती म्हणाली..नका एवढं अटॅच होऊ तिच्याशी नाहीतर परत त्रास होईल...हे बंद करा. मग मी हे चॅटींग कमी केल्यासारखं दाखवलं पण कनेक्ट राहीलो. पुढे मे महिन्यात आमच्या घरी टेरेसवर पार्टी झाली. आमच्या सौ त्यावेळी माहेरी गेल्या होत्या व त्यांची परमिशन घेऊनच मी पार्टी अरेंज केली होती. मला लाल रंग खूप आवडतो म्हणून त्या दिवशी ती लाल रंगाचा टॉप घालून आली होती...छान दिसत होती😍. आधीपण आमच्या एक दोन बाहेर पार्टीज झाल्या तेव्हा सुद्धा ती लाल टॉपच घालून आली होती. सर्व पार्टीमध्ये ती माझ्या शेजारीच बसायची आणि त्या दिवशी पण आमच्या घरी पार्टी झाली त्यावेळेस तिने अगदी घरच्यासारखे सगळं आवरलं...मला किती वेळा वाढलं, तिथे सुद्धा ती माझ्या शेजारीच बसली होती आणि हे मुलांनी बघितले आणि सौ ना सांगितलं. आता त्यांचा संशय बळावला. पार्टी नंतर आम्ही लेट नाईट चॅटिंग करत बसलो खूप मजा आली होती चॅटिंग करायला, सौ नी तिकडून मी रात्री बराच वेळ ऑनलाईन होतो हे पाहिलं होतं म्हणून दुसऱ्या दिवशी तिने त्याबद्दल प्रश्न केला तेव्हा मी सांगितलं ग्रुप मधील लोक लांब जाणार होते आणि पोचल्यावर मेसेज करणार होते म्हणून मी ऑनलाईन होतो. आता या मैत्रीमुळे मी आपल्याच लोकांशी खोटं बोलायला लागलो होतो. हे चॅटिंग करता करता मी दुसऱ्या दिवशी तिला आपण दोघे long drive ला जाऊ आणि रात्री एकत्र dinner करूयात का..! म्हणून विचारलं आणि ती पटकन हो पण म्हणाली... देवच पावला होता. दुसऱ्या दिवशीचा आमचा बेत फिक्स झाला त्यामुळे मी तर हवेतच होतो. आयुष्यात पहिल्यांदा कोणा मैत्रीणिला फिरायला घेऊन जाणार होतो, आजकालच्या भाषेत आम्ही दोघे date वर जाणार होतो. आजकाल लोक डेटवर जाऊन काय करतात हे मला माहित नाही पण आमच्या दोघांचा एकच मानस होता की छान एकत्र वेळ घालवायचा, गप्पा मारायच्या आणि आवडती गाणी ऐकायची हा निर्मळ विचार दोघांच्या मनात होता आणि या विचारानेच आम्ही हा फिरण्याचा बेत बनवला होता. दुसऱ्या दिवशीच्या आमच्या डेटवर जाण्याच्या विचारात रात्र कशी निघून गेली हे कळलच नाही. सकाळी मी मित्रांबरोबर संध्याकाळी पार्टीला जाणार आहे असं मुलांना सांगितलं पण मित्रांची नावं सांगताना माझी गफलत झाली आणि मला ते जाणवलं पण मी ते विशेष सिरियसली घेतलं नाही. पण माझ्या मुलांच्या आणि बायकोच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनी मिळून trap लावला. दुसऱ्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे दोघांनी लाल रंगाचे ट्युनिंग केलं होते. मी घरून निघालो, तिच्यासाठी प्राधिकरणात पेस्ट्री घेतल्या आणि तिच्या घरापासून तिला कलेक्ट केले. माझी दोन्ही मुलं आमचा पाठलाग करत होत़ी आणि यापासून आम्ही अनभिज्ञ होतो कारण आम्ही काही चूक करतोय असं आम्हाला वाटत न्हवतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारची दक्षता घेण्याची गरज आम्हाला वाटली नाही. पण आमच्या घरच्यांशी मी खोटं बोललो होतो तेव्हा त्यांनी माझ्यावर नजर ठेवली होती. ती गाडीत बसली आणि आमचा तो मंतरलेला प्रवास चालू झाला. आमच्या आवडीची गाणी आम्ही लावली आणि छान गप्पा मारत निघालो पौड रोडच्या मानस रिसॉर्टकडे. आज एखाद्या मैत्रीणी बरोबर डेटवर जाण्याचा प्लॅन सक्सेस झाला यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आम्ही दोघेही खूप आनंदात होतो…स्वर्गीय सुखाचा अनुभव घेत होतो असंच म्हणा हवं तर... पुढील दोन तासात आमच्यावर पुढे काय प्रसंग गुजरणार आहे याची आम्हाला पुसटशी ही कल्पना नव्हती. आम्ही दोघे आपापल्या सीटवर बसलो होतो, ना एकमेकांना स्पर्श केला ना स्पर्श करायची इच्छा...आमच्या दोघांमध्ये फिजिकल अंतर होतच पण आमची मन केव्हाच एकमेकांशी एकरुप झाली होती 💞. निघाल्यानंतर तिने एकदा पण मला विचारलं नाही की आपण कुठे जात आहोत "तुमच्याबरोबर आहे ना..मी सेफ आहे" केवढा माझ्यावरचा तिचा विश्वास आणि तिच्या याच विश्वासाला पात्र ठेवण्याचा मी प्रयत्न करत होतो आणि आजपर्यंत सुद्धा हा प्रयत्न चालूच आहे. मला अजूनही आठवत नाही की आम्ही कुठल्या रोडने कसं गेलो. स्थळ काळ वेळ याचं काहीच भान आम्हा दोघांना नव्हतं, आम्ही दोघेही एकमेकांना फक्त मेहसूस करत होतो…आम्ही काय बोलत होतो...काय ऐकतोय...काहीही आठवत नाही. एकमेकांना feel करणं काय असतं हे त्या दिवशी समजलं 💕...वाटेत खूप गर्दी लागली तरी त्याचा मला त्रास झाला नाही, गर्दीचा तिरस्कार करणारा माणूस पण तिच्याबरोबर ती गर्दी सुद्धा मी एन्जॉय करत होतो. मुले मागून पाठलाग करत होते, किती वेळा ती गाडीच्या जवळ सुद्धा आली असतील पण मला त्याचं भान नव्हते...जगात फक्त मी आणि तीच असल्यासारखं वाटत होतं...बाकी सगळं जग शून्य भासत होतं. बराच वेळ प्रवास झाल्यानंतर आम्ही चुकलो काय असं मला वाटलं, मी गाडी थांबून एका साईडला घेतली आणि पत्ता विचारण्यासाठी खाली उतरलो आणि वीज चमकावी असं घडलं 💥⚡ माझा मुलगा टू व्हीलरवर डायरेक्ट माझ्यापुढे उभा राहिला, मला काहीच कळालं नाही, हे सगळच अनपेक्षित झालं होतं. त्यांनी माझ्याकडून गाडीची चावी घेतली, माझा फोन काढून घेतला, तेव्हा ती तर गाडीतच होती आणि बाहेर काय चाललंय हे तिला तर काहीच कळालं नव्हतं. तेवढ्यात दुसऱ्या गाडीवर माझी मुलगी तिथे आली, दोन्ही मुलं मला काही बाही बोलत होती पण मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतोच. मला मोठा धक्का बसला होता...की आम्ही करायला गेलो काय आणि आता झालंय काय...मुलीने तिला गाडीतून उतरवले...मुलगी तिला खूप काही बोलत होती पण त्याला तिने काहीच प्रत्युत्तर दिले नाही कारण आम्ही दोघेही उत्तर द्यायच्या मनस्थितीत नव्हतोच आणि आम्ही दिलेलं उत्तर कुणाला समजण्यासारखे नव्हते. मुलीने तिला तिच्या गाडीवर घेतलं...तिच्या मागे माझी कार...माझ्या मागे मुलगा टू व्हीलर वर, आमच्या डिटेक्टिव्ह टीम ने मला हायजॅक केले होते आणि आमची वरात परत घराकडे निघाली होती. आयुष्यात पहिल्यांदा डेटवर जाण्याचा प्लॅन अशा प्रकारे चौपट झाला होता...हे माझ्या ओव्हर एक्साइटमेंट मुळे घडलं असावे असं मला वाटलं की ज्यामुळे मी कसलीच काळजी न घेता निघालो डेटवर...या हायजॅक ऑपरेशनची इत्तमभूत माहिती सौ ना कळवण्यात आली होती, ह्या दोन तासाच्या प्रवासात मिनिटा मिनिटाची खबर त्यांना कळविण्यात येत होती, हे मला नंतर कळालं. माझ्या कुटुंबीयांनी त्या दिवशी पूर्ण प्लॅन करून या सिकंदरचा बंदर केला होता. असो, मुलीने जाता जाता तिला भरपूर सुनावलं पण तिने ते काही मनावर घेतलं नाही कारण परिस्थितीच तशी होती आणि ती तिच्या जागी बरोबर होती. एखाद्या मुलांच्या वडिलांनी असं करणे कुठल्याच मुलांना रुचणार नव्हतं कारण त्यांना सत्य माहित नव्हतं, हे माझ्या मैत्रिणीला कळत होतं त्यामुळे ती माझ्या मुलीपेक्षा वयाने चार वर्षे लहान असून सुद्धा काही उत्तर न देता मॅच्युअर पद्धतीने वागली. तिला फक्त माझी काळजी होती कारण आता माझ्या घरी सगळीच उलथापालथ झाली होती. आता या सर्वांना कसं समजवावं याचा विचार मी गाडीत करत होतो. मुलीने तिला तिच्या घरी सोडले, तिच्या घरी तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता, घरी फक्त मावशी होते आणि तिला काही विशेष माहिती द्यायची आवश्यकता नव्हती कारण ती माझ्याबरोबर जेवायला गेली आहे हे घरी माहीत होतं. मी घरी आलो मुलांकडून माझा फोन घेतला आणि पहिला तिला फोन लावला, ती घरी पोहोचली होती पण तिला सर्वात जास्त माझी काळजी होती. ती मला धीर देत होती की सर्व ठीक होईल आणि त्या दिवशी ती उपाशीच झोपली. इकडे आता मला घरातील महाभारताला तोंड द्यायचे होते, सौ ना पहिला फोन केला...तिचा हाच मुद्दा होता की तुम्ही माझ्याशी खोटं बोलून गेलात. ती तिच्या ठिकाणी बरोबरच होती, माझ्याकडून आयुष्यात पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं होतं जे आमच्या कुटुंबीयांच्या पचनी पडन अवघडच होतं. पण मी जर तिला सांगितलं असतं की मी या मैत्रिणीवर फिरायला चाललोय तर यांनी कुणीच अनुमती दिली नसती त्यामुळे मला खोटं बोलावं लागलं. माझी मुलगी मला म्हणाली-पप्पा ती किती लहान आहे..! ही अशी कुठे मैत्री असते का...! आमच्या दोघांच नातं सर्वांच्या समजण्याच्या पलीकडच होतं आणि आम्ही ते समजून ही सांगू शकत नव्हतो ही माझी त्या दिवशीची अगतिकता होती. मी आमच्या या वागण्याला पुरस्कृत करतो असं नाही पण आमचे कुटुंबे जे समजत होते तसं काहीच नव्हतं.आमच्या मनात काहीच पाप नव्हतं आणि आमच्या भावना समजून घेणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी आमची अवस्था झाली होते. त्या पार्सल पेस्ट्री आम्ही अजून खाल्ल्या नव्हत्या त्या आदिच आमचा एन्काऊंटर झाला होता त्यामुळे त्या गाडीत परत आल्या, मग मी दोन पैकी एक खाल्ली आणि दुःखात झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या सासूबाईंचे माळीनगरला वर्षश्राद्ध होते त्यासाठी मला आणि मुलांना तिकडे निघायचं होतं तेव्हा सकाळी निघालो आणि दहा वाजता तिथे पोहोचलो. सौ रात्रभर काय तणावाखाली असतील याची मला जाणीव होती, त्या रात्रभर रडतच होत्या..झोपल्याच नव्हत्या. या त्यांच्या सत्यवचनी रामाकडून त्यांना असं काही अनपेक्षित होईल याची त्यांना जरा सुध्दा अपेक्षा नव्हती. तिला हा फार मोठा मानसिक धक्का होता. या मानसिक धक्क्यामुळे पुढे तिचे वजन पाच-सहा किलोने कमी झाले आणि ते रिकव्हर व्हायला पुढे आठ महिने लागले. मला बघताच तिचा रागाचा पारा खूप चढला आणि ते सहाजिकच होतं, तशीच ती मला शंकर महाराजांच्या देवळात घेऊन गेली कारण इथे सगळ्यांच्यात काही बोलता येणार नव्हतं.आम्ही दोघे गाडीत असताना वाटेत ती मला खूप बोलली पण माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं तिचे एक दोन फटके सुद्धा मला त्या दिवशी खावे लागते, थोडं का असेना पण तिने मला पहिल्यांदीच असं केलं होतं आणि मी आमच्या मैत्रीसाठी सर्व सहन करत होतो. मी विचार करत होतो की या मैत्रीसाठी किती हा त्रास झाला...माझ्या कुटुंबाला व मला, तिला सुद्धा थोडाफार झालाच, खरचं यात काय चूक आहे का? आमच्या मनात काही चुकीची भावना नसताना कोणी ही आमच्या भावना समजून घेतच नाही...ते त्यांच्या मनातील भावनांनुसारच समोरच्याकडे बघतात… अगदी आपले आप्त स्वकीय असले तरी पण…. आता जे घडायचं होतं ते घडून गेलं होतं. आमच्या घरच्यांना मी व्यवस्थित समजावून सांगितले, माझी चूक होती असं मला नाही वाटले आणि मी ते मान्य ही केली नाही. पण यापुढे असं काही घडणार नाही याची खात्री दिली आणि तो विषय तिथेच संपवला.

या घटनेनंतर मी सोमवारी जेव्हा कामावर आलो तेव्हा मॉर्निंग मीटिंगच्या वेळेस तिला सारखे हसू येत होते की सरांचं कसं झालं असेल, पण मी व्यवस्थित मॅनेज करेन याची तिला खात्री होती, हे तिने मला पाठवलेल्या एका मेसेज मध्ये लिहिले होते. पण या घटनेनंतर आम्ही थोडे विलग झालो पण या Reverse force मुळेच आमची ओढ अजून वाढत गेली. मग मी सुद्धा तिच्याकडे त्याच गतीने ओढला गेलो. आमची मैत्री निर्मळ आहे हे आम्हा दोघांना माहीत होते त्यामुळे आमची अटॅचमेंट वाढत गेली आणि यामुळेच मी घरच्यांची बंधने झुगारून आमची मैत्री या ना त्या प्रकारे कायम ठेवली..ही माझ्यासाठी मोठी रिस्क होती पण मी ती घेतली कारण मला तिचं मन दुखवायचं नव्हतं. ती कंपनीत नवीनच आली होती, घर सोडून इतक्या दूर आल्यानंतर तिला माझा आधार वाटत होता... माझ्यावर तिचा खूप विश्वास होता. घरच्यांचे ऐकून जर मी ही मैत्री तोडली असती तर ती खुप नाराज झाली असती व मनाने खचली असती आणि ते मला नको होते, ती नेहमी आनंदी रहावी म्हणून मी खूप रिस्क घेऊन हे मैत्री चालू ठेवली... कोणी आपल्यावर विश्वास टाकत असेल किंवा त्याला आपल्या आधाराची गरज असेल तर त्याचा आधार मोडायची माझी इच्छा झाली नाही. त्यासाठी जमेल तो त्याग करायला मी तयार होतो आणि तिचा भावनिक आधार म्हणून उभा राहिलो. घरचे मला सारखे नावं ठेवत होते आणि अजून पण ठेवतातच, काय तुमची मैत्रीण... तुम्हाला शोभते का? चांगली तरी मैत्रीण करायची...पण माझ्या मते आम्हा दोघांमधे एक वेगळाचं नात होतं ज्याला आम्ही मैत्री हे गोंडस नाव देते होते. मैत्रीच्या आवरणाखाली वाढणार आमचं हे निर्मळ प्रेमच होतं, जे एकमेकांच्या मनाशी जोडलं गेलं होतं. हे फिजिकलच्या पुढे होतं, त्यामुळे यात रंग, रूप, पर्सनॅलिटी याचा कुठेच संबंध नव्हता ते फक्त एकमेकांच्या भावनांशी निगडित होतं आणि तेवढच आम्हाला पुरेसं होतं.

तीचे मेसेज...! 

"मी सजले तुझ्या लोचनात रे..|

पण जन्मले आधी तुझ्या मनात ...❤️"

 

"कितनी छोटी सी दुनिया है मेरी.....

