हि कथा संपूर्णतः काल्पनिक आहे. कथेतील सर्व पात्रे,त्यांची नावे,प्रसंग,गाव ,राज्य वैगेरे माहिती काल्पनिक असून जिवीत अथवा मृत व्यक्ती किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही आणि असेल तर तो एक संयोग असावा ,हि कथा फक्त करमणूकी साठी लिहिली आहे.
*सावत्र पिता*..आणि.."देवा माणूस*
विमु..
विमल पुंडलिक खरे..उर्फ विमु
लग्नानंतर
सौ.
विमलताई नारायणराव शेळके उर्फ .विमु....
विमलताई घरात एकट्याच होत्या. नवरा नारायणराव कामावर गेले होते
आज विमलताई फारच उदास दिसत होत्या. त्याच काय कारण आहे ते शोधण्याचा प्रयत्न करीत होत्या. कोणत्याच कामात मन लागत नव्हते. घर जणू खायला येत आहे असे वाटायचं. दिवाण खाण्यात साडीचा पदर दोघी हातानं चोळत एक कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात चकरा मारीत होत्या. निराशेचे कारण शोधत होत्या पण कारण सापडेना. असं कधी च त्यांना वाटलं नव्हतं.
संध्याकाळ झाली होती. विमल ने देवाकडे दिवे लावले. देवाचं नाव घेतलं. मग स्वयंपाक घरात जाऊन रात्रीचे जेवण बनवत होते. तरी पण मनात काय चालले होते ते कळत च नव्हते.
आज नवरा" मी रात्र उशिरा येणार" असं सांगून गेला होता.
आजच का उशिरा ? आज लवकर यायचं होत त्या ऐवजी उशिरा?
खिन्न मनाने मनातल्या मनात विमलताई विचारायला लागल्या.
स्वयंपाक पण आटोपला होता.कोणतेच काम उरले नव्हते.आता काय करू? कसा वेळ घालवू? विचार करत बसली.
वेळ पसार करण्यासाठी सोनलच्या लग्नाचा अल्बम घेऊन लग्नाचे फोटो बघायला लागल्या.
एक एक फोटो बारकाईन बघत होत्या. किती दिवसा पासून एवढा वेळ मिळाला.लग्न झाल्या नंतर पण फोटो व्यवस्थित बघितले नव्हते.
फोटो बघता बघता एका फोटो वर त्यांची नजर स्थिर झाली. फोटो वरून हाथ फिरवीत होते. मनात काहीतरी बडबड करीत होते. फोटो बघता बघता त्यांना भूतकाळातील आठवणी नजरे समोर आल्या. चित्रपटातल्या दृश्य सारखे एक एक दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागले.
पुंडलिक खरे आणि भिमाताई खरे ह्यांची एकुलती एक देखणी,हुशार आणि संस्कारी मुलगी ती विमु म्हणजे विमलताई.
त्यांचे बाबा म्हणजे पुंडलिकराव एका दुकानावर जमा खर्च लिहायचे. घरची परिस्थिती चांगली होती. स्थावर मिळकत आणि शेती पण होती. पैशांची तूट नव्हती.
त्यांच्या वडिलांनी त्यांचे खूप लाड केले होते. लाडक्यात वाढलेली विमु बघता बघता वयात आली.
ग्रेज्युयेट झाल्यानंतर शहरात एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करायची. नोकरीला दोन वर्ष होऊन गेली होती. तिच्या बापाने आता चांगला मुलगा शोधण्यास सुरुवात केली होती. शोधण्यात दिढ वर्ष झाली पण योग्य मुलगा दिसला च नाही.
मॅरेज ब्युरो मध्ये पण नाव नोंदले गेले.तरी पत्ता लागत नव्हता. एकदा एका मॅरेज ब्युरोतून फोन आला. आई,बाबा आणि विमु तिघं जणी मॅरेज ब्युरो मध्ये गेले. त्यांना अल्बम दाखविला. मुलीच्या लायकीचे मुलांचे फोटो आणि बायोडेटा बघितला. एका फोटोवर त्यांची नजर अडकली. दोन वेळा बायोडेटा वाचला,फोटो पण बघितला. विमु ने पण फोटो बघितला. एकमेकांशी चर्चा केली आणि त्या मुलावर शिक्का मोर्तब केला.
विमलचे बाबा पुंडलिकरावांनी मुलाच्या बापाशी संपर्क केला. मुलगा त्याचे आई बाप विमुला बघायला आले. मुलगा आणि मुलगी ला एकमेकांशी खाजगीत बोलण्यासाठी सावकाश वेळ देण्यात आला. दोघांनी एकमेकांना जे काही विचारायचं होत ते विचारले. बघण्या चा कार्यक्रम आटोपला होता.
गोपाळराव ,पत्नी आणि मुलगा संपत घरी जाण्यासाठी उभे झाले.
" निघतो आम्ही पुंडलिकराव. दोन तीन दिवसात कळवतो तुम्हाला.
" ओ.के.गोपाळराव. आम्ही पण थोड विचारतो. विमल च काय मत आहे ते आम्ही जाणून घेतो.जे असेल ते तुम्हाला कळवतो."
दोन दिवसांनी मुलाच्या बापानं कळवल की संपतला तुमची मुलगी विमल पसंद आहे.
विमलच्या बापानं पण सांगितलं की आमच्या विमुला पण तुमचा मुलगा पसंद आहे.
लगेच दोन दिवसांनी साखर पुडा करण्याचे ठरवले गेले.त्या प्रमाणे एकदम साध्यात साखरपुडा संपन्न झाला. सहा महिन्यांनी लग्न पण आटोपले.एकुलती एक मुलगी असल्याने पुंडलिकरावांनी धूम पैसा खर्च केला होता.
जावई संपतराव एका कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर होते. पगार पण तगडा होता. विमुची नोकरी पण चालूच होती.
राजा राणी सारखं त्यांचा संसार होता. लग्नाच्या दुसऱ्या वर्षी च विमुला नवी जुनी होती. घरात पाळणा झुळणार होता.सर्व जण आनंदात होते. विमलने येणाऱ्या बाळा चं नाव पण विचारून ठेवले होते. मुलगी झाली तर.." सोनल" आणि मुलगा झाला तर.."सुशील"
त्यांचा नवरा संपतला मुलांच्या नावा बाबतीत काहीच विरोध नव्हता.
