चंपा
रश्मी तिच्याजवळ आली.
"चंपा आग काय झालं परत कशी आलीस…? चाचा कसा पोहचला तुझ्यापर्यंत? तुला तर अगदी मी बाहेर सोडलं होत ग… मग चाचा???" रश्मीला तिच्या प्रश्नांची पाहिजे होती. चंपाने घडलेली घटना तिला सांगितली. रश्मीने कपाळावर मारून घेतले.
"क्या हुआ? अब क्या करेंगे रे... ? ये चाचा तुझे छोडेगा ऐसा लगता हें तेरेको… देवा क्या किया तुने…? चंपा चाचा कुत्रा हाय ग, आता किती पिसाळला असलं तो… असा सहज सोडायचा नाय तुला रस्त्या रस्तावर माणसं ठेवली असत्यात पण तुझे आजके आज ही बाहर पडना होगा चाहे कुछ भी हो जाये।" रश्मी विचार करू लागली.काय करता येईल.
"रश्मी मी माझ्या सरांना फोन करू? ते वकील आहेत." चंपा म्हणाली.
"इथं पोलीस हो या वकील इधर सिर्फ चाचा की चलती है… वो इधर आये तो फसेंगे... नही चंपा हमे कुछ और सोचना होगा।" रश्मी विचार करायला लागली.
तिने फोन काढला आणि विक्रमला काही सांगून यायला सांगितले. विक्रम तासाभरातच पोहचला. रश्मी बाहेर येऊन त्याच्याशी लगट करू लागली.
चाचा आला.
"रश्मी तू इथं है वो चंपा…"
"वो है की अंदर… आसुवों से नाह रही पागल… चाचा उसे समझया पर रोना धोना चालूच हाय…" तिने विक्रमच्या शर्टची बटन काढायला सुरुवात केली.
"चाचा आयेगी लाईनवर तुम जावो मे नही तो गौरी हे उसके बाजू..." चाचा निघून गेला. चाचा लांब गेल्यावर विक्रमने शर्टची बटन परत लावली. चंपा बाहेर आली. विक्रमच्या गाडीत सीटवर न बसता खाली जाऊन लपून बसली. कोणाला शंका येऊ नये म्हणून जवळपास अर्ध्या तासाने विक्रमने गाडी काढली.
चंपा विक्रमच्या मदतीने तिथून निसटली. चंपाने रामला फोन केला.
"सर मला अड्रेस पाठवा मी घरी येतीये."
चंपा रामकडे पोहचली. रामने तिला पाणी दिले. पाणी पित पित चंपा बोलली.
"सर मी जरी इथे आली असली तरी ते लोक मला शोधत इथपर्यंत येतील. मला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही. मला खूप लांब जावं लागेल."
"चंपा शांत हो … खाऊन घे काहीतरी मग बघू आपण काय ते ? आजची रात्र जाऊदेत. मघ बघुयात."
"नाही एव्हाना त्यांना मी पळालेले समजले असेल. माझ्यामुळे मी तुमचा जीव धोक्यात नाही घालू शकत."
"अगं एकटी मुलगी एवढ्या रात्री कुठे जाणार आहेस? आणि गेलीस तरी तिथेही चांगले लोक असतीलच असे नाही त्यामुळे तुला मी कुठेही जाऊ देणार नाही." तेवढ्यात दारावर बेल वाजली.
" सर दरवाजा नका उघडू, मला शोधत बघा कोणीतरी आले असेल. चंपा खूप घाबरली होती.
"तू नको घाबरू मी आलोच."
दरवाजा उघडला.
"सर ही फ़ाइल् यावर फक्त कोर्टामध्ये सह्या कराव्या लागतील."
"ओके थँक्स…" महत्वाची फाईल रामने घेतली आणि दरवाजा बंद केला.
"तू वरती जा फ्रेश होऊन ये मी जेवण लावतो.मला माहित आहे उशीर झालाय पण तू जेवली नाहीस हो न? "
"हो सर…"
"मोबाईल बंद केलास ना ?"
"हो तुम्हाला फोन करून लगेच बंद केला.सिमकार्ड काढून टाकले."
"गुड..."
चंपा फ्रेश होऊन आली.
पोटभरून ती जेवली. चंपाने अगदी स्वतःचेच घर असल्यासारखे सगळे आवरून नीट ठेवले आणि पुन्हा येऊन बसली.
"सर सकाळी लवकर उठून मी कोल्हापूरला जाईन माझ्या कॉलेज मधली माझी मैत्रीण आहे रेखा खूप चांगली आहे ती तिच्या घरचे मला नक्की मदत करतील."
"कशावरून?"
"मी फोन करेन तिला, तिला माझ्याविषयी सगळे माहित आहे."
"मला त्याची गरज नाही वाटत."
"सर पण मी इथे जास्त दिवस नाही राहू शकणार.
"का? "
"चाचा मला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि त्याला माहिती आहे ऑफिसचा अड्रेस तो नक्की उद्या येईल."
"मी वकील आहे लक्षात नसेल तर..."
"सर मला माहिती आहे पण ते लोक खूप भयानक आहेत."
"चंपा मला तुला काही विचारायचं आहे."
"काय सर..."
"माझ्यासोबत लग्न करशील?"
"सर???"
"मला तू आवडतेस…"
"आवडतेस म्हणून की…"
"उपकार म्हणून नाही."
"मला मनापासून तू आवडतेस, एकदा आपले लग्न झाले तर तुझापर्यंत येण्याची कोणाची हिम्मत होणार नाही."
"सर मी कोण, कुठून आली हे माहीत असूनही तुम्ही...?"
"मला फरक नाही पडत कारण मला तू मनापासून आवडतेस.
"नाही पण मला हे योग्य वाटत नाही."
चंपाला कोणाचे उपकार नको होते. तिच्या भावना रामला समजत होत्या राम तिच्या जवळ गेला.
"तू कोण आहेस किंवा कुठून आलीस मला काहीच फरक पडत नाही. तू एक खूप चांगली मुलगी आहेस. स्वतःपेक्षा इतरांसाठी धरपडतेस मला अशीच बायको हवी आणि आत्ता नाही मला तू तेंव्हापासून आवडतेस जेव्हापासून तुझ्याविषयीचे सगळे गैरसमज दूर झाले."
चंपाच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते. ती काहीही न बोलता तशीच बसून राहिली तिच्या मनामध्ये प्रश्नच प्रश्न होते निर्णय घेणे कठीण होत.
"चंपा काही विचार करू नकोस आत्ता जाऊन झोप उद्या बघुयात."
तिला रामच्या कुशीत जाऊन रडावस वाटत होतं पण स्वतःला सावरलं आणि रूममध्ये गेली. आहे त्याच ड्रेस वर बेडवर पडली पण तिला झोप लागत नव्हती. ती सतत रामचा विचार करत होती. राम एवढं प्रेम करतात. रामचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. राम दिसायला खूप देखणा होता उंच ,तब्बेतीने व्यवस्थित, गोरापान तिलाही आवडत होता पण तिने तिची भावना दाबून ठेवली होती कारण आपल्यावर प्रेम कोण करणार? आणि तो अधिकार आपल्याला कधीच नव्हता आणि नाही. कोणाच्या गळ्यात नाही पडायचं तिने ठरवलं आणि राम उठायच्या आत तिने निघायचे ठरवले. तिला झोप येत नव्हती. घशाला कोरड पडली होती. किचनमध्ये येऊन पाणी प्यायली परत रूममध्ये निघाली तर राम सोफ्यावर झोपलेला दिसला. थंडी खूप होती. रामचा तिथेच डोळा लागला होता. ती रूम मध्ये गेली पांघरून घेतले आणि रामच्या अंगावर टाकले. राम शांत झोपला होता अंगावर पांघरून पडताच त्याने पांघरून अंगावर ओढ़ले तेवढ्यात त्याला जाग आली.
"तू...? झोप नाही येत?"
"नाही... पाणी प्यायला आले होते."
"कदाचित नवीन जागा आहे त्यामुळे झोप नसेल येत." राम उठून बसला होता.
चंपा विचारात होती किती चांगला माणूस आहे ना वाईट विचार ना वाईट नजर…
"झोप जा आता येईल झोप."
चंपाच्या डोळ्यातून पाणी आले.
"ये वेडा बाई काय झालं?"
"काही नाही...मला थोडावेळ जवळ घ्याल?"
चंपा रामच्या जवळ गेली... पण त्याला हे योग्य वाटत नव्हते त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"काय झाले?"
चंपा खूप रडत होती.
"काहीच नाही... " डोळ्यातल पाणी थोपवून ठेवल होत केंव्हाच त्यानां वाट मोकळी करून दिली. चंपा फक्त रडत होती. खूप वेळ झाले दोघे काहीच बोलत नव्हते. चंपा उठली तोंड धुतले आणि पुन्हा राम जवळ बसली.
"सॉरी…"
"आता हे काय? जा झोप आता नक्की झोप छान लागेल."
चंपा उठली आणि रुममध्ये गेली आणि पडल्या पडल्या तिला झोप लागली .
काहीतरी होत असतं मात्र
तेंव्हा बोलता येत नाही,
मन भरून सुद्धा
हलकं करता येत नाही,
शब्द ओठांवर असतात
पण बाहेर पडत नाहीत,
तेंव्हा आपण प्रेम, आदर, भावना
आणि संस्कार यात अडकलेलो असतो
भाग्यशाली अनुप राऊत
क्रमशः