रामायण व समर्थ रामदास अवतार. मच्छिंद्र माळी द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण व समर्थ रामदास अवतार.

रामायण व समर्थ रामदास अवतार
___________________________
मच्छिंद्रनाथ माळी छत्रपती . संभाजीनगर

रामायणातील रावण युद्धाच्या वेळची घटना आहे. रावणाचे बंधू अहीरावण व महीरावण दोघे पराक्रमी होते. रामाकडून खुपदा मारले गेले , परंतू ते सुर्योदयाला जिवंत होत. याचे कारण मायावी राक्षस भुंग्यांचे रूप घेऊन पाताळात लपविलेल्या अमृतघटातील अमृताचें थेंब या अहीरावण, महीरावणा च्या मुखात आणून घालत.
हनुमंतांना ही घटना कळताच त्यांनी सुक्ष्म देह धारण करून पाताळाच्या वाटेवर जाऊन थांबले व त्या भुंग्यांना बंदीस्त केले. सहाजिकच अहीरावण व महीरावण जिवंत झाले नाही व अग्नीसंस्कार केले गेले.
त्यांची पत्नी चंद्रसेना कष्टी झाली व रावणाकडे गेली.रामाचे एकपत्नी व्रताच्या प्रभावामुळे रावण विजयी होत नाही हे भाकीत पुर्वीच नारदांनी वर्तवलेले होते. म्हणून रावण तिला म्हणतो " चंद्रसेने! तू रामाला मोहीत करून वश कर. म्हणजे याचा बदला घेता येईल व मलाही सीता मिळेल."
त्यानुसार चंद्रसेना महाल सजवते .आत एक पलंग शृंगारून सगळी तयारी करते. रावणाचे सैनिक तीच्या महालाचे संरक्षण करीत असतात.
नियोजित कटानुसार तीची दासी रामाकडे जाऊन म्हणते " हे आर्यभुषण रामा! चंद्रसेनेचे पती परलोकाला गेल्याने ती दुःखी आहे. तीला शांत करा. ती शरण आली आहे. आपण तीच्या महाली येऊन सांत्वनाची अभिलाषा बाळगून आहे . तिला शांत करा!"
परस्त्रीला मातेसमान समजणारे राम चंद्रसेनेच्या महालात रात्री जायला तयार झाले. वास्तविक हे नाटक श्रीरामाला समजले होते पण सहाय्य मागायला आलेल्याला विन्मूख पाठवू नये हा रघूकुळाचा धर्म असल्याने ते अडचणी सापडले. बुद्धीमंतांवरीष्ठं असे मारूतीरायांनी हा प्रश्न सोडवला. हनुमंत म्हणाले "हे देवी! फक्त एका अटी वर स्वामी तेथे येतिल. तिथे जर काही अपशकून वा अपघात घडला तर ते क्षणभरही तिथे थांबणार नाहीत!"
मारूतीरायांनी कैदेतील भुंग्यांना जीवे मारण्याचे भय दाखवून. चंद्रसेनेच्या महालातील पलंगाचे चारही पाय पोखरायला सांगीतले. त्याप्रमाणे हे भुंगे पाताळ मार्गाने चंद्रसेनेच्या महालात गेले व चारही खूर असे पोखरून ठेवले की नुसता धक्का जरी लागला तरी तो पलंग मोडून पडेल!
दिवसभराचे युद्ध संपल. सुर्यास्ता नुसार श्रीराम चंद्रसेनेच्या महालात गेले . ठरल्या नाटकानुसार चंद्रसेना बोलत बोलत शयन घरात गेली .तिथे रामाला पलंगावर बसण्याची विनंती करताच रामांनी आपले उत्तरीय पलंगावर टाकले..पलंग क्षणात मोडून पडला.श्रीराम अटी नुसार निघून आले व त्यांचा व्रतभंग झाला नाही.
पुढे रावण वध झाला. रामाने बिभीषणाला राज्याभिषेक केला. मंदोदरी व इतरांचे सांत्वन केले. चंद्रसेनेला हनुमंतांचे कर्तुत्व समजले होते.
ती म्हणाली " हे श्रीराम! आपण अखील जगताचे स्वामी व चराचर व्याप्त आहात. मी आपल्याशी कारस्थान करून अपराध केला आहे. मी क्षमा मागते. परंतू हा व्यवहार आपल्या दोघात होता. तुमचा दास हनुमंत हाच माझ्या पतीच्या मृत्यूला कारण आहे. तसेच आपल्या स्वामीभक्ती पायी त्याने माझे सूडाचे मनोरथ पुर्ण होऊ दिले नाही....म्हणून ही विरहीणी त्याला शाप देते की मारूतीला घोर कलीयुगात गर्भवास सहन करून जन्माला यावे लागेल . तसेच त्याला तेंव्हाही स्त्रीसूख कदापी मिळणार नाही. "
मारुतीने वचन दिले , "मी कलीयुगात जन्म घेईन पण तेंव्हाही रामकार्यासाठी स्वतःच स्त्रीसुख लाथाडून अजन्म ब्रह्मचर्य पाळीन"
हे वचन मारूतीरायांनी सत्य केले. १६०८ साली रामनवमीला या महाराष्ट्राचे नव्हे भारतवर्षाचे भाग्य फळले. सुर्यांजी पंत ठोसर(कुलकर्णी ) यांची पत्नी राणूबाई मातेपोटी हनुमंत जन्माला आले.सर्वसुखाचा त्याग करून देव, देश व धर्मासाठी हा योद्धा सन्यांसी भारत भर हिंडला.या भ्रमणात लोकांना जागे केले. निस्पृहता शिकवली. मनोबोध सांगून समाजमन बळकट केले.विवेक व वैराग्य हीच आदर्श मानवी जिवनाची चाके आहेत हे सांगणारा ग्रंथराज दासबोध सांगितला.सोलीव सुख, बागप्रकरणे, सवाया, रामदासी गाथा, करूणाष्टके असे विपूल लेखन करून त्यांनी शेवटी शेवटी गडावर आत्माराम हा ग्रंथ लिहीला.दासबोध हे उत्तम विचाराचे विस्तीर्ण तळे आहे तर आत्माराम हे या तळ्यात मध्यभागी उमललेले सुंदर असे कमळ आहे. तिथपर्यंत जायचे तर मनोबोध, दासबोध पोहून जावा लागतो.
*।।जय जय रघुवीर समर्थ।।*
____________