Unexpected Love - 3 saavi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Unexpected Love - 3

रूद्र आर्या

●●□□●●

सकाळी रूद्र त्याच्या रोजच्या वेळेवर उठतो.. आणि नेहमीप्रमाणे त्याच्या जिम मध्ये जायला निघतो... तो खाली येतो आणि जिम च्या दिशेने जातच असतो की त्याला गार्डन कडे जाणार्या स्पेस मध्ये असलेल्या झोक्यावर बसलेली आर्या दिसते...

सकाळचे पाच वाजत असताना ही इथे काय करते असा प्रश्न त्याच्या डोक्यात येतो . अजुन पूर्णपणे सकाळ झालेली नसते. जी मुलगी 9 वाजल्या शिवाय उठायची नाही ती 5 वाजता उठलेली म्हणून त्याला पचायला जरा जड जात होतं... तो तसाच परत एकदा तिला निरखून बघतो....

आर्या एकटक बाहेर पाहत असते.. डोळे मिटून थंडगार मंद वारा चेहर्यावर झेलत होती.. हळु हळु झोका पायाने हलवत होती.. त्याने निरखून पाहिले तर तिच्या कानात ईयर बड दिसले बाजूलाच मोबाइलही दिसला म्हणजे.. मैडम सकाळ सकाळी थंड वातावरणात गाण्याचा आनंद घेत होत्या... ती खूप तल्लीन होऊन गाणं ऐकत होती... चेहर्यावर समाधान दिसत होते...

काही क्षण तिच्याकडे बघून रूद्र तिथून निघून गेला.. जिम मध्ये जाऊन त्याचं जे अगोदर पासूनच पिळदार शरीर होते त्याला आणखीनच ताकदवान बनवत होता... चांगलेच 2 तास तो त्याच्या शरीरावर मेहनत घेतो... व्यायाम करुन तो तसाच त्याच्या रूममध्ये जायला निघतो... जाताना तो तिथे असलेल्या स्पेस कडे बघतो तर आर्या त्याला तिथे झोक्यावर दिसत नाही... तो तसाच जायला निघतो....

तो त्याच्या रुम मध्ये जाणारच असतो की त्याच्या समोरील रुम मधून आर्या निघते... दरवाज्याच्या होणार्या आवाजमुळे तो तिकडे बघतो तर आर्या नुकतीच अंघोळ करून तिच्या रुम बाहेर पडत होती.... केस साध्या पद्धतीने बांधले होते.. अंगावर सिंपल कलर चा कुरता होता.. ओढणी एका साइड ने घेउन मोकळी सोडली होती... कपाळावर टिकली.. हातात एक एक बांगडी टिपिकल मराठी मुलगी शोभत होती... पैंजण तेवढे नव्हते पायात..

ती तिच्या रूमचा दरवाजा लावत होती आणि तो तिच्याकडे बघत होता.. ती दरवाजा लावून पुढे बघते आणि क्षणभर त्यांची नजरानजर झाली ती फक्त काही सेकंद... कारण आर्या ने तिची नजर चोरली होती त्याच्याकडून.. उगीच अवघड्ल्यासारखे झाले तिला.. ती काही ना बोलता तिथून भरभर चालत निघून जाते...
रूद्र मात्र तिथेच असतो.. त्यांची नजरानजर झाली त्या क्षणी त्याचे हार्टबीट् स्किप झाल्यासारखं त्याला जाणवलं... पण त्याने या गोष्टी कडे जास्त लक्ष दिले नाही...
तो फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातो...

●○●○●○●○●○●○●○●○●○●

आर्या खाली जाते तर रूद्रची मॉम घरात असलेल्या देवळात देवपूजा करत होती... ती दूरूनच त्यांना पाहत होती... रूद्रची मॉम पुजा करण्यात मग्न झाली होती... त्यांच्या समाधानी चेहर्यावरुन त्यांच देवप्रती असलेली आस्था झळकत होती... त्यांची पुजा होताच त्या आरतीची ताट घेऊन उभ्या झाल्या.. त्याच वेळी रूद्रचे dad आले... तेही डायरेक्ट देवळांत गेले आणि पाया पडून देवांचा आशिर्वाद घेतला..

रूद्रच्या मॉम ने त्यांना आरती दिली आणि त्यांच्या पाया पडून त्यांचा आशिर्वाद घेतला.. दोघांच्या चेहर्यावर छान समाधानी हसू होतं...
त्यांना समाधानी पाहून आर्याच्या चेहर्यावरही गोड हसू आलं.... तितक्यात त्यांची नजर आर्या जाते जी एका कोपर्यात ऊभी राहुन त्यांना पाहत होती...

ते दोघे तिला डोळ्यांनीच त्यांच्या जवळ बोलावतात ... तशी ती पण त्यांच्या जवळ जाते..

रूद्रची मॉम तिच्या समोर आरतीची ताट पुढे करते.. तशी आर्या गालात हसून नाही मध्ये मान हलवते... रूद्रचे मॉम dad तिच्याकडे गोंधळून पाहत असतात...

" काय झालं आरु?? आरती का नाही घेत??", रूद्र ची मॉम गोंधळून विचारते..

" मी मूर्तीत देवाला शोधत नाही.. जी व्यक्ती माझ्या मदतीला धावून येते.. तिच व्यक्ती माझ्यासाठी देव आहे.. मग ती व्यक्ती कोणीही असो... वयाने लहान किंवा मोठी... कुरूप किंवा सुंदर.. श्रीमंत किंवा गरिब... देवाचं अस्तित्व आहे हे मी मानते... पण मी मंदिरातील देवाला मानत नाही... ", आर्या म्हणते आणि त्या दोघांच्याही पाया पडते..

ते दोघं मात्र किंचित गालात हसून देतात..

" तू तुझ्या आईवडीलांच्या विरुद्ध आहेस... तुझ्या आई ची तर अपार श्रद्धा आहे देवावर.. किती व्रत किंवा उपवास ठेवून मंदिरात जाते...", रूद्रची मॉम हसुन म्हणते...

इतक्यात सिद्धार्थ तिथे येतो...

" मग दी... तू आस्थिक आहेस की नास्थिक... की दोन्ही आहेस की ... दोन्ही नाहीस?? I m so confused... ", सिद्धार्थ confused होऊन म्हणाला.. कारण त्याने तिचं बोलणं ऐकलं होतं...

" मलाही माहित नाही... ", आर्या हसुन म्हणते..

तसे सगळे हसतात.. सिद्धार्थ ही देवांच्या पाया पडून आशिर्वाद घेतो.. आणि त्याच्या मॉम dad चाही आशिर्वाद घेतो...

ते सगळे डाइनिंग टेबल वर बसतात... आर्या सिद्धार्थ जवळ बसते...इतक्यात रूद्रपण येतो.. आणि देवाच्या पाया पडून आशिर्वाद घेतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग विष करुन त्याच्या सीट वर बसतो..
रूद्रची मॉम आणि आर्या सगळ्यांना ब्रेकफास्ट serve करतात..

" आर्या... बाळा कॉलेज ला रिपोर्टिंग कधी द्यायची आहे तुला??", रूद्रचे dad विचारतात...

" उद्या आहे काका... ", आर्या म्हणते..

" कोणतं कॉलेज दी??", सिद्धार्थ खाता खाता विचारतो...

" ***** कॉलेज", आर्या कॉलेजचे नाव सांगते... तसा सिद्धार्थला जोरात ठसका लागतो...
रूद्रचे मॉम dad गालात हसतात... रूद्र मात्र शांतपणे खात असतो...

" हळु सिद्ध... एवढी कसली घाई आहे?? हे घे पाणी पी ... " , आर्या काळजीने सिद्धार्थ ला म्हणत त्याच्या पाठीवर हात फिरवते... आणि त्याला प्यायला पाणी दिले...

थोड्याच वेळात सिद्धार्थ पूर्ववत होतो..

" दी.. मी पण तिथेच कॉलेज ला आहे... ", सिद्धार्थ आनंदाने तिला म्हणाला...

" हो का.. ", आर्या हसुन म्हणाली..

" तू कोणता सब्जेक्ट शिकवायला येणार आहेस आमच्या कॉलेजला?", सिद्धार्थ विचारतो..

" केमेस्ट्री ", आर्या तिचा नाश्ता संपवत म्हणते..

" अच्छा तर म्हणजे ती नवीन टीचर येणार आहेत आम्हाला केमेस्ट्री शिकवायला ती तू आहेस..", सिद्धार्थ आनंदाने म्हणाला..

" येस मे बी...", आर्या हलकं हसुन म्हणाली..

" मला एवढं केमेस्ट्री जमत नाही हा.. म्हणून मला क्लास मध्ये काही विचारशील नको हा..", सिद्धार्थ केविलवाणा चेहरा करून म्हणाला.. कारण त्याला केमेस्ट्री आवडत नव्हता.. कारण तो त्याला जमत नव्हता..

सगळे हसले त्याला असं बघून... रूद्रही गालातच हसला.. पण त्याची नजर सिद्धार्थ च्या बाजूला बसलेल्या आर्या वर गेली जी खुपच हसत होती... तो क्षणभर हरवला... तिची स्माइल जगातील सगळ्यात सुंदर वाटली त्याला...

अचानक आर्या ची नजर रूद्र वर पडते जो तिला टक लावून पाहत होता.. त्याला असं स्वत:कडे बघताना पाहून ती जरा अस्वस्थ झाली... रूद्र ने पण त्याची नजर फिरवली...

□●□●□●□●□

ब्रेकफास्ट नंतर रूद्र त्याच्या ऑफिस ला निघून गेला.. जाताना त्याने सिद्धार्थ ला त्याच्या कॉलेजला ड्रॉप केले जे त्याच्या ऑफिस च्या रस्त्याने लागत होते...

□□□□□□□□□□

आर्या तिच्या रुममध्ये बसून काही बूक्स वाचत होती... अचानक ती भूतकाळात हरवली..

भुतकाळ

आर्या तिच्या आईवडीलांसोबत रूद्र्च्या घरी आली होती... रुद्रा तेव्हा नवीनच त्याच्या कॉलेज मधून ग्रेजुएट झाला होता...

त्याला आर्मी जॉईन करायची होती हे सगळ्यांनाच माहीत होतं... त्याने फिजिकल एग्ज़ाम पास केली होती... काहिच दिवसांत त्याची व्रिटन टेस्ट होती... तो जीव तोडून अभ्यास करत होता....

त्याच वेळी आर्या आणि तिचे आईवडील आले होते... तिच्या आईवडीलांनी रूद्र ला भरपूर शाबासकी दिली... they both were proud of him.. रूद्र ला ही आर्या चे आई वडील फार आवडायचे.. फक्त आर्या सोडून.. कारण ती खुपच मस्तीखोर होती.. जेव्हा कधी ती यायची त्याच्या घरी तेव्हा सगळं घर भंडावुन सोडायची... तिचे आईवडील तिला सांगायचा प्रयत्न करायचे.. पण ती कोणाचचं ऐकायची नाही... त्यात रूद्रची मॉम तर तिला जास्त लाड करायची.. कारण तिला मुलगी नव्हती.. म्हणून ती आर्यालाच आपली मुलगी मानुन तिचे सारे लाड पूरवायची..

रूद्रला ती कधी आवडलीच नाही... तिचा बालिशपणा बघून त्याला नेहमी राग यायचा.. पण त्याने कधी राग व्यक्त केला नव्हता.. आर्या स्वत:हून बोलवायची त्याला पण तो नेहमीच तिला इग्नोर करायचा...

आर्या चे आई वडील त्यांच्या घरी निघून जातात पण रूद्रची मॉम आर्याला हट्टाने थांबवून घेते..
तिचे मस्त लाड चालू होते... रूद्रचे मॉम dad आणि छोटा सिद्धार्थ खुपच खुश होते...
सिद्धार्थ ला मात्र तिचं तिथे थांबणे आवडायचं नाही..

तो शक्य तितका लांब राहायचा तिच्यापासून..

अशातच रूद्रच्या परिक्षेचा दिवस उजळला... त्या दिवशी नेमके त्याचे मॉम dad बाहेर गेले होते.... घरी फक्त 15 वर्षांची आर्या आणि लहान सिध्दार्थ होता..

दोघेही खेळत होते... रूद्र्च्या पेपरला निघायची वेळ झाली होती अर्ध्या तासाने त्याची ट्रेन होती.. त्यानंतर 1 तासाने ट्रेन होती.. पण त्याला या ट्रेन ने जाणे भाग होते.. ती जर गेली तर त्याला परीक्षेला जाता येणार नव्हते.. रेलवे स्टेशन जवळच असल्या कारणाने तो वेळेवरच निघणार होता..... तो तसाच फ्रेश होऊन तयारी करून त्याच्या रुमचा दरवाजा उघडत होता पण त्याला तो उघडताच येत नव्हता.. तसा तो गडबडला...

तो जोरजोराने दरवाजा वाजवत होता... पण कोणीच दरवाजा उघडला नाही.... तो आज पहिल्यांदा घाबरला होता... ते दारही एवढे मजबूत होते की त्याला तोडणे म्हणजे अशक्यच.. तो हतबल झाला होता... त्याच्याही नकळत डोळ्यांतून अश्रु वाहू लागले होते...

त्याची निघण्याची वेळ निघत चालली होती.. तो जोराने हाका मारत होता पण कोणीच दार उघडलं नाही..

बरोबर अर्ध्या तासाने दार उघडलं गेलं.. तो समोर पाहतो तर आर्या समोर उभी राहुन त्याला हसत होती... तिनेच मस्ती केली होती त्याच्याशी...
तिला असं हसताना पाहून त्याच्या डोळ्यात राग उतरला... डोळे रागाने लालबुंद झाले होते... त्याने घड्याळ पाहिलं पण त्याच्या ट्रेन पडण्याची वेळ निघुन गेली होती..

आर्या अजुनही त्याला हसत होती...

" तू माझ्याशी बोलत नाही ना.. म्हणून ही शिक्षा दिली मी तुला.. आता बोलशील ना??... नाही बोललास ना तर परत अशीच शिक्षा देईन.. ", म्हणत ती पुन्हा हसत होती...
जेव्हा रूद्र जोरजोरात हाका मारत होता.. दरवाजा वाजवत होता तेव्हा आर्या तिथेच होती.. तिला त्याला असं बघून हसू येत होतं...
त्याची परिक्षा त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे.. यापासून ती वंचित होती...

तिचं बोलणं ऐकून रूद्र ची सटकली.. आणि त्याने जोरात तिच्या कानाखाली मारली.. त्याच्या या कृतीने ती मात्र सुन्न झाली.. डोळ्यातील अश्रु लगेच गालावर ओघळले..

" मूर्ख मुलगी... तुला माहिती आहे.. तू काय केलंस ?? तुझ्यामुळे... फक्त तुझ्याचमुळे आज मला आर्मी जॉईन करता येणार नाही.. 15 वर्षांची तू असुन... अजुनही लहान मुलांगत वागते.. मस्तिची पण एक मर्यादा असते... तेवढं पण कळत नाही.. माझ्याशी बोलण्याची लायकी नाहिये तुझी.. स्टुपिड!!!", रूद्र तिच्या खांद्याला पकडून तिला रागाने जोरजोरात ओरडत होता...

आर्या तर थरथर कापत होती... गाल ही लाल होऊन प्रचंड दुखत होता.. मन भितीने भरुन गेलं होतं..

इतक्यात रूद्रचे मॉम dad येतात.. रूद्र आणि आर्या ला असं बघून ते शॉक होऊन जातात..

रूद्रचे dad पटकन रूद्र ला आर्या पासून दूर करतात.. रूद्र रागाने थरथरत होता... त्याच्या अंगाची लाही लाही झाली होती...
रूद्र चे मॉम dad तर थक्क होऊन त्याला असं पाहत होते... त्यांनी आजपर्यंत कधीच त्याला एवढं रागात पाहिलं नव्हतं...

रूद्रची मॉम आर्या ला आपल्या कुशीत घेते जी भितीने कापत असते.

" रूद्र... काय करतोस हे?? एवढा का चिडला आहेस.. आणि तू पेपर ला का नाही गेला?? तुझी ट्रेन तर गेली असेल इतक्यात.. ", रूद्रचे dad त्याला जरा थंड आवजात विचारतात..

" या मूर्ख मुलीला विचारा.. का नाही गेलो ते.. हिने माझ्या रुमचा दरवाजा बंद करून घेतला होता.... हिच्यामुळे... नाही जाऊ शकलो मी... फक्त हिच्यामुळे... मूर्ख कुठली...", रूद्र म्हणाला तसे त्याचे डोळे आणखीनच वाहू लागले..

रूद्रला असं हतबल पाहून त्याच्या मॉम dad ला खुपच वाईट वाटलं... तेवढेच ते आर्या च्या या कृतिवर निराश झाले होते.. पण त्यांनी तसं जाणवू दिले नाही कारण तीची हालत already खराब झाली होती भितीने..

रूद्रचे dad रूद्र ला त्याच्या रूममध्ये घेउन जातात... रूद्रची मॉम आर्या ला घेउन त्यांच्या रुम मध्ये जाते... रूद्र्च्या आईच्या प्रेमळ स्पर्शात ती रडू लागते... तिला वाईट वाटलं होतं... तिच्याकडून चूक झाली म्हणून ती रूद्र्च्या गळ्यात पडून रडत माफी मागत होती...


रूद्रच्या मॉम ला पण तिची दया येते.. शेवटी आर्या ला ती तिचीच मुलगी वाटत होती... तेवढंच दुःख तिला आपल्या रूद्र साठी वाटत होतं...

रूद्रचे dad रूद्र ला जसे तसे समजावतात...

दुसर्या दिवशी सकाळीच आर्या तिच्या घरी निघुन जाते.. तेव्हा पासून ती कधीच त्यांच्या घरी परत गेलीच नाही...

वर्तमान काळ

तब्बल 10 वर्षा नंतर आर्या तिकडे परत आली होती....

आर्या तिच्या भुतकाळातून बाहेर येते.... आणि एक मोठा सुस्कारा सोडते...

" त्या घटनेला 10 वर्ष होऊन गेली तरी असंच वाटते की ते आताच काल झालं आहे... कुठून खुळा विचार आला होता मला त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद करायला काय माहित?? त्यांच्या डोळ्यात असलेला माझ्यासाठी तिरस्कार, राग अजुनही अंगावर काटा आणतो.. त्यांची एक वेगळीच भिती मनात राहुन गेली आहे.. लवकरात लवकर इथुन बाहेर जायचं आहे... त्यांना माझ्यामुळे आनखी त्रास नको.. ", आर्या स्वत:शीच म्हणाली...

○♡○♡○♡○♡○♡○♡○♡○

अखेर आर्याचा तो दिवस उजळला जेव्हा तिला तिच्या कॉलेज ला हजर व्हायचं होतं...

सगळे नाश्ता करून आपल्या आपल्या कामी जायला तयार होते..

" आरु .. तू सिद्धार्थ सोबतच जा.. रूद्र तुम्हा दोघांना सोडेल कॉलेज ला... ", रूद्रचे dad म्हणाले... तसा रूद्र ने एक जळजळीत कटाक्ष आर्या वर टाकला.. एक तर ती त्याला जास्त पसंत नव्हती... त्यात आता तिला त्याच्या सोबत गाडीत घेऊन जाणे त्याला पचत नव्हते...

त्याची धारदार नजर बघून आर्या ची नजर आपोआप खाली झुकली...