नवव्या महिन्यात सोनल चा जन्म झाला. सोनल हळू हळू पालथे होऊ लागली होती. तिच्या हरकतीने विमल फारच खुश व्हायची. संपत रात्री कामा वरून घरी आला म्हणजे सोनलशी खेळायचा. बघता बघता सोनल दोन वर्षाची झाली होती. माणसांना थोड थोड ओळखायला लागली होती.
एके दिवशी संपतच्या ऑफिसातून फोन आला की संपतला ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. बंद पडलेली मशीन दुरुस्त करता करता दुसरे मशीन त्याच्या अंगावर पडले. दोघं पाय कामातून गेले होते. एक हाथ तुटला होता. डोक्यावर जोरदार मुका मार लागला होता. मेंदूची नस तुटली होती. रक्त प्रवाह बंद झाला होता. ब्रेन डेड झालं होत.रक्त बरेच वाहून गेलं होत. आई सी यु मध्ये होता. वाचण्याची शक्यता बिलकुल नव्हती.
तब्बल दहा रात्री आणि अकरा दिवस आई सी यू मध्ये होता. नंतर कोमात चालला गेला होता. बावीस दिवस कोमात होता. विमलची परिस्थती पण वेड्या सारखी झाली होती. दोन वर्षाची चिमुकली सोनलला मांडीवर घेऊन वेड्या सारखी बसून रहायची. सोनल कडे तीच बिलकुल लक्ष नव्हते.नातेवाईकांनी बरेच समजावले.
शेवटी तो दिवस आला च..जो नाही यायला पाहिजे होता. विमल च कपाळावरच कुंकू पुसल गेलं,काचेच्या बांगड्या तुटल्या, सफेद साडी नेसवली. अवघ्या ३०व्या वर्षी च भर तारुण्यात वैधव्य मिळालं. फारच दुर्भाग्य विमल च. विमल ने स्वतःला कसेबसे सावरले.
विमल आणि सोनल घरात एकटे च होते. विमलला तिच्या आई बाबांनी थोड्या दिवसांसाठी माहेरी बोलावून घेतले. एक महिना राहिल्या नंतर परत ती सोनलला घेऊन स्वघरी आली. तिच्या समोर स्वतःच आणि चिमुकली सोनल च भविष्य आ वासून उभे होते.
काय करावं आणि काय नाही काहीच सुचेना. संपतला हे जग सोडून जायला अढी च वर्षे होऊन गेली होती.सोनल पण पांच वर्षाची झाली होती. तिला तीच भविष्य सतावत होत. वडीलधार्या माणसांनी पुन्हा लग्न करून घ्यायची सल्ला दिला. तिला हा सल्ला रूचेना पण..अनेक प्रश्न तिच्या मनात उद्भवले
तिच्या एका काकांनी समजावले," विमल , तुझ्या साठी नको पण चिमुकल्या सोनल चा विचार कर.तीच भविष्य काय आहे? कसं आहे? ते विचार.लागल्यास तू अजून दोन तीन महिने विचार नंतर निर्णय घे."
तिला भविष्याची फार मोठी मंजिल तय करायची होती. कोणाचा तरी आधार पाहिजे होता.शेवटी तिने नाखुश होऊन पुन्हा लग्नाला मंजुरी दिली.
"पण काका माझी एक अट आहे. माझ्या सोनल ची जबाबदारी घेईल का? माझी नाही घेतली तर चालेल पण सोनल ला तो स्वीकारेल का? आमच्या दोघींच्या सुरक्षेची हमी देईल का?" विमल ने प्रश्न केला
"आम्हाला सुरक्षा देईल, सोनलला मुलगी म्हणून स्वीकारेल याची काय हमी?" चिंतेने विमल म्हणाली.तिच्या बोलण्यात गंभीर पणा जाणवत होता.
काकांनी तिला विश्वासात घेत सांगितले "ते सर्व बोलण माझं झालंय मुलाशी. तो तयार आहे.तुझा काय विचार आहे ते कळव फक्त."
विमलचे पुनर्विवाह नकुलशी झाले. सोनल तेव्हा पाच वर्षाची होती.
विमलच्या मनाला अजूनही शंकेची सुई टोचत होती. १००% विश्वास नव्हता. दुसरा नवरा नकुल कसा निघेल? दारुड्या,सट्टेबाज,निष्काळजी तर नाही ना निघणार? वगैरे वगैरे ती विचारायला लागली. तिचं हे विचारणं स्वाभाविक च होत.
नकुल ला ती रोज संशयित नजरेने बघायची.
विमलच्या काकांच्या सांगण्या वरून विमल आणि सोनलच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी
नकुलने दोघं माय लेकीच्या नावावर ५-५ लाखांची एफ डी बेंकेत ठेवली होती.
सोनलला शाळेत दाखल केलं. सोनल हळू हळू शिकू लागली,हुशार होऊ लागली.एक एक पाऊल पुढे टाकत होती.
रात्रीचे जवळ जवळ दहा वाजले होते. अचानक घराची बेल वाजली. बेलच्या आवाजाने विमलची विचार शृंखला तुटली. ती भूतकाळतून वर्तमान काळात आली. थोडी कावरी बावरी सारखी दिसत होती. लवकर लवकर जाऊन दरवाजा उघडला .समोर नकुल उभा होता. नकुल घरात आल्या बरोबर लगेच त्याला आलिंगन दिलं आणि रडायला लागली. नकुलने तिला अगोदर शांत केले. तिला विचारता विमल फक्त एवढच बोलली की,
" काही नाही हो.बस मी सोनलच्या भविष्याचा विचार करीत होती."
" हो का.." बस नकुल एवढच बोलला. या शिवाय काहीच उत्तर दिलं नाही.
नकुल पासून तिला ही अपेक्षा होती की ह्या बाबतीत नकुल काहीतरी बोलेल, सल्ला देईल पण तसं काहीच बोलला नाही. नकुल च थोडक्यात दिलेलं उत्तर ऐकून विमल फारच निराश झाली.
विमल ला नकुल विषयी फक्त एवढंच माहित होत की तो बीजवर आहे. त्याची पहिली बायको चांगली नव्हती म्हणून नकुल ने तिच्याशी घटस्फोट घेतला होता. सविस्तर तिन कधी नकुल ला विचारलं नव्हतं.
