"टिंग टॉंग "दरवाजाची बेल वाजली
"मॅडम आपल्या केक ची ऑर्डर "
"हो थँक क्यू "असे म्हणत केक चा बॉक्स हातात पकडत भावना ने दरवाजा बंद केला आणि आवाज दिला
"पिकू लवकर ये हे बघ मी आज तुझ्यासाठी खास केक आणला आहे आवडला ना तुला अरे तुला काय वाटलं मी विसरले तुझा बडे "
"चला बसा ख्रुचीवर "
पिकू ला खुर्चीवर बसून त्याच्यासमोर भावना ने केक ठेवला आणि त्याला पाहत म्हणाली "माझा आवाज एव्हडा चांगला नाही एक मिनिट हा बडे चे गाणे लावते "असे म्हणून तिनी म्युजिक सिस्टिम ऑन केला आणि हैप्पी बडे गाणे लागले तशी ती त्या मागोमाग म्हणू लागली आणि गाणे बंद होताच तिनी टाळ्या वाजवत पिकूला म्हण्टले
"पिकू केक कट कर नाही जमणार तुला ओके ओके मी येते "असे म्हणत तिनी केक कट केला
आणि पिकूला पाहत म्हणाली "विश यु हैप्पी हैप्पी बडे पिकू असे म्हणून तिनी त्याला केक चा तुकडा भरवला आणि दुसरा थोडा तुकडा आपल्या तोंडात टाकला "
ती पिकू कडे पाहत म्हणाली "पिकू आज तुला दहा वर्ष झाली आमच्या घरात येऊन पण गेल्या पाच वर्ष तू माझ्या खूप जवळ आहे पिकू तू नसतास तर काय झालं असत विचार हि नाही करवत तू माझ्या सुखा दुःखात नेहमी सोबत करतोस तुला पाहिल्यावर मनाला शांतता मिळते आपलेसे वाटते कधी कधी मी तुझ्यावर रागावते पण पिकू ते हि प्रेमानेच नाही का तसे हि मला आणि माझ्याशिवाय तुला आहेच कोण कोणीच नाही पण म्हणून आपण निराश नाही व्हायचे आता पण पण मी बोलत आहे आणि तू फक्त माझ्याकडे पाहत आहेस काहीच बोलत नाही तसे हि तू काय बोलणार जाऊ दे चला आता तुझ्या आवडीचे जेवण मी मागवले आहे ते पटकन खा इथेच बस घेऊन येते "मी असे म्हणत भावना किचन मध्ये गेली आणि बाउल पिकू समोर ठेवत म्हणाली "पिकू मनसोक्त पणे खा"
सकाळचे सहा वाजले नेहमी प्रमाणे भावना उठली फ्रेश होऊन तिनी ब्रेकफास्ट आणि टिफिन बनवला देवाची पूजा करून ती आणि पिकू सोबत ब्रेकफास्ट साठी बसले ती वेळेची पक्की होती त्यामुळे ती नेहमीच्या वेळेवर ऑफिस साठी बाहेर पडली तिनी पिकूला पाहत म्हटले "पिकू चल मी ऑफिस मध्ये जाते तू घरी मस्ती करू नकोस गप्प बसून राहा आणि तुझे दुपारचे जेवण मी ठेवले आहे ते खा मी संध्यकाळी आल्यावर आपण फिरायला जाऊ "असे म्हणत आपली बॅग घेऊन भावना बाहेर पडली तिनी घरच्या दरवाजाला कुलूप लावले आणि जिना उतरत बिल्डिंग च्या खाली आली तिनी पहिले कि कोणी तरी तिच्या स्कूटर काढण्याच्या वाटेवरच कार पार्क केली आहे ते पाहून तिला राग आला तिनी वॉच मॅन ला आवाज दिला तिचा आवाज ऐकून तो पळत आला ""काय झालं मॅडम "?
"काय म्हणून काय विचारतोस हि कोणाची कार आहे मी माझी स्कूटर कशी काढू "
वॉच मॅन ने पहिले तर खरंच वाट नव्हती "अरे हो मॅडम हि तर वाटेवरच आहे एक मिनिट आता चावी घेऊन येतो ते चेअर मेन साहेबाच्या घरी कोणी आले आहे "
कंटाळेल्या स्वरात भावना म्हणाली "बर लवकर कर मला उशीर होईल "
वॉच मेन ने चावी आणली आणि भावना ला रस्ता दिला तसे ती नि गाडी सुरु केली आणि निघून गेली ते पाहून वॉच मेन मात्र मनाशी काहीतरी पुटपुटला
भावना सरकारी कार्यालयात उच्च पदावर कामावर होती तिला बेशिस्त पणा अजिबात आवडत नसे त्यामुळे काही सहकाऱ्याशी तिचे पटत नसे दुपारचे जेवण हि ती काही मोजक्या लोकांच्या सोबत करत असे
ऑफिस सुटल्यावर संध्यकाळी भावना आपल्या स्कूटर वर घरी निघाली आणि काही क्षणात ती घरी पोहोचली स्कूटर व्यवस्थित जागेवर पार्किंग करून ती वर गेली चावीने तिने घराचा दरवाजा उघडला तो आवाज ऐकून पिकू धावत आला त्याला असे धावत आलेले पाहून
"अरे थांब आता आली मी मला माहित आहे आपल्याला आज फिरायला जायचे आहे ते फ्रेश होऊन येते चहा पिते मग जाऊ" असे सांगून ती आत गेली फ्रेश होऊन तिनी आल्याचा चहा केला चहा पिता पिता मोबाईलवर नजर मारली तो पर्यंत पिकू तिच्या शेजारी येऊ बसला होता पिकू सारखा तिच्या तोंडावर पाहत होता हे पाहून " तुला एकदा सांगितले म्हणजे ते केल्याशिवाय पर्याय नाही चला असे म्हणून पिकू ला घेऊन दरवाजा बंद केला आणि चालत चालत दोघे हि जवळ असलेल्या पार्क मध्ये गेले
भावना ने बसण्यासाठी नजर मारली तर एक सोफा खाली होता बाकीचे भरलेले होते पार्क मध्ये लोक खेळत होते तर काही चालत होते
भावना आणि पिकू सोफ्यावर येऊन बसले भावना इथे तिथे नजर मारून त्याच्याशी बोलू लागली पण पिकू मात्र तिला काही उत्तर देत नव्हता तरी हि ती बोलत होती मधेच तिनी पर्स मधून मोबाईल काढला आणि आपली आणि पिकूंची सेल्फी घेतली दोन तीनेक फोटो घेऊन तिनी तो पर्स मध्ये ठेवला आणि पिकू बरोबर पार्क चा एक चक्कर मारून ती घरी निघाली
पण समोर बसलेले मात्र कुजबुज करत होते "ती वेडी आहे का "?
अश्याच एका संध्यकाळी नेहमी प्रमाणे भावना स्कूटर वरून घरी येत होती वाटेत अचानक तिच्या स्कूटर चा टायर पंचर झाला ते पाहता
"अरे देवा ह्याला आणि आताच व्हायचे होते इथे जवळ कुठलाच मॅकेनिक नाही काय करू कशी जाऊ घरी "अशी ती स्वतःशी पुटपुटू लागली तिनी स्कूटर स्टॅन्ड वर लावली आणि तिच्या शेजारी उभी राहिली
एवढ्यात कोणीतरी बाईक वाला तिच्यासमोर येऊन थांबला त्याने आपल्या हेल्मेट ची काच खाली केली आणि भावना कडे पाहत विचारले
"मॅडम काही प्रॉब्लेम आहे का "?
तसे हि भावना चे बोलणे काही मोजक्याच लोकांशी असायचे आणि त्यात हा अनोळखी माणूस भावना ने त्याला पहात म्हटले "काही नाही"
तरी हि त्याने स्कूटर कडे पहिले आणि म्हणाला "मॅडम स्कूटर चा मागचा टायर पंचर झाला आहे आणि तुम्ही म्हणता काही नाही अहो घाबरू नका मी तुमच्याच सोसायटी मध्ये गेल्या आठवड्यात नवीन राहायला आलोय माझे नाव मिहीर देवधर मी तुम्हला सोसायटी मध्ये पहिले आहे कदचित तुम्ही मला पाहायला नसेल "असे म्हणून त्याने हेल्मेट काढले
हे पाहताच भावना ने हलकीशी एक नजर त्याच्या चेहऱ्यावर मारली तर तो चहेरा तिला पहिल्यासारखा जाणवला तरी ती म्हणाली "नाही काही प्रॉब्लेम नाही "
"प्रॉब्लेम नाही कसा तुम्ही मेकँनिक ला बोलवले का कारण इथे मेकँनिक मिळणे मुश्किल आहे "
ह्या प्रश्नावर भावना गप्पच राहिली कारण तिलाच घरी कसे जावे हे समजत नव्हते तिचे ते गप्प राहणे पाहून
"मॅडम तुम्ही बस ने जा मी तुमची गाडी दुरुस्ती करून घरी आणून देतो इथे किती वेळ उभ्या राहाल आणि इथे जवळ मेकँनिक पण नाही मिळणार "
"नाही नको कशाला मी पाहीन काय करायचं ते तुम्ही जा "
"मॅडम मग काय करणार तुम्ही इथेच राहणार का "?
"मी पाहीन काहीतरी तुम्ही या "
ह्या ठिकाणी मेकँनिक मिळणे कठीण होते हे मिहीर च्या लक्षात आले त्याने भावनाच्या चेहऱ्याकडे पहिले तर ती खूप चिंतेत दिसली ते पहाता त्याने ओके असे म्हणून कोणाला तरी फोन लावला आणि त्याच्याशी बोलून लागला फोन ठेवला आणि मिहीर ने भावना कडे पाहत म्हणाला "मॅडम मी माझ्या एका मेकँनिक मित्राला सांगितले आहे तो येईल "
"कशाला उगीच तुम्ही त्रास घेतला मी पहिले असते काय ते मला उगीच कोणाला त्रास देणे आवडत नाही "
"मॅडम त्रास कसला संध्यकाळ होत आली आहे आणि तुम्ही इथे किती वेळ राहणार आणि शेजारी म्हणून मी मदत नको करायला मी थांबतो तुमच्याबरोबर असे म्हणून मिहीर थांबला त्याने भावना शी बोलण्यास सुरवात केली पण एक दोन प्रश्नांची भावना ने उत्तरे दिली आणि गप्प झाली ह्यावरून तो हि गप्प झाला २० मिनिटांनी तो मेकँनिक आला त्याने पंचर काढला भावना ने पैसे दिले आणि तो गेला
भावना ने मिहीरला पाहत थँक्स म्हटले आणि स्कूटर स्टार्ट करून निघून गेली तो हि तिच्या मागेच होता तसे हि घरची दोघांची वाट एकच होती भावना ने गाडी पार्क गेली तो पर्यत काळोख झाला होता तिनी पटकन जिना चढला आणि दरवाजाची चावी काढली आणि पहिली लाईट लावली लाईट उजेडाने अंधारात गोंधळेला पिकू सरळ तिच्याकडे धावत आला
लाइटचा उजेड पडला आणि पिकू धावत भावना जवळ आला भावना पिकूला जवळ करत म्हणाली "सॉरी पिकू मला उशीर झाला तुला काळोखात राहावे लागले अरे पण काय सांगू प्रॉब्लेमच झाला ना वाटेत येताना टायर पंचर झाला ना रे आणि तो अश्या ठिकाणी जिथे मेकँनिक पण मिळणे कठीण होते पण देव पावला आणि तो तिथे पोहचला आपल्या सोसायटी नवीनच राहायला आलाय तो नाव काय सांगितले त्याने हा मिहीर मी नको म्हणत होती तरी हि त्याने आपल्या मेकँनिक मित्राला फोन लावला तो येई पर्यत तिथे थांबला खरंच अनोळखी असून सुद्धा खूप मदत केली नाहीतर मला गाडी तिथेच ठेवून बस ने यावे लागले असते आणि अजून उशीर झाला असता तु काळजी करत होतास ना मला उशीर झाला म्हणून पण तुला कसे कळवले असते पण जाऊ दे मी आता आली ना चल पटकन फ्रेश होऊन येते मग मस्त पैकी आपण जेवण करू असे म्हणून भावना आत गेली
मिहीर आणि भावना एकाच सोसायटी च्या वेगवेगळ्या विंग मध्ये राहत होते दुसऱ्या दिवशी संध्यकाळी मिहीर काही सामान घेण्यासाठी सुपर मार्केट मध्ये शिरला आणि तो आपले सामान घेण्यात मग्न होता एवढ्यात समोर भावना पण काही घेत होती भावना ने मिहीर ला पाहत हाक दिली "मिस्टर मिहीर "
ओळखीचा आवाज कानावर पडला म्हणून त्याने पहिले आणि म्हणाला "अरे तुम्ही "
"हो"
"काही सामान नेण्यासाठी आलो आहे "
"हो का मी पण "
"तर भावना झाली तुमची शॉपिंग "?
"नाही थोडी उरली आहे "
"करा तुम्ही माझे झाले असे" म्हणून मिहीर काउंटर कडे गेला
मिहीर चे बिल होई पर्यत भावना हि काउंटर कडे पोहोचली भावना चे सामान काही जास्त नव्हते मिहीर पैसे देऊन आपले सामान बॅगमध्ये भरले तेव्हड्यात भावना हि तिथे पोहचली तिनी हि आपले सामान बॅग मध्ये भरले आणि निघतच होती कि
मिहीर ने भावना ला पाहत विचारले "आता कुठे घरी कि आणखी कुठे जाणार "?
"नाही नाही घरी जाणार आहे "
"घरीच ना मग इफ यु डोन्ट माईंड तर चला समोर कॉफी शॉप मध्ये कॉफी घेऊ"
"नाही नको कशाला "
"का तुम्हला कॉफी नाही आवडत ओ अनोळखी माणसा बरोबर कोणी पहिले तर समजू शकतो पण मला कि आपल्याला हवे तसे जगावे लोक काय हो हजार बोलतील आणि तसे हि आपण शेजारी"
"नाही तसे नाही मला लोकांशी काही घेणे देणे नाही "
"मग चला तर "
"नाही माझा पिकू वाट पाहत असेल मी निघते "असे म्हणून भावना निघून गेली पण घरी आल्यावर मात्र तिला वाईट वाटू लागले आपण नको म्हण्याला नको होते आपुलकीने विचारले आपल्याला मदत केली आणि आपण सरळ नकार दिला असे ती स्वतःशी पुटपटू लागली
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे ती पार्किंग मध्ये आली पण तिची नजर इथे तिथे पाहत होती एवढ्यात तिला मिहीर आपल्या बाईक कडे येताना दिसला ती लगेच पुढे गेली आणि त्याला पाहत "गुड मॉर्निग मिहीर "
मिहीर ने पण हसत हसत "हो व्हेरी गुड मॉर्निंग भावना "
"सॉरी हा मिहीर तुम्हाला माझा राग आला असेल ना "?
"नाही कशाला राग "?
"नाही काल तुम्ही कॉफी साठी "
"अहो इट्स ओके नाही मला राग आला आणि आपल्या घरी कोण वाट पाहत असेल तर सहाजिक आहे तिथे पोहचणे महत्वाचे आहे माझं तसे नाही ना माझी वाट पाहायला घरी कोणीच नसते म्हणून तर जमेल तेव्हडा वेळ बाहेर घालवतो येतो मी" असे म्हणून मिहीर निघून गेला
भावना मात्र त्याचे ते बोलणे ऐकून गप्पच झाली
संध्याकाळी मिहीर ऑफिस मधून आला त्याने आपली गाडी पार्क केली आणि आपली बॅग घेऊन जिन्या कडे वळला एवढ्यात त्याला हाक आली त्याने पहिले तर हळू आवाजात त्याला पाहत तो म्हणाला "साहेब एक विचारू रागवणार नाही ना "?
मिहीर गंभीर होत म्हणाला "अरे वॉच मेन दादा असे काय म्हणतोस विचार ना काय विचारायचे आहे "
त्याने आजू बाजूला पहिले आणि हळू विचारले "साहेब तुम्ही भावना मॅडम ना पूर्वी पासून ओळखता "?
"का रे "?