" रूद्र ... सोडतोस ना दोघांना कॉलेज ला??", त्याचे dad नजर रोखत म्हणाले तसा त्याने फक्त मान होकरात हलवली आणि बाहेर निघाला..

रूद्र्च्या मॉम dad ला बाय करून आर्या आणि सिद्धार्थ पण निघाले...

‌‍ ●♡●♡●♡●♡●♡●♡●

" आरु दी... तू पुढे बस... ", सिद्धार्थ driving सीट च्या बाजुच्या सीटचा दरवाजा उघडून म्हणाला..

आर्या काही बोलणार इतक्यात रूद्र असं काही बोलतो जे आर्याला मनाला चटका लागतो... पण ती चेहर्यावर काहिच भाव दाखवत नाही...

" मी माझ्या बाजूला कोणा ऐर्यागिर्याला बसवत नाही सिद्धार्थ... गपचुप येऊन पुढे बस.. ", रूद्र सिद्धार्थ कडे बघत आर्या ला तूच्छपणे म्हणाला..

" दादा.... ", सिद्धार्थ ला अजिबात आवडलं नव्हतं त्याने त्याच्या दी ला असं काही बोललेलं..

" सिद्ध.. राजा तू पुढे बस... मी मागे बसते.. आपल्याला उशीर होतोय...", आर्या सिद्धार्थला प्रेमाने म्हणाली..

सिद्धार्थ ही नाईलाजाने होकार देत पुढे बसतो...

आर्या ही शांतपणे मागे बसते... गाडीत सगळे शांत असतात.. सिद्धार्थ रूद्र शी तोंड फुगवून बसला होता... आर्या फक्त मागे बसून खिडकीबाहेर बघत होती... रूद्र आरशात तिला अधूनमधून पाहत होता... तिचा चेहरा अगदी शांत निरागस दिसत होता.. तिचा चेहरा बघून कुठंतरी त्याच्या मनाच्या कोपर्यात त्याला वाळवंटात पाण्याचा झरा मिळावा अशी शांतता त्याला मिळाली... पण त्याने हे सगळं इग्नोर केलं....

थोड्याच वेळात रूद्र सिद्धार्थ आणि आर्या ला त्यांच्या कॉलेज च्या ठिकाणी पोहोचवतो...

नेहमी जाताना त्याला बाय करणारा सिद्धार्थ त्याला बाय न करताच निघुन जातो... आर्या रूद्र ला बघतच नसते... ती पण निघुन जाते.. ते जाताच रूद्र सुस्कारा सोडत तिथून निघून जातो...

□●□●□●□●□●□●□●□●□●□

अश्यातच दिवस निघुन गेले.... आर्या दोन दिवसात रूद्रच्या घरुन जाऊन दुसरीकडे शिफ्ट होणार होती...

या दिवसात हवी तेवढी प्रगती आर्या आणि रूद्र मध्ये झाली नव्हती... तो रोज तिला सकाळी झोक्यावर पाहायचा जेव्हा तो जिम ला जायचा..
सकाळी रात्री सगळे सोबत डिनर करायचे..
तो तिच्याजवळ थोडाफार आकर्षित व्हायचा पण तो या गोष्टींना सरळ सरळ इग्नोर करत होता...

आर्या रूद्र्च्या मॉम dad आणि तिच्या छोट्या सिध्द बरोबर छान रुळली होती.. पण रूद्र समोर असताना ती जास्त खुलून बोलायची नाही.. सिद्धार्थ आणि तिला कॉलेज ला सोडताना तो रोज तिला आरशातून पाहायचा... पण का पाहतो?? याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं...


आर्या जाणार म्हणून रूद्रची आई तिच्या आवडीचं भरपूर काही बनवून तिला खाऊ घालत होती.. सिद्धार्थ आणि त्याचे dad मात्र आर्या ची उडालेली धांदल बघून हसत होते..

●□●□●□●□●□●□●


क्रमशः

सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून दैनंदिन जीवनात काही साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा... काही चुकीचे आढळल्यास माफी असावी...

कथा आवडल्यास कमेंट... रेटिंग नक्की दया..

Thank you...