story of unspoken love part 5 books and stories free download online pdf in Marathi

अव्यक्त प्रेमाची कथा. भाग ५

अव्यक्त प्रेमाची कथा.

पात्र रचना

संदीप                आपल्या कथेचा नायक.

सुशीलाबाई            संदीपची आई.

केशवराव              संदीपचे वडील.

अभय               संदीपचा मोठा भाऊ.

अश्विनी              अभयची बायको.

रामलिंगम             संदीपचे सहकारी.

रमेशकुमार            संदीपचे सहकारी.

प्रसाद                संदीपचे सहकारी.

विश्वनाथन साहेब       कंपनीचे उपाध्यक्ष

शलाका               आपल्या कथेची नायिका

भाग  ५   

भाग ४ वरून पुढे वाचा  ......

साधारण दोन तीन महीने असेच गेले, आता शलाकाची तब्येत चांगली सुधारली होती. एक दिवस रोजचं स्थानिक वर्तमानपत्र चाळताना तिला एका कंपनीची अकाऊंटस असिस्टंट पाहिजे अशी जाहिरात दिसली. वॉक इन इंटरव्ह्यु होता. C&F डेपो मधे काम होतं. शलाकाला अनुभव काहीच नव्हता. पण तिचा इंटरव्ह्यु छान गेला. तिच्या हुशारीवर इंटरव्ह्यु घेणारे खुश झाले, आणि त्यांनी तिला जॉब ऑफर केला. अनुभव नसल्याने तिला पगार कमी मिळणार होता आणि सहा महिन्यांचं ट्रेनिंग होतं. शलाकाने हो म्हंटलं. पहिल्याच प्रयत्नात नोकरी मिळाली, यांचा तिला खूपच आनंद झाला होता.

घरी पण सगळ्यांनाच आनंद झाला, शलाकाला आता पुन्हा नैराश्य येणार नाही, याची खात्री पटली. त्या दिवशी शलाकाच्या घरी सेलीब्रेशन झालं. सगळा आनंदी आनंद होता. दु:खाचं जे सावट पडलं होतं ते दूर झालं होतं.

शलाका मुळातच हुशार होती आणि तिने आपल्या कामात स्वत:ला झोकून दिलं होतं. स्वत:च्या कामा व्यतिरिक्त तिने इतरांना मदत करून त्यांची पण कामं आणि पद्धत शिकून घ्यायला सुरवात केली. लवकरच ती डेपो मॅनेजरची अत्यंत विश्वासू अशी सहकारी बनली. तिने बनवलेले रीपोर्ट मुंबई ऑफिसला जायचे. हेड ऑफिसचं पण तिच्यावर लक्ष होतं. बघता बघता शलाकाला चार वर्ष झाली, तिचं प्रमोशन झालं, आता तिची पोस्ट असिस्टंट लॉजीस्टीक मॅनेजर होणार होती. पगारा मधे सुद्धा भरघोस वाढ होती आणि राहायला कंपनी क्वार्टर मिळणार होतं. प्रॉब्लेम एकच होता आणि तो म्हणजे ही पोस्ट नाशिकच्या फॅक्टरी मधे होती. शलाकाच्या घरी यावर दोन दिवस चर्चा चालली होती. शेवटी असं ठरलं की आदल्याच वर्षी बाबा निवृत्त झाले आहेत, तेंव्हा आई आणि बाबा शलाकाच्या बरोबर नाशिकला जातील. हे पक्कं झाल्यावर शलाकाने ऑफर स्वीकारली. शलाका मुळातच हुशार होती आणि तिने आपल्या कामात स्वत:ला झोकून दिलं होतं. स्वत:च्या कामा व्यतिरिक्त तिने इतरांना मदत करून त्यांची पण कामं आणि पद्धत शिकून घ्यायला सुरवात केली. लवकरच ती डेपो मॅनेजरची अत्यंत विश्वासू अशी सहकारी बनली. तिने बनवलेले रीपोर्ट मुंबई ऑफिसला जायचे.  हेड ऑफिसचं पण तिच्यावर लक्ष होतं. बघता बघता शलाकाला चार वर्ष झाली, तिचं प्रमोशन झालं, आता तिची पोस्ट असिस्टंट लॉजीस्टीक मॅनेजर होणार होती. पगारा मधे सुद्धा भरघोस वाढ होती आणि राहायला कंपनी क्वार्टर मिळणार होतं. प्रॉब्लेम एकच होता आणि तो म्हणजे ही पोस्ट नाशिकच्या फॅक्टरी मधे होती. शलाकांच्या घरी यावर दोन दिवस चर्चा चालली होती. शेवटी असं ठरलं की आदल्याच वर्षी बाबा निवृत्त झाले आहेत, तेंव्हा आई आणि बाबा शलाकाच्या बरोबर नाशिकला जातील. हे पक्कं झाल्यावर शलाकाने ऑफर स्वीकारली. पाहता पाहता एक वर्ष उलटून गेलं. शलाका नाशिक मधे चांगली रुळली होती. स्थलांतर झाल्यामुळे आता तिचा स्वभाव पण पूर्व पदावर आला होता. हसरी, आनंदी शलाका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. कामात अतिशय काटेकोर आणि व्यवस्थित असल्याने, साहेब लोकं पण तिच्यावर खुश होते.

एक दिवस मॉल मधे ती काही खरेदी करायला गेली होती, दोन रॅक च्या मधे अतिशय चिंचोळी जागा होती. पलीकडच्या बाजूने संदीप पण त्याच ओळीत ट्रॉली घेऊन आला. दोन्ही ट्रॉली जाण्या इतकी जागाच नव्हती. दोन मिनिटं कोण मागे जाणार, यांच्या बद्दल संभ्रम निर्माण झाला, मग संदीप म्हणाला की “ मी मागे सरकतो.” पण मागे वळून पाहिलं, तर ओळीच्या शेवटी, अजून कोणीतरी ट्रॉली ठेऊन, सामान घ्यायला दुसरीकडे गेलं होतं. शलाकाच्या ते लक्षात आलं, म्हणाली, “माझं घेणं झालं आहे, मीच मागे जाते. तुम्ही घ्या हवं ते.”

संदीप आता गोंधळला, हा आवाज त्याला एकदम ओळखीचा वाटला. म्हणाला “आपण कधी भेटलो आहे का? तुमचा आवाज खूप ओळखीचा वाटतो आहे.” शलाकाला सुद्धा तसंच वाटत होतं. ती म्हणाली की आपण भेटल्याचं मला आठवत नाही, पण मला सुद्धा तुमचा आवाज, बोलण्याची पद्धत अगदी काल ऐकल्या सारखी वाटते आहे. दोघांनाही नेमकं काहीच आठवत नव्हतं, त्यामुळे तो विषय तिथेच संपला.

चार एक महिन्यांनंतर संदीपच्या ऑफिस ची असिस्टंट लॉजीस्टिक मॅनेजरची जाहिरात निघाली. नाशिकच्या लोकल पेपर मधे ती जाहिरात आली. शलाकाच्या नजरेस ती जाहिरात पडली. ती विचार करत होती, पण शेवटी, काहीच न करण्याचा निर्णय तिने घेतला.

साधारण १५ दिवसांनी एका सेमिनार मधे शलाका गेली होती. तिथे संदीपच्या कंपनीच्या फॅक्टरीचा मॅनेजर पण आला होता. ती दोघं एकमेकांना थोड फार ओळखत होते, आणि मॅनेजर जवळ शलाकाची इथंभूत माहिती होती, त्याला अश्या माणसांची पारख होती. बुफे घेतांना त्यांनी शलाकाला विचारलं की “आमच्या कंपनीत यायला आवडेल का?”

“थॅंक यू. सर,” शलाका म्हणाली, “पण मी आमच्या कंपनीत हॅपी आहे. मग कशाला बदल करायचा विचार करू?”

“तुमचं म्हणण बरोबर आहे, पण आमची कंपनी मोठी आहे, आणि तुम्हाला वर चढायला भरपूर वाव आहे. पगार पण भरपूर जास्त मिळेल. आम्हाला आवडेल, तुम्ही आमच्या कंपनीत यायचा विचार केलात तर.” – मॅनेजर.

दोन चार दिवस खूप विचार केल्यावर, आणि आई, बाबांशी बोलल्यावर, तिने दादाला पत्र लिहिण्याचा विचार केला. पण पत्र आणि त्याचं उत्तर येण्या मधे बराच वेळ गेला असता. शेवटी त्याच्या ऑफिस मधे फोन केला, आणि संध्याकाळी फोन करायला सांगितलं. मग संध्याकाळी त्यानी PCO वरुन  शलाकाला फोन केला.

“काय ग, काय एवढं अर्जंट आहे? सर्वांच्या तब्येती तर ठीक आहेत ना?” – दादा.

“हो दादा सर्व ठीक आहे. मला एका सेमिनार मधे, मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीचा मॅनेजर भेटला होता, तो मला त्यांच्या कंपनीत येते का म्हणून विचारत होता.” मग शलाकाने सर्व विस्तारपूर्वक सांगितलं. आणि विचारलं की त्याचं काय मत आहे ते. एका क्षणाचाही विचार न करता त्यांनी सांगितलं की तुला तिथे नक्कीच वाव मिळेल. मोठी कंपनी आहे. अर्थात आतलं वातावरण कसं आहे ते तुला आधी बघावं लागेल. ते जर ठीक असेल, तर जरूर जॉइन कर.

दुसऱ्या दिवशी शलाकानी त्या मॅनेजरला फोन करून सांगितलं की ती तयार आहे तर तो म्हणाला की भेटायला ये, आपण सर्व गोष्टी फायनल करून टाकू.

दोन महिन्यांनी नोटिस पीरियड संपल्यावर शलाका, नवीन कंपनीत रुजू झाली. आधीचा अनुभव असल्याने तिला नवीन ठिकाणी रुळायला अजिबात वेळ लागला नाही. जात्याच मनमिळाऊ स्वभाची असल्याने ती लवकरच सर्वांमध्ये मिसळून गेली.

