मन फकिरे.. Kadambari द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मन फकिरे..

घरी एकच लग्नघाई सुरू होती. भिंतीवर लायटिंग माळा सोडल्या होत्या. जिन्यावरून झेंडूच्या फुलांच्या माळा सोडल्या गेल्या होत्या. दारावर सुंदर, सुरेख अशी रांगोळी काढली होती. जागोजागी फुलदाणीमध्ये मस्त सुवासिक फुले होती. देवघरात आरतीचे ताट आधीच तयार करून ठेवले होते.

दारावर नवरा नवरीची चारचाकी येऊन उभी राहिली. घरी एकच गोंधळ उडाला. नवरा नवरी आले... नवरा नवरी आले... म्हणून एकच गदालोळ उठला. माही आपली शालू सांभाळत चारचाकी मधून उतरली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. सकाळपासून लग्नविधी मध्ये वेळ कशी निघून गेली समजलेच नव्हते. पण खरी परीक्षा आता सुरू होती सासरमध्ये. तिच्या मनावर प्रचंड दडपण आले होते. निश आणि माही दारात येऊन उभी राहिले. निशची आई, सामी आरतीचे ताट घेऊन आली. दोघांचे औक्षण झाल्यानंतर दोघांना आत घेतले गेले. देवघरामध्ये जाऊन देवांचे दर्शन घेतले गेले. त्याच दिवशी देवाचा गोंधळही झाला. फोटोशूट झाला. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळे झोपण्यासाठी निघून गेले.

लग्नानंतरचे तीन दिवस देवदर्शनामध्येच कसे गेले समजले नाही. चौथ्या दिवशी सकाळी लवकरच सत्यनारायनाची पूजा झाली. आणि माही माहेरी आली. ती खुश होती. तिच्या घरचेही आंनदी होते. येता जाता आई बाबा तिची बहीण निशच्या नावांनी तिला चिडवत होते. निशचा फोन आल्यानंतरही घरी एकमेकांना डोळ्यांनी खुणावत माहीला चिडवत होत्या. माही वरून वरून राग आल्यासारखे दाखवत होती. पण मनोमनी सुखावत होती. पाच दिवसांनंतर माही सासरी जाणार हे माहीत असल्यामुळे माहीचे आई बाबा तिच्या सर्व इच्छा पूर्ण करत होते. पाहता पाहता पाच दिवस कसे भुर्रकन उडून गेले. आणि माहीचा सासरी जायचा दिवस उजाडला. आणि घरी एकच तारांबळ उडाली. सर्वजण माहीच्या सासरचे लोक येणार म्हणून कुठेही कसूर व्हायला नको याची पुरेपूर काळजी घेत होते.

निश आणि त्याचे कुटुंब, माहीच्या माहेरी आले. पाहुण्यांचे यथासांग स्वागत करण्यात आले. सगळी मंडळी बसून बोलू लागली. लग्न एकदाचे व्यवस्थित पार पडले वैगेरे वैगेरे. सर्वजण बोलण्यामध्ये व्यस्त होते पण निश, माहीला शोधत होता. स्वयंपाक घरात वेगळवेगळे जेवणाचे पदार्थ बनवले जात होते. आणि त्याचवेळी माही बाहेर आली. आणि म्हणाली..."जेवण तयार आहे. पाने वाढायला घेऊ का..?" मग सर्वांनी होकार देताच पाने वाढले गेली. आणि जेवण उरकले गेले. पुन्हा जेवणानंतर थोड्या गप्पा झाल्या आणि निशचे कुटुंब परत जाण्यासाठी तयार झाले. इकडे माहीही तयार झाली होती. जाताना तिला खूप वाईट वाटत होते. पण ती रडली तर पुन्हा आई बाबा, बहिणही रडेल म्हणून माहीने डोळ्यांमधून अश्रू काढले नाही. हसतमुख होऊन ती सासरी आली.

आज निश आणि माहीच्या लग्नानंतरची पहिली रात्र होती. घरी एकच चहलपहल सुरू होती. दोघांची खोली खूप मस्त सजवली गेली होती. संपूर्ण पलंगावर लाल गुलाबाच्या पाकळ्या पसरवल्या होत्या. सगळीकडे फुगे होते. मस्त सुवासिक वास दरवळत होता. सगळे जेवणखाण वैगेरे आवरले.

निश आणि माही स्वतःच्या खोलीमध्ये आले. सजवलेली खोली पाहून दोघेही खुश झाले. आणि दोघेही पलंगावर बसले. आणि दोघांचा मधुचंद्र सुरू झाला. दोघेही एकमेकांमध्ये विलीन झाले होते. आणि त्याचवेळी........'रिक्स..' हे नाव निशच्या तोंडामधून बाहेर पडले. आणि माही एकदम कोसळून पडावी तशी एकदम निशपासून दूर झाली. तिला समजेलच नाही. 'आपण जे नाव ऐकले ते खरेच होते की आपला भास...?' ती आवक होऊन दोन तीन मिनिटे तिथेच बसली. आणि अंगावरील कपडे सावरत ती बाथरूममध्ये गेली. इकडे निशही बावरून गेला होता. आणि मनामध्ये विचार करु लागला. 'आपल्या तोंडून पुन्हा तिचे नाव कसे आले..?' दोघेही आपआपल्याला विचारांमध्ये गडून गेले. आणि यामध्ये सकाळ कधी झाली त्यांना समजलेच नाही.

दुसऱ्या दिवशी निश ऑफिसला निघून गेला. आणि जाता जाता माही कडे पहिला. पण माहीने काहीच प्रतिसाद दिला नाही. चार पाच दिवस असेच अबोल अबोल निघून गेले. आणि एके दिवशी निशने माहीला मोबाईल वर संदेश पाठवला. "मला कॅफे स्वीडन मध्ये भेट दुपारी बारा वाजता" आणि तो ऑफिसला निघून गेला. इकडे माहीने सर्व आवरले आणि कॅफेमध्ये निशला भेटायला निघाली. निश आधीच कॅफेमध्ये माहीची वाट पाहत बसला होता. माही येताच तो उठून उभा राहिला आणि माहीला खुर्चीवर बसायला सांगितला.

खुप वेळ असाच निघून गेला. आणि निशने पुढाकार घेतला. तो बोलू लागला. "काय ऑर्डर करायचे..?" माही म्हणाली "मला फक्त कॉपी" मग निशने दोघांसाठी ऑर्डर दिली. आणि पुन्हा माहीला म्हणाला. "आज वातावरण मस्त आहे न..?" माहीने फक्त मानेनेच होकार दिला. निश थोडा सावरून बसत म्हणाला "तुला काहीच बोलायचे नाहीये का माही..? काही विचारायचे नाहीये का..?" माहीने फक्त डोळ्यांनी सांगितले तू बोल पुढे मी ऐकत आहे. मग निशने सुरुवात केली.

निश कुठेतरी हरवल्यासारखा बोलू लागला दोन वर्षांपूर्वी मी लंडनला गेलो होतो. ऑफिसच्या कामानिमित्त. दुसऱ्या दिवशी ऑफिसचे काम आवरले आणि मी हॉटेल कडे निघालो. हॉटेलवर पोहचलो आणि थोडा लॉनमध्ये फिरत होतो तेव्हाच एक मुलगीने लक्ष वेधून घेतले. दिसायला सावळी, कुरळे तपकिरी केस, टोकदार नाक, भुरे डोळे, गुलाबी ओठ, सगळे एकदम कसे परिपूर्ण. मी तिला पाहतच राहिलो. आणि ती माझ्याजवळ आली. आणि स्मित हास्य करत म्हणाली. "कधी मुलगी पहिला नाही का..?" मी अचंबित झालो. आणि तिला म्हणालो. " तू मराठी बोलते...! म्हणजे तू मराठी मुलगी आहे." मी खूप आनंदाने बोलताना पाहून तिनेही मला खुश होत उत्तर दिले." अर्थातच....हो मी रसिका, पण मला इथे सर्वजण रिक्स म्हणतात. मी महाराष्ट्र मधून बिलॉंग करते. पुणे इथून. आणि तुम्ही......?" इतके म्हणून ती निशच्या प्रतिउत्तराची वाट पाहू लागली. निश म्हणाला. " अरे वा, मी ही पुणे मधूनच आहे. माझे नाव निश. आणि मला सर्वजण निशच म्हणतात. "असे म्हणून तो मोठ्यांनी हसला आणि रिक्स कडे पाहू लागला. त्याला वाटले ती थोडी चिडली आहे पण ती ही हसायला लागली. थोडे औपचारिक बोलणे झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांना बाय केले.

पुन्हा दुसऱ्या दिवशी मला हॉटेलवर रिक्स दिसली. आणि आम्ही दोघे पुन्हा भेटले. पुन्हा गप्पा सुरु झाल्या. रिक्सच्या बोलण्यामधून जाणवले रिक्स या हॉटेलवर दररोज येते. हाफ डे काम करते आणि दिवसभर बाईक घेऊन मस्त सगळीकडे फिरते. हा तिचा आवडता छंद होता. असाच एक आठवडा निघून गेला आणि रिक्सने, मला फिरण्यासाठी सोबत येणार का असे विचारले. आणि मी ही तयार झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही फिरण्यासाठी गेलो. असाच वेळ जात होता. आणि आम्ही एकमेकांनाकडे आकर्षित होत होतो. माझी भारतामध्ये येण्याची वेळ आली. मी रिक्सला सांगितले तसे, तेव्हा तिचा चेहरा पडला. तिला वाईट वाटत होते. हे स्पष्ठ समजत होते मला. पण मी काही बोललो नाही तिला. दुसऱ्या दिवशी विमानतळावर ती मला सोडण्यासाठी आली व मी तिला विचारले. " माझ्यासोबत लग्न करणार का.? मला नाही माहीत यापेक्षा वेगळे कोणत्या प्रकारे लग्नाची मागणी घालतात. पहा तू विचार कर आणि मला सांग. मी भारतामध्ये गेल्यानंतर तुझ्या उत्तराची वाट पाहीन" ती माझ्या डोळ्यामध्ये एकटक पाहत म्हणाली. "खरे तर मीच तुला विचारणार होते. पण त्याआधी तूच मला विचारला. आणि असे म्हणून तिने मला मिठी मारली आणि कानामध्ये म्हणाली. " डिअर निश मी खरेच तूझ्यासोबत लग्न करायला तयार आहे." मी ही प्रचंड खुश झालो आणि तिला गुड बाय म्हणत विमानामध्ये बसलो. मी माझ्या एका वेगळ्याच दुनियेमध्ये होतो. भारतामध्ये आल्यानंतर ही मी खूप खुश होतो. 'रिक्स...' माझी पहिली प्रियसी..' मी इथे, रिक्स लंडनमध्ये, पण फोन.. संदेश यामुळे आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. आमचे सर्व मस्त सुरू होते.

असेच महिने उलटून गेले. आणि एक दिवस रिक्सने मला सांगितले. ती मला भेटण्यासाठी भारतामध्ये येत आहे. मला खूप आनंद झाला. मग मी तिला माझ्या घरीच यायला सांगितले. थोड्याच दिवसांनंतर ती भारतामध्ये आली. तिने जी कपडे परिधान केली होती ती खूप मॉडर्न होती. जी की माझ्या घरी चालणार नव्हती. मी तिला सांगितलो. चांगली कपडे परिधान कर. पण तिने नकार दिला आणि म्हणाली. "तुझ्या कुटुंबाला मी जशी आहे तशीच भेटुदे. आहे एक आणि दाखवू एक हे मला जमणार नाही." अशी म्हणून ती माझ्यासोबत माझ्या घरी आली. तिला पाहूनच आईच्या कपाळावर आटी पडली. आईच्या चेहऱ्यावरूनच समजले तिला रिक्स आवडली नाही. तीन चार दिवस रिक्स माझ्या घरी होती. पण आईने कधीच तिला आपली भावी सून म्हणून स्वीकारली नाही. रिक्स आणि आईचे या चार दिवसामध्ये कधी जमलेच नाही. रिक्सलाही माझ्या आईचे काही पटत नव्हते. चार दिवसांनंतर ती लंडनला परत गेली. पण आईने सरळ सांगितले." मला मुलगी पसंद नाहीये. तू तिचा विचार सोडून दे. आपल्या घरच्या चालीरीती ती जपणार नाही. आणि माझा पूर्ण नकार आहे तूझ्या या रिक्स की बिक्सला." मी ऐकून शांतच राहिलो. मी आईला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण सर्व वाया गेले. तिने शेवटपर्यंत नकारच दिला आमच्या लग्नासाठी.

दिवस निघून जात होते. रिक्स आणि माझ्यामध्ये आता भांडण सुरू झाले होते. त्याच वेळी ती मला कायमचे लंडनमध्ये राहण्यासाठी बोलवू लागली. जे की मला शक्य नव्हते. घरीही माझ्या लग्नाचा विषय सुरू होता. रिक्सही समजून घेत नव्हती. आईही समजून घेण्याचा पलीकडे गेली होती. तिने मुली पहायला सुरुवात केली होती. मग मी चार पाच महिने वाट पाहिले आणि संदेश पाठवला. "तुझा शेवटचा निर्णय सांग.." तर तिने प्रतिउत्तर दिले. "मला विसरून जा. आणि दुसऱ्या मुलीसोबत लग्न कर." हा संदेश वाचून मी हैराण झालो. पुन्हा तिला चार पाच दिवस फोन केला तरी तिने तेच उत्तर दिले. मग मी ही मनाची तयारी केली आणि आई म्हणेल तिच्यासोबत लग्न करायला तयार झालो. आणि आईने तुला माझ्यासाठी पसंद केले. आणि आपले लग्न झाले. सर्व सांगून झाल्यानंतरही निश खाली मान घालूनच बसला होता.

माही, निशकडेच पाहत होती. त्याच्या डोळ्यांमध्ये अजून ही तिला रिक्सच दिसत होती. पण स्वतःला सावरत ती म्हणाली. मलाही तुला सांगायचे आहे थोडे. पण माझे असे प्रेमप्रकरण वैगरे काही नव्हते. पण तरीही सांगायचे आहे. असे म्हणून ती त्याच्याकडे पाहू लागली. त्याने मान वर करून तिला डोळ्यांनीच सांगितले तू सांग मी ऐकत आहे. मग तिने सुरुवात केली सांगायला.

दोन वर्षांपूर्वी मी आणि रोध एकाच कंपनीमध्ये नोकरी करत होतो. खरेतर आधी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. एक दिवस मी जिना उतरून खाली जात होते व तो वर येत होता. त्याचे माझ्याकडे लक्ष नव्हते. पण मी त्याला पाहिले. आणि मला तो खूप आवडला. मग मी दररोजच तो यायच्यावेळी मुद्दाम खाली जिना उतरून जाऊ लागले.

एके दिवशी मी अशीच किती वेळ उभी राहून त्याची वाट पाहू लागले. म्हणजे तो वरती यायच्या वेळी मी खाली उतरून जाण्यासाठी. पण, तो आलाच नाही खूप वेळ. आणि अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. आणि विचारले. "कुणाची वाट पाहत आहे..?" मी माझे लक्ष भंग न करताच म्हणाले. "कुणाची नाही.." पण पुन्हा त्याच व्यक्तीने विचारले. "रोध आज आला नाही का..?" मग मी पुन्हा म्हणाले. "हा, नाही आला.." असे म्हणून मी त्या व्यक्तीकडे पाहिले आणि चकीतच झाले. कारण माझ्या शेजारी रोधच उभा होता. माझ्याकडे हसतच पाहत होता तो. दॅट टाइम आय वाज व्हेरी ऍकवॉर्ड सिच्युएशन. मला पुढे काय बोलायचे समजलेच नाही. मी गोंधळून इकडे तिकडे पाहू लागले. मग तो हसत हसतच निघून गेला. त्यांनंतर काही दिवसांनंतर मी माझ्या मैत्रीणीसोबत एका हॉटेलमध्ये गेले होते जेवण्यासाठी. पण त्या हॉटेलमध्ये आधीच सर्व टेबल्स बुक होते. मग आम्ही परत जात होतो तेव्हाच रोध मागून आला आणि मला म्हणाला. "मी इथे एकटाच आलो आहे. इफ यु डोन्ट माईंड, यु जॉईन वित मी. " मग आम्ही विचार केला. काय हरकत आहे. मग आम्ही तिघांनी मिळून जेवण केले. मग मी त्याला थँक्स म्हणाले. मग त्याने माझा मोबाईल नंबर मागितला. मी ही दिले.

त्यांनंतर आम्ही फक्त एकमेकांना फोन मॅसेज करत होतो. पण हे सर्व काही फक्त मैत्री या नात्याने. आणि अचानक एक दिवस रोध लंडनला निघून गेला. कारण त्याला तिथे चांगला जॉब भेटला होता. तो तिकडे गेल्यानन्तरही आम्ही एकमेकांनसोबत बोलतच होतोच. दोन वर्षे निघून गेले आणि घरी माझ्या लग्नाचा विचार सुरू झाला. म्हणून मी रोधला एक दिवस विचारले. "माझ्या घरी माझ्या लग्नाचा विषय सूरु आहे. तुला अजूनही काही बोलायचे नाहीये का.?" त्याने त्यावर फक्त एकच रिप्लाय केला. "बोलू नंतर, कामामध्ये बिजी आहे." त्यानंतर त्याने मला कधीच फोन किंवा मॅसेज केला नाही. मग मी ही समजायचे ते समजून डोक्यामधून विषय काढुन दिले. पण आपले लग्न ठरले आणि आपल्या लग्नाच्या एक दिवस आधी त्याचा फोन आला. त्याने मला लग्नासाठी मागणी घातली होती. पण माझ्याकडे आता या गोष्टीसाठी उत्तर नव्हते. निश, माहीकडे पाहत होता. थोडा वेळ दोघेही शांतच बसून राहिले. मग निशच म्हणाला. "वि हाव टू ओपशन्स. एक तर आपण मागचे सर्व विसरून आपले हे नाते निभावू पण फक्त एक तडजोड म्हणून. आणि दुसरा ऑपशन म्हणजे आपण जर आपला भूतकाळ विसरू शकत नसलो तर घटस्फोट घेऊ." माही काहीच बोलली नाही. ती शून्यात हरवली होती. थोडावेळ असाच शांततेत गेला आणि निश म्हणाला. "आपण यापेक्षा असे केले तर.." माही त्याचे बोलणे कान देऊन ऐकत होती. आणि अजूनही पुढे निश काहीतरी बोलणार आहे म्हणून ती त्याच्या चेहऱ्याकडे आशेने पाहत होते. माहीकडे पाहत निश म्हणाला. "आपण आता हनिमूनसाठी लंडनला जाणारच आहोत. तर मग आपण आपल्याला प्रेमाला भेटलो तर. मग पाहू पुढे काय करायचे." माहीला हा विचार पटला. तिने मानेनेच होकार दिला. मग दोघेही घरी आले.

हनिमूनला जायचा दिवस जवळ आला. मग दोघेही लंडनला जायची तयारी करू लागले. पण त्याआधी आठवणीने दोघांही रिस्क आणि रोधला कॉन्टॅक्ट करून सांगितले त्यांचा मेन मोटिव्ह काय आहे तिकडे येण्याचा. रोधचा रिप्लाय आला. "इट्स व्हेरी गुड न्युज फॉर मी. आय एम डॅम एक्सिटेड. कम फास्ट. मी वाट पाहत आहे तुझी. रिप्लाय पाहून माही खुश झाली. पण रिस्कचा, निशला काहीच रिप्लाय आला नाही. म्हणून तो थोडा अपसेट होता.

हनिमूनला जायचा दिवस उजाडला. आणि दोघांच्या घरचे निश व माहीला बेस्ट विषेस देण्यासाठी जमले. दोघेही लंडनच्या विमानामध्ये बसले. दोघेही खूप खुश होते. पुढचा विचार करून. आणि त्यांना कळलेही नाही. लंडन कधी आले. दोघेही विमानतळावर उतरले. आणि इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हाच रोध दिसला. माहीला खूप आनंद झाला. निशने तिला रोधसोबत जा म्हणून सांगितले. पण माही म्हणाली. "रिक्स...?" तो माहीला म्हणाला. "तिला काहीतरी काम असेल म्हणून ती आली नसेल. तू माझी काळजी करू नको. तू जा रोधसोबत. आणि पोहचल्यानंतर मला मॅसेज कर. टेक कअर.. "मग माही आणि रोध निघून गेले. निश थोडा निराश होऊन विमानतळाच्या बाहेर पडला. आणि समोरच त्याला रिक्स दिसली. ती चारचाकी घेऊन त्याची वाट पाहत उभी होती. निश खुश झाला पण रिक्सच्या चेहऱ्यावरची एक रेषही हलली नाही. निशने स्वतःचे सामान तिच्या गाडीमध्ये ठेवले आणि दोघेही घरी निघाले. थोड्या वेळेनंतर माहीचा, निशला मॅसेज आला.."रिचड" म्हणून.. रिक्स आणि निशही घरी पोहचले. या इतक्या वेळेमध्ये दोघेही एकमेकांसोबत थोडेही बोलले नव्हते. निश घरी आल्यानंतर रिस्कला म्हणाला. "अजून कितीवेळ बोलणार नाहीये तू माझ्यासोबत.?" असे म्हणून तो रिस्ककडे पाहू लागला. रिस्क स्वतःच्याच कामामध्ये होती. निश मग कितीतरी वेळ तिच्याकडे पाहत बसला. रिक्सने कॉपी बनवली. व निशला कप देता देता म्हणाली. "तू तुझ्या आईच्या सांगण्यावरून लग्नही करून घेतला. छान केला. मग आता पुन्हा माझ्याकडे का आला आहे.?" निश तिच्याकडे पाहतच म्हणाला. "कोणीतरी लग्न करणार करणार म्हणत शेवटी नाहीच म्हणाले." लागायचा तो पंच लागला होता. इकडे माही आणि रोधही एकमेकांना भेटून आनंदी होते..

दुसऱ्यादिवशी रिक्स आणि निश बाहेर फिरण्यासाठी गेले. आणि त्याचवेळी निशच्या आईचा कॉल आला. निश मनामधून घाबरला पण तरीही त्याने कॉल रिसिव्ह केला. थोडे बोलून झाल्यानंतर आईने माहीबद्दल विचारले. आता काय बोलावे निशला समजले नाही. म्हणून निश म्हणाला. "ऐक न आई, आम्ही करतो नन्तर कॉल. बाहेरही फिरायला जायचे आहे. आज थोडा उशिराच उठलो आहोत दोघे." निशची आई ठीक आहे म्हणून कॉल ठेवली. तेव्हाच निश, रिक्सला म्हणाला. "आज सुटलो, उद्याचे काय..? गॉड नोज.."
रिक्सने काहीच प्रतिउत्तर दिले नाही. पुन्हा दोघेही फिरण्यामध्ये गुंग झाले. इकडे माही आणि रोधही एकमेकांसोबत मस्त टाईम घालवत होते. आधीच्या दिवसावर बोलत होते. दिवस मस्त निघून गेला.

दोन तीन दिवस असेच फिरण्यामध्ये निघून गेले आणि एक दिवस माहीला निशचा कॉल आला. "माही, अग आई कॉल करत आहे सारखी. आणि तिला गेली दोन तीन दिवस मी कारणे देऊन आता माझ्याकडील कारणे संपली आहेत. सो, आज तू इकडे ये आपण आईला व्हिडीओ कॉल करू. तिला संशय यायला नको." माहीने "हा येते" असे सांगितले. आणि ती रोधला सांगून सर्व आवरून निशकडे निघाली. निशला पाहून माहीला आंनद झाला. दोघांनी मिळून आईला व्हिडीओ कॉल केला. आणि थोडा वेळ गप्पा मारल्या. कॉल झाल्यानंतर माहीने निशला विचारले."रिक्स कुठे दिसत नाहीये..!" यावर निश म्हणाला. "अग, तिचे काम आहे. तिला आणखीन सुट्टी नाही भेटणार." माही हसत म्हणाली. "अरे रोधचेही हेच झाले आहे. सो, मी विचार करतच होते. आता आपण एकटे काय करायचे..? तुला कॉल करणार होते पण. आय थॉट यू बीजिंग विथ रिक्स." निशने फक्त स्मित हास्य केले आणि म्हणाला. "चल मग आपण दोघे फिरू. असे म्हणून दोघेही बाहेर फिरण्यासाठी जाऊ लागले..

दोघेही मस्त वेळ घालवत होते. आणि अचानक एक दिवस दोघांनी ठरवले की, रोध आणि रिक्स यांच्यासोबत रात्रीचे जेवण करायचे. ठरल्याप्रमाणे चौघेही रात्री जेवण्यासाठी एकत्र आले. पण रोधने थोडी जास्तच ड्रिंक घेतली. सो त्याला तो काय बोलत होता याचे भान राहिले नाही. आणि तो रिक्ससोबतही फ्रल्ट करत होता.. निश सर्व शांतपणे पाहत होता. माही त्याला आवरण्याचा प्रयन्त करत होती. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी निशने त्यांना रोधच्या घरी सोडले. आणि तो रिक्ससोबत तिच्या घरी आला. घरी आल्यानंतर निश शांतच होता. काही केल्या त्याच्या डोक्यामधून रोधचे वागणे जात नव्हते. तेव्हा रिक्सच म्हणाली. "तुला तो रोध थोडा खराब मुलगा वाटला नाही...? आय मिन टू से. ही इज नॉट राईट पर्सन फॉर माही." "त्याचे वागणे, थोडे खटकले मला, सो आय टोल्ड यु." बाकी माहीची मर्जी. निश काहीच बोलला नाही. पण तो माहीचा विचार करता करताच झोपी गेला.

लंडनला येऊन आता एक महिना होत आला होता. भारतामध्ये परत जाण्यासाठी आता फक्त एक आठवडाच बाकी होता. पुढे काय करायचे याच विचारांमध्ये दोघेही होते. घरी काय सांगायचे.? याचे उत्तरही त्यांना भेटत नव्हते. शेवटी संध्याकाळी ते आपल्याला ठिकाणी गेले. आणि माही, रोधला विचारू लागली.ब"आपण पुढे काय करायचे. कारण एक महिना झाला आहे. आणि माझी सुट्टीही संपली आहे. आता आपण लग्न करणे गरजेचे आहे." रोध हसत म्हणाला. "अग.. अजून थोडा वेळ जाऊदे, आधी तू निशकडून घटस्फोट तरी घे. मग लग्नाचे पाहू." माही ठीक आहे म्हणाली. आणि झोपण्यासाठी स्वतःच्या रूमकडे वळली. ती रूममध्ये जाऊन निशला मॅसेज करतच होती की तिला दारावरची बेल वाजल्यासारखे ऐकू आले. पण तिने दुर्लक्ष केले. पण थोडा वेळ गेला आणि तिला बाहेर कोणीतरी कुजबुज करत असल्यासारखे ऐकू आले म्हणून ती रूमच्या बाहेर आली. आणि पाहून शॉकच झाली. बाहेर एक मुलगी रोधला मिठी मारत म्हणाली. "आय रिअली मिस यु माय स्वीट हार्ट." आणि रोध तिला म्हणाला. "हॉयु यु कम हेअर बेबी..? यु टोल्ड मी. यु आर नॉट रिटर्न अगेन इन माय लाईप.ब" त्यावर ती मुलगी म्हणाली. "सॉरी, बट आय शुडन्ट लिव्ह विथआऊट यु." हे सर्व पाहून माहीला काहीच समजले नाही. ती फक्त स्तब्ध उभी राहिली. आणि ती मुलगी सर्व सामान घेऊन माहीच्या रूमकडे वळली. तिथे माहीला उभी राहिलेली पाहून ती रोधकडे वळून म्हणाली."ह्यू इज शी.?" रोध स्वतःला सावरत म्हणाला. "शी इज माय फ्रेंड. लंडन पाहण्यासाठी आली आहे.." त्यावर ती मुलगी ठीक आहे म्हणाली आणि रूममध्ये गेली. इकडे लगेच रोध माहीच्या जवळ येऊन म्हणाला "सॉरी, माझ्याकडे ऑपशन नव्हता. इथले नागरीकत्व मिळवण्यासाठी मला सुजेनसोबत लग्न करावे लागले." माही पुढेचे काहीच न ऐकता तिथून निघून गेली. ती रात्र तिने कशीबशी काढली.. आणि दुसऱ्या दिवशी एका हॉटेलमध्ये जाऊन थांबली. ती खूप दुःखी झाली होती. ज्याच्यासाठी मी इकडे आले त्यानेच मला फसवले.

इकडे निश एकसारखा माहीला कॉल करत होता. पण ती एकही कॉल रिसिव्ह करत नव्हती. त्याला तिचे टेन्शन येऊ लागले. रिक्स काय बोलत आहे याच्याकडेही त्याचे लक्ष नव्हते. तो फक्त माहीचा विचार करत होता. त्याला काही सुचेनासे झाले होते. आणि रिक्स म्हणाली. "अरे, कुठे लक्ष आहे तुझे.? मी केव्हापासून तुझ्यासोबत बोलत आहे. आज मला सुट्टी आहे. आणि आपण बाहेर फिरायला जाऊ. आवर लवकर. पण तू तुझ्याच विचारांमध्ये गुंतला आहे. झाले काय आहे.? काही बोलणार का.?" पण निश काहीच बोलला नाही. पुन्हा रिक्सच म्हणाली. "निश...! सुरू काय आहे तुझे.? मी बोलत आहे तरी तुझे काही एक नाही." तरीही निश काहीच बोलला नाही. मग रिक्स चिडली आणि म्हणाली. "बोलणार आहे का तू काही.?" निश आता ताडकन जागेवरून उठला आणि म्हणाला."माही कॉल रिसिव्ह करत नाहीये. मला तिची काळजी वाटत आहे. मला तिच्याकडे जायला हवे." रिक्स चिडली आणि म्हणाली. "तू का तिची काळजी करत आहे.? ती रोधसोबत असेल. म्हणून कॉल रिसिव्ह करत नसेल." "पण मी काय बोलते ते तू ऐकला का.? आपण बाहेर फिरायला जाऊ म्हणत आहे. समजले का तुला.?" निश, रिक्सवर चिडला आणि रागाने म्हणाला. "तुला फक्त स्वतःचे पडलेले असते. कुणाला काय वाटते यापेक्षा तुला काय वाटते हे जास्त गरजेचे वाटते. माही माझा कॉल रिसिव्ह करत नाहीये. तिने यापूर्वी असे कधीही केले नाहीये. तुला इतके साधे कळत नाही. ती कोणत्यातरी प्रॉब्लेममध्ये आहे. पण नाही. तुला फक्त तुझे पडले आहे. लहान मुलीसारखी वागते नेहमी. फक्त तू तुझा विचार करते. तुला काय वाटते तुला काय हवे आहे. याच्या पलीकडे तू कधी विचारच करत नाही. आणि हो... माही माझी बायको आहे ती का कॉल रिसिव्ह करत नाही याचा मला फरक पडतो समजले का तुला." रिक्स त्याच्याकडे पाहतच राहिली. ती त्याला म्हणाली. "म्हणजे...? माझी काही किंमतच नाहीये तुझ्या लाईफमध्ये. आणि मागे तू आला आहे मी नाही. इंफॅक्ट तुझे लग्न झाले आहे व माही तुझी बायको आहे हे मला चांगलेच माहीत आहे. कदाचित तू हे विसरला होता. आणि हा आहे मी मतलबी. आणि का असू नये..? जेव्हा तुझी आई मला पसंद करत नव्हती तर तिच्या आगेन्स्ट जाऊन लग्न केला का तू माझ्यासोबत. तुला तुझे मत नाहीये.? स्वतःचा निर्णयही स्वतः घेऊ शकत नाही." निश तिथून जाणारच होता की रिक्सने त्याला थांबवले. आणि एकदम कड्या आवाजामध्ये म्हणाली."तुला जायचे असेल तर खुशाल जा तू. पण इथुनपुढे तुझा आणि माझा काहीएक संबंध नसणार. मान्य आहे का तुला.? आणि ज्या माहीसाठी तू जात आहे. ती रोधसोबत तिथे मस्त आंनदी आहे. विचार कर आणि सांग मला. मी इथेच उभी आहे. मला कुठे जायची घाई नाहीये." पण निश तिला काही न बोलताच तेथून निघून गेला. आणि तो सरळ रोधच्या घरी गेला. पण घरी रोध नव्हता. त्याची बायको सुजेन होती. निशने तिला विचारले. "वेअर इज माही..?" त्यावर सुजेन म्हणाली. "शी लिव्ह आवर होम. अँड आय डोन्ट नो. वेअर इज शी." निशला खूप राग आला. आणि तो तावातावाने म्हणाला. "व्हाट डू यु मिन बाय? आय डोन्ट नो. यु मस्ट नो अबाऊट हर. बिकज शी कम हियर ओन्ली फॉर रोध. अँड यु टोल्ड मी. यु डोन्ट नो अबाऊट हर. वा ग्रेट. इट्स रिअली ग्रेट. अँड वियर इज रोध..??" त्याच्या या बोलण्यावर सुजेन फक्त इतकेच म्हणू शकली. की रोध कामावर गेला आहे. यावर प्रतिउत्तरावर निश प्रचंड चिडला आणि दारावर मूठ मारत म्हणाला. "माही.. कुठे आहे तू? प्लीज मला एकदा कॉल कर." आणि तो एकदम टेन्शनमध्ये आला आणि बाहेर पडला. मग त्याने रोधला कॉल केला. "हॅलो रोध, मी निश बोलतो. माही कुठे आहे? तुझ्यासोबत आहे का ती..? ती माझा कॉल का रिसिव्ह करत नाहीये." रोध पलीकडून एकदम शांतपणे म्हणाला. "अरे. जस्ट चिल. ती सकाळीच माझ्या घरामधून बाहेर पडली. मी विचारले तर म्हणाली. माझे मी माझा मार्ग पाहते. सो मलाही माहीत नाहीये ती कुठे आहे." निश आणखीन चिडला आणि म्हणाला. "तुला समजते का तू काय बोलत आहे. ती मुलगी फक्त तुझ्यासाठी लंडनला आली होती. आणि तू आता म्हणतो. तुला माहित नाही? ती कुठे आहे आणि कोणत्या सिचूअशनमध्ये आहे?" रोध खूप निर्लजपणे हसत म्हणाला. "हेय, तू का इतका चिडत आहे. इंडियामध्ये सर्व करून इकडे आला दोघे तुम्ही. आणि तूच वरती माझ्यावरच एक हात वर करून बोलत आहे. इतकीच काळजी आहे तर लग्न करून ही इकडे कशाला आला होता? आणि तिने तर हद्दच केली. स्वतः दुसऱ्यासोबत लग्न करून माझ्याकडे आली. आणि माझे लग्न झाले आहे हे समजल्यानंतर मलाच म्हणते. माझा मार्ग माझे मी पाहते." निशने चिडून कॉलच कट केला. आणि आहे तिथेच उभा राहून विचार करू लागला. 'कुठे गेली असेल माही? तिला समजत नाही का? मला एक कॉल करायचे ते.' आणि तो थोडावेळ तिथेच विचार करत उभा होता. आणि त्याला एकदम आठवले. लंडनमध्ये येण्यापूर्वीच आपण इंडियामधून एक हॉटेल बुक केलो होतो हनिमूनसाठी. कदाचित माही तिथेच गेली असणार. असे म्हणून तो त्या हॉटेलवर गेला. आणि तिथे जाऊन रेसिपीनिस्टला माहीबदल विचारू लागला. तेव्हा त्याला समजले. माही त्याच हॉटेलमध्ये आहे. मग तो माहीच्या रूमकडे निघाला. पण रूममध्ये माही नव्हती. तो विचार करू लागला.