"नाही तुम्ही इथे नवीन राहायला आलात आणि आज सकाळी तुम्ही दोघे बोलत होता म्हणून विचारले "
"नाही पूर्वी पासून नाही हल्लीच ओळख झाली आमची पण असे का विचारले "
"साहेब भावना मॅडम सहज कोणाशी बोलत नाही आपल्या सोसायटी च्या कित्येक माणसाना त्या ओळखत हि नसतील माझ्याशी हि कामापुरतेच बोलणे असते अशी व्यक्ती तुमच्या बरोबर बोलत होती ते हि तुम्ही नवीन राहायला आलात म्हणून विचारले "
"काहीच स्वभाव असतो कमी बोलण्याचा दादा त्याला आपण काही करू शकत नाही "
"नाही साहेब ह्याला स्वभाव नाही गुर्मी म्हणतात "
"वॉच मेन दादा असे कोणा बद्द्ल बोलू नये कमी बोलणे म्हणजे गुर्मी असणे असे नाही "
"साहेब तुम्हला काही माहित नाहीह्या सोसायटी तला प्रत्येक माणूस त्याना ओळखतो एकुलती एक लेक आई बाप पण गुर्मीत सतत दुसऱ्यांना खालीपणा दाखवण्यात हुशार आपण काय ते सुशिक्षित आणि आम्ही अनाडी तशी लेक "
ह्यावर हसत हसत मिहीर म्हणाला "वॉच मेन दादा तुमचा ३६ आकडा वाटतो म्हणून एवढ्या रागाने बोलत आहात "
"माझाच का सोसायटी च्या पण खूप जणांचा आहे म्हणून तर एकटी राहते "
"एकटी नाही हो एकटी कुठे कोणतरी वाट पाहत असेल असे ती म्हणत होती "
"काय कोणी नाही घरात आई वडील गुर्मीत गेले हि एकटीच असते घरात कोण वाट पाहणार चला साहेब येतो माझी पाणी सोडण्याची वेळ झाली "असे म्हणून वॉच मेन निघून गेला मात्र मिहीरच्या कानात ते वाक्य परत परत घुमत होते "एकटीच असते घरात कोण वाट पाहणार"
भावना घरी परतली पार्किंग मध्ये आपली गाडी पार्क करून ती जिन्याच्या पायऱ्या चढू लागली आज दिवस भर तिच्या डोक्यात मिहीर चे ते बोलणे घुमत होते ती ने दरवाजा उघडला आत गेली फ्रेश होऊन ती ने किचन मध्ये जाऊन चहा गेला चहा चा कप घेऊन ती सोफयावर बसली तिने पिकू ला पाहत म्हटले "सॉरी पिकू आज आल्या आल्या मी तुझ्याशी बोलले नाही माहित आहे म्हणून तू गप्प बसलास ना पण काय करू रे विचारच असा पडला तुला माहित आहे मी तुला त्या मिहीर विषयी सांगितले होते ना तो रे मला मदत केली त्याने तोच काल काय झालं माहित आहे का मी सुपर मार्केट मध्ये गेले होते ना तो पण होता तिथे आमचे दोघांचे सामान घेऊन एकदाच झाले तसे त्याने मला कॉफी साठी विचारले पण मी नकार दिला आणि तू वाट पाहत अशील म्हणून सांगून मी निघून आले पण मग मलाच वाईट वाटले रे एवढ्या आपुलकीने त्याने विचारले ओळख नसताना एव्हडी मदत केली आणि मी मात्र सरळ नकार देऊन आले त्याला काय वाटले असे म्हणून मी रात्री ठरवले कि त्याला सॉरी म्हणायचे म्हणून सकाळी ना मी त्याला पार्किंग मध्ये पाहत होते एवढ्यात तो आला मी त्याला सॉरी म्हटले पण त्याने जे उत्तर दिले ना ते ऐकून खरंच खूप वाईट वाटले माहित आहे तो काय म्हणाला "तुम्हला घरी वाट पाहण्यासाठी कोणीतरी आहे माझे असे कोणीच नाही म्हणून मी जमेल तेव्हडा वेळ बाहेर असतो "
"पिकू का असेल रे तो एकटा त्याचे ते बोलणे ऐकून मी एकदम गप्पच झाली तुला माहीत आहे आज संपूर्ण दिवस माझ्या डोक्यात तोच विचार चालत होता एकटेपणा किती वाईट असतो ना रे आता बघ मी तुला काहीतरी सांगते आणि तू मात्र झोपून गेलास काय रे पिकू कधी तरी उत्तर दे ना पण पिकू तू आहेस म्हणून मला खूप आधार वाटतो माझा पिकू" असे म्हणून तिनी पिकूला जवळ घेतले
मिहीर घरी आला फ्रेश होऊन गॅलरी मध्ये म्युजिक ऐकत बसला पण वॉच मेन चे ते बोलणे त्याला परत परत आठवत होते तो स्वतःशी पुटपुटला " वॉच मेन दादा तर म्हणत होता कि ती एकटीच असते मग ती तर सांगत होती कोणीतरी वाट पाहणार काय असेल खरे "
एवढ्यात त्याचा फोन वाजला त्याने म्युजिक बंद केले आणि फोन उचला पलीकडून आवाज आला
"तुला भेटायचे होते "?
गंभीर होत मिहीर म्हणाला "का काही विशेष कारण "?
"नाही विशेष काही नाही असेच भेटायचे होते "
"कारण नसताना उगीच भेटणे मला जमणार नाही "
"मी तुला फोन एवढ्या साठी केला कि उर्मीचा पुढच्या आठवड्यात साखर पुडा आहे आणि तिचे म्हणे आहे कि तू यावेसे"
"सॉरी उर्मि ला सांग मी नाही येऊ शकत मला उगीच मोठेपणा नको आणि आपलेपणा हि नको "
"ती तुला फोन करणार आहे पण मला वाटले कि त्या पहिली मी तुला सांगावे तू तिला काहीतरी म्हटले तर उगीच तिला वाईट वाटू नये "
"ओ रिअली सॉरी पण माझे आणि उर्मी चे नाते वेगळे आहे त्यात तुला बॅलन्स करण्याची गरज नाही "
असे म्हणून मिहीर ने फोन ठेवला
काय असेल दोघांच्या आयुष्याची कहाणी ?
अश्याच एका संध्यकाळी मिहीर च्या फोन ची रिंग वाजत होती पण मिहीर गाडी चालवत होता म्हणून त्याने घेतला नाही तो सोसायटी च्या पार्किंग मध्ये पोहचला आणि त्याने मोबाईल पहिला आणि परत कॉल केला
"हॅलो उर्मी बोल "
"हा मिहीर काय रे फोन का रिसिव्ह करत नव्हतास "
"काही नाही बाईक वर होतो "
"ओके ओके मिहीर ऐक माझा आणि सूरज चा साखरपुडा फिक्स झाला आहे आणि तुला यायचे आहे "
"सॉरी उर्मी पण मी नाही येऊ शकणार "
"पण का मिहीर "?
"हे बघ उर्मी "
"मला माहित आहे तुझे न येण्याचे कारण पण मी तुला बोलवते मग तुला काय प्रॉब्लेम आहे "
"उर्मी सॉरी पण मी नाही येऊ शकणार "
"मिहीर एक सांगू का "
"काय "?
"हा दुरावा संपू नाही शकत का काय आहे ना ह्या दुराव्यामुळे आपल्यात हि दुरावा येत आहे "
"उर्मी त्या दुराव्याविषयी मला माहित नाही पण आपल्यात कधी हि दुरावा येणार नाही मी लग्नाला नक्की येईन पण आता फोर्स नको "
"एस युवर विश "
"थँक्स "असे म्हणून मिहीर ने फोन ठेवला आणि झपाझप जिना चढून दरवाजा उघडला
आज जरा भावना ला उशीर झाला होता तरी तिने गाडी पार्किंग मध्ये पार्क करून वॉच मेन ला हाक दिली भावना चा आवाज ऐकताच वॉच मॅन आहे तसा तो पळत आला
"काय झालं मॅडम "?
"हे घे "
"काय आहे मॅडम "
"तुझ्यासाठी माझ्याकडून गिफ्ट "
"पण का मॅडम "
"दादा तुम्ही खूप करता आमच्या सोसायटी साठी "
दादा हे शब्द कानावर पडताच वॉचमन ने भावना कडे पहिले कारण ती त्याला सुरेश ह्याच नावानेच हाक मारायची
त्याचे ते असे पाहणे भावना च्या लक्षात आले ती त्याला पाहत म्हणाली "काय झालं दादा म्हण्टले म्हणून चकित झालात पण सगळे तुम्हला दादाच म्हणतात ना पण मी नाही म्हणायची पण आज पासून मी पण तुम्हला दादा च म्हणार तसे हि तुम्ही माझ्या पेक्षा मोठे आहात दादा हे ठेवा आमच्या सोसायटी ची सुरक्षा तुमच्या हातात असते आणि ती तुम्ही चोख बजावत आलात" असे म्हणून भावना निघून गेली
वॉच मॅन दादा मात्र पाहत राहिले कारण भावना चे असे रूप त्यांनी कधीच पहिले नव्हते
भावना मिहीर च्या एकटेपणा बद्दल विचार करत होती पण त्याच्या घरी जाऊन त्याला विचारावे हे धाडस तिला होत नव्हते तसे हि त्याचे एकमेकांचे नंबर हि नव्हते हीच परस्थिती मिहीर ची होती घरात कोणी नाही तर कोणीतरी वाट पाहत असेल हे ती का म्हणाली ह्याचे उत्तर मात्र त्याला मिळाले नव्हते पार्किंग मध्ये भेटल्यावर हाय हॅलो करून ते निघत होते पण दोघांच्या हि मनात एकमेकांविषयी खूप प्रश्न होते
रविवार चा दिवस उजाडला रविवार असल्याने भावना जरा उशिराच उठली सगळे घरकाम पिकूचे करून तिनी जेवण बनवले दुपारी १ वाजता दोघेही जेवणास बसले पिकूला पाहत भावना म्हणाली "पिकू आज आपण फिरायला जाणार आहोत तुझ्या आवडत्या पार्क मध्ये तुला तिथे मज्जा येते ना मग पटकन जेव थोडी विश्रांति घे मग जाऊ आपण अश्या तिच्या गप्पा चालू होत्या पण एकतर्फी पिकू तिला नेहमी प्रमाणे काहीच उत्तर देत नव्हता
जेवण उरकून तिनी थोडा आराम केला संध्यकाळी ५ वाजता ती आणि पिकू पार्क मध्ये गेले रविवारी पार्क मध्ये गर्दी असते तशीच आज हि होती भावना ने पिकू ला घेऊन पार्क चा एक राऊंड मारावा असे ठरवले तसे ती चालू लागली अचानक तिची नजर एका सोफयावर वर गेली तो माणूस तिला ओळखीचा वाटला तिनी थोडं पुढे जाऊ पहिले तर तो मिहीर होता आणि त्याच्याबरोबर एक मुलगी होती दोघेही गप्पात रमले होते त्याला पाहून भावना पुटपुटली "एकटा राहतो म्हणतो तर हि कोण जाऊ दे आपल्याला काय करायचे आहे" असे म्हणून ती पुढे निघाली तिला तिच्या ओळखीच्या नातेवाईक भेटली भावना ने तिला पाहत हसले पण तिनी तिला न पहिल्या सारखे गेले ते पाहून भावना ने पिकूला पाहत म्हटले "पाहिलंस पिकू त्या काकू ने मला न ओळ्खल्यासारखे केले बघ ना रे सगळे कसे मस्त गप्पा मारत आहे पण माझ्याशी गप्पा मारायला कोणीच नाही मिहीरला मी एकटे समजत होती पण त्याला हि गप्पा मारण्यासाठी कोणी तरी आहे पण मला कोणीच नाही "असे म्हणून भावना चे डोळे भरले
ती मिहीर बसलेल्या सोफ्या जवळ पोहोचली पण मिहीर गप्पात गुंतला होता भावना तशीच पुढे गेली एक रिकामा सोफा दिसला त्यावर ती आणि पिकू बसले ती सगळे पाहत होती लोकांचे हसणे मस्ती करणे तिनी परत एकदा मिहीर बसलेल्या ठिकाणी नजर मारली तर तो अजून हि गप्पात रमला आहे हे पाहून ती नि डोळे बंद केले
एवढ्यात तिला हाक ऐकू आली तिनी डोळे उघडून पहिले तर मिहीर होता त्या बरोबर ती मुलगी होती
मिहीर ने हसत हसत विचारले" भावना तुम्ही इथे आणि असे डोळे मिटून "
"नाही असेच "
"तुम्ही आहात ना इथे कि निघणार "
"नाही आहे ना "
"अच्छा मी येतो हिला सोडून "असे म्हणून मिहीर आणि ती मुलगी गेली आणि अचानक भावना च्या चेहऱ्याचा रंग बदला ती
पिकू ला पहात म्हणाली "हाच तो मिहीर "
थोड्याच वेळात मिहीर परतला भावना ने त्याला जागा दिली तसे तो बसला
भावना ने उत्सुक होत विचारले "रविवारी येता तुम्ही इथे कधी दिसला नाही "?
"नाही नाही मी नाही येत आज फक्त भेटायला आलो होतो आणि तुम्ही दिसला म्हटलं तुमच्याकडे वेळ आहे तर गप्पा गोष्टी होतील "
"ती मुलगी मैत्रीण वाटत"
"हो तसेच काहीतरी "
"मी तुम्हला ओळख करून दिलीच नाही "
"हा माझा पिकू आणि पिकू हे मिहीर ज्यांनी मला मदत केली होती "
"हा पिकू म्हणजे त्या दिवस तुम्ही हा वाट पाहणार म्हणत होता"
"हो हाच तो माझा पिकू खूप जीव लावतो ह्याच्या शिवाय मला आणि माझ्या शिवाय ह्याला कोणीच नाही "
मिहीर ने पहिले तर भावना चे डोळे भरले होते ते पाहून
"भावना तुमचे डोळे भरले काय झालं "
काही नाही असे म्हणून भावना गप्प बसली ह्यावर मिहीर म्हणाला "मला माहित नाही तुमच्या मनात काय चालू आहे पण एक मित्र म्हणून सांगू का तुम्हला तरी पिकू आहे मला सोबत कोणीच नाही "
ह्यावर भावना ने मिहीर कडे पाहत विचारले "मग ती मुलगी कोण "?
भावना ने त्या मुली बद्दल विचारले तसे मिहीर गप्प झाला हे पाहून भावना म्हणाली "सॉरी मला असे विचारायला नको होते "
"नाही इट्स ओके "
"नाही तुम्ही आता पण म्हणाला ना कि सोबत नाही म्हणून मला विचारावेसे वाटले "
"भावना खरंच मला सोबत नाही"
"पण का तुम्हला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही मला सांगू शकता असे म्हणता कि कोणाला सांगितल्यावर मन हलके होते "
मिश्किल भावना कडे हसत मिहीर म्हणाला "बरोबर बोलात तुम्ही कोणाला सांगितल्यावर मन हलके होते भावना तुम्ही आणि मी एकाच एकटेपणाच्या नावेतून प्रवास करत आहोत आज ज्या मुलीला तुम्ही पाहिलं ती माझ्या बायकोची बहीण उर्मी "
"बायको म्हणजे तुमचे लग्न "?
"झाले होते पण ते आता नाही आमचा घटस्फोट झाला"
"काय "?
"हो भावना दोन वर्षांनी पूर्वी आम्ही वेगळे झालो "
"काय पण तुमच्या सारख्या माणसाबरोबर असे व्हावे काही कारण आणि तिची बहीण तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये "
"तिची बहीण मला बहीणीच प्रमाणे आमचे नाते घटस्फोटानंतर हि कायम राहिले एका मोठ्या भावा प्रमाणे ती माझ्याशी मन मोकळेपणा ने बोलते आणि ह्या घटस्फोटात आमच्या दोघांची चुकी होती त्यामुळे तिनी माझ्याशी नाते नाही तोडले पुढच्या आठवड्यात तिचा साखरपुडा आहे आणि तिचे म्हणे असे आहे कि मी तिथे यावे "
"काय "?
"हो पण मी नाही जाणार "
"मग तुमच्या बायकोला माहीत आहे "
"हो तिला माहित आहे कि मला तिने बोलावले आहे म्हणून मला तिथे नाही जायचे "
"पण काय कारण होते तुमच्या घटस्फोटासाठी "?
"गुर्मी ज्याला आपण इगो म्हणतो तो आमच्या नात्यात पसरला आणि अवघ्या दोन वर्षात आम्ही सहमतीने वेगळे झालो आता कधी हि भेटतो पण तो आपलेपणा नाही राहिला "
"मग तुम्ही दुसरे लग्न "?
"नाही परत त्यात पडणे नाही तिने हि नाही केले पण तिच्या बहिणीला वाटते कि आम्ही एकत्र यावे पण ते अशक्य आहे तेच मला समजावत होती पण मी तिला नकार दिला "
"पण त्या वेळी तुम्ही समजून घेतले असते तर हे टोकाचे पाऊल "
"काय असते ना भावना समोर चा माणूस जर ऐकायला तयार नसेल तर आपण सांगून हि फायदा नाही असेच झाले त्या दिवसापासून मी एकटा राहतो "
"आई बाबा "?
"गावी असतात त्यांना माझ्या दुसऱ्या लग्नाची चिंता लागली आहे पण मी त्याना सांगितले कि मला लग्न नाही करायचे "
"घटस्फोट होऊन हि कधी तुम्ही भेटता म्हणजे प्रेम अजून हि आहेच "
"प्रेम खूप करायचो रीतसर कांदे पोहे खाऊन आमचे नाते जुळले आजही आठवतो तो दिवस जेव्हा मी तिला पहिल्यादा पहिले होते पाहताच क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो मग काय आमचे लग्न झाले आणि ते प्रेम बहरले एवढे कि आम्ही एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हतो ह्यातच १ वर्ष केले ती पण एका मल्टि नॅशनल कंपनीत कामाला होती माहित नाही कुठे ठिगणी पडली आमचे वाद एकमेकाला आपण स्वतः हुन वेळ देत नाही म्हणून झाला प्रत्येक वेळी मीच का वेळ काढावा तू हि काढ हा इगो तयार झाला आणि तो वाद एव्हडा वाढला कि काही दिवस आम्ही सोबत असून सुद्धा एकमेकांशी बोलत नव्हतो मग एके दिवशी ठरवले कि सहमताने आम्ही वेगळे झालो आणि त्या प्रेमाची कहाणी अपूर्ण राहिली दोन्ही घरातून आम्हाला समजवण्याचा खूप प्रयन्त केला पण आम्ही मागे हटलो नाही वेगळे झालो कायमचे एका सही ने आमचे प्रेम संपून टाकले आम्ही एवढे प्रेम करायचो कि कधी स्वप्नात हि वाटले नव्हते कि आम्ही वेगळे होऊ "
असे म्हणून मिहीर ने आपले अश्रू पुसले ते पाहता भावना म्हणाली
"सांभाळा स्वतःला ह्या हसऱ्या चेहऱ्यामागे एवढे दुःख लपले आहे हे आज कळले "
"रडून तरी काय करू गेलेले दिवस परत आणू नाही शकत म्हणून स्वतःला खुश आणि आनंदित ठेवण्याचा प्रयन्त करत आहे "असे म्हणून मिहीर हसू लागला
रडवेल्या चहेऱ्यावर चे हसू पाहून भावना ला मात्र विचित्र वाटले ती त्याला पाहत म्हणाली "आपल्या दोघांच्या आयुष्यात गुर्मी नेच मार दिला माझी आयुष्याची कहाणी ह्या गुर्मीवरच बेतली "
काय असेल भावना ची कहाणी ?
"मिहीर माझे आयुष्य गुर्मितच केले गुर्मी खूप वाईट असते त्याचे परिणाम खूप वाईट होतात माझे आई बाबा दोघेही सरकारी नोकरी वाले आणि मी एकुलती एक माझे आई बाबा नेहमी आपल्या स्तराच्या लोकांशी बोलायचे कोणाशीही त्याना बोलायला त्यांना आवडायचे नाही तीच सवय मला लागली मी लहान पणापासून आई बाबा नि सांगितलेल्या मुलाशीच मैत्री केली ह्या सोसाय टीत हि आम्ही एवढे रुळत नव्हतो मोजकेच लोक आमच्या संपर्कात होते अशीच मी मोठी होत गेले अश्या निवडक स्तराच्या मैत्री मुळे माझ्याकडे हक्काची मैत्रीचं राहिली नाही कि काही भरभरून बोलावे असे त्यात कॉलेज झाले कॉलेज आयुष्य मी भरभरून नाही जगले नेहमी स्तरासारखे वागावे हेच डोक्यात हिंमतीवर नोकरी मिळवली माझे आई बाबा खुश झाले आणि मला हि थोडा गर्व झाला नातेवाईक हि आमच्या घरी तसे कमीच असायचे आयुष्यात आपलेपणा गरजेचा असतो हे तेव्हा कळले नाही आपण श्रेष्ठ बाकीचे मूर्ख ह्यातच मी जगत होते "
स्वतः बद्दल असे वाईट बोलले पाहून "भावना तुम्ही स्वतःला दोष देत आहात ""?
"हो मिहीर ऐकून तुम्हला आश्चर्य वाटेल पण मी स्वतःला दोष देत आहे कारण आता मला कळून चुकले कि मी आयुष्यात काय गमावले आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून मी आता एकटीच राहिले "
"तुम्ही लग्न का नाही केलं "?