संदीप दोन महीने केनयाला गेला होता. तिथे नवीन फॅक्टरी उभारायची होती, म्हणून सुरवातीची सर्व तयारी करण्या साठी  त्याला  दोन महीने तिथे राहावं लागलं होतं. मुंबईला परत आल्या नंतर, सर्व रीपोर्ट  पाहतांना त्याच्या लक्षात आलं की, लॉजीस्टीक डिपार्टमेंटचे रीपोर्ट खूपच सर्व समावेशक आहेत, त्या एकाच रीपोर्ट वरुन  सर्व कामकाजाची कल्पना येते. त्याला जरा आश्चर्यच वाटलं. त्यांनी फोन करून फॅक्टरी मॅनेजरला विचारलं. की “लॉजीस्टीक मधे नवीन कोणी जॉइन झालं आहे का?”

मग मॅनेजरने शलाकाची सर्व माहिती दिली. तो शलाकाची, तिच्या कामाची खूप तारीफ करत होता. वरतून त्यांनी हे ही सांगितलं की ती सिंगल आहे, आणि त्याबद्दल कुठल्याही प्रश्नांना ती उत्तर देत नाही. तिला मुळीच आवडत नाही. बाकी ती खूपच हसतमुख आणि मनमिळाऊ आहे. नंतर जवळ जवळ एक महिन्या नंतर संदीप नाशिकला गेला.

फॅक्टरी मधे प्रत्येक  डिपार्टमेंट हेड बरोबर त्याची मीटिंग होती. तो सर्व आढावा घेत होता. त्याची ही नेहमीचीच पद्धत होती. दुपारी चार वाजता, लॉजीस्टीक मॅनेजर सुट्टीवर असल्याने, शलाकाच मीटिंग साठी आली होती.

ती आली, त्यावेळी संदीप लॉजीस्टीक चे रीपोर्ट बघत होता, मान वर न करताच तो म्हणाला, “मिस शलाका, बसा.” – संदीप.

शलाका बसली. फाइल उघडून नेमके पेपर समोर घेतले. आता फाइल मधून डोकं वर काढून संदीपने तिच्याकडे पाहीलं. संदीपला मॉल मधला प्रसंग आठवला.

“तुम्ही?, तुम्ही शलाका आहात?” – संदीप.

“हो मीच शलाका, पण तुम्ही इथे कसे?” शलाकाने विचारलं खरं, पण नंतर हा चुकीचा प्रश्न आहे आणि तो ही, चुकीच्या माणसाला विचारलं आहे हे लक्षात येऊन तिने जीभ चावली. खजील झाली, मग मान खाली घालून हलक्या स्वरात म्हणाली “सॉरी सर, मी असं विचारायला नको होतं.”

“ठीक आहे, तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिक आहे. डोन्ट वरी” – संदीप. मग अर्धा तास, ती आणि संदीप तिच्या डिपार्टमेंटच्या कामा बद्दल बोलत होते, “सर, काही सूचना असतील तर सांगा, मी त्या अमलात आणीन.” असं बोलून शलाकाने वर पाहिलं. पण संदीपचं ती काय म्हणाली, त्याकडे लक्षच नव्हतं, तो तिच्याकडेच बघत होता. शलाका एकदम अवघडून गेली. मग स्वत:ला सावरून म्हणाली, “सर, काय झालं?”

“काही नाही, तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे.” – संदीप.

“काय बरोबर आहे?” – शलाका.

संदीप गोंधळला. त्याच्या लक्षात आलं की त्यांची चोरी पकडली गेली आहे म्हणून. तो सारवा सारव करण्यासाठी म्हणाला “सॉरी शलाका, गैर समाज करून घेऊ नकोस. प्लीज, मी जरा वेगळ्याच विचारात होतो.”

शलाकानी गप्पच होती. तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

दोन मिनिटं शांततेत गेली, मग शलाकानी विचारलं. “ काय झालं सर? कसल्या विचारात होता तुम्ही?”

“शलाका, मघाशी तू अगदी हलक्या स्वरात म्हणाली की सॉरी सर, मी असं विचारायला नको होतं, हे पुन्हा त्याच स्वरात म्हणशील?” – संदीप.

आता शलाका चिडली, खरं तर तिला संदीप बद्दल खूपच चांगला रीपोर्ट मिळाला होता, पण मिळालेली माहिती आणि आत्ताचं त्याचं वागणं यांचा काही ताळमेळच तिला बसवता येईना. “तुम्ही काय बोलत आहात सर, मला तर, काहीच कळत नाहीये.” शलाका म्हणाली. तिने अत्यंत संयमाने राग आवरला आहे हे तिच्या स्वरातून स्पष्ट होत होतं. संदीपला पण कळलं की ती चिडली आहे म्हणून. तो घाई घाईने म्हणाला “हे बघ शलाका, गैरसमज करून घेऊ नकोस, I am just trying to recollect. मी आठवण्याचा प्रयत्न करतो आहे. अजून काही नाही.”

 

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

 

 

 

 

 

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED