श्रमसंत्सग - 3 Chandrakant Pawar द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्रमसंत्सग - 3

श्श्रम या वेगळ्या प्रकारे लिहिलेल्या शब्दात जरी वेगळा अर्थ नसला तरी श्रमाची भुरळ ही प्रत्येकाला आहे .असणार आणि राहणार... त्यामुळे की काय असे न म्हणता अनेकांना श्रम हे झकास आणि श्रमदार वाटतात.
श्रम हा विकार नाही श्रम ओंकार आहे एवढे लक्षात ठेवलं की उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. घरोघरी श्रमारी आहेत. ते जीवनाचा मोठा निर्णय घेत असतात. त्यांना वाटतं की श्रमाचा निर्णय घेणं हा त्यांचा हक्क आहे.
मग प्रतिबंधात्मक श्रमादेशचा भंग झाला तरी ते त्याची दखल घेत नाही. श्रमाची बदनामी करणाऱ्यावर कारवाई होते की नाही हा प्रश्न सुद्धा गौण आहे. मात्र श्रमदृष्टी ही प्रत्येक जण जपून ठेवतो. जरी त्याला दूरदृष्टी नसेल तरीही सुद्धा. शरीर श्रमाचा आदेश पाळतो आणि जीवनाचं सत्य सर्वार्थ मांडतो.
श्रम ही घोषणा नाही तो विनियोग आहे. जीवनाचा सहभाग आहे. पृथ्वीवर जे श्रमज पृथ्वीचर म्हणून नांदतात त्यांची श्रमनांदी मध्यवर्ती ठरते. केंद्रवर्ती असते.
जीवन नेहमीच श्रमसूत्रांचा दावा करते...
आणि श्रमसूत्रे कोणतीही जबाबदारी घेण्यास तत्पर असतात.
श्रमज्ञान नेहमी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन यांची काळजी घेते. सामाजिक व्यवहार यांचा ताबा मागत नाही...
उत्तुंग भरारी घेणाऱ्या श्रमिना जीवन नेहमी कवेत घेऊ पाहते त्याचे कारण म्हणजे श्रमाचा दर्जा हे होईल.
श्रमात्मक इच्छा पूर्ण होण्यासाठी दुधारी शक्तीचा वापर केला तरी अनेकदा त्यामध्ये अपयश येते. ती प्रक्रिया बेदेखल करण्यासाठी पुरस्कार प्रदान सोहळा साजरा केला जातो. हीच मोठी श्रमसेवक माहिती आहे.

जीवनाचा क्षय श्रमावर दबावामुळे राहतो. तो अक्षय आक्षेप नसतो. ती अजिबात धमकी नसते. कारण घाबरायचं नाही . लढायचं हेच श्रमाचं मोठं घबाड आहे.

श्रमामध्ये स्वाक्षरीला खूप महत्त्व आहे .कारण स्वाक्षरी ही श्रम करणारा हजर आहे याची शाश्वती देते आणि स्वाक्षरी ही वर्क ऑर्डर पार पाडते. मग स्वाक्षरी ही निशाणी स्वरूपात निर्णय घेते. अजिबात माघार घेत नाही अनधिकृत आणि अधिकृत यांची ती पोचपावती ठरते.
जीवनाचा हक्क आणि जगण्याचा हक्क हे प्रकरण म्हणजे विरोधी तक्रार नाही तर ती एकमेकाला पूरक अशी शक्ती ठरते. कृती आणि संधी उपलब्ध होते. याचं कारण एकच आहे की श्रम म्हणजे महाविचार... व्यक्त करणे ....
श्रमाचा अतिउच्च अर्थ म्हणजे महाज्योत. महाज्योतीचा अतिउच्च अर्थ श्रमदर्जा...

ज्यांना श्रम छत्र लाभत नाही .ते अनाथ असले तरी चिंता करीत नाहीत त्याचं कारण असं आहे की त्यांची काळजी हा श्रमनाथ घेतो. श्रमनाथ हा कोटी कोटी श्रमजांचा श्रमनाथ आहे. श्रमात अशा अनेक अतर्क्य गोष्टी आहेत ज्याने माणसाची मती कुंठीत होते. याचे स्पष्ट आणि स्वच्छ उदाहरण म्हणजे भिकाऱ्याने हात पुढे केला तरी त्याच्या हातावर श्रमाचे दाम मिळतं. टाळी वाजवत फिरून सुद्धा श्रमदानाने जीवनमजुरी मिळवता येते. घरोघरी फिरून झोळीमध्ये सुद्धा श्रमाचे दान घेता येते.

सच्चेपणाने काबाडकष्ट करून, नोकरी करून, उद्योग धंदा करून प्रामाणिकपणे सुद्धा जीवन मजुरी मिळवता येते हेच मोठे श्रमाचे महा वैशिष्ट्य ठरतं.
खरंतर श्रम प्रकियेसाठी पुढाकार महत्त्वाचा असतो तो पुढाकार एकदा ठरला म्हणजे जीवनाला गती मिळते. ज्या क्षणी जीवनाला गती मिळते त्या क्षणी श्रमकीर्ती अवतार घेते. जगामध्ये,देशांमध्ये,गावांमध्ये, शहरांमध्ये , कार्यालयामध्ये, समाजामध्ये, पृथ्वीचारांमध्ये श्रम करणाऱ्या व्यक्तीला अजरामर करून सोडते. याचा अनुभव आपल्या अवतीभोवती जिवंत पणे अनेक जण उपभोगीत असतात. मग उद्योग घराणे म्हणून नावारूपास आलेली व्यक्ती श्रमक्षेत्र पदाकांत करून सोडते. अथवा नोकरदार घराणे म्हणून उदय पावते.

कफल्लक हात अथवा दिवाळखोर श्रमखोर वृत्ती समाजामध्ये छुप्या रीतीने वावरत असते संधी मिळाली की ती त्या गोष्टीचा ताबा घेते आणि मग त्या राष्ट्राला, त्या व्यक्तीला, त्या संस्थेला, त्या क्षेत्राला अगदी नामोहरण करून सोडते. यालाच श्रमाचे नुकसान म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये मग जीवनाची होळी सुद्धा होते.