रहस्यम बदलांच सत्य Shreyas Ghadge द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रहस्यम बदलांच सत्य

 जर आपल आयुष्य आपण व्यवस्थितपणे निरखून बघितलं, तर प्रत्येक क्षणातली एक एक गोष्ट त्यात आपल्याला दिसेल. आणि व्यवस्थितपणे आपल्याला लक्षात येईल तर आपल आयुष्य हे देखील एका ऋतु प्रमाणेच आहे. जात कधी पावसाळा ,कधी उन्हाळा,हिवाळा त्या सगळ्या गोष्टींचा समावेश काही प्रमाणात असतो. एवढेच नव्हे तर बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आठवणी देखील ऋतूंप्रमाणे निगडीत असतात. ज्याला आपण भावना द्वारे व्यक्त करतो. खरे तर आयुष्य हेच आहे ,जर सगळ्या ऋतूंमध्ये आपण प्रत्येक क्षणाला जगलो तर आपल्याला टाकली दिसू शकता माहिती पडते. जो व्यक्ती दुःखात देखील आनंद शोधण्याचा जर प्रयत्न करत असेल तर कदाचित अत्यंत मजबूत दृष्टीने त्याचा पाया त्याने रेखाटलेला आहे. व जो व्यक्ती आनंददेखील दुःखीच राहत असेल, तर समजून येते की अवकाळी पावसा प्रमाणेच या ऋतूमध्ये च्या गोष्टी व्हायला पाहिजे, म्हणून मुद्दाम ढगाळ वातावरण निर्माण करतो. 

                      खरेतर व्यक्ती हा सत्याचा कधीही बदलू शकत नाही. जे होणार आहे ते होऊनच राहणार आहे. वास्तविक पाहता बघितलं तर आज जर तुम्ही दुःखी आहात, तर कदाचित या असे जगायला पाहिजे की उद्याचा दिवस हा चांगला होईल. कारण फक्त आणि फक्त तुमचा दिवस वाईट होता तुमचा आयुष्य नाही. खरेतर गोष्टी तेव्हा जास्त आनंदी बनतात जेव्हा तुम्ही वर्तमान काळात जपतात आणि वर्तमान काळातील होणाऱ्या घटनांना बारकाईने निरीक्षण करून त्यावर ती स्वतःची प्रतिक्रियाही व्यक्त करता. परंतु आताच्या काळात नेमकं होणार नुकसान ही व्यक्तिच्या विचारसरणीमुळे होत आहे. ज्या गोष्टी घडल्या नाही त्यांचा विचार करणे, भविष्यात कोणत्या गोष्टी घडणार आहे त्यांचा आधीचा आराखडा बनवण्याचे जे की कधी पण बदल निर्माण करून घेऊ शकतात. म्हणून प्रत्येक गोष्टीवर करिता एक सत्यता लाभलेली आहे. त्यात बहुतांश वेळेस कुठल्याही प्रकारचा बदल घडून येऊ शकत नाही. म्हणजेच मी रहस्यमय बदलांची गोष्ट करत आहे. खरे तर तुमच्या अंतरातील आत्मा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट करून देण्याचा प्रयत्न करते. पण बहुतांश वेळेस तुम्ही त्यात आपण इतके गर्क होऊन जातो, जी गोष्ट आपल्याला स्वीकारायला पाहिजे त्या गोष्टीला आपल्याला स्वीकारायचं नसते. एवढेच नव्हे तर बहुतांश वेळेस जो व्यक्ती आपल्याला सारखा सारखा नकार देतो. नेहमी आपल्या मनात तोच व्यक्ती हवा असतो. विचार करून बघितला तर अशा वेळेस ज्या व्यक्तीला आपण हवी असतो त्या व्यक्तीला जर आपण आत्मसात करून स्वीकारले तर कदाचित आपला आयुष्य जास्त सोपे होईल. परंतु आपलं मन त्या गोष्टींकडे कधी विचार करतच नाही. कारण भावने द्वारे हा रहस्यमय बदल घडवून आणणे कदाचित थोडे कठीण आहे. आणि सर्वात मोठा बदल तेव्हा कडून येते जेव्हा आपण गोष्टींना स्वीकारणं शिकतो. एवढे सोपे नसते प्रत्येक गोष्टीला आपल्या मनानुसार किंवा मना व्यतिरिक्त स्वीकारणे. तुमच्या एका निर्णयामुळे तुमचे आयुष्य घेऊ जाऊ शकते व तेवढ्यातच ते संपुष्टात देखील येऊ शकते. बहुतांश वेळेस आपल्या मनाला बऱ्याच गोष्टी शिकवण्याची गरज असते, आणि ती आपल्या व्यतिरिक्त कोणी शिकवू शकत नाही.जसे उदाहरणार्थ काही गोष्टी जर बदलू शकत नाही, त्या गोष्टींबद्दल कधी बदल करून घेऊ शकत नाही,त्यांना आपल्या मनात द्वारे स्वीकारायला पाहिजे की ते बदलू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या जगात कोणतीही गोष्ट पूर्णपणे निवास करत नाही. त्याची बरीच कारणे आहे, एवढेच नव्हे जर कोणती गोष्ट तुम्हाला निवास करताना आढळली, तर त्यामागे कारणीभूत देखील आपणच असतो. खरेतर सत्यता ही आहे की कोणताही व्यक्ती, जेव्हा गोष्टींना आतून समजण्याचा प्रयत्न करतो जेव्हा कि ती गोष्ट तितकी मोठी नसताना देखील त्याची आवश्यकता मुळीच नाही आहे. एवढेच नव्हे तर बहुतांश आपल्यापेक्षा शिक्षण आणि बुद्धीने कमी असणाऱ्या लोकांना देखील आपण परस्पर महत्त्व देऊन त्यांचं आपल्या आयुष्यात मोठ स्थान निर्माण