"मिहीर प्रेमाची गरज आपल्या आयुष्यात किती असते ना हे मला आता कळते पण वेळ निघून गेली आहे "
"म्हणजे "?
"तेव्हाच जर मी गुर्मीत नसते तर आज माझं आयुष्य खूप सुंदर असते काही वर्षांपूर्वी मिहीर माझ्या ऑफिस मध्ये माझा एक सहकारी माझ्या पेक्षा पोस्ट ने जरा लहान तो माझ्यावर प्रेम करायचा दिसायला चांगलाच होता आणि एक दिवस त्याने मला विचारले त्याचे ते वाक्य पूर्ण होण्याआधी मी त्याला नकार न देता त्याचा असा अपमान केला कि त्या बिचाऱ्याने कधीच नजर करून बोलला नाही आणि लवकरच त्याची बदली झाली झाली नसेल मुद्दाम त्याने करून घेतली असेल "
"का तो मुलगा स्वभावाने चांगला नव्हता "?
"नाही नाव ठेवण्यासारखे काहीच नव्हते त्यात खूप प्रामाणिक आणि आदर ठेवणार होता "
"मग तुम्ही त्याचा अपमान का केला "?
"मी त्याच्या वरचढ पोस्ट वर होती त्यामुळे गर्व होता आणि त्याच गर्वात मी त्याचा अपमान केला पण त्याने एक शब्द हि काढला नाही गप्प निघून गेला एक महिने त्याने कसे बसे काढले आणि त्याची बदली झाली त्यांनी मुद्दाम केली असेल "
"मग तुम्ही लग्न का नाही केलं "?
"लग्न स्थळलाच्या बाबतीत तसेच झाले येणाऱ्या स्थळ कडून एक तर माझ्या आई बाबांना नाहीतर मला खूप अपेक्षा होत्या ह्यात स्थळे नाकारत गेली आणि सगळी कडे आमचा स्वभाव कळलं मग स्थळे येणे बंद झाली तरी हि मला ह्या सर्वांचे काहीच वाटत नव्हते पण एक दिवशी मात्र सगळे संपलेच आई बाबाचा असिडेन्ट झाला आणि त्यातच ते दोघे गेले राहिले ती फक्त मी एकटी सगे सोयरे आले आणि कार्य करून निघून गेले मात्र माझ्या साठी माझे दुःख कमी करण्यासाठी कोणीच थांबले नाही त्या तश्या अवस्थेत मला एकटीला सोडून गेले थांबणार कसे आम्ही कधी त्याच्याशी प्रेमाने बोलोच नाही त्या दिवसा पासून हा पिकू माझा सोबती झाला त्याला आमच्या घरात येऊन १० वर्ष झाली पण त्याची साथ मला ह्या पाच वर्षांत खूप झाली ते दुःखाचे दिवस मी पिकू बरोबर घालवले त्या दिवसापासून आज पर्यत पिकूंच माझं सर्वस्व झाला लोक मला हसतात कि काय वेडी हि कुत्र्या बरोबर बोलते पण पिकू न बोलता हि सगळे समजू घेतो आधार वाटतो मला त्याचा पूर्ण घरात फक्त तो आणि मीच असतो आता कळते कि आपलेपणा काय असतो माझ्याकडे पैसे आहेत पण ते आनंदाचे क्षण घालावण्यसाठी आपली माणसं नाहीत शेजाऱ्यांशी बोलावे तर कोणी नाही हक्काची अशी मैत्रीण नाही कोणीच नाही पण आता मला वाईट वाटले तरी हि मी काही च करू शकत नाही म्हणून मी स्वतःला समजावते कि पिकू च माझा आपला आहे बाकी कोणी नाही "असे म्हणून भावना रडू लागली
तिचे ते पश्तापाचे बोलणे पाहून तिला समजावत मिहीर म्हणाला "हे बघा भावना ह्यात तुमची काहीच चूक नाही तुम्हला बालपणीच जे शिकवण दिली त्या वर तुम्ही चालत आलात पण मोठेपणी तुम्ही थोडा विचार करायला हवा होता पण आता आपण काहीच करू शकत असे नाही तुम्ही स्वतःला बदला लोकात मिसळण्याचा प्रयत्न करा माहित आहे पहिली ते काही बाही बोलतील पण त्यांना पण हळू हळू कळेल कि तुम्ही बदला आहात काय असते ना जसे पेराल तसेच उगवेल तसेच तुमच्या बाबतीत झाले आणि हो आजपासून हा मित्र तुमच्या सुख दुःखात पिकू बरोबर नेहमी असेल "
मिहीर चे ते बोलणे ऐकून आपले डोळे पुसत भावना म्हणाली "खरंच तुम्ही माझे मित्र व्हाल "?
"का नाही भावना तुम्ही किती चांगल्या आहात स्वतःची चूक कबूल करून पुढे जाणे ह्याला खरी माणुसकी म्हणतात"
"थँक्स मिहीर तुमच्याशी बोलून बरे वाटले एवढे दिवस मनात साचलेले आज बाहेर आले खूप सांगायचे होते पण ऐकण्यासाठी कोणीच नव्हते "
"मग आज पासून आपण एकमेकांचे सुख दुःख मनसोक्त वाटून घेऊ त्या साठी तुम्ही मला फक्त मिहीर म्हणा एकेरी नाव कसे आपलेपणा येतो "
"तुम्ही पण मला भावनाच म्हणा "
"हो" असे म्हणून दोघेही हसू लागले आणि पिकू ला भावना ने जवळ केले
*****************************समाप्त*************************************************************