चंपा - भाग 12 Bhagyashali Raut द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चंपा - भाग 12

चंपा





चंपा...चंपा ही नक्कीच कोल्हापूरला निघून गेली असणार ...राम स्वतःशीच अंदाज बांधत बोलत होता.

परत रूम मध्ये गेला आणि टीशर्ट घालून गाडीची चावी घेतली बाहेर जाऊन पटकन गाडी काढली आणि एसटी स्टँड गाठले. गाडी एसटी स्टँडच्या पार्किंग मध्ये घातली आणि तसाच पळत प्रत्येक कोल्हापूरच्या बसमध्ये चढून बघत होता. चंपा कुठेच दिसतं नव्हती. चाचची माणसं ही प्रत्येक बस मध्ये चढून चंपाला शोधत होती. त्यांच्या अश्या भरभर गाडीमध्ये चढून बघण्याच्या पद्धतीने सगळे प्रवाशी घाबरत होते. राम तर वेड्यासारखा चालू गाडीतही तिला शोधत होता पण अजूनतरी ती असेल इथेच अशी आशा होती म्हणून प्रत्येक कोल्हापूरला जाणाऱ्या बसमध्ये तो तिला शोधत होता.
राम चंपाचे चांगले होण्यासाठी तिला शोधत होता तर चाचाचे लोक तिला पुन्हा नरकात नेण्यासाठी तिला शोधत होते. चंपा खूप घाबरलेल्या अवस्थेत मान खाली घालून बसली होती रामने तिला पाहिले आणि तिच्या शेजारी बसला.

"का अशी निघून आलीस?" चंपाने घाबरून त्याच्याकडे पाहिले तर राम तिच्याशेजारी बसला होता.

"सर तुम्ही का आलात इकडे??? चाचाने इथे त्याची माणंस पाठवली आहेत मला शोधायला उगीच तुम्ही यात अडकू नका. जा तुम्ही…"
"तुला एकटीला सोडून ? कस शक्य आहे? तू घाबरू नकोस ?" गाडीमध्ये कंडक्टर चढला.
"तिकीट... तिकीट ...बोला " कंडक्टर ओरडत त्यांच्याजवळ आला.
"एक कोल्हापूर..." चंपा म्हणाली.
"नाही उतर खाली… नाही जायचं तू कुठेही."
"साहेब घरची भांडण स्टँडवर घेऊन नका येत जाऊ बाबा... एवढं व्हत तर घरीच बायकोची मनधरणी करायची ना... ओ बाई अहो म्हणतायत एवढं साहेब तर जावा की कशाला उगीच ताणताय…?"
"चल उठ ..." राम म्हणाला .
"नाही... तुम्ही जा…"
"उगाच हट्ट करू नको चंपा उठ.…"
"तुमचं ठरवा आणि ठरलं की मला सांगा मी येतो परत." अस म्हणत कंडक्टर पुढे गेला तेवढ्यात चाचची माणसं भरभर गाडीत चढली.
चंपाने त्यांना पाहिलं आणि घाबरून रामला बिलगली…
"आता???"
"घाबरू नकोस उठ??"
"ते ओळखतील मला…"
रामने चंपाचा हात घट्ट पकडला.
"उठ.."दोघे उठले चंपाच्या खांद्यावर त्याने हात ठेवला तिला एक साईडने बाजूला नेले तेवढ्यात आवाज आला.
"ये अबे रुक...बाहेर क्यो जा रहा हे?"एकजण बोलला. तेवढ्यात कंडक्टर आला.
"क्या हे, कायको बस मे चढे? दूसरा बोलला.
"ये कंडक्टर एक लडकी ढुंढ रहे हैं|"
चंपाला आता घाम सुटला होता. ती आणखीच रामला घट्ट बिलगली.
"क्या हे? बीबी हे मेरी, रूढी थी तो मनाके ले जा रहा हूं। " राम न घबराता म्हणला.
"हा हा मान गयी क्या भाभी? अच्छा हे अजून मत बदलायच्या आधी घेऊन जा तिला, त्यांना जाऊद्या उगाच अडवू नका." कंडक्टर हसत हसत बोलला.
राम आणि चंपा पटकन बसमधून खाली उतरले. पळत गाडीकडे गेले.
" चंपा पळ, जोरात.." तेवढ्यात एक बस मध्ये आली.
"सर पटकन जायला पाहिजे, नाहीतर...
"नाहीतर काहीही होणार नाही त्यांच्या समोरुन तुला घेऊन आलो तुला पुन्हा नाही त्यांच्या तावडीत सापडू देणार. " तेवढ्यात बस जाते चल... लवकर… गाडीपाशी पोहचले आणि गाडीत बसले गाडी पंधरा मिनिटात घराजवळ पोहचली दोघांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.
"थँक्स सर…"
थँक्स काय? एक तर न सांगता निघून गेलीस आज काय झालं तर?"
"अजूनही काय सांगता येतंय चाचा घरापर्यंत पण पोहचेल मी चांगली ओळखते त्याला मी जास्त नाही राहू शकत इथे."
"काहीही होणार नाही मी आजच कम्प्लेण्ट करून येतो." राम भरदाव वेगाने गसी चालवत घरापर्यंत आला. दोघेही गाडीमधून उतरले आणि आतमध्ये गेले. रामने मोबाईल काढला आणि देशमुख साहेबाना फोन लावला.
"हॅलो देशमुख साहेब मी राम पटवर्धन बोलतोय... हो हो… सर आज दुपारी तुम्ही आहेत का? मला भेटायला यायचं होत. ओके मग 5 पर्यंत पोहचतो. थँक यु सर…"

चंपा आधी मी भेटून त्यांना सविस्तर माहिती त्यांना सांगतो मग आपण त्यांना भेटायला जाऊ. तू घरीच थांब, मी ऑफिसची काम संपवतो आणि देशमुख सरांना भेटायला जातो. आलोच फ्रेश होऊन.
काहीही न बोलता चंपा लगबगीनं किचनमध्ये गेली आणि ट्रॉली मध्ये काय काय आहे ते बघून तिने पोहे करायची तयारी केली. राम एकटा असून किचनमध्ये एवढे व्यवस्थित किराणा भरलेला बघून चंपाला आश्चर्य वाटले… पोह्यांची प्लेट तयार करून ती रामच्या वाट बघत हॉल मध्ये थांबली बराच वेळ झाला तरी राम येत नाही म्हंटल्यावर तिने पोह्यांचा ट्रे उचलला आणि त्याच्या रूमकडे गेली दरवाजा थोडा उघडा असल्याने तिने हळूच दरवाजा उघडला आणि आत गेली. तिथेही राम नव्हता तीने ट्रे टीपॉयवर ठेवला आणि बेडवर बसली. तेवढ्यात बाथरूम मधून राम बाहेर आला चंपाचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि ती त्याच्याकडे बघतच बसली त्याने कमरेखाली टॉवेल गुंडाळला होता. अंगावरून ओघळनारे पाण्याचे थेंब तिच्या नजरेत भरले. प्रथमच एवढया जवळून ती पुरुषाला पाहत होती. तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. त्याचे डोळे, त्याचा रंग,त्याचे केस, केसांमधून टिपकणारे पाणी त्याच्या मानेवरून ओघळत होते. सगळं सगळं ती डोळ्यात साठवून घेत होती. रामला तिच्या डोळ्यात प्रेम दिसत होते. रामने पटकन टीशर्ट चढवला. चंपाला लाजल्यासारखे झाले.



प्यार करते थे उनसे,
इजहार करपाए,
इंतजार में खडे थे लेकिन,
वो आए तो आँख
मिल ना पाए



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत