घे भरारी पुन्हां... Kavi Sagar chavan द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

घे भरारी पुन्हां...

मनोगत




रात्र खुप झाली असली तरी लिहायला घेतोय कारण घडलेला प्रसंगचं असा काही होता की त्या दिवसाची कुठंही कल्पना नसताना काळाच्या ओघात जीवन अस्तव्यस्त झालं .
सुरवातीला चढत्या क्रमाने जात कादंबरी ची सुरवात होते एका हरहुन्नरी तरुणांच्या संघर्षाची कहाणी आहे . मृत्युशी दोन हात करून पुन्हा आयुष्याची सुरवात करणे सोपी गोष्ट नाही .मुळात हे प्रत्येकाला जमत नाही . त्यासाठी आशीर्वाद आणि दैवी गुण आत्मसात असावे लागतात आणि ते काही मोजक्या चं लोकांच्या भाग्यात असतात . गावातील एका होतकरू तरुणाच्या मदतीला आखा गावं धावून येतो . वर्गणी करून गावात पैसे जमवले जातात . जिवाभावाचे मित्र जीवाचं रान करून गावातील सदन मंडळींकडून पैशाची व्यवस्था कररता त
आपल्या मित्राला जीवनदान देण्यात त्यांचा चं खरा मोलाचं वाटा आहे असं म्हणायला हरकत नाहीं . आयुष्य खरं तर खुप नागमोडी वळणाच आहे कुठल्या थांबा तुमच्या आयुष्यात काय वळण घेईल कोणीही सांगू शकत नाही . अचानक काळाने केलेल्या प्रघात अस्तव्यस्त करून टाकतो आणि मग त्यातून बाहेर निघणे कठीण असतें अश्या वेळी जिवा भावाचे मित्र स्नेही आपल्या सोबत असतील तर त्यातून बाहेर पडायला मदत होते . ही घडलेली घटना म्हणजे नियतीने केलेला निर्दयी प्रहार होता हॉस्पिटलमध्ये आलेले अनुभव हृदय हेलावून टाकणारे प्रसंग माझ्या मनाची अस्वस्थता तुम्हा सर्वां सोबत शेअर करतोय पुस्तक स्वरूपात याचा एकच उद्देश म्हणजे जगात चांगुलपणा आहे चांगली माणस आहेत त्यांचं कार्य इतरांपर्यंत पोहचावे तरुणाना प्रेरणा मिळावी भविष्यात अनेक मदतीचे हात निर्माण व्हावे ही एक माफक अपेक्षा .



_ सागर चव्हाण





मदतीचे हात

जिवाभावाचे मित्र , गावातील प्रतिष्ठित व्यक्ती , वेळ प्रसंगी पाठीशी खंबीरपणे उभें राहणारे शेजारी, नातेवाईक, अश्रूषा करणारे हॉस्पिटलमधील डॉ, नर्स , व कर्मचारी मामा मावशी आपणा सर्वांच्या कृतज्ञता पूर्वक ऋणात " !







घे
भरारी
पुन्हां !





माणसाच आयुष्य खूप गुंता गुंतीच आहे. अस म्हणायला काही हरकत नाही कारण आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काहीतरी अर्थ असतो काहीतरी लॉजिक असत . आणि आपण त्याला दैव म्हणतो किंवा मग आपल्या कर्माचं फळ लहानपणी लहानपणी एखादी अघटीत घटना घडली किंवा कांही वाईट बातमी कानांवर आली कीं आपल्या घरातील किंवा शेजारी राहणारी मोठी माणसे बोलता बोलता म्हणायची आणि अनपेक्षित पणे दैव " यावर भाष्य होत असे . तो माणूस किंवा ती स्त्री अशी अशी होती एक शॉर्ट मध्ये स्टोरी सांगून गप्पा चालायच्या मला त्यावेळी एक प्रश्न कायम पडत तो " दैव " काय असत . आपलं भाग्य कोण लिहीत असेल ? बाळ जन्माला येत तेंव्हा त्याच्या पाची ला पूजा करतात तेंव्हा स टवाई आई येतें का ? काहीच मेळ लागत नसे काय प्रकार असेल बर हा श्रध्दा की अंधश्रद्धा त्याचं ही नेमकं उत्तरं नाहीं .कारण आस्था असणे किंवा नसणे आपापल्या मतावर अवलंबून आहे . एखादया चं काही चांगल काम झालं कीं त्याला नशीब म्हणायचं " वाईट झालं की कर्मा चं फळ हे विषय इतके गहन होते की डोक्याच्या वरून जायचे काय खरं काय खोटं हा नंतरचा भाग झाला . काही गोष्टींची पुरतात होण्यासाठी अनुभव लागतो हें मात्र खरं " अश्या प्रकारे बहुतेक अनुभवाने उलगडत जाणार जीवनाचं पान आपल्याला प्रत्येक गोष्टीचा सारांश देत असतो .आपण घेता येईल तेव्हडे चांगले घेण्याचं प्रयत्न करणे म्हणजे माणूस असल्याची जाणिव होतें प्रत्येकाच्या वाटयाला आपापली सुखदुःख आलेली असतात. आणि ती त्यानें त्याची संपवयची जे मिळालं त्याला गोड मानून घ्यायचं हा एक नशीबा चा सिद्धांत असू शकतो "!