एक मैं हूं और एक दोस्ती है तेरी......।❤️"

मधील काळामध्ये डिपार्टमेंट मध्ये बसायची जागा यात बदल केल्यामुळे मी खाली डिपार्टमेंटला बसायला आलो, हे तर तिच्या दृष्टीने आनंदाचे होते कारण मी सारखा तिच्यासमोर असणार होतो, तिचं एवढंच म्हणणं होतं...तुमच्या प्रसन्न चेहऱ्यावरचे हास्य बघितलं की मला खूप एनर्जी येते. आता खाली बसायला लागल्या पासून आमचा सहवास वाढायला लागला होता त्यामुळे मग रोज ऑफिस सुटल्यानंतर आमचं थांबणं चालू झालं, सर्वजण घरी गेल्यानंतर आम्ही ऑफिसमध्येच गप्पा मारत बसायचो, तिचे बाकी मित्र किंवा डिपार्टमेंट मधील सहकारी ५.३०ला तिला चलं म्हणायचे पण ती काहीतरी कारण काढून मागे थांबायची. दररोज कामांमध्ये रिपोर्ट चेकिंग किंवा इतर कामासाठी आम्ही दोघं एकत्र यायचा प्रयत्न करायचो जेणेकरून एकमेकाचा सहवास मिळावा. पण हे फार थोड्या वेळासाठी असायचं. थोडस मागे जाऊयात...मी ४ वाजता कंपनीत चालत चक्कर मारावयास जायचो त्यावेळेस डिपारमेंटमध्ये खाली टीमला भेटायचो हे तिला माहीत असायचे त्या वेळेची ती अगदी आतुरतेने वाट बघायची, कधी कधी छान पावडर लावून तयार असायची..छान वाटायचे तिला बघितलं की...मग एक दिवस आम्ही दोघे चालायला गेलो आणि चालत अर्धा तास छान गप्पा मारल्या. आमचा असं झालं होतं की "तुमसे मिलना,बाते करना बहुत अच्छा लगता है" मी पाठवलेले शायरी ती जपून ठेवायची. तिला शायरी पाठवता पाठवता तिच्यावर मी कधी शायरी करायला लागतो हे मलाच कळालं नाही. आजपर्यंत तिच्यावर खूप शायरी केल्या आणि त्यापण एक से बढकर... प्रसंग सुखाचा असो, दुःखाचा असो, रोमँटिक असो वा आमच्या विरहाचा असो, त्या त्या प्रसंगांनरूप तिच्यावर शायरी करून पाठवायचो आणि ती पण माझ्या शायरीची तलफगार झाली होती.

"आज-काल तो आप बहोत सजने सव़रने लगे हो, 

हमसे दोस्ती कर रहे हो..या फिर इश्क़ लडा रहे हो, 

(जो कुछ भी हो पर मेरी आँखों को जच़ने लगे हो)" 

 एक प्रसंग सांगतो, आम्ही कंपनीत सुद्धा एकदा पकडलेले गेलो होतो, तसं काही सिरीयस नव्हते पण आमचा विचार होता की आमचे भेटने हे कोणाच्या नजरेत येऊ नये पण घडल उलटच. एकदा तिला गावाला जायचं होतं त्यामुळे व्हाट्सअप मधील सगळा डेटा कॉपी करायचा होता, जेणेकरून व्हाट्सअप मेसेज सगळे डिलीट करता येतील की घरी गेल्यावर रिस्क नको. आम्हाला डिपार्टमेंट मध्ये काही बोलता येत नव्हते म्हणून मग आम्ही कॅन्टीनला बसून ते कॉपी करत होतो तेवढ्यात डिपार्टमेंटमधील एक जण आईस्क्रीम घ्यायला कॅन्टीनला आला आणि त्यांनी आम्हाला दोघांना तिथे बघितलं, मग काय काही खोटं सांगून त्याला चालता केला. हे असं व्हायचं त्यामुळे आम्हाला एकत्र बसणे किंवा फिरणे चोरीचे झाले होते. 

"जमाने की नजरों का पेहरा है बडा़ ही सक्त, 

इसलिये हमे बातें करने मिलता है थोडासा ही वक्त, 

बाते होती है पल दो पल, 

पर उसका इंतजार रहेता है हर पल" 

याला उपाय म्हणून आम्ही माझ्या गाडीत ऑफिस सुटल्यानंतर बसायला लागलो, गाडी सेंटर पार्किंग किंवा ऑफिसमधील कमी राहदारीच्या रोडवर लावायचो, गाडीत बसून गप्पा ही व्हायच्या आणि आमची गाणी पण ऐकली जायची. हे पंधरा- वीस मिनिटं बसणं सुद्धा आमच्या जीवाला समाधान देऊन जायचं. त्या दिवशी ती घरी गावाला निघाली होती पण तिची अगतिकता मला कळत होती, मला सोडून जाण्याची तिची इच्छा नव्हती, ती मला म्हणाली की पहिल्यांदा असं होतय की घरी जायला नको वाटतय, ती गाडीत असताना आम्ही बराच वेळ चॅटिंग करत राहिलो अगदी रात्री बारा वाजेपर्यंत, miss you 😢😭😵‍💫 या emoji नी माझा मोबाईल भरून गेला होता. "आता सांगा ही मैत्री का अजून काही"

"ये कैसा सब्र से बेसब्रसा इश्क लडा़ते हो, 

सुबह मिलते समय घनी जुफ्लोंसे जब यु खेलते हो, 

बात करते भौं (भुवई) को यु उडा़कर आँखों से तीर चलाते हो, 

हरद़म निचले होठों को दातो़ं तले दबातें हो, 

मिलने के समय मह़कती पाउडर लागते हो, 

क्यु यु दील का चैन चुराकर उसे बेचैन बनाते हो, 

अच्छा लगता जब यु मुझसे एैसे इश्क़ लडा़ते हो,"

मी तिला नेहमी म्हणायचो तुझ्या वयाचे मित्र सोडून तू माझ्या मागे का लागली आहेस....! 

"हम उम्र को छोड आपने हमे यार क्यू चुना है।

क्यु हमे यु आशिके यार बनाया है। 

इस नाचीज के साथ क्यु प्यार का धागा बांध रहे हो, 

हमसे क्या पाओगे तुम और हम मे क्या धुंड रहे हो, 

मै ये अच्छा कर हु या फिर बुरा...!

बस आजकल इस उधेड़भुन मे ही रहता हुं..!"

..ती गावाकडे असताना सुद्धा आम्ही फोनवर बराच वेळा बोललो...तीच ही तिथं मन लागत नव्हतं, ती गावावरून परत कधी येणार याची मी वाट पाहत होतो आणि तिला सुद्धा कधी ऑफिसला येईन असं झालं होतं. माझी पण अटॅचमेंट दिवसां गणिक वाढीस लागली होती, यावर मी शायरी केली होती. 

"ए दोस्त, मिलते हो रोज मगर...!

आज बडी फुरसत से तुम्हे यु देखा है। 

एक खूबसूरत दिल के साथ हसीन हुस्न भी आपने पाया है। 

रोज आँखोंसे बातें होती है। पर मुझसे आज एक गुनाह हुआं है।

 आपके इजा़जत के बिना...!

आपके होठों को पहली दफा़ मेरी आंखों ने छुआ है। 

आज पहली दफा़ आपके मुलायम हातों को छुआ है। 

तो दिल मे कुछ हुआ है। 

हाथ मिलाकर कुछ देते समय मैने भी बहुत कुछ पाया है। 

बेश़क कुछ सोयें हुए अरमानों को जगाया है। 

ए दोस्त पहेली बार आपको यु मेहसूस किया है। 

आज बडी फुरसत से तुम्हे यु देखा है।" 

नंतर आमचे व्हाट्सअप पूर्णपणे बंद करावे लागले मग मी तिच्याशी Insta वर कनेक्ट झालो मग Insta वर आम्ही थोडेफार चॅटिंग करायचो आणि बरेचसे Reel शेअर करायचो. एक दिवस रात्री मी गुड नाईट मेसेज मध्ये आमच्या घराच्या बागेतील मोगऱ्याच्या फुलांचा फोटो पाठवला तर ती म्हणाली मला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात, मग तिच्यासाठी सकाळी मी रोज मोगऱ्याची फुलं आणायचो..आणताना पण चष्म्याच्या केस मध्ये काळजीने आणायचो...ती माझ्या हातातून फुल घेताना मला चोरून स्पर्श करायची मग आम्ही मुद्दामच फुलं घेताना थोडा वेळ लावायचो की जेणेकरून जास्त वेळ दोघांनाही एकमेकाचा स्पर्श अनुभवता येईल, ही मोगऱ्याची फुलं पण आमच्या मैत्रीतला एक दुवा ठरली. पुढे पुढे काही काम करताना किवां बोलताना ती हळूच माझ्या हाताना स्पर्श करायची ...हा स्पर्श दोघांनाही हवा हवासा वाटायचा, ही एक प्रेमाची भावना होती यात कुठे वासना वगैरे प्रकार नव्हता. ही प्रेमाची ओढ नाही तर दुसरं काय होतं, हे मैत्रीच्या पलीकडेच होतं हे दोघांनाही जाणवत होतं, हे प्रेमच आहे मी मान्य केलं पण ते ती मान्य करत नव्हती. आमच्या गप्पांमध्ये एकदा असाच बायकोबद्दल विषय निघाला होता. तिच्या मनात थोडा संदेह असावा की मी लग्न झालेला माणूस, माझं माझ्या बायकोवर प्रेम असणारच आणि तरीसुद्धा हा माझ्याशी अशी मैत्री कशी करत असेल. ती हे बोलून दाखवत नव्हती पण तिच्या मनातले हे विचार मला जाणवायचे, त्यावर मी ही शायरी तिला पाठवली होती. 

"आप पुछ रहे थे,अपने बिबी के साथ कितने मशगुल रहते हो, और मेरा सवाल था उसी प्यार के साथ तुम कैसे मुझमे समा रहे हो, इस उधेड़भुन मे सारी रात जगाई है, तब जाकर कही ये उलझन सुलझी है। 

मेरा पहेला प्यार जैसे दूध का पुरा भरा प्याला है। 

तुम बस इसमे शक्कर जैसे घुल गये हो

दुध का स्वाद तो बढ़ गया है और दूध भी नही झल़का है।" 

पण Insta वरचे आमचे कनेक्शन जास्त दिवस नाही राहिले. एक दिवस पुना कॅम्पमधे खरेदी करत असताना मी तिला मेसेज पाठवला व तो माझ्या मुलाने बघितला, मग पुढे मोठा हंगामा झाला, आमच्या सौ नी खूपच गोंधळ घातला आणि सकाळी उठल्यावर मिलिंद दादांना फोन केला, दादांनी साताराला भेटायला बोलावलं, नॉनव्हेज खाल्ल्यानंतर चार दिवस तरी दादा त्या माणसाला भेटायला बोलवत नाहीत पण मी आदल्या दिवशी नॉनव्हेज खाल्ले होतो तरी आम्हाला त्यांनी सातारला भेटायला बोलावले. जाताना मला खूप टेन्शन होतं की दादा आता काय सांगणार आहेत. पण दादांनी सौ ना एकच सांगितले ...एवढा अकांड तांडव करायची काय गरज नाही, मेसेज केले म्हणून काय झालं आणि मला सांगितलं की तिला डिपार्टमेंटमधुन काढून टाका तिच्या संपर्कात नका राहु. मी दादांना ‘हो’ म्हटलो, पण तिच्यापासून लांब जाण्यास माझं मन मानत नव्हतं कारण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मला पटत नव्हत्या कारण ती pure soul आहे याची मला जाणीव होती. पण दादांनी आमच्या सौ ना शांत केले होते आणि मी तिच्याशी काही संबंध ठेवणार नाही हे मान्य केले मग तो विषय तिथेच संपला. दादांचे आज माझ्यावर खूप मोठे उपकार झाले होते व नॉनव्हेज खाऊन पण दादा आम्हाला भेटले या गुरूंच्या उपकाराची परतफेड करावी म्हणून मी दादांना शब्द दिला की मी आजपासून नॉनव्हेज सोडून देतो, दादा म्हटले पूर्ण विचार करून निर्णय घ्या आणि मी त्यांना शब्द दिला आणि माझं नॉनव्हेज त्या दिवसापासून सुटलं. मला असं वाटतं की वाईटतून नेहमी चांगलं घडतं तसं इथं झालं. ती माझ्या जीवनात काहीतरी चांगलं करण्यासाठीच आली व तिच्यामुळे आज माझे नॉनव्हेज सुटले होते आणि मी आध्यात्मात एक पाऊल पुढे सरकलो होतो ...यासाठी तर तिची माझ्या आयुष्यात येण्याची योजना नव्हती ना..! असे मला वाटले, यासाठी मी तिचा आभारीच असेन. पुढे आमचा सर्व सोशल कॉन्टॅक्ट बंद करावा लागले. माझी ही मैत्रीण मला शोभेशी नाही असे टोमणे मला घरातून मिळतच होते. माझ्या सौ चा एक मित्र IAS आहे यावर ती मला नेहमीच चिडवायची की 'माझा मित्र IAS आहे' नाहीतर तुमची मैत्रीण बघा...! मी पण तिला म्हटलं आता मी पण IAS मैत्रीण करेन. हा विचार मी माझ्या या मैत्रिणीला बोलून दाखवला की तुला माझ्याशी मैत्री करायची असेल तर IAS व्हावं लागेल म्हणजे तू IAS झाल्यावरच आपण मैत्री पुढे चालू ठेऊ. हे फार जड अंतकरणाने मी तिला सांगितलं...तिच्याही डोळ्यात अश्रू तरळले होते मग मी तिला धीर द्यावा म्हणून पहिल्यांदाच तिचा हात हातात घेतला होता ते पण तिला न विचारता, त्यावरची ही शायरी...आमची प्रत्येक भेट वा बोलने हा एक इव्हेंट होऊन जायचा आणि त्यावर मी शायरी लिहायचो, माझी शायरी लिहण्याची ती एक प्रेरणाच झाली होती. 

"आप यार से प्यार कब बन गये पताही नही चला है। 

जो मैने जिंदगी मे दुसरी मर्तबा किसी यार का हाथ, 

 इतने प्यार से थामा है। 

हम पहले प्यार से खफा तो नही है। 

पर किसी यारसे ये प्यार गुनाह तो नही है। 

दिल मे जो खुशी है वो बया नही कर पा रहे है। 

दिल मे जगे है कई अरमान, वो बता नही पा रहे है। 

इस सच्ची यारी को हमे अंत तक निभाना है।" 

IAS होण्याच्या स्वप्नाची पुढील वाटचाल...! मी तिला सरळ सांगितलं की आपण आता यापुढे सोशल मीडियावर कनेक्ट रहायचं नाही आता आपली मैत्री होईल तेव्हा...जेव्हा तु IAS होशील...! 

"अब न वैसी बात होगी न वो जज्बात होगें, 

अब न वो Reel होंगे न वो मेरी शायरी होगी, 

अब तो संघर्ष होगा और तेरी कामयाबी की ही बात होगी, 

अब तेरी कड़ी मेहनत होगी और जितने की उम्मीद होगी, 

अब तो बस तेरी निगाहे एक ही लक्ष्य पर टिकी होंगी, 

अब तो बस तु होगी और तेरी IAS की साधना होगी, 

मेरा दावा है, एक दिन इस दुनिया मे तेरी अलग पेहचान होगी, 

तब कही जाकर तेरे लिये लिखी मेरी शायरी होगी, 

मेरा दावा है। 

तु जरुर IAS होगी.. तु जरुर IAS होगी...! 

तुझा दोस्त *** रामानु"

ती पण त्या जोश मध्ये या गोष्टीसाठी तयार झाली. पण यासाठी तिला ग्रॅज्युएशन मिळवणे आवश्यक होते मग आम्ही ठरवलं की BA ला ऍडमिशन घ्यावे, जे त्यातल्या त्यात सोपे आहे आणि पुढे UPSC परीक्षेसीठी उपयोगी होईल आणि त्यानुसार आम्ही कॉलेज पण शोधलं. ती एक दोन वेळा कॉलेजला पण जाऊन आली, पण हा जोश पुढे पुढे कमी होत गेला कारण यासाठी लागणारे कष्ट खूप आहेत आणि मी तिच्यापासून दुर राहु शकलो नाही त्यामुळे आमची मैत्री चालूच राहिली आणि माझ्याशी मैत्री करण्यासाठी IAS व्हावे लागेल ही अट शिथिल झाली व हा विषय इथेच संपला. माझ्या एका विचाराने तिच्यात खूप फरक पडला होता पण तो विचार तिने तडीस नेला नाही, खरंच आमचा हा मैत्रीतला विरह तिचा उद्धार करु शकला असता पण माझीच अधिरता याला मारक ठरली कारण मेन उद्देश होता आमची मैत्री आणि पण जर IAS तरच...पण मी तिच्या मैत्री पासून लांब राहू शकलो नाही आणि ही मैत्री चालू राहिल्यामुळे तिला IAS होण्याची गरज भासली नाही आणि देश एका होणाऱ्या IAS ला मुकला. 

 या दरम्यान तिने मला एक सुंदर हिंदी गा़ण पाठवलं होतं, 

'है तेरा मांजा तेज' या गाण्याच्या रिलेशननी तिचे IAS होण्याचे स्वप्न मी कनेक्ट करून शायरी बनवली, 

आपका दिल पतंग ...तो मै उसका मांझा हुं, 

जैसे की तुम हीर 💃और मै तुम्हारा राझां🕺 हुं, 

खुले आस़मान मे उड़ तो जरा, मै जमी़ से तुझे थामे हुं, 

तुझे उस ऊंचाई (IAS) तक पहुंचानेका,मै बस एक जरिया़ हुं, 

मांझा है तेज मेरा ....पर ये वादा करता हुं... 

उस लक्ष्य 🎯 को हासिल किये बिना, मै तुझे कट़ने न दुं...!"

