उत्कर्ष… - भाग 1 Pralhad K Dudhal द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

उत्कर्ष… - भाग 1

उत्कर्ष…भाग १
नव्या सोसायटीत मनासारखे घर मिळाल्याने आम्ही दोघेही खूश होतो.घरात आवश्यक असलेले फर्निचर करणे चालू होते.दोन महिन्यांत कामे उरकली आणि धुमधडाक्यात वास्तुशांती केली.
इथे रहायला आल्यावर एक अनोखी उर्जा अंगात संचारल्यासारखे वाटत होते.आयुष्यात प्रथमच सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत होत्या त्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत होत होता आणि तो आनंद नाही म्हटलं तरी आम्हा दोघांच्या वागण्या बोलण्यात जाणवत होता.मधल्या काळात ज्यांची समोरासमोर भेट झाली नव्हती असे लोक भेटल्यावर त्यांच्याकडून आम्हाला एक वाक्य हमखास ऐकायला मिळत होते…
“ तुम्हा दोघांना रिटायरमेंट आणि नवे घर चांगलेच मानवले आहे बर का! “
ते ऐकून छान वाटत होते; पण एक दिवस मात्र आमच्या या आंनदी आयुष्यात वादळ उठले…
झाले असे की ,एक दिवस आमच्या खालच्या मजल्यावर बंद असलेल्या घरात कुणीतरी रहायला आले.आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय? ज्याचे कुणाचे ते घर असेल तो रहायला आला असेल किंवा त्याने भाडेकरू ठेवला असेल!
हो बरोबर..,मला आमच्या खाली कुणीतरी रहायला आले याचा आनंदच झाला.
माझ्या खिडकीतून खालची बाल्कनी व्यवस्थित दिसते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मी तिकडे नजर मारली तर माझ्या नजरेचे स्वागत त्या बाल्कनीत ओळीने मांडून ठेवलेल्या सात आठ बियरच्या बाटल्यांनी केले!
त्या बाटल्या पाहून खाली राहायल्या आलेल्या न पाहिलेल्या व्यक्तीबद्दल थोडासा अंदाज आला; पण आपल्याला काही त्रास झाला नाही तर तो कोण आहे आणि तो काय खातो पितो याच्याशी मला काही घेणेदेणे असायचे कारण नव्हते… मी दुर्लक्ष करुन माझ्या कामाला लागलो…
साधारण अर्धा तास गेला आणि खालच्या बालकनीतून स्पिकरचा प्रचंड मोठा आवाज यायला लागला.
मी खिडकीतून खाली पाहिले तर कुठेलेसे पंजाबी गाणे फुल वॉल्यूमवर लाऊन एक टी शर्ट बरमुडा घातलेला पंचवीशीचा तरुण हातातली बियरची बाटली नाचवत स्वतःही नाचत होता!
त्या आवाजाने आधीच मी वैतागलेला होतो,त्यात हा मद्यधुंद तरुण नाचतोय हे पाहून मी वरुनच ओरडलो…
“ हॅलो… आवाज कमी करा “
आधी त्या तरुणाचे लक्ष दिले नाही;पण मी पुन्हा आवाज दिल्यावर त्याने वर पाहिले… नाचता नाचता त्याने हातवारे करत विचारले “ क्या?”
“ अरे पहले आवाज कम करो, इधर लोग रहते है…”
“ क्यू?”
“ क्यू क्या? आवाजसे तकलीफ हो रही हैं, पहले वॉल्यूम कम करो…”
“ मेरा घर हैं, मै कुच्छ भी कर सकता हू… मै क्यू आवाज कम करू?” त्याचे नाचणे आणि मग्रुरीत बोलणे चालूच होते.
आता मला त्याचा चांगलाच राग आला होता,मी त्याच्यावर अजूनच जोरात ओरडलो..,
“ तो तुम्हारे घर के अंदर आवाज आयेगा उतना ही आवाज रखो, बाकी लोगोंको क्यू तकलीफ दे रहे हो? स्पीकर घर के अंदर रखो, और आवाज कम करो”
“ मै नहीं करेगा, जो उखडना हैं उखाडो!”
बाप रे, तो तर आवाज वाढवून माझ्यावर खेकसत होता.
आता मात्र माझी सटकली होती…
एकदा वाटले खाली जाऊन गचांडे पकडून त्याच्या कानाखाली वाजवावी; पण मग लक्षात आले अरे आपण आता त्रेसष्ट पार केले आहे! थोडे जेष्ठ नागरिकासारखे वागायला हवे!
मग मी सोसायटी ग्रुपवर या घटनेबद्दल लिहिले. बिल्डिंग प्रतिनिधीला ही फोन करुन घटना सांगितली.बहुतेक माझ्या वरच्या मजल्यावरच राहात असलेल्या बिल्डिंग प्रतिनिधीने माझे आणि त्याचे बोलणे ऐकले असावे, कारण त्याने त्याच्या फ्लॅट मालकाला लगेच फोन केला आणि काही क्षणातच स्पीकर बंद झाला..
मी निश्वास टाकला आणि झोपी गेलो.
सकाळी नेहमीप्रमाणे उठून फिरायला गेलो.घरी येऊन दैनंदिन कामे करत असतानाच बेल वाजली.दार उघडल्याबरोबर प्रथम बियरचा उग्र दर्प नाकात शिरला बघितले तर समोर तो कालचा तरुण एकदम केविलवाणा चेहरा घेऊन उभा. मी नाखुशीने त्याच्याकडे बघु लागलो. तो अचानक माझ्या पायावर झुकला पाया पडून गयावया करत बोलू लागला…
“ सॉरी अंकल, मेरी वजह से आपको तकलीफ हूई…”
त्याचा तो अवतार बघून नाही म्हटलं तरी माझा अहम सुखावला…मला त्याची दया आली…
“ आओ, अंदर आओ…बैठो “ मी त्याला घरात बोलावले. तो आत आला आणि सोफ्यावर बसला..,
“ सॉरी अंकल फिरसे…माफ करना..वो मै रातको बियर पिया था ना…”
“ ठीक है….”
सुबह का भूला शाम को घर वापस आयें तो उसे भूला नहीं कहते…
कुठे तरी ऐकलेला डायलॉग आठवला आणि मनोमन त्याला माफ करुन टाकले!
सौ. ने त्याला पाणी आणून दिले, त्याने ते घेतले…
“ नाम क्या हैं आपका?”
“ उत्कर्ष”
“ अच्छा नाम है! “ मी त्याला थोडा हरभऱ्याचा झाडावर चढवला…तो अजूनच बुजला..

( क्रमश:)