नकुल शी रहावलं गेलं नाही. आज विमल ला पहिल्या लग्नाची करुणांतिका सांगून च टाकतो असं विचारून त्याने सांगायला सुरवात केली.....
*****************************************************************
नकाहो...
.म्हणजे ..नकुल काशिनाथ होबाळे
विमल चा दुसरा नवरा.
माझी पहिली बायको चंचल नावा प्रमाणे चंचल होती. तिचं संपूर्ण लक्ष घराबाहेर च होत. पुरुष मित्रांबरोबर फिरण,मैत्रिणी बरोबर धमाल करणे, पार्टीला जायचं, सिनेमा बघायचा , हॉटेलात खायचं हे जणू तीच दैनंदिन होत. रात्री कधी वेळेवर यायची नाही. कधी कधी तर दारू पण पिऊन भलत्या रात्री घरी यायची.
मी एकदम साधा आणि सरळ स्वभावाचा संस्कारी मुलगा. देखणा, तरणाबांड मी माझ्या आई बाबांचा एकुलता एक मुलगा. माझे आई बाबा पण माझ्या बरोबर राहायचे. मी पण एका कंपनीत उच्च हुद्यावर चांगल्या पगाराची नोकरी करायचो. बायकोच्या वर्तणूकने मी फार कंटाळलो होतो. अनेक वेळा मी तिला समजावले पण ती काहीच समजायला तयार नव्हती. कित्येकदा आमचं ह्या बाबतीत भांडण झाली होती. शेवटी कंटाळून मी घटस्फोट घ्यायच नक्की केलं. मी ह्या बाबतीत आई बाबांशी चर्चा पण केली आणि त्यांनी पण हो सांगीतलं.
आज पुन्हा ती चिक्कार दारू पिऊन रात्री एक वाजता घरी आली होती. दारूच्या नशेत असल्या कारणाने मी काहीच बोललो नाही. सकाळी उठल्यावर तिच्याशी बोलणं चालू केलं. बोलण्या बोलण्या वरून भांडण झालं.
रागाच्या भरात चंचल बोलली, " हे बघ नकुल , मी अशीच राहणार आहे. तुला नसेल पटत तर.....
तर...? तर.. काय???? प्रश्नार्थक चेहरा करून मी बोललो . मी मनात समजून गेला की चंचल कोणत्या आशयाने बोलत आहे. मला फक्त तिच्या तोंडून ऐकायचं होत.
" बोल पुढं काय..तर...च्या पुढं काय?"
"मला तुझ्या पासून वेगळं व्हायचंय आहे .म्हणजे तू समजला असशील च"
" वेगळं?? स्पष्ट बोल"
"मला तुझ्या पासून घटस्फोट घ्यायचा आहे.आपल दोघांचं काही जमणार नाही."
" माझ्या मनातलं च तू बोलली . आज आणि आताच जाऊ या वकीला कडे" नकुल बोलला.
"हो चल,मी यायला तयार आहे. संपव एकदाची कटकट.तू पण मोकळा आणि मी पण मोकळी"
एवढं बोलून चंचल फटाफट तयार व्हायला गेली. त्याच्या पाठोपाठ मी पण गेलो. दहा मिनिटातच आम्ही दोघं तयार होऊन रीक्षेने वकिलाच्या ऑफिसात साडे दहाला पोहोचलो.
वकिलांनी दोघांचं बोलण शांततेने ऐकलं. नंतर थोडा वेळ विचार केला आणि दोघांना सल्ला दिला
" बघा,घटस्फोट घेणं इतकं सोपं नाही जेवढं बोलण सोपं आहे. एक संधी देतो तुम्हाला आपापसात समजुती साठी. एक महिन्याची मुदत देतो. आपापसात समजुती करून घ्या. माघार घेऊन घ्या."
" नाही वकील साहेब.मला माघार घ्यायची च नाही. मला घटस्फोट च हवाय." चंचल भार देऊन म्हणाली
"तुमचं काय म्हणणं आहे नकुल"?
वकिलांनी मला प्रश्न केला.
"साहेब,जशी तिची ईच्छा तीच माझी पण.ती जर माघार घ्यायला आणि समजुती साठी तयार असेल तर माझी तयारी आहे त्यासाठी. आणि तिला घटस्फोट च हवा असेल तर माझी त्यासाठी पण तयारी आहे." मी उत्तर दिले.
"ओके..चला तर मग दोघं जणी घटस्फोटाच्या पेपरवर स्वाक्षऱ्या करा." घटस्फोटाचे पेपर चंचल च्या पुढं ठेवत वकील साहेब बोलले.
चंचल ने कसलाही विचार न करता फक्त एक मिनिटात च पेपर वर स्वाक्षरी केली.
पाठोपाठ मी पण स्वाक्षरी केली.
पेपर घेऊन आम्ही दोघं एकमेकांशी काहीं न बोलता एक रीक्षेने घरी जाण्यास निघालो. रस्त्यात आम्ही दोघं चूप च बसलो. कोणीच कोणाशी बोलले नाही.
"मला फक्त १५ ते २० मिनिट दे.मी माझा समान पॅक करते. तुला वाटले तर माझ्या बरोबर रूममध्ये येऊ शकतो.मी काय सामान घेत आहे ,काय नाही ते बघायला. नंतर उगीच शंका नकोय. मी गेल्या नंतर उगाच कटकट नको. तू माझी बेग तपासू शकतो.मला काहीच हरकत नाही." चंचल मला बोलली.
"ओके..मी तिच्या पाठोपाठ रूममध्ये गेलो आणि बेड वर बसून बघत होतो.
अवघ्या १५ मिनिटात २ मोठ्या बॅग्स,आणि एक लहान बॅग घेऊन चंचल घरा बाहेर निघाली.जाता जाता एक शब्दही माझ्याशी बोलली नाही. मी पण काहीच विचारले नाही. जाता जाता इशाऱ्याने हाथ वर करून निघाली. दोघं बेग्ज ला धक्का मारीत आणि घसडीत रस्त्यावर उभी राहिली. एक रीक्षा आली.त्या रीक्षेत बसून ती निघून गेली कायम साठी. ते गेली तेव्हा दुपारचे तीन वाजले होते.