करतो. अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण याद्वारे देखील असे काही बदल घडून येतात ज्यांना आपल्याला भोगावे लागते. आपले विचार नेहमी आपल्या बला नुसारच मजबूत करायला पाहिजे. जे बहुतांश वेळ सत्य घटनेद्वारे व्यक्त झाले पाहिजे. असे बरेच सत्यता बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनाने बनलेले आहे. तसेच सर्वात मोठा आयुष्यातला घटक म्हणजे व्यक्तीच येणे व व्यक्ती चे जाणे. फार क्वचित असे लोक असतात जे तुमच्यासोबत पहिले पासून ते शेवटपर्यंत असतात. परंतु बदल घडवून आणण्याकरिता सर्वात मोठा आयुष्यातला सर्वात मोठी सत्तेची बाब हीच आहे , व्यक्तीच येणे व व्यक्तीचं जाणे.  असेच एक महत्त्वाचं शेवटचा सत्य ही देखील आहे, जेव्हा तुम्ही आयुष्यात भविष्यात पोहोचल्यानंतर जिल्ह्यातून भूतकाळातल्या काही ताण-तणावाच्या व तुम्हाला झालेल्या भावने द्वारे दुखापतींचा जेव्हा विचार करतात, तर बहुतांश व्यक्तींना स्मितहास्य येते. आणि बरेचदा तो मनातल्या मनात ही देखील म्हणतो ''किती मूर्ख होतो मी या सगळ्या गोष्टींचा देखील ताण तणाव निर्माण करून घेतला होता.'' कारण सगळा खेळ हा तीव्रतेचा आहे, त्या क्षणाचा आहे. सर कोणत्या गोष्टीची आठवण रोज येत असेल, त्याद्वारे नेहमी चर्चा होत असेल तर तो विषय असाच चघळला जातो. त्यात बहुतांश वेळेस बदल घडून येत नाही व गोष्टींमध्ये बदल तेव्हा कडून येतो जेव्हा त्या गोष्टीचा विसर पडतो. परंतु यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या गोष्टीची चर्चा होत आहे ती कोणत्या विषयाची आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर चटपटा विषय असेल तर तो लोक कधी विसरत नाही. उदाहरणार्थ जर तुम्ही आयएस ऑफिसर बनले असेल तर लोक दोन दिवसात विसरून जाईल, परंतु जर आयएएस ऑफिसर म्हणून तुम्ही भ्रष्टाचारात पकडले गेले. तर लोक तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवेल. आणि या सगळ्या गोष्टी सोबत आणखी एक महत्त्वाचं आणि शेवटचं सत्य हे आहे, या जगात तुमचा सर्वात मोठा चाहाता हा तुमचा कोणीतरी अनोळखी च व्यक्तीस राहील. पण तुमचा सर्वात जास्त राग करणारा व्यक्ती हा तुमचा कोणी जवळचाच राहणार. परंतु ही आणखी जगातलं सर्वात मोठं सत्य हे आहे, ची प्रत्येक व्यक्ती हा कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यातील एक खरा भटकून बनतोच. त्यात बदल करून येऊ शकत नाही. या जगात तुम्हाला प्रत्येक व्यक्ती जर असं करत असेल तर समजून घ्या की तुमच्या कोणतातरी बिघाड आहे. कारण पूर्णपणे अशक्य म्हणता येणार नाही परंतु काही क्षणापर्यंत असे म्हणता येऊ शकते की तुम्ही कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या आयुष्यातील एक आठवण असाल. वास्तविक बघितला तर तुम्हीच सगळ आहे, एवढेच नव्हे तर तुमच्यातच सगळ्या गोष्टी आहे प्रश्न देखील तुमच्यात आहे उत्तर देखील तुमच्यात आहे, चांगल्या गोष्टी पण तुमच्यात आहे वाईट गोष्टी पण तुमच्यात आहे. मेहनत करण्याची ताकद देखील तुमच्या तयारी आळस बाळगण्याची शक्तीदेखील तुमच्या कडे आहे. परंतु शेवटी विजय कोणत्या व्यक्तीचा होतो? हा प्रश्न मात्र सर्वांना पडत असेल. मेळा चा सर्वात सोपे उत्तर ही आहे त्यांची निवड कोणती होती. व त्यांच्या निवडी द्वारे हा रहस्यमय बदल घडून आलेला आहे. एवढेच नव्हे तर आनंददेखील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख देखील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आहे. जिंकला देखील प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि खानदेखील प्रत्येकाच्या आयुष्यात खरे तर फरक एवढाच आहे की काही लोक आल्यानंतर त्यातून काही गुण देतात व समोर जातात तर काही लोकं त्याचा शोक साजरा करीत असतात. खरेतर जिंकणे ही कधी पण नशिबाची देणगी नसते, तर फक्त आणि फक्त विजय व्यक्तीची निवड असते. एवढेच नव्हे तर आनंदी राहणे व दुःखी राहणे हे देखील व्यक्तीची निवड असते. त्याला आनंदी राहायचं असेल तर त्याला पहिले आपल्या मनाची परवानगी घ्यावी लागते. मग कोणती परिस्थिती असो त्याला जर आनंदी राहायचं असेल तर तू राहू शकतो. आणि हे शेवटचा रहस्यमय बदलांचं सत्य आहे.