आता याची पुढची पायरी म्हणजे आमची ताटातूट झाली. तिला डिपार्टमेंट मधून काढने मला शक्य नव्हतं पण दादांचा निम्मा तरी आदेश पाळावा आणि तिचा उत्कर्ष होईल म्हणून तिची डिझाईन डिपार्टमेंटला ट्रान्सफर केली. तसे पाहिले तर माझ्या डिपार्टमेंटला वेकेन्सी नव्हतीच त्यामुळे तिचे डिपार्टमेंट चेंज करणे आवश्यकच होते, यात दोन्ही उद्देश सफल होणार होते, तरीपण हे मी नाखुषीनेच केले. तिला हे कळल्यानंतर तिला पण खूप दुःख झालं. आम्हा दोघां पुढे कुठलाच दुसरा पर्याय नव्हता. तिची इंटरव्यूची सगळी तयारी करून घेतली आणि ती त्यात पास झाली, 8 ऑगस्ट 2023 तिची ट्रान्सफर दुसऱ्या डिपारमेंटला करण्यात आली. हे ट्रान्सफरच कळाल्यापासून रोज ती रडत होती (आणि आता ती मला रडवते तीच सगळं रडणं तिने माझ्याकडे पूर्णपणे वसूल करून घेतलंय) मग मी तिला रोज समजावुन सांगायचो, एखादी मुलगी माहेरून सासरी पाठवतात तशी ती रडली होती. आम्हालाही दुःख होतं पण पर्याय नव्हता कारण आता तिचं भविष्यात चांगलं होणार होतं. आता दुसऱ्या डिपार्टमेंटला गेल्यामुळे तिचं भेटणं कमी झालं होतं मग ती सकाळी दहा वाजता लँडलाईनवर फोन करायची मग हळूहळू आम्ही Teams वर कनेक्ट झालो सकाळी गुड मॉर्निंग व्हायचं आणि त्यानंतर थोडाफार चॅटिंग. मग मी एका संध्याकाळी लँडलाईनवरून तिच्या मोबाईलवर फोन लावला आणि आम्हाला कनेक्शनचे नवीन साधन मिळाले. मग रोज संध्याकाळी ती कंपनीतून निघून तिच्या आकुर्डीतील क्लासला पोहचेपर्यंत वीस मिनिटं तरी आमचं बोलण व्हायच. तिला गाण्याची भारी आवड, आवड कसली ती दर्दीच आहे म्हणा... तिच्याकडे हिंदी, मराठी, इंग्लिश, तामिळ सर्व गाण्यांचा खूप मोठा संग्रह आहे. ती रोज मला एकतरी गाण सांगायची मग ते spotify वर लाईक करून कसे सेव करायचे हे तिने मला शिकवले. मग ती पण माझ्याकडून एखादं गाणं मागायची हा आता आमचा रोजचा नियम झाला होता. मग मी तिच्यासाठी आधीच गाणी ऐकून त्याची लिस्ट करून ठेवायचो जेणेकरून संध्याकाळच्या बोलण्याच्या लिमिटेड वेळेत गाणे शोधण्यासाठी वेळ वाया जाऊ नये, पण तिचं काम भारी होतं, गाणी तिच्या डोक्यातच असतं...तिला गाणी शोधायची गरज पडायची नाही. मग बोलता बोलता आम्ही एकमेकांना सांगितलेलं गाणं spotify वर like करून ठेवायचो,अशा प्रकारे तिने पाठवलेल्या गाण्यांचा संग्रह वाढत गेला तो साधारणपणे आता 130 गाण्यांचा झाला आहे. हा संग्रह असंख्य पर्यंत जावा म्हणजे पुढील आयुष्य ही तिची गाणी ऐकण्यात व तिच्या आठवणीत व्यतीत व्हावा हीच इच्छा कारण या तिच्या प्रत्येक गाण्यांत मी तिला feel करत असतो आणि शेवटपर्यंत करत राहील. मी पाठवलेल्या गाण्यांपेक्षा तिने पाठवली गाणी कित्येक पटीने सरस असतं. मला वाटतं की एकमेकांच्या भावना या गाण्यातून आम्ही एकमेकांना पोहोचवायचो, माझ्या भावना बराच वेळ शायरीतून प्रकट व्हायच्या पण तिच्या भावना या गाण्यातुनच कळायच्या. तिने पाठवलेली कित्येक गाणी मी पूर्वी ऐकली होती पण तिने पाठवल्यानंतर ती गाणी ऐकल्यानंतर एक वेगळाच मंजर तयार व्हायचा, ती गाणी तिच्या मनातून येत आहेत, तिच्या भावना प्रकट करत आहेत असं मला वाटायचं. या संध्याकाळच्या संभाषणासाठी आम्ही दोघेही अधिर असायचो, मला तर कधी संध्याकाळ होते आणि तिचा फोन येतोय असं वाटायचे. ती नवीन डिपार्टमेंटला असल्यामुळे तिला खूप कमी वेळ मिळायचा, तिची अवस्था सासरी पाठवलेल्या मुलीसारखी झाली होती. माहेरची आठवण येत होती पण भेटायला येता यायचं नाही, सासरी परफॉर्मन्स दाखवणे भागच, नवीन नवीन गोष्टी शिकणे, त्यासाठी वेळ देणं भाग होतं. मी कायम तिचा इंतजार करत असायचो आणि त्यावर शायरी करत राहायचो.. 

 

"हम मिलते कम, पर दुरीयां ही जादा रहती है। 

ये दोस्ती है सरकारी नौकरी... 

जिसमे काम कम, पर छुट्टीयां जादा रहती है। 😄"

 

"आदत लगाकर अपनी, खूद गायब हो जाते हो,

 एक दीदार के लिए बहुत बेकरार करते हो, 

पर मिलते ही एक ही नजर में घायल करते हो, 

ऐ यार..!युहीं रोज़ हमारा कत्लेआम करते हो..!" 

 

"आप आये तो बहार आई थी, 

जी भर के देख लेते तब तक़ तो ..!

 बहार बाहर हो गयी थी। "

 मी फक्त ऑफिस टाईम मध्ये what's app वर कनेक्ट व्हायचो व जाताना मी सगळे डिलीट करून परत तिला ब्लॉक करायचो. नंतर टेलिग्राम ॲप डाऊनलोड करून घेतला आणि तिथे आम्ही कनेक्ट होऊ लागलो, ऑफिस टाईम नंतर आम्ही टेलिग्राम वर कनेक्ट व्हायचो पण तिथले चॅटिंग फार थोड्या वेळाचे असायचे पण नाही पेक्षा बरे...कुठेतरी कनेक्ट होतो. आम्हाला दिवसभर वेळ मिळायचा नाही त्यामुळे कधी पेट्रोल भरायला कार आणली तर तिला मेसेज करायचो आज गाडी आणली आहे. एक दोन आठवड्यात एखाद्या वेळेस हे व्हायच. गाडीत बसून गप्पा मारणे व गाणी ऐकने ही आम्हाला पर्वणी असायची. बाहेर पाऊस पडत असायचा आणि आम्ही गाडीत रोमँटिक गाणी ऐकायचो, स्वर्गीय सुख ते हेच का असं आम्हाला वाटायच. गप्पा मारताना शब्दांना काही अर्थच नसायचा... काय बोलतोय दोघांनाही माहीत नसायचं, जनरल गप्पाच असायच्या. फक्त आपण एकमेकांशी बोलतोय हाच आनंद असायचा. शब्दातुन व डोळ्यातून एकमेकांच्या भावना पूर्ण सांगता येत नसतं म्हणून मी एक दिवशी गाडीत तिचा हात हातात मागितला आणि तो तिने चटकन दिला पण...स्पर्श हा एकमेकांच्या भावना समजण्याचे सर्वात प्रबळ साधन, या मागे माझा फक्त हाच हेतु होता...दुसरे बाकी काही नाही. मी प्रथमच एखाद्या मैत्रिणीचा हात हातात घेतला होता. आम्ही हातात हात घेऊन एकमेकांना feel करत होतो, वेळ पुढे सरकत होता तरी आमची हात सोडायची इच्छा होत नव्हती, खूप Romanic pal होता तो...! 

"हातों मे आ गया जो कल हात आप का.. 

दिल को बडा़ सुकुन दे गया पल दो पल का, 

सुकून के साथ एक मिठीसी चुभन दे गया प्यार आप का..! 

अब तो...!

हातो से निकलकर मेरे जेह़न में उतर गया प्यार आप का..!"

आमच्या पावसाळ्यातल्या गाडीतल्या भेटी काही औरच झाल्या, त्या आठवणीने आजही अंगावर रोमांच येतात. संध्याकाळची वेळ असायची - बाहर शाम का सेहमा मंजर, गाडीमे सेहमे हम दोनो...आकाशात ढग आणि आमच्या मनात भावना दाटलेल्या असायच्या आणि गाडीच्या काचेवरून ओघळणारे पाणी जसे आमच्या भावनांचा flow असायचा. बाहेर पावसात सगळं चिंब भिजलेले असायचं...आम्ही गाडीत कोरडे पण आमची मनं भावनीक आनंदाने चिंब भिजायची, अगदी एकमेकांपासून अंतर ठेवून सुद्धा आम्ही एकमेकांच्या प्रेमात भिजवायचो. या अशा आमच्या किती भेटी झाल्या याची मोजदाद नाही. या भेटीच आम्हाला लाख मोलाचा आनंद देऊन गेल्या. त्या आठवणीने आजसुध्दा रोमांचित व्हायला होते. 

"मिलते है जब तो एक अजीब सी कश़िश दिल मे रहती है।

जैसे बादल मे खोकर चांद एक हो जाते है। 

वैसे तो मै तुझमे और तुम मुझमे खो जाते है। 

फिर मै न मै और तुम न तुम रह पाते है। 

बस एक दुजे के हो जाते है। ❤ "

पण यात आम्ही कधीच कुठल्याही सीमा ओलांडल्या नाहीत. आमच्यातला एक सिटच अंतर हे कायम ठेवलं होतं. मी एकदा सहजच तिला तिच्या गालाला हात लावला तेव्हा ती म्हणाली 'प्रथमच कुणीतरी त्रयस्थ माणसाने माझ्या गालाला हात लावाला आहे, मला गालाला हात लावलेला आवडत नाही' पण तिने माझा स्पर्श स्विकारला आणि माझ्या आग्रहाखात तिने माझ्या गालाला पण हात लावला होता आणि नंतरच्या एका भेटीत मैने उनके हाथों को बडे प्यार से चुमा था। 

हा एवढाच या तो आमचा भावनिक स्पर्श...! 

"शाम का रंगीन समा था।

दोनों के दीलों मे प्यार का जुनून था। 

आपके इजा़जत से ही आप का हात थामा था। 

और तो और जरासा बेसब्री का आलम भी था। 

जो हमसे गुस्ता़खी करवा रहा था। 

इसलिये बेइजा़जत हमने आपका हात चुमा था। 

गुस्ता़खी माफ हो हुजुर ...!"

 पण एवढ लिहुनसुध्दा मी आमच्या भावना येथे पूर्णपणे प्रकट करू शकलो नाहीये. हे खरंच आहे की शब्द हे भावना प्रकट करण्याचे सगळ्यात तोकडे साधन आहे. भावना या फक्त अनुभवायच्याच असतात आणि ज्या आम्ही अनुभवल्या त्या कायम आमच्या आठवणीत राहणार आहेत. हमारी कुछ ख्वाईशे है बाकी… शायद ये न कभी पुरी होगी...! 

गाडीतल्या एका भेटीनंतर माझ्या मनातल्या विचारांवर मी ही शायरी बनवली होती..!

सोचा था कल...मिटाएगें कुछ दुरियां... 

ये दो सिट मे का दरियां...है जो हमारे दरमीयां... 

तो पिछे के सिट पर साथ बैठकर करेंगे बतीयां..! 

पर मिलते ही आपसे दिल मे फुटी एैसी फुलझडीयां... 

मिले जैसे के बीत गयी हो कई सदियां...! 

फिर याद ही न रहा की मिटानी है अपने में की कुछ दुरियां..

खो गये बातों मे इस कदर के बीत गई घडीयां...! 

ए खुदा संभालेना, मुझसे हो न जाये कुछ गुस्ताखियां.. 

इजहारे प्यार बया़ करने आप करती हो बडी़ चालाखियां..! 

 शायद आपके जज़्बात बता रही थी आपकी अंखीयां.. 

 पर पढ़ते तब तक ढल गयी शाम और हो गयी अँधेरीया...! 

या आमच्या छान आठवणींवर तर आम्ही जगतोय. अशीच गाणी पाठवत असताना तिने "आ गले लग जा" हे गाणं पाठवलं होतं, ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी आम्ही एकदा गाडीतल्या भेटीत ...हम गले मिले थे..ते पण एक सीटच अंतर ठेवून. मागील महिन्यात असंच आभाळ भरुन आलं आणि बाहेर पाऊस पडायला लागला तर तिने मला मेसेज केला 'बाहेर पाऊस पडतोय' बहुदा तिला ते पावसातले दिवस आठवले असावेत मग मी लगेच एक शायरी बनवून पाठवली...! 

"कुछ मिठी सी ठंडक आज आ गई है इन हवाओं मे.. 

शायद मौसम के दिल को भी मिली है राहत किसी के आने से..!"

"इंतजार की बेकरारी तो जमीन को रहती है। 

वरना बारिश को तो पता होता है के वो कब बरसने वाली है।" 

आमचे संध्याकाळी गाडीत गप्पा मारत बसणे हे दिव्य काम असायचं कारण कोणीही आम्हाला पाहू नये या गोष्टीची आम्ही खूप काळजी घ्यायचो आणि त्यामुळेच आम्ही ही गोष्ट सिक्रेट ठेवू शकलोय. आम्हाला यात कोणीच पकडू शकले नाही, ही गोष्ट फक्त आमच्या दोघांच्यातच आहे. एकमेकाला शोधण्यात आमची तारांबळ व्हायची, ती तिच्या डिपार्टमेंटमधून निघायची, थोडा वेळ व्हायचा....तर कधी कोणी त्या लोकेशनला असेल तर परत दुसर्या लोकेशनला गाडी न्हायचो भारीच मजा....त्यावेळेस आम्ही मोबाईलवर फोन करत नव्हतो त्यामुळे थोडा वेळ जायचा शोधायला पण ठीक आहे कुठेतर भेटायचो. यात गाडीतलाच एक किस्सा आहे, पावसाळ्याच्या दिवसात मी शक्यतो जमेल तसं कार आणायचो मग आम्ही गाडीत बसून गप्पा मारायचो हे मी आधीच सांगितलं आहे. यात असं व्हायचं की ती पलीकडच्या सीटवर बसायची व तिच्या ओल्या पायांचे मॅटिंगवर इम्प्रेशन व्हायचे, माझ्याबरोबर गाडीत कुणी बसले आहे याचा पुरावा राहू नये म्हणून ती उतरल्यानंतर तिच्या पाऊलखुणा फडक्याने पुसायचो, हे मी तिला सांगातले की तुझे पाय मला पुसावे लागत आहेत. तेव्हा ती म्हणाली बघा प्रेमात हे सुद्धा करावे लागते. मागील एक किस्सा सांगायचा राहिलाच. तिची डिपार्टमेंटला ट्रान्सफर होण्यादरम्यानचा...ती माझ्याबरोबर काम करते याचा आमच्या सौ ना टेन्शन होतच. पण मी खाली डिपार्टमेंटला बसायला आलोय हे मी तिला सांगितलं नव्हतं नाहीतर ते अजून वाढले असते.दर गुरुवारी आम्ही दोघे स्वामींच्या मंदिरात जायचो,मी ऑफिसमधुन डायरेक्ट मंदिरात पोहोचायचो आणि सौ घरून मंदिरात यायच्या. साधारण संध्याकाळी ६.३०वाजता चा टाईम आमचा फिक्स होता. आमच्याकडील एक रिटायर कामगार निंबाळकर हे त्या दिवशी मंदिरात दिसले. आजपर्यंत ते कधीच मला त्या मंदिरात दिसले नव्हते. आम्ही दर्शन घेऊन बसलो होतो तेवढ्यात ते मला बघून माझ्या जवळ आले आणि डायरेक्ट दीपीकाचे नाव घेऊन म्हणाले 'ती सांगत होती की तुमच्या एवढे सात्विक साहेब कधीच बघितले नाहीत'.आता आमच्या सौ नी माझी तारीफ ऐकली ओके पण हे दीपीका सांगते ऐकून वेगळेच वाटले की तुम्ही तर तिच्याशी संबंध तोडले आहेत मग आता हे नवीन काय...! मी त्यांना बरं म्हटलं आणि विषय तिथे संपवला. आमच्या दोघांच्या वेगवेगळ्या गाड्या होत्या,आम्ही आमच्या गाड्यावर बसलो तर हे निंबाळकर मागून परत आले आणि मोठ्याने म्हणले 'तुम्ही दीपीकाचे ट्रान्सफरचे काम केले ते खूप भारी झालं खरच तुमच्यासारखा साहेब नाही असं ती सारख म्हणते'.आमच्या सौ नी ते ऐकलं आणि तिथेच परत वादंग झाला की 'हे काय नवीन आता तुम्ही तिला काढणार होते ना...मग का नाही काढले?' तिला सगळं समजून सांगितलं की तिचे ट्रान्सफरचे काम चालूच आहे पण हे पुढच्या आठवड्यात होणार आहे ते झाल्यानंतर तुला सांगणार होतो. पण ती मला म्हणाली तुम्ही तिला काढू शकत होते तरी दुसऱ्या डिपार्टमेंटला का ट्रान्सफर केले. माझं म्हणणं होतं की एखाद्याचं चांगलं करावं वाईट करु नये. आपण स्वामींच्या मंदिरात आहोत आणि ती पण स्वामींची भक्त आहे. सौ म्हटल्या तुमचा तिच्याबद्दलचा सॉफ्ट काॅर्नर अजुन काही जात नाही, पण असो स्वामीच बघतील काय ते...! पण ते ठीक झाले, तिची दुसऱ्या डिपार्टमेंटला ट्रान्सफर होणार हे कळाल्यामुळे सौ च एक तरी टेन्शन कमी झालं होतं की ती माझ्या संपर्कात जास्त राहणार नाही. यानंतर कधी पण मंदिरात येताना चेष्टेने आमच्या सौ म्हणायच्या आज निंबाळकर आहेत का? नाही तर मी येत नाही. पण खरंच त्यानंतर आजपर्यंत निंबाळकर कधीच त्या मंदिरात दिसले नाहीत. मग मी मैत्रीणीला विचारलं ह्या निंबाळकरची तुझी कुठली ओळख, ती म्हणाली अशीच झाली. तिच्या ओळखीला काही लिमिटच नाही. इतक्या कमी वेळात कंपनीमध्ये तिच्या एवढ्या ओळखी झाल्या आहेत की विचारता सोय नाही. एक वेळ कंपनीत मी एवढा जुना असून मला कमी लोक ओळखत असतील पण त्याच्यापेक्षा जास्त हिला ओळखतात याला कारण म्हणजे तिचा चांगला स्वभाव. तरी असो पुढे... इथपर्यंत आमच्या मैत्रीचा पहिला फेज होता. यामध्ये एकमेकांना जज करणे,एकमेकांचे गुण-अवगुण समजून घेणे, एकमेकांची आवड- नावड जोपासने. यात खुप चॅटिंग चालायचं, सारखं एकमेकाशी कनेक्ट असने महत्त्वाचं वाटायचं, प्रत्येक मेसेजला उत्तर दिलं गेलं पाहिजे, नवीन नवीन काही पाठवले पाहीजे असे मनात असायचे. या दिवसांत असं झालं की ती रूमवर एकटीच होती म्हणजे एक मैत्रीण होती पण ऑफिसमधुन गेल्यानंतर सुद्धा तिला बराच वेळ रिकामा होता त्यामुळे खुप चॅटिंग चालायचं. आम्ही एकमेकानां भरपूर वेळ द्यायचो म्हणजे तिचा एकटेपणा ती माझ्याबरोबर कनेक्ट राहुन कमी करायची. आमच्या दोघांचे स्वभाव अगदी मिळते होते की आम्हाला जास्त कोणाच्या बरोबर जुळायला आवडायचं नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं असं असायचं. बहुदा त्यामुळेच आमच्या दोघांचे चांगले जमायचं. माझी शायरी पाहून किंवा माझं पूर्वीचे लिखाण बघून ती ही प्रेरित झाली आणि मी सांगितल्यानंतर तिने सुद्धा मनातील भावना कागदावर उतरवायला सुरुवात केली होती. एक-दोन लेख तिने चांगले लिहिले होते पण हे नंतर पूर्णपणे बंद झाले. तेव्हा कधी मधी काही शायरी कॉपी करून मला पाठवत राहायची म्हणजे आम्ही खूप कनेक्ट होतो अगदी शंभर टक्के. नंतर पुढील काळात तिची मावशी तिच्या बरोबर राहायला आली त्यानंतर हे कनेक्शन थोडं कमी होत गेलं आणि नंतर तिची लहान बहीण ऋतिका आल्यानंतर ते खूपच कमी झाले. आता तर लिखाण शून्य झालंय तसचं शायरी पाठवणे पूर्णपणे बंद झालंय. साधारण गेले वर्षभराच्या काळामध्ये आम्ही एकत्र आल्यापासून तिच्यामध्ये खुप बदल घडत गेले..ते पुढे येईलच, यासाठी पूर्णपणे ती जबाबदार नाही तर मी म्हणेन याला मी पण तेवढाच जबाबदार आहे. कारण आम्हाला सोशल मीडियावर कुठेच कनेक्ट होता येत नव्हते, फक्त कंपनीच्या वेळेमध्ये लँडलाईन वर बोलणे, व्हाट्सअप कंपनीच्या वेळेतच वापरणे, ऑफिस टाईम नंतर जमलं तर टेलिग्राम वापरणे पण त्यासाठी तिला स्पेशली टेलिग्राम वर लॉगिन करावे लागायचे आणि वेगळा वेळ काढावा लागायचा तो साधारणता तिला शक्य होत नसायचा. माझ्याशी कनेक्ट करायला खूप प्रतिबंध असल्यामुळे तिने ते कमी केल असेल असं मला वाटतं आणि यात तिची काहीच चूक नाही. कधी कामानिमीत्ताने किंवा कधी मुद्दामच ती माझ्या जागेवर येयची व माझ्या बाजुच्या स्टुलावर बसायची आणि मला म्हणायची 'ही माझी जागा आहे'.आम्ही कधी एकमेकाच्या परफ्युमची तारीफ करायचो, एकमेकांच्या छान दिसण्यावर सुद्धा बोलायचो. नवीन कुठला परफ्युम वापरता येईल, तिने एखादी लाईट कलरची कोणती लिपस्टिक वापरावी हे सजेस्ट करायचो. ती पण कधी सांगायची की आज सकाळी आवरताना लाल हेअर बँड लावताना सारखी तुमचीच आठवण येत होती.आमच्या घराच्या बागेत खाऊच्या पानाचा वेल आहे त्याची पानं मी ऑफिसमध्ये घेऊन यायचो आणि दुपारी जेवण झाल्यावर पानं खायचो. तिला विचारलं एकदा की पानं खाणार का..तर ती हो म्ह़़णाली मग मी तिला पानं बनवून द्यायचो आणि ती पण पान खाण्यासाठी आठवणीने यायची, कधी दुपारी नाही आली तर संध्याकाळी आमच्या गाडीतल्या भेटीत मी तिला बनवलेले पान घेऊन जायचो. हे असं छान खेळीमेळीचे वातावरण आमच्यात होते. ही मैत्रीतली पहिली उकळी होती, जसं दूध तापवताना पहिले उकळी खूप मोठी असते आणि ती खुप जलद येते. पण या उकळीत दूध ओसंडून द्यायचं नसतं नाहीतर तेच ओसंडणारे दूध त्याला उकळणाऱ्या अग्नीला विझवते.असंच हे मैत्रीचं दूध विश्वासाच्या अग्नीवर उकळतं असते पण जर एखादी गैरसमजाची उकळी आली तर मैत्रीचं दूध ओसंडून या विश्वासाच्या अग्नीला विझवते. माझ्या पहिल्या मैत्रिणीच्या मैत्रीत पहिल्या गैरसमजाच्या उकळीतच साधारण तीन महिन्यातच आमची मैत्री संपुष्टात आली होती. पण देवाचे उपकार किंवा आमच्या या मैत्रिणीचा समजूतदारपणा असेल की ही आमची मैत्री अजुन टिकून राहिली. कारण या दोन्ही मैत्रीणीमध्ये मी constant आहे, बदलली ती मैत्रीण...तसेच माझा स्वभाव तोच आहे पण मला समजून घेणारी मैत्रीण दुसरी आहे की जिने मला या सात आठ महिन्यात खूप समजून घेतलं. एक प्रसंग सांगतो...तिने पाठवलेल्या एका गाण्यांमध्ये खांद्यावर डोकं ठेवून काही दुःख किंवा सुख शेअर करण्याबद्दलचा काहीतरी संदर्भ होता. तेव्हा मी तिला चेष्टेने म्हणालो की तू माझ्या खांद्यापर्यंत तरी पोहोचतेस का...! यावर एक दिवस संध्याकाळी डिपार्टमेंटमधुन गप्पा मारून निघताना माझ्या बाजूला उभा राहून मला सांगते...बघा मी तुमच्या खांद्याच्या वरपर्यंत पोहोचते. पण मी तिला काय सांगू की माझा खांद्यापर्यंत जाऊ दे... तु माझ्या हृदयात तर कधीच पोहोचली आहेस. बऱ्याच वेळेला डिपार्टमेंट मधून गप्पा मारून निघताना आम्हाला उशीर व्हायचा मग निघताना माझी धांदल उडायची आणि कधी माझं पाकिट तर कधी चष्मा डॉवर मध्ये राहायचं, हे तिला कळाल्यानंतर जेव्हा कधी आम्ही गप्पा मारून निघायचो तेव्हा ती मला आठवण करून द्यायची की सगळं घेतलय ना...! मी तिला हो म्हणायचं पण तिला काय सांगू की माझं हृदय तिच्याजवळच राहिलेलं असायच. हे तिला मला सांगता येत नव्हते पण तिला ते कळत असावं. मी बोलताना समोच्याचे काही चुकले तर Hopless म्हणायचो, ही माझी जुनी सवय पण तिला ते आवडायचं नाही म्हणून ती मला म्हणाली हा शब्द फक्त वापरूत जाऊ नका. तेव्हा तिच्या आग्रहाखातर मी Hopless म्हणायचं सोडून दिले. तिला पण एक वाईट सवय होती की तिला काही खायला द्या चॉकलेट किंवा काही दिले तर आठवडाभर तरी जपून ठेवायची खायची नाही किंवा कधी गिफ्ट दिले तर त्याचा feedback नाही, दिलेली गोष्ट छान - वाईट no feedback ( वाढदिवसाच्या गिफ्ट चा लगेच feedback दिला होता) ठीक आहे जशी आहे तशी, या अशा छान आठवणी आहेत आमच्या दोघांच्या, आता यापुढे मैत्रीतला दुसरा फेज चालू होतोय. 

तिला आता नवीन ग्रुप मिळाल्यामुळे, नवीन मित्र-मैत्रिणी जोडल्या गेल्या तसेच तिथे तिचा कामाचा लोड पण भरपूर असल्यामुळे तिला वेळ कमी मिळायचा. मग पुढे संभाषण हळूहळू थोडं कमी होऊ लागलं होतं कारण डिझाईन डिपार्टमेंटची बसण्याची व्यवस्थाच अशी होती की सगळे आजूबाजूला, फोनवर बोललं तरी एकमेकाला ऐकू जायचे, मोबाईलवर जे काय करतो ते दुसऱ्याला दिसायचं, कुठेच प्रायव्हसी नव्हती. त्यातूनही ती जमेल तसं कनेक्ट व्हायचा प्रयत्न करायची पण खूपच कमी, आमचे कनेक्शन जवळपास निम्म्यावर आले होते. याला काहीच पर्याय नव्हता, माझा इंतजार हा आता रोजचाच झाला होता. ते मला खूप feel व्हायचं आणि मी विचार करायचो की तिला खरंच वेळ नाही का..! आता आपली तिला गरज राहिली नाही त्यामुळे ती पूर्वीसारखी माझ्याशी कनेक्ट नाही व आता आपल्यापासून दूर चालली आहे का.... "उसको पाने की ख्वाईश तो नही थी, पर उसको खोने का डर जरुर था। " ह्याचं मला दुःख व्हायचं मग याबद्दल मी तिला एकदा स्पष्ट विचारलं पण तेव्हा ती म्हणाली की खरंच पूर्वीसारखी आता ओढ वाटत नाही. हा काळाचा महिमा, बाकी काय... एखाद्या गोष्टीची ओढ असण्यासाठी दोन गोष्टी पूरक असतात एक म्हणजे गरज आणि दुसरी सहवास. पण आता या दोन्ही गोष्टी आमच्यात राहिल्या नव्हत्या व त्यामुळे हा बदल तिच्यात झाला असावा असे मला वाटले व याचे मला वाईट पण वाटत होते. मी तिला खूप miss करायचो पण तिला तसं वाटत नव्हतं कारण ती कामात असायची आणि माझ्याकडे काम कमी होते. आता नवीन डिपार्टमेंटमधुन तिला १५ दिवसांचे एक ट्रेनिंग करायची संधी मिळाली त्यामुळे ती आता १५ दिवस HR डिपार्टमेंटला बसणार होती. आता हे ट्रेनिंग चालू असताना आम्हाला जास्त बोलता येणार नव्हते, तरी पण मी जमेल तसं तिला फोन करायचो ती पण ट्रेनिंग मधून वेळ काढून माझ्याशी बोलायची पण भेटणं शक्य नव्हते. आम्हाला हा विरह खूप जाणवत होता. मग ती लंच टाईम मध्ये वगैरे मेसेज करायची तर कधी कधी मी ४ वाजता चालत HR बिल्डिंग कडून जायचो व तिला मेसेज करून भेटायला बोलवायचो पण ती कधी आली नाही. एक दिवस फॉरेनची चॉकलेट होते ते घेण्यासाठी मी तिला बोलावलं पण त्यावेळेस ती येऊ शकली नाही तर मी HR समोरील गार्डनमधील एका Hut च्या टेबल वरती ते ठेवून दिलं आणि त्याचा फोटो तिला व्हाट्सअप केला. ते बघुन ती लगेच खाली आली पण मी तो पर्यंत मी निघून गेलो होतो. पण अशा पद्धतीने चॉकलेट दिल्यामुळे ती खूप खुश झाली होती. त्यानंतर एक दोन वेळा मी दुपारी कार मध्ये पेट्रोल भरायला गेल्यानंतर आमच्या संध्याकाळच्या भेटीच्या जागेवर कार लावून तिला तो फोटो पाठवायचो जेणेकरून आमच्या जुन्या आठवणी पल्लवीत होतील. ती म्हणायची या तुमच्या अशा childish वागण्याचे खूप छान वाटतं, जसे आपण एखाद्या अफेअर कपलसारखं वागतोय...अफेअर नसताना सुद्धा. आम्ही जमेल तसं एकमेकांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचो. एक दिवस तिने जेवण झाल्यानंतर कॅन्टीनच्या आसपास झाडावरून पडलेल्या फुलाचा हातात घेऊन त्याचा फोटो मला पाठवला होता. त्याच्यावर ही शायरी मी तिला पाठवली, अशा प्रकारे 15 दिवस आम्ही अगदी संपवले. 

 ती आमच्या डिपार्टमेंटला असताना गुरु पौर्णिमेच्या दिवशी तिने सर्वांना पेन गिफ्ट केले व आमच्या पाया पडून ही गुरुदक्षिण आम्हाला दिली होती. त्यावेळेस तिच्याबरोबर पहिला फोटो काढला. नंतर या दिवाळीमध्ये आम्हाला कंपनीमध्ये Civil ड्रेस घालायची परवानगी दिली होती, तेव्हा ती म्हणाली की छान आवरून या उद्या मग आपण एकत्र फोटो काढू. ती छान पंजाबी ड्रेस घालून आवरून आली होती, सकाळी पहिला स्वतःचा फोटो काढून तिने मला पाठवला व माझा फोटो मागीतला. त्याचा Corporate डिपार्टमेंटला flash mob डान्स होता तो बघायला येण्याचा तिचा आग्रह होता. मग मी डिपार्टमेंटमधील सगळ्यांना घेऊन तेथे गेलो त्यामुळे तिला आनंद झाला. तिने छान डान्स केला मग आम्ही दोघांनी प्रथमच फोटो काढायच्या उद्देशाने असा एकत्र फोटो काढला. नंतर डिपार्टमेंटला आल्यानंतर टू व्हीलर वर बसून आम्ही छान फोटो काढले. तो दिवस आमचा एकत्रपणे खूप छान गेला. पूर्वी सुद्धा तिचा असा डान्स कंपनीच्या कॅन्टीनमध्ये होता. त्यावेळेस पण तिने मला आग्रहाने तो बघायसाठी बोलावलं होतं. मी डबा आणतो त्यामुळे कॅन्टीनला जात नाही. मी तिच्यासाठी कॅटिनला गेल्यानंतर मला बघून तिला खूप आनंद झाला. तिचा तो पण डांन्स छान झाला होता. ती HR च्या अशा सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये पूर्णपणे सामील असायची ही तिची एक जमेची बाजू होती आणि त्यामध्ये ती मला पण सामील होण्याचा आग्रह करायची. तिच्या आग्रहामुळेच मी HR च्या UTSAH हॉल मधे जायला लागलो होतो आणि असे सोशल कार्यक्रम अटेंड करत होतो. तिनेच प्रोत्साहीत केल्यानंतर मी HR च्या कवी संमेलनात माझी शायरी पेश केली होती. त्यावेळेस ती ट्रेनिंग मध्येच होती पण माझी शायरी ऐकायला आग्रहाने आली होती. आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या म्हणून त्या दिवशी ती संध्याकाळी घरी जाणार होती मग एक आठवडाभर तरी आमची भेट होणार नव्हती. या विरहाचे आम्हाला दुःख होत होते. मग संध्याकाळी आम्ही HR समोरील बागेतल्या त्या HUT मध्ये बसून गप्पा मारल्या. मी तिच्यासाठी परफ्यूम गिफ्ट आणला होता, तो तिला गिफ्ट दिला, तिचे म्हणणे कशासाठी ही गिफ्ट...मला असं नाही आवडत. माझं म्हणणं होतं की दिवाळीसाठी तुला काहीतरी गिफ्ट द्यावे...तू गुरुदक्षिणा दिली तर हे गिफ्ट माझा आशीर्वाद समज, मग तिने ते घेतलं. त्यात 3 flever होते त्यातला तिच्या आवडीचा एक मी घेतला व बाकी दोन तिला ठेवले. मग बराच वेळ तिथे गप्पा मारल्यानंतर आम्हाला निरोप देताना खूप वाईट वाटत होतं की आता आपण खूप दिवसांनी भेटणार. त्यानंतर मी राजस्थानच्या ट्रिपल जाणार होतो त्या दिवशी सोमवार होता दुसऱ्या दिवसापासून मी रजेवर होतो. तिला त्या दिवसभरात माझ्याशी संपर्क साधता आला नाही, सहा वाजता सुद्धा लँडलाईन वर फोन करता आता नाही. मग मी निघालो… तिला मला Happy journey wish करायचे होते. पण आता मी तर निघालो होतो मग तिला माहित होतं की मी शंकराच्या देवळात असेन म्हणून तिने रिस्क घेऊन Happy journey wish करण्यासाठी माझ्या मोबाईलवर फोन केलाचं, मला शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं फोन किंवा मेसेज करायची रिस्क घेऊ नका...आल्यावर आपण बोलूच, तरीपण मी तिला तिथून एक दोन मेसेज केलेच होते. माझ्यात पण काही कमी किडे नव्हते. तिची ही किती अगतिकता, किती ही आमच्यातली अटॅचमेंट म्हणून मी म्हणतो प्रेम का मैत्री हा फरक मला करायचं नाही. मी नर्सिंगपुरला दत्तयाग करायला गेलो होतो तेव्हा सुद्धा तिच्या हातात बांधाण्यासाठी एक पिवळा गोप आणला होता तिने तो माझ्याकडूनच हातात बांधून घेतला पण नंतर त्याची गाठ सुटली. आम्ही दोघे एकमेकांसाठी सारखे काहीतरी करत असायचो...! 

 

 "दोस्ती और इश्क का फर्क कोई मुझे समझाये तो जरा, 

इन दोनों की सिमायें कोई बताया तो जरा, 

इनके कानुन से मुझे कोई वाकिब तो कराये जरा, 

हम दोनो मे दोस्ती है या इश्क है कोई हमे समजाये तो जरा।.."

तिला मी म्हटलं की राजस्थान वरून तुला काय गिफ्ट आणु तेव्हा तिने हक्काने सांगितलं तुमच्या आवडीचं काही आणा. मग मी आमच्या घरच्यांच्या नकळत तिला एक लाल कलरचा top आणि काही बांगड्या घेतल्या व त्या डायरेक्ट कंपनीच्या पत्त्यावर पार्सल गेल्या कारण बरोबर आणता येणं शक्य नव्हतं. तिचा वाढदिवस 25 नोव्हेंबरला असतो या वर्षी तिने 22 व्या वर्षात पदार्पण केले म्हणजे ती मोठी झाली असं ती नंतर मला म्हणाली होती. त्या दिवशी तिने आम्हासगळ्या कंपनीतल्या ग्रुपला पार्टी दिली होती. मी राजस्थानवरुन आणलेले गिफ्ट तिला त्या दिवशी दिले तसेच आमच्या ग्रुप कडून तिला एक गिफ्ट द्यायचं होतं, ते पण मी स्वतः दुपारी जाऊन घेऊन आलो होतो. मी एवढं आजपर्यंत कोणासाठीच केलं नव्हतं पण तिच्यासाठी हे का करत होतो मला नाही माहीत ...! एक जर्किन घेतले होते पण त्याचा कलर तिला आवडला नव्हता. त्यामुळे तिने नंतर ते बदलून आणले. या पार्टीत तिची लहान बहिण पण आली होती तिला पण मी वेगळं गिफ्ट आणलं होतं. हॉटेलमध्ये सगळ्यांच्यात गिफ्ट देताना आम्ही गिफ्टच्या खाली एकमेकांचा हाताला हात लावला होता. खूप दिवसांनी आमचा एकमेकांना स्पर्श झाला होता, असा चोरुन स्पर्श करण्याची मजा पण काही वेगळीच असते. पार्टी झाल्यानंतर तिने मेसेज केला की आम्हाला दोघीनांही तुम्ही दिलेलं गिफ्ट आवडलं ते आम्ही वापरु.यापुढे साधारण मागील दीड महिन्याच्या कालावधीत म्हणजे वाढदिवस झाला की आमच्यातले संवाद कमी कमी होऊ लागले. तिचे मेसेज पण येत नव्हते, मी जरी मेसेज केला तरी एक दोन तासाने तो बघितला जाईचा, रिप्लाय yes,no, hmm ती काही वेगळ लिहित बसायची नाही. कधी फोन केला तरी तिला बोलायला वेळ नसायचा,आता पण नसतोच, 'मी नंतर कॉल करते' हे ठरलेले उत्तर असायचं. पण परत कॉल काही येयचा नाही, तो येयचा डायरेक्ट संध्याकाळी, तिचं म्हणणं की आपण संध्याकाळी बोलणारच आहोत तर असे मधे कशाला बोलत बसायचं आणि पुर्वी सारखे बोलण्यात विशेष काही नसायचं. यात तिची ही काही चूक नव्हती कारण मी रिकामा असायचो आणि ती कामात,पण मला हे कळत...जिथे इच्छा तिथे मार्ग...पण आता इच्छाच जर कमी झाली असेल तर मार्ग कुठून सापडणार...! त्याबद्दल मी तिला एक शायरी पाठवली होती. तेव्हा ती म्हणायची मला पण भेटावसं वाटतं पण वेळ मिळत नाही. तुम्ही मला एवढा वेळ देता पण मला तुम्हाला वेळ देता येत नाही त्याबद्दल sorry...! 

"जरुरत, फुर्सत इन दोनों का है ये फसा़ना...! 

बडी फुर्सतसे होती है दोस्ती, प्यार, इश्क मोहब्बत...

फिर चाहे कितना भी रोक लगाये जमाना... 

पर जब दिल मे न रहे वो लगन, 

तब वही फुर्सत....बन जाती है एक बहाना...! 

जरूरत और फुर्सत को कभी अलग नही देखना, 

इन दोनों को हमेशा हात मे हात मिलाकर होता है चलना, 

जरुरत होने तक आसान होता है फुर्सत को निकालना,

पर जरुरत निकलजाने पर फुर्सत का मुश्किल होता है मिलना, 

ये मौसम बदलते है,तो ताय्जुब नही इंन्सान का दिल बदलना, 

दौर ए दोस्ती की शुरवात मे शायरी पढ़ना और भेजना,

लिखी हुई शायरी के लिए बेचैन रहना और उसी शायरी के साथ सुबह उठना और रात को सोना, 

शायरी के लिये बेकरार रहना और शायरी न भेजने पर रोना, सुबह होते ही बेकरारी से फोन करना और दिन मे एक दो बार तो हालचाल पूछना,

बस एक दिदार के लिये किसी बहानेसे मिलने चले आना, 

शायर की शायरी से जुड़कर खुद भी अपने दिल के ज्ज़बात कागज पर उतारना, 

पर जैसे दिन गुजरते ही वो तड़प, बेकरारी कम हो जाना, 

जुडे है इतना बताने के लिये सिर्फ गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेज तक ही सिमीत रेहना, 

ये नई जग़ह या नये लोगों अस़र है नही पता, पर तय है सुबह के उगते सुरज का शाम को ढ़लना, 

उनके प्यार पर हमे है भरोसा,पर उन्हे भी दिक्कत मे डाल रहा होगा नये काम का उन पर यु हावी हो जाना, 

उनकी इस नजरअंदाजगी से मुश्किल हो रहा है जिना, 

दिनभर मुलाकात हो न हो पर आज भी कायम है उनका शाम को बेसबरी से फोन करके ढेर सारी बाते करना, 

और हमे भी अच्छा लगता है उनके उस फोन का बेसबरी से यु इंतजार करना, 

पर दुनिया का दस्तुर है, सब ( प्यार, समय, फुर्सत) देकर देनेवाले की हथेलियोंका यु खाली रहना....! "

मागील एक दीड दीड महिन्यात माझ्या मनाची अवस्था अशी होती. माझं विश्व खूपच छोट, खूपच लिमिटेड त्यात तिला तशी खूप मोठी जागा मिळाली होती. पण माझ्यापेक्षा तिचं जग बरचं मोठं होतं, खूप मित्र-मैत्रिणी,घरचे एकत्र कुटुंब त्या त्यामुळे खूप लोकांचा संपर्क, आता नवीन डिपार्टमेंट तेथील सगळी लोकं, नवीन काम या सगळ्यांच्या आता माझ्यासाठी तिच्याकडे फारच कमी जागा आणि कमी वेळ शिल्लक होता. 

 तिने तिच्या आधारासाठी लावलेले हे आमच्या मैत्रीचे झाड सुरुवातीला तिने खूप काळजीने जपले. रोज सारखे संवादाचे आणि संपर्काचे खतपाणी घालून त्याला तिनेच वाढवले. आता ते झाड मोठे झाले तेव्हा त्याला रोज एवढ्या खतपाण्याची गरज नाही हे ओळखून ते तिनेच कमी केले. आता रोज सकाळी एक गुड मॉर्निंग मेसेजचे दोन थेंब व संध्याकाळी जमलेच तर क्लासला जाता जाता संवादाच्या हवे वर हे झाड ती जिवंत ठेवत आहे. मला तिने आधीच जिंकून घेतले होते. त्यामुळे आता मला स्पेसिफिक रोज वेगळा वेळ देण्याची गरज नव्हती. नाहीतर पुर्वी सकाळपासून एक-दोन मेसेज,दुपारी "जेवले का" मेसेज,बाकी मधेच "काय करताय" अशी विचारपूस असायची, काहीतरी चॅटिंग व्हायचं पण ते सर्व आता शून्य झाला आहे. शायद वक्त का तकाजा यही है। 

"इंतेहा तो रोज होती है इंतजार की, 

कुछ भी तो खबर नही आती है वस्ल-ए-यार की, 

बेकरारी रहती है उनके दिदार की, 

बस़ उन्हे ही पता होती है घडी़ हमारे मिलने की, 

हम बस अपनी घडी़ मे देखकर राह तकते है शाम होने की, 

पर जब होती है बात उनसे तो खुशी मिलती है जन्नत की, 💕"

 

"क्यु मै तुमसे इतनी मोहब्बत करता हुं? 

 आप मिलने नही आओगे ये पता है, 

फिर भी रोज तेरा इंतजार करता हुं...!"

 नवीन डिपार्टमेंटला गेल्यावर मला भेटाण्यासाठी तिच्या जीवाची तळमळ व्हायची, पण नवीन डिपार्टमेंट असल्यामुळे तिला काही पर्याय नव्हता. मला भेटायची इच्छा पण न मिळणाऱा वेळ व माझी जाणवणारी तडफड या कात्रीत ती अडकली होती, यावर तिला मी ही शायरी पाठवली होती. 

आपके इस बेइंतेहा इश्क से वाक़िफ़ हुं, 

आपके बेपनाह प्यार से वाक़िफ़ हुं

आपकी पहली मोहब्ब़त से भी वाक़िफ़ हुं, 

 आपके दिल के हर जज्बा़त से वाक़िफ़ हुं

आपके उस हर बेकरारी से वाक़िफ़ हुं,

 हमारे लिए धड़क रहे आपके दिल की हर धड़कन से वाक़िफ़ हुं,

आपके नजरों के उन तीरों से वाक़िफ़ हुं, 

आपकी गहरी आँखों से बया हुए उस हर बेजुंबा लफ्ज़ से वाक़िफ़ हुं, 

आपके गुलाब से होठों कि खामोशी से भी वाक़िफ़ हुं,

 आपके बद़न कि भिनी भिनी खुशबू से वाक़िफ़ हुं,

आपकी इबा़दत भरी चाहत से वाक़िफ़ हुं,

आपकी दुरियां रख कर निभाई हुई नजदिकीयों से वाक़िफ़ हुं,

आपके आँखों से निकले उस हर अश्क़ से वाक़िफ़ हुं

 अब तो आपके दिल के जुदाई के दर्द से भी वाक़िफ़ हुं,

आपकी मुस्कुराहट मे दबी उन सभी सिसकियों से वाक़िफ़ हुं,

ऐ मेरे यार..!आपकी सच्ची दोस्ती से मै अच्छी तरह वाक़िफ़ हुं

क्युं के...! तु मुझमे और मै तुझमे समाये हुए हुं, 

 तु न फिक्र कर... मै तो फलक तक तेरे साथ हुं....! 

               मै तो फलक तक तेरे साथ हुं....! 

माझ्या शायरीच्या बदल्यात ती ❤ emoji पाठवायची, मला त्यापासून खूप एनर्जी मिळायची, छान वाटायचं, कधी कधी गुड मॉर्निंग मेसेज बरोबर पण हा ❤ emoji असायचा मग माझा दिवस छान जायचा. मी त्याबद्दल तिला सांगितलं तर ती पण भरभरून ❤ emoji पाठवायची. पण मला कुठलीही गोष्ट मागून घ्यावी लागते शेवट माझं नशीब..! त्यावरची शायरी….

"बस आपके ❤ की हि चाहत है। 

और यही मेरे दिल कि राहत है।" 

 

"पता है आपको भी..!

आपके ❤ का हम पर कुछ अलग ही है खुमार,  

हमेशा ❤ इसे पाने के लिए हमारा दिल रहता है बेकरार, 

इसे ❤ पाकर दिल को आज भी आता है बडा़ करार, 

रोज के Gm मेसेज के साथ साथ रहता ❤ का भी इंतजार, 

पर आजकल बीना ❤ के Gm मेसेज से दिन लगता है बेकार,

फिर 'रामानु' की शायरी से आपका दिल लेते है सँवार,

तो आप भी खुशी से ❤❤ की करते हो बौछार, 

आपका ये ❤ ही मेरी खुशी है, मेरी सांस है और आपसे

बस ❤ की ही आंस है...मेरे यार...! "

 

"आपका ये ❤ ही हमारे बीच जोडे़ रहेगा प्यार...! 

आपके इस ❤❤ का एक अलग ही खुमार है। 

इसकी ख्वाईश ही हमारी शायरी की रफ्तार है। 

इसे पाने के लिये ये दिल हमेशा बेकरार है। 

मिल जाये तो बडा़ सुकुन पर कभी करना पडे इंतजार है। 

एक की बजाय अगर भेजे दो चार, तो फिर जन्नत की सैर है।

 ये 💕❤💓 ही हमारा इंतजार और आपका प्यार है।

कंजूसी न किजीये कभी... 🥰🙂😍😘

इसके आगे तो हमारे लिये दुनियाकी सारी दौलत भी बेकार है।“

आमच्यातली दरी वाढत आहे याला पूरक असणारे एक दोन प्रसंग मधे घडले, ऑक्टोबर महिन्यात ती कंपनीच्या एका ट्रेकला जाऊन आली, तिला छान वाटलं. मग आम्ही दोघांनी एकत्र ट्रेकला जाऊ असं ठरवलं होतं की जेणेकरून आपल्याला थोडा वेळ एकत्र घालवता येईल. नोव्हेंबर मध्ये कंपनीचा एक ट्रेक होता पण तो मुक्कामी होता, तेव्हा मी तिला विचारलं की तू जाणार आहेस का तर ती म्हणाली नाही. पण नंतर तिचं ठरल्यावर सुद्धा तिने मला सांगितलं नाही. मी शनिवार- रविवार तिला मेसेज केले तर काहीच उत्तर नाही, खूप फोन लावले पण फोन उचलला नाही, म्हणून मी सोमवारी आल्यावर तिला विचारले की काय झाले तर ती म्हणाली ट्रेकला गेले,अचानक ठरले. पूर्वी ती प्रत्येक गोष्ट मला विचारायची किंवा सांगायची पण आता तिला माझी एवढी कदर राहिली नव्हती. त्यामुळे माझं मन मला खायला लागलं होतं. मी तिच्या विरहाने बेचैन असायचो आणि शायरीवर शायरी लिहीत बसायचो जसे राखीशी दूर झाल्यानंतर गुलजार शायरी लिहीत होते, मी त्या लायकीचा नाही पण आपलं एक उदाहरण देतो, दुरियों का दर्द बहुत बडा होता है। 

 ....ये क्यु है....! 

तेरी गैरमौजुदगी मे भी तेरी मौजूदगी का ऐह़सास क्यू है। 

तुझे मिलकर भी फिर मिलने की आसं क्यू है। 

तुझे पाने की ख्वा़ईश तो है पर हमेशा खोने का डर क्यू है। 

मेरी दुनिया अलग है, पर इसमे तेरी खास जगह क्यू है। 

तेरी भी तो दुनिया अलग है, पर उसमे मेरा बसेरा क्यू है। 

तू नही आसपास फिर भी तेरे पास होने का ये ऐहसास क्यू है।

तेरी और मेरी राहे अलग पर दोनो की एकही मंझिल क्यू है।

मेरे हर दर्दका मरह़म तु क्यु है और मै तेरे सुकुन कि वज़ह क्यु है। 

तेरे दिल की खुशी मेरे होठों पर क्यु है और मेरे दिल का दर्द तेरे आंखों मे क्यू है।

मेरी हर बात में तेरा ही नाम क्यु है और तेरी खामोशी मे मेरे दिल का शोर क्यु है। 

तेरे दिल मे मेरी धड़कन क्यु है और मेरी सांसो मे बस़ तेरी खुशबू क्यु है। 

मेरे ख्वाबों मे रोज तेरा आना क्यु है। 

तेरी ख्वाईशों मे बस़ मेरी ही आरजु क्यु है। 

मेरे रेत से अरमानों मे तेरी इबादत की नमी क्यु है। 

कभी ना जुदा हो जाये एैसा हम मे राबता क्यु है। 

अपनी इस दोस्ती पर सवाल तो बहोत है, उसपर दोनोंका एक ही जवाब क्यु है। 

मै जमीं तो तू आसमां, फिर भी हम दोनोको फलक पर मिलनेकी तमन्ना क्यु है।

हमारी ढे़र सारी बातों मे ये खामोशी क्यु है। 

हमे एक दुसरे पर इतना ऐतबार क्यु है। 

अपनी इस बेइंतहा चाहत मे इतनी सच्चाई क्यु है। 

पता नही हम दोनों मे इतना याराना क्यु है। 

हम दोनो थे अंजान पर आज एक जान क्यू है।

हम है दो जिस्म, मगर एक जान क्यू है।

या एवढ्या शायरीवर तिचा रिप्लाय शून्य असायचा, ती म्हणायची मला समजत नाही काय उत्तर द्यायचं..! खरच समजत नव्हतं का तिला उत्तर द्यायचं नव्हतं हे काही मला कळालं नाही. पण एवढ आहे ती माझ्यापासून अंतर ठेवूनच होती. मी याबद्दल तिच्याशी बोललो होतो की आपल्यात काय झाले आहे...का? तू माझ्यापासून लांब राहतेस...का.. मला ignore करतेस, ती म्हणाली तसं काही नाही सर तुम्ही खूप विचार करता, आपले संबंध पूर्वीसारखेच आहेत, फक्त आपल्याला वेळ मिळत नाही, तुम्ही हा विचार सोडून द्या. यावर तिला मी शायरी पाठवली होती. ..! 

मै वही हुं...मेरा दिल भी वही है। 

मेरी चाहत वही है... मेरा प्यार वही है। 

मेरा ऐतबार वही है...मेरा इंतजार वही है। 

मेरे जज्बा़त वही है...मेरे ख्वाब वही है। 

मेरै आँखों की नमी वही है...मेरे दिल की धडकन वही है। 

मेरे दिल मे बसी तेरी छबी वही है। 

तुम नही हो पास पर तुम्हे पाने की हसरत वही है। 

शायद ये सही नही है...पर ये दिल मानता ही नही है। 

हमेशा लगता है मुझे, तुम्हारा रुह मेरे पास यही है। 

कैसे कहुं के, आज भी मेरी शायरी वही है। 

क्यु के, मै भी वही हुं...मेरा दिल भी वही है। 

 मी रोज ब्रह्ममुहूर्तावर उठुन नामस्मरण करतो हे तिला कळाले. ती पण स्वामींच्या मंदिरात दर गुरुवारी जात होती तिथे पण तिला नामस्मरणाचं महत्त्व कळालं होतं. तिने पण पहाटे उठून नामस्मरण करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळेस ती पहाटेच मला गुड मॉर्निंग मेसेज करुन ठेवायची परत दिवसभर काही संबंध नको, एकदा सरांना सकाळी मेसेज पाठवला की दिवसभराचं काम झालं. मी त्यांच्याशी अटॅच आहे हे कळण्यासाठी एवढं तिला पुरेसं वाटत होतं. हे नामस्मरण तिने का चालू केलं होतं ते कळालं नाही...मला फॉलो करायसाठी का...ती डिस्टर्ब होती म्हणून मनशांतीसाठी...ती कधी कधी खुप डिस्टर्ब असायची, म्हणायची की कंपनीत येण्याची इच्छा होत नाही. ती पहिल्यासारखी फ्रेश दिसायची नाही, डोक्यावर काहीतरी ओझं असल्यासारखी वाटायची, कृत्रिम हसायची. मला वाटायचं की नवीन डिपार्टमेंटचा कामाचा लोड असेल।...का दुसरा काही भावनीक गुंता होता ते माहित नाही. ती खुलून याबद्दल कधीच माझ्याशी बोलली नाही. मी आजपर्यंत 95% तरी गोष्टी तिच्याशी शेअर केल्या आहेत पण ती माझ्याकडे 50 टक्के च्यावर कधी ओपन झाली नाही. ठीक आहे स्त्री सुलभ स्वभाव असेल किंवा तिला माझ्यावर तेवढा विश्वास नसेल. तिने संध्याकाळी आकुर्डी मध्ये UGचा क्लास लावला होता. ऑफिस सुटल्यानंतर ती दीड तास तिकडे जायची, ऑफिस मध्ये रोज साधारणपणे अर्धा-एक तास तिला थांबावं लागायचं, त्यानंतर क्लासला जायचं मग तिथून घरी, अशी तिची तारेवरची कसरत चालू होती. या सर्व धावपळीत तिचे वजन कमी झाले, दरम्यान ती तीन -चार दिवस आजारी पण पडली होती. मला कधी कधी वाटायचं आमच्या मैत्रीचा तिच्यावर काही दबाव तर नाही ना..! याविषयी बोलण्यासाठी तिला मी एकदिवस खूप आग्रह केला पण ती तयार होईना, दिवसभर छान रोमँटिक शायरी तिला पाठवली, ती म्हणाली आज मूड वेगळाच दिसतोय मग खूप आग्रह केल्यानंतर ती गाडीत गप्पा मारायला येण्यास तयार झाली. पण गाडीत बसतानाच मला म्हणाली की माझी मनस्थिती ठीक नाही तेव्हा माझी इच्छाच नव्हती आज तुम्हाला भेटायची, मला काय होतं हेच कळत नाही, कुणाला सांगितलं तरी कळत नाही, मैत्रिणीला,आईला दोघींना सांगितलं तरी त्या समजून घेत नाहीत. मी            

सर्व ऐकून घेतल्यानंतर तिला एकच सांगितलं की तू तुझ्या मनाला मारतेस आणि दुसऱ्यांचे ऐकतेस

आणि त्याचा त्रास तुला होतोय. तुझ्या मनाला काय पाहिजे हे तू विचारातच नाहीस त्यामुळे एवढेच कर की…तू दुसऱ्यांच कमी ऐक व जास्तीत जास्त स्वतःच्या मनाचं ऐक तुला खूप बरं वाटेल…. तिला हे समजून सांगितल्यावर खुप बरं वाटलं. गाडीतुन उतरून जाताना तिने एवढ्या आनंदाने मला Bye केला की तो आनंदी चेहरा मी आजही विसरू शकत नाही. आपण कुणाचा तरी प्रश्न सोडवू शकलो आणि त्या माणसाला आनंदी करू शकलो याचे मला समाधान त्या दिवशी लाभले. तिने रात्री गेल्यावर खूप दिवसांनी लिखाण केले आणि मेसेज केला 'माझं म्हणणं कुणालाच समजत नव्हतं पण तुम्ही ते समजून घेतलं आणि मला समजून सांगितलं, माझे बरेच प्रॉब्लेम solve झाले, thank you. अशाप्रकारे मी जमेल तेव्हा तिचा भावनिक गुंता सोडवायचो जेणेकरून ती खुश राहावी एवढाच माझा उद्देश असायचा. 

आमच्यात दुरावा पडत चाललाय हे मी जाणत होतो मग माझ्या प्रत्येक प्रार्थनेत ती असायची. रोजच्या नामस्मरणत सुद्धा तिचा पण ध्यास असायचा,काम करताना मनात तिची आठवण ही सततच होती आणि असतेच, का कोण जाणे मी जेवढा तिला विसरायचा प्रयत्न करायचो तेवढी तिची आठवण वाढत होती. दरम्यान मी महानुभाव पंथ,अक्कलकोट, गाणगापूर,अशा ठिकाणी देवाला गेलो तरी देवापुढे हेच साकडं घालायचो की तिची आणि माझी मैत्री कायम असु देत ती माझ्यापासून दूर जाऊ नये व माझ्याशी ती पूर्वीसारखी अटॅच आहे का हे पाहण्यासाठी मी एक दोन ठिकाणी कौल पण लावला...तो कौल पण माझ्या बाजूनेच लागला.

"तुम हो मै हुं और प्रातःकाल जप नाम हो,

फिर आपके Good morning मेसेजसे दिन की शुरुवात हो,

फिर रामानु की शायरी के आलम मे दोपहर हो, 

उस पर आपके ❤❤ की बौछार हो, 

अगर हो नसीब में तो एखाद बार आपसे बात हो, 

पर आपके दीदार का हमेशा इंतजार हो, 

आप भी तो मिलने के लिए बेकरार हो, 

पर ऑफिस के हालत से आप भी मजबूर हो,

आज तो मिल पाये हम, ये दिल की हमेशा फरियाद हो, 

हमारे दिलों की इसी कश्मकश्म मे धीरे धीरे शाम हो, 

आज शाम तो आपसे बात हो ये दिल को आंस हो, 

पर कभी कभी 'मला उशीर होईल' ये आपका मेसेज हो, 

इससे हमारे दिल मे अंधेरा हो, 

पर इस अंधेरे दिल मे आपके गानों से रोशनी हो, 

और इन गानों के साथ ही हमारी रात हो,

फिर घर जाकर सोने से पहेले Goodnight मेसेज हो तो हो, 

इस तरह हम दोनों का एक दुसरे को खुश रखने का प्रयास हो, 

ये है हम दोनो का रिश्ता.....!

मुझे नही लगता दुनिया का इस पर कोई ऐतराज हो....!”

तिकडून आल्यानंतर हे तिला मी सांगितलं पण. त्या दोन दिवसात माझं तिचे काहीच बोलणं झालं नाही. तेव्हा तिचा टेलिग्राम वर मेसेज आला की कुठे आहात? मी सोमवारी येणार नाही हे कळल्यावर ती अजून नाराज झाली. आम्ही दोघे एकमेकांना खूप miss करत होतो. आमची अवस्था अशी होते की 'धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय' या आमच्या परिस्थितीवर तिने एक गाणं मला पाठवल "चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो" खरचं तशी वेळ आता आली होती. त्या दिवशी मी गावावरुन तिला फोन केला तर म्हणाली काही करा पण गुरुवारच्या आधी कामावर या कारण शुक्रवारी कंपनीमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन आहे तेव्हा सिव्हिल ड्रेस मध्ये यायचं आहे, छान आवरून या आपण फोटो काढूयात. ती म्हणाली पिस्ता कलरची थीम ठरली आहे, तसा शर्ट असेल तर घाला. पण ख्रिसमस रेड कलरचा असतो म्हणून मी म्हटलं,मी लाल टी शर्ट घालेन.मग तिने त्यांच्या डिपार्टमेंटला ठरल्यानुसार ड्रेस कोड केला. त्या दिवशी सकाळपासून ती बिझी होती. त्यामुळे पूर्वीसारखा तिने काही स्वतःचा फोटो मला पाठवला नाही पण माझा मागून घेतला. आता ती सासुरवाशीण झाली होती, माहेरच्या लोकांची तिला विशेष काळजी नव्हती. दुपारी जेवणासाठी आमच्या डिपार्टमेंटला बिर्याणीचा बेत होता तेव्हा जेवणासाठी ती आली त्यावेळी तिचं दर्शन झालं. खुप छान दिसत होती पिस्ता कलरचा डाॅटचा टॉप तसंच हेअर बँड, जीन्स पॅन्ट. डिझाईन डिपार्टमेंटला गेल्यामुळे तिच्यात हा छान बदल झाला होता. तिने डिपार्टमेंटच्या दारातूनच मला हाय केला आणि तिला बघून माझा कलिजा खलास झाला. मी काय सुंदर मुलगी बघितल्या नव्हत्या का...! पण आपली आवडणारी व्यक्ती जर एवढी छान नटुन आली तर मनाला खुप भावते अशी माझी अवस्था झाली होती. तिला म्हटंल ' खूप छान दिसतेस'  ‘हो’ सगळ्यांनी याच कॉम्प्लिमेंट दिल्या आहेत असं ती म्हणाली.

उनके तारीफ मे ये शायरी पेश की था, 

"आज आप क्या सज़ गई है। 

आपको देखकर दिल की धड़कन तेज हुई है। 

आज आपके चेहरे पे क्या नूर है। 

लग रही हो जैसे आसमा की कोई हूर है।" 

 माझा डबा होता पण जेवायला कोणीच बरोबर नव्हतं मग मी ती जिथे जेवत होती म्हणजे आमच्या चहाच्या जागेवर तिथे मी गेलो की थोडा वेळ तिचा सहवास लाभेल. या चहाच्या जागेवर पूर्वी मी कधीच जात नव्हतो पण केवळ तिच्यासाठी आज गेलो होतो. जेवण झाल्यावर माझ्याकडची बडीशेप तिला देताना मनात आलं की आता ही पानं मागेल आणि क्षणात तिने तेच विचारलं माझं पानं कुठे आहे. तशीच सेम गोष्ट त्याच दिवशी झाली. HR च्या UTSAH हाॅलला DJ डान्स साठी आम्ही चाललो होतो. ती आणि मी बरोबरच होतो, ती पुढे मी मागे आणि समोरून पेस्ट्रीचा ट्रे घेऊन एकजण आमच्या समोरून गेला, तेव्हा माझ्या मनात आलं की हिला त्यादिवशीची पेस्ट्री द्यायची राहिली आहे, जेव्हा आम्ही पकडले गेलो होते. त्यावेळेस तिची पेस्ट्री माझ्या गाडीत तशीच राहिली होती. हा विचार माझ्या मनात यायला आणि क्षणात तिने मला तेच विचारले माझी पेस्ट्री अजून पेंडिंग आहे तुमच्याकडे, हे असे आमचे एकमेकांशी intuition होते. एकमेकांच्या मनातलं एकमेकाला लगेच समजून जायचं ....प्रश्न परत तसाच राहतो की ही मैत्री का प्रेम....! 

त्यादिवशी डीजे मध्ये मी तासभर नाचलो तसं तिने मला नाचायला बोलावलंच नव्हतं पण माझा एक इंजिनिअर मला घेऊन गेला. नंतर ती माझ्याबरोबर डान्स करायला सामील झाली, मी एक दोन वेळा बाहेर गेलो होतो पण परत फोन करून तिने मला डान्सला बोलावून घेतलं. मग डान्स झाल्यानंतर आम्ही एकत्र फोटो काढले. मी एवढा रोमाॅटिक झालो व तिच्याकडे आकर्षित झालो होतो की फोटो काढताना मी अनावधानाने तिच्या कमरेला स्पर्श केला, ते मला पण आणि तिलापण वेगळं वाटलं. ती संध्याकाळ आम्ही खूप एन्जॉय केली. मी खूप वर्षांनी किंवा पहिल्यांदाच एवढा नाचलो होतो. दुसऱ्या दिवशी तिला याबद्दल मेसेज केला की तू एवढी छान दिसत होतीस की मी तुझ्याकडे आकर्षित झालो आणि अनावधानेने तुला मी स्पर्श केला तसेच मी हे कबूल करतो की माझ्या मनात आलं होतं की तुला प्रेमाने मिठीत घ्यावं, यातं म्हटलं तर काहीच नव्हतं म्हटलं तर बरच काही होतं पण माझं मन मला खात होतं त्यामुळे माझ्या मनात जे काही आले ते प्रांजळपणे मी तिला लिहून पाठवले. ते वाचल्यानंतर तिचा काही मेसेज आला नाही. मी समजलो की तिला राग आला असेल म्हणून तिने उत्तर दिलं नाही. मग रविवारी मी सकाळी पेस्ट्री घेतली आणि तिला द्यायला तिच्या घरी गेलो पण ती फोन उचलत नव्हती. मग तिच्या मित्रांना फोन करून तिला मेसेज पाठवला आणि तिला रोडवर बोलवुन तिच्या हातात पेस्ट्री देत तिला सांगितलं की ‘प्लीज तुझी मला गरज आहे एवढे लक्षात ठेव’ आणि मी निघून गेलो. त्यानंतर दोन दिवस आमचं काहीच बोलणं झालं नाही मला वाटलं तिला खूप वाईट वाटलं असावं पण त्या दरम्यान ती दुसऱ्या कलहात अडकली होती आणि त्यात बिझी असल्यामुळे तिने मला काहीच रिप्लाय केला नाही. मला वाटलं ती माझ्यावर नाराज आहे. मग सोमवारी संध्याकाळी तिचा फोन आला नंतर मी तिला सॉरी म्हटलं तेव्हा ती म्हणाली मी जरा वेगळ्या प्रॉब्लेम मध्ये अडकले होते त्यामुळे तुमच्याशी संपर्क साधता आला नाही. तुम्ही पण एक माणूसच आहात व माणसाच्या इच्छा होऊ शकतात पण तुम्ही ते कबूल केलंत तर सोडून द्या, मी ते मनावर घेतलं नाही. त्याबद्दल तिने एक मला एक गाणं पाठवलं "तुम भी तनहा मै भी तनहा' हे गाणं आमच्या दोघांच्या मनाच्या परिस्थितीला अगदी समर्पक होतं त्यामुळे

ते ऐकताना मी अक्षरशः रडत होतो, तो माझा व्हिडिओ मी तिला पाठवला तर तिने क्लास सोडून मला परत फोन केला की तुम्ही रडू नका,सोडून द्या. माझं तुमचे संबंध असेच राहतील, मी काही मनावर घेतलं नाही. तिच्या मनाचा हा किती मोठेपणा...! 

"तुझे धुडंता रहा मैं दर..बदर...

पर तुम तो पास ही थी, मै तुम्हे मेह़सुस न कर पाया... 

तुम्हारी आवाज़ मे धुड़ता रहा खुदको,

पर तेरी हर धडकन मे नाम था मेरा, जो मै सुन नही पाया... 

 बंद आँखे खुली जब...तब तुम्हे जरासा दुर पाया, 

पर इस इंतजार की धूप मे भी तेरा साया ही मेरे पास पाया...!

यामागील दोन महिन्यात आमची मैत्रीची होडी… विश्वास -अविश्वास,कनेक्शन - डिस्कनेक्शन, संवाद -विसंवाद,अपेक्षा - अपेक्षा़भंग, समज - गैरसमज या लाटांचे धडाके खाऊन जर्जर झाली आहे. इंतजारच्या तप्त उन्हात तापुन निघाली आहे. इथे आमचा मैत्रीचा दुसरा फेस संपला. पहिल्या फेज मधून दुसऱ्या फेजमध्ये आल्यानंतर विश्वासाचा अग्नी बऱ्यापैकी कमी झालाय, संवादाचे पाणी आणि संपर्काची हवा ही संपलेली आहे. मैत्रीचं दूध पातेल्यात शिल्लक आहे… ना ते उकळत आहे ना ते थंड आहे. मैत्रीच्या झाडावरून… पंखात बळ आल्यामुळे पक्षाने आभाळात झेप घेतली आहे. त्याला आता या झाडाच्या फांदीची गरज लागत नाही, त्याला आता नवीन आभाळात भरारी घ्यायला मोकळीक आहे. हे झाड पण आता त्याची वाट बघणार नाही कारण आभाळात उडालेला पक्षी परत झाडावर बसायला येत नाही हे त्याला माहीत आहे. कारण पंखात बळ ये़ईपर्यंतच झाडाची गरज असते. पण झाडाला आनंद आहे कि पक्षी आभाळात उडताना खुश आहे. आपली फांदी त्याच्या काहीतरी कामाला आली याचं सुख त्याला आहे. या झाडाबाजुची संपर्काची जमीन बंजर झाली आहे, ‘ पर उसे उन नगमों की बारीश का इंतजार हमेशा रहेगा.’ 