चंचल ला रीक्षेत बसतांना बघितले तेच..नंतर तिचा विचार मनातून कायमसाठी काढून टाकला.मानसिक शांती मिळाली होती. मी आई बाबांना चंचलशी घटस्फोट घेतल्याचे कळविले.
नंतर एका वर्षांनी एक आमचे जवळचे ओळखीचे नातेवाईक जे तुमचे अगदी च जवळचे काका आहेत त्यांनी मला तुमच्या विषयी सांगितलं. माझी मनापासून तयारी होतीच. फक्त अडचण होती ती वयाची. आपल्या दोघां मध्ये अडीच वर्षाचं अंतर होतं. मला शंका होती की कदाचित तुम्ही तयार होणार नाही. तुमच्या काकांच्या सांगण्यावरून मी तुम्हा दोघांच्या सुरक्षततेची हमी दिली. तेव्हा आपल लग्न झालं.
बोलता बोलता नकुल गहिवरून आला होता. त्याचे डोळे पाणावले होते. थोडा वेळ बोलणं बंद केलं होत.
विमल ल वाटलं की नकुल चे बोलणे संपले .ती म्हणाली," ऐका आता झोपा शांततेने. केव्हाचे बोलत आहात तुम्ही"
नकुल ने पण मुकाट्याने डोक हलवित संमती देत म्हणाला," ओके झोपू या."
दोघं जण दुसऱ्या दिवसाच्या भविष्याच्या आशेच्या किरणांची आशा बघत झोपले.
**************************************************************************************
सोनल…
सोनल ची मुलगी शिखा चा पहिला च वाढ दिवस तारीख १ जानेवारीला मोठ्या थाटामाटात साजरा केला . सोनलने अपार्टमेंट मधील सगळ्या लहान मुलांना आग्रहाने बोलाविले होते. तसेच तिच्या मैत्रिणींचे लहान मुलं आणि नवरा धवलच्या मित्रांच्या लहान मुलांना पण खास बोलाविले होते. सोनल आणि धवल चे आई बाबा पण होते च.
वाढ दिवस धूम साजरा करण्यात आला. फोटो ,व्हिडिओ शूटिंग पण करण्यात आले. दोन दिवस दोघांचे आई बाबा आग्रहाने राहिले. दोन दिवसा नंतर तेही गावी चालले गेले. शिखा लहान असल्याने तिला सांभाळणार घरात कोणीच नसल्या कारणाने तिला १ वर्षाची पगारी रजा मिळाली होती.
घरात सोनल आणि चिमुकली शिखा बस दोनच उरले होते. नवरा धवल ऑफिसात गेला होता. सोनलला करमत नव्हते. घरात सूनावा भासत होता. चार दिवसापासून तयारीत स्वतःला जुंपली गेली होती. सगळे येणार,वाढ दिवस चांगला साजरा होणार या विचाराने ती आनंदी दिसत होती. चार दिवस केव्हा संपले,वाढ दिवस पण केव्हा साजरा झाला ते कळलंच नाही.
रात्रीचे नऊ वाजले होते. धवल ऑफिसातून आला नव्हता.बरोबर ९ वाजून १० मिनिटांनी त्याचा फोन आला की आज त्याला घरी यायला उशीर होईल. घरी यायला साडे दहा होतील. म्हणजे अजून दीड तास वाट बघावी लागणार होती.
काय करावं? काय सुचत नव्हत.बुचकळ्यात पडली होती सोनल.
अचानक आठवण आली. शिखाचा वाढ दिवसाचा फोटो अल्बम काढला.एक एक फोटो बारकाईन बघत बसली होती. एकदा संपूर्ण अल्बम बघितला गेला.
थोड्या वेळाने परत बघण्याची इच्छा झाली.
शिखा खेळणी खेळत होती. अधून मधून ओरडायची. तीच ओरडणं ऐकून सोनल पण खुश व्हायची. तिचं खेळण बघायची.
शिखा च खेळणं बघून सोनलला तिचे लहानपण आठवले.
विमल ताई नारायणराव शेळके ह्यांच्या पोटी जन्मलेली ती सोनल लहान होती तो पर्यंत तिला काही समजत नव्हते. कोण माणूस कसा आहे,तो अस का करतोस, कोणासाठी करतोस,त्याच्या मनात काय आहे? चांगला माणूस आहे की वाईट आहे? काहीच..म्हणजे काहीच समजत नव्हते. तिचं सावत्र बाप नकुलरावां विषयी पण तिला काहीच समज नव्हती..
पण जसजशी तिचे वय वाढू लागले,मोठी होऊ लागली तसतसे ती सर्व काही समजू लागली. दहावी पास झाली,बारावीत तर ८०%नी पास झाली पण तिच्या सावत्र बापाला खुशी झाली नाही.सावत्र मुलगी म्हणू तिच्या कडे दुर्लक्ष केले.
एकदा विमलताई नवऱ्याला म्हणाल्या," अहो, ऐकता का..सोनल बारावीत चांगल्या मार्का ने पास झाली आता पुढं काय करायचं? कोणती लाईन घ्यावी?
" तिला जे करायचं असेल ते .मी काय सांगू? माझा विषय नाही तो. जी लाईन घ्यायची असेल ती घेऊ दे मला काय समजत त्यातलं." नकुल कठोरपणे बोलला.
नकुल च कठोर बोलणं ऐकून विमलताई बुचकळ्यात पडल्या. तिला फारच आश्चर्य वाटलं.
नकुल ला अचानक काय झालं? एवढा कठोर का झाला?"
नकुल च कठोर बोलणं ऐकून दोघं माय लेकी घळघळा रडायला लागली.
पण विमल ताईंशी रहावलं गेलं नाही .त्या बोलल्या," म्हणजे? तुमची काहीच जबाबदारी नाही? वाऱ्या वर सोडलय का आम्हा दोघं माय लेकिंना? तिच्या भविष्याची काहीच काळजी नाही का तुम्हाला? " रागाच्या भरात विमल ताई बोलल्या.
" नाही" एवढच उत्तर नकुल ने दिलं.
नकुल सोनल शी फारसं बोलत नव्हता. तिच्याकडे जास्त लक्ष देत नव्हता. सावत्र मुलगी म्हणून दुर्लक्ष करायचा. त्याला सोनल ची काहीच पडली नव्हती.
कित्येकदा विमल ताई आणि नकुलराव मध्ये चकमक उडायची.
शेवटी एका कॉलेज मध्ये १२ वी कॉम्पुटर सायन्स मध्ये सोनल ने प्रवेश घेतला. कॉलेजची फी आणि देणगी साठी विमल ने ५-५ लाखांची मुदती ठेवी पण तोडली.
दर वर्षी सोनल चांगल्या मार्कानी पास होत गेली. तिचं एकच ध्येय होतं की काहीही लफडे न करता शिखून चांगल्या पगाराची नोकरी करून आईला सुखी करावी.
कॉम्पुटर सायन्स मध्ये तिनं ७५%मिळवून बी. एस्सी.( कॉम्पुटर सायन्स) ची पदवी मिळवली होती. कॉलेज कॅम्पस मध्येच एका आई. टी.कंपनीने तिची सॉफ्टवेअर इंजिनिअर पदी नेमणूक केली होती आणि चांगला पगार पॅकेज देऊ केला होता.
तिच्या नोकरीला दोन वर्ष पुर्ण होऊन तिसरे वर्ष चालू होते. पगार पण वाढला होता. कंपनी तिच्या कामगिरी शी संतुष्ट होती.
तिची आई म्हणजे विमलताईला आता तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागली. आईचा चिंतित चेहरा बघून सोनलने विचारले की," आई तू इतकी चिंताग्रस्त का आहे? कसली काळजी तुला वाटते?"
विमलताई एवढं च बोलल्या,"काही नाही ग. तुझ्या लग्नाची काळजी वाटतेय मला."
" अग आई, कशाला एवढी चिंता करतेस? होईल सगळं काही व्यवस्थित. देवावर विश्वास ठेव. आहे ना तुझा देवावर विश्वास"? पुरे झालं आता झोप शांततेने.रात्र खूप झालीय.
आईला शांत करून दोघं माय लेकी शांततेने रात्री झोपल्या.
सकाळी नकुल,सोनल नोकरीला गेले आणि विमल ताई घर कामात व्यस्त राहिल्या.
बघता बघता तिने महिने निघून गेले कुणाला काहीच कळलं नाही.
सोनलच्या ऑफिसात एक मुलगा होता. गुजराती चा मुलगा होता. दिसायला चांगला होता. त्याचं बोलणं, चालणं, वागणं एकदम व्यवस्थित होत. सोनल शी त्यानं मैत्री पण करून घेतली. तो सोनलच्या जवळ येऊ लागला. त्याच्या मनात सोनल प्रती प्रेमाचे अंकुर फुटू लागले होते.पण लाजरा स्वभाव असल्या कारणाने तो प्रेमाचा एकरार करू शकत नव्हता.
पण एकदा हिम्मत करून त्याने घाबरत घाबरत सोनल समोर प्रेमाचा एकरार केला.
सोनलला आश्चर्य वाटले.ती म्हणाली," चंदन,मी तुझा कडे फक्त मैत्रीच्या संबंधाने बघतेय. त्या पलीकडे काहीच माझ्या मनात नाही.तू जे समजत असेल ते तर बिलकुल च नाही.तुझ्या मनातून हे सगळं काढून टाक आणि फक्त आणि फक्त मैत्रीची भावना ठेव."
सोनल चे उत्तर ऐकून चंदन निराश झाला.काहीच बोलल्या शिवाय तो चालला गेला. त्या दिवसा पासून तो गुमसुम रहायला लागला होता. ही गोष्ट सोनलने तिच्या आईला केली.
सोनल बऱ्याच दिवसापासून चिंता ग्रस्त दिसत होती. तिचं बोलणं,चालणं, खाण पिणं,आणि इतर व्यवहारात फरक जाणवत होता. कुठल्या तरी बाबतीत ती गंभीर दिसत होती.
" अग सोनल , बघ ऐक माझ मी काय म्हणते ते.
तुझ्या मनात काय विचार चालले आहे ते मला माहित आहे. तू कसला विचार करत आहेस ते मी जाणते. पण मला तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे.सांग जे काही सांगायचं आहे ते. जास्त विचार नको करू.मी काही रागावणार नाही ,मला वाईट पण नाही वाटणार" विमलताई मुलीला समजावत होत्या.
" आई,घाबरत घाबरत आणि दोघं हातानी ओढणी चोळत सोनल म्हणाली," आई, मी वर्तमान पत्रात बऱ्याज वेळा वाचलं आहे की सावत्र आईने सावत्र मुलाशी दुष्कर्म केलं.
दुसऱ्या एका वर्तमान पत्रात मी वाचलं की सावत्र बापाने तरुण अने देखणी अशी सावत्र मुलीशी दुष्कर्म केलं. तिला गर्भवती बनवली. मला ती च भीती वाटते.मी लहान होती तो पर्यंत ठीक.कारण मला दुनियादारी माहित नव्हती.मी आता वयात आली. नोकरी करते. मला आता खर खोटं,बर वाईट समजायला लागले. लोकांची दृष्टी कशी आहे ते पण ओळखून आहे.
मला "सावत्र" या शब्दा विषयी तिरस्कार आहे. नफरत झाली मला.विश्वास नाही मला या शब्दावर."
सोनलच्या बोलण्यात राग स्पष्ट दिसत होता. तिचे डोळे पाणावले.
हम..अस होय ! .सोनल, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे ग. तुझी चुक नाही.तुझ्या जागी मी असते ना तर मी पण हे च विचारले असते जे तू आता मला म्हणाली.
रात्र झाली झोप आता. तुझे बाबा आता येण्याच्या तयारीत च आहे. उद्या बोलू या ह्या बाबतीत.
सोनल आईच ऐकून स्वतःच्या बेडरूम मध्ये गेली.
तिची आई विमलताई पण त्यांच्या बेडरूम मध्ये गेल्या.
थोड्या वेळाने डोर बेल वाजली.विमलताई ने दरवाजा उघडला. समोर दुसरा नवरा नकुलराव होते. नकुलराव आत आले.जेवण वगैरे आटोपून बेडरूम मध्ये गेले. रोज काहीना काही बोलणारे नकुलराव गप्प होते. भांडी वगैरे करून विमलताई पण बेडरूम मध्ये शिरल्या.
शांततेचा भंग करीत नकुलराव म्हणाले, " हे बघा मी काय म्हणतो ते,आपली मुलगी *आपली* मुलगी शब्दा वर जोर करीत नकुलराव म्हणाले, सोनल आता लग्नाची झाली. नोकरीला पण तिला दोन वर्षे झाली.तिच्यासाठी चांगला मुलगा बघण्याची वेळ आलीय आता. तिच्यासाठी योग्य मुलगा मिळाला की तिचे हाथ पिवळे करून तिला सासरी पाठविणे.हा एकच ध्येय पकडुन बसलोय मी. उद्या पासून मी या कामाला लागतो. बरोबर की नाही?"
पती नकुलरावांच बोलण एकूण विमलताई आश्चर्य चकित च झाल्या. काय बोलावं आणि काय नाही तर ते च कळत नव्हतं.
आजपर्यंत त्यांनी जे गैरसमज करून घेतला होता तो एका क्षणर्धात ओघळला गेला. विश्वास बसत नव्हता त्यांच्या बोलण्यावर.
"असं काय बघता माझ्या समोर? नकुलरावांनी प्रश्न केला
"काही नाही. बस असं च विचारात होते मी पण. होना सोनल आता लग्ना सारखी झाली" विमल ने उत्तर दिले.
"हे बघा...नकुलराव बोलायला लागले.त्यांना मध्येच अटकावत विमलताई बोलल्या, " मी तुमची पत्नी आहे. तुम्ही मला तू ता करून बोला."
"हो पण तुम्ही माझ्या पेक्षा फार मोठ्या आहेस आणि बायकांचं आदर ठेवणे,त्यांना मान सन्मान देणे,मदत करणे माझ्या आई बाबांनी मला शिकवले आहे. तुम्ही समजत असाल तितका मी काही नालायक नाही हो. माझ्यात माणुसकी अजून आहे. माझी खराब दृष्टी बिलकुल नाही. कदाच तुम्ही माय लेकीच्या मनात प्रश्न उद्भवत असेन की सावत्र बाप आहे,मुलगी देखणी आहे नजर बिगडू शकते. विश्वास कसं ठेवायचा ह्याच्यावर? म्हणजे माझ्यावर?
जाणुनबुजून मी तुम्हा दोघा माय लेकिशी असं वागत होतो. खास तर सोनल शी मी फारच विचित्र पणे वागलो.मला तुम्हा दोघांना आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. भविष्यात कुठल्याही संकटाशी तुम्ही लढू शकाल असं मी विचारलं होत. कुणावर अवलंबून नाही राहता तुम्ही आणि खास तर सोनल स्वतःच्या पायावर उभी राहून स्वावलंबी व्हावी अशी माझी इच्छा होती. म्हणून मी जाणुनबुजून तिच्या कडे दुर्लक्ष करायचो.
इकडे या ,मी तुम्हाला काही दाखवतो असं म्हणून नकुलरावांनी कपाटातून प्लॅस्टिकची पिशवी काढली. पिशवी फारच जुनी होती. पिशवीतून काही कागद काढली. विमलताईच्या हातात देत म्हणाले," पिशवी घ्या,बघा आत काय आहे ते."
विमलताईनी पिशवी हातात घेतली, तिच्यातून कागद काढली.कागद पण जुनी झाली होती. बघितलं तर त्यांचे डोळे जर एकदम चमकले. " अग बाई! " तोंडात दोन बोटं घालून आश्चर्याचे उदगार काढत बोलले.
सोनलच्या नावावर ५ लाखांची विमा पॉलिसी. सोनल जेव्हा ५ वर्षांची होती तेव्हा तिचा विमा उतरवला होता.
दुसरी पॉलिसी पण मनी बेकची. २२ वर्षा नंतर दर दोन वर्षांनी पॉलिसीचे १० टक्के सोनलला मिळणार.
सोनलच्या नावावर आणि विमल ताईच्या नावावर चालू खाते पण सुरू केले होते त्याची पासबुक पण विमलताईने बघितली.
दोघं विमा पॉलिसी मध्ये नोमिनी म्हणून नाव कुणाचे? तर " विमलताई खरे" ह्यांचे.
शिवाय, सोनलच्या नावाची सुकन्या पॉलिसी तर खरीच. जुन्या मुदत ठेवी सोनलच्या शिक्षणासाठी खर्च झाल्या म्हणून नवी मुदत ठेवी तुम्हा माय लेकीच्या नावावर बँकेत ठेवली.
मला माहित होत की सोनलच्या शिक्षणासाठी पुष्कळ पैसे लागणार या दृष्टीने मी आपलं लग्न झाल्या बरोबर सर्वात पहिले हे च काम केलंय. तुमच्या नावावर ५-५ लाखाची मुदत ठेव ठेवली
शिवाय दोघं माय लेकीच्या नावावर लाखांची बेंकत ठेवलेली नवीन मुदत ठेव. विशेष म्हणजे विमलताईच्या मुदत ठेवी वर सोनलचे नाव नॉमिनी म्हणून आणि सोनलच्या नावावर असलेली मुदत ठेवी वर विमलताई चे नाव नॉमिनी म्हणून.
ह्यात तुम्हाला माझं नाव नॉमिनी म्हणून दिसत असेल तर सांगा मला."
विमा पॉलिसी मध्ये पण विमल ताईच नाव नॉमिनी म्हणून. सोनलच्या नावामागे अजूनही तिच्या पहिल्या बाबांचं म्हणजे संपतरावां च नाव जोडलेले आहे.
विमलताई हे सगळं बघून घळा घळा रडायला लागल्या.
बेडरूम मध्ये असलेली सोनलला झोप येत नव्हती.केव्हांची ती कुशी बदलत होती.झोपेचा प्रयत्न करीत होती.अचानक तिला सावत्र बापाचं बोलण एकायला मिळालं. ती भिंती जवळ गेली कान देऊन ऐकत होती.तिला स्पष्ट ऐकू येत होत.
बापाचं बोलण ऐकून ती चक्क रडायला लागली. कित्येक वर्षापासून तिच्या मनात सावत्र बापा विषयीची असलेली तिरस्काराची भावना क्षणात ओघळली गेली. ति स्वतःलाच दोष देत होती. काही विचारल्या शिवाय
आज पर्यंत तीनसावत्र बापाला संशयित नजरेनं बघत होती. रात्रभर सोनल रडत होती. झोप तर तिच्या पासून खूप च लांब चालली गेली होती.
सकाळी उठल्यापासून दोघं जण नकुलराव आणि सोनल स्वतःच्या कामात व्यस्त राहिले आणि कामावर निघून गेले. विमलताई घर कामात व्यस्त राहिल्या.
संध्याकाळी घरी आल्यावर कोणी कोणाशी बोलले नाही. रात्री जेवतांना सोनल पण गप्प बसली होती. जेवणाकडे तिचं लक्ष नव्हतं. नकुलरावांनी ते बघितलं. त्यांना रहावलं गेलं नाही आणि शेवटी विचारलं की" काय झालं सोनल तुला? तू जेवत का नाहीस? काय विचारत आहे? अजून हि मी चुकीचा वाटतोय का? "
सोनल रडायला लागली.ती पटकन उठली आणि बाबांच्या पायावर पडली. रडत रडत बोलली,"बाबा मला माफ करा हो. मी तुमची गुन्हेगार ठरली हो. मी तुमच्या विषयी फारच वाईट विचारलं होत. तुमच्या विषयीच्या फारच वाईट भावना मी मनात दडवून ठेवल्या होत्या. मी खोटी ठरली हो बाबा. तुम्ही तर देव माणूस निघाले. देवा पेक्षाही मी जास्त महान तुम्हाला मानते."
नकुल रावांनी तिला उठवलं." अग वेडी आहेस तू. मी तुला जन्म दिला नाही दिला तरी काय झालं तू च माझी सख्खी मुलगी आहे. मला लाजववू नकोस ग बाई..उगी हो आता. " तिला खुर्ची वर बसविले.
मला एक सांग माणसांच्या हाथाची पाचही बोटं सारखी आहे का? सांग मला. नाही ना? समाजातले सगळेच सावत्र आई,बाप,भाऊ,बहीण एक सारखे च असतात का? नाही ना? शंभरातून २-३-४ तर असे निघतात च समजूतदार आणि माणुसकी असणारे."
अग वेडी मी ते च करतोय जे एक बाप स्वतःच्या मुलीसाठी करतोय. मी माझं कर्तव्य च करतोय एका बापाचं.
" जेव आता शांततेने. जेवणानंतर आपण तुझ्या लग्ना विषयी बोलणं करू या."
सोनल ला जाणून लग्ना विषयी ची माहिती जाणून घ्यायची घाई झाली होती. कसेबसे तिन जेवण आटोपलं आणि हॉलमध्ये आई बाबांची वाट बघत बसली होती. जेवण करून,भांडी वगैरे करून तिघ हॉल मध्ये बसले.
मी एक मुलगा बघितला आहे. आई बापाचा एकुलता एक मुलगा आहे. देखणा,घारे डोळे,सहा फुटी,मजबूत बांधा, हसतो तेव्हा गालात खळी पडते.बिलकुल हिरो सारखा दिसतोय.तुला एकदम मेच होईल असा आहे दिसायला. चांगल्या पगाराची नोकरी आहे.स्वतःचा ३ रूमचा फ्लॅट आहे.स्वतःची बाईक आहे. आणि लग्नानंतर गाडी पण घ्यायच म्हणतोय लेका.
एक दोन दिवसात तो येणार आहे तुला बघायला.आणि एवढंच नव्हे तर तू जर त्याला पसंद पडली ना तर त्याच वेळेस साखर पुडा पण करणार आहे.मी मुलाच्या विषयी संपूर्ण चौकशी केली आहे. तू काळजी नको करू.
बाबांचं बोलणं ऐकून सोनल घळ घाळा रडायला लागली. एक सारख्या अश्रुंच्या धारा डोळ्यातून वहात होत्या. ती इतकी गहिवर ली होती की काय बोलावे आणि काय नाही काही च सुचेना.
विमल ताई पण आश्चर्य चकित झाल्या.
गप्पा मारत रात्रीचे अकरा वाजले होते. सगळ्यांना झोप येत होती.
किती दिवसा पासून दोघं माय लेकी शांततेने रात्री झोपले.
नकुल रावांना झोप येईना. विमल सारखी बायको आणि सोनल सारखी मुलगी असल्याचा त्यांना धन्यता वाटत होती.
ठरल्या प्रमाणे सहा महिन्यांनी सोनल चे लग्न झाले. नकुल रावाने धूम पैसा खर्च केला. लग्नात मुलीला सोनं,चांदी,कपडे ,केले.
कन्यादान केले.कन्यादान मध्ये चांदीची गाय आणि २५ लाखाची विमा पॉलिसी एक वेळ प्रीमियम भरलेली पोलीस दिली. पोलिस मध्ये नॉमीनी म्हणून आई विमल ताई च नाव आणि दुसरी नॉमीनी म्हणून सोनल च बाळ. तसेच चालू खात्याची पासबुक की ज्यात साडे साथ लाख पैसे जमा होते ते पण दिले.
लग्नात आलेले सगळे पाहुणे, नातेवाईक,मित्र मंडळीना आश्चर्याचा फारच धक्का बसला.सगळे च तोंडात बोट घालून एकमेकांना बघत च राहिले.
आपापसात कुजबुज करायला लागले.
काय हो..कसा बाप निघाला वाह! धन्य आहे बापाला. खरंच विश्वास बसत नाही हो. सख्या बाप सारखं किंबहुना त्या पेक्षाही फारच चांगलं काम केलं हो नकुल रावान.
"सावत्र" या शब्दाला जणू बाण च मारला हो.
अहो बिचाऱ्याने दुसऱ्या बायको पासून मुलगा किंवा मुलगी चा पण प्रयत्न केला नाही.
एके दिवशी मला नकुलराव म्हणाले की, " माझं सगळं लक्ष दुसऱ्या मुलावर किंवा मुलीवर विभाजित होईल. मी सोनल वर लक्ष देऊ शकणार नाही
माझ्या सख्ख्या मुला मुलीवर च माझं लक्ष रहाणार. सोनल वर अन्याय झाल्या सारखं मला वाटेल म्हणून मी दुसऱ्या मुला मुलीचा बिलकुल विचार च केला नाही की प्रयत्न पण नाही केला"
"ऐका हो सगळ्यांनी" असं बोलत नकुलरावांनी स्टेज वर जाऊन माईक हातात घेऊन बोलायला लागले.
"ऐका..
"माझ्या मुलीच्या नव्या कुटुंबाला काही सांगण्याचा माझा विचार आहे . पण तसे करणे अयोग्य ठरेल कारण आता तिचे लग्न झालेले आहे आणि ती तुमच्या कुटुंबातील सदस्य बनली आहे . माझ्यावर विश्वास ठेवा , त्याबद्दल माझी कुठलीही त़र्कार नाही . उलट आता माझ्या मुलीचे पहिले प्राधान्य हे तुमचे कुटुंब असले पाहिजे . आता तिच्या आयुष्यात आमची भूमिका मागच्या सीटवर बसून फक्त बघण्याची असेल . आम्ही हे सगळे आनंदाने स्वीकारले आहे . पण आमची एक विनंती आहे . तिला आनंदात ठेवा !
" मला खात्री आहे की , तुम्ही तिला आनंदात ठेवाल . कदाचित ती आमच्यापेक्षा तुमच्याकडे अधिक आनंदी राहील . पण प्रत्येक वडिला प्रमाणेच मला माझी मुलगी आनंदात राहावी असे वाटते . त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की , तिला आनंदात ठेवा .
" ती माझ्यासाठी कधीच ओझे नव्हती . उलट ती माझा श्वास आणि चेहऱ्यावरील हास्य आहे . मी तिचे लग्न करुन देत आहे ; कारण ते सगळे निसर्गनियमानुसार करावेच लागते . आपल्या संस्कृती समोर मी असहाय्य आहे आणि म्हणूनच तुमच्या घरी पाठवत आहे . ती माझ्या घरातील आनंद होती आणि आता तुमच्या घरी प्रकाश देईल , हा माझा तुम्हांला शब्द आहे . रक्त , घाम गाळून मी तिचे पालनपोषन केलेले आहे आणि आता ती परिपूर्ण बनली आहे . आता माझी मुलगी तुमच्या सगळ्यांची काळजी घेईल , सगळ्यावर प्रँम करेल , मायेची ऊब देईल . त्या बदल्यात माझे एकच मागणे आहे - प्लीज तिला आनंदी ठेवा !
" समजा , तुम्हाला कधी वाटले की , माझी मुलगी काही चुकीचे बोलली किंवा तिच्याकडून काही चूक झाली तर तिला रागवायला माझी काहीच हरकत नाही . पण तिच्याशी प्रँमाने वागा . कारण ती खूप नाजूक आहे . जेव्हा तिला निराश वाटेल तेव्हा तिच्या बरोबर राहा . तुमचे तिच्याकडे थोडेफार लक्ष असू द्या . त्याची तिला गरज आहे . ती कधी आजारी पडली तरी तिची काळजी घ्या . कोणती जबाबदारी पार पाडण्यास ती कमी पडली तर तिला खडसावून सांगा . पण तिच्याविषयी सहानुभूती बाळगा . ती अजून शिकते आहे . तिला समजावून घ्या . प्लीज तिला आनंदी ठेवा .
" तिला अनेक महिने भेटता आले नाही , तरी मला काही वाटणार नाही . पण मी रोज एकदातरी तिच्याशी फोनवर बोलल्याशिवाय राहणार नाही . जर तिला माझी आठवण आली नाही , तर माझ्यासारख्या आनंदी मीच असेन . पण माझ्या जगण्याचा केवळ एकमेव उद्देश आहे आणि तो म्हणजे माझ्या मुलीचा आनंद . तो तिला देत राहणे हे आता तुमच्या हाती आहे . मी तुमच्याकडे याचना करतो की , प्लीज तिला आनंदी ठेवा . जावईबापू , हे शब्द तुम्हांला आता फारसे महत्त्वाचे वाटणार नाहीत . पण जेव्हा कधी मुलीचे बाप व्हाल , तेव्हा या शब्दांचे मोल तुम्हांला कळेल . त्या वेळी तुमच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून आवाज येईल , प्लीज तिला आनंदात ठेवा . "
स्टेज वर नव वधूच्या वेशात सज्ज सोनल कान देऊन ऐकत होती.विमल ताई पण स्टेज च्या खाली असलेल्या खुर्ची वर बसून ऐकत होत्या. त्यांना बिलकुल च कल्पना नव्हती की नकुल राव असं काही बोलतील.
टाळ्यांचा गडगडाट झाला. तेवढ्यात सोनल च बाळ खेळता खेळता जोरात किंचाळल आणि जोरजोरात रडायला लागल. सोनल भानात आली.पटकन उठली. लवकर लवकर बाळा जवळ गेली.बाळाला उचललं आणि छातीशी लावून उगी करण्याचा प्रयत्न करू लागली. पण बाळाच रडणं बंद होईना. तिला एकदम आठवलं .ती जेव्हा लहान होती तेव्हा तिच्या आईने म्हणजे विमल ताईने कुण्या एका मराठी कवीने लिहिलेली अंगाई गीत गायले ल आणि ते अंगाई गीत ती पण गाऊ लागली.
पाळण्यात चिऊ ताई
करीतसे गाई गाई
चांदोबा आला आकाशात
झोप कशी येत नाही
तारका या आकाशात
झोपल्या ग किती गुणी
अजूनिया का ग जागी
आज माझी परिराणी
खेळूनिया लपाछपी
चांदोबा ही गेला झोपी
निंबोणीच्या झाडामागे
पार दिसेनासा झाला
नीज येते पापणीत
चळवळ थांबेना ही
मंद मंद झुळवून
आई गातसे अंगाई
नीज येई डोळ्यावर
तरी खेळायचे हिला
झुळवून थके
डोळा आईचा लागला..
तेवढ्यात डोअर बेल वाजली...बाळाला बेड वर ठेऊन लगबगीनं ती दार उघडायला गेली..दार उघडल समोर मंद स्मित करत नवरा धवल उभा..
आत आल्यावर पटकन दरवाजा बंद केला आणि धवल ला बिलगली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेऊन रडायला लागली. ज्या प्रमाणे तिची आई विमल ताई सावत्र बापाला म्हणजे नकुल रावांना बिलगली होती त्याप्रमाणे च.
समाप्त
------------------
भरतचंद्र शाह