श्रमसंत्सग - 2 Chandrakant Pawar द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्रमसंत्सग - 2

अनेकांना भीती वाटते मी श्रम केले आणि फुकट गेले तर...
दुसऱ्याभाषेत म्हणायचे तर मी गाढव मेहनत केली आणि त्या मेहनतीला किंमत मिळाली नाही तर...
अशा लोकांना सांगावेसे वाटते की कार्य करत रहा. जे काय आहे त्याची श्रम फळे तुम्हाला नक्की मिळतील


अनेकदा शेतामध्ये अनेकांना ग्रामपंचायती मार्फत मिळालेली मोफत रोपे लावायची भीती वाटते. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दूरवर खड्डे करून झाडे लावणार आणि कोणी चोरून नेलीतर. उद्या कोणी कापून नेली तर आमचा फायदा काय...

अशा लोकांना म्हणावसे वाटते की...

अरे शतश्रम मुर्खांनो...

तुम्ही जर झाडे लावलीच नाही तर ती चोरीला जाणार कशी काय ? यासाठी तुम्हाला झाडे लावायला पाहिजे. मगच ती चोरीला जातील ना. उगाच माझी शेती इतकी आहे .तितकी आहे अशा बढाया मारण्यात काही अर्थ नाही .

उजाड शेतीचा तुम्हाला काही फायदा होत नाही. त्यातून उत्पन्न येत नाही. त्यासाठी त्या शेतीच्या बांधाच्या कडेने किंवा शेतीमध्ये तुम्ही काहीतरी उत्पन्न घ्यायला पाहिजे किंवा झाडे लावायला पाहिजे. त्यांनी निसर्गाचा सुद्धा फायदा होईल आणि लोकांना प्राणवाय सुद्धा मिळेल
समजा एखाद्याने झाडे लावली आणि चोरीला गेली.
म्हणजे जी कोणी चोरी केलेली आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी कोणीतरी नक्कीच चोर आहे याची खात्री होईल. चोरी झाली चोरी झाली असा बोभाटा होईल आणि चोर नक्की कोण आहे हे सुद्धा शोधण्याचा मार्ग तयार होईल. शासन व्यवस्था आहे ती चोराला शोधून काढेल .निनावी चोरीचा अर्ज आपण पोलिसात देऊन टाकायचा.
तसं पाहायला गेलं तर अनेक झाडं शेतकरी तोडू शकतो. जर त्याच्या घरासाठी त्याला अडचणी होत असेल किंवा घराचे नुकसान होत असेल तरच...
मात्र अशी अनेक झाड आहेत जी तोडणं गुन्हा आहे

ही गोष्ट सांगण्याचे कारण एकच आहे की अनेकांना आरामदायी श्रम हवे असतात. त्यांना मेहनत नको हवी असते. मात्र आपोआप मिळणारे मेहनतीचे फळ त्यांना हवं असतं. तरी ते मिळतच मिळतं. त्यासाठी जास्त परिश्रम करण्याची आवश्यकता नाही. असे अनेक उद्योगधंदे आहेत त्यामध्ये सहजरीत्या श्रम फळ मिळतं.

जीवनामधला सुपरस्टार कोण असेल तर तो आहे श्रम. श्रम एकदा चमकलं की मग त्याचा प्रकाश चोहीकडे पडतो. त्यासाठी श्रमाला प्रत्येकाने शरण जायची गरज आहे.
श्रम करताना शरम करण्याची गरज नाही.
कसं आहे ना...
श्रमाचे खरं नाव हे सौंदर्य आहे. कोणतीही गोष्ट करताना ते आपण करतोच. पण ती गोष्ट करून झाल्यानंतर त्यातले सौंदर्य जे उठून दिसतं ते मात्र खूपच अनाकलनीय ठरतं. साचेबद्ध श्रमामध्ये सुद्धा सौंदर्य ठासून भरलेल असतं. यासाठी प्रयत्न सुरू मात्र करायला हवेत.

रांगोळी काढणे आणि मेहंदी काढणे ही महिलांची आवड आहे. परंतु त्यातलं सौंदर्य पुरुषांना किंवा पुरुषांसाठी असतं. एखाद्या घरासाठी असतं. निसर्गासाठी असतं किंवा आनंदासाठी असतं. सरळ सरळ म्हणायचं तर महिलांसाठी असतं. असं म्हटलं तरी सुद्धा वावगं नाही.


श्रम म्हणजे जीवनाची प्रभा... माज अजिबात नाही.

अनेकांना एक गोष्ट माहीत नाही. श्रम ही हौस मौज करण्याचे साधन आहे. आनंदाची खरी हौस ही श्रम आहे. .हे लक्षात घेतलं की अनेक गोष्टी सोप्या वाटू लागतात. अंगावर टॅटू काढणे ही खरी तर जुनी हौस आहे. परंतु आधुनिक युगामध्ये त्यातली वेगळी चित्र वेगळ्या प्रकारे आकर्षक स्वरूपात काढून श्रमाने त्याला एक वेगळे आधुनिक रूप दिलेले आहे .यासाठीच म्हटलं जातं की श्रम हे नवीन नवीन दशाब्दी स्वरूपात जन्म घेते. जुन्या रूढी परंपरांना नवा साज चढवून ते अफलातून स्व:कला आणि कौशल्य व कलाकुसर यांचं सादरीकरण करतं.

घाई घाईतआनंद साजरा करणं किंवा जीवन साजरं करणे हे श्रमाच्या अगदी विरुद्ध आहे हे लक्षात ठेवायला हवं.
श्रमप्रथा ह्या जरी ट्रॅडिशनल असल्या तरी त्या अनेक स्वरूपात त्यांचं नृत्य स्वतःच्या हिमतीवर करतात आणि जगातल्या चाणाक्ष अथवा बुद्धिमान मनुष्याला चकित करतात. अनेकांच्या लक्षात हीच गोष्ट येत नाही की श्रमाचं एक नाव जीवन आहे..

श्रमाच्याही पलीकडे जाऊन म्हणता येईल की जगण्यासाठी श्रम करावेत... श्रमण्यासाठी श्रम करू नयेत. हे श्रमबीज आहे. श्रम ब्रीद सुद्धा आहे... हे पटलं म्हणजे जीवन श्रमहास्य सेलिब्रेट करायला काहीच हरकत नाही....
गळ्यात पट्टा अडकवल्यासारखे काहीजण श्रम करतात. त्यांना श्रम सांगू इच्छिते की माझा रंग मुळातच वेगळा आहे आणि त्याचं तेज मात्र एक समान आहे... त्याचं खरं कारण जीवन हे श्रमाचे विश्वस्त आहे.... आश्वाशित आहे...