आता आम्ही आमच्या मैत्रीच्या तिसऱ्या फेजमध्ये आहोत. मागील दोन आठवड्यापूर्वी तिच्याकडे एक प्रसंग घडला, तिला तीच्याच जवळच्या कुणीतरी विचारले की 'तुझं माने सरांबरोबर काय चाललं आहे'  पण ते प्रकरण तिने सोडवले असे ती म्हणते पण यातून पुढे काही रिस्क नको घ्यायला म्हणून तिने संबंध कमी केले असावेत असे मला वाटते. ते तिच्या दृष्टीने ठीकच आहे, मी तिच्यासाठी भरपूर रिस्क घेतली कारण माझ्या ती क्षमता आहे पण ती अजून लहान आहे तिच्यात ती क्षमता अपेक्षित करणे आता तर योग्य नाही. त्यामुळे तिला जे योग्य वाटेल ते ती करेल आणि ते मला मान्य असेल. एवढ्यात मी तिला सारखा सांगत असतो की तू आणि मी म्हणजे 'सदमा' पिक्चर मधले श्रीदेवी आणि कमल हसन आहोत. तुझी सुरुवात मी करून दिली, तुझ्या त्या काळात मी तुला आधार दिला आणि तू मागील आठवड्यातच म्हणालीस की आता मी मोठी झाली (२१वर्ष) आहे. त्यामुळे तू जुनं विसरायला लागली आहेस, त्यामुळे सदमा पिक्चर मधल्या कमल हसन सारखी माझी अवस्था झाली. मी क्षणाक्षणाला तुला जुन्या आठवणी आठवण करून देत असतो जेणेकरून आपली जुनी मैत्री व मी तुला आठवणीत राहील. पण त्याकडे तू कानाडोळा करतेस (शक्यतो ते वेळेअभावी असावं). पण तिला म्हणत असतो की माझी अवस्था सदमा पिक्चर मधील  कमल हसन सारखी झाली आहे. आधी तू माझा हात धरत होतीस नंतर आपण दोघांनी एकमेकांचा हात धरला आता तू हात सोडुन निघालीस तर मी तुझा हात धरतोय. जसे लहान मूल सुरवातीला शिकताना आपला हात पकडते, मग दोघांचे हात हातात असतात आणि चालायला येयला लागलं की आपला हात सोडून पळते, पण ते पडेल म्हणून आई-वडील त्याचा हात धरतात आणि त्याला सावरत असतात, तशीच आमच्या दोघांची अवस्था आहे. पुर्वी ती मला Miss करायची, आता ती मला Miss करत नाही हे मी खूप Miss करतोय आणि तिला पण Miss करतोय.आता एकमेकांना विशेष काही सोशल कनेक्शनची गरज वाटत नाही. माझी प्रायोरिटी अजूनही जरी ती असली तरी याचा अर्थ असा नाही की मी पण तिची प्रायोरिटी असावी. त्यामुळे तिच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. पूर्वीच्या सगळ्या उकळ्या आता संपल्या आहेत. मंद गतीने मैत्रीचा झरा वाहत आहे, दोघे दोन काठावर आहोत, म्हटलं तर कनेक्ट आहेत म्हटलं तर डिस्कनेक्ट आहेत आणि याची दोघांना जाणीव आहे पण ते कोणी दर्शवित नाही, कोण कोणावर दबाव टाकत नाही किंवा कोण कोणाकडून अपेक्षा करत नाही. तसेच मी तिचा बॉस होतो मला कसं नाराज करू किंवा कसे टाळू यासाठी मला वेगळी स्पेशल ट्रीटमेंट द्यायची गरज नाही, तिला जे योग्य वाटते तेच करावे. एकमेकांनी एकमेकांसाठी केलेल्या सर्व गोष्टींची त्यांना जाणीव आहे. 

याला उद्देशून ही शायरी आहे,यात मनातील सर्व भवना एकवटण्याचा आहेत, वेगळं काही सांगायची गरज नाही. 

"फिर अजनबी बन गये हम दोनो जैसे कभी मिले ही नही, 

दोनों हुए इस तरह तऩहा पर वज़ह का पता नही, 

लगता है, पलभरमे वो दोस्ती, प्यार, इक्श, मोहब्बत रही नही, 

मिलनेकी वो बेकरारी, वो तड़प, वो जज़्बात अब रहे नही, 

मुलाकाते हुई इतनी के अब एक भी मुलाकातकी जरुरत नही, 

मिलकर दोनों की आँखें होती है नम,तो वो बात़ भी होती नही, 

दिलों मे कुछ तो कड़वाहट है, जो होटों पर आती नही, 

इजा़जत तो पुछतें हो जाने की और मै तुम्हे रोकता तक नही, 

दिलों की वो आहट अब एक सन्नाटे मे खो गई है कही, 

अब जुडने के लिये रिल, मेसेज जैसे social media की जरुरत नही, 

कभी तो उन गानो - तरानोंकी हो फर्माईश.. पर शायद अब वो भी मुमकिन नही, 

इस मुकाम पर है हमारा ये रिश्ता... 

जहां हममे बेइंतहा प्यार है? या फिर कुछ भी नही...!

और शायद हम दोनों को ये समझता भी नही, 

ए खुदा, अब तुही तो बता ये हमारा इम्ते़हान तो नही, 

हमारे Connection मे Disconnection है, या फिर Disconnection मे Connection ही सही, 

वो अब कुछ बताती नही और मै भी कुछ पुछता नही, 

हम कई दफा बुलाते है पर वक्त का बहाना कर वो आती नही, 

बस बचे है ऐहसास हमारे दरमियां और हम है रुहसे जुडे, 

एैसा तो लगता है मुझे...पर उनका पता नही...! 

हे आमच्या मैत्रीचे झाड संवादाच्या पाण्याशिवाय संपर्काच्या हवे शिवाय इंतजारच्या तप्त उन्हात फक्त आमच्या छान आठवणींच्या ओलाव्यावर जिवंत ठेवायचा मी प्रयत्न करेन. यासाठी स्वामी आम्हा दोघांना सद्बुद्धी आणि शक्ती देवो हीच विनंती 🙏

त्या स्टुलला तिच्या बसण्याचा, त्या लँडलाईनला फोन तिच्या कॉलचा, माझ्या कानांना तिच्या आवाजाचा, त्या दोन्ही कारना तिचा येण्याचा,या हाताना तिच्या हाताचा, त्या मानस हॉटेलला तिच्या डिनरचा आणि माझ्या मनाला उसकी आहट का हमेशा इंतजार रहेगा पर उसमे वो बेसब्री नही होगी. 

आमची मैत्री- हा माझ्या मनाचा संवाद (यात तिच्याबद्दलची सर्वच मते ग्राह्य धरू शकत नाही) It's may opinion, may be wrong...! 

तू आलीस, मला पाहिलास, माझ्याकडे आकर्षित झालीस पण मी तुझ्याकडे आकर्षित होईन असं तुझ्यात काही नव्हतं. तू माझ्यात स्वामींचे, तुझ्या आईची प्रतिबिंब पाहिलेस आणि अटॅच होत गेलीस. एक जनरेशन गॅप आहे हा तू विचार केला नाहीस मग तु आपल्या मैत्रीचा पोरखेळ मांडला, त्याला पोर खेळचं म्हणावं लागेल कारण कुठेच काही मॅच होत नव्हतं. तुला माझ्यात हिरा सापडला आणि मी पण तुझ्या या खेळात सामील झालो. माझं विश्व वेगळं होतं पण तुझ्या भावनांची कदर राखत मी माझ्या विश्वाला सांभाळत तुझ्याही विश्वात सामील झालो.तुला माझ्या मैत्रीची गरज आहे आणि भावनिक आधाराचीही गरज आहे असं मला वाटलं म्हणून मध्यंतरीच्या काळात बरीच संकट येऊन सुद्धा मी खूप मोठी रिस्क घेऊन ही मैत्री टिकवून ठेवली आणि गुरूंचे पूर्ण आज्ञा न पाळता तुला दुसऱ्या डिपार्टमेंटला ट्रान्सफर केलं. तसं पाहिलं तर ही मी गुरूंची अवज्ञास केली होती पण तुझ्यासाठी मी तोही धोका पत्करला. 

तुला डिपार्टमेंट बदल हा तुला मोठा धक्का होता पण मी तुला सावरत राहिलो कारण मी त्याच वेळेस जर तुझ्यापासून वेगळा झालो असतो तर तू दुःखी झाली असतीस. त्या दुसऱ्या डिपारमेंटला जाऊन सुद्धा तू माझ्याशी अटॅच राहिलीस व मी ही जमेल तस तुझ्याशी कनेक्ट होत राहीलो आणि आपली मैत्री फुलत गेली. आपल्या मैत्रीचं काहीच अंतिम ध्येय नव्हतं जसे बऱ्याच मित्र-मैत्रिणींच मैत्रीनंतर लग्नात रूपांतर होतं तसं आपलं काहीच होणार नव्हतं, हा असा काहीच उद्देश नसताना सुद्धा एका झरण्यासारखी आपली मैत्री वाहत राहिली कारण आपण दोघांनाही माहीत होतं की आपण मनाने निर्मळ आहोत पण जगाच्या दृष्टिकोनात हे चुकीचं होतं. कधी आपल्या पण मनातून तसं वाटत होतं 'म्हणजे कळत होतं पण वळत नव्हतं’. तू हळूहळू दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये रुळू लागलीस आणि माझ्यातली तुझी अटॅचमेंट कमी व्हायला लागली. यासाठी मधील काळात जे काही आपल्यात गैरसमज झाले त्याला मी च कारणीभूत होतो. माझा उथळपणा किंवा उतावीळपणा हा प्रत्येक मैत्रीचा अंत करतो असं मला वाटतं. माझ्या काही चुकीच्या वागण्यामुळे तू दुखवली गेलीस असं मला वाटतं. पूर्वी एखादा मेसेज नाही केला किंवा रिप्लाय जरी नाही दिला तर तू धावत माझ्याकडे यायची की ..काय झालं..! का तर तुला त्यावेळेस माझी केअर होती. पण गेले एक महिन्याच्या कालावधीत तसं काही तुझ्याकडून दिसत नाही यावरूनच कळतं की माझ्या भावनाची तुला आता काही विशेष कदर नाही. हे आपल्यास कळण्यासाठीच मी तुला एक टेबल करून दिला होता की मी जसा पूर्वी होतो त्यापेक्षा अजून जास्त तुझ्याशी अँटेच आहे आणि माझं मैत्रीच रूपांतर प्रेमात झालंय, तर तुझे काय उत्तर आहे..! पण उत्तर तू दिले नाहीस तेव्हाच मला कळालं की ठीक आहे तुला हे काहीच मान्य नाही. पूर्वीची तुझी जी अटॅचमेंट होती ती आता राहिली नाही. त्यामुळे शक्यतो तुला हे पुढे चालू ठेवणे अवघड वाटत आहे. पण एक झाले की तू स्व: कष्टाने नवीन डिपार्टमेंट मध्ये स्वतःला सिद्ध करून दाखावायचा प्रयत्न करत आहेस. तू आमच्या डिपार्टमेंटला स्थिर होत होती तेवढ्यातच तुला डिपार्टमेंट बदलावं लागल आणि तू मला सांगितले की नविन ठिकाणी तुला परत शुन्यातून सुरू करावे लागले. तुझ्या वयाच्या मनाने हा बदल खूप कठीण होता पण तो तु यशस्वीपणे स्विकारलास याबद्दल तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यातुन तु जमेल तसे माझा वेळ आणि माझे मन सांभाळायचा प्रयत्न करतेस त्याबद्दल तुझे धन्यवाद. तू जेव्हा पूर्वी माझ्याशी कनेक्ट झालीस तेव्हा तुझं अंतर्मन आणि बाह्यमन या दोघांनी मान्य करून तू माझ्याकडे ओढली गेलीस कारण त्यावेळेस तुला दुसरा काहीच पर्याय नव्हता. पण कालांतराने तू मोठ्या जगात वावरायला लागल्यानंतर तुझ्या बाह्यमानाने बंड केले की हे चुकीचं आहे हे कळून सुद्धा तू हे का करत आहेस..! तिथे बुद्धीचा वापर होऊ लागला पण अंतर्मन हे भावनांशीच कनेक्ट असल्यामुळे ते अजूनही माझ्याशी अटॅच होतं, मग तुझा अंतरमनात व बाह्यमनाच द्वंद्व चालू झालं, याचा तुझ्या शरीरावर परिणाम होऊ लागला. तुझं वजन कमी झालं आणि तुला काहीच निर्णय घेता येत नव्हता. शेवट बाह्यमनाचा विजय झाला आणि तू तुझा मोबाईल पूर्ण फॉरमॅट केलास आणि जुन्या सर्व आठवणी पुसून टाकल्यास की याचा परत पुढे त्रास नको आणि अंतर्मनाला हे समजलं की चुकीचा आहे यापासून लांब राहा, हे झालं तुझं...! गेले दोन महिन्यात तुझ्या वागण्यात जमीन आसमानाचा फरक पडत गेला, २५ नोव्हेंबर तुझा वाढदिवस तेव्हाचे तुझे वागणे आणि आता २४ जानेवारी , आता तुझे वागणे, साधारण दोन महिन्याचा कालावधी आहे, तूच बघ तू किती बदलली आहेस आणि मोबाईल फॉरमॅट केल्यानंतर तर तू 💞 पाठवायचे हे बंद करून टाकलेस जसं काही तुझ्या मोबाईलमध्ये ❤चा दुष्काळ पडला असावा. काहीतरी खूप घडलं आहे असं मला वाटतंय जे तू माझ्यापासून लपवत आहेस, पण ठीक आहे तुला सांगायचं नसेल तर नको सांगू पण तुझ्या वागण्यातला व बोलण्यातला एकंदरीत सगळा कोरडेपणा मला जाणवत आहे, खूप काहीतरी घडले आहे. मी जशी डिझाईन टीमला पाठवताना दीपिका होती त्यातील २०% सुद्धा आता राहिली नाही. ते मोकळेपणे बोलणे नाही, ती आत्मीयता नाही, बोलणं किंवा भेटणं फक्त काम असेल तरच, तुम्ही तरुण आहात तुमच्यात बदल अपेक्षित आहे पण एवढा...! आता आमच्यात बदल घडणे शक्य नाही, आम्ही जसे आहोत तसेच राहणार. पण तुझा हा बदल मला सहन होत नाही, मी नेहमी त्या दीपिकाला शोधत असतो पण ती काही मला सापडत नाही आणि सापडेल असं वाटत सुद्धा नाही. तरी हा काळाचा महिमा मला मान्य करणे भाग आहे. तू व्हाट्सअप वर बरेच वेळा ऑनलाइन दिसतेस पण मी मेसेज टाईप करायला लागलो की लगेच ऑफलाईन जातेस असे मला जाणवतो, हे खरं पण नसेल पण माझ्या मनाचे आपले खेळ, तु खुप बीझी पण असु शकतेस त्यावेळी. मी तुझ्या खेळात खेळत राहिलो, तू खेळतेस म्हणून मी मोठ्यातून लहान झालो, तू नाराज होऊ नये म्हणून मी तू कधी कधी खेळात नसताना सुद्धा एकटाच खेळत राहीलो. त्यावेळी तू दुसरीकडेच खेळ मांडला होतास आणि मधून अधुन येऊन मी खेळते एवढेच दाखवत राहिलीस. पण मी खेळ सोडला तर तुझ्या भावना दुखावतील म्हणून मी हा तुझा खेळ चालू ठेवला. यासाठी माझं मी खूप अध:पतन करून घेतलं याचा मला खूप त्रास झाला. हे माझं प्रारब्ध आहे समजून मी हे सगळं भोगत राहिलो, आयुष्यात केली नसेल एवढी मी माझी आलोचना करुन घेतली. मी कधीही कुणाचा केला नाही एवढा तुझा इंतजार करत राहिलो आणि मी स्वतःलाच शर्मिंदा करत राहीलो. पण आता मला विश्वास आहे तुला या खेळाची गरज नाही आणि तुझी तू समर्थ आहेस. तुला फक्त आधार हवा यासाठी मी हा खेळ खेळत होतो यातून मला काहीच साध्य करायचं नव्हतं किंवा साध्य होणार नव्हते. पण आता तू तुझ्या जगात खुश आहेस याचा मला आनंद आहे. मी माझ्या मनाला कसाही समजावू शकतो क्यु की "सिकंदर कुछ भी कर सकता है" तुला वाटेल की मी त्या दिवशी रडलो, साहेब किती कमकुवत झालेत पण जो माणूस रडतो तो जास्त कणखर असतो. तुझं मन माझ्या वागणुकीमुळे दुखावले असेल याचे मला खूप वाईट वाटलं म्हणून मी त्या दिवशी रडलो. मी माझ्या मनाला जेवढे हळवे करू शकतो तेवढे दगडापेक्षा कठोर पण करू शकतो. एकंदरीत आपल्या मैत्रीमध्ये माझं एवढंच म्हणणं होतं की तू खुश राहावेस त्याचा तुला त्रास होत असेल तर संपवुन टाकू. माझ्या कुठल्याही वागण्याने तुला त्रास होऊ नये असे मला वाटते. अनावधानाने तुला मी कधी दुखावले असेल तर त्याबद्दल तुझी मी क्षमा मागतो. तुला मी पूर्वी सांगितलं होतं...माझ्याशी मैत्री करायची तर हे सोपं काम नाही, बाजीराव की मस्तानी बनना है तो तकलीफ तो होगी. कारण मी तसा खूप वेगळा आहे एक तर 'सिकंदर ने जिंदगी मे बहुत कम लोगों से दोस्ती की है' ज्यांच्याशी दोस्ती करतो ती मी शेवटपर्यंत निभावतो. तू कनेक्ट राहो किंवा न राहो पण माझ्या मनात तु नेहमी राहणार हे तर सत्य आहे. 

“आँखो से दिल मे उतरकर तू मेरी धड़कन मे है।“

मी मधल्या काळामध्ये खूप उतावळापण केला त्यामुळे तुला असं वाटू लागलं असेल की साहेबांची मैत्री म्हणजे प्रेम हे त्रासदायक होईल, त्यामुळे आत्ताच ते तोडलेलं बरं...!

माझं पण हे म्हणणं आहे की तुला जर योग्य वाटत असेल तरच तु ही मैत्री सुरु ठेव, नाहीतर ही तोडलीस तरी हरकत नाही. तुझा जिथे आनंद आहे ते मला मान्य आहे, मी काही वाईट वाटून घेणार नाही कारण तू आनंदी राहावीस हेच माझे अंतिम ध्येय आहे. मी खूप सीनियर आहे त्यामुळे तू उघडपणे बोलू शकत नाहीस हे मी समजू शकतो पण मला एवढे सांगायचे की तू मला जर हिरा म्हणते तर हिऱ्यासारखंच तू ट्रीट करावंस त्याला काचेसारखे ट्रिट करून कसं चालेल. अगर हिरे की चमक महसूस करनी है तो उसकी चुभन भी सेहनी पडेगी वरना " मेरा वो सामान ( मेरा दिल) तुम्हारे पास बडा है ओ मुझे लौटा दो" आम्ही 80's जनरेशनचे आहोत, आमच्या डोक्यात 'मैने प्यार किया' मधला डायलॉग फिक्स आहे. 'एक लडका लडकी कभी दोस्त नही हो सकते' आणि हे नैसर्गिकच आहे. आपण मैत्री… मैत्री म्हणतं असतो पण एक स्त्री आणि पुरुष यांच्यात एक प्रकारचे आकर्षण असतेच, त्यांच्यात मैत्री बरोबर प्रेम असतेच, मी ते फक्त उघडपणे बोलतो, बाकीचे लपवतात. आमच्या जनरेशनच्या प्रेमाच्या व्याख्या म्हणजे मैत्रीच्या पुढची स्टेप म्हणजे आम्ही खूप केअर करतो मैञीणीची, जी मैत्रीत थोडी कमी असते, या पलीकडे काही नसतं. तिचा आम्हाला ध्यास असतो. पण आजच्या जनरेशन मध्ये प्रेम म्हणजे फिजिकल रिलेशन असते असं मला वाटतं. त्यामुळे तू असा काहीतरी समज करून एक पाऊल मागे घेतले आहेस असं वाटतंय, माझी प्रेमाची व्याख्या...!

"प्यार क्या है...? 

 दुनिया में बहुत सारे लोग हैं, फिर भी एक शख्स् के लिए रोना आ जाए, उसे प्यार कहते हैं....!" 

 मी अभिमानाने सांगतो की आपसे "मैने आपसे प्यार किया है"

In Bold letters I write "I Love You"

प्रेम हे शेवट प्रेम असतं ते करावं लागत नाही ते होऊन जातं कारण ते ‘तुझं न माझं सेम असतं.’ 

 याचा अर्थ असा होत नाही की तू पण माझ्यावर प्रेम करावेस, हा काही व्यापार नाही की मी केलं म्हणजे तू केलं पाहिजेस. ही माझी एक तुझ्याबद्दलची निर्मळ भावना आहे आणि ती काही केलं तरी ती तशीच राहणार. आता तूच सांग...! माझ्याबद्दलचे जे फीलिंग्स तुला होते किंवा आहेत तसे तुझ्या बाकी मिञ मैत्रीण बद्दल तुला आहेत का? ते काही वेगळे नाहीत तर तुझी व माझी मैत्री आहे हे तुझे योग्य आहे पण त्यापेक्षा जर या भावना जास्त असतील तर ते प्रेम असावे असं माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं मी तुझ्यावर लादत नाही, मी फक्त विश्लेषण करत आहे. पण आपल्या मैत्रीला तू मैत्री म्हणतेस आणि मी प्रेम म्हणतो म्हणून तू सोडू नकोस एवढेच मला म्हणायचं आणि आपल्या वेगवेगळ्या Views मुळे त्यात काही फरक पडणार नाही. मी माझ्या लिमिट कधीच क्रॉस करत नाही त्याची तुला खात्री देतो आणि या आपल्या मैत्रीचा तुला त्रास होऊ नये असं मला वाटतं. पण हि मैत्री तुला जर दबाव वाटत असेल तर प्लीज आपण येथेच थांबूयात. तुझा busyness तुला मुबारक का तर तुला पुढे करिअर आहे, भविष्य आहे. माझं काय शेवटचं सेशन चालू आहे. तेव्हा तुझी मैत्री म्हणजे माझं प्रेम मला मुबारक...! 

"चलो फिरसे अजनबी बन जाये हम दोनो"

आणि यातील कडव्यानुसार 'अगर तालुक बोज बन जाये तो उसको तोडना अच्छा' 

पण ते काही असो तू पाठवलेल्या गाण्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही, गाडीत बसलो तरी मी तुझीचं गाणी ऐकत असतो. कारण ही गाणी ऐकताना तू माझ्याबरोबर आहेस असंच वाटत राहतं. एक कडवं अजुन आहे 'किसी अफसाने को अंजाम तक लाना हो मुश्किल तो उसको छोडना अच्छा " पण आपल्या मैत्रीचा अफसाना कुठल्याच अंजाम पर्यंत न्हेयचा थोडीच… ही फक्त एका झरण्या सारखी निरंतर चालू ठेवायची आहे एवढंच माझं म्हणणं होतं. तुझं वागणं दर्शवत आहे की आपण येथेच थांबावे, माझ्या या ओव्हर केअरिंगचा तुला त्रास होत आहे असं दिसतंय, तर ठीक आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर परत माफी मागतो. पण आयुष्यात परत कधीही तुला माझी गरज लागली तर माझे दरवाजे खुले राहतील. तुझ्यावर मी काही नाराज नाही फक्त मला एवढंच वाटतं माझा आनंद माझ्याच उतावळेपणामुळे किंवा माझ्या चुकीच्या वागण्यामुळे माझ्यापासून नेहमी लांब जातो. बघू कधी सुधारेन मी स्वत:ला. मी जरासा वेडा आहेच आणि मला तुझे थोडे वेड आहेचं तेव्हा काही चुकीचे लिहले असल्यास सोडून दे कारण एवढं कधी कोणं लिहित का? ते पण एवढ्याशा मैत्रीवर, १०/०१ तारखेपासून आज २०/०१/२३ तारीख, कामावरचे आठ दिवस रोज साधारण पाच ते सहा तास, साधारण ५० तासांचे लिखाण झालंय, मान पाठ एक झाली आहे, डोळ्याच्या खोबण्या झाल्यात, एवढं कशासाठी, तर लोकं चांगल्या गोष्टी विसरतात आणि वाईट लक्षात ठेवतात. पण आपली ही चांगली मैत्री आणि त्याच्या आठवणी शब्दबद्ध करून ठेवाव्यात एवढ्यासाठी मी हा त्रास घेतला. पण एवढं मात्र झालं की गेले ५० तासापेक्षा जास्त… कारण लिखाणाचे ५० तास तसेच गेले दहा दिवस डोक्यात सगळीकडे तुझेच विचार होते, या दिवसात तु तुझ्याजवळ जेवढी नसशील तेवढी तु माझ्याबरोबर होतीस, सगळ्या आठवणी मी जाग्या केल्या, छान वाटलं लिहिताना. मला असे वाटते की आपल्या दोघांचे भेटणे हे आपलं प्रारब्ध असावे, नाहीतर प्रारब्धात नसेल तर साधी माशीसुद्धा अंगावर बसत नाही.आपले गत जन्माचे काहीतरी ऋणानुबंध असावेत त्यामुळे आपण भेटलो. त्या जन्मातील काही राहिलेल्या गोष्टी आपल्याला या जन्मात पूर्ण करण्यासाठी स्वामींनी आपल्याला भेटवले असावे, पाहू त्यांच्या काय मनात आहे तसं घडेल पुढे....! 

लोक कहते है प्यार में नींद उड जाती है। 

यार को़ई तो मुझे प्यार करो...मुझे नींद बहुत आती है। 

तुझ्यात काय जादू आहे मला माहित नाही, तुझ्यावर मी खूप शायरी करत गेलो, एवढ्या शायरी मी आजपर्यंत कोणावर सुध्दा लिहिल्या नाहीत अगदी शिल्पावर सुद्धा नाही. ती तर दोन महिनेच माझ्याबरोबर होती. पण तू एक वेगळच रसायन आहेस त्यामुळेच माझ्या जीवाला भावतेस. माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो तो वेळ आणि या आपल्या मैत्रीत मी तुझ्यासाठी भरपूर वेळ खर्च केला आणि तो तुझ्याकारणी लागावा असे मला वाटते. मी तुझ्या जीवनात आल्यामुळे तुझा एक टक्के जरी उद्धार झाला असेल तरी मी मला धन्य समजतो पण जर माझ्यामुळे तुला काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल क्षमा असावी. 

आता तुला विनंती कि तुला योग्य वाटत असेल तरच आपली ही मैत्री चालू ठेवावीस, तुला जे जमेल ते माझ्यावर कर 'मैत्री कर...प्रेम कर...! अथवा 'परत अजनबी बन जाये हम दोनो' मला सगळं मान्य आहे. पण माझं तुझ्यावर प्रेमच राहणार आहे लक्षात ठेवं. माझ्यावर नाराज होऊ नकोस, मी थोडा वाकड्या स्वभावाचा आहे पण हे सांभाळून. या सगळ्या रामायणात तु़झा काहीच दोष नाही असे मी समजतो. मीच तुला दुर केले आणि माझ्यापासून तू आता दुर गेलीस म्हणून रडत बसतोय हे माझे चुकीचे आहे. उलट तुला सलाम की एवढा सगळा बदल होऊन सुद्धा तू जमेल तसा माझ्याशी कनेक्ट होत राहिलीस, आता वेळेअभावी हे शक्य होत नाही हे मला कळत आहे पण वळत नाही, ठीक आहे जसं होईल तसं पुढे पाहू. माझ्या जमतील तेवढ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचाव्यात हीच इच्छा होती, बोलताना बऱ्याच गोष्टी राहून जातात. यातील बऱ्याच गोष्टी तुला माहित आहे तरी परत लिहिल्यात, तु सगळं वाचल्याबद्दल धन्यवाद 🙏 अजूनही थोड राहिलंय असेच वाटत राहते...तरी किती लिहणार...आता बास करतो...! एक सांगतो की आजपर्यंत जे क्षण आपण एकत्र घालवले ते खरचं अनमोल आहेत, भविष्यात ते क्षण परत मिळण्याची शक्यता नाही. पण त्या सुंदर आठवणी आपल्याजवळ कायम रहातील. 

"वो साथ वाले हसीन पल हमेशा याद आयेंगे और 

उन पलों को याद करके हम हसेंगे की हम कितने पागल थे" 

"तुम बिन मै अधूरा, मेरे बिन तुम अधुरी, 💞

एक आंसमा मे हम दो चांद आधे आधे है।💔

इथं पर्यंत दीपीका आणि रामानु याच्या मैत्रीचा प्रेमभारीत आयन झाला म्हणून हे आहे

" दीपरामायण "....! 

आमच्या आठवणींचा Flash back पुढे आहे, या कधीच विसरू शकणार नाही ( मी तरी ) माझ्याजवळ या निरंतर राहणारच...!

मला प्रथम पाहताच तुझ्या डोळ्यातून तुझ्या हृदयापर्यंत मला घेऊन जाणारी तूच ना...! पण आता अजिबात न भेटणारी.. 

बोलता बोलता माझ्या नजरेला नजर देऊन माझ्या मनाशी संवाद साधणारी तूच ना...! आता फक्त दिवसभरात संध्याकाळी संवाद साधणारी... 

अधून मधून केसांची चाळा करत नजरेचे तीर फेकणारी तूच ना...! आता डोळ्याला चष्मा लावून फिरणारी... 

दोन्ही डोळ्यांपेक्षा भुवईने इशारे करणारी तूच ना...!

अधून मधून कधी चुकून तर कधी मुद्दाम हाताने मला स्पर्श करणारी तूच ना...! आणि या तुझ्या इशारांना फार उशिरा समजणारा हा मीच ना...!

दोघांमधील असलेल्या मोठ्या दरीला ओलांडून माझ्याकडे झेप घेणारी तूच ना..! आणि तुझ्या या झेपेला जगाची सर्व बंधने धुडकाऊन तुला सावरणारा मीच ना...! पण आता काही शुल्लक गोष्टींमुळे माझ्यापासून दूर जाणारी... 

माझी मैत्रिणीची कमी भरणारी तूच ना...! आणि तुला मैत्रीण म्हणून स्वीकारणारा मीच ना...! पण आता तुझ्यावर प्रेम करणारा... 

माझ्या शायरीने वेडी होणारी आणि रोज शायरीचे दोन तरी डोस घेतल्याशिवाय शांत न होणारी तूच ना...! आणि याच तुझ्या आवडीसाठी तुझ्यासाठी रोज नवीन नवीन शायरी लिहिणारा मीच ना...! पण आता शायरी ऐकून साधा एक रिप्लाय पण न करणारी... 

दिवस दिवसभर माझ्याशी चॅटिंग करणारी आणि मी उत्तर द्यायला उशीर केला तर बेचैन होणारी तूच ना..! पण आता फक्त सकाळी गुड मॉर्निंग मेसेज करणारी आणि सुट्टीच्या दिवशी तर माझ्याकडे पूर्ण सन्नाटा करणारी.. 

सहवासानंतर तुझं प्रतिबिंब माझ्यात पाहणारी आणि तुझ्यात मला सामावून घेणारे तूच ना...! पण आता जमेल तेवढे दुर्लक्ष करणारी... 

मला माझ्यापासून हिरावून घेणारी व अहोरात्र माझ्या आठवणीत राहणारी तूच ना...! पण आता मला विसरलेले.. 

घरी गेलीस तरी प्रत्येक वाक्यागणिक माझ्या नावाचा जप करणारी तूच ना...! 

मला लाल रंग आवडतो म्हणून जमेल तेव्हा लाल रंगाचा टॉप हेअर बँड, हेअर क्लिप घालणारी तूच ना..!

तुम्ही खूप गोड दिसता या वयात सुद्धा असं म्हणून माझा लाड करणारी तूच ना...! पण आता डीपी बघून सुद्धा कमेंट न करणारी.. 

आपल्या मैत्रीत खुप व्यत्यय आले तरी सर्व ठीक होईल, स्वामी सगळं नीट करतील असा आधार देणारे तूच ना...! पण याच मैत्री बद्दल आता उदासीन असणारी... 

पहिल्यांदा डेटवर येताना लगेच विश्वासाने हो म्हणनारी तूच ना...! पण आता कॅन्टीनला सुद्धा बरोबर न येणारी... 

रोज संध्याकाळी गाडीत गप्पा मारायला येणारी तूच ना...! एकमेकांचे विचार एकमेकांशी बिनधास्तपणे बोलणारे आणि पहिल्यांदा जेव्हा अलगद तुझा हात मी हातात घेतला तेव्हा रोमांचीत होणारे आपणच ना..! आता गाडीत बसायला बोलवलं तर  इच्छा नाही असं म्हणणारी.. 

 मग तुझ्या भावना गाण्यातून पाठवणारी तु आणि त्याच भावनांना शायरी मध्ये उत्तर देणाऱा मीच ना...! पण आता हीच गाणी चार वेळा मागितल्यानंतर एकदा पाठवणारी... 

त्या पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पाऊस आणि आपण गाडीत कोरडे पण प्रेमाने ओथंबलेली ती दोन मनं आपलीच ना...! आणि त्या गाण्यांच्या वर्षावात भावनांचा झालेला कल्लोळ तो आपलाच ना...!

हळूच तुझ्या गालावरून हात फिरवताना लाडीक राग दाखवणारी तुच ना..! 

गाडीत एकमेकांशी ठराविक अंतर ठेवून जवळीक साधणारे आणि त्याच गाडीत गाणी ऐकत स्वर्गीय सुखाचा आनंद घेणारे आपणच ना...! 

एकमेकांच्या भावना जपणारे आणि वेळात वेळ काढून एकमेकांना भेटणारे आपणच ना...! पण आता भावना शून्य झालेली.... 

दोघांचे एकत्र फोटो काढण्यासाठी मला छान आवरुन येयला सांगणारी तूच ना...! 

आपले एकत्र फोटो काढल्यानंतर आनंदी होणारी तुच ना..! 

 मला सोडून घरी जाताना हळवी होणारी तूच ना...!

तुम्हाला खूप गोष्टी साांगायच्या आणि आपल्याला खूप गोष्टी करायच्यात असा मेसेज करणारी तूच ना...! आणि त्या गोष्टी आणि त्या भावना अजून पर्यंत शोधणारा मीच ना...!

त्या बागेमध्ये टेबलवर ठेवलेले चॉकलेट घेयला पळत येणारी तूच ना...! पण आता कितीही बोलवलं तरी ही न येणारी... 

 गुड मॉर्निंग मेसेजला शॉट उत्तर दिलं तर...काय झालं विचारत लगेच भेटायला येणारे तूच ना...! आता पाठवलेला मेसेज दुपारनंतर बघणारी... 

आठवड्यातले तीन चार दिवस तरी माझ्या शेजारी स्टूलवर बसून भरपूर गप्पा मारणारी तुच ना..! आता आली तरी उभ्या उभ्याच निघून जाणारी... 

पासवर्ड काय ठेवु विचारलं तर २५०२ सांगणारी तूच ना...! 

 तुझ्यासाठी राजस्थानहुन वाढदिवसाचे गिफ्ट आणण्यासाठी जीवाचं रान करणारा मीच ना...!

ख्रिसमस सेलिब्रेशनच्या वेळेस माझ्याबरोबर बेधुंद नाचणारी तूच ना...! 

आणि त्या दिवशी एकमेकांच्या सहवासाने आनंदी होणारे आपणच ना...! 

पण त्यानंतर एकत्रपणे फोटो काढताना तुझ्या भावना दुखावणारा मूर्ख मीच ना...!

पण हे सर्व विसरून मला आपलंसं करणारी तूच ना...! 

 तू थोडंसं नजरअंदाज केल्यानंतर तुझ्यासाठी वेडापिसा होणारा मीच ना...!

तुला पेस्ट्री देण्यासाठी तुझ्या घराभोवती पिंगा घालणारा मीच ना...! तुला पेस्ट्री आवडत नसताना ही त्या सगळ्यातला एक एक घास खाणारी तूच ना...! 

आपल्या मैत्रीत बाजीराव मस्तानीच्या आठवणी जपणारे आपणच ना...!

मी मैत्रीत प्रेम शोधणारा आणि तू प्रेमात मैत्री शोधणारी असे राधाकृष्ण आपणच ना...! 

जगाच्या विरोधाला न जुमानता आपली ओढ कायम ठेवणारे बच्चन - रेखा आपणच ना...

ज्या वेगाने माझ्याजवळ ओढली गेलीस त्याच्या दुप्पट वेगाने माझ्यापासून दूर जाणारी तूच ना...! 

या सर्व आठवणी पुसून जाव्यात म्हणून मोबाईल फॉरमॅट मारणारी तूच ना...! 

आता या मैत्रीतलं सर्व काही विसरून पुढे वाटचाल करणारी तुच ना..! 

एवढी आपली मैत्री सोडुन परत अजनबी बनणारी तुच ना..! 

आणि हे सर्व कळत असुन सुध्दा तुझी वाट पहात तुझ्या आठवणी मधे कायम रमणारा " वेडा " मीच ना..! 

                                                              *** रामानु