प्रेमपत्र Pranav bhosale द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

प्रेमपत्र

प्रेमपत्र

 

         आज सहजच घराची साफ सफाई करताना जुन्या पेटीत वेगवेगळी कागदपत्रे हाताला लागली. मामाने पाठवलेली पत्र, आजोबांनी पाठवलेले पत्र, आईची केलेली विचारपूस, मी लहान असेन, माझासाठी लाडाने वापरलेले शब्द मला पुन्हा बालपणात घेऊन गेले. आजच्या २१ व्या शतकात कोण कोणाला पत्र लिहत तेव्हा..! आता पत्राची जागा मोबईल ने घेतली आहे. मी काय तुम्हाला मोबाईल परिणाम दुष्परिणाम सांगणार नाहीये. पण आज ती जुनी पत्र पाहून, ते वापरलेले शब्द स.न.वि.वि. तसेच प्रिय, माझा लाडका, माझी लाडकी, हे सर्व वाचून मला माझ्या प्रेमपत्राची आठवण झाली.

          गोष्ट म्हणावी एवढी जुनी नाहीये, साधारण १०-१५ वर्षापूर्वीचीच. मी पुण्याला mpsc साठी करायला गेलेलो, अगदी प्रत्येकाकडे मोबईल असतील असे नाहीच. आणि असले तरी तेव्हा whatsapp वेगरे काहीच नव्हता. पुणे म्हणजे विद्येचा माहेरघर. माझ्यासारखेच खूप सारे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून मुल मुली इथ शिक्षणासाठी आले होते. मी मात्र पहिल्यांदाच पुणे पहिला होत. जास्त कोण नाही पण एक मित्र होता पुण्यात त्याच्यासोबतच माझी रहायची सोय झाली होती, क्लास पासून आमची रूम खूप लांब होती. त्यामुळे क्लास ला लवकर पोहचायला सकाळी खूप लवकर उठून  आवराव लागत असे.

            एका शेतकरी कुटुंबातून मोठा झालेलो आणि पहिल्यांदाच पुण्याला आलेलो त्यामुळे कोणाशी कस बोलायचं, कस वागायचं याचा जास्त अनुभव नव्हता. प्रत्येकाची आपआपली स्वप्न असतात, समाजात मिळणारा मान सन्मान बगून मी पण स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनायची स्वप्न घेऊन पुण्यात आलो होतो. पहिल्याच दिवशी क्लास ला जायला उशीर झाला, सर्व क्लास मध्ये खूप गर्दी झाली होती. मला बसायला जागा मिळणे मुश्कील झाले. कसबसे शेवटच्या बाकावर जागा मिळाली. अजूनही आठवतो तो दिवस, क्लास मध्ये कमीच लक्ष होते. घराची आठवण येऊ लागली. एवढी सर्व बिनधास्त मुल मुली बगून स्वतामध्ये न्यूनगंड भरलाय याची जाणीव झाली. शेवटच्या बाकावर मान खाली घालून मी बसून होतो. मनात विचार आले, आपण इथे कशासाठी आलो आहे...? आपले ध्येय काय आहे...?  त्यामुळे लगेच सरांकडे लक्ष केंद्रित केले.

           तेव्हा आमची पूर्व परीक्षेची तयारी चालू होती. मला मात्र नेहमीच क्लास ला उशीर होऊ लागला. त्यामुळे नेहमीच शेवटच्या बाकावर जागा ठरलेली असायची. क्लास चालू होऊन आठवडा जरी झाला असला तरी मी मात्र एकटाच असायचो जास्त कोणाबर बोलण नाही, ना कोणाशी मैत्री. आत्मविश्वास एवढा कमी होता कि खूप प्रश्नाची उत्तरे येऊन पण गप्प च राहणे मी पसंद करत असे. सर्व मुले मुली मात्र एकत्र गप्पा मारायचे, सरांना प्रश्न विचारायचे, सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देयाचे. त्यामध्येच एक चेहरा होता. अनु...! अतिशय हुशार, सुंदर, सतत हसरा चेहरा, निरागस आणि मनमोकळा हास्य असे गोड भाव तिच्या चेहऱ्यावर कायम असायचे. सरांनी कोणताही प्रश्न विचारला तर अनु कडे त्याच उत्तर असायचे. त्यामुळे सर्वाना तिच्याबद्दल माहिती होते. आणि हुशार लोकांच्या आजूबाजूला खूप सारे लोक असतात च की, मला पण वाटायच आपण पण जाऊन बोलूया, पण मी एवढा धीट कुठे तेव्हा? त्यामुळे मनातील इच्चा मनात दाबून गप्प लेक्चर ला बसत असे.

            आता पुण्यात राहून जवळपास महिना झाला होता. सर्व स्थिर स्थावर झाल होत. पण कधी लवकर क्लास ला गेलो तरी शेवटच्या बाकावर बसायची सवय लागली होती. नेहमीप्रमाणे मी शेवटच्या बाकावर बसलो होतो, पण आज मात्र काहीतरी मिसिंग वाटत होत. आज क्लास चालू होऊन पण अनु आली नव्हती. तिच्या नेहमीच्या जागी माझी नजर गेली. मी सर्व वर्गात नजर फिरवली ती मात्र कुठेच दिसली नाही. मनात विचार घोळू लागले, का आली नसेल, आजारी असेल काय? नेहमी लवकर येणारी आज क्लास मध्ये नाहीये..! कदाचित आमची मैत्री होण्यासाठी देवाच्या मनात असच कायतरी असेल... आज अनु ला उशीर झाला होता. उशीर झाल्यामुळे अनु शेवटच्या बाकावर माझ्या बाजूला येऊन बसली...! थोड्या वेळापुर्वी विचलित असलेला माझ मन आता खूप गंभीर होऊन शांत बसल होत. हृदय धड धड करत होत. मनात एक वेगळीच भारी फिलिंग होती. बोलायची खूप इच्छा होती. पण खूप भीती वाटत होती. आज मात्र माझ लक्ष कशातच लागत नव्हत. सरांनी शिकवलेला एक एक  शब्द डोक्यावरून जात होता. मी मनातही विचार केला नव्हता अस त्यादिवशी घडलेला, आपल्याला आवडणारी, सर्वाना हवीहवीशी वाटणारी व्यक्ती माझ्या बाजूला बसली होती.  आज तिच्याशी बोलण्याचा योग आला होता. एक महिना तिला लांबून बघण्यातच समाधान मानल होत. क्लास सुटायच्या वेळेला का होईना माझ्या तोंडातून एकदाचे शब्द फुटले.

              हाय... कशी चालेय पूर्व परीक्षेची तयारी...? मी म्हणलो.  “ छान चालेय ! बगू आता पेपर कसा जातोय ते. ती म्हणाली. ओके बाय.. ‘मला जायचय” मी मग माझी इच्छा नसताना बाय म्हणालो आणि ती पुढे निघून गेली.

क्रमशः -