इकडे माही उंच टेकडीवर एक बाकावर बसून विचार करत होती. हे सर्व काय झाले? आता घरी जाऊन काय सांगायचे? ती खूप रडत होती. आणि तिला राहून राहून निशची आठवण येत होती. निशला जाऊन मिठी मारून खूप रडू वाटत होते. आता यावेळी निश आपल्यासोबत इथे असायला हवा होता. असे तिला सारखे जाणवू लागले. तिला जे घडले यापेक्षा निश आपल्यासोबत असता तर किती चांगले झाले असते असे वाटू लागले. आणि ती त्याच्यासोबत घालवलेला टाइमबद्दल विचार करू लागली. आणि हसू लागली.

निश त्या टेकडीवर आला. आणि आल्या आल्या माहीकडे पाहून रागाने तिला म्हणाला. "अक्कल आहे का तुला? इंडिया नाहीये हे. किती कॉल केलो तुला. एक कॉलही रिसिव्ह करता आला नाही तुला. किती टेन्शन आले होते मला. तू मूर्ख आहे का? बोल काहीतरी" पण माही फक्त त्याच्याकडे पाहून मिठी मारून रडू लागली. निशने तिला शांत केले आणि म्हणाला."मला वाटत होते मी रिक्सवर प्रेम करतो. पण, आज मला कळाले मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि मला फक्त तुझ्यासोबत जगायचे आहे." माही रडत रडतच म्हणाली. "मी ही तुझ्यावर प्रेम करायला लागले हे मला आजच समजले." दोघेही एकमेकांना आणखीन घट्ट मिठी मारून रडू लागले. आणि हसूही लागले.

ही तीच टेकडी होती. ज्या टेकडीवर दोघांनी खूप वेळ सोबत घालवला होता. त्या टेकडीवर वारा कसा मस्त वाहत होता. सगळीकडे एक मस्त प्रकाश पसरला होता.. फुलांचा मस्त सुवास येत होता.. वातावरण एकदम मस्त बनले होते. आणि त्यांच्या प्रेमाचा आनंद व्यक्त करत होते. आणि आज हीच टेकडी त्यांच्या प्रेमाची साक्षीदार होती.