रंग तिच्या प्रेमाचा - भाग २ chaitrali yamgar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रंग तिच्या प्रेमाचा - भाग २

त्याच शेवटचं वर्ष यातच जात ...तिचा नकार जरी असला तरी ही तो तिला कायम मदतीला धावुन यायचा...मग एखाद्या विषयच्या नोट्स असु किंवा प्रोजेक्ट..असु तिचा...तो कायम तिला मदत करायचा... कॉलेज मध्ये बापाच्या पैशावर माज न दाखवता तो कायम शिक्षकांच्या मनात आपल्या अभ्यासाच्या प्रगतीतुन लक्षात रहावा हाच त्याचा अट्टाहास ... त्यामुळे शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी....

कॉलेज सोडताना त्याने शिक्षकांना तिच्याकडे लक्ष असु द्या सांगितलं आणि त्यांनी ही प्रेमाने होकार कळवला...शिक्षक त्याला दिलेल्या शब्दांप्रमाणे तिच्यावर लक्ष ठेवून होते पण हा ही अधुन मधुन तिची विचारपुस त्यांच्याकडून नकळतपणे करत होता...तिला आपल्या नोट्स त्याने तिच्या मैत्रिणींद्वारे दिल्या होत्या दुसर्या वर्षाच्या ...पण याची काळजी घेत होता कि कुठेही त्याच नाव येणार नाही... त्यामुळे ह्या सगळ्यांपासुन ती अनभिज्ञ होती...

दिवाळीच्या सुट्टीत अचानक तिच्या बाबांनी तिला एक दिवस अचानक एक स्थळ चालून आल्याने गावी बोलावुन घेतलं....तिला नकार द्यायचा होता स्थळाला पण तसं करता येणार नव्हतं....तरी ही बाबांना तिने सांगितलं तेव्हा त्यांनी कारण विचारलं तर तिला काय सांगाव ते कळालं नाही म्हणून तिने खोटंच सांगितलं कि तिला एक मुलगा आवडतो...फोटो दाखव म्हणताच ती मोबाईल मधला एक फोटो दाखवते घाईघाईत जो नेमका तिचा व त्याचा ( देवांग ) असतो ...बाबांना काय बोलावं कळत नाही...ते तर तोंडात बोट घालतात.. तिला एक सरप्राइज आहे असं सांगुन तयार व्हायला लावतात...

ती ही जबरदस्ती तयार होते... संध्याकाळी ठरल्याप्रमाणे पाहुणे येतात....आणि नवरा मुलगा खुद्द देवांग चं आहे पाहुन आता ती तोंडात बोट घालते...तिला आता कळत कि दुपारी बाबांनी तिच्या तोंडात का बोट घातलं होतं...सगळं मग व्यवस्थित होत...दोन्ही घरच्यांना मुलगा आणि मुलगी पसंत पडतात ....आता तिला नाही ही बोलता येत नसत... त्यामुळे तिचा लग्नाला होकार येतो...आतुन का माहित नाही पण ती आज खुप खुश असते...कदाचित लग्न आपल होतं आहे हे कळाल्यामुळे होणारा आनंद असेल...आणि फायनली दोघांच्या पसंतीने महिनाभराची तारीख ही काढली जाते...



आपल्याच खोटं बोलण्याने आपण अडकलो आहोत ... त्यामुळे आता हे लग्न करणं मस्ट आहे असा विचार करत ती रात्र तशीच घालवते...या महिनाभरात त्याचे बाबा त्या दोघांना जाणुन घेण्यासाठी महिनाभर भेटायला लावतात...तिच्या आवडी निवडी जाणुन घ्यायला...आधी न आवडणारा देवांग मात्र हळुहळु तिला आवडू लागतो ...या मुलाखतीत...आणि न कळत का होईना तिचं ही त्याच्यावर प्रेम जडतं...पण तिला आता वाटू लागतं कि ती ओढ ...ते प्रेम...आता त्याच च आपल्यावर नाही...त्याच्या डोळ्यांत काहीच भाव दिसत नसल्याने....याबाबत एक दिवस ती बोलायचं ठरवते ....पण तो ते तिला तसं वाटणं धुंडाळून लावतो...आपण उगाचच नाही तो विचार करतोय ...असा विचार करून ती त्याच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्ने रंगवायला लागते... कधीकाळी याला पडणारी तिचं स्वप्ने ....त्याला तिच्या डोळ्यांत दिसायला लागतात....तो खुश झाला असता...पण आता त्याला तिचं आपल्यात अडकणं म्हणजे गुन्हा वाटायला लागतो...ती ते स्वप्न पाहत आहे जे कधीच पुर्ण होणार नाही ह्याची त्याच्या मनात खंत असते....



देवांग च्या बाबांनी जेव्हा त्याला एक गोष्ट करायला सांगितली...तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन च सरकली....आज पहिल्यांदाच त्याचे बाबा...महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ...मिस्टर साने...आज त्याच्यापुढे ...झोळी घेऊन उभे होते...जे द्यायला ते सांगत होते...ती त्याची हृदयाची धडधड होती...जान होती...ह्या जगात जगायला एक असलेलं कारण होतं...आणि आज तेच सर्वस्व मागत होते...त्याला एक फोटो दाखवला गेला ...आणि तिच्याशी लग्न करायच आहे असं सांगितले गेले...लग्न हा शब्द ऐकुनच तो ईतका गोठून गेला होता कि ...त्याला काय बोलावं कळत नव्हतं ....पण शेवटी बापाचं प्रेम जिंकल...आणि फोटो न बघता तो मुलगी बघायला तयार झाला...मुलगी जेव्हा पहायला गेला...तेव्हा आनंदाला थारा राहिला नाही...कारण तीच समोर ...जी त्याची जान होती...बाबा आपला किती भारी आहे...आपली जान... आपल्याला वापस करत आहे ह्या विचाराने हरखुन गेलेला तो.....पण त्याचवेळी त्याला जेव्हा बापाने परत एकदा झोळी पसरवुन ...हे सांगितले कि हे सर्व नाटक महिनाभरासाठी करायचं आहे...कारण हिचा नवरा तो नाही ...तर त्याचा मोठा भाऊ विहान असेल..हे ऐकुन चं त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती...आणि म्हणूनच तिला पाहून क्षणभरासाठी हरकलेला देवांग परत निर्विकार झाला होता....बाबाच्या ईच्छेसाठी...



क्रमशः