भरकटलेली पाखरं Gajendra Kudmate द्वारा मानवी विज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भरकटलेली पाखरं

(Note: शेवटपर्यंत एकदातरी आवर्जून वाचा जबरदस्ती नाही तर प्रेमळ विनंती आहे)
नमस्कार मित्र हो, आज आपन पुन्हा एका नविन विषयावर बोलू. कदाचित माझ्या या वाक्याला कंटाळले असाल, हरकत नाही. तर मित्र हो, मी आज आपल्या भावी पिढीला म्हणजे शाळेकरी मुले मुली आणि तरुण पिढी यांच्या भवितव्याला लागलेली जी भयंकर अशी उदळी हिंदीत त्याला दिमक कसे म्हणतात. त्याबद्दल बोलणार आहे.
मित्र हो, आज इकडली तिकडली गोष्ट न करता मी सरळ मुद्द्यावरच येतोय. तर मित्र हो, तुम्ही सुद्धा मोबाइल वापरता. मोबाइलमध्ये यू ट्यूब टिकटॉक सारख्या अनेक ऍप आहेत. ते एकदा तरी उघडता, प्रत्येक व्यक्ती सर्वच ऍप उघडत नाही, परंतु त्यातील एक तरी उघडतो. यू ट्यूब तर हमखास उघडतो. तर मित्र हो, हे ऍप उघडल्यावर ट्रेडिंग व्हिडिओजमध्ये बॉलीवूडचा गाण्यावरती, डायलॉगरती काय ते प्रकार MEME म्हणतात त्याला. त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कमीत कमी १५ मिनिटे तसेच वेगवेगळे व्हिडीओ आपण एकदातरी बघतो किंवा सुरू करुन बंद करतो म्हणजेच प्रयास करतो. अशा प्रकारे प्रत्येकाने जरी एक व्हिडिओ पाहिला तर आज संपूर्ण जगाची आबादी मोजू शकत नाही तेवढी कुठच्या कुठे चालली आहे तितक्याच प्रमाणात ते व्हिडिओ उघडले जातात. इतक्यात एक व्हिडिओ फारच धमाल करतोय "पुष्पराज" या व्हिडिओंना रोज आलटून पालटून लोकं बघत आहेत.
मित्र हो, जर तुम्ही लक्ष्य करुन बघितलं तर प्रत्येक वेळी वेगवेगळे स्टार्स ऍकटींग करताना दिसतील. स्टार्स यासाठी म्हणतो की त्यांनी जन्म घेतला तर ते त्यांच्या आई वडिलांचे स्टार्स झालेत आणि आता त्या ऍपवर त्या व्हिडिओच्या द्वारे चमकत आहेत. तर ते स्टार्स झाले की नाही. तर मित्र हो, माझा खरा मुद्दा इथून सुरू होतो. मित्र हो, यू ट्यूब, टिकटॉक सारख्या ऍप वर आजकालची शाळेकरी मुले मुली कॉलेज मधील तरुणाई सुद्धा आहेत याबरोबर गृहिणीहि सुद्धा काय ते डायलॉग म्हणा की बॉलीवूडच्या गाण्यांवर डान्स करून व्हिडिओ बनवीतात आणि अपलोड करताच. तेच व्हिडिओ एका ऍपवरुन दुसर्‍या ऍपवर अपलोड होत असतात.
मीत्र हो, मी ऐकदोन स्टार्सना विचारलं तर याबद्दल मला त्यांनी सांगितले की आम्हाला व्ह्यूअर्स आणि फॉलोअर्सची संख्या वाढवायची आहे. मी विचारलं अरे बाबांनि व्ह्यूअर्स आणी फॉलोअर्स वाढवुन काय करायचे आहे. पूढे त्यांनी सांगितली कि यू ट्यूब,टिकटॉकसारख्या ऍपवर जर १० लाख व्ह्यूअर्स आणि फॉलोअर्स झालेत तर प्रत्येक लाईक आणि व्ह्यूअर्स आणि फॉलोअर्स प्रमाणे रॉयल्टी म्हणजे पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये येणार. मी सहजच म्हटले हे आमिष आहे, असं काही नसतं. हे नादान काहीच नाही जाणत व्ह्यूअर्स बद्दल त्यांना नीत रोज नवीन वस्तू बघायला पाहिजे. एकदा वस्तू जुनी झाली की ढुंकूनही बघत नाही. व्ह्यूअर्सच काय सांगता या तरुणांना यानं काल आईने जेवनात दिलेली भाजी नकोय पिझ्झा बर्गर हवे.
मित्र हो, आजची तरुण पिढी आणि शाळेकरी पिढी संपूर्ण भरकटून गेली आहे. त्यांच्या डोळ्यात ते व्हिडीओ बनवायचे आणि फेमस व्हावे असा नाद लागलाय, की ते स्वत:च्या भविष्याशी खेळत आहेत. हे त्यांना कळत नाही आहे की आज आताच त्यांचं वय आणि बुद्धी हि कोवळी आहे. या दोघांच्या उपयोग या वेळेस त्यांनी फक्त प्रशिक्षणात लक्ष केंद्रित करून त्यांच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी केलेल्या पाहिजे. कारण या मुला मुलींची बुद्धी हि मऊ अशा मातीसारखी असते. जिला जसे वाटते तसे आकार देता येते. जिच्या मदतीने भविष्यातील स्वप्नांची सुंदर मूर्ती बनविता येते. परंतु जर त्याच मेंदूत असे भरकटणारे विचार आज टाकाल तर आयुष्यभर तुम्ही भरकटतच रहाल लक्षात ठेवा. या वयात त्यांच्या मेंदूत शिक्षणाची लहर असते जिचासोबत ती निरंतर वाहत असतात आणि पुढे आपल्या निश्चित ध्येयाला गाठतात.
मित्र हो, भरकटण्याचं एक उदाहरण देतो, आपण लॉटरी बघितली आहे. बंपर ड्रॉ १०० रूपये लॉटरीवर १० लाख इनाम नक्कीच बघितली आणि विकत घेतलेली आहे. तर मित्र हो, १०० रूपात १० लाख मिळण्याच्या आशेने आपण भरकटून जातो. परंतू याचा पलिकडचा विचार केला काय? १०० रुपयांची लॉटरी जर १० दहा लाख लोकांनी घेतली तर लॉटरी कंपनीकडे १ कोटी जवळ जवळ पैसे गोळा होतात. लॉटरीनुसार १० लाख रुपये बक्षिस एकाच व्यक्तीला देणे आहे. १ कोटींतून १० लाख दिले तरीसुध्दा ९० लाख त्या कंपनीकडे शिल्लक आहेत. त्यात पैसे लोकांचे, लोकांनी भरले, बुंदभर नफा एका व्यक्तीला मिळाला आणि संपूर्ण पैसा लॉटरीवाल्या कंपनीकडे गेला. यावरून हेच सांगू इच्छितो की आपल्यापैकी कुणीही एक जरी व्हिडिओ बघितला किंवा प्रयास तरी केला तर त्या ऍपला एक ग्राहक भेटतो. आपल्या सरखे अनगिनत लोक मिळुन कंपनीच्या धंदा जोरात चालतो.
मित्र हो, अशा जीवघेण्या कंपन्यांसाठी आपली शाळेकरी आणि तरुण पिढी स्वतःचे भविष्य अंधारात घालताहेत. कधी न मिळणाऱ्या त्या पैशाचा आणि प्रसिद्धचा नादात भरकटून आपली अनमोल अशी वेळ या निरर्थक अशा व्हिडिओमागे बेकार घालवत आहेत. अरे नादानांनो व्ह्यूअर्स आणि फॉलोअर्स वाढवून काहीच होत नाही. बाबांनो स्वार्थ पुर्ती झाल्यानंतर सगे संबंधी दोस्त मित्र ढुंकूनही पाहत नाही. हे तर न पाहिलेले लोक आहेत त्यांना तुमच्या सुख दु:ख, वर्तमान, भविष्याबद्दल काहिच करायचे नसते. त्यांना फक्त त्यांची करमणूक आणि मनसमाधान हवा आहे. आणि इथे सर्व बरोबर आहे. त्यांनी संबंधित ऍप याकरिता डाऊनलोड केला आहे की त्यांनी तुला चेंज हवाय, त्यांना रोज नवनवीन करमणूक हवी. जर तुमचे काम त्यांची करमणूक करत असतील तर तूम्ही त्याचे खरे स्टार्स आहेत अन्यथा कुणीच नाही. ते तुम्हाला नाही तर तुमचा कामाला लाईक करतात. काम नाही तो लाईक नाही, हम तुमको पहचानते नही.
म्हणून भरकटलेल्या पाखरांनो हे वय तुमचे काम करायचे नव्हे तर शिकून आपले भविष्य सावरण्याचे आहे. काम करण्याची एक निश्चित वेळ जीवनात पुढे येईल. आत्तापासून मेंदूत भरकटलेले विचार राहतील तर तुम्ही काहीच मिळवू शकत नाही. पुढे हे जेव्हा खरंच तुम्हाला कामाबद्दल कुणी विचारलं तर तुम्हाला हे सांगण्याचे सामर्थ्य राहणार नाही आणि तुम्ही तुमची बुद्धी तुम्हाला साथ देणार नाही. कारण कि तीसुद्धा भरकटली आहे तुमच्या प्रमाणे. माझ्या भरकटलेल्या पाखरांनो पुन्हा एक विनंती करतो की लवकरात लवकर या विनाशकारी स्वप्नातून बाहेर या आणि आपल्या वर्तमानाला बलशाली बनूवून भविष्य उज्ज्वल करा.
धन्यवाद.

स्वलिखित

गजेन्द्र गोविंदराव कूडमाते